बायपास...

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
23 Oct 2015 - 12:03 am

खुप मजा यायाची गावांत. पूर्वी एवढा पैसा कधीच दिसायचाच नाही. व्यवहार ज्वारी, बाजरी आणि गहु यांवर चालायचे. आठाभर बाजारी घातली कि हप्ताभरच्या चहाची सोय व्हायची. लोकं कष्टाळु होती तशीच प्रेमळ ही खुप होती. कुना एकाच्या दुःखावर अख्खी गल्लीच काय तर गांव गोळा व्हायचा. हाड़ाचं वैर असलं तरि दवाखाना म्हटलं कि उतरंडीत ठेवालेले पै पैसे निघायचे. अडल्या बाळंतनीला तालुक्याला नेयाला निम्म्यारातिला गाड्या जूपायच्या.
पण ती अडदंड सड़क गावाला घासुन गेली अणि गांव बदलला. गावाचा भूगोल बदलला तसेच मानसशास्त्र हि बदलले. लोकांना पैस्याचा हव्यास जड़ला. कारखाने आले, मोठ मोठी दुकानं थाटली. लांडगी वाढली. वाघांचे रक्त-मांसानं भरलेली ठसे दिसू लागली. ससे बिळातच दडू लागली. हरणांची कत्तलं होउ लागली. भावना जपणाऱ्यांना पूर्वी प्रेमळ म्हणायचे अतातेच मुर्ख ठरू लागले. खोट्या भावना पाझरणाऱ्यांना रोकड़ मिळु लागली तशी भावनांची दुकानं फुलू लागली.

समाजजीवनमान

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

23 Oct 2015 - 12:48 am | चित्रगुप्त

हे काय ? पहिला परिच्छेद खूपच प्रभावी वाटला, आणि आता काहीतरी छान वाचायला मिळणार अशी अपेक्षा निर्माण झाली, पण लेख पटकन आटोपला, आणि दुसर्‍या परिच्छेदातले ... "लांडगी वाढली. वाघांचे रक्त-मांसानं भरलेली ठसे दिसू लागली. ससे बिळातच दडू लागली. हरणांची कत्तलं होउ लागली" हे सर्व कारखाने, मोठमोठी दुकाने असलेल्या शहरात कसे घडू लागले, हे समजले नाही. ही शतशब्द कथा आहे की काय ?

मांत्रिक's picture

23 Oct 2015 - 5:46 am | मांत्रिक

मी स्वतः माझं गाव असंच बदलताना बिघडताना पाहिलंय! त्यामुळं समजलं तुम्हाला काय म्हणायचंय ते. पण थोडंसं कथारुप देउन खुलवता आली असती.

चांदणे संदीप's picture

23 Oct 2015 - 6:33 am | चांदणे संदीप

मागच्या कथेत ऑस्कर मिळाल्याने तुमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत कांबीकर साहेब!

सुरूवात सरळमार्गाने केली तर शेवटही तसाच छान रमतगमत करायचा. खूप जास्त उपमा आणि रूपके यांच्या जंगलात वाचक वाट हरवून भटकले!

पुलेशु!
Sandy

मागच्या कथेत ऑस्कर मिळाल्याने तुमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत कांबीकर साहेब!

हे राम.

चांदणे संदीप's picture

23 Oct 2015 - 3:51 pm | चांदणे संदीप

;-)

आनंद कांबीकर's picture

23 Oct 2015 - 5:25 pm | आनंद कांबीकर

नविन हाओत एमी अजुन

बिन्नी's picture

23 Oct 2015 - 8:12 am | बिन्नी

बरं.

आनंद कांबीकर's picture

23 Oct 2015 - 5:26 pm | आनंद कांबीकर

कुठ बी आपलं एक शब्द टाकायचा की झाला प्रतिसाद

सुबोध खरे's picture

23 Oct 2015 - 9:12 am | सुबोध खरे

पूर्वीचा काळ चांगला होता आणि गावंच कशी चांगली होती आणि शहरं कशी स्वार्थी होती? शहरात सुद्धा चाळीच कशा चांगल्या आणि फ्लैट कसे वाईट हे वेगवेगळ्या रागात आणि लयीत चालीत ऐकलं आणि वाचलं आहे. असं म्हणायची पद्धत असते हेही वाचून कंटाळा आला.
मानवी वृत्ती काही दहा हजार वर्षात बदललेली नाही. गावात एका भावाच्या त्यागावर घर उभारलेला पाहिलेलं आहे. ( म्हणजे बाकी लोक नुसते बसून खात होते) बापाला दहा बारा पोरं असत त्यातील मोठ्या पोराने बापाचा संसार चालवायचा आणि मोठ्या बहिणीने लहान भावंडांचा सांभाळ करायचा. त्यांच्या भावनांना किंवा आशा आकांक्षाना किंमत नव्हती? आजच भावनांची दुकाने फुलू लागली का? विभावरी शिरुरकर यांनी लिहिलेले कळ्यांचे निःश्वास वाचा. बाबांचे संसार माझा कसा होणार?
भाऊ बंदकी काय आजच्या काळात आहे? औरंगजेबाने आपल्या भावना मारले आणि बापाला तुरुंगात टाकले. प्रत्यक्ष मेहुण्याने शिवाजी महाराजांशी फितुरी केली. हि काय आजच्या काळात झालेली गोष्ट आहे.
सोने नाणे यासाठी तेंव्हा हि खून पडत आजही पडतात. चोर दरोडेखोर पेंढारी ठग काय आजच जन्माला आले. बालविधवा, परित्यक्ता, दोन किंवा तीन लग्न करणे आणि बायका "ठेवणे" हे आज दिसत नाही.
पण जुना काळ चांगला होता, खेडी कशी उत्तम होती हा राग आळवलाच पाहिजे का?

आनंद कांबीकर's picture

23 Oct 2015 - 10:33 am | आनंद कांबीकर

..... या बदलचं आम्ही जरा जास्तच लाउन धरलं अणि भाऊ तुमी बी लइ मनाला लागून घेतलं. नई लिहनार भाऊया इश्यावर् अता.

सुबोध खरे's picture

23 Oct 2015 - 11:11 am | सुबोध खरे

आम्ही कशाला मनाला लावून घेऊ? आणि लावून धरण्यासारखे काय आहे?
आणि तुम्हाला लिहायचं ते तुम्ही लिहा आम्हाला पटेल तो आम्ही प्रतिसाद देऊ. बस

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Oct 2015 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

शतकानुशतके माणसाच्या भावना तश्या फार बदलल्या नाहीत. राग, लोभ, भिती, प्रेम, व्देष, चंचलता, बनेलपणा, इ इ इ तसेच आहे.... इतकेच काय "पूर्वी काय कसे सगळे छान छान होते, हल्ली सगळंच बिघडलंय" असे म्हणण्याची प्रवृत्तीही अगदी तशीच शाबूत आहे =))

असंका's picture

23 Oct 2015 - 2:37 pm | असंका

:-))

टवाळ कार्टा's picture

23 Oct 2015 - 3:34 pm | टवाळ कार्टा

खिक्क...गुडलेंग्थ बॉलला पार स्टेडियमच्या बाहेर मारले

इतकेच काय "पूर्वी काय कसे सगळे छान छान होते, हल्ली सगळंच बिघडलंय" असे म्हणण्याची प्रवृत्तीही अगदी तशीच शाबूत आहे =))

अगदी अगदी....याचे एक वेगळ्या क्षेत्रातील उदाहरण पतंजलींच्या व्याकरणमहाभाष्यात मिळते. ते म्हणतात,

"पूर्वीचे ब्राह्मण अगोदर व्याकरण शिकून मग वेद शिकायचे त्यामुळे कुठे काय कसं आहे ते नीट कळायचं, नैतर आजकाल वेद नुस्ते घोकताहेत."

महाभाष्य हे इसपू २०० च्या आसपास आहे असे मानले जाते.

अजून सर्चवले तर अनेक ठिकाणची अन अनेक काळांतली उदाहरणे मिळतील.

बाकी ब्रिटिश काळात "ब्रिटिशपूर्व भारत = सुवर्णकाळ" हे समीकरण उदयाला आले हेही वेगळे सांगणे न लगे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Oct 2015 - 6:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

सायफाय पिक्चरमध्ये दाखवतात तसे प्राचिन मानवी आवाजांला जमा (रिकव्हर) करता आले तर, "आमच्या काळात भाल्यांनी शिकार केली जायची. काय सायबा ते भाले आणि काय ते धाडस ! पण, या हल्लीच्या नवीन लेच्यापेच्या पिढीत धनुष्य-बाण का काय ते म्हणतात त्यांनी दुरून भेकडासारखी शिकार करायची टूम निघालीय" असे आवाज मिळतील असा दाट अंदाज आहे ;) :)

चित्रगुप्त's picture

23 Oct 2015 - 8:53 pm | चित्रगुप्त

या प्रकारचा सर्वात प्राचीन उल्लेख चिनी साहित्यात आहे म्हणे. एक म्हातारा दुसर्‍याला सांगतो आहे: हल्ली म्हणे ओढा पार करण्यासाठी त्यात दगड ठेऊ लागले आहेत... नवीन पिढी अगदी कुचकामाची आहे, तिला पोहून जायला नको... वगैरे.

मार्मिक गोडसे's picture

23 Oct 2015 - 4:10 pm | मार्मिक गोडसे

आनंदसाहेब, 'अ‍ॅग्रोवन' मधील इरगोंडा पाटील ह्यांचे 'दवंडी' हे सदर वाचा. डॉक्टरसाहेबांनी ग्रामीण मानसांच्या वृत्तीबद्दल जे काही थोडक्यात सांगीतले, ते तिथे रोज सविस्तर वाचायला मिळेल.

प्यारे१'s picture

23 Oct 2015 - 4:17 pm | प्यारे१

यात खेड़ी चांगली चा सूर असेल कदाचित पण एक्सप्रेस हायवेमुळे बदललेली समीकरणं नक्कीच जास्त महत्त्वाची आहेत. मुंबईहून पुण्याला जायला 8-10 तास लागणं त्यात एखादा ट्रक घाटात बंद पडला की आणखी बोम्ब. अगदी वाई पुणे 100 किमी अन्तराला सुद्धा 5 तास लागायचे. खांबाटकी घाट अरुंद त्यात दुपदरी वाहतूक वगैरे. या पार्श्वभूमीवर रस्ते चांगले झाले. प्रवासाचा वेळ निम्म्याहून कमी झाला. रस्त्याच्या बाजूच्या जमिनीचे भाव वाढले आणि त्या जमीनी विकून आलेल्या पैशावर राडे घालायची वृत्ति पण वाढलीय.
रस्त्यांनी समीकरणं बदललीत नक्की.
2000 सालपर्यन्तचं आळशी पुणे आता कसं बदललंय बघताय ना? ;)

आनंद कांबीकर's picture

23 Oct 2015 - 5:35 pm | आनंद कांबीकर

अगदी बरोबर आहे प्यारे भाऊ पण लय चंगळवाद वाढलाय. जमिनीचा आलेला भरपूर पैसा संपला कि पूढच्या पिढीचे लए हाल होणार भौ.

मग तो जमिनीचा पैसा मिळणाऱ्या लोकांचा मूर्खपणा नाही का ?
आलेले सगळे पैसे उधळून लावायचा फालतूपणा करायचा आणि मग एकमेकाची नरडी धरायची यात कसला शहाणपणा आलाय ? आणि पुढची पिढी फक्त बसून खायला जन्माला घत्लिए ? आलेल्या पैश्यात त्यांना चांगलं शिकवा स्वतःचे काम धंदे सुरु करा , कोण नको म्हणलाय ?
तेच पैसे कुठे गुंतवले . दुसरी जागा घेतली . हे नाही करत .

चंगळ करायची कि आलेल्या पैश्याचं नीट नियोजन करायचं हे स्वतःच्या बुद्धीवर असतं . उगा चांगल्या झालेल्या रस्त्याला नावे ठेवण्यात काही अर्थ नाही .

तिमा's picture

23 Oct 2015 - 5:19 pm | तिमा

या जगांत चांगले आणि वाईट हे अनादि काळापासून आहे. प्रत्येक धडपडणार्‍या जीवाला स्वार्थ असतोच. जितकी स्पर्धा वाढते, तितका तो वाढतो. जीवनावश्यक गोष्टींची अनिश्चितता जाणवू लागली की साठेबाजी वाढते. शांत आणि सरळ जीवन बहुतेकांना हवे असते. पण तसे ते सध्याच्या काळात मिळणे मुष्किल आहे. त्यामुळे जग बदलते तसे आपण बदलावे.

विवेकपटाईत's picture

23 Oct 2015 - 6:46 pm | विवेकपटाईत

बायपास वाचल्या बरोबर सव्वा वर्षाआधी हॉस्पिटल मध्ये सकाळी येणाऱ्या त्या सुंदर नर्सची आठवण झाली. बाकी दिल्लीच्या अधिकांश गावांमध्ये हेच झाले आहे. अधिकांश लोकांचा एकदोन पिढीत पैसा संपून जाणार, हेच सत्य.

चित्रगुप्त's picture

23 Oct 2015 - 8:49 pm | चित्रगुप्त

मी रहातो, त्या दिल्लीजवळच्या हरियाणातील यमुनेच्या जवळ (म्हणजे कित्येक किलोमीटर पर्यंत) असलेल्या अनेक शेतकर्‍यांनी आपापल्या शेतातली वरची दहा-वीस-तीस फूट माती विटा बनवणारांना विकली, त्याचे लाखो रुपये मिळाले ते मोठमोठ्या गाड्या, दारू यात उडवले. आता दरवर्षी ती जमीन यमुनेच्या पुराने भरते त्यामुळे कोणत्याही कामाची राहिलेली नाही.

चौथा कोनाडा's picture

23 Oct 2015 - 7:12 pm | चौथा कोनाडा

छान लिहिले आहे. कथा आवडली.

या सिनेमाची ( अर्थात लेखाची ) पटकथा नेहमीची असली तरी दोन परिचछेदात चापुन चोपुन बसवल्यामुळे प्रभावी वाटली.
लेखन शैली छान आहे.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत !
(हे मुद्दाम लिहिले आहे. बायपास नंतर एक्सप्रेस हायवे हा सिनेमा आणता येइल. म्हंजे मग बायपासचे दिवस कसे चांगले होते हे ठसवता येइल )
लिखते रहियो आनंदभाऊ !

शिव कन्या's picture

23 Oct 2015 - 7:26 pm | शिव कन्या

थोडक्यात पण छान लिहिलेय. पुभाप्र.

पैसा's picture

23 Oct 2015 - 7:30 pm | पैसा

 ed ed.gif

आनंद कांबीकर's picture

26 Oct 2015 - 2:08 pm | आनंद कांबीकर

.......

चित्रगुप्त's picture

23 Oct 2015 - 8:42 pm | चित्रगुप्त

'बायपास' नामक मूक लघुपट (१६ मिनीटे: नवाजुद्दिन सिद्दिकी, इरफान खान) अतिशय प्रभावी आहे, अवश्य बघा:
https://www.youtube.com/watch?v=NCRBY9ss-58

मार्मिक गोडसे's picture

23 Oct 2015 - 9:36 pm | मार्मिक गोडसे

धन्यवाद,
पैशाचा जीवघेणा प्रवास. आवडला लघुपट.

नाखु's picture

26 Oct 2015 - 5:33 pm | नाखु

सगळेच "बाय" करतात "पास" कुणीच करेना.

गावकुसाबहेरचा नाखु

आनंद कांबीकर's picture

28 Oct 2015 - 5:49 pm | आनंद कांबीकर

....

सागरकदम's picture

28 Oct 2015 - 6:55 pm | सागरकदम

खेळ सात बाराचा म्हणून एक चित्रपट आहे ,ह्यावरच आहे