मन
मन सागरापरी खोल, त्याचा कोणा लागे थांग
मन भिरभिरे वाऱ्यावरी, त्याला धरू कसे सांग
मन मोकाट सुटता, त्याचा माग न लागता
त्याचे संगे धावू किती, न पाऊल थकता
मन सुटे सुटे झाले, अन डोहात दडले
किती शोधले तरी, न एक डोळा दिसले
मन हळुवार किती, थोडे शब्द तीर हे लागता
डोळ्यामध्ये मन उतरते, अश्रू हे दाटता
मन कणखर किती , सावटाची दाटे भीती
सावरे स्वतःला लगेच, अन सावरे प्रीतीची हि नाती
मन कधी किती गूढ , जणू कृष्ण माई संथ
मन सहिष्णू धर्माचे , त्याला कोण पुसे त्याचा पंथ
मन एकाकी कधी अन कधी सामावे सर्वांसी
रात्र काळोख दाटता, उजळे प्रकाश चंद्रासी
मन अवखळ कधी, अन कधी क्रोधात कोपता
मन प्रेमळ कधी , अन कधी निरव शांतता
न कळले हे मन , न माझे न तुझे
मन होता हे उदास, मानसी अश्रुंचे हे ओझे
कधी चंचल हे मन, अन कधी हर्षता आनंदे
कधी एकटे च रुसते अन कधी गाते तुझ्या संगे
कधी सापडेल का हे मन, माझ्या मुठीत या बंद
वाटे, नकोच सापडावे , मुक्त विहरू दे स्वच्छंद
जर कधी लागलच ठाव, या उनाड मनाचा
उरे काय अर्थ ह्या जगण्याचा
बरे आहे , हे असेच , काही कोडी न सुटतात
रिक्त ओंजळ हे माझी, न काही उरले उरात
मन कोणासी कळले , भले भले हि थकले
जंग जंग पछाडून , हाती काही न लागले
मनाबद्दल हे विचार पण, माझ्या मनातलेच बोल
मानसी बोलता स्वतःच्या, कळे मनाचे हे मोल
नको उत्तर शोधूं या, या मनाच्या प्रश्नाचे
तेच असेल हे जगण्याचे ऋण , जे बाकी असेल फेडायचे
-शीतल
प्रतिक्रिया
21 Aug 2015 - 12:38 pm | वेल्लाभट
कविता चांगली आहे..
आवडली.
अवांतरः जोशीतला शी दुसरा असतो ना?
21 Aug 2015 - 10:56 pm | जव्हेरगंज
+१ शी....!!
22 Aug 2015 - 9:07 am | एक एकटा एकटाच
कविता छान आहे.
22 Aug 2015 - 8:20 pm | मांत्रिक
सुंदर!!!
अर्थपूर्ण!!!!!!
सत्य परिस्थिती!!!!!!!!!
23 Aug 2015 - 12:39 pm | शीतल जोशी
thank u :0
23 Aug 2015 - 1:09 pm | तिमा
ही कविता व्हॉटस अॅपवर पूर्वी वाचली आहे असे वाटते. ती आपणच त्यावर टाकली होती का ?
23 Aug 2015 - 9:48 pm | शीतल जोशी
Ho . Aadhi whatz app var share keli hoti. Thnk u :)
23 Aug 2015 - 2:33 pm | सत्याचे प्रयोग
झकास आहे कविता. मनी भावली.
27 Aug 2015 - 12:10 pm | मांत्रिक
मनी मांजर भावली कशी झाली? ;)
गंमतीत घ्या!
27 Aug 2015 - 10:24 pm | सत्याचे प्रयोग
मांत्रिक तुमची भीती वाटते हो. उगीच तुम्ही ओम फट म्हणायचे अन इकडे आमचा स्वाहा व्हायचा
कशी वाटली गंमत
27 Aug 2015 - 10:24 pm | सत्याचे प्रयोग
मांत्रिक तुमची भीती वाटते हो. उगीच तुम्ही ओम फट म्हणायचे अन इकडे आमचा स्वाहा व्हायचा
कशी वाटली गंमत
27 Aug 2015 - 11:58 am | शीतल जोशी
धन्यवाद
27 Aug 2015 - 12:15 pm | प्रसाद गोडबोले
आमच्या यमक्या दिवेकर च्या अत्मकुंथित कवितांची अठवण झाली =))
28 Aug 2015 - 10:41 am | मदनबाण
मन कोणासी कळले , भले भले हि थकले
जंग जंग पछाडून , हाती काही न लागले
वा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town