दोन लोकगीते आणि थोडे माझे:

पथिक's picture
पथिक in जनातलं, मनातलं
19 Oct 2015 - 12:52 pm

दीवा बले सारी रात, मेरया जाल्मा
दीवा बले सारी रात।
बत्तियां बटा रखदी, मेरया जाल्मा
दीवा बले सारी रात।
आवेंगा तां पुच्छ लवांगी, मेरया जाल्मा
कित्थे गुज़ारी सारी रात।
बत्तियां बटा रखदी, मेरया जाल्मा
दीवा बले सारी रात।
आवेंगा तां बुज्झ लवांगी, मेरया जाल्मा
कित्थे गुज़ारी सारी रात।
दीवा बले सारी रात, मेरया जाल्मा
दीवा बले सारी रात।

-- दीया रात भर जलता है, ओ मेरे ज़ालिम
दीया रात भर जलता है।
बत्तियां तैय्यार करा रखती हूं, ओ मेरे ज़ालिम
दीया सारी रात जलता है।
तू आयगा तो मैं पूछ लूंगी, ओ मेरे ज़ालिम
कहां बिताई सारी रात।
बत्तियां तैय्यार करा रखती हूं, ओ मेरे ज़ालिम
दीया सारी रात जलता है।
तू आयगा तो मैं समझ जाउंगी, ओ मेरे ज़ालिम
कहां बिताई सारी रात।
दीया रात भर जलता है, ओ मेरे ज़ालिम
दीया रात भर जलता है।

-- दिवा जळत राहतो, जुलमी सख्या…. तू मात्र येत नाहीस… मी वाती करून ठेवते. रात्रभर दिवा जळत राहतो. कितीतरी वाती जळून जातात. तू मात्र येत नाहीस…. कुठल्या विरहीणीने, केव्हा गायलं असेल हे गीत पहिल्यांदा ? कोण असेल ती ? कशी असेल ? कोण असेल तो ज्याची ती वाट बघत असेल रात्र रात्र ? कुठे असेल त्यांचं घर ? सगळं काळाच्या गर्तेत गडप झालंय ! त्या विरहिणी बद्दल काहीही कळू शकत नाही आपल्याला. पण तिची वेदना मात्र या तिच्या शब्दांमधून काळाला ओलांडून आजही स्पर्श करू शकते आपल्या हृदयाला.

मनात प्रश्न आला - आजची 'ती' तिच्या जुलमी सख्याची अशीच वाट पाहत राहील का ? वाती बनवून रात्र रात्र जाळत राहील का ? कि घटस्फोट घेईल सरळ ? आणि दूसरा सखा निवडेल ? सुंदर, शाश्वत, आर्त गीताच्या जागी घटस्फोट ! क्या कमाया क्या गँवाया ? आज खरोखरंच जीव कोणाला लावतो का आपण असा प्रश्न पडतो. प्रेमातही स्वार्थाची भेसळ… आजची परिस्थिती पाहून म्हणावसं वाटतं - दीया जलता रहे रातभर - अंदर का दीया….

***

जे उठ चल्लियों चाकरी,
नीले घोड़े वालिया !
सानूँ बोजे पा।
जित्थे ते आवे रातड़ी
नीले घोड़े वालिया !
कडढ कलेजड़े ला।

-- 'यदि तुम जंगी नौकरी पर चल पड़े हो,
ओ नीले घोड़े वाले !
मुझे अपनी जेब में डाल लो
जहाँ कहीं रात पड़ जाया करे
निकाल कर कलेजे से लगा लिया करना'

या स्त्री चा सखा, जो चाललाय लढाई वर, परत आला असेल कि नाही तो ….? कितीतरी लढायांबद्दल वाचलं ईतिहासात, पण त्यातला कुठल्या लढाईत हा 'नीले घोडेवाला' गेला असेल कळणं अशक्य आहे. पण ते न कळलेलंच चागलं. त्यामुळे कुण्या दोन व्यक्तींशीच निगडीत राहत नाही हे लोकगीत. ते होऊन जातं सर्व विरहिणींचं. कुठलाही सैनिक होऊ शकतो त्यातला 'नीले घोडेवाला'. 'ती'चा आणि 'त्या'चा ईतिहास गेलाय वाहून नदीतल्या फुलांसारखा, पण हे काळजाला हात घालणारं लोकगीत मात्र आहे…. मरावे परि 'गीतरूपे' उरावे हेही सुंदरच….

(लोकगीते आणि त्यांचा हिंदी अनुवाद देवेंद्र सत्यार्थी यांच्या 'धरती गाती है' पुस्तकातून)

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

19 Oct 2015 - 1:14 pm | मांत्रिक

उत्तम माहिती. लोकगिते ही छान आहेत.