मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत.
काही उदाहरणे देत आहे.
१) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्याची 'कीव' कराविशी वाटते.
२) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट'
३) Bicycle करिता 'सायकल'
४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी.
५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !!
६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं.
७) Cinema/Movie साठी 'पिक्चर'
तुम्हाला अजून असे कोणते शब्द आठवतात ? शब्दांचा हा चुकीचा वापर टाळावा निदान कमी व्हावा म्हणून काय करता येईल ?तुम्ही काही करता का ? तुम्ही निदान पुढच्या पिढीला अशा चुकीच्या वापरापासून परावृत्त करता का ?
प्रतिक्रिया
25 Jul 2014 - 10:20 pm | बॅटमॅन
पगार हा शब्द पोर्तुगीज मधून आलाय असे वाचले आहे खरे.तपासून पहायला पाहिजे.
बाकी उर्दू ही मिश्रभाषा आहे, ( मेनली फारसी + काही अरबी शब्द इ.इ.) + (हिंदीचे मध्ययुगीन रूप) = उर्दू. त्यामुळे एखादा शब्द उर्दूतून आला याचा अर्थ त्याचे मूळ अरबी, फारसी नैतर तुर्की असते. या तीन भाषांमध्ये चेकवले पाहिजे. अरबीचं तुम्ही जाणताच जे काय असेल ते, बाकीचं जमेल तसं पाहतो.
29 Apr 2015 - 5:37 pm | असंका
तुमच्या तपासकामात सहाय्यकारी असा एक लेख आलेला आहे....
पगार या शब्दाची जन्मकथा... इथे
30 Apr 2015 - 3:14 am | नगरीनिरंजन
बाहेरचे शब्द उसने घ्यायचेच नाही असे अजिबातच म्हणणे नसावे कोणाचेच. पण बुद्धीमांद्यामुळे स्वभाषेत वा इतर अनेक भाषांमध्ये चपखल, समर्पक आणि सुंदर शब्द असूनही फक्त इंग्रजी/हिंदीतले घासून गुळगुळीत झालेले शब्द वापरणे हा प्रकार फार वाईट आहे.
वरती विक्षिप्तबाईंनी उच्चाराप्रमाणे लिहीणे वगैरे विचार मांडले आहेत, तितकं दक्ष पाहिजे प्रत्येक बाबतीत. साला प्रगत होणे म्हणजे मेंदूचा अधिक वापर करणे, कमी नाही.
25 Jul 2014 - 6:04 pm | थॉर माणूस
१) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्याची 'कीव' कराविशी वाटते.
>>> make a line किंवा stand in line असते इंग्रजीमधे, त्यातूनच हा प्रकार मराठीमधे आला असावा. लायनी वगैरे अर्धवट ज्ञानातून होणारे प्रकार आहेत. आपला मुद्दा इतर लोकांच्या दृष्टीने पहा बरं, स्वच्छ भाषेच्या मागे लागलेल्या इंग्रजासमोर उभे राहून आपण कितीही छान इंग्रजी बोलायचा प्रयत्न केला तरी एका मर्यादेनंतर आपल्या इंग्रजीने त्यालाही फेफरे येईल. :)
२) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट'
>>> वीजप्रवाहासाठी लाईट शब्द वापरलेला मी तरी (सुदैवाने) ऐकलेला नाही. लाईट गेले म्हणतात ते दिवे गेले या अनुषंगाने असते. आणि दिवे गेले म्हणजे अर्थातच वीज गेली असेल या अर्थाने ते येत असावे.
३) Bicycle करिता 'सायकल'
>>> Bicycle हा सायकलचा एक उपप्रकार आहे, शब्द मोठा होतो म्हणून तो बारीक करण्याचा प्रयत्न यापलीकडे त्यात फार चुकीचे काही नाही. मोटरसायकल म्हणता की बाईक?
४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी.
>>> हा थोडं विचित्र आहे खरं. पण बहुतेक जुन्या काळात ही विशेषणे लग्न झालेल्या स्त्री पुरुषांसाठी वापरली जात. खास करुन मिसेस हे लग्न झालेल्या स्त्री साठी होते. त्यामानाने मिस्टर हे जास्त Generically वापरले जायचे. "हे माझे पती" म्हणणे केव्हाही योग्य. आजच्या काळात hubby जास्त चालते बरं का.
५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !!
>>> हो ना, ब्रँडनेमचं क्रियापद कसं होईल बरं? आता मरीअम-वेबस्टर गुगल किंवा झेरॉक्स ला क्रियापद म्हणत असली म्हणून काय झालं?
६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं.
>>> मागे एकदा एक वाक्य वाचलं होतं Every bun is bread but not every bread is bun. त्यातलाच प्रकार.
७) Cinema/Movie साठी 'पिक्चर'
>>> Movie म्हणजे Motion Pictures. सुरुवातीला Motion pictures जास्त प्रचलित असावा ज्यामुळे त्याचे छोटे रुप पिक्चर प्रचलित झाले असावे. सध्या मूव्ही हा शब्द जास्त ऐकायला मिळतो.
इतरांनी लिहील्याप्रमाणे काही प्रमाणात न्युनगंड, काही प्रमाणात साहेबाची भाषा म्हणजे भारी असल्या प्रकारामुळे गमती घडतात. पण सगळ्याच शब्दांमागे हे कारण असते असं नाही. पम्चर, शाक अपसर हे अज्ञानातून होतं (मराठी शब्द माहिती नाही आणि इंग्रजी येत नाही). तर बर्याच शब्दांचे अपभ्रंश झालेले असतात. हे एका दिवसात होत नाही तर शब्दाचा अपभ्रंश व्हायला, तो प्रचलित व्हायला वेळ लागतो. तोवर त्याचा वापर गमतीशीर वाटू शकतो. जसे की फारसी भाषेतून आलेले शब्द... जेव्हा ते मराठीमधे घुसले तेव्हा गमतीदारच वाटले असतील. कित्येक शब्दांचे तर अर्थसुद्धा बदललेत मराठीत.
त्यामुळे मी याचा फारसा त्रास करुन घेत नाही किंवा किव वगैरे सुद्धा करत नाही. आपणही असेच नकळत कुणाला तरी पिडत असूच की... मग कशाला लय लोड घेताय, जौंद्या की. :)
25 Jul 2014 - 6:14 pm | मराठी कथालेखक
तसं असेल तर "लाईट गेली आहे म्हणून मिक्सर चालवू शकत नाही" अशी काही परिस्थिती तुमच्याकडे निर्माण होत नसेलच.
29 Jul 2014 - 9:57 am | थॉर माणूस
:)
26 Jul 2014 - 1:04 am | सोनू
वीजप्रवाहासाठी लाईट शब्द वापरलेला मी तरी (सुदैवाने) ऐकलेला नाही.
>> लाईट गेले ना, बघ पंखा फिरत नाहीये. टी. व्ही. सुरू करून बघ लाईट आलीय का ते.
असे संवाद कधीच नाही ऐकले?
29 Jul 2014 - 10:10 am | थॉर माणूस
ते वीज गेली या अनुषंगाने येते सोनु...
वीजप्रवाह गेला या पद्धतीने लाईट हा शब्द आलेला मी तरी पाहिलेला नाही असं म्हणायचं होतं मला, येतंय का लक्षात?
घरात वीजप्रवाह गेला वगैरे म्हणता का तुम्ही लोक? वीज गेली असेच म्हणता ना? पुर्वी लोकांसाठी पंखे, टीव्ही, मिक्सर (आता ह्याला काय म्हणू? मिक्सर, ग्राईंडर, ब्लेंडर की फूड प्रोसेसर?) वगैरे चैनीच्या गोष्टी होत्या. घरात वीजेवर चालणारे उपकरण म्हणजे बल्ब आणि ट्यूबलाईट. वीज गेली हे कळण्याचा सोपा उपाय म्हणजे लाईट चालते का ते पहाणे त्यामुळे लाईट गेली अर्थात वीज गेली असे समीकरण रूढ झाले.
पण एवढ्यावरून वीज गेली असे ठरवत नसत, लगेच शेजारच्यांना विचारलं जाई, "लाईट आहेत का हो तुमच्याकडे?". :) आजकाल हे कमी झालं असावं बहुतेक.
अर्थात शुद्ध आणि सात्विक भाषेचा हट्टच धरायचा असेल तर आमची काही हरकत नाही, पण उगाच आपल्या लेखी अशुद्ध बोलणार्यांची कीव करायची गरज नाही इतकेच मला मराठी कथालेखक साहेबांना सांगायचे होते. असो, चालू द्या...
2 Aug 2014 - 11:35 pm | भिंगरी
तुमची लाईट गेली का?असे आमच्याकडे नेहमीच विचारणा होते शेजाऱ्यांकडून. कारण कधी कधी फक्त एखाद्या घरातीलच विद्युत प्रवाह खंडित झालेला असतो.
पण एका अमराठी शेजाऱ्याकडून आपका करंट है क्या? अशी विचारणा झाली आणि माझ्या मेंदूलाच करंट लागला.
25 Jul 2014 - 6:06 pm | प्रसाद गोडबोले
हे तरी ठीक आहे हो ... आमचे एक मित्र पॅन्ट चे अनेक वचन पॅन्टी असे करायचे अन केवढा घोळ व्हायचा काय सांगु =))
25 Jul 2014 - 6:08 pm | प्रसाद गोडबोले
आणि हे घ्या पावाच्या अधिक अभ्यासा करिता
http://pt.wikipedia.org/wiki/P%C3%A3o
बाकी ह्या वरुन परेश रावलचा अप्रतिम डायलॉग आठवला " ये मेरे पाव है =))
25 Jul 2014 - 6:11 pm | बॅटमॅन
बाकी, इंग्रजी शब्दांचे अपभ्रंश होतात म्हणून कातावणार्यांना, बहुतेक भाषांतील बहुतेक शब्द असेच तयार झालेत हे माहिती आहे काय? अगदी मराठेशाहीतही आपण इंग्रजी नावांची कसली मस्त मोडतोड केलीय याचा विदा रियासतीच्या खंड ५ मध्ये आहे. उदा.
मॉस्टिन, ऑस्टिन- माष्टिन, आष्टिन.
एल्फिन्स्टन- अल्पिष्टन.
मॅक्फर्सन- मेघफास.
सार्टोरियस- सरताऊस.
रॉस लँबर्ट- रासलंपट =)) =)) =))
इंग्रजीतही असे कैक शब्द सापडतील. म्यांगो हा शब्द तेलुगु/तमिऴ मधल्या मंगई या शब्दाचा अपभ्रंश आहे, मुलिगॉटॉनी हा शब्द मिळगु तण्णीर चा अपभ्रंश आहे. माँगूज़ हा मराठीतल्या मुंगुसचा अपभ्रंश आहे.
खुद्द संस्कृत शब्दांचे अपभ्रंश पाहिले तर अख्खी मराठी जवळपास त्यांनीच भरलेली आहे. मग विंग्रजीच्या तथाकथित शुद्धतेबद्दल इतके गळे का म्हणून काढायचे ते समजत नाही. ना ती कुणाची मातृभाषा, ना अजून काही. गेल्या २०० वर्षांच्या फ्याडपायी आपल्या मातृभाषेला बोल का लावायचा ते समजत नाही. असो.
25 Jul 2014 - 6:21 pm | नानासाहेब नेफळे
ईष्टुर फाकड्याला कसे विसलात आपण?
25 Jul 2014 - 6:24 pm | बॅटमॅन
अर्र हो की नेफळेसाहेब, विसरलोच होतो. आठवण केल्याबद्दल धन्यवाद!
25 Jul 2014 - 6:48 pm | असंका
+१
इष्टुर फाकडा मीही शोधत होतो त्या यादीत.
25 Jul 2014 - 6:14 pm | यशोधरा
अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. >> अजून सरळसोटपणे माझा नवरा अथवा माझी बायको म्हणावं की! एवढं काये त्यात!
25 Jul 2014 - 9:26 pm | केदार-मिसळपाव
पुन्हा तुर्की शब्द आला.
25 Jul 2014 - 10:21 pm | बॅटमॅन
व्युत्पत्तिकोशात बायको हा शब्द तुर्कीपासून आला असेल असे म्हणताना एक प्रश्नचिन्ह दिलेय बहुधा. अन सद्यकालीन तुर्की भाषेत तरी बायको या अर्थी 'बायको' शब्दासदृश शब्द दिसत नाहीये. पाहिले पाहिजे.
28 Jul 2014 - 5:02 pm | केदार-मिसळपाव
मला एका तुर्कीश मुलीने सांगितला आहे.
तिला बाबा, बायको, बाझार इत्यादि शब्दाचा अर्थ कळत होता.
पण "आई" ह्या शब्दाचा उगम मला मात्र अजुनही माहित नाही.
28 Jul 2014 - 6:38 pm | बॅटमॅन
इंट्रेस्टिंग. बहुत धन्यवाद या माहितीकरिता.
30 Jul 2014 - 12:50 am | नंदन
ह्या तुर्की शब्दाचा मुख्य अर्थ 'स्त्री' आणि संदर्भाने पत्नी असा होतो.
30 Jul 2014 - 1:36 pm | केदार-मिसळपाव
म्हणजे बायन वरुन बाई आला असेही असु शकते.
30 Jul 2014 - 1:53 pm | बॅटमॅन
म्हायतीकरिता धन्यवाद नंदनशेठ!
1 Aug 2014 - 7:58 pm | पिशी अबोली
'आई' शब्द द्रविडियन भाषांमधून आलेला आहे.
25 Jul 2014 - 6:16 pm | रेवती
अगदीच सहमत आहे. पिक्चर असा चुकीचा शब्द कशाला वापरायचा? आम्ही पिच्चर म्हणतो.
बायसिकलला आम्ही सायकल म्हणायचो पण आमची मुले बाईक म्हणातात. आम्हाला बाईक म्हंजे मोटरसायकल असे म्हाईत होते. अशे चुकीचे शब्द वाप्रूच नये असे सुचिवते.
25 Jul 2014 - 6:24 pm | प्रसाद गोडबोले
वाघ म्हणलं तरी खातो अन वाघोबा म्हणलं तरी खातो च्या धर्तीवर नवीन म्हण आहे नवरा म्हणलं तरी घाबरतो अन मिस्टर म्हणलं तरी घाबरतो *acute*
25 Jul 2014 - 6:29 pm | नानासाहेब नेफळे
मग हजबंडरी सुरु करायला हरकत नसावी ;-)
25 Jul 2014 - 6:25 pm | नन्दु मुळे
आमच्या कोल्हापूर ला झोरॅक्स म्ह्न्टल जात
25 Jul 2014 - 6:32 pm | यशोधरा
कोल्लापूरचं समदं जगायेगळंच की वो!
25 Jul 2014 - 6:35 pm | बॅटमॅन
आजवर कोल्लाप्रात नै ऐकलो बा असलं काय.
(मिरजकर) बॅटमॅन.
25 Jul 2014 - 6:52 pm | असंका
+१
मीपण
28 Jul 2014 - 3:59 pm | नन्दु मुळे
विश्वास ठेवा.अर्थात ही गोष्ट १९९९ ची.
25 Jul 2014 - 6:40 pm | बबन ताम्बे
खेडयात डॉक्टरांना डाक्टर आणि एस. टी. कंडक्टरना कंडाक्टर म्हणतात.
25 Jul 2014 - 7:07 pm | कंजूस
मराठीत बोल्लो तर पब्लिक मारल .मोबाईल घर वगैरेची बैकसाइड .
25 Jul 2014 - 7:37 pm | कपिलमुनी
डायवर = ड्रायव्हर
किन्नर = क्लीनर
मोसम = मोशन :)
25 Jul 2014 - 8:03 pm | अत्रुप्त आत्मा
काही विंग्रजी शब्दांना (कायमचे ;) ..) मराठी रूप दिलेला...
हा आमचा- रायगड मराठी विभाग (मूळ शब्द ओळखा..पण त्यासाठी मूळ- ओळ- खा! )
डी...म पडताय ना लाइट?... बल - बदला(य)ला झाला हो...त्याचा!
मो..टार चालत नाय??? फेस .. उडाला असल...बग!!!!
किती पेप्श्या खाशील मेल्या...सर्दी ह्वैल नाय तं काय!?
शिग्रेटी कमी फुक हां... मेल्यां लगिन झाला ना इतक्यात!
=====================
क्रमशः ;)
25 Jul 2014 - 7:39 pm | कपिलमुनी
आमच्या सांगलीकडे दनलाप म्हणजे दणकट ..
पूर्वी Dunlop Tyres फार चांगले चालायचे त्यामुळे हा शब्द आला ..
दनलाप चप्पल हाये
गडी लै दनलाप.. :)
25 Jul 2014 - 7:40 pm | कपिलमुनी
आमच्या सांगलीकडे दनलाप म्हणजे दणकट ..
पूर्वी Dunlop Tyres फार चांगले चालायचे त्यामुळे हा शब्द आला ..
दनलाप चप्पल हाये
गडी लै दनलाप :)
25 Jul 2014 - 8:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
अरे, अरे, अरे... अडवा घोडं, थांबा थोडं.
सद्या इंग्लिशमध्ये आहेत ते सगळे शब्द मूळचे इंग्लिशमधले आहेत हा समज फर्फार चुकीचा असू शकतो. मूळ इंग्लिशशी बर्यापैकी नाते सांगू शकेल अशी जगातली एकुलती एक भाषा वेल्समध्ये मृतप्राय होत असलेली एक अत्यल्पसंख्य उपभाषा आहे.
चारशे वर्षांपूर्वीपर्यंत खुद्द इंग्लिश राजेरजवाडे इंग्लिश भाषा वापरणे गावंढळपणाचे लक्षण समजत असत आणि इंग्लंडचा सगळा राज्यकारभार फ्रेंचमधून चालत असे.
वसाहतीच्या कालखंडात आणि नंतरही इंग्लिशने भारतिय भाषांकडून अनेक शब्द उचलले आहेत. योगा (योग नै बरं का), कर्मा (कर्म माझे !), गुरु, इ शब्द (विदेशी आणि भारतिय) गोरे इंग्लिशमध्ये कित्ती कित्ती कौतुकाने वापरतात हे काय सांगायला पाहिजे आहे काय? ;)
इंग्रजांनी जगभरातून केवळ आर्थिक संपत्तीच लुटली असे नाही तर अगदी आफ्रिकन भाषांसह अनेक भाषांची शब्दसंपत्ती लुटून नेऊन इंग्लिशला शब्दसंपन्न केले आहे. येथे इंग्लिश्ने आत्मसात केलेल्या १४६ भाषांमधिल शेकडो शब्दांची अनुक्रमणिकेसह (अल्फाबेटीकल) यादी सापडेल.
डिक्शनरी.कॉम प्रमाणे सद्याच्या इंग्लिशमध्ये ८०% (होय, ऐशी टक्के) शब्द उसनवार घेतलेले आहेत. शास्त्रिय परिभाषा जमेस धरली तर ते प्रमाण ९०% पर्यंत वर जाउ शकेल. यामुळे ला इंग्लिशला उसनवार भाषा (बॉरोव्ड लँग्वेज) म्हटले जाते.
इंग्लिशची ही उसनवारी अजूनही सतत चालू आहे *. मात्र संवादासाठी जगात सर्वात जास्त वापरली वापरली जाणारी भाषा असल्याने हल्ली ती शब्द उसने घेण्याबरोबरच जगभरच्या भाषांना शब्द उसने देण्याचे काम प्राधान्याने करते आहे. ऑ
कोणत्याही दोन भाषांमधिल देवाणघेवाणीचा आवाका आणि त्याच्या प्रवाहाची दिशा त्या भाषांमु़ळे होणार्या तौलनिक आर्थिक, सामाजिक व राजकिय फायद्यांवर अबलंबून असतो... त्यांत भाषाशास्त्रींच्या अथवा भाषाभिमान्यांच्या काळजीने फारसा बदल पडत नाही, असाच अनुभव आहे.
तेव्हा, प्रयत्न कौतुकास्पद आहे पण, भौतीच दिलपे मत लेना भाय. ये सब पापी पेटका सवाल है ना ;)
======
* : हा छोटा दुवा मुळातूनच वाचावा. कारण, कुछ धक्के अच्छे होते है ।
नक्की मूळ इंग्लिश वाटणारे शब्द प्रत्यक्षात कोठून आले हे सत्य त्रिफळाचित करून जाते ('विकेट घेऊन जाते' असे म्हणण्याची इच्छा मोठ्या कष्टाने आवरली आहे हे नम्रतेने नमूद करत आहे ;) .
25 Jul 2014 - 8:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
मूळ भाषांतून इंग्लिश्मध्ये येताना बर्याच शब्दांची बर्यापैकी मोडतोड झालेली आहे... हेही नमूद करण्याजोगे आहे. वेंजॉय ;)
28 Jul 2014 - 6:32 pm | केदार-मिसळपाव
विलाज नाही त्याला.
1 Aug 2014 - 12:13 pm | मैत्र
खूप शब्द आहेत की इंग्रजीने घेतलेले..
मला फक्त juggernaut - जगन्नाथ (पुरीच्या रथ यात्रेवरून आलेला) शब्द माहीत होता.
तो रथ ओढण्यामुळे जो प्रचंड जोर - momentum येतो त्याचा संदर्भ इंग्रजांनी घेतला होता.
Guru / Pandit हे आता बर्यापैकी रुळले आहेत आणि बर्याच आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत सर्रास दिसतात.
पण तरीही भाषेचे मूळ व्याकरण चांगले सांभाळले आहे.
25 Jul 2014 - 8:29 pm | हुप्प्या
एखाद्या भाषेने दुसर्या भाषेतून शब्द उसने घेतले तर त्याला लुटून नेणे म्हणणे कितपत योग्य आहे? असे केल्याने मूळ भाषेतले ते शब्द नष्ट होतात का? मला नाही वाटत. इंग्रजीने मराठीतून मुंगुस नेले म्हणून मराठी माणसे तो प्राणी दिसताच डोके खाजवू लागतात का की माझ्या पणजोबांपर्यंत ह्याला काय म्हणतात ते ठाऊक होते पण शिंचे इंग्रज आल्यापासून तो शब्दच गायब झाला आहे?
असो. पण इंग्रजीचे पावित्र्य जपण्याची अनाठायी उठाठेव उच्चभ्रू भारतीयांनी थोडी कमी करावी. एखाद्या सासूने सुनेकडे घराण्याचे कुळाचार जपण्याची जबाबदारी द्यावी आणि जबाबदार सुनेने ती अगदी डोळ्यात तेल घालून पार पाडावी तसे इंग्रजांनी आपल्याला इंग्रजी भाषा दिली आहे आणि ती कसोशीने जपली पाहिजे असे मानणे हे एक खूळ आहे. ते सोडावे.
25 Jul 2014 - 10:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
"लुटून नेणे" हा वसाहतवादाच्या संदर्भाबरोबर सहज आलेला शब्दप्रयोग होता. शिवाय सगळी चर्चा जरा उपरोध्/विनोदाच्या अंगाने चालली आहे. माझ्याही प्रतिसादात बर्याच स्मायल्या आहेत :)
शिवाय, मी कधी म्हटले आहे की इंग्लिश्ची मोडतोड करू नये ? किंबहुना, शब्द एका भाषेतून जाताना बदलणे हे दोन भाषांतील फरकामुळे बर्याचदा होते. तुमच्या प्रतिसादाच्या 'एक्झॅक्ट सेम' वेळेवर दिलेला माझा हा दुसरा प्रतिसाद वाचला तर माझे मत अजून 'क्लियर' होईल ;)
तेव्हा मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे, दिलपे मत लो, वेंजॉय द धागा ;)
25 Jul 2014 - 10:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
...तुमच्या प्रतिसादाच्या 'एक्झॅक्ट सेम' वेळेवर दिलेला माझा हा दुसरा प्रतिसाद वाचला तर माझे मत अजून 'क्लियर' होईल.
(मिपाच्या चालू-बंद मधे वरची लिंक माझ्या प्रतिसादात मागे राहून गेली... ती येथे आहे.)
25 Jul 2014 - 11:11 pm | हुप्प्या
शब्द लुटणे ह्याविषयीचे स्पष्टीकरण मान्य.
भाषा जपण्याबद्दलचा सल्ला तुम्हाला नव्हता. लेखाच्या लेखकाला होता. अमुक एका शब्दाऐवजी तमुक शब्द वापरला तोही इंग्रजीत म्हणून त्याची कीव करण्याची भाषा लेखक करतो आहे हे जरा मनोरंजक वाटले.
इंग्रजीचे जन्मस्थान असणारे इंग्लंड, तिथलेही लोक इंग्रजीच्या अधोगतीबद्दल इतके दक्ष नसतील असे काही वेळा वाटते.
बाटगे जास्त कडवे असतात अशा अर्थाची एक म्हण आठवली. पण निदान आठवडाभर तरी ती तशीच्या तशी उद्धृत करणे उचित नाही. ;-).
28 Jul 2014 - 11:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
इंग्रजीचे जन्मस्थान असणारे इंग्लंड, तिथलेही लोक इंग्रजीच्या अधोगतीबद्दल इतके दक्ष नसतील असे काही वेळा वाटते.
ते इतके दक्ष अजिबात नाहीत हे स्वानुभावावरून सांगू शकतो... काहिंचे इंग्लिश उच्चार ऐकून इंग्लंडच्या राणीला चक्कर येईल... अर्थात "क्विन्स इंग्लिश" बोलणार्यांचे प्रमाण मराठी माणसांत पुणेरी मराठी बोलणार्यांइतकेच असावे, कारण भाषा दर २० किलोमीटरवर बदलते या नियमाला इंग्लिशही अपवाद नाही.
25 Jul 2014 - 8:17 pm | हुप्प्या
अमेरिकेत रांग ह्या अर्थी क्यू हा शब्द सहसा वापरत नाहीत. क्यू हा शब्द त्या अर्थाने ब्रिटनमधे वापरला जातो. अर्थाने तिथे लाईन हा शब्दच वापरला जातो. कुणी वापरला तर अमेरिकन लोक गोंधळात पडतात. क्यू हा बिलियर्ड्स वा पूल खेळताना टेबलावरील चेंडूला ढकलायची काठी ह्या अर्थी जास्त प्रचलित आहे. अर्थात त्याचे स्पेलिंग वेगळे आहे पण बोलताना स्पेलिंगपेक्षा उच्चार जास्त महत्त्वाचा असतो.
तस्मात, क्यू न म्हणता लाईन म्हणणार्यांची कीव करणार असाल तर तमाम अमेरिकन लोकांची कीव करण्याची तयारी ठेवा!
26 Jul 2014 - 1:16 am | सोनू
माझ्यामते त्यांचा आक्षेप लाईन ला नसून लायनी या बहूवचनाला आहे.
25 Jul 2014 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
गोरा साहेब तेच करतो हो,
'मुंबई'चं 'बॉम्बे' करतो,
'खडकी'चं 'किरकी' करतो,
'कोलकाता'चं 'कॅलकत्ता' करतो,
'हरी'चं 'हॅरी' करतो,
'योग'चं 'योगा' करतो, वगैरे वगैर...
आणि आम्ही कौतूक करतो *sad*
मग, जरा करूद्याना आपल्या लोकांना विंग्लिश्ची तोडफोड... तेवढाच आपला रिव्हेंज ;)
28 Jul 2014 - 6:04 pm | स्वाती दिनेश
पारींचं पॅरिस करतो,
फिरेन्झचं फ्लॉरेन्स करतो,
रोमाचं रोम करतो,
म्युनशनंचं म्युनिक नाहीतर म्युनिच करतो,
क्योल्नचं कलोन करतो..
यादी न संपणारी आहे..
25 Jul 2014 - 9:59 pm | स्पा
रम्य चर्चा
25 Jul 2014 - 10:31 pm | कवितानागेश
रम्य ही स्वर्गाहूनि चर्चा........ :)
25 Jul 2014 - 10:30 pm | मयुरा गुप्ते
आम्ही कि नाही इथे 'वालमार्टात' जाउन मग मुलांनी खुपच दंगा केला की 'पार्कात' जातो. आणि की नाही आम्ही तो 'मल्टी बिलियन'डॉलर्स खर्चुन केलेला 'अवतार'च बघितला. तर लेकीने मला थोडं सुधारवायचा प्रयत्न केला..'अवतार' नाही काय्...'अॅवटार'..मग बाकी आम्ही माय मराठीतच कान उघडणी केली...गधडे, तुझ्या अॅवटार वाल्यांच्या नानाची टांग्.शाळेमध्ये अधुन मधुन 'पजामा डे' असतो, तेव्हा आपला रात्री झोपयचा पायजमा (हा नक्कि मुळ मराठी शब्द नाहीये, जाणकार माहिती देतीलच) घालुन पाठवतो.
बाकी प्रतिक्रिया नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.
-मयुरा.
26 Jul 2014 - 12:11 am | बॅटमॅन
हाण तेजायला...जबरीच ओ =))
28 Jul 2014 - 6:28 pm | केदार-मिसळपाव
हा पोषाख बायजाबा नावाच्या स्त्री ने शिवला होता. तो ईंग्रजांना आवडला नी त्यांनी त्याचे पायजामा केले.
हा.का.ना.का.
25 Jul 2014 - 10:59 pm | धन्या
>> त्याला हास्पिटलात न्हेलंत.
>> तिजी कालच डिलेव्री झाली.
>> आला म्हॉटा झ्याटमीन शिकवायला.
>> शील्याब टाकून घ्या.
>> काल रात्री लाईट गेली व्हती.
>> बलप लय डीम झालाय, बदलून टाका. नायतं टुबंच लावा ना.
>> ए पॉरा, त्या जांग्यावर प्यांड घाल. तसाच फिरु नुको.
>> मना बुलू रंगाचा शरट हावा.
>> मना फुल्प्यांड पायजे. मी हाप्प्यांड नाय घालनार जा.
>> ये पॉरा, ज्याम धर नाय तं कुटरवरना पडशील.
>> ट्याक्टर घ्यातलाय आज दोन तासांना. नांगार काय परवाडताय.
>> ती चक्की विलेक्टीक वर चालते.
क्रमशः ;)
28 Jul 2014 - 5:57 pm | शिद
आमच्या गावाकडच्या भाषेत अतिशहाण्या माणसाला थोड्याफार अश्याच शब्दांत सुनवतात - ह्यो आयलो मोठो झाटलीमन...गप बह.
28 Jul 2014 - 11:06 pm | वामन देशमुख
आला म्हॉटा झ्याटमीन शिकवायला.आला
हे मला खरंच कळलं नाही.
इस्कटून सांगाव वो :)
28 Jul 2014 - 11:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
तेन्ला जंटल्मेंटल म्हनायचंय ! =))
30 Jul 2014 - 8:09 pm | हाडक्या
झ्याटमीन म्हनल्याव तुमच्या मनात काय आलंय ते आमी वळकून हावो.. ;)
25 Jul 2014 - 11:11 pm | खटपट्या
व्हरांडा हा शब्द मराठी कि इंग्रजी ?
बाकी लक्ष्मी वरून लैक्मे झालेलं ऐकलं कुठंतरी
मदर फादर सुद्धा मातृ पितृ वरून घेतलंय हे खरं का ?
आम्ही पण क्रमश:
26 Jul 2014 - 1:29 am | तुमचा अभिषेक
मुंबईत लाखाला पेटी बोलतात आणि कोटीला खोका
शंभरच्या नोटेला कान बोलतात आणि पाचशेच्या नोटेला बापू..
डान्सबार या ईंग्रजी शब्दाला काय म्हणे तर छमछम ..
खंबा कशाला बोलतात हे जाणकारांना सांगायला नकोच,
आणि अश्यांना मग चपटी कशाला म्हणतात ते ही माहीत असेल..
सुपारी, कबूतर, घोडा, घंटा ... वाट लावली या अंडरवर्ल्डने मराठी आणि ईंग्लिश दोन्ही भाषांची :(
28 Jul 2014 - 7:01 pm | सरनौबत
एकदा आमचे इकोनोमिक्स चे मास्तर (मातृभाषा - अर्थातच हिंदी) म्हणाले मराठी फारच गमतीदार आहे. काहीही बोलतात. " आनंद मेला … पाहायला चला."
मी आणि मित्र मागच्या बाकावरून उभे राहिलो आणि म्हणालो …" गुर्जी !!!! ते मेला नाही …मेळा आहे…म्हणून दाखवा जरा आम्हाला जरा ' ळ ' !!!"
जीभ वळत नाही म्हणून मराठी गमतीदार काय ?
त्यानंतर नेहमीच आमच्यावर खार खाउन असायचे.
लोकमान्य टिळकांचे नावच बदलून टाकणारे हे लोक ( सर्व हिंदी लोक "तिलक" असे म्हणतात हे आपल्याला ठाऊक आहेच पण आपण नाही ).
यांना काय कपाळ मराठी कळणार.
28 Jul 2014 - 7:04 pm | सरनौबत
सर्व हिंदी लोक "तिलक" असे म्हणतात हे आपल्याला ठाऊक आहेच पण आपण काही नाही बोलत.....असे म्ह्णायचे होते
29 Jul 2014 - 12:05 am | डॉ सुहास म्हात्रे
उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे मुळाक्षर नाही... मराठीने ते दाक्षिणात्य (द्रविड) भाषांतून उचलले आहे... "ळ" संस्कृतमध्येही नाही !
यावरून, बाला (बाळा), काला (काळा), गोला (गोळा) असे बोलणार्या गावाकडच्या माणसाची कोणी चेष्टा करू लागला तर आम्ही त्याला 'ळ' ऐवजी 'ल' च्या वापरामुळे खेडवळ बोलिभाषा "तुपातल्या मराठीपेक्षा" संस्कृतच्या जास्त जवळ आहे, असा युक्तीवाद करून गारद करत असू ते आठवले ;)
29 Jul 2014 - 7:07 am | सुनील
आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति
आणखी काही उदाहरणे असू शकतील!
29 Jul 2014 - 12:56 pm | बॅटमॅन
ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् | होतारं रत्नधातमम् ||
-ऋग्वेद, मंडल पहिले, सूक्त पहिले, त्यातली पहिलीच ऋचा.
बाकी हे ळ वैदिक संस्कृतमध्ये होते. पाणिनीय संस्कृतमधून गायब झाले.
29 Jul 2014 - 1:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
ही ही ही... आमचा संस्कृतचा इतका गाढा अभ्यास नाही (अभ्यास नाही असे म्हटले तरी चालेल... अकरावी नंतर संस्कृतचा सहवास संपला :) ). पण आमचा तो युक्तीवाद ऐकून स्वतःला संस्कृतचे पंडित समजणारे गार पडत असत हे मात्र खरे.
(उगा शेखी मिरवणार्यांना गारद करण्यात मजा वाटणारा) ईए
29 Jul 2014 - 1:26 pm | बॅटमॅन
युक्तिवाद बाकी आहे मस्तच :)
30 Jul 2014 - 8:14 pm | हाडक्या
बाकी तुमची ही लगोलग संदर्भसहित उदाहरणे, श्लोक, ऋचा इत्यादि देण्याची पद्धत पाहून आम्ही लई जळतो बॅटमॅनराव..
(हो हो जळतो.!)
29 Jul 2014 - 10:00 pm | पिशी अबोली
वेदांमधील 'ळ' चे मूळ हा दीड शतक चाललेला वाद आहे. अजून संपला नाही आणि कधी संपणंही कठीण दिसतंय... :)
30 Jul 2014 - 5:09 pm | सरनौबत
ळ नाही पण ट आहे ना ? मग टिलक का नाही ?
29 Jul 2014 - 12:05 am | डॉ सुहास म्हात्रे
उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे मुळाक्षर नाही... मराठीने ते दाक्षिणात्य (द्रविड) भाषांतून उचलले आहे... "ळ" संस्कृतमध्येही नाही !
यावरून, बाला (बाळा), काला (काळा), गोला (गोळा) असे बोलणार्या गावाकडच्या माणसाची कोणी चेष्टा करू लागला तर आम्ही त्याला 'ळ' ऐवजी 'ल' च्या वापरामुळे खेडवळ बोलिभाषा "तुपातल्या मराठीपेक्षा" संस्कृतच्या जास्त जवळ आहे, असा युक्तीवाद करून गारद करत असू ते आठवले ;)
29 Jul 2014 - 12:40 am | यसवायजी
माझा एक मित्र बनियनला 'बनेन' आणी अंडरवेअरला 'अंडरवेल' म्हणायचा. :D
आम्ही 'ईश्टील' किंवा 'प्याश्टीक'च्या पेल्याला 'गिलास' म्हणतो.
सायकलला शायकल आणी क्रोसीनला क्रोशीन म्हणतो. टाईल्सला ष्टाईलच्या फरश्या म्हणतो.
काम्पुटर, किरकेट, ष्टंपा, बॅटा, बेल्सा, यष्टी, लज्गरी बस, वगैरे शब्द मराठीच आहेत.
29 Jul 2014 - 1:22 am | मराठे
बनियानला अंतर्बंडी आणि अंडरवेअरला अंतर्चड्डी असे दोन समर्पक शब्द आहेत! वापरा आणि खात्री करा!
29 Jul 2014 - 1:31 am | यसवायजी
वापरा आणि खात्री करा
काय वापरा म्हणताय? वापरतोच की. खात्री कसली करायची त्यात? :))
29 Jul 2014 - 12:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
ती तुमची "अंदरकी बात" असल्याने त्यांना माहित नसणे स्वाभाविक आहे ;)
30 Jul 2014 - 12:10 am | अत्रुप्त आत्मा
@अंतर्बंडी आणि अंडरवेअरला अंतर्चड्डी >>> अहो.. सरळ अंतर्वस्त्र म्हणा ना राव!
काय ते भयंकर शब्दां-तरण!
या वरून मि.पा.वर (आंम्ही-आणलेल्या.. ) एका शब्दभुभू'ची आठवण झाली.ते महाराज असल्या संस्कृतचं तूप सोडलेल्या मराठी शब्दांना - काढण्यात माहिर आहेत!
29 Jul 2014 - 7:40 pm | नाव आडनाव
फक्त दुधापासून बनवलेला चहा म्हणजे "पिव्वर" चहा, म्हणजे इंग्रजीतला "प्युअर" चहा :) पारनेर आणि नगरला हा शब्द बर्यापैकी वापरात आहे. माहित नाही बाकीच्या लोकांनी आइकलाय कि नाही.
30 Jul 2014 - 1:55 pm | बॅटमॅन
मिरजेतही हा शब्द ऐकला आहे.
30 Jul 2014 - 9:56 pm | धमाल मुलगा
"आमच्या येथे पिव्वर म्हैशीचे दूध मि़ळेल"
30 Jul 2014 - 9:26 am | vrushali n
बरेचदा पेशंट लोक खुप ब्लडींग (blooding) होत आहे,असे म्हणतात ,त्याची आठवण झाली
30 Jul 2014 - 2:34 pm | युगन्धरा@मिसलपाव
काहि लोक बनियनला "गंजीफ्रॉक" म्हणतात.....
1 Aug 2014 - 6:36 pm | रेवती
आमच्या कामवाल्या बाई कपडे धुताना आईला "बै, सगळ्यांच्या बनेलांना नीळ घालयची का?" असे विचारीत. त्या बनियनला बनेल म्हणत. आम्ही मुले त्या तसे म्हणायची वाट बघत असू, नंतर घोड्यासारखे खिंकाळून हसत असू.
आता यात हसण्यासारखे काय? अशा चेहर्याने त्या आमच्याकडे बघत असत.
2 Aug 2014 - 12:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
कदाचित त्या बाई हुशार असाव्यात आणि त्यांना त्या वाक्याआडून "सगळ्या बनेल पोरांच्या कपड्यांना नीळ घालायची का?" असे म्हणायचे असेल ;)
2 Aug 2014 - 10:54 pm | रेवती
होय, नक्कीच! :)
30 Jul 2014 - 10:23 pm | हुप्प्या
दोन्ही शब्द हे अमेरिकेत पूर्णपणे अगम्य आहेत. हे कुठून आले ते कुणी जाणकारच सांगू शकतील. पण ह्यातला कुठलातरी एक शब्द जास्त उच्चभ्रू इंग्रजी आहे असे मला वाटत नाही.
30 Jul 2014 - 10:30 pm | यसवायजी
विकी- Banyan
Banyan is also commonly used in present day Indian English and other countries in the Indian Subcontinent to mean "vest" ("undershirt" in American English).
31 Jul 2014 - 2:24 pm | माहितगार
(शब्दकोशात एंट्री करण्याच्यादृष्टीने) एखादा (नवा अथवा इतरभाषी) शब्द भाषेने स्विकारला आहे हे केव्हा समजावे ?
31 Jul 2014 - 3:11 pm | केदार-मिसळपाव
एखाद्या सार्वजनीक पत्रकात अथवा किमान तिन चार वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमात वापरला जातो.
उदा. गेलाबाजार हा शब्द मि गावात ऐकलाय तसेच मराठी वृत्तपत्रात तसेच अंतरजालावरही बघितलाय.
माझ्यामते हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे.
31 Jul 2014 - 9:14 pm | माहितगार
बरचसं पटतय.
31 Jul 2014 - 3:39 pm | मराठी कथालेखक
"नापास" ...हा शब्द ऐकला /वाचला (अगदी वृत्तपत्रातही वापरला जातो) की माझं टाळकं फिरतं ..
31 Jul 2014 - 3:58 pm | बॅटमॅन
सहनशक्तीच्या परीक्षेत नापास झाला म्हणायचे की तुम्ही ;)
31 Jul 2014 - 4:00 pm | मराठी कथालेखक
आणि वृत्तपत्रे अनुत्तीर्ण
31 Jul 2014 - 4:05 pm | बॅटमॅन
नापास हा शब्द जबर्या आहे. जसे पोष्टपोन वरून भारतीयांनी प्रीपोन हा नवा शब्द काढला तसाच पास वरून नापास काढला. लय आवडतो मला. अनुत्तीर्ण इ.इ. पाहिले की जीर्ण ठिगळांची आठवण येते.
1 Aug 2014 - 12:21 pm | मैत्र
मी अनेक वेळा लोकांना दुरुस्ती सांगत असतो की prepone असा शब्द नाहीये.
reschedule earlier म्हणा.
८०% वेळा लोक आपल्यालाच हसतात.
1 Aug 2014 - 4:28 pm | हाडक्या
हे पहा..
http://www.oxforddictionaries.com/definition/english/prepone
जरी उगम भारतीय इंग्लिश मधून असला तरी आता प्रमाणित इंग्लिश भाषेने हा शब्द स्वीकारला आहे, तेव्हा लोकांना दुरुस्ती सांगणे थांबवलेत तरी चालेल.
1 Aug 2014 - 4:43 pm | बाळ सप्रे
असच updation ह देखिल शब्द स्वीकारावा. अजुन स्वीकारला नाहिये.
1 Aug 2014 - 10:16 am | हुप्प्या
बेलाशक हा शब्द बघा. बे हा फारसी उपसर्ग विना ह्या अर्थी वापरला जातो. उदा. बेइज्जत, बेमुर्वत, बेईमान वगैरे.
पण ला हा अरबी उपसर्ग त्याच अर्थाचा आहे. उदा. लावारिस. आता हे दोन उपसर्ग शक ह्या शब्दाला लावून एक धेडगुजरी शब्द बनवला आहे.
तीच गोष्ट बेमालूमची. बे हा फारसी. मालूम हा अरबी इल्म वरून आलेला शब्द. तोही धेडगुजरीच.
ताकदवान ह्यात ताकद हा बहुधा फारसी. पण वान हा धनवान, शक्तीवान अशापैकी संस्कृतजन्य.
नापास शब्द खुपण्याचे कारण काय? पास हा शब्द इंग्रजी आहे आणि तो सोवळा असावा अशी तीव्र इच्छा की अजून काही?
31 Jul 2014 - 4:04 pm | हाडक्या
हे 'मकाले' शतकी खेळीशिवाय थांबतच नाय बाब्बो.. आता पण द्विशतक आलेच की.
31 Jul 2014 - 4:26 pm | मराठी कथालेखक
पण त्यात माझं योगदान कमीच... इथे वेगळाच वाद रंगला (आता थंड झाला बहुधा) आणि द्विशतक झाले.
31 Jul 2014 - 4:20 pm | शिद
२००...!!!
1 Aug 2014 - 12:48 pm | मैत्र
१. आमच्या कडे वीज गेली हे मराठीत / हिंदी मध्ये -- करंट नाहीये.. करंट आया क्या? असं म्हटलं जाते. ते जास्त सयुक्तिक वाटतं
२. आजही ओळख करून देताना उलट सांगायची वेळ आली -- "मी हिचा नवरा" तर काहीतरी भाषिक चूक वाटते. मग इंग्रजीच्या आधाराने I am her husband किंवा she is my wife हे सोपं पडतं
३. ग्रीक मित्रांशी बोलताना अनेक शब्द आपल्या वापराशी साधर्म्य असलेले सापडले. तेव्हा लिहून ठेवलं नाही म्हणून लक्षात नाही. पण आश्चर्यकारक साम्य आहे.
४. सावरकरांचे मुद्दे बाजूला ठेवले तर आज सर्वमान्य झालेले महापौर संपादक वगैरे शब्द आता योग्य वाटतात जे प्रचलित इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी पर्याय आहेत. तहसीलदार हा शब्द वापरात असताना प्रांताधिकारी त्यांनी आणला वगैरे थोडा ओढून ताणून केलेला मुद्दा वाटतो (आळशांच्या राजांना विचारायला हवं की उत्तर भारतात प्रांत शब्द आहे का आणि तिथेही तो सावरकरांनी नेला का?)
पोस्टाला' डाक, असा शब्द सावरकरांनी शोधला -- मग काय अखंड उत्तर भारतीयांनी तो सावरकरांपासून प्रेरणा घेऊन गावागावात नेला का? (आठवा डाकिया डाक लाया)..
असो..
५. bicycle ला सायकल. प्रत्येक ठिकाणी सवयीने शब्द वापरला जातो. युरोपात सायकलला बाईक आणि आपण ज्याला बाईक म्हणतो त्याला मोटरबाईक किंवा इतर शब्द वापरतात. बाईक ही बहुधा सायकलच असते - विशेषतः सायकलचा देश हॉलंड मध्ये. त्यामुळे त्या स्थानिक सोयीस्कर वापरात फार काही गैर आहे असं नाही.
1 Aug 2014 - 3:32 pm | बॅटमॅन
एकच लँग्वेज फ्यामिली असल्याने साम्य अपेक्षितच आहे.
पण ग्रीक अन संस्कृतमध्ये जरा जास्तीच सिमिल्यारिटी आहे खरी. ते मदर-मितेरा, फादर-पातेरास, इ. सोडलं तरी संस्कृत छाप वाटणारे कैक शब्द आहेत. अन जितक्या जुन्या ग्रीकमध्ये डोकावाल तितकं हे साम्य अधिक गहिरं होत जातं, उदा.
केंद्र-केंद्रो.
पात्रम्-पोतिरी.
पदम्- पॉदि.
पुरम्-पोलिस. (हे तर कॉग्नेटच आहेत.)
पत्नी-पोत्निया. (अर्थात हे प्राचीन ग्रीकमध्ये, अर्वाचीन नाही).
क्रीणाति-किरिआजो(बहुधा, लिनिअर बी लिपीत असा काहीसा फॉर्म आहे.) अर्थ आहे विकत घेणे.
ऋतम्- आरेते.
कीर्ती आणि क्लिऑस हेही कॉग्नेट आहेत. मतलब तोच- ऋलृयो: सावर्ण्यं या न्यायाने र-ल दोन्ही एकच धरल्या जातात.
असे कितीतरी शब्द तर सांगता येतीलच, पण ग्रीक व्याकरणाची रचनाही संस्कृतप्रमाणेच आहे. क्रियापदांचे ४ गण (संस्कृतात १०) आणि मॉडर्न ग्रीकमध्ये ३ विभक्त्या (प्राचीन ग्रीकमध्ये ८ विभक्त्या, अगदी संस्कृतप्रमाणेच. भरीस भर म्हणून द्विवचनही होते.) शिवाय मॉडर्न ग्रीकमध्ये स्ट्रेस अॅक्सेंट आहे तो प्राचीन ग्रीकमध्ये वैदिक संस्कृतसारखा टोन/पिज अॅक्सेंट होता. उगीच नाही त्या विल्यम जोन्सनं इंडोयुरोपियन भाषाकुळाची कल्पना मांडली! जितके पहाल तितकी साम्येच साम्ये आहेत. अन शब्द सोडून व्याक्रणातही आहेत हे लैच विशेष.
1 Aug 2014 - 4:39 pm | अनुप ढेरे
द्विवचन असलेली संस्कृत ही एकमेव भाषा आहे असं आमच्या एका संस्कृत शिक्षकांनी सांगितल्याचं स्मरतं. हे साम्य खूपच रोचक आहे.
1 Aug 2014 - 4:44 pm | बॅटमॅन
हे साम्य फक्त ग्रीकपुरतं मर्यादित नाही. इंडोयुरोपीय भाषाकुळातील कैक भाषांत ते आढळतं, उदा. लॅटिन आणि अवेस्ता ग्रंथातील 'अवेस्तन' या नावाने ओळखली जाणारी भाषा.
http://en.wikipedia.org/wiki/Dual_%28grammatical_number%29#Languages_wit...
वरील दुव्यात द्विवचन असलेल्या भाषांची लिष्ट मिळेल. जगातल्या बर्याच लँग्वेज फ्यामिल्यांत हा गुणधर्म आढळतो.
1 Aug 2014 - 6:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
अरेबीकमध्येही व्दिवचन आहे ! सर्वांना माहित असलेले बहरेन हे अल् बहर (समुद्र) चे व्दिवचन आहे. ते नाव त्या बेटांच्या दोन्ही बाजूला समुद्र आहे या संदर्भात आहे.
अल आयुन (एक डोळा), आयुनेन (दोन डोळे)
एकवचन, व्दिवचन आणि अनेकवच आधुनिक अरेबिकमध्येही नेहमी वापरले जाते.
2 Aug 2014 - 11:42 pm | हुप्प्या
नवरा हा शब्द नववर ह्यावरुन आला असावा. त्यामुळे काटेकोरपणे बोलायचे तर नवरा हा शब्द पती असा वापरणे चूक आहे. मी हिचा पती वा ही माझी बायको/पत्नी. फार ग्रामीण हवे असल्यास मी हिचा दादला असे म्हणता येईल.
बायसिकलला सायकल म्हणणे मला आजिबात म्हणजे आजिबातच चूक वाटत नाही.
क्यूला लाईन आणि लाईनचे लायनी असे अनेकवचन करणेही मला चूक वाटत नाही. लोक आपल्या भाषेच्या सोयीने शब्दांचे कंगोरे घासून नवे शब्द बनवतात. प्लॅटफॉर्म हा शब्द अत्यंत किचकट आहे त्याचा फलाट होतो तो अगदी सोपा आहे. ऑस्ट्रेलियात टूडे ला टूडाय म्हणतात तेही त्यातलेच. त्याचे मात्र कौतुक. एतद्देशीयांची मात्र अवहेलना.
भारतात (कदाचित महाराष्ट्रातच असेल) प्यांटीची चेन असे सर्रास म्हणतात. अमेरिकेत मात्र त्याला झिप (वा झिपर) म्हणतात. चेन आणि झिप हे समानार्थी आजिबात नाहीत. कदाचित इंग्लंडमधेही म्हणत असतील. कारण चेनचा डिक्शनरीतील अर्थ पाहिला तर झिप वा झिपर असा अर्थ मला तरी सापडला नाही.
पुण्यात पोहण्याच्या तलावाला ट्यांक म्हणतात. ते मला आता कमालीचे विचित्र वाटते. इंग्रजी शब्द हवाच असेल तर पूल असा सोपा शब्द आहे त्याऐवजी ट्यांक कशाला? त्या शब्दाचा मूळ अर्थ (पाण्याची) टाकी असा आहे.
(अर्थात ट्यांक म्हटल्याने इंग्रजीचे पावित्र्य भ्रष्ट होते वगैरे मी म्हणणार नाही!)
1 Aug 2014 - 7:25 pm | पिशी अबोली
नाही. आणि करणारही नाही. हे चुकीचे वापर आहेत असल्या गैरसमजांसाठी काहीतरी नक्कीच करेन.
आपण भाषा बोलतो म्हणजे काय वाट्टेल त्या पद्धतीने वाट्टेल ते बडबडत नसतो. आपल्या भाषेचा एक पॅटर्न आपल्या डोक्यात फिट्ट बसलेला असतो. त्यापलीकडे एका मर्यादेपुढे जाणं हा त्या भाषिकांसाठी एक वेगळा मानसिक ताण होऊ शकतो. म्हणून एखाद्या परकी भाषेतील शब्द आपल्या नकळत हळूहळू आपल्या भाषेत शिरकाव करतात तेव्हा आपल्या नकळतच ते आपल्या भाषेच्या त्या पॅटर्नमधे सामावले जातात. ध्वनिदृष्ट्या तर हे अगदी सहज होतेच. पण त्यांच्या अर्थ/ अर्थच्छटा यांच्यातही आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार काही ना काही बदल होतातच. हे काही मराठी-इंग्लिश च्या बाबतीतलं जगावेगळं उदाहरण नाही. जिथे दोन भाषा एकत्र नांदल्या/ नांदत आहेत तिथे हे होणारच. त्यापासून सुटकाच नाही. त्यामुळे हे चुकीचे वापर आहेत असे समजून महाराष्ट्रातील इंग्लिशच्या भवितव्याची चिंता करायची काही गरज नाही. अगदी कसलीतरी चिंता करायचीच असेल, तर मराठीच्या अनेक बोलींची चिंता करा..
2 Aug 2014 - 12:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
मराठी न येणार्या संस्कृत पंडीताला "अपरोक्ष" या शब्दाचा मराठीतला "प्रमाण अर्थ" सांगीतला तर घेरी येईल असे वाटते ;)
10 Aug 2014 - 11:27 pm | मराठी कथालेखक
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मी प्रतिसाद देत आहे..
मला वाटतंय मला जे म्हणायचं होतं ते नेमकं स्पष्ट झालं नाही बहुधा (काही प्रतिसादांवरुन असं वाटतंय)
इंग्रजीच्या किंवा मराठीच्या शुध्दतेच्या आग्रहातून मी हा धागा काढला नाहीये.
मला इतकंच म्हणायचंय की , एखाद्या इंग्रजी वाक्यात X हा इंग्रजी शब्द वापरला जात असेल तर त्याच अर्थाचे मराठी वाक्य बोलताना क्ष हा मराठी शब्द वापरला जावा, किंवा एक्स हा इंग्रजी शब्द जसाच्या तसा उच्चारला गेला किंवा उचाराचा अपभ्रंश होवून येक्स, येक्श असे काही झाले तरी मी समजू शकतो. पण X या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून Y हा दुसराच इंग्रजी शब्द वापरला जातो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते.
11 Aug 2014 - 12:09 am | डॉ सुहास म्हात्रे
दुसर्या भाषेतला कुठला शब्द आपल्या भाषेत घ्यावा आणि तो कसा वापरावा हे भाषिक ठरवतात... प्रथम भाषा (शब्द आणि त्यांच्या वापराची पद्धत) बनते आणि नंतर व्याकरण (भाषेच्या आस्तित्वात असलेल्या वापरावरून बनलेले नियम) लिहीले जातात. हा प्रवास उलटा करणे असफल ठरते.
१०० वर्षे जुनी / ५० वर्षे जुनी / आताची मराठी (किंवा कोणतीही) भाषा पाहिल्यास हेच दिसेल.
पण X या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून Y हा दुसराच इंग्रजी शब्द वापरला जातो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते.
याचे चपखल उदाहरण वरच्याच प्रतिसादात दिलेले आहे. "अपरोक्ष" या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ आणि त्याचा मराठी अर्थ पाहिल्यास हे स्पष्ट होईल.
11 Aug 2014 - 11:08 pm | मराठी कथालेखक
अपरोक्षचा संस्कृत अर्थ मला माहीत नाही. तसाच तो अनेकांना माहित नसेल म्हणून काही घोळ होत असेल अशी शक्यता असू शकते. पण इंग्रजी जाणणारे, लिहणारे आणि बोलणारे मराठीतून तेच बोलताना जर X ऐवजी Y वापरत असतील तर नक्कीच मोठं आश्चर्य आहे ना.
म्हणजे "Yesterday I watched a movie. There was a huge queue for the ticket." असं छान बोलणाराच मराठीत बोलताना मात्र "मी काल पिक्चरला गेलो होतो.तिकीटासाठी मोठी लाईन होती." असं बोलतो तेव्हा आश्चर्य वाटतं
बाकी अपरोक्षच्या बाबत दुसरी शक्यताही असू शकते ती म्हणजे की एकच शब्द मराठी आणि संस्कृतमध्ये वेगवेगळ्या अर्थाने योगायोगाने असेल. जसे इंग्रजीत soon आहे आणि मराठीतही सून आहे *lol*
12 Aug 2014 - 2:06 am | डॉ सुहास म्हात्रे
मराठी : अपरोक्ष = नजरेआड किंवा अनुपस्थितीत (उदा: ही घटना माझ्या अपरोक्ष घडली.)
संस्कृत : अपरोक्ष = डोळ्यासमोर किंवा उपस्थितीत
29 Apr 2015 - 5:57 pm | आसुड
मधुमेह अस सध्या ऐकण्यात येत नाहि...'शुगर' शब्द सर्रास वापरला जातो
29 Apr 2015 - 9:48 pm | संदीप डांगे
धागाकर्त्याचा अभिनिवेश कळला पण सामान्य ज्ञान कमी पडते आहे असे जाणवलं. म्हणून.... :
१) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्याची 'कीव' कराविशी वाटते.
>> क्यु आणि लाईन हे दोन्ही शब्द पुर्णपणे बरोबर आहेत. त्याच चुकीचे काहीच नाही. लाईन शब्द वापरण्याचे कारण 'फॉल इन लाईन' हा इंग्रजी वाक्प्रचार असू शकतो. साहेबांनी नेटीवांना दरडावून दरडावून नागरी+लष्करी शिस्त लावण्याच्या प्रयत्नांचा अवशेष म्हणून 'क्यु' च्या ऐवजी लाईन शब्द प्रचलित झाला असेल.
२) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट'
>> थोडं भूतकाळात डोकावलं तर लाईट या शब्दाचा वीज या अर्थी वापर का सुरु झाला आणि तोच कसा बरोबर आहे हे लक्षात येईल. जेंव्हा वीज सर्वात प्रथम आली तेव्हा फक्त लाईट बल्ब वापरले जायचे. बाकीच्या उपकरणांचा शोधही लागला नव्हता किंवा तेवढा प्रचंड वापर होत नव्हता. लाईट बल्ब म्हणजे वीज असा सरळ अर्थ होता. त्यामुळे लाईट बल्ब चालू-बंद असणे हा वीजप्रवाह चालू-बंद असण्याचा पुरावा होता. म्हणून लाईट आले-गेले यालाच महत्त्व होते. वीज आली-गेली यापेक्षा लाईट आले-गेले असे म्हणणे त्याकाळात जास्त संयुक्तिक होते. तीच सवय पुढे कायम आहे.
३) Bicycle करिता 'सायकल'
>> बायसिकल करता बाईक किंवा सायकल हे शब्द सर्वत्र प्रचलित आहेत. जसे आपल्याला पल्सर, युनिकॉर्न सदृश्य वाहनांना मोटरसायकल न म्हणता बाईक म्हणतो आणि ते चुकीचे वाटत नाही तसेच सायकलला सायकल म्हणणे चुकीचे नाही.
४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी.
>> इंग्रजी पद्धतीत ओळख करून देण्याच्या परंपरेतून हे मिस्टर आणि मिसेस आले असेल. 'धिस इज मिस्टर एक्स अँड हि़ज वाईफ' म्हणण्याऐवजी 'धिस इज मिस्टर एक्स अँड मिसेस एक्स' असे म्हटले जायचे असे बघितले आहे. उंचावरून पाणी खालपर्यंत येता येता गढूळ होत जाते, भाषा, चालीरीती, परंपराही तशाच. माझे हजबंड किंवा माझी वाईफ म्हणण्यापेक्षा माझे मिस्टर अँड माझी मिसेस असे उल्लेखणे जास्त आदरयुक्त वाटत असेल. हा माझा नवरा किंवा ही माझी बायको म्हणण्यापेक्षा आमचे "हे" किंवा 'आमचे कुटूंब' म्हणणे जास्त आदरयुक्त वाटते तसे.
५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !!
>> झेरॉक्सच का, कोलगेट, बिसलेरी, जीप, मारुती इत्यादी पायोनिअर कंपन्यांची नावेच उत्पादनांची नावे म्हणून प्रसिद्ध होतात. तेही संयुक्तिक आहे. कारण दात घासायची पावडर/ब्रश, बॉटल्ड ड्रिंकिन्ग वॉटर/पिण्याचे पाण्याची बाटली, मुळ कागदपत्राची छायाप्रत असे दुकानदाराकडे जाऊन म्हणणे किंवा बोलीभाषेच्या जलद संभाषणात तीव्र गरजेच्या वेळी समोरच्याला समजेल अशा पद्धतीने सांगण्यासाठी किचकट आणि अव्यवहारी असते कधी कधी. तेही त्या उत्पादनांच्या अगदी सुरवातीच्या दिवसात फारच कठीण जेव्हा ती संकल्पनाच फार नवीन असते. जसे आपण आता इंटरनेटवर शोधाच्या ऐवजी गुगुलून बघा असे म्हणतो. कारण इंटरनेटवर शोधणे म्हणजेच गुगलचा वापर करणे असेच सर्वमान्य झाले आहे म्हणून.
६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं.
>> तो अभिप्रेत असलेला अर्थ इथे सांगितला असता तर बरं झालं असते. तुम्हाला माहित्ये तर जणांसी करावे शहाणे. असो. तुमच्या माहितीसाठी सांगतो. विशिष्ट पद्धतीने बनवतात असा ब्रेड हा खाण्याचा पदार्थ आहे. अक्षरशः शेकडो प्रकारचे ब्रेड जगात बनवले जातात. फक्त मैदाच नाही, तर बर्याच प्रकारच्या धान्यांच्या पिठापासून बनवतात. त्यातलाच पाव हा एक प्रकारचा ब्रेडच आहे. चपाती किंवा पोळी हा पण बेडच. आता तुम्ही मिल्क-ब्रेडलाच ब्रेड म्हणत असाल तर जाऊद्या.
७) Cinema/Movie साठी 'पिक्चर'
>> सिनेमा, मूव्ही, मोशन पिक्चर्स हे सर्व एकाच गोष्टीला म्हटले जाते. याचे अनेक प्रकार असतात. त्यातला एक फिचर फिल्म. फीचर फिल्म हा प्रकार सर्वात जास्त लोकप्रिय आहे. फिचर फिल्म म्हणजे ४० मिनिटांपेक्षा जास्त लांबीचे चित्रपट. एका शो च्या वेळेत चित्रगृहात दाखवले जाणार्या तीन ते चार छोट्या चित्रपटांपेक्षा जास्त लांबीचा व प्रमुख चित्रपट म्हणजे फिचर फिल्म. कमर्शियल फिल्म्स्/मूव्हीज्/सिनेमांचे वितरण व प्रसिद्धी करतांना त्यामुळे कोणती फिचर फिल्म आहे ते सांगावे लागत असे. त्यामुळे मुख्य चित्रपटास फिचर फिल्म असे संबोधन वापरायचे. त्यावरूनच अपभ्रंश होऊन फिचर चे पिक्चर झाले.
बाकी जाणकारांनी प्रकाश टाकावा...
30 Apr 2015 - 11:50 am | आदूबाळ
Going to the pictures असं जुन्या ब्रिटिश इंग्रजीत सिनेमा पाहायला जाण्यास म्हणत असत. "अव्वल इंग्रजी" अंगी बाणवण्याच्या तर्खडकरी जमान्यात pictures = चित्रपट असं हुच्चभ्रू समीकरण बनलं असावं.
फीचरचं पिक्चर झालं हा निष्कर्ष ओढूनताणून आणल्यासारखा वाटतो.
30 Apr 2015 - 1:01 pm | संदीप डांगे
ओह... असही आहे काय...
30 Apr 2015 - 12:02 pm | प्रमोद देर्देकर
या झेरॉक्सच का, कोलगेट, बिसलेरी, जीप, मारुती इत्यादी पायोनिअर कंपन्यांची नावेच उत्पादनांची नावे म्हणून प्रसिद्ध होतात. >>> हो सहमत आहे.
या विषयी अजुन एक उदाहरण म्हणजे कॅडबरीचे. जगात सर्वजणांस हा शब्द माहित आहे. पण एक आडणाव आहे हे कित्येक लोकांना माहिती नाही. आपण खातो ते चॉकलेट असते ते फक्त कॅडबरी कं चे की नेसलेचे की आणखी कुठल्या कं चे असो, म्हणताना मात्र मी कॅडबरी खातो असेच म्हणतात.
30 Apr 2015 - 2:19 pm | आदूबाळ
हल्ली तर कॅडबरीही कॅडबरीची नसते. कॅडबरीची मालकी आता क्राफ्ट फूड्स नावाच्या कंपनीकडे आहे.