सफर तामिळनाडुची! - भाग १

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in भटकंती
20 May 2015 - 4:16 pm

माझं न नवर्‍याचं एक तत्व आहे.. समजा पैसे असतीलच.. तर माणसानी दुनिया पहावी.. बावळट सारखं घराला डेकोरेटच करणं, इंटीरियरच करणं ह्या सारख्या क्षुद्र गोष्टींवर पैसे घालवु नयेत.. आता ह्या वाक्यातली मुदलातली "समजा पैसे असतीलच तर.." हीच अट पुर्ण होत नसल्याने आम्ही पुढच्या भागाकडे कधी वळलोच नाही..! पण तरी वर्षातुन एकदा "कुठे तरी जायला हवं राव" नावाचा किडा वळवळतो..आणि मग लोक कसं ऋण काढुन सण साजरा करतात.. तसं आम्ही ऋण काढुन भटकायला जातो..! तसंही पैसा नाही म्हणुन कुरकुरायचय.. असंही कुरकुरायचय.. मग किमान दुनिया भटकुन मग घरी येऊन कुरकुरू..!

सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी (२०१४) नोव्हेंबरात "कुठे तरी जायला हवं राव" डोकं वर काढु लागले.. त्यातच दिर कोइंबतुरला असल्याने "जाऊन तर पाहु" असा सुर लागु लागला.. बॅकग्राऊंड म्युझिक म्हणुन "खड्ड्यात गेली शिंची नोकरी.. चला आता कुठेतरी" चा भुंगा गुणगुणत होताच.. आणि सरते शेवटी आजपासुन बरोब्बर १५ दिवसांनी आठवड्याभरासाठी तामिळनाडुत जाऊ असा ठराव पास करण्यात आला. (अर्थातच तत्काळ तिकिट काढायला लागणार असल्याने, "बॅगा तर भरुन ठेवु, मिळालं तिकिट तर जाउ, नाही मिळालं तर बसु घरीच" असा उपठरावही पास केला गेला!)

मला हातातली कामं धामं सोडुन ट्रिप प्लान करायची कित्ती कित्ती आवड आहे हे इकडच्या स्वारींना माहित असल्याने स्वारी माझ्यावर सर्व सोपवुन, तिकडेच तोंड करुन निघुन गेली.. तिजोरीतला खडखडाट पहाता "बजेट टुर" फक्त मीच प्लान करु शकते (जन्मतःच देणगी म्हणुन मिळालेल्या कंजुसी वॄत्तीमुळे!!) हा स्वारींचा विश्वास मी लवकरच सार्थ ठरवला..! केवळ एक सप्ताहात ९ दिवसांची, ५ माणसांची सहल केवळ अर्ध लक्ष रुपयांमध्ये बसवुन दाखवली..!

ह्या एका सप्ताहात मी झोपेत सुद्धा ट्रिप अ‍ॅडव्हायझर वर माहिती काढत होते, तामिळनाडुत फोन करुन "अय्यो राम पाप्पं.." च्या टोन मध्ये बोलत होते..हापिसातल्या तमिळ लोकांकडुन बेसिक संभाषण शिकत होते.. तामिळनाडु आणि कर्नाटकाच्या स्टेट ट्रन्सपोर्टच्या कस्टमर केअरला शुद्ध मराठीत प्रश्न विचारुन छळत होते..

जन्मोजन्म आपण तामिळनाडुतच राहिलो आहोत इतक्या आत्मविश्वासाने मी लोकांना पुढचा प्लास दिला..

पुणे - रामेश्वरम / धनुषकोडी- मदुराई - कोइंबतोर - कुन्नुर - बंदिपुर - म्हैसुर - पुणे (व्हाया बंगलोर)

Route

आता हा रुट असाच का? हेच सर्वात जास्त सोयीच की अजुन काही? मग कोडाई करावं की उटी? की कुन्न्नुरलाच २-४ दिवस मुक्काम टाकावा? असे अनंत प्रश्न तुम्हाला पडु शकतात. ह्या सर्वांचे उत्तर "मला माहिती नाही" हे आहे..

त्याचं असं होतं की सोबत अबीर आणि साबु-साबा, दिर कोइंबतोरला असल्याने तिकडे प्रेक्षणीय काही नसले तरी जायचे हे निश्चित (.. आणि तिकडे अप्रतिम कांचीपुरम साड्या मिळतात हा एक बारिकसा मुद्दा... ज्याने आमचं बजेट कोलमडवलं!).. आमचे साबु साबा हे निसर्गरम्य ठिकाणी.. निवांत दिवसभर आराम करत पडुन रहायचे कॅटेगरीत येत नसल्याने त्यांना बोअर होणार नाही ना? हा धाक, आम्हाला निसर्ग प्रिय तर त्यांना धार्मिक स्थळं..
ह्या इतक्या अटींच्या कचकचाटातुन आलेला प्लान आहे हा. हेक्टीक होताच.. पण आम्ही एन्जॉय केला.. त्यामुळे आता वरचा प्लान असा वाचा...

पुणे - रामेश्वरम (धार्मिक स्थळ) / धनुषकोडी (सुर्योदय!!) - मदुराई (मंदिर) - कोइंबतोर (दिर + खरेदी) - कुन्नुर (टॉय ट्रेन + थंड हवेच ठिकाण) - बंदिपुर (वाघ!!!) - म्हैसुर (कुठुन तरी ट्रेन पकडायची तर परत खाली का जा? म्हणून बंगलोरला जाताना वाटेतले बघणेबल शहर) - पुणे (व्हाया बंगलोर)

आम्ही रोज एका नव्या जागी गेलो.. पण पुन्हा पुन्हा असं येणं होत नाही म्हणुन हावरटसारखं शक्य तितकं बघायचं होतं.. थोडक्यात २ ट्रिप आम्ही एकीत कोंबल्या.. पण मंडळींचा उत्साह इतका दांडगा की रोज टणाटण उड्या मारत फिरले..!

मंडळी कामाला लागली.. सोबत आबालवृद्ध (मारणार सासुबाई!) लोक असल्याने खायला प्यायला जंगी नेणार होतो सोबत.. सुई-दोर्‍या पासुन सर्वकाही घेतलं होतं.. शुक्रवारच्या ४ वाजताच्या नागरकोलने आधी मदुराईला जायचा प्लान होता. तिथे मुक्काम ठोकुन रामेश्वरमला जाऊन यायचं होतं. तत्काळमध्ये तिकिटं मिळाली होती..! आम्ही नक्की जात होतो!!

शुक्रवारी घरातुन मोजक्या ८ बॅगा घेऊन निघालो.. रुटीन प्रमाणे सतत "काहीतरी राहिलय" असं वाटत होतंच.. गाडी आली.. बहीणाबाई आणि मांसाहेबांनी जातीने उपस्थिती लावुन खाण्या पिण्याच्या अजुन २ बॅगांची भर घातली!!

वातावरण अत्यंत उत्साही... गाडी निघाली.. मंडळींच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडुन वहात होता!!... रात्र झाली.. खाणे पिणे आटपुन मंडळी आता ताणुन देणार.. की बाजुच्या सहप्रवाशांकडुन बातमी आली... "तामिळनाडुत धुवांधार पाऊस सुरु आहे.. समुद्र किनार्‍यावर वादळाचा अ‍ॅलर्ट आहे..!!"

ही सुवार्ता कानी पडते न पडते तोच... अबीरने "मला घरी जायचय.. आत्ताच्या आत्ता खाली उतरा..." असा टाहो फोडला..

........

त्यारात्री ३ वाजता... नुकत्याच रडुन रडुन झोपलेल्या पोराला मांडीवर जोजवत एक व्यक्ती धनुषकोडीच्या सुर्योदयाचं गणित आता कसं बसवावं ह्याचा विचार करत होती..

.... आणि उत्तर म्हणुन काचेवरुन पावसाचे थेंब ओघळत होते...

क्रमशः

प्रतिक्रिया

वा काय सुरुवात आहे. प्रत्यक्ष ट्रिपपेक्षाही तयारीसुद्धा मजेदार असते.आमचेही नाव आम्ही खरे करून दाखवत असतो.नंतर अमुक ठिकाणी तमुक केल्याने कसे पैसे वाचले हे आठवून किती गुदगुल्या होत असतात.बाकी नकाशावरची रूट रेघ आणि ठिकाणे मॅच होत नाहीत.कन्याकुमारी एक्सप्रेसने मदुराईला जाणे सोशिकताची कसोटी लागते.वाचनीय आहे ,लवकर लिहा.रजनिकांतचे किस्सेही टाका.

गणेशा's picture

20 May 2015 - 4:36 pm | गणेशा

सुरुवात खुशखुशीत.. साबु - साबा पहिल्यांदाच वाचल्याने या शब्दांची मजा आली... प्लॅन पुन्हा वाचताना ही मजा आली..

आता पुढची निसर्गस्थळे आणि मंदिरे यांचे फोटो आणि वृत्तांत यांची वाट पहात आहे...

नंदन's picture

20 May 2015 - 4:38 pm | नंदन

छान झालीय, काळ-काम-माणसे-पैशाचे हे समीकरण सांभाळणे सोपे काम नोहे. ट्रिपबद्दल - विशेषतः धनुषकोडी, बंदीपुरबद्दल - वाचायची उत्सुकता आहे. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

त्यारात्री ३ वाजता... नुकत्याच रडुन रडुन झोपलेल्या पोराला मांडीवर जोजवत एक व्यक्ती धनुषकोडीच्या सुर्योदयाचं गणित आता कसं बसवावं ह्याचा विचार करत होती..
.... आणि उत्तर म्हणुन काचेवरुन पावसाचे थेंब ओघळत होते...

अगदी चित्रदर्शी!

तुषार काळभोर's picture

20 May 2015 - 5:13 pm | तुषार काळभोर

लईच्च भारी वाक्ये आहेत!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2015 - 5:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुपच सुरेख....!

-दिलीप बिरुटे

राही's picture

21 May 2015 - 12:14 am | राही

नेमकं. त्यामुळे शेवट सुंदर झालाय. पूर्ण लेखच आवडला हेवेसांनल.

स्पा's picture

20 May 2015 - 4:43 pm | स्पा

अरे वा
अजून एक प्रवास वर्णन

वाचतोय
झकास सुरवात

टवाळ कार्टा's picture

20 May 2015 - 4:59 pm | टवाळ कार्टा

भारी :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2015 - 5:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुसखुशीत सुरुवात. सुरुवातीचा उता-याने पकड़ घेतली ते थेट एंडिंगलाच आलो. एकदम मस्त.

अवांतर : दुर्मिळ दिसतं तुमच्या लेखनात असा खुसखुशीतपणा (पळा आता) :)

-दिलीप बिरुटे

  • मधुरा देशपांडे's picture

    20 May 2015 - 5:18 pm | मधुरा देशपांडे

    खुसखुशीत सुरुवात. पुभाप्र.

    मस्त लिहिते आहेस.पुभाप्र.

    कपिलमुनी's picture

    20 May 2015 - 5:46 pm | कपिलमुनी

    रुंबा स्टार्ट !

    दणदणीत सुरुवात ! एकदम पिरा स्टाईल. एकदाची तुला बुद्धी सुचली हे प्रव लिहायाची म्हणुन तुझं अभिनंदन आणि अबीर ने तेवढा वेळ दिला म्हणून लेकराचं कौतुक ;)

    वा वा वा... मस्त लिहलयस पिरा... पुभाप्र

    मोदक's picture

    20 May 2015 - 6:58 pm | मोदक

    भारी सुरूवात.. पुढील भागांच्या प्रतिक्षेत!!

    सिरुसेरि's picture

    20 May 2015 - 7:14 pm | सिरुसेरि

    तुमच्या इटिनरिमध्ये तंजावुर नाही ? इल्ले ? तुमच्या चेन्नई एक्स्प्रेसला शुभेच्छा . रुम्ब नल्ल पेसरा . बाकी चेन्नईत टी नगरला व तामिळनाडुतही अनेक ठिकाणी 'सर्वाना स्टोअर' व 'को-ओप्टेक्स' च्या शो रूमस आहेत .जिथे योग्य किमतींना कपडे मिळतात ( कांचीपुरम साड्या , पांढरे व्हाइट शर्ट व धोती ) . त्या तुलनेत 'नल्ली' ,'पोथी' या शो रूमस नुस्त्याच भपकेबाज व दिखाउ वाटतात .

    बॅटमॅन's picture

    21 May 2015 - 12:49 pm | बॅटमॅन

    असेच म्हणतो. तंजावर नै पाह्यलं तं काय पाह्यलं? पण बाकी ट्रिपचा आराखडा मस्त आहे, बघू काय काय वाचायला मिळते.

    कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

    20 May 2015 - 7:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

    मस्तं लिहिलयं. :)

    प्रीत-मोहर's picture

    20 May 2015 - 8:03 pm | प्रीत-मोहर

    वाह . इसको बोल्ते प्रवास वर्णन!!!
    पुभाप्र. किती मस्त लिहितेस ग तु

    आदूबाळ's picture

    20 May 2015 - 8:41 pm | आदूबाळ

    कं सुर्वात कं सुर्वात!

    (.. आणि तिकडे अप्रतिम कांचीपुरम साड्या मिळतात हा एक बारिकसा मुद्दा

    येस्स. आणि सहासहा मजली टोलेजंग शोरुमापण आहेत. "पोथीस्" की अशाच काहीतरी नावाच्या शोरूममध्ये फिरून वाट लागली माझी (आणि अर्थात खिशाची).

    सानिकास्वप्निल's picture

    21 May 2015 - 12:15 am | सानिकास्वप्निल

    मस्तं सुरुवात
    पुभाप्र

    डॉ सुहास म्हात्रे's picture

    21 May 2015 - 12:57 am | डॉ सुहास म्हात्रे

    सुंदर खुसखुशीत सुरुवात !

    पुढच्या सचित्र प्रवासवर्णाच्या प्रतिक्षेत !

    रुपी's picture

    21 May 2015 - 1:31 am | रुपी

    आमचे आईबाबाही यदाकदाचित ट्रीपला गेलेच तर असेच हावरटासारखे बघून घेण्याच्या मताचे आहेत. त्यामुळे प्रत्येक ट्रीप पळापळीची होते ;)
    पण पुन्हा पुन्हा जाणं होत नाही हेही खरंच.

    अवांतरः लोकांचे नातेवाईक असे कोईंबतूर सारख्या लांबच्या आणि भेट देण्यासारख्या ठिकाणी कसे असतात बरे? आमचे तर अमेरिकेत आलं तरी इथल्या इथे! कुणाकडे बदल म्हणून २-३ दिवस राहायला जावं असं नाही!

    अत्रुप्त आत्मा's picture

    21 May 2015 - 1:33 am | अत्रुप्त आत्मा

    सीट नं 22

    आ रक्षित!

    अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग! लैच्च मज्जा येणार हा सहलीत! वाचतीये. आता उगीच अठवडाभर लांबवू नका, पटापटा लिहा.

    श्रीरंग_जोशी's picture

    21 May 2015 - 8:36 am | श्रीरंग_जोशी

    क लिवलय, क लिवलय.

    तुमच्या पतीदेवांचे जीवनविषयक तत्वज्ञान अनुकरणीय आहे. लेखनशैली खूपच छान. पुभाप्र.

    पेट थेरपी's picture

    21 May 2015 - 9:55 am | पेट थेरपी

    छान लिहिलय. साबा साबु माबोवरचं ना? तामिळनाडू माझी कर्मभूमी राहिली आहे. त्यामुळे पुनःप्रत्ययाचा आनंद घेणार. यू गेट वर्ल्ड बेस्ट इडलीज इन मदुरै. तश्याच सेम्म माटुंग्याला थंबीज मध्ये मिळतात. लुसलुशीत वर चटणी आणि तूप. यम्मी. बाळ का रडायला लागल? पाप्प.

    पिलीयन रायडर's picture

    21 May 2015 - 11:02 am | पिलीयन रायडर

    अरे वा!! इतके छान प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!!!

    साबु - साबा म्हणजे सासरेबुवा-सासुबाई!!!

    @सिरुसेरी
    नाही हो, तंजावर कुठे घुसवायचं ह्यात!! त्याला परत एकदा चक्कर टाकावीच लागणारे तामिळनाडु मध्ये!! तेव्हासाठी तुम्ही दिलेली दुकानांची नावं नोट करुन ठेवली आहेत!

    @पेट थेरेपी
    त्याला ट्रेन अजिबात आवडली नाही म्हणुन!!

    स्नेहल महेश's picture

    21 May 2015 - 11:06 am | स्नेहल महेश

    वाह......काय सुरुवात आहे मस्तच एकदम पिरा स्टाईल
    पुढच्या प्रवासवर्णाच्या प्रतिक्षेत !

    पगला गजोधर's picture

    21 May 2015 - 11:50 am | पगला गजोधर

    चला आता डिटेलवार माहिती आली पाहिजे… वाचून आम्हालापण जमलं पाहिजे

    सुप्रिया's picture

    21 May 2015 - 12:07 pm | सुप्रिया

    खुसखुशित प्रवासवर्णन. पुढील भाग येउ दे पटापट.

    जगप्रवासी's picture

    21 May 2015 - 1:20 pm | जगप्रवासी

    छान खुसखुशीत लेख. बसमधली जागा अडवून ठेवली आहे, चला तामिळनाडूच्या सफरीवर

    प्रवास नियोजन आणि तयारीचं वर्णन अगदी हटके!! आवडलं. पुढील प्रवासवर्णनाच्या प्रतिक्षेत. :)
    रामेश्वरहून धनुष्कोडीला जाताना टायरला वल्ह्यासारखं काहीतरी बांधलेल्या, वाळू कापत जाणार्‍या वाहनाचा वेगळाच प्रवास आज ७ वर्षांनंतरही आठवतो आहे. आजही तसंच वाहन आहे की काही बदलले आहे याविषयी वाचायला आवडेल.
    हा प्रवास केल्यानंतर पाहिलेला धनुष्कोडीचा समुद्र केवळ अविस्मरणीय!!

    दिपक.कुवेत's picture

    21 May 2015 - 2:06 pm | दिपक.कुवेत

    पुढिल भाग पटापट टाक....पूढे काय आणि कसं घडत गेलं हे वाचायची उत्सुकता लागली आहे.

    प्रचेतस's picture

    21 May 2015 - 2:15 pm | प्रचेतस

    महाबलीपुरम प्लान मधे दिसले नाही.

    आकाश खोत's picture

    21 May 2015 - 3:27 pm | आकाश खोत

    पुभाप्र

    अनन्न्या's picture

    21 May 2015 - 4:14 pm | अनन्न्या

    वाट बघून थकलो प्रवास वर्णनाची.

    मॅक's picture

    21 May 2015 - 8:33 pm | मॅक

    खुपच मस्त...... next.......

    जुइ's picture

    21 May 2015 - 10:13 pm | जुइ

    भरपूर फटू टाक!

    पिरा, अजया लिहा की गं पटापटा.

    इशा१२३'s picture

    21 May 2015 - 11:12 pm | इशा१२३

    मस्त वर्णन पिरा.पुभाप्र.

    पॉइंट ब्लँक's picture

    22 May 2015 - 7:22 am | पॉइंट ब्लँक

    झक्कास सुरुवात :)

    उमा @ मिपा's picture

    22 May 2015 - 4:16 pm | उमा @ मिपा

    पिराstyle सहीच, मज्जा आली वाचताना!
    पुभाप्र.

    पैसा's picture

    22 May 2015 - 4:28 pm | पैसा

    एकदम मस्त सुरुवात! लिहा पटापट!

    खंडेराव's picture

    22 May 2015 - 5:32 pm | खंडेराव

    वाचत आहे!

    पाटीलबाबा's picture

    23 May 2015 - 6:53 pm | पाटीलबाबा

    छान सुरुवात

    स्पंदना's picture

    24 May 2015 - 12:07 pm | स्पंदना

    हैश्या !!
    आले बाबा एकदअची ट्रीपमध्ये. मस्त वर्णन पिरा.