मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत.
काही उदाहरणे देत आहे.
१) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्याची 'कीव' कराविशी वाटते.
२) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट'
३) Bicycle करिता 'सायकल'
४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी.
५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !!
६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं.
७) Cinema/Movie साठी 'पिक्चर'
तुम्हाला अजून असे कोणते शब्द आठवतात ? शब्दांचा हा चुकीचा वापर टाळावा निदान कमी व्हावा म्हणून काय करता येईल ?तुम्ही काही करता का ? तुम्ही निदान पुढच्या पिढीला अशा चुकीच्या वापरापासून परावृत्त करता का ?
प्रतिक्रिया
25 Jul 2014 - 4:54 pm | कवितानागेश
४ नंबरला मिष्टर आणि मिशेस असतं बरं का. :)
25 Jul 2014 - 5:02 pm | वामन देशमुख
नंतर सांगतो, आत्ता थोडा वीकनेसपणा आलाय!
25 Jul 2014 - 5:20 pm | मराठी कथालेखक
मग डॉक्टरना (किंवा डॉक्टरीणबाईंना) बोलवाकी हो
25 Jul 2014 - 5:25 pm | धन्या
कदाचित ते/त्या व्हिजीटला गेले/ल्या असतील. :)
25 Jul 2014 - 5:36 pm | वामन देशमुख
डॉक्टरीणबाईं
आमच्याकडे दवाखान्यात नोकरी करत असलेल्या लेडीज बायकांना "सिस्टरिणबाई" असं म्हणतात!
25 Jul 2014 - 5:06 pm | कविता१९७८
झेरॉक्सला मराठीत काय म्हणतात?
25 Jul 2014 - 5:10 pm | बाळ सप्रे
काही दुकानदार 'झेरोक्ष' लिहितात.
25 Jul 2014 - 5:15 pm | मराठी कथालेखक
Xerox ला इंग्रजीत पण Xerox नाही म्हणत हो !! Photocopy म्हणतात.
आपण मात्र Ricoh/Canon ई कोणत्याही मशिनवर Xerox काढत असतो.
पुढे कधी काळी ती Xerox कंपनी बंद पडली तरी भारतात मात्र तिचे अस्तित्व कायमच टिकून राहील !!
25 Jul 2014 - 5:17 pm | कविता१९७८
हो जसे मिनरल वॉटर ला बहुतेक सर्वजण बिसलरी म्हणतात.
25 Jul 2014 - 5:29 pm | वेल्लाभट
हो,
कुठल्याही एसयुव्ही ला जीप
25 Jul 2014 - 5:55 pm | आदूबाळ
मारूती ८००, मारूती १००० आणि जीप असे गाड्यांचे तीन प्रकार भेटतात.
2 Aug 2014 - 3:46 pm | शशिकांत ओक
भेटणे हे क्रियापद अनेक जण वापरताना तारतम्य बाळगत नाहीत. मला पेन किंवा असे वस्तु सुचक शब्द भेटत नाही. सापडते किंवा मिळते. जीवंत मानव एकमेकांशी भेटतो. निर्जीव वस्तूंसाठी हे क्रियापद वापरू नये असे वाटते.
11 Aug 2014 - 11:30 am | आदूबाळ
समजा मला रस्त्यात म्हैस दिसली. तर ती मिळाली, सापडली का भेटली?
11 Aug 2014 - 1:00 pm | प्रभाकर पेठकर
>>>>तर ती मिळाली, सापडली का भेटली?
म्हैस बेवारशी असेल आणि तुम्ही तिला पाळण्यासाठी आपल्या घरी नेलीत तर ती 'रस्त्यात मिळाली'.
जर आधीपासून तुमचीच असेल आणि हरवली असेल तर जेंव्हा ती दिसली तेंव्हा ती 'सापडली' म्हणता येईल.
'भेटली' म्हणण्यासाठी तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखणे अपेक्षित आहे. तसेच, दोघांनी थांबून एकमेकांशी कांही संभाषण करणे, भावनिक आदानप्रदान होणे आवश्यक आहे. तसे असेल तर ती 'भेट' म्हणता येईल. जसे, 'गेल्यावर्षी मी माझी गाय एका शेतकर्याला विकली. तीची आणि माझी काल रस्त्यात भेट झाली. तिने मला आणि मी तीला ओळखलं. मी तिच्या गळ्याखाली कुरुवाळलं, तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिने माझ्याकडे पाहून तिचं डोकं माझ्या अंगावर घासलं. आणि ओळख दर्शविली.' असे झाल्यावर तो माणूस घरी येऊन आपल्या घरच्यांना म्हणू शकतो 'अरे! आज मला रस्त्यात आपली 'आनंदी' किंवा 'कपिला' (जे नांव असेल ते) भेटली होती. तिने मला लगेच ओळखलं. खुप वाईट वाटलं रे आम्हा दोघांनाही.' वगैरे वगैरे.
अन्यथा एक गाय अथवा म्हैस 'दिसली' हेच योग्य होईल.
11 Aug 2014 - 1:52 pm | प्यारे१
म्हैस ऐवजी कुठला शब्द चालेल?
11 Aug 2014 - 1:57 pm | बाळ सप्रे
हेच लिहिणार होतो पण वेळ नाही 'भेटला'!!
12 Aug 2014 - 12:15 am | हुप्प्या
आपण सापडणे, भेटणे व मिळणे ह्यातील फरक उत्तमरित्या अधोरेखित केला आहे. परंतु मराठी भाषेच्या शुद्ध असण्याबद्दल लोकांमधे कमालीचे औदासिन्य आहे. पेन भेटले, बसचे तिकिट भेटले हे हिंदीत मिलना हे क्रियापद आहे त्याचे मराठीत केलेले कलम आहे.
" कल मुझे अपना पुराना दोस्त मिला था. " "कल मेरा फोन खो गया था, आज मिला." ह्यातील मिलना हे क्रियापद सजीव निर्जीव सगळ्यांकरता वापरले जाते म्हणून त्याचे मराठी रुप भेटणे हेही असेच सजीव वा निर्जीवांकरता वापरावे असा सोयिस्कर समज काही शॉर्टकट बहाद्दरांनी करुन घेतला आहे. कदाचित नागपूरसारख्या हिंदाळलेल्या मराठीतून हा शब्दप्रयोग मराठीत आला असेल.
मलाही सगळ्याला भेटणे म्हणणे चूक वाटते.
तोच प्रकार बोलणे व म्हणणे ह्यात होतो. "काल रमेश बोलला की सगळ्या लोकल लेट आहेत." ह्यात बोलला पेक्षा म्हणाला हे जास्त समर्पक आहे. पण इथेही बोलणे हेच क्रियापद सर्रास वापरले जाते.
11 Aug 2014 - 3:25 pm | कपिलमुनी
आमच्या मावळात लोकल भेटते, मोबाईल भेटतो , बस भेटते.. ;)
11 Aug 2014 - 4:27 pm | आदूबाळ
आमच्या शाळेत परीक्षेत मार्क पण भेटायचे.
11 Aug 2014 - 5:15 pm | प्यारे१
पाचगणीतल्या बर्याच विन्ग्रजी शाळेत जाणार्या पोरांच्या तोंडी 'रिमूव्ह प्रिंट/पेज' असं ऐकलंय.
प्रिन्ट निकाल, पेज निकाल वगैरे साठी.
बाकी तिथंही बर्याच जणांना मार्क भेटतात.
11 Aug 2014 - 5:37 pm | नाव आडनाव
उस्मानाबादच्या एका कॉलेजातल्या मास्तर आणि विद्यार्थी यांचा संवाद:
what my father's go - म्हणजे माय मराठीत माझ्या बापाचं काय जातंय
नगर कॉलेजच्या मास्तर आणि विद्यार्थ्यांचा संवाद:
you people are drinking cigarette under tree - तुम्ही लोक झाडाखाली उभे राहून सिगरेट पिताय :)
11 Aug 2014 - 9:24 pm | यसवायजी
शाळेतल्या पोरांचं सोडा. आमचा रिजनल हेड म्हणतो, "अरेSS रिमूव्ह सम टाईSSम, लेट्स डू इट ना.."
:))
11 Aug 2014 - 9:28 pm | मराठे
एका टायवाल्याचा दुसर्या टायवाल्याशी बसमधे ऐकलेला संवाद.. "हे, आय हॅव रिमूव्हड युवर टिकीट अल्सो हा!"
12 Aug 2014 - 6:01 am | खटपट्या
हसा चकटफू या कार्यक्रमात टायवाल्यासाठी चक्क "टायघाल्या" हा शब्द वापरला होता :)
25 Jul 2014 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
आणि कुठल्याही नूडलला "मॅग्गी"
26 Jul 2014 - 10:26 am | नाव आडनाव
टुथ्पेस्ट म्हणजे कोल्गेट :)
आयटी / सोफ़्टवेयर म्हणजे इन्फोसिस :)
माझ्या ओलखीचे एक काका आहेत त्यांनी मी फ्रेशर असताना विचारलं "काय रे कुठे नोकरी लागली तुला". मी सांगितलं "पर्सिस्टनट मध्ये". काका म्हणाले काय करते हे कंपनी. मी सांगितलं सोफ़्टवेयर बनवते. काका म्हणाले "अच्छा म्हणजे इन्फोसिस मध्ये नोकरी लागली तुला :) "
28 Jul 2014 - 3:59 pm | धन्या
हे इतकेही कॉमन नाही.
29 Jul 2014 - 7:58 pm | आदूबाळ
हे मी पण दोनतीन लोकांकडून ऐकलं आहे. बहुदा लोकांना "इन्फोटेक" म्हणजे "इन्फोसिस" वाटत असावं!
माझे एक दूरचे काका आहेत. त्यांनी मी दहावी पास झाल्यानंतर इन्फोसिस(?) हेच कसं बेष्ट करियर आहे हे परोपरीने पटवून द्यायचा प्रयत्न केला. चंद्रमोहन नावाच्या त्यांच्या मित्राची मुलगी तेव्हा टाटा इन्फोसिस मध्ये नुकतीच लागली होती. तिचं उदाहरण सारखं देत असत.
मी "जाणार नाही" हे निक्षून सांगितल्यावर "थू: तुझ्या जिंदगानीवर" असा चेहेरा करून बोलायला लागले. अजूनही बोलतात. टाटा इन्फोसिस मधली चंद्रमोहनची मुलगी आता मोठ्या पदावर आहे.
29 Jul 2014 - 8:31 pm | रेवती
हे वाचून माझ्या आजोबांची आठवण आली. आईचे वडील हे अल्फाबेटस वाचनापुरते इंग्रजी शिकले होते. माझी आई बी ए झाल्यावर त्यांना भयंकर अभिमान वगैरे वाटला होता. (ज्या काळी मुलींची १८ व्या वर्षी लग्ने होत त्याकाळी मुलीला बी ए होईतो शिकवणे आणि त्यावर टायपिंगच्या क्लासला घालणे हे म्हणजे अतिच समजत असत) ;)
पुढे अनेक वर्षांनी माझी मामेबहिण पेढे देऊन नमस्कार करून म्हणाली की "आजोबा मी बीई इलेक्ट्रॉनिक्स झाले"
त्यावर ते (वय ९५) म्हणाले "अरेरे! जुन्या काळी मी मुलीला बी ए केले आणि आज तू फक्त बीई झालीस, जरा ई पासून ए पर्यंत येण्यासारखा अभ्यास का नाही केलास?" आम्ही हसून लोळलो होतो. त्यावर "अचरट कार्टी" असा शेरा त्यांनी मारला. ;)
30 Jul 2014 - 12:57 am | डॉ सुहास म्हात्रे
जेव्हा साखर कारखानदारांनी आपल्या गावांत नवीन नवीन महाविद्यालये उघडणे सुरू केले त्यावेळेची गोष्ट आठवली. एका कारखान्याच्या चेअरमनने मोठ्या अभिमानाने प्राध्यापकांच्या मुलाखतीत भाग घेतला होता. एका उमेदवाराने आपले शिक्षण एम एस सी असे सांगितल्यावर चेर्मन सायबांनी, "पन मंग तुमी मॅट्रीक झाला का नाय ते सांगा अदुगर." असे म्हणून उमेदवारालाच नव्हे तर इतर मुलाखत घेणार्यांनाही गारद केले होते ! =))
30 Jul 2014 - 10:39 am | नानासाहेब नेफळे
काहीही खोटं सांगू नका ,आमच्या प महाराष्ट्रतल्या साखर कारखानदारानी पार युके जर्मनी युएसतल्या कंपन्यांशी करार करुन रिफाईन्ड शुगर, अल्कोहोल, कोजनरेशन प्रोजेक्ट उभारलेत ,ते इतका दूधखुळा प्रश्न विचारतील असे वाटत नाही...
30 Jul 2014 - 6:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्या वाक्याची सुरुवात वाचा हो पहिली, मग समजेल तो कोणता काळ होता ते... मग उचलली जीभ लावली टाळ्याला असे करून बेजबाबदार आरोप करण्याची प्रवृत्ती जरा तरी काबूत येईल असे वाटते (अर्थात हा आपला माझा आशावाद आहे).
मी सांगीतलेल्या काळात त्या विभागात मी स्वतः रुरल इंटर्नशीपसाठी ६ महिने राहिलो आहे. उस शेतकर्यांपासून ते अनेक स्तराच्या साखर कारखानदारांशी प्रत्यक्ष संबंध आणि बोलणे झालेले आहे... तीच गोष्ट महाविद्यालयात काम करणार्या प्रिंसिपल-प्राध्यापक वगैरेंबद्दल. हा किस्सा तेथे फार प्रसिद्ध झाला होता. तो तुम्हाला माहित नाही म्हणजे तुमचा पश्चिम महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीच्या इतिहासाचा अभ्यास कमी पडतोय असे दिसते ! खरा अभिमान असायला आधी अभ्यास जरूर आहे हे नमूद करावेसे वाटते.
मी पण पश्चिम महाराष्ट्राबद्दल अभिमान बाळगून आहे. पण फुक्या अभिमानाच्या लागणीने अस्मितेची गळवे होऊ नयेत इतके मानसिक स्वास्थ्य कमावून आहे. तुम्हालाही स्वास्थ्यासाठी अनेक शुभेच्छा ! :)
(तुमच्या आयडीचा एकंदर स्वभाव पाहता ही नुसती फुसकी काडी असण्याचा संभवही नाकारता येत नाही... तसे असले तर मग आम्ही खो...खो...खो असे हसलो आहे असे समजा. {हल्ली स्मायल्या गायब आहेत तेव्हा शब्दांवरच समाधान मानून घ्या :) ;) }
30 Jul 2014 - 6:57 pm | नानासाहेब नेफळे
माझे आजोबा एका कारखान्याचे डायरेक्टर होते व मी त्याच कारखान्याचा सभासद आहे
30 Jul 2014 - 6:58 pm | नानासाहेब नेफळे
ईस्पीकएक्का ऐकिव माहीती खरी नसते
30 Jul 2014 - 11:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
नानासायेब, आवो ही दंतकथा नाही तेथे प्रत्यक्ष हजर असलेल्या अनेक जणांकडून ऐकलेली आहे.
तुमच्या आजोबांचे माहिती नाही. पण एकापेक्षा जास्त कारखानदारांशी वैद्यकीय व्यवसायिक म्हणून वैयक्तीक स्तरावरही संबंध आलेला आहे. त्यावेळेस त्यांचे सर्वसामान्य ज्ञान आणि अचानक आलेल्या सधनतेचा असर असलेली वागणूक हे दोन्ही जवळून पाहिलेले आहे. तेव्हा याबाबत जास्त चर्चा न वाढवणे तुमच्याच फायद्याचे राहील असे वाटते ;)
30 Jul 2014 - 11:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
अजून काही... ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला त्या एकाच तालुक्यात त्या काळी पाच साखर कारखाने होते.
30 Jul 2014 - 11:59 pm | भीडस्त
श्रीरामपूर तालुका होता का तो???
30 Jul 2014 - 2:24 pm | भिंगरी
प्रत्येक नॉनस्टिक भांड्यांना निर्लेप
25 Jul 2014 - 6:27 pm | अनुप ढेरे
झेरॉक्स हे जेनेरिक टर्म होण्याच्या मार्गावर आहे. To xerox हे क्रियापद वेब्स्टरमध्येही आलेलं आहे.
http://www.merriam-webster.com/dictionary/xerox
अधिक माहितीसाठी हे वाचा.
http://en.wikipedia.org/wiki/Genericized_trademark
झेरॉक्स सध्या to xerox हे क्रियापद लोकांनी वापरू नये म्हणून प्रयत्न करत आहे. असे चालू राहिल्यास xerox हा शब्द त्या कंपनीच्या मालकीचा राहणार नाही.
http://en.wikipedia.org/wiki/Xerox#Trademark
29 Jul 2014 - 7:46 pm | संचित
हल्ली गुगल पण क्रियापद झाले आहे. त्याला गुगलची हरकत नाही का?
30 Jul 2014 - 10:46 am | अनुप ढेरे
गूगलही प्रचार करत आहे लोकांना 'टू गूगल' असं क्रियापद वापरण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी. जालावर अजून शोधले असता बँड-एड हेही जनेरीक झालेलं ब्रँड नेम आहे असं दिसलं. फोटोशॉपही त्याच मार्गावर आहे.
30 Jul 2014 - 1:53 pm | मराठी कथालेखक
असंही काही चालू आहे हे माहित नव्हतं. पण हे म्हणजे जनरेट्यामुळे अतिक्रमणे नियमित करण्यासारखं आहे.
25 Jul 2014 - 7:33 pm | अत्रुप्त आत्मा
@Photocopy म्हणतात. >>> (वि)शुद्ध मराठीत- छायाप्रत !
बराबर ना!? ;)
25 Jul 2014 - 5:07 pm | बॅटमॅन
काही चूक नाही त्यात. आपल्या भाषांची वाट लावणार्या त्या इंग्रजीची आपणही शक्य तितकी वाट लावलीच पाहिजे ;)
25 Jul 2014 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्यांची झोपडी आपण तोडलीच पाहिजे... ते करताना आपला बंगला मोडला तरी बेहत्तर ! ;) =))
25 Jul 2014 - 6:46 pm | बॅटमॅन
आपला बंगला आणि कशाला मोडतोय ओ? ज्याला झोपडी म्हटले जाते त्यांनाच अधिकृत करून बंगल्याचा पार्ट म्हणून आत घ्यायचे अन जरा रिनोव्हेषण केले की जंक्षाण कामच झालं की ओ ;)
30 Jul 2014 - 12:58 am | डॉ सुहास म्हात्रे
नाय पण मग रिवेंज घेण्यातली मजा कमी होते ना !
30 Jul 2014 - 7:44 pm | हाडक्या
हा हा हा ..
'रिवेंज' शब्दावर निषेध नोंदवायला आलो होतो पण काँटेक्स्ट लक्षात आल्यावर लॉळ झालो..
30 Jul 2014 - 11:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
25 Jul 2014 - 7:30 pm | कवितानागेश
बाकीचे युरोपियन्स लावतात की वाट. आपल्यापेक्षा जास्त.
इतालियन किंवा स्पॅनिश लोकाम्शी इन्ग्लिश बोलताना खूप धमाल येते.
25 Jul 2014 - 7:33 pm | बॅटमॅन
सहमत. या पवित्र कार्यास आपणही हातभार लावावा इतकेच सुचवावयाचे आहे. ;)
26 Jul 2014 - 10:47 am | टवाळ कार्टा
+१११११११११११११११११११
30 Jul 2014 - 1:57 pm | मराठी कथालेखक
हरकत नाही , पण सध्या आपण नेमकी कशाची वाट लावत आहोत ? इंग्रजीची की मराठीचीच ? कारण इंग्रजीत लिहताना आपण
1) She is my wife
2) There was a huge queue at Cinema
3) The movie was damn good
असं बरोबरच लिहतो.
30 Jul 2014 - 2:06 pm | बॅटमॅन
इंग्रजीही इंडियनिझम आणून आपण बिघडवत आहोतच की. असो.
30 Jul 2014 - 2:14 pm | केदार-मिसळपाव
इंग्रजी ही मुळातच अशुद्ध भाषा आहे. त्यात खुप्श खुपशे फ्रेंच, दॉईच आणि इतर बरेच शब्द आहेत. आपण एक एका अर्थाने ती भाषा अजुन समृद्धच करत आहोत. लै लिहिण्यासारखे आहे ह्या विषयावर.
30 Jul 2014 - 2:19 pm | बॅटमॅन
अर्थातच सहमत आहे.
मला इंग्रजीच्या तथाकथित शुद्धतेबद्दल आग्रही अन मातृभाषेबद्दल अनाग्रही लोक पाहिले की मजा वाटते त्यामुळे मजेने म्हटलो इतकेच.
30 Jul 2014 - 6:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
इंग्रज नविन शब्दांबद्दल किंवा एक/अनेक जुने शब्द वापरून बनवलेल्या शब्दांकडे "भाषा बिघडवली" या दृष्टीने बघतात असे वाटत नाही...
ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मोठ्या अभिमानाने दर वर्षी "न्यू वर्ड लिस्ट <वर्ष>" जाहीर करते / छापते... ही आहे २०१२ ची नविन शब्दसूची
अती सोवळेपणा न करता चपखल अर्थांचे नविन शब्द आत्मसात करणे हे इंग्लिश भाषा संपन्न बनण्याचे एक महत्वाचे कारण आहे असे वाटते. मुख्य म्हणजे असे करताना जगातल्या कोणत्याही भाषेतली आवक त्यांना निषिद्ध नाही असे दिसते.
30 Jul 2014 - 7:02 pm | रेवती
अती सोवळेपणा न करता चपखल अर्थांचे नविन शब्द आत्मसात करणे हे इंग्लिश भाषा संपन्न बनण्याचे एक महत्वाचे कारण आहे असे वाटते.
सहमत. पूर्वीही अशाच विषयाच्या धाग्यावर शांताबाई शेळके यांनी सांगितलेले विचार टंकले होते. जी भाषा काळाप्रमाणे बदलत जाते तीच टिकते अशा अर्थाने त्या म्हणाल्या होत्या.
30 Jul 2014 - 7:24 pm | नानासाहेब नेफळे
भाषाशुद्धी हाच दूधखुळा प्रकार आहे, एखाद्या नदीला जसे ओढे ओहोळ येऊन येऊन त्या नदीला समृद्ध करतात ,जर ओढे बंद केले तर नदीचे प्रवाहीपण बंद पडेल व डबके होऊन ती वास मारायला लागेल.तसेच भाषेचे आहे ,उदा- संस्कृत व पाली भाषा या असल्या खुळचटगिरीमुळे मरणासन्न झाल्या.
30 Jul 2014 - 7:33 pm | बॅटमॅन
आयला, म्हणजे गेल्या अडीच हजार वर्षांपासून संस्कृत मरणासन्न आहे होय? नवीनच शोध लागला, धन्यवाद बरं का नेफळेसाहेब.
30 Jul 2014 - 8:49 pm | नानासाहेब नेफळे
मागच्या अडीचहजार वर्षात कोणत्या कालखंडात लोक संस्कृतातून सर्रास बोलत होते, केव्हा ती बोलीभाषा होती ?
एखाद्या भाषेचे डॉक्युमेंटेशन आहे म्हणजे ती प्रचलीत भाषा आहे असा गैरसमज झाला आहे काय?
(माझा हा प्रतिसाद संस्कृतातून खरडून दावल्यास संस्कृतात अजूनही धुगधुगी आहे हे मान्य करु)
1 Aug 2014 - 7:09 pm | पिशी अबोली
गत द्विसहस्रवर्षेषु कस्मिन् काले जना: सर्वथा संस्कृतेन वार्तां कुर्वन्ति स्म, अपि च कदा सा लोकभाषा आसीत्? कस्याश्चित् भाषाया: केवलम् आलेखनं उपलब्धम्, अतः सा प्रचलिता भाषा, इत्येषा मिथ्यामति: किम्?
(ममेतद् प्रत्युत्तरं संस्कृतेन लिख्यते चेत् 'संस्कृतम् अद्यापि ऊर्जयते' इति अंगीकुर्मः|)
1 Aug 2014 - 7:19 pm | पिलीयन रायडर
पिशी आनी बॅटमॅन असताना (माइंड इट - बॅट्मॅन - काव्य वगैरे करतो तो संस्कृत मध्ये...) त्यांना असले भुक्कड चॅलेंजेस देणे म्हणजे... जौ दे...
अजुन बॅटमॅनाचे एखादे काव्य कसे आले नाही इथे..???
1 Aug 2014 - 7:22 pm | नानासाहेब नेफळे
ब्याट्या,म्याडमचे उत्तर क्रॉसचेक कर आणि सांग बरोबर आहे का.
1 Aug 2014 - 7:31 pm | पिशी अबोली
ऑ?? तुम्ही बॅटमॅनला सांगताय क्रॉसचेक करायला म्हणजे त्याला संस्कृत नक्की चांगलं येतं हे तुम्हीच मान्य करताय की.. म्हणजे संस्कृत उत्तम जाणणारी एक व्यक्ती इथे नक्कीच आहे हे तुम्हाला मान्यच आहे. आता माझा अनुवाद अगदी शून्य मार्क मिळवण्याजोगा असला, तरीही ते क्रॉसचेक करु शकणारा बॅटमॅन उत्तम संस्कृत जाणणारा आहे हे तुम्हाला मान्य असल्यामुळे संस्कृतमधे धुगधुगी आहे हेही तुम्हाला मान्य करावंच लागेल, हो ना नेफळेसाहेब?
1 Aug 2014 - 7:34 pm | धन्या
एकच मारा लेकीन सॉल्लीट मारा. :)
1 Aug 2014 - 7:49 pm | नानासाहेब नेफळे
ब्याटम्यानभाऊ फारच विश्लेषण करतात भाषेचं, लँग्वेज सिम्यानटीक्स ,फोनेटीक्स ,मॉर्फोलॉजी वगैरे वगैरे!
खरे तर त्यांनाच आव्हान केले होते पण त्यांनी सोईस्कर पळ का काढला ते समजले नाही, आता क्रॉस चेक करुन खरे खोटं सांगा, बघू जमते का त्यांना!!
1 Aug 2014 - 8:47 pm | यसवायजी
हा हा हा :D
ब्याट्या, पळ का काढला का च्यालेंज फाट्यावर मारलं बे ??
1 Aug 2014 - 9:05 pm | नाव आडनाव
नेफळे, तुम्ही बॅटमॅन साहेबांना परत आव्हान द्या आणि यावेळी तुम्ही हरले तर काय करणार हे पण लिहा - जसं हरलो तर नेफळे पुन्हा मिसळपाव वर दिसणार नाही :) आणि अजून एक, फक्त "नानासाहेब" नाही सगळेच "साहेब". इथे बाकीचे पण काही "साहेब" आहेत आणि ते सगळे नेफळेच आहेत हि आतली खबर माहित आहे सगळ्यांना.
1 Aug 2014 - 9:32 pm | नानासाहेब नेफळे
ब्याटोबाला आव्हान दिले तेव्हा ते बर्याच वेळ ऑनलाईन होते,दुसर्या दिवशीही याच धाग्यावर होते, परंतु फिरकले नाहीत ,बहुधा बराच खटाटोप करुनही जमले नसावे ,मग अबोलीताईंना धाडले असावे.
असो ,चार भुक्कड ओळीच्या संस्कृत भाषांतराला मिपासारख्या अग्रेसर संस्थळावर तीन दिवस लागतात यावरुन आम्ही काय समजायचे ते समजलो.
(तरीही उपरोक्त भाषांतर ग्राह्य मानतो व संस्कृतात धुगधुगी आहे हे मान्य करतो )
2 Aug 2014 - 11:17 am | मृत्युन्जय
बॅट्ञा आंजावर असताना सतत काकदृष्टीने तुमचे प्रतिसाद शोधत असतो आणि त्यामुळे तुम्ही प्रतिसाद टाकल्यावर त्याने लगेच उत्तर द्यावे असा गैरसमज झाला की काय तुमचा?
चार भुक्कड ओळीच्या संस्कृत भाषांतराला
तुम्ही भुक्कड लिहिले होते हे तुम्ही मान्य केले हे एक बरे झाले.
1 Aug 2014 - 8:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
आता "मी पडलो, पण मुद्दामच पडलो" असे दिव्य लॉजीक ऐकायची तयारी ठेवा ;) *lol*
1 Aug 2014 - 9:37 pm | नानासाहेब नेफळे
दिव्य लॉजीक ऐकायची तयारी ठेवा
म्हणजे मी लॉजीकने बोलतो हे तरी तुम्हास मान्य आहे, हे ही नसे थोडके.
2 Aug 2014 - 11:54 am | डॉ सुहास म्हात्रे
वा, वा ! तुमचे मराठीपण कच्चे असल्याचा पुरावा किती सहजपणे दिलात ! *lol* *lol* *lol*
असेच तुमच्या "दिव्य" प्रतिभेचे दर्शन देत आमचे मणोरंजण क्रत र्हा *dance4* *biggrin*
2 Aug 2014 - 11:14 am | मृत्युन्जय
कड्डक ठोकला आहे.
3 Aug 2014 - 1:37 am | बॅटमॅन
कडक!!!!
(मायला ह्यो धागा लैच पेटल्याला दिसतोय. जरा दुर्लक्षच झालं खरं.)
3 Aug 2014 - 12:35 am | बॅटमॅन
साधु साधु पिशीमहोदये, गद्योत्तरं खलु सम्यक् एव वर्तते!!
अनवान्तरम् - किन्तु विषयेऽस्मिन् जनै: यत्किञ्चिदपि लिखितं तत्तु महिषपृष्ठे प्रावृडिव व्यर्थमिति मन्ये |
3 Aug 2014 - 1:01 am | बॅटमॅन
पाणिनिकाले तु जना: संस्कृते वदन्ति स्म, गालिप्रदानमपि कुर्वन्ति स्म |
अर्थात् पाणिनिकाळात कैक ठिकाणी त्याने व्याकरण रचलेली संस्कृत भाषा प्रचलित होती हे अष्टाध्यायी न वाचता त्या ग्रंथाबद्दलचे इतरांचे जुजबी विकीस्टाईल लेख वाचूनही समजते. ते एक असोच.
अन पिशी अबोली यांचे भाषांतर अगदी अचूक अन नेमके आहे.
अन बाकी प्रतिसाद खालीलप्रमाणे.
पिशीमहोदया तु बहु सम्यक् उत्तरं दत्तवती, किन्तु नेफलेमहोदयस्तु ( पाणिनिप्रणीते संस्कृते 'ळ' कारो नास्ति चेत् ल-कारो एव प्रयुक्तोऽत्र |) केवलं संस्कृतद्वेषात् एव विगतबुद्धि: हतविवेकः इव प्रजल्पते | तस्मादेषः पद्योपहारः स्वीकरोतु भवान् |
संस्कृतं नाम वै किञ्चित् नास्ति, नासीत् कदाप्यहो |
नैषा नैसर्गिकी भाषा, यन्त्रवद् रचिता खलु ||१||
अधुना त्वेति जल्पन्ति येऽपि सर्वे मुहुर्मुहु: |
संस्कृतं ते न जानन्ति, न चापि प्राकृतादयः ||२||
यस्य कस्यापि जल्पोऽयं, येन केनापि मण्डितः|
यस्मै कस्मै कथित्वा तु, यद्वा तद्वा भवेत् खलु ||३||
एते सर्वे जनाश्चात्र वर्तन्ते ज्ञानिनो इव |
परं मनसि तेषां वै, सदैवात्र स्थितं खलु ||४||
" व्याकरणं न जानामि , नैव जानाम्यहं ध्वनीन् |
छन्दःशास्त्रं न जानामि, तथापि शृणुयु: जना: ||५||
ज्ञानहीनं द्वेषपूर्णं जल्पाम्यहमहो सदा |
मिथ्या वक्तुं सदा ह्यत्र तत्परोऽस्मि शुको इव ||६||"
कठोरोऽयं वाक्प्रहारो जनान् हि खलु बाधति |
इत्युक्ते "वाक्प्रहारो न, यथा बाधति बाधते" ||७||
एते संस्कृतद्वेष्टारः दयनीया: हि सर्वथा |
व्यासोक्तिस्तु दशां तेषां सम्यक्दर्शयते अहो!! (ऊर्ध्वबाहुर्विरोम्येष न कश्चिच्छृणोति माम् ;) ) ||८||
30 Jul 2014 - 7:45 pm | सुबोध खरे
संस्कृत व पाली भाषा या असल्या खुळचटगिरीमुळे मरणासन्न झाल्या.
मग ल्याटिन कशामुळे मरण पावली?
30 Jul 2014 - 8:43 pm | रेवती
अंशत: सहमत नानासाहेब!
31 Jul 2014 - 12:38 pm | मराठी कथालेखक
संस्कृत मरणासन्न झाली याच्याशी असहमत.
संस्कृत ही लॅब मधल्या प्रमाणित उपकरणे/मानकांप्रमाणे आहे. लॅब मधली प्रमाणित उपकरणे रोज वापरली जात नाहीत पण त्यांच्या मदतीने रोजच्या वापरातील उपकरणे तपासली /सुधारली जातात.
संस्कृतच्या संदर्भाने मराठीचे(व कदाचित हिंदी आणि इतर मराठी भाषादेखील) शुध्दीकरण /प्रमाणीकरण सोपे होत असावे असे मला वाटते. (अर्थात मी या विषयातला तज्ञ नाही. )
30 Jul 2014 - 7:08 pm | बॅटमॅन
अगदी बरोबरे ओ...जरा मजेने म्हटले होते, परमार्थेण न गृह्यतां वचः :)
25 Jul 2014 - 5:10 pm | कविता१९७८
मी तर इथे लोकांना चुकीची मराठी इंग्रजी वाक्ये बोलताना पाहते; शेजारणीला विचारलं मुलगी काय करते तर म्हणे ती स्लीप झाली. मी विचारलं कशी, लागलं नाही ना तर म्हणे स्लीप झाली म्हणजे झोपली, ह्या बाई एका झोपडपटटीत इंग्रजी शाळेत शिकवतात , त्या बिचार्या मुलांची दया आली हे ऐकुन.
30 Apr 2015 - 2:57 am | नगरीनिरंजन
घसरणे = स्लिप होणे हे चालते तर झोपणे = स्लीप होणे हे न चालायला काय कारण?
25 Jul 2014 - 5:11 pm | सूड
>>सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी.
न पेक्षा एजमान म्हणावें, कसें? बाकी आम्हीही फॉर अ चेंज लायनी, मेंबरं असं म्हणत असतो.
25 Jul 2014 - 5:32 pm | वामन देशमुख
एजमान
अहो, "एज-मान" असे म्हणून तुम्ही यजमानांच्या "वयमाना"चा सूड घेताहात का?
25 Jul 2014 - 5:18 pm | बॅटमॅन
शुद्ध मराठी बोला म्हटलं तर लोक अंगावर येतात, तेच शुद्ध इंग्लिश बोला म्हटलं तर कशी हांजी हांजी करतात ते पाहणं रोचक आहे. बरं हे फक्त रोजीरोटीमुळंच होतं असंही नाही. इंग्लिश=हुच्चभ्रू हे समीकरण तूर्तास असल्याने लोक हुच्चभ्रू दिसण्यासाठी कायपण म्हणून इंग्रजी बोलायचा प्रयत्न करतात. याच लोकांना मराठीच्या मुद्यावर हाड थू करताना पाहून बाकी चिकार करमणूक होते मात्र.
25 Jul 2014 - 5:30 pm | वेल्लाभट
सत्यवचन!
अक्कल काढावी अंगावर आल्यास.
25 Jul 2014 - 6:53 pm | धमाल मुलगा
>>शुद्ध मराठी बोला म्हटलं तर लोक अंगावर येतात
लै वाईट अनुभव येतात राव. आणि अनास्था पाहून तर आणखी वाईट वाटतं.
अवांतरः ह्यावरुन आठवलं, पुर्वी एकदा बाबासाहेब पुरंदर्यांसोबत फोटू काढला होता तो हापिसातल्या मित्रांना दाखवत होतो, त्यातलीच एक अतिशहाणी बया चित्कारली.."आयल्ला! एम.एफ.हुसेन? कुठे भेटले होते?" मी जागेवर फ्लॅट! कोण, काय वगैरे सविस्तर इस्काटून सांगितल्यावर म्हणे, "आमच्याकडं मराठीचं फार काही नसतं. त्यामुळं मला ठाऊक नाही बॉ!" हेच इंग्रजीबाबत नेमकं उलटं. थोडक्यात केवळ बोलणंच नव्हे, एकुणातच इंग्रजी=हुच्चभ्रू हे समीकरण भयंकर रुजलेलं आहे.
धाग्यासंदर्भात: माझी कवटी सरकवणारा असाच एक प्रकार म्हणजे - "अमुक अमुक एक्सपायर झाला." का? वारला/ देवाघरी गेला/मेला/मृत झाला/ निवर्तला/चचला/खपला/खेळ आटोपला असे सभ्य ते टवाळ सगळ्या मापात बसणारे इतके प्रतिशब्द आहेत मराठीत, ते वापरले तर हा वापरणारा काय खपतो का?
25 Jul 2014 - 7:00 pm | बॅटमॅन
बाबासाहेब पुरंदर्यांना एमेफ हुसेन समजणारी बया मराठी असेल तर तिला असांसदीय भाषेत सुनावायची आणि शेलक्या शब्दांत आहेर द्यायची इच्छा अनावर होतेय हे वाचून!!!!!!!!!!!!!!!!!!!!
बाकी एक्सपायरशी सहमत. जाणीवपूर्वक मराठीत काही बोललो तर अंगावर पाल पडल्यागत, काहीतरी अन्यदेशीय किंवा अन्यग्रहीय ऐकल्यागत चेहरा करतात ***चे. यांच्या ***ला *** करून *** *** ***********************!!!!!!!!
बरं हे प्रमाणभाषेबद्दलच असं, बोलीभाषा तर याहूनच जास्ती पाण्यात पाहिल्या जातात. आता मी मिरजेचा आहे, थोडा तिकडचा अॅक्सेंट येणारच की बोलण्यालिहिण्यात. तीच गोष्ट इतरांचीही त्यांच्या त्यांच्या बोलीभाषेबद्दल. पण बोलीभाषा म्हणजे काय एखादा आफ्रिकेतील जिराफ पहावा तसे पाहिल्यागत करतात-जणू आयुष्यात पैल्यांदा ऐकल्यागत. खरेच ऐकली नसेल तर ठीके ओ, पण असं काय नसतं. बोलीभाषा=गावंढळ आणि तो ट्याग त्यागायची अहमहमिका लागलेले हे रूटलेस***चे लोक, यांच्या ****************!!!!
25 Jul 2014 - 7:52 pm | धमाल मुलगा
बाई भागवत हे आडनाव धारण करीत असत.
अगदी अगदी! दूर कशाला? मिपावरच 'दिल्या जाईल', 'केल्या जाईल' वगैरे वैदर्भीय बोलीबद्दल कितीतरी तोंडसुख घेतलं गेलंच की.
>>बोलीभाषा=गावंढळ आणि तो ट्याग त्यागायची अहमहमिका लागलेले हे रूटलेस***चे लोक
क्या बात! क्या बात! तोडलंस भावा. जन्तेला चढत्या भाजणीत लाज वाटते; आपल्या गावाची, आपल्या प्रदेशातल्या बोलीची, मग महाराष्ट्राच्या मराठीची, मग भारताची.... मज्जाय सगळी. :)
30 Apr 2015 - 3:01 am | नगरीनिरंजन
इंग्रजीच्या ॲक्सेंट्सचं मात्र फार कौतुक. दोन-चार वर्षं ऑस्ट्रेलियात काढली की माइट (मेट), डाय (डे) असं बोलायला लागतात लगेच.
अशा लोकांच्या बौद्धिक पांगळेपणाचं मला आश्चर्य वाटतं.
25 Jul 2014 - 7:38 pm | लंबूटांग
;)
25 Jul 2014 - 7:48 pm | धमाल मुलगा
=)) =))
लंब्या... हालकटैस.
ह्या छिद्रान्वेषीपणाचे आभार मानतो आणि फ्लॅट हा उधारीचा शब्द मागे घेऊन उताणा हा शब्द वाचावा अशी नम्र इनंती करतो.
25 Jul 2014 - 7:48 pm | यशोधरा
कठीण आहे. परवा ऑफिसमध्येही एक जण म्हणे "वैसे तो कुछ लॅंग्वेजेस ऑड होती हैं, पर ये मराठी तो एकदम ही ऑड हैं, मुझे बोलना भी अच्छा नहीं लगता, यू नो!" आता हे ऐकल्यावर तिला शांतपणे विचारलं की तुला मराठी येते का बायो, कामचलाऊ तरी? समजते का? थोडीतरी? तर अर्थातच नाही असं उत्तर आलं. मग तिला सांगितलं की आधी भाषा शिक, मग त्यात प्रावीण्य मिळव आणि मग भाषेला ऑड वगैरे नावं ठेव. भाषाच येत नाही तर भाषा "ऑड" आहे हे क्सं काय ठरवलंस?
त्यानंतर काही काळ भयाण शांतता पसरली!
26 Jul 2014 - 10:16 am | नाव आडनाव
एकदा माझा म्यानेजर, जो कानपूर चा आहे, म्हणाला "मेरी बेटी भी मराठी बोल लेती है लेकिन मै नही सिखता हुं मराठी ". मला माहित होतं तरिही मी त्याला विचारलं - "आपकी बेटीकी उम्र क्या है." तो म्हणाला "६ महिने" तेंव्हा माझ्या मोठ्या मुलीचं वय होतं १० महिने आणि तिची मातृभाषा मराठी असूनही तिला ती बोलता येत नव्हती. खरंतर १ वर्ष पर्यंत बर्याच मुलांना कोणतीच भाषा येत नही. मग जर साहेबांच्या घरी मराठी बोलली जातंच नसेल तर साहेब कन्येला मराठी येते कशी आणि तेही ६ महिन्यनची असताना? असा प्रश्न विचारल्यानंतर साहेब दुसरा विषय घेऊन बोलू लागले. हीच फेकायची सवय बर्याच लोकांना असते, माझ्या म्यानेजर सारखी - आणि त्यांना तिथेच प्रश्न विचारून उताण पाडता येतं आणि मला तर असं करायला लई मज्जा वाटते :)
25 Jul 2014 - 5:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
'येथे पंचर काढून मिळेल' पाटी पूर्वी अनेकदा दिसायची.'थंड कोल्ड्रिंग येथे मिळेल'पाटी पूर्वी दिसायची.
25 Jul 2014 - 5:40 pm | कविता१९७८
मीसुद्धा 'येथे थंडगार कोल्ड्रींक मिळेल' अशा पाट्या वाचल्या आहेत.
25 Jul 2014 - 8:32 pm | प्रभाकर पेठकर
मी तर पुण्यात 'येथे पँटची चेन लावून मिळेल' असा फलक पाहिला आहे. तेंव्हा सकाळ सकाळ कचेरीत निघालेले अनेक पुरुष तिथे, पँटची चेन लावून घ्यायला, रांगेत उभे असतील असे विनोदी चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
कदाचित त्या शिंप्याला 'पँटला चेन लावून मिळेल' असे म्हणायचे असेल.
25 Jul 2014 - 8:40 pm | असंका
भारीच की..! काय कल्पना!!
:-))
25 Jul 2014 - 8:51 pm | नानासाहेब नेफळे
प्रमाणाचा अट्टाहास धरला कि असेच होणार...
बायदवे, तेलाची बाटली, आंब्याची टोपली , पाण्याचे भांडे, तुपाची वाटी यावरही आपले ज्ञानकिरण पाडावेत...
25 Jul 2014 - 10:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
आपण आपले अंग शर्टात घालत असताना "शर्ट अंगात घालणे" हा शब्दप्रयोग कसा काय वाटतो ? :)
28 Jul 2014 - 11:45 pm | यसवायजी
'पँटला चेन लावून मिळेल' असे म्हणायचे असेल.
का पायजम्याला साखळी? ;)
25 Jul 2014 - 5:37 pm | धन्या
आमच्या गाडीचा शॉकपसर खराब झाल्यामुळे धक्के बसत होते.
25 Jul 2014 - 5:43 pm | असंका
आपण पाव हा मराठीत लिहून ब्रेड इंग्रजीत bread लिहिला आहेत. पाव हा शब्द मराठी आहे असे सुचवायचे आहे का?
तुम्हाला एक कोडे घालू का?- ब्रेडला पोर्तुगीज भाषेत काय म्हणतात?
25 Jul 2014 - 6:05 pm | मराठी कथालेखक
हो. म्हणजे मी तरी तसेच समजतो ? चुकलाय का शब्द ? बाकी पोर्तुगीज शब्द माहित नाही.
खालील लिंक प्रमाणे "पांव" असा मराठी शब्द आहे.
http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%...
25 Jul 2014 - 6:12 pm | बॅटमॅन
पाव/पांव या शब्दाचा पूर्वज पोर्तुगीज़ मधला पाव हा शब्द आहे. पोर्तुगीज भाषेतून आलेले पण बहुतेकांच्या तसे गावीही नसलेले अजून काही शब्द खालीलप्रमाणे:
पगार, चावी, मेज, कमरा, बटाटा, इ.इ.
25 Jul 2014 - 6:24 pm | प्यारे१
अरबी भाषा बोलणारे अल्जिरियावाले लोक १३२ वर्षांच्या फ्रेंच राजवटीनंतरही वरील पोर्तुगिज शब्द वापरतात तर...!
मला हे फ्रेंच अथवा अरेबिक शब्द असावेत असं वाटत होतं.
दुकान, कानून, कायदा, ज्यादा, पेटी हे अरेबिक असावेत असा अंदाज आहे.
25 Jul 2014 - 6:34 pm | बॅटमॅन
हे शब्द पोर्तुगीज भाषेत आहेत एवढं नक्की- यद्यपि पोर्तुगीजनं उसनवारी केलेली असण्याची शक्यता दुर्लक्षून चालणार नाही, तूर्तास ते माहिती नाही त्यामुळे पोर्तुगीज असे म्हणतो.
सहमत, फक्त (हाही बादवे अरेबिकच शब्द आहे), अरबी की फारसी हे ठाऊक नाही, जाणकारांना (उदा. बिका, प्रपे, इ.) विचारलं पाहिजे. त्या दोन भाषांची आपसांत देवाणघेवाण बरीच झालेली असल्याने थोडे ट्रेनिंग मिळाल्याखेरीज एखादा शब्द मूळचा अरबी, फारसी की तुर्की हे कळणार नाही. इंड्यन माणसाला 'तिकडनं' आलेला शब्द इतकं पक्कं ठौक असतं, पण त्यापलीकडे नै. आणि असणार तरी कसं म्हणा.
25 Jul 2014 - 6:56 pm | नानासाहेब नेफळे
यावरुन आठवले,सावरकरांना मराठी भाषेवरचा फारसी प्रभाव नष्ट करायचा होता ,कारण अर्थात फारसी मुस्लिमांची भाषा होती व सावरकर हिंदुत्ववादी होते. त्यांच्याभाषेत 'भाषाशुद्धी'साठी त्यांनी मराठीचे' संस्कृतकरण 'करण्याचा घाट घातला होता. खास संस्कृत शब्द मराठीत दिले त्यांनी.
उदा- तारिख- दिनांक
तहसीलदार- प्रांताधिकारी
मैदान- क्रिडांगण
पगार- वेतन,ईत्यादी.
भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात ....
25 Jul 2014 - 7:00 pm | प्रसाद गोडबोले
असं कसं असं कसं ? तसं असतं तर नानासाहेब ह्या शब्दाला नानासाहेब पेशवे जे की तुमच्यालेखी जातीयवादी किंव्वा नानासाहेब फडणवीस जे की तुमच्या लेखी लंपट ह्यांच्या अस्मिता चिकटल्या नसत्या काय ?
तरीही तुम्ही नानासाहेब हा आयडी घेता ह्यावरुन अस्मिता चिकटणे वगैरे घडत नसावे असे वाटते *biggrin*
25 Jul 2014 - 7:13 pm | नानासाहेब नेफळे
नानासाहेबच्या उल्लेखावरुन आठवले ,'साहेब' या फारसी शब्दाला 'महोदय, असा कुणीही सध्या वापरत नसलेला शब्द सावरकरांनी शोधला होता,... आणि पेशवा हा ही फारसी शब्दच आहे ,त्याला काय म्हणायचे मग.... पुण्यस्वराज्य?????
28 Jul 2014 - 4:39 pm | चिगो
'महोदय' संसदेत वापरतात.. बाकी, "संसदीय" मराठी आणि हिंदी ऐकून / वाचून फेफरं यायला होतं, ही गोष्ट वेगळी..
25 Jul 2014 - 7:02 pm | बॅटमॅन
या बाबतीत सावरकर एकटेच अद्वितीय इ. नाहीत. सगळ्या जगभर असेच झालेले आहे. मराठीवरचा फारसी प्रभाव कमी करायला म्हणून तर शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोश बनवायला सांगितला ढुंढिराज व्यासांना. त्यातही पोलिटिकल-रिलिजियस अजेंडा होताच.
पण बाकी काही असो, सावरकरांचे प्रतिशब्द अतिशय चपखल आहेत. विनासायास रुळले- मराठीतच नव्हे, तर हिंदीतही.
25 Jul 2014 - 7:22 pm | नानासाहेब नेफळे
कुठे रुळलेत!!!!
आज तारिख कीती? असेच लोक विचारतात, आज कोणता दिनांक आहे? असे कुणीही विचारत नाही!!!
एखादा मोठा माणुस भेटल्यास ,नमस्कार साहेब' असे म्हणणारे कितीजण आहेत आणि नमस्कार महोदय, म्हणाणारे किती ????
पोस्टाला' डाक, असा शब्द सावरकरांनी शोधला, कितीजण डाक कार्यालयात जाउन येतात? आणि डाक कार्यालयातल्या अधिकार्याला काय म्हणायचे ,डाकाधिकारी????
25 Jul 2014 - 7:28 pm | बॅटमॅन
किमान लेखनात तरी बरेच रुळलेत हेही नसे थोडके.
25 Jul 2014 - 7:27 pm | नानासाहेब नेफळे
शिवाजींचा प्रयत्न जरी फारसीचा प्रभाव नष्ट करण्याचा असला तरीही संस्कृतकरण करण्याचा त्यांचा कोणताच अजेंडा नव्हता,याउलट संस्कृतकरणामागचे कारण उघड धार्मिक आहे आणि ते संस्कृतकरण बहुजनांच्या अंगवळणी पडत नाही....
25 Jul 2014 - 7:29 pm | बॅटमॅन
आयला हे बरंय. एकच गोष्ट केली, ती शिवाजीमहाराजांनी केली तर अजेंडा नाही अन सावरकरांनी केली तर मात्र अजेंडा? मज्जाच आहे की.
25 Jul 2014 - 7:37 pm | प्रसाद गोडबोले
हो ते तसंच आहे !
ह्याचं अजुन एक उदाहरण म्हणजे , आजारी पडल्याचं नाटक करुन , औरंगजेबाला मिनत्या विनंत्याकरुन महाराज आग्रातुन सुटतात तो मुत्सद्दीपणा आणी सावरकर माफीनामा देवुन अंदमानच्या सेल्युलर जेल मधुन सुटतात तो पळपुटेपणा !!
25 Jul 2014 - 7:48 pm | बॅटमॅन
आणि सावरकरांचा 'सा' उच्चारायची लायकी नसलेले नेभळट जालकेसरी जेव्हा माफीवीर इ.इ. मुक्ताफळे उधळू पाहतात तेव्हा तर चिक्क्कार मणोरञ्जण होते राव.
25 Jul 2014 - 7:52 pm | नानासाहेब नेफळे
हो ते तसंच आहे! आग्रातुन बुद्धीचातुर्याने निसटणे आणि नंतर स्वराज्याची रितसर निर्मिती करुन छत्रपती होणे व शेवटापर्यंत लढत राहणे..
याउलट..
प्रचंड 'मुत्सद्दीपणा' दाखवुन १९२१ नंतर घरी बसणे...
हो ते तसेच आहे.
25 Jul 2014 - 9:27 pm | प्रसाद गोडबोले
ह्यावरुन आपल्या अभ्यासाची पातळी कळाली ... आत्ता लक्षात येते की महाराष्ट्र शासनाने आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय का घेतला असावा ते )
25 Jul 2014 - 7:46 pm | नानासाहेब नेफळे
राजव्यवहारकोष म्हणजे राजकारभारातले त्यांचे ठराविक मायन्यातील शब्द लिहुन घेतले, त्यातही संस्कृतकरण केल्याचे दिसत नाही.
याउलट थेट सामन्यांच्या तोंडी असलेल्या भाषेत संस्कृत घुसडण्याचा प्रयत्न वेगळ्या वाटेने जाणारा होता, सामान्यांचे ज्या भाषेशी वावडे आहे तिचा पगडा बसवणे व राज्यव्हवहारकोष तयार करणे यातला फरक समजून घ्या! स्वतः शिवाजींची पत्रे बरीच फारसीप्रभावाखाली आहेत.
25 Jul 2014 - 7:54 pm | बॅटमॅन
नेफळेबुवा, राज्यव्यवहारकोष कधी वाचलात काय? की उचलली जीभ लावली टाळ्याला असंच करायचंय? माझ्याकडे आहे आणि वाचलाय म्हणून सांगतो. लेखनपद्धती पूर्णपणे संस्कृत धाटणीची करावी असा स्पष्ट उद्देश दिसतो- नव्हे, ग्रंथकारही तेच म्हणतो. घरी गेलो की ते श्लोक टंकतो.
अन महाराजांची पत्रे फारसीत आहेत ती राज्याभिषेकाअगोदरची, नंतरची सगळी पत्रे संस्कृत शब्दवालीच आहेत. बाकी सामान्यांच्या तोंडी संस्कृत घुसडू पाहत होते असं जरी मानलं तरी सामान्यांना अक्कल नको काय? की त्यामुळेच ते सामान्य ठरतात- कुणीही या आणि काहीही शिकवा, जसे शिकवेल तसे ओरडू?
25 Jul 2014 - 7:54 pm | प्रसाद गोडबोले
नेफळे राव तुम्ही अगदी मॅकोले चे आदर्ष सुपुत्र दिसता ! कारकुनी सिस्टीम मधुन तयार केलेले अन स्वकीयांपेक्षा परकीयांचाच अभिमान बाळगणारे !!
बाकी
सामान्यांचे एकेकाळी इंग्रजीशीही वावडे होते आणि बाबासाहेब म्हणाले की इंग्रजी हे वाघीणीचे दुध आहे ...पण बाबासाहेबांबद्दल
असे काही तुम्ही बोलु धजावणार नाही !
25 Jul 2014 - 8:07 pm | नानासाहेब नेफळे
बाबासाहेबांनी इंग्रजीचा प्रभाव बसवण्याचा प्रयत्न केला असल्यास तो स्त्युत्यच मानावा लागेल, इंग्रजी ही ख्रिस्तांची भाषा ,'अब्रह्म' वगैरे खुळचटगिरी त्यापाठी निश्चितच नव्हती...
वैश्विक भाषेतुन भारतीयांना ज्ञानाची कवाडे खुली व्हावीत हाच उदात्त उद्देश त्यामागे होता....
याऊलट चार पाच पोथ्या व स्त्रोत्रांच्या चवलिपावलीत येणार्या पुस्तकातली अगम्य व मरणासन्न संस्कृत भाषा स्वतःच्या धार्मिक मुलतत्ववादासाठी इतरांवर थोपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे यातला फरक लक्षात घ्या ,लक्षात कसा येईल? ,चष्मा काढा आधी.
25 Jul 2014 - 8:15 pm | धमाल मुलगा
पोथ्या, स्तोत्रं, धार्मिक मूलतत्ववाद आणि सावरकर हे एकत्र बांधलेलं पाहून हसावं की रडावं तेच कळेना!
शंका: सदरहू सदस्य ब्रिगेडच्या ब्रेनवॉशिंग सेशन्सला न चुकता हजेरी लावत असावेत की काय अशी शंका आल्यावाचून राहिली नाही.
25 Jul 2014 - 8:17 pm | बॅटमॅन
या शंकेत ब्रेनचे अस्तित्व गृहीत धरल्या गेले आहे असे वाटते. तस्मात गृहीतक तपासून पहावे अशी इणंती ;)
25 Jul 2014 - 8:24 pm | अत्रुप्त आत्मा
@या शंकेत ब्रेनचे अस्तित्व गृहीत धरल्या गेले आहे असे वाटते.>>>
30 Jul 2014 - 1:55 pm | मृत्युन्जय
भें** बा***. साल्या तु १०० नंबरी पुणेकर आहेस (नसलास तरीही). किमान शब्दात कमाल अपमान करण्याची लय भारी कुवत आहे तुझ्यात.
31 Jul 2014 - 12:00 am | डॉ सुहास म्हात्रे
31 Jul 2014 - 12:01 am | डॉ सुहास म्हात्रे
25 Jul 2014 - 8:21 pm | यशोधरा
सावरकरांचं नाव घेतलं की कसं जबरदस्त वाटत आसंल राव, मी सावरकरांच्या चुका काढतो/ ते वगैरे. तुमास्नी इतकं कळंना! छ्या! ;)
25 Jul 2014 - 8:28 pm | नानासाहेब नेफळे
यशुताई,'जबरदस्त' हा फारसी शब्द आहे ,"विस्मयकारक" वगैरे संस्कृत शब्द वापरा :-P
25 Jul 2014 - 8:30 pm | यशोधरा
अर्थ बदलतो म्हाराजा. :)
1 Aug 2014 - 10:11 am | हुप्प्या
जबरदस्त हा फारसी नव्हे. जबर हा जब्बार ह्या अरबी शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ सर्वशक्तीमान असा आहे.
दस्त म्हणजे हात. तो मात्र फारसी आहे. पण तो संस्कृत हस्तचा भाऊ आहे.
जबरदस्त हा सरमिसळ केलेला शब्द आहे.
1 Aug 2014 - 11:16 am | डॉ सुहास म्हात्रे
इतके सिरियस स्पष्टीकरण श्रीमती नानासाहेबांच्या डोक्यावरून गेले असणार ;)
त्यांना विचार न करता काहीपण शेरे मारायची सवय आहे ! :)
1 Aug 2014 - 11:26 am | बाळ सप्रे
शेरे मारायची सवय आहे खरी त्यांना.. पण गेल्या काही दिवसात काही प्रतिसाद नोंद घेण्यालायक आहेत.
आणि तसंपण शेरे मारण्याची सवय बर्याच मिपाकरांना आहे..
सो डोन्ट राइट हिम ऑफ!!
1 Aug 2014 - 11:30 am | डॉ सुहास म्हात्रे
खूपदा बेजबाबदार शेरे मारले ही विश्वासार्हता आपोआप कमी होते आणि आयडी वाचकांच्या मनातून आपोआप राईट ऑफ होते !
1 Aug 2014 - 12:31 pm | बॅटमॅन
माहितीकरिता धन्यवाद. हस्त-दस्त माहिती होतं, पण जबरचं मूळ अरबी आहे हे ठौक नव्हतं ते आत्ता कळालं.
26 Jul 2014 - 11:18 am | पिलीयन रायडर
हा एक नवाच पैलु आमच्या अल्पमतीला आज कळाला...
आजवर सावरकर ते पु.लंचा तिरस्कार केवळ जातीमुळे करताना पुष्कळ लोकांना पाहिल्यामुळे त्याबद्दल काही विशेष वाटले नाही.. ज्ञानेश्वरपण सुटले नाहीत ह्यांच्या तडाख्यातुन... (बोलणार्याची लायकी सुद्धा विचारात घ्यावी लागते म्हणा..).. शिवाय शिवाजी महाराज ह्यांच्यावरही मक्तेदारी दाखवायचा सोस लोकांना सुटत नाही.. (पुन्हा एकदा.. कीव येते.. असो..)
पण आता हा माज इतका वाढलाय की संस्कृतपेक्षा परकीय भाषा जवळच्या वाटु लागल्या.. नुसतं तेवढंच नाही तर स्वभाषांशी "वावडं"च होऊ लागलं..?? मोठ्या संख्येने समाज असा निर्बुद्ध विचार करु लागला तर भारतीय भाषा मृतवत होणार नाहीत तर काय?
बाबासाहेबांचा दाखला देणार्या लोकांना बाबासाहेब काडीभर तरी कळले असतील का हा प्रश्नच आहे.. शाळेत असताना एक धडा होता.. "महापुरुषांचा पराभव".. राहुन राहुन त्या धड्याची आज फार आठवण आली..
बॅट्या आणि प्रगो.. तुमच्या सगळ्या पोस्टसाठी +१११११
28 Jul 2014 - 3:20 pm | नाव आडनाव
"महापुरुषांचा पराभव" हे एकदम बरोबर उदाहरण दिलंय. मला पण हेच लिहायचं होतं पण शनिवारी आणि रविवारी मिसळपाव बंद होतं. मला लहान असताना हा धडा जास्त कळला नव्हता पण मोठा होताना आजू बाजूला जे काही चाल्लय ते बघून बर्याच वेळेला या धड्याची आठवण आली आणि हळूहळू कळला / अजूनही कळतोय.
कुणाला सावरकरांची बदनामी करायची आहे, तर कुणाला संभाजी महाराजांची. कुणाला आंबेडकरांवर चिखल उडवयचाय तर कुणाला गांधींवर. नेत्यांच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतील असं नाही, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या घ्यायला काय हरकत आहे? तुम्ही आम्ही हे सगळं होत असताना तिथे नव्हतो आणि इतिहास लिहिताना बर्याचदा दोन बाजूनी वेगवेगळा लिहिला जातो. त्यातला जो चांगला आहे तेवढाच ठेवू, बाकीच्या गोष्टींची (ज्याने कुणाचीही बदनामी होत असेल) चर्चा जाहीर रित्या तरी टाळली पाहिजे.
31 Jul 2014 - 5:30 pm | चिगो
क्या बात है, पिराताई.. १००% सहमत .. त्यातल्यात्यात आजकाल स्वतःला बाबासाहेबांचे किंवा आणखीही कुणाकुणा महापुरुषांचे समर्थक म्हणवणार्यांचा चेपुवर जो प्रचंड वैचारीक सावळागोंधळ आणि वायझेडपणा सुरु असतो ना, तो प्रचंड डोक्यात जातो..
25 Jul 2014 - 8:51 pm | प्रभाकर पेठकर
दूकान, मैदान, ज्यादा, फत्ते (विजय), मालूम, हे शब्द अरेबिक भाषेत (मस्कतच्या) ऐकले आहेत.
'पेटी'ला संदूक म्हणतात.
अरबी भाषेतही प्रदेशनिहाय बदल दिसून येतात. आपल्याकडे जसे मुंबई-पुण्याची मराठी, कोकणातील मराठी, नागपूरची मराठी वगैरे वगैरे कांही प्रमाणात वेगवेगळ्या असतात. तसेच, मस्कत, दुबई, सौदी, बाहरेन वगैरे देशांमध्ये अरेबीक थोडी थोडी बदलत जाते.
तेही शब्द मुळ अरेबिक आहेत की बाहेरुन आयात केले आहेत सांगणे अभ्यासकाचेच काम असेल.
29 Jul 2014 - 10:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
फ्रेंचमध्ये पावाला pain असा शब्द आहे, उच्चार पां किंवा पॉं, कोकणी उच्चाराशी बरंच जास्त साधर्म्य असणारा. अल्जिरीयन-फ्रेंच उच्चार मला माहित नाही.
फ्रेंच, इतालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज या भाषा लॅटिनोद्भव आहेत आणि बरेच शब्द सारखे आहेत. काही शब्दांची स्पेलिंग्ज कदाचित समानही असतील, पण उच्चार निरनिराळे असतात.
अवांतर - नोबेलविजेता फ्रेंच कथालेखक आल्बेर कामू अल्जिरीयात जन्माला आला.
---
मूळ धागालेखक -
आमच्यात लोकांवर येताजाता लैन मारतात, १४ फेब्रुवारीला "लौ यू" म्हणतात. मूळ शब्द काय आहेत हे समजून त्यांचे विचित्र उच्चार, गंमतीखातर करणं निराळं असतं. आणि माहित नसताना भलते काहीतरी शब्द वापरणं निराळं. अस्मितांची गळवं टरारलेली असणं सगळ्यात जास्त विनोदी.
पण तरीही जेव्हा भलते शब्द भलत्या अर्थाने बऱ्याच प्रमाणावर लोकांकडून वापरले जातात तेव्हा भाषा बदलते. वर अनुप ढेरेंनी झेरॉक्सचं उदाहरण दिलेलं आहेच.
आता याच धाग्यात अशा अर्थाचा प्रतिसाद वाचला, स्लीप म्हणजे झोपणं नाही. उच्चार आणि स्पेलिंग पाहिलं तर sleep या शब्दाचा उच्चार-लेखन स्लीप आणि slip चा उच्चार-लेखन स्लिप असंच पाहिजे. pen, pane, pain या तीन इंग्लिश शब्दांचे उच्चारही निरनिराळे आहेत, पेन्, पेन आणि पेऽन. पण लक्षात कोण घेतं!
30 Jul 2014 - 1:32 pm | केदार-मिसळपाव
मी म्हणतो नेहमी आपणच लक्ष का द्यायच? इथे आपली मराठी सांभाळायची/वाढवायची सोडुन इतर भाषांच्या शुद्धतेची काळजी आपणच का घ्यावी. त्यांनी योग चे योगा केले, आपणही योगा असेच म्हणतोय. तुम्ही त्यांना सांगा ना ते की ते योग आहे. त्यांना ही करु द्या ना चुकांची दुरुस्ती. महत्वाचा मुद्दा असा की आधी आपले घर व्यवस्थित आवुया लावुया आणि मग इतरत्र बघुया. इथे मला युरोपातले उदाहरण द्यावेसे वाटते. हे लोक स्पष्ट सांगतात की इंग्रजी परकीय भाषा आहे. ती आम्ही फक्त अत्यावश्यक वेळीच वापरु. मला त्यात काही चुकिचे वाटत नाही. बहुतेक भारतिय इंग्रजीबहुल देशात वास्तव्यास असल्याने त्यांना इतर भाषिय देशातला अनुभव नसतो. माझा अनुभव असा आहे की युरोपातले लोकही शक्यतो त्यांच्या भाषेतिल वाक्ये कामचलाउ इंग्रजीत रुपांतरित करतात आणि ती खपतातही. मी सुद्धा बरिच मराठी वाक्ये दॉईच भाषेत रुपांतरीत करतो. तुर्तास इतकेच.
30 Jul 2014 - 6:52 pm | प्यारे१
आभार्स. फ्रेन्च फुटबॉल पटू झिनेदाईन झिदान जन्मानं अल्जिरियाचाच. (डूक्करमुसंडी वाला)
'पां' च आहे. 'लेऐ (lait) एत पां' :)
बाकी फ्रेंच लोक्स नि फ्रेंच भाषेला टेम्पोत बसवायलाच हवंय.
लिहीतात काय नि बोलतात काय. बोबडी वळते राव.
आधी शिकलो असतो तर कदाचित जमलं असतं.
2 Aug 2014 - 8:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
फ्रेंचचे उच्चाराचे नियम इंग्लिशपेक्षा निराळे आहेत. ते एकदा समजले की बरंच फ्रेंच सहज वाचता येतं ... अगदी अर्थ समजला नाही तरीही. (पण उच्चार समजला म्हणून फ्रेंच स्पेलिंग लिहीता येईल का हे मला माहित नाही; जे इंग्लिशबद्दल मला म्हणता येतं.)
फ्रेंचमधल्या 'र'चा उच्चार किती मराठी लोकांना जमेल याबद्दल मला बरंच कुतूहल आहे. मला तरी तो जमत नाही.
---
केदार-मिसळपाव -
माझ्या कागदोपत्री नावाची आणि टोपणनावांची उच्चार आणि लेखन दोन्हींमध्ये वाट लावणारे उच्चशिक्षित मराठी लोक मला लहानपणापासून माहित आहेत. लोकांचे उच्चार आणि शुद्धलेखन सुधारण्यात घालवण्याइतपत वेळ माझ्याकडे नाही याची जाणीव मला लहानपणापासूनच झाली. त्यामुळे परदेशी लोकांनासुद्धा मी त्यांना झेपेल तोच उच्चार सांगते.
ज्यांना करायचंय त्यांनी करावं. फक्त दुसरा कोणी अमक्या पद्धतीने वागतो म्हणून मी ते करत नाही. किंवा दुसरा कोणी आवडीने मला नावडणारी गोष्ट खात असेल तर मी त्यांना अडवायलाही जात नाही. माझं मराठी (हिंदी, इंग्लिश, फ्रेंच) फार चांगलं आहे अशातला भाग नाही; निदान आहे त्यापेक्षा सुधारण्याचा प्रयत्न करते हे माझ्यापुरतं मला पुरेसं आहे.
25 Jul 2014 - 6:44 pm | असंका
एवढे आहेत होय? मला तो पाव एकच माहित होता...
25 Jul 2014 - 8:35 pm | प्रभाकर पेठकर
'पगार' हा शब्द पोर्तुगिज आहे? माझ्या ऐकिव माहिती नुसार हा उर्दूतून आला आहे.
पूर्वी श्रीमंतांच्या पदरी 'आश्रीत' असायचे त्यांना 'हातखर्चा'साठी जे पैसे दिले जायचे त्याला 'पगार' म्हणत.