तसंतर विमान म्हणजे फक्त एक वाहतुकीचा प्रकार. पण खेड्यातल्या "त्या"च्या सारख्यांसाठी विमान म्हणजे एक मोठं आकर्षण. विमानाचा आवाज ऐकून एकदा तो त्याच्या आई-वडिलांना म्हणाला "मी मोठा व्हवून ईंजिनीअर झालो त आपन ईवाईनातून फिराया जावू".
त्याने अभ्यास केला, ईंजिनीअरींगचं पहिलं वर्ष बरेच लोक फेल होत असतांना त्याने फर्स्ट क्लास मिळवला. एज्युकेशनल ट्रिप साठी हैद्राबादला गेला. परत येतांना सगळ्यांसोबत लुंबिनी पार्कात गेला.
............ अचानक मोठा आवाज झाला. त्याला अजूबाजूला सगळं लाल दिसायला लागलं. छातीत काहितरी घुसलं होतं. श्वास हळूहळू थांबत होता. त्याने सरांना सांगितलं पण आता उशीर झाला होता. दुसर्या दिवशी सरकारने ठरवल्याप्रमाणे सगळ्या डेडबॉडीज विमानाने पाठवल्या. त्याचे वडील बाजूला बसून ईवाईनातून आले.
प्रतिक्रिया
7 Aug 2015 - 1:38 pm | जगप्रवासी
सुन्न झालो वाचून
7 Aug 2015 - 1:38 pm | मितान
+१
7 Aug 2015 - 3:09 pm | बोका-ए-आझम
+१
7 Aug 2015 - 4:04 pm | प्रदीप@१२३
+१
7 Aug 2015 - 4:30 pm | नावातकायआहे
+१
7 Aug 2015 - 9:15 pm | बहिरुपी
+१ सुन्न !
<काय सिक्वल असणार, मित्रा? एक आयुष्य संपलंय, आणि बाकीची गोठलीत.. :-(>+१
8 Aug 2015 - 9:59 am | नूतन सावंत
कथा +१
घटना -१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
8 Aug 2015 - 9:59 am | नूतन सावंत
कथा +१
घटना -१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
8 Aug 2015 - 10:05 am | पैसा
+१
सत्य हे कल्पनेपेक्षा भयंकर असतं. तुमच्या दु:खात सहभागी आहोत असं म्हणून दिलासा द्यायचा प्रयत्न करू आम्ही. पण तो दिलासा स्वतःलाच जास्त असतो, की मी किंवा माझे जवळचे कोणी त्या स्फोटात गेले नाहीत. :(
8 Aug 2015 - 10:46 pm | एक एकटा एकटाच
+१
9 Aug 2015 - 2:53 pm | तीरूपुत्र
अररररर खुप वाईट झालं.त्यांना काय मिळालं असेल असं करून.सत्य आहे म्हणून,आवडले असे म्हणणार नाही.
10 Aug 2015 - 9:22 am | समीरसूर
+1
मन बधिर झाले. नाव आडनाव यांचा सत्यघटनेचा वृत्तांतदेखील चटका लावणारा...
+1
10 Aug 2015 - 10:07 am | पिलीयन रायडर
+१
10 Aug 2015 - 10:20 am | विशाल कुलकर्णी
कथा 'आवडली' असं तरी कसं म्हणू? प्यारे साहेबांशी सहमत. शुभेच्छा :)