[शतशब्दकथा स्पर्धा] ईवाईन

नाव आडनाव's picture
नाव आडनाव in स्पर्धा
4 Aug 2015 - 10:22 pm

तसंतर विमान म्हणजे फक्त एक वाहतुकीचा प्रकार. पण खेड्यातल्या "त्या"च्या सारख्यांसाठी विमान म्हणजे एक मोठं आकर्षण. विमानाचा आवाज ऐकून एकदा तो त्याच्या आई-वडिलांना म्हणाला "मी मोठा व्हवून ईंजिनीअर झालो त आपन ईवाईनातून फिराया जावू".

त्याने अभ्यास केला, ईंजिनीअरींगचं पहिलं वर्ष बरेच लोक फेल होत असतांना त्याने फर्स्ट क्लास मिळवला. एज्युकेशनल ट्रिप साठी हैद्राबादला गेला. परत येतांना सगळ्यांसोबत लुंबिनी पार्कात गेला.

............ अचानक मोठा आवाज झाला. त्याला अजूबाजूला सगळं लाल दिसायला लागलं. छातीत काहितरी घुसलं होतं. श्वास हळूहळू थांबत होता. त्याने सरांना सांगितलं पण आता उशीर झाला होता. दुसर्‍या दिवशी सरकारने ठरवल्याप्रमाणे सगळ्या डेडबॉडीज विमानाने पाठवल्या. त्याचे वडील बाजूला बसून ईवाईनातून आले.

प्रतिक्रिया

जडभरत's picture

4 Aug 2015 - 10:43 pm | जडभरत

अर्र!!!
शशक आहे का? उल्लेख नाही कुठे?

जडभरत's picture

5 Aug 2015 - 7:01 am | जडभरत

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Aug 2015 - 11:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

शशक स्पर्धेचा उल्लेख राहीला काय ? कथा आवडली हेवेसांन.

रेवती's picture

4 Aug 2015 - 11:29 pm | रेवती

कथा आवडली. +१.

हैदराबाद,लुंबिनी पार्क, स्फोट. टोकं जुळली.

कथा आवडली.
+१

सुहास झेले's picture

9 Aug 2015 - 1:37 am | सुहास झेले

आवडली ...

हैदराबाद,लुंबिनी पार्क, स्फोट. टोकं जुळली.

कथा आवडली.
+१

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2015 - 11:58 pm | अत्रुप्त आत्मा

+१

राघवेंद्र's picture

5 Aug 2015 - 12:00 am | राघवेंद्र

+१

टवाळ कार्टा's picture

5 Aug 2015 - 12:02 am | टवाळ कार्टा

+१

अनन्त अवधुत's picture

5 Aug 2015 - 12:46 am | अनन्त अवधुत

+१

मुक्त विहारि's picture

5 Aug 2015 - 6:43 am | मुक्त विहारि

+१

अजया's picture

5 Aug 2015 - 7:15 am | अजया

+१

जेपी's picture

5 Aug 2015 - 7:18 am | जेपी

+1

प्रीत-मोहर's picture

5 Aug 2015 - 7:29 am | प्रीत-मोहर

+१

पिलीयन रायडर's picture

5 Aug 2015 - 7:37 am | पिलीयन रायडर

+१

अमृत's picture

5 Aug 2015 - 8:31 am | अमृत

+१

ब़जरबट्टू's picture

5 Aug 2015 - 9:08 am | ब़जरबट्टू

+1

अदि's picture

5 Aug 2015 - 9:52 am | अदि

+१

देशपांडे विनायक's picture

5 Aug 2015 - 10:05 am | देशपांडे विनायक

+१

तुषार काळभोर's picture

5 Aug 2015 - 10:10 am | तुषार काळभोर

+१

असा मी असामी's picture

5 Aug 2015 - 10:35 am | असा मी असामी

+१

मृत्युन्जय's picture

5 Aug 2015 - 10:53 am | मृत्युन्जय

+१

पाटील हो's picture

5 Aug 2015 - 11:00 am | पाटील हो

.

चिगो's picture

5 Aug 2015 - 11:05 am | चिगो

+१

संजय पाटिल's picture

5 Aug 2015 - 11:09 am | संजय पाटिल

+१

मी-सौरभ's picture

5 Aug 2015 - 11:10 am | मी-सौरभ

..

तुडतुडी's picture

5 Aug 2015 - 11:55 am | तुडतुडी

+१

अविनाश पांढरकर's picture

5 Aug 2015 - 12:14 pm | अविनाश पांढरकर

+१

अनिता ठाकूर's picture

5 Aug 2015 - 12:57 pm | अनिता ठाकूर

+१

gogglya's picture

5 Aug 2015 - 1:06 pm | gogglya

+१

रातराणी's picture

5 Aug 2015 - 1:09 pm | रातराणी

+१

नितिन५८८'s picture

5 Aug 2015 - 1:25 pm | नितिन५८८

+१

यमन's picture

5 Aug 2015 - 1:33 pm | यमन

छान म्हनवत नाय हो...

तुमचा अभिषेक's picture

6 Aug 2015 - 2:38 pm | तुमचा अभिषेक

:(

खटपट्या's picture

6 Aug 2015 - 2:47 pm | खटपट्या

+१

नाखु's picture

6 Aug 2015 - 3:07 pm | नाखु

+१

प्राची अश्विनी's picture

6 Aug 2015 - 7:14 pm | प्राची अश्विनी

+१

अनिवासि's picture

6 Aug 2015 - 7:47 pm | अनिवासि

मस्त
+१

स्वामी संकेतानंद's picture

6 Aug 2015 - 7:57 pm | स्वामी संकेतानंद

+१

आवडली.
इवाइन शीर्षक पाहून वाटले की व्याही-विहीण नात्यातली मजेदार कथा असेल. आमच्याकडे विहीण ला इवाइन म्हणतात म्हणून. पण कथा वाचून चर्र झाले काळजात.

टुंड्रा's picture

6 Aug 2015 - 9:09 pm | टुंड्रा

+१

नाव आडनाव's picture

6 Aug 2015 - 9:11 pm | नाव आडनाव

परवा (४ तारखेला) ग्रामपंचायतीची निवडणूक होती म्हणून मतदानासाठी गावाला गेलो होतो. माझं नाव गावच्या मतदार यादीत आहे. मामाचं आणि माझं गाव बाजू-बाजूलाच आहे. जातांना "त्या"ची आठवण आली. कायम येतंच राहते. "तो" म्हणजे माझा सख्खा मामेभाऊ. येत्या २५ तारखेला ८ वर्ष होतील. नाव लिहायचं नव्हतं म्हणून "तो" असं लिहिलं.

मला नक्की कळत नव्हतं - इथे लिहावं की नको. मला मित्र कमी आहेत. कम्युनिकेशनचा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे कोणाबरोबर बोलणार. असलाच एखादा ऐकायला आणि एकदम मनातलं बोलायचं असलं तर बोलतांना शब्दंच आठवत नाहीत, त्यामुळे समोरचा वैतागतो. लिहितांना तसं नाही. वेळ लागला तरी चालतो. संध्याकाळी परत आल्या नंतर रात्री लिहिलं. शब्द कमी वापरायचे हे शतशब्दकथेत चांगलं - कारण मला तसाही प्रॉब्लेम शब्दांचाच आहे. स्पर्धेत जिंकायचं / हरायचं असं काही नाही. मनात आलं ते लिहिलं. म्हणूनंच आधी स्पर्धेसाठी शीर्षक तसं दिलं नव्हतं.

मामा मामी अजून त्या दिवशी सारखेच आहेत. आता यातून बाहेर येणं अशक्य आहे त्यांना. अ‍ॅक्सिडेंट, खून झालेल्या केसेस त्यांना माहित आहेत पण बाँबस्फोट त्यांना माहित नव्हता. कळतंच नव्हतं असं कसं झालं. त्याने कोणाचं काय केलं होतं जे त्याला बाँब लावून मारलं, सरांनी त्याला दवाखण्यात नेलं असतं तर तो वाचला असता का असे बरेच प्रश्न त्यांना पडतात. पण उत्तर कसं मिळणार. नाहीच मिळणार. कोण देणार. का केलं विचारलं तर अमक्या एका दंगलीचा बदला म्हणून स्फोट केल्याचं सांगतील. पण नंतर कळेल ती दंगल तर तमक्या एका दंगलीची रीअ‍ॅक्शन होती. हे लॉजिक रिकर्जिव्हली चालतंच राहणार. सरांना काही ऑप्शन होता का? नाही. कारण तेच घाबरलेले होते. इतके जखमी, काही मृत, सगळीकडे रक्त... काय करायचं त्यांना कळलंच नाही. तो म्हणत होता "मला श्वास घेता येत नाहीय सर." हळूहळू श्वास घेणं कमी होत गेलं. आणि शेवटी थांबलं. हे सरांनीच सांगितलं. त्याच्या कॉलेजचे अजून ७ जण होते जे स्फोटात गेले.

मी स्फोटाच्या दिवशी कल्याणहून घरी आलो होतो. यायला रात्रीचे १०:३०/ ११ झाले असतील. टीव्ही वर बातम्या लावल्या तर सगळं लाल दिसत होतं. तेंव्हा १३ / २६ तारखेला स्फोटांच्या बातम्या असायच्याच. मी झोपलो पण पहाटे आई ने उठवलं तेंव्हा ती रडत होती. आईने सांगितलं "तो कालच्या स्फोटात गेला".

ही सत्य घटना आहे. मी गेल्या आठ वर्षांत मामा मामी ला कधी स्फोट करणार्‍यांना शिव्या शाप देतांना ऐकलं नाही किंवा त्यांना बदला घ्यावासा वाटत नाही. बरं आहे - सि॑क्वल नाही.

माफ करा, सत्य घटना आहे हे लिहायला पाहिजे होतं. जे लिहिलंय ते जसं झालं तसंच लिहिलं. इथे जितक्या लोकांनी वाचलं त्यांच्याशी समोर बोलल्या सारखं वाटलं.

श्रीरंग_जोशी's picture

6 Aug 2015 - 10:31 pm | श्रीरंग_जोशी

अतिरेकी हल्ल्यांत मारल्या गेलेल्या व्यक्तिच्या जवळच्या माणसाने लिहिलेले वाचून मनाला वेदना झाल्या.

मला जेवढे आठवते त्यानुसार संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी या हल्ल्याचे दुर्दैवी बळी होते.

एक समाधानाची बाब अशी की इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेच्या मुसक्या बर्‍यापैकी आवळल्या गेल्या आहेत. भटकळ बंधूंपैकी एक अटकेत आहे.

ही वेळ कुणावरही न येवो.

खूप वाईट वाटलं वाचून. त्याहून वाईट स्फोटात मरणं हे स्वीकारलं गेलं आहे आपल्याकडं. कोणीतरी येतो बॉम्ब ठेवतो आणि माणूस मरतं हे कसं स्वीकारार्ह असू शकतं कळत नाही. कालच जोक म्हणून आलेला... 'एक दिवा एका मुला ला दिसतो, उचलायला जातो तर स्फोट होऊन मरतो. प्रत्येक दिवा अल्लादीन का चिराग नहीं बल्कि मुजाहिद्दीन का भी हो सकता है' ही आपली सामाजिक सुरक्षा आहे.
हे भिकारी अतिरेकी म्हणजे तुमच्या भावाच्या वयाचीच पण ब्रेन वॉश केलेली टीन एजर्स पेक्षा थोड़ी मोठी मुलं असावीत. हे वय खराब. सांगेल ते पटतं. वाईट सांगितलेलं तर जास्तच लवकर... अनुभव नसतो आणि रक्त गरम. का मारलं माहिती नाही का मेला माहिती नाही. नंतर कधी या शिकवण्यातून बाहेर येतात की नाही देव जाणे.
यांना मारून नाही उपयोग. त्यामागच्या शिकवणीला ठेचलं गेलं पाहिजे.

चिगो's picture

7 Aug 2015 - 1:35 pm | चिगो

काय बोलू?

ही सत्य घटना आहे. मी गेल्या आठ वर्षांत मामा मामी ला कधी स्फोट करणार्‍यांना शिव्या शाप देतांना ऐकलं नाही किंवा त्यांना बदला घ्यावासा वाटत नाही. बरं आहे - सि॑क्वल नाही.

काय सिक्वल असणार, मित्रा? एक आयुष्य संपलंय, आणि बाकीची गोठलीत.. :-(

नीलमोहर's picture

7 Aug 2015 - 2:21 pm | नीलमोहर

मनोगत अगदी मनाला भिडणारं आहे तुमचं..
तुमच्या दु:खात सह्भागी..

उगा काहितरीच's picture

6 Aug 2015 - 9:16 pm | उगा काहितरीच

+१

सव्यसाची's picture

6 Aug 2015 - 11:01 pm | सव्यसाची

+१

मधुरा देशपांडे's picture

7 Aug 2015 - 1:01 pm | मधुरा देशपांडे

+१

माधुरी विनायक's picture

7 Aug 2015 - 1:06 pm | माधुरी विनायक

+१