फिटनेस माउंटन अँड युअर एसयुव्ही

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
12 May 2015 - 10:50 am

एक सहज सुचलेली/केलेली तुलना.
FM

फिट व्हायचंय, व्यायाम करायचाय... असं म्हणताना/ऐकताना लोकांच्या चेह-यावर एखादं मोठं संकट पुढे उभं राहिल्यासारखे भाव असतात.
समजा, की हे संकट आहे. प्रचंड मोठा डोंगर आहे. तुमचं उद्दिष्ट त्याच्या शिखरावर पोहोचणं हे आहे. तुम्ही म्हणजे एक फोर व्हील ड्राइव्ह एसयुव्ही आहात. तर;
तुमच्या मागील चाकांना मिळणारी ताकद म्हणजे व्यायाम. सर्वात महत्वाचा. ख-या अर्थाने तुम्हाला प्रॉपेल करतो तो व्यायाम.
पुढच्या चाकांना मिळणारी ताकद म्हणजे डायट. रेअर व्हील ड्राइव्ह इज नॉट इनफ. डाएट्ची म्हणजेच सकस आहाराची, पोषणाची जोड नसेल तर तुम्ही हा डोंगर चढू शकणार नाही. व्हायसे व्हर्सा. आहार, व्यायाम दोनही गरजेचं.
इंजिन म्हणजे तुमचं मन. Its your mind that drives your exercise. शरीराला ताकद मनातून मिळते.
बाहेरचं मोटिव्हेशन म्हणजे टोविंग व्हॅन सारखं आहे. ते तुम्हाला चालतं करू शकेल, पण अखेरपर्यंत नेऊ शकणार नाही.
ड्रायव्हर म्हणजे तुमचा मेंदू. इच्छा नसेल तर उर्मी असूनही काहीही होत नाही. सो तुमचं डोकं ठरवेल तिथे तुम्ही जाणार.
हेडलाईट्स म्हणजे ट्रेनर, मार्गदर्शक. तो नसेल तर दिशाहीन वाटचाल होते. म्हणजे चार दिवस जिम मग कुणी म्हणतं अरे डाएटने माझं कमी झालं, की डाएट, मग कुणी योगासनांची महती सांगतो, की योगा, कुणी म्हणतो फक्त चाल रे... की चालायला सुरूवात. असं होत रहातं. सो यु नीड अ गुड ट्रेनर.
चाकं म्हणजे शिस्त. ती नीट नसतील तर ग्रिप जाते.
गियर्स म्हणजे रेजिम किंवा वर्काउट शेड्युल. योग्य वेळी योग्य गियरमधे गाडी असली म्हणजे प्रोग्रेस होते.
फ्युएल अर्थातच तुमची प्रेरणा. वर म्हटल्याप्रमाणे ती बहुतांशी मनातून येते. बाकी, तुमचे आदर्श तुम्हाला प्रेरित करतच असतात.
हे सगळं साधलं की तुम्ही फिटनेसरुपी मेरूच्या शिखरावर पोहोचता.
आणि जसं एखाद्या डोंगरमाथ्यावर जाऊन वाटतं, की एवढा सगळा उपद्व्याप, एवढे कष्ट केले त्याचं चीज झालं, तसंच तुम्हाला एखाद्या अनपेक्षित क्षणी स्वतःचाच फिटनेस बघून जाणवतं, that awesome feeling of being FIT.

एक महत्वाचा नामोल्लेख: धाग्यातील चित्रात मागे दिसणारी हर्क्युलियन पोज़मधील व्यक्ती म्हणजे माझा ट्रेकस्नेही परेश
पेणकर होय

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

पैसा's picture

12 May 2015 - 11:47 am | पैसा

जरा डिट्टेल लिवा! म्हणजे कल्पना छान आहे, पण आम्ही शेवट मिपाकर. नुसतं एक चित्र दिसलं की धावले पुढच्या धाग्यावर!

वेल्लाभट's picture

12 May 2015 - 12:11 pm | वेल्लाभट

फिट व्हायचंय, व्यायाम करायचाय... असं म्हणताना/ऐकताना लोकांच्या चेह-यावर एखादं मोठं संकट पुढे उभं राहिल्यासारखे भाव असतात.
समजा, की हे संकट आहे. प्रचंड मोठा डोंगर आहे. तुमचं उद्दिष्ट त्याच्या शिखरावर पोहोचणं हे आहे. तुम्ही म्हणजे एक फोर व्हील ड्राइव्ह एसयुव्ही आहात. तर;
तुमच्या मागील चाकांना मिळणारी ताकद म्हणजे व्यायाम. सर्वात महत्वाचा. ख-या अर्थाने तुम्हाला प्रॉपेल करतो तो व्यायाम.
पुढच्या चाकांना मिळणारी ताकद म्हणजे डायट. रेअर व्हील ड्राइव्ह इज नॉट इनफ. डाएट्ची म्हणजेच सकस आहाराची, पोषणाची जोड नसेल तर तुम्ही हा डोंगर चढू शकणार नाही. व्हायसे व्हर्सा. आहार, व्यायाम दोनही गरजेचं.
इंजिन म्हणजे तुमचं मन. Its your mind that drives your exercise. शरीराला ताकद मनातून मिळते.
बाहेरचं मोटिव्हेशन म्हणजे टोविंग व्हॅन सारखं आहे. ते तुम्हाला चालतं करू शकेल, पण अखेरपर्यंत नेऊ शकणार नाही.
ड्रायव्हर म्हणजे तुमचा मेंदू. इच्छा नसेल तर उर्मी असूनही काहीही होत नाही. सो तुमचं डोकं ठरवेल तिथे तुम्ही जाणार.
हेडलाईट्स म्हणजे ट्रेनर, मार्गदर्शक. तो नसेल तर दिशाहीन वाटचाल होते. म्हणजे चार दिवस जिम मग कुणी म्हणतं अरे डाएटने माझं कमी झालं, की डाएट, मग कुणी योगासनांची महती सांगतो, की योगा, कुणी म्हणतो फक्त चाल रे... की चालायला सुरूवात. असं होत रहातं. सो यु नीड अ गुड ट्रेनर.
चाकं म्हणजे शिस्त. ती नीट नसतील तर ग्रिप जाते.
गियर्स म्हणजे रेजिम किंवा वर्काउट शेड्युल. योग्य वेळी योग्य गियरमधे गाडी असली म्हणजे प्रोग्रेस होते.
फ्युएल अर्थातच तुमची प्रेरणा. वर म्हटल्याप्रमाणे ती बहुतांशी मनातून येते. बाकी, तुमचे आदर्श तुम्हाला प्रेरित करतच असतात.
हे सगळं साधलं की तुम्ही फिटनेसरुपी मेरूच्या शिखरावर पोहोचता.
आणि जसं एखाद्या डोंगरमाथ्यावर जाऊन वाटतं, की एवढा सगळा उपद्व्याप, एवढे कष्ट केले त्याचं चीज झालं, तसंच तुम्हाला एखाद्या अनपेक्षित क्षणी स्वतःचाच फिटनेस बघून जाणवतं, that awesome feeling of being FIT.
]

पैसा's picture

12 May 2015 - 12:24 pm | पैसा

आता मस्त! हे लेखात अ‍ॅड करू का?

वेल्लाभट's picture

12 May 2015 - 12:28 pm | वेल्लाभट

प्लीज. :)

चित्रगुप्त's picture

12 May 2015 - 12:22 pm | चित्रगुप्त

छान. व्यायामाचा नेमका परिणाम कसा आणि काय होत असतो ? आपल्यासाठी योग्य व्यायाम प्रकार कसा निवडावा ?
तसेच वेगवेगळ्या वयाच्या, वजनाच्या, जीवनशैलीच्या लोकांसाठी उचित असलेला व्यायाम आणी आहार याविषयी विस्तृतपणे लिहावे, असे सुचवतो.
.

.

प्रसाद गोडबोले's picture

12 May 2015 - 9:38 pm | प्रसाद गोडबोले

अवांतर : चित्रगुप्त काका , तुमचा 'काळसर्प'प्रयोग भलताच प्रसिध्द झालाय बरं का !!

चित्रगुप्त's picture

12 May 2015 - 9:42 pm | चित्रगुप्त

'काळसर्प'प्रयोग भलताच प्रसिध्द झालाय

कुठे झालाय म्हणे प्रसिद्ध ? आणि कसाकाय ?

प्रसाद गोडबोले's picture

13 May 2015 - 8:15 pm | प्रसाद गोडबोले

इथे पुण्यात !

लोकं डायटचे फार मनावर घ्यायला लागलेत

स्वधर्म's picture

12 May 2015 - 1:18 pm | स्वधर्म

अाजकाल सर्वजण व्यायाम, अाहार या बाबतीत जागरूक झाले अाहेत. खरंतर तुंम्ही अाम्ही व्यायाम करावा, असे अनेकांना मनापासून वाटते. पण त्याचे एक महत्वाचे कारण असे की त्या लोकांचा व्यवसाय तुंम्ही व्यायाम केला तर चालणार असतो. मी धागाकर्त्याबद्दल वा इथल्या कुणाबद्दल बोलत नाही, याची नोंद घेणे. खासकरून जीमवाले, रेडीओवर प्रायोजित कार्यक्रम करणारे असे काही बोलतात, की अापण जर व्यायाम केला नाही, तर जणू फार म्हणजे फारच मोठा धोका पत्करत अाहोत. पण याकडे जरा वेगळ्या दृष्टीकोनातूनही पाहता येइल.

जर घरातली कामे स्वत: केली, बारीक सारीक कामासाठी वाहन नाही वापरले, छोट्या मोठ्या चढ-उतरणीसाठी लिप्टचा मोह टाळला, तर खरंच अापल्याला व्यायामाची गरज अाहे का? लोक जेंव्हा अापली भली मोठी कार घेऊन ‘जीम’ला जातात, अाणि अात जाऊन ट्रेडमीलवर पळत राहतात, तेंव्हा अाश्चर्य वाटते. एका मित्राने अतिशय उत्साहाने ट्रेडमील घेतली व महिन्याभराने त्याला गुढग्याचा त्रास सुरू झाल्याचा अनुभव अाहे. नंतर कळले की ट्रेडमीलवर चालणे नैसर्गिक नाही अन त्यामुळे गुढग्यांना हिसके बसत होते. तसेच काही घरात स्वयंपाक, धुणे (मशिनमध्ये हं), साधे घर झाडायलाही बाई लावतात, तेंव्हाही असेच अाश्चर्य वाटते. अापण घर झाडायला कमरेत वाकायचे नाही, पण योगा क्लास मात्र चुकवायचा नाही, हे काय अाहे?

वेल्लाभट's picture

12 May 2015 - 2:07 pm | वेल्लाभट

व्यायाम फॅड झालाय, जिम्स स्टेटस सिंबॉल झाली आहेत, जिमवाल्यांचे धंदे चालावेत म्हणून खुळं काढली जातात इथपर्यंत ठीक आहे. मान्य.

पण व्यायाम या संकल्पनेला पूर्वापार मानलं गेलेलं आहे आणि त्याचं महत्व खूप आहे. जर अमूक अमूक गोष्टी करताना जो होतो तोच व्यायाम असता तर या संकल्पनेचा कुठलाही इतिहास किंवा वैज्ञानिक पुरावे आपल्याला आढळले नसते. काही करता करता होतो तो व्यायाम नसून जो स्वतंत्रपणे विशिष्ट प्रकारे केला जातो तो व्यायाम. परिक्षा देता देताच अभ्यास होऊ शकतो का? तसं आहे हे.

आता आधुनिक व्यायामप्रकार, जुने व्यायामप्रकार, नैसर्गिक - कृत्रिम हे वाद आमची पिढी तुमची पिढी सारखे व्यापक व न संपणारे आहेत. त्यात न पडलेलं बरं. तुम्हाला जो आवडतो तो 'व्यायाम' मात्र दिवसातला वेगळा वेळ काढून करणं ही प्रत्येकाची (मानलेली किंवा न मानलेली) गरज आहे.

ट्रेडमिल चांगलं की नाही यावर परस्परविरोधी अनेक सिद्धांत, रिसर्च वाचायला मिळतील. हार्ड सरफेस वर धावू नये असं बहुतांश तज्ञ म्हणतात. चांगल्या ट्रेडमिल ला खाली शॉक अ‍ॅब्सोर्बर असतात ज्याने आघात कमी होतो. प्रतिसादातील व्यक्तीने कुठलं ट्रेडमिल घेतलं होतं ते ठाऊक नाही. शिवाय बूटही चांगले असायला हवेत. हे दोनही असेल तर पुढे धावण्याचं तंत्र, फॉर्म, वॉर्मप इत्यादी मुद्दे आहेत. बिना वॉर्मप कुठलाही व्यायाम केला तर तो बेक्कार अंगाशी येऊ शकतो. तेंव्हा ट्रेडमिल ला दोष देणं चूक आहे.

बाकी मुद्दा राहिला सोयीस्कर वागण्याचा. घर झाडायचं नाही पण योगा क्लास मात्र नियमितपणे करायचा.... हे व्यक्तिदोष आहेत. त्याला कुठलाही व्यायाम काहीही करू शकत नाही.

स्वधर्म's picture

12 May 2015 - 2:45 pm | स्वधर्म

वाद घालणे हा उद्देशच नव्हता. केवळ वेगळा दृष्टीकोन मांडणे असा होता. मी धागाकर्त्याबद्दल वा इथल्या कुणाबद्दल बोलत नाही, याची नोंद घेणे, असेही म्हटले अाहे. असो.

अाजूबाजूला अगदी नेमस्त वागणार्या लोकांना रोग/ अारोग्याचे त्रास झाल्याचे पण त्याचवेळी काही व्यायाम न करणाराही मजेत असल्याचे दिसते, त्यामुळे व्यायाम केलाच पाहिजे, हे कधी कधी सरधोपट तत्व वाटते, इतकेच म्हणायचे अाहे.

वेल्लाभट's picture

12 May 2015 - 2:52 pm | वेल्लाभट

माझ्या अख्ख्या प्रतिसादात वाद हा शब्द एकदा आलाय फक्त. तोही वेगळ्या संदर्भात; की व्यायामप्रकार कुठला असावा इत्यादी. माझा मुळीच हेतू नाही हो वादाचा. काय तुम्ही पण !

तुमचा दृष्टीकोन तुमचा आहे; माझा मी स्पष्ट केला. बास!

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 May 2015 - 5:07 pm | अनिरुद्ध.वैद्य

व्यायाम करायला जीम लावावे लागते हे गृहीतकच चुकीचे वाटतेय. घराच्या घरी करता येणाऱ्या सुर्य नमस्कारापासून ते धावणे, सायकलिंग असे वेगवेगळे व्यायाम आहेत, ज्या साठी जीम लावावी लागत नाही.

जर घरातली कामे स्वत: केली, बारीक सारीक कामासाठी वाहन नाही वापरले, छोट्या मोठ्या चढ-उतरणीसाठी लिप्टचा मोह टाळला, तर खरंच अापल्याला व्यायामाची गरज अाहे का?

होय, आहेच. बारीक सारीक कामे (!) आणि जिने चढून उतरून कोणी फीट होईल का?

तुम्ही व्यायाम कशासाठी करता यावर हे डिपेंड करेल. कोणी जर वजन कमी करणार असेल तर त्याला चालावे अथवा पळावे लागेलच. घरातल्या घरातच सगळी कामे करणारे किती लोक फिट बघितलीय आपण? (जेनेटिकली बारीक लोक सोडा)

नंतर कळले की ट्रेडमीलवर चालणे नैसर्गिक नाही अन त्यामुळे गुढग्यांना हिसके बसत होते

ह्यासाठीच मशीन हाताळण्याची सवय नसेल तर सुरुवातीला कोणीतरी सांगणार माणूस लागत. नंतर ती आपण वापरतो. ट्रेडमिल वापरायचे काही नियम आहेत, ते नाही पाळले गेले की दुखापत होणारच. जीममध्ये ट्रेनर सांगतो व्यवस्थित कशी वापरायची.

स्पा's picture

12 May 2015 - 2:18 pm | स्पा

जे ब्बात वेल्ला काका

व्यायाम करायला एक माणुस ठेवावा म्हणतोय.

आहे का कोणाच्या माहितीत चांगला एखादा गरजू आणि मेहनती माणुस

पैजारबुवा,

चित्रगुप्त's picture

12 May 2015 - 3:46 pm | चित्रगुप्त

व्यायाम करायला एक माणुस ठेवावा म्हणतोय.

खरे आहे. पूजा-अर्चा करायला जर पैसे देऊन नेमलेला माणूस चालतो, आणि त्याचे पुण्य यजमानाला मिळते, मंदिर, चर्च इत्यादिला दिलेल्या दानातून पुण्यलाभ होतो, तर व्यायामाला काय हरकत आहे ?
कामाच्या बाबतीत बाया जास्त सिन्सियर असतात म्हणे. त्यामुळे व्यायाम करायला माणूस ठेवण्याऐवजी बाई ठेवली तर ?
यावर तज्ञांनी प्रकाश टाकावा.

स्वधर्म's picture

12 May 2015 - 3:47 pm | स्वधर्म

पण एकदा व्यायाम न करणार्या, जाग्रणं करणार्या, बिनधास्त लोकांकडे पण बघा.
कित्येक जरा काय झालं तर गळपटणारे ‘नाजूक’ पैलवान बघितलेला,
- स्वधर्म

वेल्लाभट's picture

12 May 2015 - 4:02 pm | वेल्लाभट

व्यक्ती तितक्या प्रकृती! ज्याचा त्याचा आनंद वेगळ्या गोष्टीत असतो असं म्हणू. पण तो केवळ 'आनंद' असतो त्याने भलंच होतं हे खात्रीने सांगता येईल का?

परवाची एक गोष्ट आठवली. सहसा मी कुणाला मागितल्याशिवाय व्यक्तिगत सल्ले देत नाही. परंतु परवा ऑफिसमधल्या एका चैनफुक्याला न राहवून म्हटलं (चूक केली त्याबद्दल चारदा स्वत:ला ओरडलोय नंतर) की बाबा वाट लावशील एक दिवस स्वतःची. तर म्हणे कसा, "कुछ नही होता. और मेरेको कौनसा नब्बे सौ साल जीना है. पचास तक जियूं चलेगा बट फुल मजा करनेका. इसलिये शराब, सिगरेट, एव्हरिथिंग गोज!'

दोनच शब्द उच्चारले मी त्यापुढे.

ज्याचा त्याचा निर्णय.

स्वधर्मभाऊ/तै/काका/काकू....वर्कआऊटच्या/ फिटनेसच्या बाबतीत आतापर्यंतचं निरीक्षण सांगतो. यागोष्टीची ओढ, खुमखुमी...आताच्या भाषेत सांगायचं तर किडा असावा लागतो. सगळ्यांचंच काम नव्हे हे.

वेल्लाभट's picture

12 May 2015 - 4:13 pm | वेल्लाभट

More so; the 'purpose' of exercise or fitness is largely misunderstood and misinterpreted in our society I believe. I can't comment on people abroad since I do not know much about.

उदा:
व्यायाम? मला कुठे बॉडीबिल्डिंग करायचंय
व्यायाम? माझं वय आहे का? व्यायामाचं?
यू नीड टू बी स्स्ट्राँग..... का? वीक असेनाका... मी काय मेवेदर आहे?

अशा असंख्य काउंटर आर्ग्युमेंट्स ऐकायला मिळतात. पुढे बोलणंच खुंटतं.

हे आपापल्या प्रकृतीनुसार बदलतं असं मला वाटतं. मी गेली कित्येक वर्षे व्यायाम करतीये. कोणत्याही नटीसारखे दिसायचे म्हणून नव्हे तर नुसती तब्येत चाम्गली रहावी म्हणून. पण योगासने, सूर्यनमस्कार, किंवा जीममध्ये केलेले नाचप्रकार मला मानवतात. उगीच डोंगर चढायला जाणे, मैदानाला सत्रा फेर्‍या मारणे, किकबॉक्सिंग, सायकल दामटवणे वगैरे मानवत नाहीत. पण हेच माझ्या नवर्‍याला फार मानवतं. पण म्हणून सायकल दामटताना मला दम लागल्यावर नाजूक पैलवान म्हटले तर कसे चालेल? एका वयात जागरणं मानवतात. आपण जागून शिनेमे बघतो, मुले आजारी असताना जागव्तात पण म्हणून नेहमी कोणत्याही वयात हेच कसे मानवेल? मला साधी शिंक आली तरी आजूबाजूचे व्यायाम न करणारे म्हणतात,"काय उपयोग तुझ्या व्यायामाचा? झालीच ना सर्दी?" या बोलण्याला खरेतर काही अर्थ नसतो. ते त्यांच्या व्यायाम न करण्याचं एकप्रकारे समर्थन करत असतात असे मला वाटते.

सतीश कुडतरकर's picture

12 May 2015 - 4:19 pm | सतीश कुडतरकर

AC जिम मध्ये खरोखरच व्यायाम होतो का! अंगातून घामाच्या धारा वाहायला पाहिजेत. असेही दिवसातले आठ- दहा तास थंडावा घेताच ना, मग शरीराला थोडे कष्ट द्या ना. Diet च वेड लागल आहे. कष्ट करायला नकोत मग shortcut शोधायचे.

मी आधी नियमित व्यायाम करायचो, जवळपास वर्षभर केला आणि शरीरही कमावले. कोणताही खुराक नाही, जे नेहमी जेवायचो तेच, त्याव्यतिरिक्त काहीही नाही. व्यायामशाळाही सामान्य, डम्बेल्स, डबल बार, चेस्ट प्रेस बेंच, काही प्लेट्स आणि भिंतीत आडवा टाकलेला एक पूलअप्स बार…बस्स!

त्यावेळेस जो व्यायाम केला तो आता मला कित्येक वर्षे पुरतोय. आता घरच्याघरी रोज फक्त सूर्य नमस्कार आणि पोटासाठी दोन आसने. दारू आणि सिगरेट च व्यसन सुद्धा केलं. पण या व्यसनामुळे जी हानिकारक तत्व शरीरात साठायची ती व्यायामाद्वारे घामावाटे नक्कीच बाहेर निघत असणार.

घाम काढा रे अंगातून!

वेल्लाभट's picture

12 May 2015 - 5:16 pm | वेल्लाभट

पण या व्यसनामुळे जी हानिकारक तत्व शरीरात साठायची ती व्यायामाद्वारे घामावाटे नक्कीच बाहेर निघत असणार.

त्रिवार नमन या आत्मविश्वासाबद्दल.

सतीश कुडतरकर's picture

12 May 2015 - 5:10 pm | सतीश कुडतरकर

मी सिगारेट चे व्यसन करूनसुद्धा मी गिर्यारोहण (तेही hardcore) करताना सुद्धा अगदी सामान्य असतो. आता हे अस का?? कदाचित मी अंगमेहनतिची कामं आधी केलेली असल्याने शरीराचे लाड कधी केले नाही, त्यामुळे माझे शरीर तस बनल असेल. तरीपण सिगारेट वाईटच, आता ती कधी सुटते ते पाहायचं.

आता महिन्यातून एकदोन वेळा दोन-दोन घोट दारु घेतली तर असा काय मोठा फरक पडणार आहे शरीरावर.

चित्रगुप्त's picture

12 May 2015 - 5:17 pm | चित्रगुप्त

माझ्या एका नियमितपणे व्यायाम करणार्‍या मित्राला अनेक वर्षे सिगारेटचे व्यसन होते. आता ते सोडल्यावर महिनाभरात त्याचे वजन १० किलोने वाढले, आणि शरीर बेढब दिसू लागले.. सिगारेटीतील निकोटीन हे वजन नियंत्रित ठेवते म्हणे. कुणाला आहे का याबद्दल काही माहिती ?

सतीश कुडतरकर's picture

12 May 2015 - 5:34 pm | सतीश कुडतरकर

निकोटीन बाबत आपल म्हणण पटतेय. कारण, गेली कित्येक वर्ष माझ वजन ७५ किलो आहे. कधीच कमी झालेलं कि वाढलेलं नाही. अगदी एखाद्किलोनेही नाही. सिगारेट वाईटच, कळतंय पण सालं वळतच नाही.

चित्रगुप्त's picture

12 May 2015 - 8:54 pm | चित्रगुप्त

...
.
.

सुबोध खरे's picture

12 May 2015 - 7:49 pm | सुबोध खरे

सिगारेटीतील निकोटीन आपल्या खिशाचे वजन नक्की नियंत्रित करते शरीराचे नाही.

अनिरुद्ध.वैद्य's picture

13 May 2015 - 12:38 pm | अनिरुद्ध.वैद्य

अनुमोदन!

चित्रगुप्त's picture

13 May 2015 - 2:03 pm | चित्रगुप्त

तर मग आमच्या मित्राचे वजन महिनाभरात दहा किलोने वाढले, ते कसे म्हणता ? व्यायाम तर ते नियमितपणे नेहमी करतच असतात.
धूम्रपान हानिकारक, ते करू नये हे योग्यच, पण त्याने वजन नियंत्रित होतच नाही, हे कसे ?

सुबोध खरे's picture

14 May 2015 - 12:21 pm | सुबोध खरे

चित्रगुप्त साहेब
सिगारेट सोडली कि दर काही वेळाने ती प्यावी अशी जबरदस्त तल्लफ येते. या वर उपाय किंवा चाळा म्हणून लोक काहीतरी खातात त्यामुळे वजन वाढते. आमच्या मनोविकार तज्ञ सरांनी यासाठी त्यांच्या वर्गमित्राला सुपारी खायचा सल्ला दिला होता. ( सुपारी ऐवजी च्युईंग गम चालेल) . सुपारी एक तर बराच वेळ चावावी लागते शिवाय पोटात काहीच जात नाही. काही दिवसांनी सुपारी सोडून द्यावी.

वेल्लाभट's picture

12 May 2015 - 5:20 pm | वेल्लाभट

प्रामाणिकपणे, ती सुटावी अशी सदिच्छा. वैयक्तिक मत, अधून मधून चार घोट तितका घात करणार नाहीत, जितका सिगरेट करते. असो.

वाचलेलं सांगतोय; घामाचं कार्य प्रामुख्याने शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचं असतं. फॅट 'जळून' बिळून वितळून घामावाटे बाहेर पडते हा निव्वळ हास्यास्पद समज आहे. इति रुजुता दिवेकर.

सतीश कुडतरकर's picture

12 May 2015 - 5:38 pm | सतीश कुडतरकर

मी सांगण्यात कमी पडलो. घाम काढा म्हणजे शरीराला व्यायाम द्या. मला विज्ञानाला आव्हान द्यायचं नाही. :-)

बाकी सिगारेटच खरच मनावर घेतलं पाहिजे. आपली कळकळ कळली.

वेल्लाभट's picture

12 May 2015 - 5:39 pm | वेल्लाभट

ओक्के ! :) नो हरकत.

AC जिम मध्ये खरोखरच व्यायाम होतो का!

म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, की AC gym मध्ये जाणारे सगळेच तो चालू ठेवायचा आग्रह धरतात?

आणखी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वर्कआऊट कसा करता त्याला महत्त्व आहे. जास्त घाम आला म्हणजे चांगला वर्कआऊट झाला असं नव्हे. तो मुंबईच्या लोकल्समधून प्रवास करतानाही येतो.

त्यावेळेस जो व्यायाम केला तो आता मला कित्येक वर्षे पुरतोय.

I'm speechless on this sentence, असा व्यायाम 'पुरत' असता तर मग बघायला नको. तुम्हाला 'पुरत' असेल तर तुम्ही नशीबवान आहात एवढंच म्हणेन!!

सतीश कुडतरकर's picture

12 May 2015 - 4:59 pm | सतीश कुडतरकर

सूड
आता घरच्याघरी रोज फक्त सूर्य नमस्कार आणि पोटासाठी दोन आसने.>>>>
मी पुढे असही लिहिलेलं आहे.

अवांतर:- मी प्रस्तरारोहक असल्याने अंगाचा भरपूर व्यायाम होतोच.

मी प्रस्तरारोहक असल्याने अंगाचा भरपूर व्यायाम होतोच.

हे माहीत आहे आणि कदाचित हे तुम्ही फिट असण्यामागचं गमक असेल. वर्षभर केलेला व्यायाम पुरण्याचं गणित काही पटलं नाही.

सतीश कुडतरकर's picture

12 May 2015 - 5:30 pm | सतीश कुडतरकर

वर्षभर केलेल्या व्यायाम--
मी व्यवस्थित सांगू शकलो नाही. क्षमस्व!
जी आवड निर्माण झाली ती अजूनही शाबूत आहे.

वेल्लाभट's picture

12 May 2015 - 5:38 pm | वेल्लाभट

घामाबाबत गैरसमज दूर करणारे अनेक दुवे सापडतील. त्यातला हा एक बघा सतीश भाऊ

दुवा

घाम हे केवळ शरीर हायड्रेट होण्याचं माध्यम आहे. बाकी काहीही नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2015 - 6:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्यसनामुळे जी हानिकारक तत्व शरीरात साठायची ती व्यायामाद्वारे घामावाटे नक्कीच बाहेर निघत असणार.

हे सिद्ध करू शकल्यास सद्याच्या प्रचलीत असलेल्या शास्त्रिय ह्युमन फिजिऑलोजीमध्ये बरेच क्रांतीकारी बदल करावे लागतील ! ;)

हघ्या.

तुमचा समज चुकीचा आहे, तसा समज दुसर्‍यांचाही होऊ नये केवळ याकरिताच हा प्रतिसाद !

चित्रगुप्त's picture

12 May 2015 - 4:41 pm | चित्रगुप्त

मला ठाऊक असलेले व्यायामाचे फायदे:
१. र्‍हदयाचे स्नायु बळकट होऊन त्याची कार्यक्षमता वाढणे.
२. शरिरातील चरबीचे ज्वलन होणे.
३. स्नायुंची शक्ती वाढणे
४. स्नायुंचा लवचिकपणा वाढणे
५. स्नायुंची कार्यक्षमता वाढणे
६. सांधे मोकळे होणे, सांध्यांभोवती आव जमण्यापासून बचाव, परिणामी सर्व शारीरिक हालचालीतील सुलभता.
७. शरीराला अतिरिक्त प्राणवायू लाभणे.
८. एकंदरित जास्त ऊर्जा, उत्साह, प्रसन्नता लाभणे.
याखेरीज आणखी फायदे असतीलच, त्याविषयी कुणीतरी लिहावे.

अलिकडे मी ताई-ची आणि ची-गाँग नामक चिनी व्यायाम अजमावत आहे. यात अतिशय सावकाश हालचाली करायच्या असल्याने स्नायुंना दुखापत होण्याची शक्यता नसते. उतारवयात करायला अतिशय उपयुक्त. आजकाल बहुतेकांना उगीचच प्रत्येक बाबतीत कारण नसता घाई करायची खोड जडलेली असते, सहनशीलतेची सवय मोडलेली असते, त्यावरही हे व्यायाम अतिशय परिणामकारक आहेत.
.

...

वेल्लाभट's picture

12 May 2015 - 5:22 pm | वेल्लाभट

गुड !

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2015 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

ताई ची व्हिडिओ...

https://youtu.be/P5hvODK2zW4

वेल्लाभट's picture

12 May 2015 - 9:31 pm | वेल्लाभट

ताई 'ची' व्हिडियो नसते हो... ताई 'चा' व्हिडियो असतो.

ळॉळ !

चित्रगुप्त's picture

12 May 2015 - 9:40 pm | चित्रगुप्त

अहो, ती 'ताई चा व्हिडियो' वाली ताई निराळी. आम्ही तिच्या सिनेमाबद्दल लिहिले होते की.
http://www.misalpav.com/node/30940

श्रीरंग_जोशी's picture

12 May 2015 - 9:47 pm | श्रीरंग_जोशी

ताई ची.

वाचकांच्या मनात गोंधळ होऊ नये म्हणून मी जमेल तेवढे दुवे जोडत असतो :-) .

चर्चा विषय अन प्रतिसाद खूप महत्वाचे आहेत. धागाकर्त्याचे विशेष आभार.

गरज नसताना व्याकरण बघितलं की असंच होतं.

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 May 2015 - 5:42 pm | अनिरुद्ध.वैद्य

तरीपण डिस्क्रिप्शन आवडले. अगदी मनापासून लिहिलेय.

व्यायामाचे अनेक प्रकार असतात, ज्याने जसं झेपतंय तसा व्यायाम करावा. काही लोक हजारो रुपडे खर्च करून जिमा लावतात, काही हनुमान व्यायामशाळेत जातात (आमच्यासारखे), काही भरपूर धावतात, काही सायकल चालवतात, काही पोहायला जातात, काही योगासने करतात (मी करतो)

मागे भरत दाभोळकर एक कार्येक्रमात म्हणालेले,ते गेली अनेक वर्षे न चुकता व्यायाम करतात,जसे आपण अंघोळ करायला काही कारणे देत नाही, तशीच व्यायामाला सुधा देऊ नयेत, रोजच्या जगण्याचा व्यायाम हा एक भाग झाला कि वेगळे efforts द्यावे लागत नाहीत.
कुठलीही गोष्ट सतत ण चुकता २१ दिवस केली कि त्याची सवय लागते म्हणतात. ज्यांना व्यायाम करायचा कंटाळा येतो त्यांनी ण चुकता २१ दिवस तो करून पाहावा :)

सूड's picture

12 May 2015 - 6:17 pm | सूड

नोटेड!!

व्यायाम करायचा असेल नियमीत तर जिम बिम लावण्याऐवजी लग्न करावं.

धागा व प्रतिसाद आवडले. ते चीनी व्यायामप्रकार योगासनांच्या जवळ जाणारे आहेत असे वाटते.

चित्रगुप्त's picture

12 May 2015 - 8:23 pm | चित्रगुप्त

चिनी प्रकार बरेचसे योगासनांसारखे आहेत, मात्र 'आसनजय' अर्थात आसन नीट करता येऊ लागले, की त्यात बराच वेळ सहजपणे स्थिर राहता येण्याचा सराव करणे - हे नाही, असे वाटते.

यसवायजी's picture

12 May 2015 - 6:55 pm | यसवायजी

छान माहिती.
जीमला जाण्याआधी आणी जीमनंतर हादडायला महाराष्ट्रीयन (शाका/मांसाहार) डाएट सुचवा . जालावर जास्त माहिती उसगाव/उरलीकांचन पब्लीकसाठी आहे.

सूड's picture

12 May 2015 - 7:36 pm | सूड

http://www.misalpav.com/node/26236

मी एखादं संत्रं, कणकेचा लाडू वैगरे पण खातो कधीकधी!!

यसवायजी's picture

12 May 2015 - 8:18 pm | यसवायजी

थांकू रे.
ते तू परत केलंस तर वाटीभर दे धाडून. ;)

आपली वाटी आणून येऊन घेऊन जाणे, ऐनवेळी वाट्या कमी पडतात.

चित्रगुप्त's picture

12 May 2015 - 8:27 pm | चित्रगुप्त

व्यायामापूर्वी एक पिकलेले केळे खावे, असे ऋजुताबाई सांगतात.

टवाळ कार्टा's picture

12 May 2015 - 9:00 pm | टवाळ कार्टा

खुपच छान धागा :)

सुबोध खरे's picture

12 May 2015 - 9:12 pm | सुबोध खरे

घामाचे काम शरीराला थंड ठेवणं हे आहे. हायड्रेटेड नव्हे उलट घामाने डीहायड्रेशन होते.
असो घाम गाळला नाही तर व्यायामाचा फायदा होत नाही हा गैरसमज --तुम्ही बाळंत पणाच्या कळा दिल्या नाहीत तर तुम्हाला मुलाबद्दल प्रेम वाटत नाही याच्या पातळीचा आहे.
नुसता प्लास्टिकचा रेनकोट घालून पहा. दहा मिनिटात शरीर घामाने निथळून निघेल. अतिविशाल माणसे शरीरावरील चरबीच्या थरामुळे कायम घामेजलेली असतात, कोणताही व्यायाम न करता. शरीर व्यायाम करतं तेंव्हा गरम होतं. याचं कारण ५० % कार्य हे उष्णतेच्या स्वरुपात फुकट जात असतं. हे म्हणजे पेट्रोल चे इंजिने चालू केले कि गरम होते कारण ५० % उर्जा उष्णतेमध्ये रुपांतरीत होऊन फुकट जात असते.
गरम शरीर थंड ठेवण्यासाठी घाम येतो. घाम वाळण्यासाठी लागणारी उर्जा शरीरातून काढून घेतली जाते त्यामुळे शरीर थंड होते.लिक्विड कुल्ड इंजिन असेच कार्य करते. थंड हवेच्या ठिकाणी किंवा बर्फाच्छादित प्रदेशात व्यायाम केला असता मुळीच घाम येत नाही मग तेथे काय कॅलरी जळत नाहीत का?
घामातून निर्विषीकरण(DETOXIFICATION) होते हा एक मोठा गैरसमज आहे.कोणत्याही तर्हेने तेल लावून ई घाम आला तरी त्यातून विषारी द्रव्ये बाहेर पडत नाहीत हे सिद्ध झालेले आहे. मुळात शरीरात विषे साठून राहू नये म्हणून तुमचे यकृत आणी मूत्रपिंडे अहोरात्र काम करीत असतात. सिगरेट मुळे फुप्फुसात साठलेली द्रव्ये घामावते बाहेर पडायची असतील तर ती प्रथम रक्तात मिसळायला पाहिजेत आणी तेथून तो त्वचेकडे येतील. पण यामुळे शरीराला उपायाच्या ऐवजी अपायच होईल. परंतु असे होत नाही. टार इ. द्रव्ये फुप्फुसातच साठून राहतात आणी त्यांचा फुप्फुसावर परिणाम होऊन कर्करोग होतो.
आयुष्यात एकदा दोन वर्षे व्यायाम केला तर तो आयुष्यभर पुरत नाही. तसे असते तर खेळाडू लोकांना हृदय विकार आला नसता.
व्यायाम हे प्रार्थने सारखे आहे. कसा करता ते महत्त्वाचे नाही करता हे महत्त्वाचे आहे. मग तो वेगाने चालणे, पळणे, पोहणे, सायकलिंग करणे किंवा पायर्या चढणे असो. पायर्या चढणे म्हणजे तळमजल्यावर जाण्यासाठी चार पायर्या चढणे नव्हे तर दिवसात तीन वेळा सात मजले चढणे इतके असावे.
नाहीतर व्यायाम करता का विचारल्यावर रुग्ण सांगतात हो करतो ना! काय करता विचारले कि प्राणायाम करतो.
जिम मध्ये गेल्यावर व्यायाम होण्याचे मूळ कारण आपण तेथे दाबून पैसे मोजलेले असतात त्यामुळे लाजे काजेस्तोवर दोन चार महिने लोक जातात आणि मग काहीतरी कारण काढून बंद होतें.
व्यायम करणे हा शरीर लवचिक ठेवण्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. अर्थात तोंडावर ताबा ठेवला तर वजनही कमी होते.
आळस हे व्यायाम न करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे ( मी सुध्दा यात मोडतो कारण माझा पण व्यायाम हा अतिशय अनियमित आहे) पण मी तोंडावर ताबा ठेवून वजन मात्र टिकवून आहे.
तेंव्हा ज्याला जसा जमेल तसा आणी तितका( खरं तर त्याच्या पेक्षा जास्त) व्यायाम करावा. व्यायामाचे फायदे जरा सावकाशीने लिहितो.

मोदक's picture

12 May 2015 - 9:17 pm | मोदक

व्यायामाचे फायदे जरा सावकाशीने लिहितो.

कितीही टेक्नीकल असले तरी शक्य तितक्या सविस्तरपणे लिहा.

चित्रगुप्त's picture

12 May 2015 - 9:35 pm | चित्रगुप्त

व्यायामाचे फायदे - वा परिणाम - यांच्या प्रतिक्षेत.
व्यायामाच्या बाबतीत कोणी काय टाळावे, याबद्दलही लिहावे.

वेल्लाभट's picture

12 May 2015 - 9:33 pm | वेल्लाभट

हायड्रेटेड नव्हे उलट घामाने डीहायड्रेशन होते.

तेच ते हो :) उलटं झालं. म्हणायचं तेच होतं.

वेल्लाभट's picture

12 May 2015 - 9:35 pm | वेल्लाभट

व्यायाम हे प्रार्थने सारखे आहे. कसा करता ते महत्त्वाचे नाही करता हे महत्त्वाचे आहे. मग तो वेगाने चालणे, पळणे, पोहणे, सायकलिंग करणे किंवा पायर्या चढणे असो. पायर्या चढणे म्हणजे तळमजल्यावर जाण्यासाठी चार पायर्या चढणे नव्हे तर दिवसात तीन वेळा सात मजले चढणे इतके असावे.

नुसतं हेच नाही. प्रोग्रेसिव ओव्हरलोड असणं गरजेचं आहे. नुसता एकच व्यायाम अनेक दिवस केल्यावर कालांतराने तुम्ही प्लॅटू स्टेज मधे जाता. ग्रोथ/परिणाम कमी होत जातो.

अप्पा जोगळेकर's picture

12 May 2015 - 11:07 pm | अप्पा जोगळेकर

चांगली माहिती.
मैदा आणि वेफर्स वर बंदी यावी असं वाटतं कधीकधी.

धागा आणि प्रतिसाद आवडले.

अमितसांगली's picture

13 May 2015 - 2:26 pm | अमितसांगली

मी साधारणता दीड वर्षापूर्वी ९५ किलोचा होतो..मागचे एक वर्ष व आता पण मी ७३-७४ किलो टिकवले आहे..माझी प्रेरणा ्हणजे मालकीणबाईंची(लग्न झालेले नाही हं अजून) विनंतीवजा धमकी...मागच्या वर्षी किमान प्रयत्न तरी करावे म्हणून तळजईला सकाळी चालायला जाऊ लागलो...१५ दिवसात रोजचे १० किमी चालू लागलो..जास्त काही वजनात फरक पडलाय अस जाणवलं नाही...शरीर फक्त पहिल्यापेक्षा हलके वाटू लागलेले...मग अजून एक प्रयत्न म्हणून जिम लावली..माझे नशीबच चांगले म्हणून जिममध्ये चांगले ट्रेनर मिळाले..एक दिवस कार्डीवो(ट्रेड मिलवर रनिंग, सायकलिंग, अजून एक कोणती तरी मशीन होती), एक दिवस पायाचे व्यायाम (उठाबशा,लंजेस,लेग प्रेस) व एक दिवस डम्बेल्स वगैरे. सुरुवातीचे दोन महिने जिम बरोबरच डाएट हि नियंत्रित केले..या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे दोन महिन्यात माझे वजन ५-६ किलोने कमी झाले...नंतर जिम सोडून नैसर्गिक व्यायाम सुरु केला...त्या अगोदर मी कधी ४००मी.च्यावर कधी पळलो नव्हतो पण हळूहळू मी स्टॅमिना वाढवत नेला व आठवड्यातून तीनदा असे १०-१२ किमी रोजचे पळू लागलो...दर रविवारी २१ किमी पळू लागलो...नंतरच्या २ महिन्यात मात्र आमुलाग्र बदल झाला...वजन ७६-७८ पर्यंत खाली आले (खाण्यावर जास्त नियंत्रण न करता पण)...आता मात्र खूपच फरक पडलाय...व्यायामाची सवयच अंगवळणी पडलीय...रनिंग, पोहणे,सायकलिंग हा क्रम आठवडाभर सुरु असतो...त्याच्या जोडीला सूर्यनमस्कार, यागोसाने, जोर, बैठका पण सुरु आहेत...मी आधी एकही जोर मारू शकत नव्हतो..मध्यंतरी एका जिममध्ये जोर काढण्याच्या स्पर्धेत तिसरा नंबर काढला (पदकही मिळालेले)...मी आता सलग ५० किमी सायकलिंग, १० किमी रनिंग व १ किमी पोहण्यासाठी प्रयत्न करतोय...आता वाटतंय कि उशिरा का होईना पण गाडी रुळावर आलीय...
माझे काही अनुभव:
१. जेवताना किंवा जेवण झाल्यावर तसेच जेवणापूर्वी लगेच पाणी पिऊ नका..
२. रात्री लवकर, सकस व हलका आहार घ्या (याचा फरक फार लवकर जाणवतो). शक्यतो संध्याकाळी ४ नंतर जास्त तेलकट किंवा जास्त गोड पदार्ध खाण्याचे टाळा
३.जेवणात दुध,दही,ताक,हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, पाच विविध प्रकारची फळे रोज असावीत.
४. जेवण झाल्यावर सहस्त्रपावली करा...फरक नक्की जाणवेल...
टीप: वजन जास्त असेल तर कमी करण्यासाठी सुरुवातीला व्यायाम व डाएट दोन्ही करणे उत्तम..एकदा व्यायामाची सवय लागली व वजन कमी झाले कि तुम्ही परत पूर्वीसारखे चरू शकता...वजन कमी करणे अवघड आहे मात्र नियंत्रित करणे खूप सोपे आहे..

वेल्लाभट's picture

13 May 2015 - 2:42 pm | वेल्लाभट

अनुभव सांगितल्याबद्दल अनेक आभार !
यथोचित प्रयत्नांतून तुम्ही साध्य केलेल्या फिटनेस चं मनापासून कौतुक.

रेवती's picture

13 May 2015 - 6:30 pm | रेवती

अभिनंदन.

चित्रगुप्त's picture

13 May 2015 - 3:04 pm | चित्रगुप्त

@अमित सांगली: तुमचा उपक्रम फारच प्रेरणादायक आहे, मात्र तुमचे वय किती, हे सांगणे आवश्यक आहे, कारण एवढा व्यायाम जास्त वयाच्या लोकांना करणे शक्य आणि योग्यही नाही.
मला स्वतःला (वय ६४) जॉगिंग, डंबेल्स आणि वेगात चालणे या तिन्हीतून (योग्य माहिती आणि मार्गदर्शनाच्या अभावी) इजा झाल्याने हे प्रकार (बहुधा कायमचे) बंद करावे लागलेले आहेत. त्यामुळे आता ताई-ची वगैरे प्रकार अजमवतो आहे. ताज्या भाज्यांचा आणि फळांचा रस काढून पिणे अत्यंत उपयोगी असल्याचा स्वानुभव आहे.

नाखु's picture

13 May 2015 - 5:01 pm | नाखु

ताज्या भाज्यांचा आणि फळांचा रस काढून पिणे अत्यंत उपयोगी असल्याचा स्वानुभव आहे

याचीच माहीती हवी आहे म्हणजे रेडिमेड फळांचे रस की किमान आदल्या दिवशी काढून फ्रीझ मध्ये ठेवलेले चालतील. शक्य असल्यास येथे तपशील द्यावा ही विनंती.

माहीतीउत्सुक

अमितसांगली's picture

13 May 2015 - 5:14 pm | अमितसांगली

रेडीमेड नकोच ..शक्यतो ताज्या फळांचा रस व शक्य असल्यास फळेच खावा...

चित्रगुप्त's picture

14 May 2015 - 12:51 am | चित्रगुप्त

@ नादखुळा: तूर्त खालील दीड तासाचा व्हिडियो अवश्य बघा, मग सविस्तर लिहितो.
https://www.youtube.com/watch?v=3mS0YA465ts

रस काढून लगेच पिणे सर्वोत्तम.

अमितसांगली's picture

13 May 2015 - 5:12 pm | अमितसांगली

वेगात चालणे व जॉगिंगच केल पाहिजे अस काही नाही...सकाळी व संध्याकाळी जमेल तसे, जमेल तितके चालावे...योगासने करा...जेवल्यानंतर लगेच झोपू नका...सलग एक तास एकाजागी बसणे टाळावे अस म्हणतात..

विंजिनेर's picture

13 May 2015 - 11:57 pm | विंजिनेर

.मी आता सलग ५० किमी सायकलिंग, १० किमी रनिंग व १ किमी पोहण्यासाठी प्रयत्न करतोय.

ऑलिंपीक डिस्टन्स? गुडलक!! मोठी कमिटमेंट आहे! कुठल्या टुर्नामेंट मध्ये साईनअप केलेत?
अजून काही शंका -
१. बाईक कुठली निवडली आहे? कशी निवडली?
२. आठवड्याला किती तास व्यायामाला द्यावे लागतात?
३. न्युट्रीशन स्ट्रॅटेजी काय आहे - ट्रेनिंगमधले आणि प्रि-रेस

टवाळ कार्टा's picture

14 May 2015 - 1:28 am | टवाळ कार्टा

५० किमी सायकलींगसाठी फक्त रोज १०-१५ किमी सायकल चालवण्याचा सराव पुरेसा होतो...१ महिन्याच्या आत ५० किमी चालवण्याचा स्टॅमिना बनतो....हे स्वानुभवावरुन सांगतोय

माझी सायकल - http://www.firefoxbikes.com/BikeDetails.aspx?BikeId=52

सायकल निवडण्यासाठी मोदकाचे धागे वाचा...(आणि मग त्याला फोन करून करून पिडायचे ;) )

५० किमी सायकलींगसाठी फक्त रोज १०-१५ किमी सायकल चालवण्याचा सराव पुरेसा होतो...१ महिन्याच्या आत ५० किमी चालवण्याचा स्टॅमिना बनतो

खरंय. पण फक्त ५० किमी सायकलिंग इज द एझी पार्ट.
ट्रायथ्लॉनमध्ये पोहणे -> बाईक राईड -> रन असे असल्यामुळे ट्रेनिंग मध्ये रिकवरी, न्युट्रीशन आणि व्यायामप्रकारांचे वेळापत्रक/बॅलन्स) मह्त्वाचे आहेत. माझी शंका त्या कॉम्बिनेशन बद्दल होती, केवळ सायकलिंग बद्दल नव्हे.

आणि सायकल निवड म्हणजे मला ट्राय-बाईकबद्दल माहिती ह्वी होती. रोडबाईक्/हायब्रीड इ. तिथे उपयोगाच्या नाहीत (म्हणजे, म्हणायला चालतील पण नंतर १० किमी "पळायला" पाय आणि दमसास - दोन्ही शिल्लक राहणार नाहीत

चित्रगुप्त's picture

14 May 2015 - 7:58 am | चित्रगुप्त

आम्ही तरूणपणी सुमारे 100 कि.मी रोज सायकल चालवून इंदूर ते बडोदे, इंदूर ते अजिंठा-वेरूळ वगैरे सफरी केल्या. सायकली अगदी साध्या, जुनाट. पैशांची मारामार, त्यामुळे जाऊ तिथे काहीतरी बादरायण संबंध जुळवत ओळखी काढून दोन वेळ जेवणाची सोय करायची, बाकी वाटेत चिंचा बोरे वगैरे हुडकायची ... हे सर्व आठवले ... पण काय मजा केली राव त्याकाळी ...

चित्रगुप्त's picture

14 May 2015 - 7:59 am | चित्रगुप्त

आम्ही तरूणपणी सुमारे 100 कि.मी रोज सायकल चालवून इंदूर ते बडोदे, इंदूर ते अजिंठा-वेरूळ वगैरे सफरी केल्या. सायकली अगदी साध्या, जुनाट. पैशांची मारामार, त्यामुळे जाऊ तिथे काहीतरी बादरायण संबंध जुळवत ओळखी काढून दोन वेळ जेवणाची सोय करायची, बाकी वाटेत चिंचा बोरे वगैरे हुडकायची ... हे सर्व आठवले ... पण काय मजा केली राव त्याकाळी ...

टवाळ कार्टा's picture

14 May 2015 - 11:05 am | टवाळ कार्टा

_/|\_

श्रीरंग_जोशी's picture

14 May 2015 - 9:07 am | श्रीरंग_जोशी

महत्वाचा विषय जरा वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न आवडला.

माझे उदाहरण सांगतो. या वर्षाची सुरुवातच डॉक्टरांकडून तंबी मिळण्यात झाली. अ‍ॅन्युअल चेकपमध्ये बाकी सर्व व्यवस्थित असले तरी कॉलेस्टरॉल मात्र वयाला शोभणार नाही असे वाढले होते. दीड वर्षापूर्वीही असेच चेकअप केले होते तेव्हा ते किंचितसे वाढले होते. तेव्हा डॉक्टरांनी नियमीत व्यायामाचा सल्ला दिला होता.

यंदा डॉक्टरांचा सल्ला इशार्‍यात बदलला होता.

मला अधून मधून व्यायाम करायला आवडतो. पण नियमीत व्यायाम करणे काही केल्या जमत नाही. मी जेथे राहतो तेथे वर्षातले चार ते पाच महिने थंडी व बर्फामुळे बाहेर फिरण्यावर मर्यादा येतात. हिवाळ्यात अधून मधून अंगणातला बर्फ (स्नो) काढणे किंवा काही वेळेस दगडी बर्फ (आइस) फोडून काढणे हे श्रम करावे लागतात. त्याखेरीज आपोआप फारसा व्यायाम होत नाही.

  • यावेळी काही परिचितांच्या सल्ल्याने १ महिन्याचा शुगर फ्री चॅलेंज घेतला. चहा कॉफीतून साखर दोन वर्षांपूर्वीच सोडली होती. एक महिना थेट साखर अन अप्रत्यक्ष साखर असलेले सर्व पदार्थ वर्ज्य केले. आता अपवाद म्हणून एखादेवेळेस गोड पदार्थ खातो.
  • ब्रेड व इतर बेकरी प्रॉडक्ट्स खाणे जवळ जवळ बंद केले (महिन्यातून एक दोन वेळा खातो).
  • तळलेले पदार्थ खाणे जवळ जवळ बंद केले (महिन्यातून एखाद्याच वेळेस अल्प प्रमाणात खातो).
  • भातासाठी ब्राऊन राइस वापरणे सुरू केले.
  • हापिसातल्या लंचमध्ये फळे व सॅलड खाणे गेली दोन अडीच वर्षे सुरू आहे त्यात बदल करण्याची गरज पडली नाही.

व्यायाम म्हणून हापिसातून घरी आल्यावर अ‍ॅरोबिक्स प्रकारचे व्यायाम करू लागलो. दोरीवरच्या उड्या मारणे, कराटेमध्ये उजव्या डाव्या हाताने बुक्क्या मारण्याची अ‍ॅक्शन करणे, जागच्या जागेवर धावणे इत्यादी.

त्याखेरीज मिनी इलिप्टिकल, अन एक्सरसाइझ बायसीकल खरेदी केली. जेव्हा इतर व्यायाम केले नाही तेव्हा या यंत्रांद्वारे व्यायाम करणे सुरू केले.

हापिसच्या इमारतीत मी पाचव्या मजल्यावर काम करतो. पूर्वी एखादेवेळेसच जिन्याचा वापर करायचो. आता रोज किमान दोनदा जिन्याने चढून वर जातो. एकावेळी दोन पायर्‍यांचे पाउल टाकतो. त्यामुळे अधिक व्यायाम होतो.

गेल्या आठवड्यात कॉलेस्टरॉल पुन्हा तपासले असता ते पूर्वीपेक्षा १० टक्क्यांनी कमी झाले. वजनही २ किलो ने घटले.

डॉक्टरांनी या प्रगतीवर समाधान व्यक्त केले व हेच प्रयत्न पुढे सुरू ठेवण्यास सांगितले आहे कारण कॉलेस्टरॉल अजूनही नॉर्मल नाही. औषध घेऊन कमी करण्याची मात्र अजिबात गरज नाही असे डॉक्टरांचे मत आहे.

आयुष्यात प्रथमच ठरवून असे काही करायची वेळ आली अन ते करू शकलो. मला स्वतःला पूर्वीपेक्षा हलके वाटते व कामावरून घरी आल्यावर पूर्वीपेक्षा अधिक उर्जा असल्याचे जाणवते.

गेल्या आठवड्यात कॉलेस्टरॉल पुन्हा तपासले असता ते पूर्वीपेक्षा १० टक्क्यांनी कमी झाले. वजनही २ किलो ने घटले.

किती दिवसात?

श्रीरंग_जोशी's picture

14 May 2015 - 6:07 pm | श्रीरंग_जोशी

चार महिने एक आठवड्याने कॉलेस्टरॉल पुन्हा तपासले. (उंची सहा फूट आहे तेव्हा वजन ७८ किग्रॅ होते आत ७६ किग्रॅ आहे).

चित्रगुप्त's picture

14 May 2015 - 7:04 pm | चित्रगुप्त

आपण गव्हाची पोळी रोज खातो, आणि भाकरी अधून मधून. याउलट करावे.