रातीत लाज ओली
शेजेवरी पहुडली
गंधीत मोगऱ्याच्या
चंद्रसवे नहाली.
पावली पैंजणाचा
वैरी भार होता
निजल्या स्वप्न पंखी
दुबळा आधार होता
घरट्यातले दु:ख ते
माझे मलाच माहीत
भळभळत्या जखमाच नुसत्या
घाव कुठेच नाहीत.
माथ्यावरी विस्कटल्या
रेखा संचिताच्या
माझे मला कोंडले मी
चंद्रात कुंकवाच्या...
कवी : अर्व (निशांत तेंडोलकर)
प्रतिक्रिया
18 May 2015 - 1:08 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सुंदर!!
मिपावर स्वागत!
18 May 2015 - 5:25 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११
18 May 2015 - 1:24 pm | एस
यातली नेमकी भावना मला कळाली नाही, पण बहुधा विवाहांतर्गत बलात्काराबद्दल असावे. एखाद्या स्त्रीसाठी अनिच्छेने कुणा पुरुषाशी संबंध ठेवावे लागणे, मग भलेही तो तिचा नवरा का असेना ही गोष्ट किती वेदनादायी आणि अपमानास्पद असू शकते ह्याची कल्पना कदाचित एक पुरुष म्हणून मला नीटपणे समजू शकणार नाही. त्यासाठी स्त्रीचाच जन्म हवा. या दृष्टीने पाहू गेल्यास ही कविता फार आर्त आणि दु:खद वाटली. अतिशय नेमकी आणि शेवट तर फारच बोलका! (की अबोल?)...
18 May 2015 - 1:32 pm | अजया
सुरेख कविता.मिपावर स्वागत.त्यातल्या गर्भित अर्थाने मात्र नुकतेच अनाहितात झालेले एक विचारमंथन, त्यातले अनुभव आठवुनदेखील शहारा आला.सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी स्थिती त्या स्त्रीयांची :(
18 May 2015 - 1:46 pm | चिनार
सुन्न करणारी कविता !
18 May 2015 - 2:07 pm | गणेशा
कविता सुंदर आणि खोल
अप्रतिम कडवे आहे हे
19 May 2015 - 12:20 pm | कहर
नेमक्या याच कडव्याचा अर्थ नाही समजला… संदर्भासहित स्पष्टीकरण मिळेल का ?
19 May 2015 - 12:37 pm | गणेशा
ही कविता खुप सुंदर आहे, त्यामुळे खुद्द कवीच अर्थ सांगेल छान असे वाटते, तरी एक वाचक म्हणुन मी माझे मत सांगतो .. या कडव्याबद्दल ( आज काल लिहिण्या पेक्षा.. वाचनच छान वाटत आहे, खुप छान कविता..लेख..भटकंती येत आहेत)
अर्थ
सुंदर अश्या पैंजणांचा ही पावलांना जणु नकोसा असा भार होता,
जसे की नवरा..संसार बाहेरुन सर्व खुप खुषाल दिसत होते,
तरी जीवाला त्याचाच सोस होता.
स्वताच्या अपुर्ण (निजल्या) स्वप्नांना काय माहीत याचाच आधार होता
नवरा हा एकमेव आधार.. माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठीचा, पण तो त्याच्याच मनमानीने सर्व काही करतो..
मी सर्वस्व दिल्याने कदाचीत.. त्यामुळे तरी, माझी स्वप्ने पुर्ण होण्याची पुसटशी आशा होती... असे कवितेतील नायिकेला म्हणायचे आहे.
पुढे जावुन.. ही स्वप्ने निजलेलीच राहिली असा मी अर्थ घेतला आहे, कारण हे एकच कडवे भुतकाळाबद्दल बोलत आहे..
वर्तमानात नायिकेने स्वताला .. स्वताच्या आकांक्षांना तिच्या कुंकवाच्या परिघात कोंडुन घेतलेले आहे.. तेच तिचे आयुष्य आनि तो परिघच तीची सिमा
रातीत लाज ओली
शेजेवरी पहुडली
गंधीत मोगऱ्याच्या
चंद्रसवे नहाली.
पावली पैंजणाचा
वैरी भार होता
निजल्या स्वप्न पंखी
दुबळा आधार होता
घरट्यातले दु:ख ते
माझे मलाच माहीत
भळभळत्या जखमाच नुसत्या
घाव कुठेच नाहीत.
माथ्यावरी विस्कटल्या
रेखा संचिताच्या
माझे मला कोंडले मी
चंद्रात कुंकवाच्या...
18 May 2015 - 2:42 pm | शैलेन्द्र
अगदी सुन्दर कविता.. वेदनेचा ठस्ठशित उद्गार
18 May 2015 - 2:59 pm | झंम्प्या
फारच छान गुम्फलिय कविता. पण नेमका काय अर्थ इथे काढायचा कळ्त नाहीये. पण का कोणास ठाउक असाही विचार आला की, ही एका प्रेमभग होउन दुसर्याशिच लग्न झालेल्या स्त्री ची तर मनातील यातना नाही ? किशोर कदमान्ची कविता आठ्वली. बघ माझी आठ्वण येते का ?
18 May 2015 - 4:16 pm | चित्रगुप्त
नेमके झाले काय, हे उमगले नाही बुवा.
असो. दुर्बोधता हे नवकवितेचे व्यवच्छेदक लक्षण होय, असे खुद्द गंगाधर गाडगीळ सांगून गेलेत, म्हटल्यावर प्रश्नच मिटला.
तरिही मजसारख्या सर्वसामान्य वाचकांना खुद्द कवीने या कवितेचा अर्थ समजवून द्यावा, अशी अत्यंत गद्य विनंती करतो.
18 May 2015 - 5:35 pm | नाखु
मिका चांगली म्हणतोय म्हणजे कवीता १ लंबर असणार है, तेव्हा रसग्रहणाचं मनावर घ्या मिका म्हणजे चित्रगुप्तांबरूबर आम्हाला पण या कवीतेमधले गुप्त चित्र जरा स्पष्ट दिसेल.
बाळबोध नाखु.
18 May 2015 - 6:42 pm | अर्व
धन्यवाद सर्वांचे...
लग्नानंतर स्त्री चे अस्तित्व हे केवळ उपभोग्य वस्तु होऊन राहीलेल्या
स्त्रीची ही व्यथा... जिंथे मन मरते तिथे या श्रृंगार ही बलात्कार वाटू लागतो
एक वेगळी व्यथा...वेदना मांडण्याचा प्रयत्न..
18 May 2015 - 6:43 pm | अर्व
धन्यवाद सर्वांचे...
लग्नानंतर स्त्री चे अस्तित्व हे केवळ उपभोग्य वस्तु होऊन राहीलेल्या
स्त्रीची ही व्यथा... जिंथे मन मरते तिथे या श्रृंगार ही बलात्कार वाटू लागतो
एक वेगळी व्यथा...वेदना मांडण्याचा प्रयत्न..
18 May 2015 - 7:11 pm | चाणक्य
रचना. कासावीस करून गेलीच. तिस-या कडव्यात जरा मीटर नीट करता येईल काय?
18 May 2015 - 8:24 pm | विवेकपटाईत
कविता आवडली. सत्य परिस्थिती.
18 May 2015 - 8:43 pm | पैसा
खूप काही सांगितलेलं..
18 May 2015 - 8:53 pm | अर्व
@चाणक्य हो मी तसा प्रयत्न केला
भळभळत्या... या ओळीत काठछाट केली असती
तर ती सल पोहचली नसती असे मला वाटते
18 May 2015 - 11:29 pm | मित्रहो
आवडली
अर्थ सांगितल्यावर कविता अधिक आवडली
सुरवातीला मला वेश्या किंवा नाचनारीचे दुख वाटले ते पैंजण श्रृंगाराचे प्रतीक होते
18 May 2015 - 11:29 pm | मित्रहो
आवडली
अर्थ सांगितल्यावर कविता अधिक आवडली
सुरवातीला मला वेश्या किंवा नाचनारीचे दुख वाटले ते पैंजण श्रृंगाराचे प्रतीक होते
18 May 2015 - 11:34 pm | मित्रहो
आवडली
अर्थ सांगितल्यावर कविता अधिक आवडली
सुरवातीला मला वेश्या किंवा नाचनारीचे दुख वाटले ते पैंजण श्रृंगाराचे प्रतीक होते
18 May 2015 - 11:34 pm | मित्रहो
आवडली
अर्थ सांगितल्यावर कविता अधिक आवडली
सुरवातीला मला वेश्या किंवा नाचनारीचे दुख वाटले ते पैंजण श्रृंगाराचे प्रतीक होते
18 May 2015 - 11:35 pm | मित्रहो
आवडली
अर्थ सांगितल्यावर कविता अधिक आवडली
सुरवातीला मला वेश्या किंवा नाचनारीचे दुख वाटले ते पैंजण श्रृंगाराचे प्रतीक होते
19 May 2015 - 12:36 am | मृत्युन्जय
अफाट कविता आहे. सलाम स्वीकारावा.
19 May 2015 - 7:55 am | चुकलामाकला
अतिशय सुन्दर!
19 May 2015 - 2:28 pm | किसन शिंदे
आशयपूर्ण कविता, शब्द वेचून वेचून लिहीलेयत. शेवटचे कडवे आणि डागाळलेल्या चंद्राला दिलेली कुंकवाची उपमा वाचून तुम्ही अतिशय ताकदीचे लेखन करू शकता असे वाटले.
19 May 2015 - 7:31 pm | अर्व
@किसन
माझा शब्द हलका
त्यास भार नी पेलतो
फक्त आसवे आणि हसू
अगदी अलगद झेलतो...
विनम्रतेने सर्व प्रतिभावंताना नमस्कार