फेस बुक बरची भुताटकी..

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
25 Sep 2015 - 10:03 am

फेस बुक बरची भुताटकी..
माधव चे फेसबुक वर अकाऊट होते...
त्याला फेस बुका वरली माधवीची प्रोफाईल आवडली.
दोघांची मैत्री झाली च्याटिंग सुरु झाले भेटी गाठी वाढल्या..
पण बेक अप झाले,,माधवीस हा धक्का सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.
माधवला पण याचे खुप वाईट वाटले
पुढच्या च्या आमावस्येच्या दिवशी माधव फेस बुकावर गेला अन अचानक च्याट विंडो उघड्ली
व अक्षरे आली ..."हाय"..
माधवी च्याट करीत होती....पिंग पिंग पिगु लागली ...
माधव घाबरला. व तिच्या अकौंट वर गेला तर ते अकौंट डिलीट केलेले दिसले.
परत आपल्या अकौंट वर आला तर "तू जहा जहा रहेगा मेरा साया साथ होगा" हा व्हिडिओ अप लोड झालेला दिसला व तो चालू झाला
माधव घामाने डब डबला..वेळ रात्रीची होती पण घामाने चिंब झाला त्याने भीतीने कम्पुटर बंद केला ...
रात्र जागून काढली ..
ऑफिस मध्ये गेला व काम्पुटर उघडला तर मोझीला चे ब्रौसर उघडले गेले व त्याचे फेस बुकाचे पेज समोर आले च्याट विंडो उघडली गेली व व्हिडिओ च्याट साठी माधवीचा आत्मा आला ..
चित्र धूसर दिसत होते..अक्षरे उमटू लागली.."माझ्या जगात ये अन मला भेट"....माधव घाबरला..
त्याला हा सारा ताण असह्य होऊन त्यानेही जीवन यात्रा संपवली
आजही दोघांचे आत्मे अकाऊट फेस बुकावर आहेत व ते च्याट करतात .

बालकथा

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

25 Sep 2015 - 10:11 am | मांत्रिक

.पिंग पिंग पिगु लागली म्हणजे काय? पेग पिऊ लागली काय?

मांत्रिक's picture

25 Sep 2015 - 10:17 am | मांत्रिक

आजही दोघांचे आत्मे अकाऊट फेस बुकावर आहेत व ते च्याट करतात

त्यांना अपत्ये झाली असतील का? झाली असतील तर त्या बालभुताचे नाव काय असेल?

वेल्लाभट's picture

25 Sep 2015 - 5:15 pm | वेल्लाभट

बालभूत !

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Sep 2015 - 6:58 pm | कैलासवासी सोन्याबापु

कसला "मुल"-"भुत" प्रश्न आहे राव!

बोका-ए-आझम's picture

25 Sep 2015 - 9:07 pm | बोका-ए-आझम

विचार करता करता फंंडा-मेंटल व्हायची वेळ आली!

प्रचेतस's picture

25 Sep 2015 - 10:12 am | प्रचेतस

अतीसुमार लेखन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2015 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगलं लिहिताय काका.
आपलं काय ठरलंय ?

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

25 Sep 2015 - 11:38 am | प्रचेतस

हो हो.
प्रोत्साहण द्यायचंय नै का. :)

प्रसाद गोडबोले's picture

25 Sep 2015 - 6:17 pm | प्रसाद गोडबोले

इतक्या अभिजात लेखनाला सुरुवातीला नावे ठेवल्या बद्दल मी तुमचा जाहीर णिषेढ करीत आहे !

काय सांगताय काका? भयंकर आहे सगळं...
मार्कला कळलंय का हे? किमान मोदींनी तरी आज हा मुद्दा उपस्थित करायलाच हवा!

संजय पाटिल's picture

25 Sep 2015 - 10:31 am | संजय पाटिल

अकुदादा, मुक्तपीठ वर पण टाका हि कथा! भरपुर वाहवा होइल..

मुक्त विहारि's picture

25 Sep 2015 - 10:33 am | मुक्त विहारि

एकदम समयोचित.

विशेषतः "आजही दोघांचे आत्मे अकाऊट फेस बुकावर आहेत व ते च्याट करतात ." हा पंच तर एकदम जबरदस्त.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

बाळ सप्रे's picture

25 Sep 2015 - 10:39 am | बाळ सप्रे

सोशल भुताटकी !!

सस्नेह's picture

25 Sep 2015 - 11:18 am | सस्नेह

अकुआजोबा किती चान चान बालकथा लिवतात !

कुठं दिसली ओ तूम्हाला बालकथा????
ते तर 'भूताळी चेपु' च्या गोष्टी करायलेत.
-प्यार्टाकस

नाखु's picture

25 Sep 2015 - 11:45 am | नाखु

त्ये बाल कथा म्हणजे तुम्ही (स्वतःचे डोईवरचे केस उपटू लागाल) या कथा वाचून म्हणून "बाल" कथा

"बाल"क असलेला पालक नाखु

प्यारे१'s picture

25 Sep 2015 - 11:47 am | प्यारे१

अच्छा!
मतलब कथा पढनेके बाद आप 'ना'बालि'ग हो जाओगे????

सस्नेह's picture

25 Sep 2015 - 11:46 am | सस्नेह

आणि लेखनविषय नीट वाचा !

ते कशालाही बालकथा म्हणतील ओ.... अकु काका आहेत ते.
उद्या मंदाकिनी ला पण बालकथा म्हणेल कुणीतरी कारण त्यातला हीरो शाळेत जातो. कुणी लिंकाळ्या लिंक देईल काय पराच्या त्या कथेची????

एकदम समयोचित.

विशेषतः "आजही दोघांचे आत्मे अकाऊट फेस बुकावर आहेत व ते च्याट करतात ." हा पंच तर एकदम जबरदस्त.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

"आजही दोघांचे आत्मे अकाऊट मिपावर आहेत व ते (अ) च्याट लेखन करतात ."

स दा धांदरफळे
अभामिपानिसोअकुजीमोदिगुकथावाचन्समीती कडून वाचक हितार्थ जारी
भैताडवाडी,डोक्याला शॉट नगर
जि:भुस्काट राज्य महान राष्ट्र

बेक अप झालं तर एवढं काय मनाला लावून घ्यायचं? मलाही ओव्हन नीट वापरता येत नाही. आहे ना जित्ता?

बॅटमॅन's picture

25 Sep 2015 - 12:26 pm | बॅटमॅन

असेच म्हणतो. बेक अप झालं तर झालं, त्यात काय एवढं?

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2015 - 12:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

बेक अप झालं तर चानच झालं ना ? म्हंजे, आसं बगा, काय ना काय शिजलं आसलंच ना ?!

म्हंतात ना की, "केकची पुंगी, वाजली तर वाजली, नायतर ब्रेड म्हणून खाल्ली"

बोका-ए-आझम's picture

25 Sep 2015 - 12:07 pm | बोका-ए-आझम

आता समजलं. ते असं का वाटत होतं. रच्याकने कुठली च्याट करतात आत्मे? मला पापडी च्याट लय आवडते!

रच्याकने कुठली च्याट करतात आत्मे

मिपावर एक आत्मा सॉरी अत्मा आहे त्याला विचारा की.

प्रसाद गोडबोले's picture

25 Sep 2015 - 6:19 pm | प्रसाद गोडबोले

रच्याकने कुठली च्याट करतात आत्मे

आत्मे बहुतेक भूतप्रणयगीतांना चाली लावुन देत असावेत =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2015 - 6:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

आंजावरील भुतांचा वाचकांवर "भूतजिल्बीप्रयोग" करण्यात हातखंडा आहे असे ऐकून आहे :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2015 - 12:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं कथा !

असे अनेक त्रस्त आत्मे वारंवार आयडी बदलत मिपावरसुद्धा फिरताना दिसतात... एकंदरीत हा रोग सर्व आंतरजालाला व्यापून दोन अंगुळे उरलेला आहे असेच दिसत आहे ! ;) :)

मुक्त विहारि's picture

25 Sep 2015 - 2:36 pm | मुक्त विहारि

समयोचित कथा...

असे अनेक "गहनविचारी, नाना प्रकारे आणि उद्दामपणे" येतच असतात.

नावे अनेक पण मूळ वृत्ती एकच.

खटपट्या's picture

25 Sep 2015 - 2:27 pm | खटपट्या

चांगलंय !!

अजया's picture

25 Sep 2015 - 4:49 pm | अजया

कसली कोडाईकनाल भूछत्र कथा आहे.अहाहा!

पैसा's picture

25 Sep 2015 - 4:58 pm | पैसा

अकुकाका, ते दोघे चॅट करतात म्हणून तुम्हाला कसं कळलं?

नाखु's picture

25 Sep 2015 - 5:02 pm | नाखु

"ध्यान" करायची तुमची तयारी आहे का बोला??????

"ध्यान" चा अर्थ आप्ल्या जबाबदारीवर आणि मगदूराप्रमाणे घेणे.

पैसा's picture

26 Sep 2015 - 5:11 pm | पैसा

निर्विकल्प समाधी अवस्था यायची!

वेल्लाभट's picture

25 Sep 2015 - 5:17 pm | वेल्लाभट

माझे तर डोळेच पाणावले.....

प्रसाद गोडबोले's picture

25 Sep 2015 - 6:22 pm | प्रसाद गोडबोले

अकुं !

अप्रतिम निव्वळ अप्रतिम लेखन !

तुमच्या लेखनाचा आधीपासुनच फॅन होतो , मिपावर आल्याचे आता सार्थक झाला सारखे वाटते !

लिहित रहा हो .... बर्‍याच जणांना प्रतत्न करुनही असे लिहिता येत नाही

द-बाहुबली's picture

25 Sep 2015 - 6:50 pm | द-बाहुबली

जबरहाट कल्पना... अतिशय नावीन्यपुर्ण. याचा सिक्वल आहे का ?

साउथ साइड च्या सिनेमा चि गोष्ट वाट्ते आहे. हा हा हा

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Sep 2015 - 7:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

किती टाक लावल्यावर असली भूते दिसतात? किंवा त्यांचे आइपी ट्रेस होतात

द-बाहुबली's picture

25 Sep 2015 - 7:20 pm | द-बाहुबली

मैत्री झाली च्याटिंग सुरु झाले भेटी गाठी वाढल्या..

खिक्क..!

रामपुरी's picture

25 Sep 2015 - 9:00 pm | रामपुरी

घाबल्लो की

विवेकपटाईत's picture

26 Sep 2015 - 9:36 am | विवेकपटाईत

मस्त. आता फेसबुक वर हि भुते, आत्मा , हडळी इत्यादी येऊ लागतील.

द-बाहुबली's picture

26 Sep 2015 - 1:30 pm | द-बाहुबली

मिपावरची भुताटकी सुध्दा फार प्रसिध्द आहे ना ? कोणी त्यावर उजेड टाकेल काय ?

हेमंत लाटकर's picture

27 Sep 2015 - 1:56 pm | हेमंत लाटकर

मिपाची शांती करावी लागेल.

मिपाची का बरं? अकुंची भुतं चेपुवर आहेत ना?

ज्योति अळवणी's picture

27 Sep 2015 - 3:24 pm | ज्योति अळवणी

थोडी अजून खुलवून सांगता आली असती ही कथा. चुका ही टाळल्या तर बर होईल. कल्पना आवडली

प्रास's picture

27 Sep 2015 - 3:32 pm | प्रास

आपण काकाश्रींच्या लिखाणाचे फ्यान हौत.

मजा आली काकाश्री!

लिहीत रहा....