ठाण्याचे नवे मेतकूट हॉटेल - एक वाईट अनुभव

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
11 Jan 2015 - 5:59 pm

आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली.

दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला. त्याने हातातील कागदावर लिहिलेल्या प्रतिक्षा यादीत माझे नाव टाकताच मी त्याला आरक्षणाचे स्मरण करुन दिले. पाचेक मिनिटात जागा होईलच असे त्याने आश्वासन दिले व कोपर्‍यतले मोठे टेबल दाखवुन हे रिकामे झाल्यावर तुम्हालाच देणार आहोत असे संगितले.

२.३० झाले तरी काही हालचाल नाही. चौकशी केली असता. होइलच इतक्यात असे मोघम उत्तर मिळाले. आता इतका उशीर केला आहात, आत आल्यावर जेवण संपले असे सांगु नका असे म्हणताच काळजी नको, पोटभर जेवा असे आश्वासन मिळाले. अखेर २.४५ ला प्रवेश मिळाला. ८ जणांना दोन जागी विभागुन बसावं लागलं. तसच बसवायचं होतं तर आधीच बोलवायचं होतं! असो. गर्दी आहे तर बसू वेग़ळे म्हणुन आम्ही सोडुन दिले. वास्तविक शेजारचे टेबल दुसर्‍या कुटुंबाला देण्याऐवजी आम्हाला जोडुन देता आले असते, पण कुणाला पडली नव्हती. अखेर दहा मिनिटे वाट पाहुन वेटरला मेनू कार्डाची विचारणा केल्यावर चौघात एक दिले गेले. आम्ही थाळी मागवणार होतो, पण अन्य वेळेस आले तर काय मिळते ते पाहायचे होते. वेटरला ऑर्डर देताच त्याने थाळी संपल्याचे सांगितले. संतप्त होऊन व्यवस्थापकाला जाब विचारला असता हो संपली असे उत्तर मिळाले.

आम्ही बाहेर पडायचे ठरवले. कुणाला काही पडली नव्हती. बाहेर श्री सनी पावसकर यांना "आमचे आरक्षण असतानाही पाऊण तास रखडवलत आणि आता जेवण संपलय असे सांगता?" असे विचारले असता त्यांनी कसलीही दिलगिरी व्यक्त न करता ' आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले. जेवण संपले याचा सरळ अर्थ पोळी, भाजी, वरण, भात हे पदार्थ निश्चितच उपलब्ध नव्हते. मग भर दुपारी आम्ही जेवणा ऐवजी काय वडे, भजी, आळुवड्या, थालिपिठ खावे? आम्ही पैसे मोजुन आपल्या आवडीचे जेवायला अलो होतो, उपाहारगृहातले उरले सुरले संपवायला आलो नव्हतो. नाराजी व्यक्त करुन बाहेर पडत असता श्री सनी पावसकर यांच्याशी बोलत असलेल्या बाई त्यांना म्हणाल्या, 'आपण तर यांना टेबल तर दिले होते"
म्हणजे केलेली मेहेरबानी ऩ जाणणारे गिर्‍हाइकच वाईट.

एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला.

बाहेर पडलो आणि राम मारुती रस्त्यावरील शिव सागर मध्ये गेलो. उत्तम स्वागत झाले, उत्तम जेवण मिळाले. चार वाजुन गेल्यावर म्हणजे बंद करायची वेळ झाली असताना सुद्धा अखेरपर्यंत तत्पर सेवा मिळाली, कसलीही घाई केली गेली नाही. नाइलाजाने असे वाटले की त्या मेतकूटवाल्यास जाऊन सांगावे की बाबारे, हॉटेल कसं चालवायचं, ग्राहकाशी कसं वागायचं हे शिकायला इथे काही दिवस नोकरी कर आणि मग हॉटेल उघड.

मिपाकरांनो, पैसे द्यायची तयारी असतानाही जर गैरसोय, मनस्ताप व अपमान सहन करायचा असेल तर घंटाळी, ठाणे येथे सुरू झालेल्या 'मेतकूट' ला अवश्य भेट द्या.

राहणीप्रतिक्रियाआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

चेतन सुभाष गुगळे's picture

19 Apr 2022 - 8:57 pm | चेतन सुभाष गुगळे

हा आयडी फक्त मेतकूटचं समर्थन करण्यासाठी तयार केला गेलेला आहे या बद्दल काही शंका?

ही शंका कदाचित खरी असावी असे मानण्यास भरपूर जागा आहे.

या सदस्यनामाने सदर धाग्यावरील प्रतिसादाव्यतिरिक्त फक्त इतर तीन धाग्यांवर प्रतिसाद दिलेला आहे आणि एका हिंदी व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्डचे मराठी अनुवाद केलेला स्वतंत्र धागा काढला आहे.

मेतकूटची आलेली पोस्टः १८/०१/२०१५
२७/०१/२०१५ रोजी श्री. महेश अशोक खरे यांचा सदस्यकाळ : 1 week 2 hours

फेब्रुवारी २०१५ नंतर या सदस्यनामाने काहीच लेखन (स्वतंत्र अथवा प्रतिसादात्मक) केलेले नाही.

आता आइडी उडालाय लेखकाचा.
धागा

सध्या 'डाइबेटिस रिवर्स करतात' अशी जाहिरात रोज असते टीवी चानेलवर.

आता आइडी उडालाय लेखकाचा.
धागा

सध्या 'डाइबेटिस रिवर्स करतात' अशी जाहिरात रोज असते टीवी चानेलवर.

श्रीरंग_जोशी's picture

27 Jan 2015 - 2:02 am | श्रीरंग_जोशी

कॅन्सस सिटी येथील एका उपहारगृहाबाबत एका व्यक्तिने खालील परिक्षण लिहिले.
Yelp Review

त्यावर उपहारगृह मालकाने लिहिलेला प्रतिसाद...
Response 1
Response 2

संदर्भः ही बातमी

मुक्त विहारि's picture

27 Jan 2015 - 3:39 am | मुक्त विहारि

माझा गणेशा झाला आहे..

श्रीरंग_जोशी's picture

27 Jan 2015 - 4:06 am | श्रीरंग_जोशी

खालील बातमीमध्ये मजकूर लिहिला आहे जसाच्या तसा.

A Negative Yelp Review Led To This Hilarious Take Down From The Restaurant’s Owner

किसन शिंदे's picture

27 Jan 2015 - 7:16 pm | किसन शिंदे

त्या रेस्टॉरंट मालकाचा रिप्लाय आवडला.

महेश अशोक खरे's picture

27 Jan 2015 - 1:20 pm | महेश अशोक खरे

केवळ अप्रतिम ! काही मनाविरुद्ध झालं की ठोका त्याला सोशल नेटवर्कवर
या प्रवृत्तीते हे उदाहरण हसवून गेले.

चिगो's picture

27 Jan 2015 - 1:36 pm | चिगो

कहर म्हणजे कहर आहे हा रिप्लाय.. मानलं बॉस त्या रेस्टॉरंटवाल्याला..

मूळचा पुण्याचा मंगुश हॉटेलचा मालक आहे का ते बघायला हवे. ;)

चिगो's picture

27 Jan 2015 - 10:48 pm | चिगो

सोनल? मराठी किंवा गेला बाजार भारतीय आहे का काय तक्रारकर्ती? ;-)

श्रीरंग_जोशी's picture

27 Jan 2015 - 11:06 pm | श्रीरंग_जोशी

नाव व फोटोवरून ही व्यक्ती भारतीय वंशाची नक्कीच असावी. मराठी असण्याबाबत ख्रात्री वाटत नाही.

येल्पवर ३३ परिक्षणे लिहून त्यांनी सदस्यत्व रद्द केलेले दिसत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2015 - 11:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी प्रतिसाद ! सज्जड शालजोडीतले मारलेत !!

तक्रार करणारीचा नवरा वकील आहे हे माहित असून अमेरिकेतला व्यावसायीक असे लिहीतो म्हणजे त्याचा वकील तिच्या वकिलापेक्षा भारी असणार !

आनंदी गोपाळ's picture

24 Sep 2015 - 9:13 am | आनंदी गोपाळ

नवी बातमी काय आहे मग? मेतकुटवाले सुधरलेत की मेटाकुटीला आलेत?

किसन शिंदे's picture

24 Sep 2015 - 11:10 am | किसन शिंदे

मेतकूट सध्या जोरात सुरूये. जागा कमी पडायला लागली म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांनी तिथेच बाजुला मोठ्या जागेत हॉटेल शिफ्ट केलं. अगदी सोमवार ते शुक्रवारही संध्याकाळच्या वेळी वेटींग लिस्ट्मधे माणसं बाहेर उभी असतात.

प्रचेतस's picture

24 Sep 2015 - 11:26 am | प्रचेतस

आम्ही आपलं घरीच मेतकूट भात, फोडणीचा भात, चटणी, कोशिंबीर आणि आळू वडी खातो ब्वॉ.

प्यारे१'s picture

24 Sep 2015 - 11:30 am | प्यारे१

बरं मग????

पैसा's picture

24 Sep 2015 - 11:36 am | पैसा

लायनीत उभे राहून फोडणीचा भात कोण खाणार? जायचा यायचा वेळ, पेट्रोल, लायनीत उभे रहायचा वैताग आणि या सगळ्याला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात सगळा स्वयंपाक घरी करून होतो.

प्यारे१'s picture

24 Sep 2015 - 11:43 am | प्यारे१

अहो पण स्टॅटिस्टिक्स वेगळं सांगतंय की. ;)
तुम्ही नका जाऊ. हॉटेल चा धंदा वाढतोय ना?
हल्लीच्या मुलांना किंवा मुलींनाही फोडणीचा भात विकतचा खाण्याची आवड, गरज, नाइलाज किंवा खाज यातलं काही एक असावं असं मानायचं. फ़क्त हल्लीचीच पिढी की पूर्वीचीही याबाबत विदा मिळाला तर विकी वर देखील टाकू.

पैसा's picture

24 Sep 2015 - 11:46 am | पैसा

कोणाला कमी पडू नये म्हणून जरासा जास्तच भात असतो रोज घरात. फोडणीचा भात करून मस्त प्याकिंग करून विकू १५० २००ला न काय! बाकी ते पिढ्या बिढ्या, विदा बिदा काय ते तुम्ही बघा आपलं. २५ वर्षांपूर्वी आम्ही आजची पिढी होतो. जी आजची पिढी आज आहे ती २५ वर्षांनंतर काय करील म्हैत नै!

प्यारे१'s picture

24 Sep 2015 - 11:56 am | प्यारे१

मेतकूट नीट जमलं तर तुमची खरपूड़ पण खपेल ओ. नाहीतर फुक्कट द्यावं लागेल.

पैसा's picture

24 Sep 2015 - 11:59 am | पैसा

ओरडून विकलंत तर माती पण विकेल. गप बसलात तर सोनं पण पडून राहील. प्याकिंग आणि प्रेझेंटेशन मस्ट. आत खरपूड का असेना! नवीन नाव देऊ कॅरॅमलाईज्ड राईस. हाकानाका! झैरात मंगताय!

ओरडून तर खोटं पण पटतं लोकांना. ते तात्कालिक असतं. एकदा 200 रुपयांचा तुमचा तो भात नेतील ओ लोक. नंतर पायरी तरी चढ़तील काय? असो.
हॉटेल व्यवस्थित सुरु आहे. बाकी मेतकूट धागा 200 पार करणार तर

वेल्लाभट's picture

24 Sep 2015 - 12:18 pm | वेल्लाभट

या निमित्ताने एक विचार सांगावासा वाटतो.

आपण मराठी मंडळी नेहमीच असा सूर लावतो की... छ्या! मसालेभाताला ९५ रुपये मोजायचे? वांग्याची भाजी १२५ रुपये?
पण आपण असं म्हणून आपल्याच पदार्थांची व्हॅल्यू कमी करतो, विशेषतः अमराठी लोकांमधे. कधी पंजाबी लोक तक्रार करतात का, की व्हेज माखनवाला १५० रुपये??? त्यामुळे आपण असा सूर लावायला नको असं मला वाटतं. ठासून सांगावं.. फिर! थालीपीठ डेलिकसी है हमारा... ६० रुपये इज स्टिल डिसेंट.

दुसरं म्हणजे हे जे पैसे आहेत ते "वांग्याच्या भाजीत काय आहे एवढं? १२५ रुपये मोजायला?" असं म्हणून द्यायचे नाहीयेत तर ते तुम्हाला "आयतं" मिळतं त्याचे आहेत. एसीत बसून, कुणीतरी वाढणारं असताना आपण हे पदार्थ खातो त्याचेही पैसे त्यात असतात. त्यामुळे...अशी आपणच आपल्या पदार्थांची, हॉटेलांची कुप्रसिद्धी करणं टाळावं.

असं माझं मत.

किसन शिंदे's picture

24 Sep 2015 - 12:22 pm | किसन शिंदे

वेल्लाभटाच्या प्रतिसादाशी शंभर टक्के सहमत.

मराठी_माणूस's picture

24 Sep 2015 - 12:23 pm | मराठी_माणूस

सहमत.
झुणका भाकर केंद्रे काढुन आपण मराठी पदार्थांची अशीच व्हॅल्यु कमी केली आहे.

वेल्लाभट's picture

24 Sep 2015 - 12:28 pm | वेल्लाभट

नाही तर काय!
त्यावरून एक एक जनरलायझेशन्स आठवतायत आणि राग येतोय. असो. वेगळा धागा काढायला हवा.

पैसा's picture

24 Sep 2015 - 12:45 pm | पैसा

मसालेभात अन वांग्याच्या भाजीला व्हॅल्यु नाही कोण म्हणतो? खूप मेहनत आहे. माझा आक्षेप आहे तो फोडणीचा भात ग्लोरिफाय करून विकायला. मसालेभात पुलाव आणि फ्राईड राईसच्या बरोबरीने विकला गेलाच पाहिजे. खरे तर फ्राईड राईसमधे ते अजि नो मोटो वगैरे काहीही घालतात पुलावात तूप ओततात काही ठिकाणी, त्यापेक्षा मसालेभात हजार पटीने चांगला आणि हेल्दी म्हटला पाहिजे. थालिपिठासारखा पोटभरीचा आणि चविष्ट पदार्थ नाही. मराठी जेवण हे सगळ्या प्रकारात समतोल आणि हेल्दी असतं. त्यातले खास पदार्थ आहेत त्याचे मार्केटिंग करावेच. पण आपले लोक दळभद्री जिलेटिन घालून खरवस विकतात आणि आपलंच नाक कापून घेतात.

त्या शिळ्या फोडणीच्या भातासाठी पैसे मोजायला तयार असलेल्या लोकांना तर साष्टांग दंडवत!

प्यारे१'s picture

24 Sep 2015 - 12:55 pm | प्यारे१

शिळा फोडणीचा भात हॉटेल/रेस्तरों मध्ये मिळत असला तर फोडणीची भाकरी(तुकडे) आणि पोळीचा मलीदा मिळालाच पाहिजे. अन्यथा आम्ही मोर्चा काढू.
-सदस्यकाहीकारणनस्तानामोर्चाकाढूयेताजातानिषेधकरुचेजनकजेपीयांचीसंघटना

चेतन सुभाष गुगळे's picture

19 Apr 2022 - 9:05 pm | चेतन सुभाष गुगळे

या! मसालेभाताला ९५ रुपये मोजायचे? वांग्याची भाजी १२५ रुपये?
पण आपण असं म्हणून आपल्याच पदार्थांची व्हॅल्यू कमी करतो, विशेषतः अमराठी लोकांमधे. कधी पंजाबी लोक तक्रार करतात का, की व्हेज माखनवाला १५० रुपये???

दिल्ली (फेब्रुवारी २००२)

बाथरुम फिटिंग्ज व्यावसायिकासोबत बिझिनेस लंच घेत असताना त्यांनी मला सांगितले की आता आपण व्यवसायाच्या जागी आहोत आणि वेळ कमी आहे अन्यथा यापेक्षा चविष्ट जेवण मी तुम्हाला घरी खाऊ घातले असते. आम्ही वेळ वाचविण्याकरिताच फक्त आणि तेही नाईलाजास्तव हॉटेलात जेवतो. अन्यथा स्वाद आणि असली घीचा चांगला माल घरी बनत असताना या सुमार जेवणाकरिता इतके पैसे खर्चणे जीवावर येते.

सुबोध खरे's picture

24 Sep 2015 - 12:20 pm | सुबोध खरे

प्यारे बुवा
आपण मराठी लोक म्हणजे झैरातीतच मागे पडतो बघा.
ते कोथिम्बिरवडी म्हणायचं आणि पस्तीस रुपयाला मोठ्या दोन वड्या द्यायच्या.
त्यापेक्षा धनिया कबाब अलोंग विथ मिंट चटनी chutney म्हणायचं, (पुदिना चटणी नव्हे) आणि सहासात लहान पण गोल वळलेल्या कोथिम्बिरवड्याच द्यायच्या पण १२५ रुपये( अधिक कर) म्हणून लावायचे हे आपल्याला केव्हा जमायचं?

वेल्लाभट's picture

24 Sep 2015 - 12:25 pm | वेल्लाभट

कसं बोललात !!!!
हेच्च्च्च्च इथेच्च्च्च्च मार खातंय राव ते तुमचं मराठी माणूस...

प्यारे१'s picture

24 Sep 2015 - 12:30 pm | प्यारे१

अहो आम्ही खरपूड़ीबद्दल बोलत होतो महाराज. एकदा नेल्यानंतर कोणी पाय ठेवील काय हाटीलात? बाकी दणक्या जेवतो बरे आम्ही. मराठी पदार्थास नावे ठेवीत नाही हो. फ़क्त घरी सुग्रास भोजन मिळत असता बाहेर काय म्हणून खावे? असा यांचा प्रश्न.

सुबोध खरे's picture

24 Sep 2015 - 12:41 pm | सुबोध खरे

आमचे एक नातेवाईक दादरला प्लाझा समोर मराठी हॉटेल चालवतात. तेथे १४-१५ वर्षपूर्वी गेलो असताना त्याच्या यादीत( मेनू कार्ड) पदार्थ पाहत असताना एक जाणवले कि बटाटा वडा एक प्लेट १० रुपये आणि ब्रेड बटर २० रुपये. मी त्याला विचारले हे काय रे बाबा?
त्यावर तो म्हणाला दादरला मराठी माणूस डोंबिवली कल्याण पासून येतो घरी जेवायला जाण्यासाठी एक ते दीड तास लागणार तोवर पोटाची सोय म्हणून एक प्लेट वडा फक्त १० रुपये.
मी विचारले मग ब्रेड बटर २० रुपये कसे?
त्यावर तो हसत म्हणाला आमच्या मुलाला ब्रेड बटरच लागते म्हणणाऱ्या हुच्चभ्रू लोकांना पैसे देऊ दे कि!

एस's picture

24 Sep 2015 - 1:14 pm | एस

हेहेहेहे! मस्त विचारसरणी. :-)

पैसा's picture

24 Sep 2015 - 12:50 pm | पैसा

ओरडून तर खोटं पण पटतं लोकांना. ते तात्कालिक असतं.

सोळा आणे सही! प्याकिंग उघडलं की आत खरपूड आहे ते कळतंच!

आमच्या फो.भा. ची कल्जी क्रू नये बर्का! तो फो.भा. च असेल. आणि लोक जरूर घेतील २०० रुपये मोजून. आजकालच्या लोकांना फो. भा. आवडत असेल तर खाऊ देत बापडे. नसीब अपना अपना!

प्यारे१'s picture

24 Sep 2015 - 12:58 pm | प्यारे१

ह्या ह्या ह्या. हिटलरकडे गोबेल होताच की!

पैसा's picture

24 Sep 2015 - 1:01 pm | पैसा

हिटलर की गोबेल? आपल्याकडे सगळे आहेत.

शिळ्या भाकरीचा कट्टा कधी करताय ते सांगा. फो.भा. आणि पेश्शल खरपुड्या मी स्पॉन्सर करते! =))

प्यारे१'s picture

24 Sep 2015 - 1:04 pm | प्यारे१

हिटलरकड़े गोबेल असतोच.
हेल हिटलर.
बाकी फुकट इतरांना द्या. हमें बख्श दो!

मेतकूटाचा गोपाळकाला झाला. ;)

नितिन५८८'s picture

24 Sep 2015 - 10:55 am | नितिन५८८

एवढे चालत असेल हे हॉटेल तर ह्यावेळेस मेतकुट वाल्याची, गणपतीची पावती २५,००० ची फाडायला काही हरकत नाही!

वेल्लाभट's picture

24 Sep 2015 - 11:18 am | वेल्लाभट

येस. हॉटेल व्यवस्थित गर्दी खेचत आहे.

सुबोध खरे's picture

24 Sep 2015 - 12:21 pm | सुबोध खरे

मेत्कुटला गेलो नाही पण २०० पार केले

किसन शिंदे's picture

24 Sep 2015 - 12:48 pm | किसन शिंदे

डॉक्टर या की सांच्याला एकदा क्लिनिक बंद झाल्यावर..

एक कट्टा करून टाकू..हाकानाका! :)

उकडीचे मोदक फार भारी मिळतात इथे..हां पारी थोडी जाड असते, पण तेवढं चालून जातेय.

सुबोध खरे's picture

24 Sep 2015 - 12:59 pm | सुबोध खरे

केंव्हा जायचं बोला.

किसन शिंदे's picture

24 Sep 2015 - 1:12 pm | किसन शिंदे

एक ऑक्टोबरला जमेल का?

सुनील's picture

25 Sep 2015 - 2:40 pm | सुनील

नक्की कधी ते ठरवा!

सुबोध खरे's picture

25 Sep 2015 - 8:32 pm | सुबोध खरे

जमेल की. रात्रि २०.३० नन्तर

सुबोध खरे's picture

25 Sep 2015 - 8:34 pm | सुबोध खरे

फक्त मला हॉटेलच्या बाहेर आशाळभूतासारखे वाट पाहायला आवडत नाही. लोक उठतात कधी आणि आम्ही बसतो कधी हे मला पटत नाही. ( वैयक्तिक दुर्गुण समजा)

सर्वसाक्षी's picture

25 Sep 2015 - 11:11 am | सर्वसाक्षी

मेतकूट नव्या जागी स्थलांतरीत झाल्यावरही एकदा गेलो होतो. बाहेर लोक इभे पाहिले आणि पदार्थ बांधुन नेले. चविच्या बाबतीत अपेक्षाभंग झाला. वांग्याचे भरीत म्हणजे मिरच्यांचे बारीक तुकडे मुक्तहस्ते पेरलेले शिजवलेले वांगे निघाले. ना दही ना चिंंचगूळ ना चमचमईत उत्तरे कडील मसालेदार बैंगन भरता. कदाचित ही त्यांची स्वतंत्र नवी पाककृती असेल. झुणका सुद्धा अगदीच सुमार होता.

अर्थात हा माझा अनुभव. कदाचित लोकांना तेथील पदार्थ आवडत असतील.
मेतकूट समोरच्या गल्लीत 'कोल्हापूर' शेजारी मी मराठी' सुरू झाले आहे, मी अजुन गलो नाही. कुणी अनुभवले आहे का?

मुक्त विहारि's picture

25 Sep 2015 - 3:46 pm | मुक्त विहारि

"मेतकूट"ला जाण्यापेक्षा.

आमचे ३८, बँकॉक स्ट्रीट, बरे आहे.

आणि साग्रसंगीत हवे असेल तर, "नंदी पॅलेस."

प्रणवजोशी's picture

18 Nov 2015 - 12:37 pm | प्रणवजोशी

मला सुद्धा असाच वाईट अनुभव आला.

प्रभाकर पेठकर's picture

18 Nov 2015 - 1:20 pm | प्रभाकर पेठकर

कधी?

जातवेद's picture

18 Nov 2015 - 3:26 pm | जातवेद

कोण ते धागा वर काढतय?