तो तरुण व्यावसायिक होता..स्मार्ट आत्मविश्वासाने भरलेला.
व्यवसाय मस्त चालला होता..
त्या निमित्ताने ब्यांकेत ये जा असायची..
त्याचे खाते पहाणारा त्याचा मित्रच होता..
ब्यांकेत ति पण नवीनच आलेली होती..
सुंदर म्हणता येणार नाही पण आकर्षक व्यक्तिमत्त्व..अती साधी राहणी..
चेहे~यावर गूढ गंभीर भाव..स्वतःचाच विचारात व विश्वात बुडून गेलेली..थोडी उदास..काही तरी शोधतेय ति..
त्याला ति आवडली..मित्रास विचारले अन तो म्हणाला..ति होय कावेरी जोशी.फारशी कुणात मिसळत नाही खूप अबोल व फटकून वागणारी आहे...
तो विचार करायचा..काय नेमके हरवले असेल तिचे? वा निसटले असेल?.इतकी छान दिसते पण अशी काकू बाई सारखी का राहते? वाटले आपण हिच्या जीवनात जावे अन तिला आमूलाग्र बदलावे..चेहे~यावर आनंद आणावा ..तिच्या जीवनात प्राजक्ताची फुले फुलवावीत..सहजीवनाच्या माध्यमातून..
पण तो व्यक्त झाला नाही कधी...
.
तो ब्यांकेत आला सवयी प्रमाणे पाहिले ति दिसली नाही..त्याने व्याकुळतेने विचारले.."अरे ति महिन्याची रजा टाकून गेली आहे..कुठे ते माहीत नाही.."
त्याला ब्यांकेत जावेसे वाटेना..आपल्या असिस्टंटला कामासाठी तो ब्यांकेत पाठवू लागला..मात्र अधून मधून चक्कर मारत असे ति आली असेल या आशेने..
.
ति ब्यांकेत येणार असे त्याला वाटत होते..व त्या अंदाजाने तो ब्यांकेत गेला ..
पाहिले ति आली होती...अन तिच्या कडे पाहिल्यावर तो चकित झाला.
ति पूर्णं बललेली त्याला दिसली..तिने खांद्यापर्यंत केस कापलेले होते..छानसा फुला फुलाचा ड्रेस तिने घातलेला होता तो तिला शोभून दिसत होता..चेहे~यावर आनंद व आत्मविश्वास होता..सहका-याशी ति गप्पा मारत होती..खळखळून हसली ..किती छान दिसत होती...
.
काम झाल्यावर बाजुच्या कोचावर तो बसला. अन विचार करू लागला...तिचा.
त्याने ओळखले तिला जे हरवले निसटले ते गवसले होते..तिचा लुप्त झालेला आनंद आत्मविश्वास तिला मिळाला होता..जीवनात फुले फुलली होती..देहबोली त्याची साक्ष होती..
त्याला तिचे ते रुप आवडले नाही..आपली तिच्या जीवनात हळुवार पणे आनंद फुलवण्या ची संधी कुणी तरी हिरावली असे त्याला वाटू लागले व तो थोडासा उदास झाला ...मला तू अशी नको आहेस गं... तो म्हणाला.मला तुझे जुने रूप हवे आहे..साधे स्वतःत बुडून गेलेलं काहीतरी शोधणार..थोडंसं उदास...
.
मग तो शांत झाला अन त्याला आपल्याच विचाराचे हसू आले..तिला अधिकार नाही आनंद शोधण्याचा? बाह्य व्यक्तीवर तिचा आनंद का अवलंबून असावा ..अधिकार आहे तिला हरवलेले शोधण्याचा..... असे विचार येताच तो स्वतःशीच हसला..
व त्याला वाटले मग माझे तिच्या जीवनात जाण्याचे प्रयोजन तरी काय?
त्याला तिची नवी प्रतिमा नामंजुर होती त्याला..ति त्याला नको होती..
तो जुनी कावेरी आठवू लागला..अंधुकशी प्रतिमा मना समोर आली क्षणभर... पण ति हळूहळू विरून गेली...
.
समोर उभी होती ति अनोळखी कावेरी ...मात्र तिला तिचा आनंद गवसला ह्याचा त्याला आनंद झाला ..
तो उठला व बाहेर आला कार मध्ये बसला व निघून गेला
.
एक प्रेम कहाणी सुरू होण्या आधीच संपली होती
प्रतिक्रिया
20 Oct 2015 - 6:56 am | मुक्त विहारि
छान लिहिले आहे.
20 Oct 2015 - 7:50 am | अत्रे
भिडलं!
मला वाटतं आपल्याला परफेक्ट/सदैव सुखी माणसं सहन होत नाहीत.
20 Oct 2015 - 8:12 am | सौन्दर्य
छान लिहिलंय.
20 Oct 2015 - 9:10 am | कोमल
ह्म्म..
एक शंका आहे, "ति" असा का लिहिला आहे? म्हणजे शब्दाला र्हस्व करण्याचं काही विशेष कारण आहे का?
20 Oct 2015 - 10:15 am | मांत्रिक
मस्तच लिहिलंय अकुबुवा.
20 Oct 2015 - 10:51 am | निनाद
ति की ती
सर्व एकाक्षरी शब्द दीर्घ लिहिले जातात, अपवाद नि.
कथानायिका आणि कथेचे नावही ती आहे म्हणून लिहिले...
20 Oct 2015 - 11:09 am | मीउमेश
आयुष्यात अश्या बर्याच प्रेमकहाण्या सुरु होण्या आधीच संपून जातात .
20 Oct 2015 - 1:23 pm | जगप्रवासी
छान लिहिलंय.
20 Oct 2015 - 1:26 pm | बिन्नी
मला जान्हवी श्री ची च गोष्ट आठवली :)
खूप छान लिहिता हो तुम्ही .
20 Oct 2015 - 2:15 pm | द-बाहुबली
छान.
20 Oct 2015 - 3:52 pm | नीलमोहर
:)
20 Oct 2015 - 6:13 pm | किसन शिंदे
अकुकाका कधी कधी फार वेगळं लिहिता तुम्ही...तुमच्या इथल्या प्रतिमेला तडा देणारं. :)
20 Oct 2015 - 6:28 pm | जव्हेरगंज
मस्तच!!!!
20 Oct 2015 - 6:43 pm | मी-सौरभ
हे तुम्हीच नक्की लिहिलय का अशी शंका यावी इतके भारी लेखन
20 Oct 2015 - 7:51 pm | आदूबाळ
ते कधीकधी (कात) टाकून येतात.
20 Oct 2015 - 8:20 pm | शिव कन्या
नायकाचा प्रांजळपणा आवडला.
सुरेख जमलेय.
20 Oct 2015 - 11:38 pm | अगम्य
इतकं लहान शीर्षक आहे. ते तरी जर शुद्ध असतं तर ...
21 Oct 2015 - 4:25 pm | मनीषा
छान आहे कथा ..
21 Oct 2015 - 11:24 pm | ज्योति अळवणी
आवडली
21 Oct 2015 - 11:30 pm | एक एकटा एकटाच
मस्त लिहिलीय
22 Oct 2015 - 1:50 pm | माजगावकर
छान लिहिलंय...
नायकाच्या मनातील विचार आवडले...
22 Oct 2015 - 3:42 pm | द-बाहुबली
थोडक्यात काय परावलंबी बायका आवडण्याची पुरुशप्रधान कोती मनोव्रुत्ती लेखकाने नाय्काला दिली आहे याची एक मिपाकर म्हणून अतिशय शर्म वाटली :( कोणताही तर्ल संवदन्शील वाचक नायकाचे हे बिभीत्स स्वरुप अॅक्सेप्ट करु शकणार नाही .. धागालेखकाने चितारलेल्या कुजकट पुरुषी मनोव्रुत्तीचा करु तेवडा कठोर निषेध कमीच है.
25 Oct 2015 - 1:17 am | अत्रे
यात स्री-पुरुष भेद कशाला? कोणालाही असे वाटू शकते.
23 Oct 2015 - 11:32 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्तच लिहिले आहे अगदी तरल आणि मनापासुन.
अतिशय आवडले.
पैजारबुवा,