शाप भाग - २

माझिया मना's picture
माझिया मना in जनातलं, मनातलं
7 Aug 2015 - 11:51 pm

"वहिनी सरकार" शारदेची हाक आली. चार पाच तरी हाका झाल्या असाव्यात. "काही होतंय का? दिवेलागणीला अशा का बसून राहिला आहात?" काय सांगणार तिला..काय होतंय माझे मलाच कळत नव्हते. मी जर मनातून हादरलेय हे उघड झाले तर वाड्यातले वातावरण बिघडायला वेळ लागणार नाही.

अजिंक्यराजे अन् राजश्री नव्या प्रोजेक्टचे काम पहायला गेले आहेत. परत येईपर्यंत जीवात जीव नाही.

पोर्चमध्ये गाडीचा आवाज आला तशी धावत गेले. कधी एकदा अजिंक्यला सुखरुप पाहते असं झालेय. ते दोघे हसत येताना पाहून हायसे वाटत आहे.

इतका वेळ उलटसुलट विचार करणारे मन थोडे शांत झाले. नक्की आपल्याला वाटतेय ते खरं की आपण गैरसमज करून घेतोय?
भूतकाळाची पाने परत अशी समोर उलगडल्या सारखी का वाटत आहेत?

राजश्री परत निघाली आहे. अजिंक्य तिला सोडायला शहरात जाऊन येतो म्हणतोय. जाऊ दे की तिलाच इथे राहू दे? अनामिक भीती दाटलीय. काही दगाफटका झाला तर...

हो..पण शहरात तर दोघे सोबत असतात तेव्हा कधी काही झालेय का? असा ही विचार मनात येतोय..काय करावं बरे?
अचानक राजश्रीच बोलली.. "आईसाहेब, वाड्यावरील कोणी सोबत येईल का? अजिंक्यला येताना सोबत होईल". म्हणजे मला काळजी लागून रहाणार नाही.

मी चमकूनच तिच्याकडे पाहिले. कसे समजले हिला माझे विचार? माझ्या काळजीत मात्र भर पडली.

कथा

प्रतिक्रिया

जडभरत's picture

8 Aug 2015 - 4:55 am | जडभरत

क्रमशः?

माझिया मना's picture

8 Aug 2015 - 6:40 am | माझिया मना

हं..विचार आहे.
:-)

मस्तच! पण मग कथा विस्तृत लिहा. वाचायला आवडेल. कथाबीज चांगलेच मसालेदार आहे तुमचे. येऊ द्या.

एक एकटा एकटाच's picture

8 Aug 2015 - 10:42 pm | एक एकटा एकटाच

सहमत

माझिया मना's picture

8 Aug 2015 - 11:28 am | माझिया मना

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!

एक एकटा एकटाच's picture

8 Aug 2015 - 10:42 pm | एक एकटा एकटाच

ही कथा शतशब्द
स्पर्धेसाठी लिहिली होती ना?

माझिया मना's picture

9 Aug 2015 - 12:01 am | माझिया मना

नाही..
शतशब्दसाठी या कथेचा पहिला भाग दिला आहे.

gogglya's picture

10 Aug 2015 - 5:16 pm | gogglya

पु भा प्र