रोज सकाळी उठल्यावर
आरसा बघितला की जाणवतं
जे तुझ्या डोळ्यात दिसतं ते आरशात दिसत नाही
आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस
नंतर अंघोळ करताना दिसतात
शरीरावर तुझ्या अस्तित्वाच्या खुणा
एक एक खूण म्हणजे तू लिहिलेली एक कविताच
मग पुन्हा पुन्हा कवितांची आवर्तनं
आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस
एकटा असताना तुझा गंध जाणवतो
खूप जवळ उभी आहेस वाटून जातं
पण एक जीवघेणी शांतता असते सगळीकडे
तुझा मोहक आवाज कुठेच नसतो
आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस
रात्री आकाशाकडे एकटक बघणं होतं
चंद्र रोजच्यासारखाच असतो
पण चांदण्यात तू नसतेस
तेव्हा तुझी एक एक आठवण
माझ्या डोळ्यातून ओघळत असते
आणि मग जाणवतं कि फक्त तू नाही आहेस
फक्त तू नाही आहेस..........................................
प्रतिक्रिया
11 Jun 2015 - 11:39 pm | सतिश गावडे
छान आहे कविता. मात्र "फक्त तू नाही आहेस" हे खटकलं. ते "सिर्फ तुम नही हो" चं भाषांतर वाटतं. "फक्त तू नाहीस" हे योग्य वाटतं.
12 Jun 2015 - 11:54 am | पैसा
+१. चांगलं लिहिताय. फक्त या सूचनेचा विचार करा.
12 Jun 2015 - 12:23 pm | वपाडाव
अगदी. अगदी.
हिन्दी किण्वा उर्दु गझल (अनुवादित) छापल्यासारखे वाटून गेले...
आशय छान...
11 Jun 2015 - 11:48 pm | लालगरूड
आवडली
12 Jun 2015 - 12:21 am | एक एकटा एकटाच
चांगली आहे.
12 Jun 2015 - 8:44 pm | सस्नेह
भा पो
12 Jun 2015 - 8:44 pm | सस्नेह
भा पो