प्रिय वपु,

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
26 Jun 2015 - 12:32 pm

प्रिय वपु,
लौकीकार्थाने तुला या नश्वर दुनियेतुन जाऊन 14 वर्ष झाली. मला खात्री आहे की तू आता जिथे असशील तिथे सुद्धा 'रंग मनाचे' लावून माणूस शोधत असशील. तुला सवयच होती म्हणा ती. वयाच्या कितव्या वर्षापासून तू दोस्त बनलास ते काही आठवत नाही, पण त्यामुळे कळत्या वयात जे काही कळल ते भन्नाटच होत.
"लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तु हवा आहेस" अशी दोस्तीची एक नवीनच व्याख्या समोर ठेवून अंतरबाह्य बदलून टाकलस, 'सखी' मधून चतुर्थीचा अर्थ सांगितलास. कधी 'वपुर्झा'तुन खर्चाच गणित समजावलस तर कधी 'पार्टनर' मधून नरक म्हणजे काय याची अनुभूति दिलिस. 'गार्गी'सारख तुला भेटण्याच् भाग्य नव्हतं कदाचित माझ्याकडे पण पुस्तकरूपातुन तुझ्यासारखा 'दोस्त' कायम माझ्यासोबत राहील.

#Gypsy

कलामुक्तक

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Jun 2015 - 12:39 pm | प्रचेतस

इतकंच?

क्रेझी's picture

26 Jun 2015 - 12:52 pm | क्रेझी

खरंच इतकच?? वपु म्हणजे माणसांचं व्यसन लागलेला माणूस! माझ्यासोबत पण असंच काहीसं झालं..शाळेमधे पहिलं पुस्तक वाचलं 'महोत्सव' आणि त्यानंतर खरंच व्यसन लागलं त्यांच्या लिखाणाचं! होती नव्हती ती सगळी पुस्तकं शोधून एकदा..दोनदा...पुढे कितव्यांदा वाचली आठवत नाही...आजही आयुष्यामधे कुठे अडलं की वपुंची आठवण होते आणि मग असंच महोत्सवचं किंवा दोस्तच एखादं पान उघडून वाचलं की एखाद्या अगदी जवळच्या मित्राला भेटून स्वतःचा प्रश्न सांगितल्यासारखं वाटतं आणि अचानक उत्तर पण गवसतं...वपु आज हवे होते त्यांचं अजून लिखाण मला वाचायचं आहे अशी खंत कायम लागून राहिली आहे! कधी कधी वाटतं खूप उशिरा ओळख झाली मला वपुंची...

संवेदनशील मन, सौंदर्यदृष्टी, आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाला अगदी खास शैलीत जगणा-या ह्या लेखकाने वाचकांसाठी खूप काही अनमोल साहित्य लिहून ठेवलय..

जसे वपुंचे प्रशंसक,चाहते आहेत तसेच टीकाकारही आहेत पण दोहोंच्या मनामधे वपुंची खास अशी जागा आहे :)

उगा काहितरीच's picture

26 Jun 2015 - 2:12 pm | उगा काहितरीच

शॉर्ट बट स्वीट ! अजून मोठा हवा होता लेख.

महासंग्राम's picture

26 Jun 2015 - 3:37 pm | महासंग्राम

वपु अशी वल्ली होते कि ज्यांच्या बद्दल कितीही लिहील तर कमीच पडेल ….
आज त्यांची १४ वि पुण्यतिथी आहे म्हणुन लिहिल हे.

वपाडाव's picture

26 Jun 2015 - 3:37 pm | वपाडाव

काहीतरी (किंवा खुप काही) कमी पडतंय...

महासंग्राम's picture

26 Jun 2015 - 3:56 pm | महासंग्राम

नक्कीच कमी असेलही मी माझ्याकुवतीनुसार लिहिलं आहे
सगळ वपु तुम्ही एका लिखाणात सामावून घेऊच शकत नाही

काव्यान्जलि's picture

26 Jun 2015 - 5:04 pm | काव्यान्जलि

खूप छान...
माझ्या सोबत देखील असंच झाल आहे.
पार्टनर म्हणजे वपुंची भगवतगीताच !!!
वपुंची पुस्तके, लेखन कौशल्य अफाट आहे.
त्यांची पुस्तके खूप उशीरा हाती आली. त्यांना प्रत्यक्ष भेटता नाही आलं याची खंत कायम जाणवत राहील.
पण पुस्तकातून रोज नवे वपु भेटतात.

प्रभू-प्रसाद's picture

26 Jun 2015 - 6:54 pm | प्रभू-प्रसाद

वपु कायम ग्रेट ...
वपु म्हणजे सामान्य मानवाचे अन्तर्मन उलगडणारे रसायण..

सुचेता's picture

29 Aug 2016 - 9:06 pm | सुचेता

अगदि खर आहे

योगायोगाने काल आणि आज गाडी चालवताना त्यांचं कथाकथन ऐकत होते..

माझ्या मनावर वपुंचा प्रचंड, आणि अत्यंत घाणेरडा (सोलापुरी भाषेतला.. घाणेरडा) पगडा आहे… खरंतर वपुंची पुस्तके माझ्या जगण्याची फिलॉसॉफी कधी बनली काहीच नाही कळलं… तसं पहायला गेलं तर माझी स्वप्नं मुळात खूप थोडी आहेत… पैकी एक म्हणजे मला वपुंना भेटायचं होतं पण…. असो
…. कित्येक वर्ष मी वपुंचं गारुड मिरवतोय…. आणि शेवटपर्यंत मिरवत राहीन…. असीम समाधानानं….

सुबोध खरे's picture

27 Jun 2015 - 1:24 pm | सुबोध खरे

व पुं चं बरचसं साहित्य मी वाचलं आहे आणि ते प्रत्येक वेळेस वेगळ्या अर्थाने जाणवते किंवा भावते. परंतु त्यांचे एक वाक्य मी ब्रम्हवाक्य म्हणून वापरतो. त्यांनी लिहिले आहे
तीन ब्रम्ह राक्षस आहेत ज्यांनी माणसाचे अर्ध जीवन खाऊन टाकले आहे ते म्हणजे
"लोक काय म्हणतील?"
हे जेंव्हा माझ्या मेंदूत उतरले तेंव्हा पासून माझे आयुष्य अत्यंत सुखाचे झालेले आहे.
कारण लोकांना फाट्यावर मारण्यामुळे आयुष्याचा माझा बराचसा वेळ आणि पैसा वाचला आहे/ वाचतो आहे

महासंग्राम's picture

29 Jun 2015 - 2:57 pm | महासंग्राम

खरय डॉक्टर दादा, आपण उगाच दुनिया काय म्हणेल यात अडकून पडतो आणि व पु जस म्हणतात तस दुनिया आपल्याला विसरून जाते

वपु आमच्या सायन/शीव च्या DS HIGH School उर्फ ध श्री चे विद्यार्थी हे त्यांचा एक लेख आल्यावर कळले.त्यांची एक वेगळी शैली होती आणि त्यावेळच्या इतर लोकप्रिय लेखकांप्रमाणेच एक वेगळा वाचकवर्ग निर्माण करू शकले. मी त्याला शिवाजी पार्क शैली हे नाव ठेवले होते.

शाळेबद्दल लिहातांना आमच्याच नव्हे तर एकूण शाळांचेच महत्त्व कसे कमी झाले हे मार्मिकपणे मांडले. "८०' च्या पूर्वी ds च्या समोर,मागच्या रस्तयावर वगैरे ठिकाणाचा पत्ता सांगितला जायचा; आता गुरुकृपा समोसेवाल्याजवळ d s हाइ स्कूल आहे असे सांगावे लागते."

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jun 2015 - 9:16 pm | निनाद मुक्काम प...

चहा पिणार्यांच्या पुस्तकांच्या कपाटात काचेतून पूल तर कॉफी पिणार्यांच्या कपाटातून वपु एकेकाळी डोकवायचे
आता चेतन भगत ...
असो
माझ्या कितीतरी मित्रांच्या साखर पुड्याला वपुर्झा च्या सीड्या दिल्या आहेत
पुस्तके वाचतीलच ह्याचा काही नेम नाही
पण लग्ना आधी प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे वपुर्झा

महासंग्राम's picture

29 Jun 2015 - 2:55 pm | महासंग्राम

फक्त वपुर्झाच नाही तर पार्टनर पण

चंपाबाई's picture

28 Aug 2016 - 11:28 pm | चंपाबाई

वपु आणि सुशि इतक्या कथा असताना मराठी सिनेमावाले कथेसाठी कुठेही का शोधत फिरतात? वपुंच्या बदली कथेवरला पेइंग घोस्ट सिनेमा मात्र फार चांगला वाटला नाही.

बोका-ए-आझम's picture

29 Aug 2016 - 2:30 am | बोका-ए-आझम

वपु कधीच आवडले नाहीत. फार तत्वज्ञान झाडताहेत असं वाटायचं. अजूनही वाटतं.

पगला गजोधर's picture

29 Aug 2016 - 6:37 am | पगला गजोधर

सहमत

प्रचेतस's picture

29 Aug 2016 - 8:32 am | प्रचेतस

+२

नावातकायआहे's picture

29 Aug 2016 - 9:09 am | नावातकायआहे

+३

महासंग्राम's picture

29 Aug 2016 - 9:15 am | महासंग्राम

वपु कधीच आवडले नाहीत.

असू शकते प्रत्येकाचा पाहण्याचा दुसरहितने वेगवेगळा असतो, त्याप्रमाणेच माणूस दिसतो.

Lets agree to disagree :)

महासंग्राम's picture

29 Aug 2016 - 9:15 am | महासंग्राम

दुसरहितने == > दृष्टिकोन*

अभिजीत अवलिया's picture

29 Aug 2016 - 8:01 pm | अभिजीत अवलिया

आयुष्य जस जसे पुढे सरकत जाते तस तसे आपली काही मते बदलत जातात. एके काळी आवडणाऱ्या गोष्टी नावडत्या होतात किंवा उलट. व.पु. च्या बाबतीत पण तसेच झाले माझे देखील.
ते फार तत्वज्ञान झाडतात हे बिलकुल मान्य. आणी इतकी तत्वे पाळून आयुष्य जगता येत नाही. त्यामुळे वाचायचे, जमले तर आचरणात आणायचे नाहीतर सोडून द्यायचे.

वपुंचे एकदंरीत साहीत्य मनाला कधीच भिडले नाहीत. कारण त्यात असलेली कृत्रिमता, सुभाषिते डायलॉग्ज्च चा खांडेकरी सोस. जीवनात वाटाणा मिळाला तरी लयलुट करायची ती चण्याचीच टाइपची टुकार सुभाषिते. ज्याला अंडरलाइन करण्यात खांडेकरांच्या पुढच्या एका पिढीला लय मजा यायची. ( अंडरराइट करण्यासाठी लायब्ररीच्या फुकट पुस्तकांना अंडरराइट करण्यासाठी खांडेकरांनी मुबलक सुभाषितांचा पुरवठा केला ) शिवाय ते एका फारच मर्यादीत वर्तुळातुन जगत असलेल्या मर्यादीत जाणीवेच्या मानसिकतेचे प्रतिनीधीत्व करत असत ज्यांच्याकडे सोपी सोपी लहान लहान ओळींची "तयार" आणि "सुंदर सुबक चौकोनी आटोपशीर " उत्तरे होती. प्रश्न ही तितक्याच मर्यादेत उपस्थित व्हायचा. त्यांच्या बहुतांश कथा फारच उथळ होत्या. उदा. ते ब्ल्यु फिल्म बघण्यासाठी एकदा चाललेली धडपड अशी एक , कुठल्याही दर्जेदार समीक्षकाने कधीही त्यांच्या साहीत्याची दखल घेतली नाही याची त्यांना बोचरी जाणीव होती ही खंत ते अनेकदा व्यक्त करत. त्यांच्या बहुधा पत्नीच्या निधनानंतर थोडा त्यांच्या साहीत्यात बदल झाला असावा याचे कारण दुसरेही असेल. "आपण सारे अर्जुन" जरा चांगल्या दर्जाचे होते. ओशो चा उत्तरकालीन आयुष्यातला प्रभाव थोडा त्यांना "शैली" तुन बाहेर काढण्यास मदतगार झाला असावा. त्यांच्या वडिलांवरील पुस्तकही चांगले होते. त्यांच्या वडिलांचं झालेलं सटल एक्स्प्लॉयटेशन वेदना त्यांनी फार संवेदनशीलतेने एरवी ची शैली टाळुन केलेलं होत, ते ही आवडल्याच स्मरतय. बाकी सगळा आनंदी आनंदच होता. त्या काळातला एक मराठी माणुस मुंबईने चारही बाजुने, दाबलेला, हरवलेला, लोकलमध्ये लोंबकळणारा सभोवतालाच्या दबावातुन एक " हम भी है सालो हम भी है " त्याच्या आत्म्याला बहुधा कुठेतरी सुकुन मिळत असावा त्या काळात वपुंची पुस्तके वाचुन. ते त्याला एक पर्याय देत असावेत. की असु आम्ही पैशाने कमी मात्र आमची एक उजवी बाजु आहे आमची एक टेस्ट आहे. आमची एक शैली आहे असे काहीसे कॉम्पेन्सेट होत असावे. त्यांच कथाकथनही ऐकल होत एकदा ते फारच मिळमिळीत वाटल शेवट काहीतरी जी बनियनचा वास असला तरी मिठीत येते तीच खरी बायको अस काहीतरी फारच चीप होत. माणुस इन जनरल रसिक होता मात्र रसिकतेला एनकॅश करणं शो ऑफ करणं हा एक प्रकार फार होता.
असो