हातात हात घेऊन चालताना,
रुतेल पायात काटा,
घाई घाईने काढलास तरी चालेल,
पण नंतर हळुवार मारशील ना फुंकर?
नव्याची नवलाई संपत असताना,
होतील असंख्य प्रश्न उभे,
प्रत्येकाचं उत्तर नाही दिलं तरी चालेल,
पण नंतर हळुवार घेशील ना कुशीत?
अस्तित्वाच्या कल्पना कोलमडून जाताना,
जड होईल अपेक्षाच ओझ,
प्रत्येकवेळी वाटून घेतलं नाहीस तरी चालेल,
पण नंतर हळुवार मन करशील ना हलक?
तुला माझी माझी तुला सोबत असताना,
येईल एकटेपण आगंतुकासारख,
प्रत्येकवेळी डोळ्यांनी शोधलं नाहीस तरी चालेल,
पण नंतर हळुवार पाठवशील का कवितेला शोधत?
प्रतिक्रिया
8 Jul 2015 - 2:35 am | यशोधरा
छान..
8 Jul 2015 - 2:49 am | सटक
पण नंतर हळुवार पाठवशील का कवितेला शोधत?
सुन्दर!!
8 Jul 2015 - 11:09 am | चुकलामाकला
वाह!
8 Jul 2015 - 12:03 pm | टवाळ कार्टा
एक मस्त मांसाहारी विडंबन डोक्यात आकार घेत आहे =))
8 Jul 2015 - 12:16 pm | दमामि
खिक्क!
8 Jul 2015 - 12:16 pm | रातराणी
होऊन जौ द्या : )
8 Jul 2015 - 12:19 pm | दमामि
फकस्त काही शब्द काढून टाकले की। झाले
8 Jul 2015 - 12:25 pm | टवाळ कार्टा
तेच कर्तोय =))
8 Jul 2015 - 12:29 pm | रातराणी
कसं काय जमत बॉ आपल्याच प्रतिसादाना प्रतिसाद द्यायला :)
8 Jul 2015 - 1:05 pm | टवाळ कार्टा
खिक्क....मांसाहारी विडंबन तयार आहे...इच्छूकांनी व्यनी करावा ;)
8 Jul 2015 - 1:09 pm | बॅटमॅन
व्यनि करणे प्लीज़!
8 Jul 2015 - 1:21 pm | खटपट्या
मला पण
8 Jul 2015 - 1:21 pm | दमामि
मला सुद्धा!
8 Jul 2015 - 1:22 pm | बॅटमॅन
टका म्हणे छान चाललाय संवाद, आपला व्यनिवाद, आपणासी!
9 Jul 2015 - 7:47 pm | अस्वस्थामा
व्यनि करावा..
8 Jul 2015 - 12:20 pm | काळा पहाड
मन वढाय वढाय
8 Jul 2015 - 12:16 pm | मदनबाण
एक मस्त मांसाहारी विडंबन डोक्यात आकार घेत आहे =)
हॅहॅहॅ... टाक हो ते विडंबन... संम नी उडवले नाही तर वाचता येउल हो आम्हाला ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M
8 Jul 2015 - 12:17 pm | एस
सुंदर.
8 Jul 2015 - 12:29 pm | स्वप्नांची राणी
अश्लील शिर्षक... ;)
8 Jul 2015 - 12:35 pm | रातराणी
_/\_
आधी लक्षातच नव्हतं आलं ; ) आता करशील ना म्हणणार नाही कधीच ; )
8 Jul 2015 - 12:50 pm | प्यारे१
अश्लीलता डोक्यात असते.
आमचे लाडके संपादक मित्र किसनदेवांची लाडकी 'शब्दांना नसतो अर्थ' वाचावी ही नम्र विनंती.
8 Jul 2015 - 12:56 pm | रातराणी
लाडके आणि संपादक मित्र एका वाक्यात? वाचायलाच पाहिजे ; )
8 Jul 2015 - 1:00 pm | प्यारे१
भावनाओंको 'सटली' समझिए मोहतरमा!~
8 Jul 2015 - 1:05 pm | रातराणी
खिक्क!
8 Jul 2015 - 12:57 pm | बॅटमॅन
आँ?????
डुआयडी अलर्ट? ;)
8 Jul 2015 - 1:22 pm | दमामि
+1111111
8 Jul 2015 - 12:52 pm | खटपट्या
चांगलीय !!
8 Jul 2015 - 12:57 pm | बॅटमॅन
छान कविता!
8 Jul 2015 - 1:04 pm | काळा पहाड
माफ करा पण लय मिसिंग आहे. मात्रा चुकल्या सारख्या वाटतात. काही शब्द काही ठिकाणी जास्त वाटतात.
8 Jul 2015 - 1:07 pm | रातराणी
धन्यवाद! सुधारण्याचा प्रयत्न करेन : )
8 Jul 2015 - 1:10 pm | बॅटमॅन
(ते सगळं दुरुस्त) करशील ना?
8 Jul 2015 - 1:15 pm | रातराणी
हा हा माईक्रो मॅनेजिंगपणा आहे बॅटमॅन !
( चाल नेहमीची हा हलकटपणा आहे माने! )
8 Jul 2015 - 1:18 pm | बॅटमॅन
ओह माय ग्वाड (& तिखट), इथे माई कुठून आल्या? त्यांनी कावळादेखील पाळलाय हे नव्यानंच कळालं.
8 Jul 2015 - 1:28 pm | रातराणी
माई सर्वव्यापी आहेत मूढ बालका.
<माई मोड ऑन>
अरे आमच्या ह्यांना भारी कुतूहल हो कावळ्याच. हुशार पक्षी आहे म्हणतात. म्हणून पाळला. उकाच्या बोक्याने खाल्ला हो पण. दुष्ट मेला. कावळा नाही रे बोका बोका.
<माई मोड ऑफ>
8 Jul 2015 - 1:30 pm | रातराणी
अर्र्र ते माई मोड ऑन/ऑफ दिसत नाय. समजून घ्या.
8 Jul 2015 - 2:16 pm | बॅटमॅन
हा हा हा =))
रातस्वप्नराणी ;)
9 Jul 2015 - 12:02 am | रातराणी
नशीब रातस्वप्नराणीमाई नाही म्हणालात. _/\_
9 Jul 2015 - 12:02 pm | बॅटमॅन
माईंची सर/मॅडम कुणालाच येणार नाय हो.
9 Jul 2015 - 12:10 pm | रातराणी
धन्यवाद. दूध आणि पाणी राजहंसच वेगळं करू जाणे. ; )
9 Jul 2015 - 12:20 pm | बॅटमॅन
अंगावर मूठभर मसल्स चढले हे ऐकून. ;)
9 Jul 2015 - 12:28 pm | रातराणी
घ्या मी काही बोलले राजहंस कोण ते? निरर्थक आत्मकांडाचा भ्रमवाद वगैरे वगैरे. छ्या गुर्जीना मंत्र नीट विचारला पायजे.
9 Jul 2015 - 12:32 pm | बॅटमॅन
=))
हे कोण बोलले बोला
राजहंस येथे निजला
9 Jul 2015 - 7:04 pm | अत्रुप्त आत्मा
@ छ्या गुर्जीना मंत्र नीट विचारला पायजे.>> ख्याक्क! आमच्यापेक्षा बाकिच्यांनाच आता आमचे मंत्र इथे पाठ झालेले आहेत. ;-)
अत्ता सूड घेइल बघा कुणीतरी लग्गेच! :P
8 Jul 2015 - 6:47 pm | एक एकटा एकटाच
मस्तच!!!!!!!
9 Jul 2015 - 12:19 am | रेवती
कविता आवडली पण शीर्षक वाचून दचकले.
9 Jul 2015 - 12:29 am | रातराणी
हो ग ताई : ) शीर्षकासाठी फार विचार नाही केला नाही. नाऊ इट्स टू लेट : )
9 Jul 2015 - 12:35 am | रेवती
असू दे, असू दे! आपण पुढच्या कवितेचं नाव चांगलसं ठेवू, बिफोर इट्स टू लेट हं. :)
माझी बाय ती!
9 Jul 2015 - 12:06 pm | रातराणी
हो..हो डोहाळे लागले की कळवतें हं ; )
9 Jul 2015 - 10:06 pm | यसवायजी
डोहाळे लागले की कळवतें हं
तयारी चालू करा लगेच.
9 Jul 2015 - 8:16 pm | प्यारे१
'करशील ना?' हा वत्सल प्रश्न नेहमीच माऊलींच्या डोक्यात फेर धरून असतो. बाळाला जेवू घालून आई जेवायला बसायला सुरुवात करतानाच, आssssई शीsssss असा आवाज येतो आणि धावपळ करत आई उठून योग्य जागी योग्य पोजीशन ला बाळाला बसवून वरील वत्सल प्रश्न विचारते.
-अर्धशतकासाठी पाणी टाकलेला ;)
9 Jul 2015 - 8:52 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
10 Jul 2015 - 1:25 am | रातराणी
मान गये प्यारेजी! आपकी पारखी नजर और बाळाच टायमिंग दोनो को! :)
11 Jul 2015 - 1:28 pm | टवाळ कार्टा
खिक्क