भूकंपामागची कारणे

हुप्प्या's picture
हुप्प्या in जनातलं, मनातलं
28 Apr 2015 - 10:29 pm

भूकंप हा कधी होईल आणि कुठे होईल ह्याचे उत्तर विज्ञानाला आजही निश्चितपणे देता येत नाही. मात्र वेळोवेळी राजकीय व धार्मिक नेते आपली पोळी भाजून घेण्याकरता भूकंपाचा वापर करत आहेत. ८० वर्षापूर्वी नेपाळ व बिहारच्या आसपास असाच मोठा भूकंप होऊन अनेक लोक मेले. २०१५ मधेही तेच झाले. १९३४ साली जेव्हा भूकंप झाला तेव्हा गांधी बाबा (मोहनदास करमचंद) म्हणून गेले की हिंदू लोक अस्पृश्यता पाळतात म्हणून देवाने त्यांना शिक्षा दिली. आता ही बातमी देवाने जातीने ह्या माणसाच्या कानात कुजबुजली का अन्य काही प्रकारे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवला गेला ते आजवर कळलेले नाही. ८० वर्षापूर्वी लोक तितकेसे वैज्ञानिक विचारांचे नसल्यामुळे हा ज्ञानी बाब जे काही बोलतो आहे त्याला माना डोलावण्याचे काम केले असेल.
पण आजच्या घडीलाही विविध मंडळी भूकंपामागची कारणमीमांसा सांगत आहेत ते मोठे मनोरंजक आहे. कुणी बाब म्हणतात की बीफ खाल्ल्यामुळे देवाने ही शिक्षा दिली आहे. आता उरलेले जग हजारो वर्षे बीफ चापत आहे त्यांना शिक्षा का बरे नाही?
कुणी म्हणते राहुलगांधी केदारनाथला गेले म्हणून देव रागावला आहे. हे काय भलतेच? देव आपल्याच अवतारावर कधी रागावतो का?
असो. हिंदू वगैरे धर्म आहेतच रानटी. पण ख्रिस्ती लोकांनी नेपाळच्या भूकंपग्रस्तांना मदत म्हणून तातडीने १ लाख कागदी बांधणीतील बायबले पाठवली आहेत. बहुधा थंडीत सरपण म्हणून वापरता येतील!
असो. कधीतरी विज्ञान भूकंप ओळखण्यात प्रवीण होईल अशी आशा. पण तोपर्यंत अशा लोकांच्या अकलेचे तारे ऐकून वाचून मनोरंजन करून घ्यावे.
http://www.mkgandhi.org/articles/mg_causation.htm
http://thenortheasttoday.com/vhp-leader-links-nepal-earthquake-to-beef-e...
http://www.firstpost.com/politics/rahuls-impure-visit-to-kedarnath-cause...

मौजमजामाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

28 Apr 2015 - 10:57 pm | पिवळा डांबिस

कुणी म्हणते राहुलगांधी केदारनाथला गेले म्हणून देव रागावला आहे. हे काय भलतेच? देव आपल्याच अवतारावर कधी रागावतो का?

पण या वाक्याला दाद देतो!!!
:)

मदनबाण's picture

29 Apr 2015 - 9:51 am | मदनबाण

+१००
हेच म्हणतो जी...
बाकी भूकंप होण्याआधी काही दिवस माझ्या वाचनात भूकंपा विषयीच्या काही बातम्या आल्या होत्या... उदा. जपानच्या कुठल्याश्या किनार्‍यावर अनेक डॉल्फिन्स येउन पडल्या होत्या.. तिथले तज्ञांचे विचार की भूकंपामुळे मागच्या सुनामीच्या वेळी अशीच काही लक्षणे दिसली होती इं. नंतर जपानच्या भूकंपा विषयीच्या साईटवर सुद्धा नंतर एकदा जाउन आलो होतो तेव्हा ४ पेक्षा जास्तीचा जपान जवळ झाल्याचे काही तरी लिहले होते... मनात सारखे भूकंपा विषयीचे विचार येत होते, अगदी माझ्या तिर्थरुपांना देखील हे मी बोलुन दाखवले होते... आणि काही दिवसातच ही नेपाळच्या भयानक भूकंपाची घटना समजली ! टिव्ही समोर बसुन मी सारखा स्वतःलाच विचारत होतो... भूकंप भूकंप मनात का घोळत होते ? सोन्याबापूच्या धाग्यावर प्रतिसाद दिल्या नंतर त्या खाली प्रमाणाच्या बाहेर काहीच्या काही अवांतर :- मी भुकंपाची वाट पाहत आहे ! असे लिहण्याचा विचार सुद्ध्या त्या वेळी आला होता, पण तसं लिहणे मी टाळले !
असं का ? त्याचा विचार मी अजुन करतो आहे...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Nepal earthquake: humanitarian crisis engulfing 8 million people – rolling report

काळा पहाड's picture

28 Apr 2015 - 11:07 pm | काळा पहाड

कुणी म्हणते राहुलगांधी केदारनाथला गेले म्हणून देव रागावला आहे. हे काय भलतेच? देव आपल्याच अवतारावर कधी रागावतो का?

मुसलमान व्यक्तीनं केदारनाथ मंदिरात प्रवेश केला तर देव रागावणार नाही का?

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2015 - 12:09 pm | टवाळ कार्टा

देव "रागवेलच" हे सामान्य लोकांना कसे समजते?

काळा पहाड's picture

29 Apr 2015 - 2:38 pm | काळा पहाड

हा प्रश्न सामान्य हिंदूंनाच का विचारला जातो? सौदी अरेबियात जाऊन सामान्य मुसलमानांना हा प्रश्न कुणी विचारेल काय?

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2015 - 3:01 pm | टवाळ कार्टा

१००, २००, ३००, ४००, ....१०००+
किती करायचेत?

काळा पहाड's picture

29 Apr 2015 - 3:06 pm | काळा पहाड

७८६

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Apr 2015 - 6:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शिव शिव शिव!!

बॅटमॅन's picture

29 Apr 2015 - 7:13 pm | बॅटमॅन

कुणाला?

हाडक्या's picture

29 Apr 2015 - 7:54 pm | हाडक्या

नशीब.. "कुणला" म्हणून विचारलंस, "काय" म्हणून विचारला असतास तर धार्मिक भावना दुखावल्या म्हून कोडतात खेचला असता तुला.. (भयंकर चिडलेली स्माईली कल्पावी)

बॅटमॅन's picture

30 Apr 2015 - 1:07 pm | बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी!!!!

खंडेराव's picture

29 Apr 2015 - 5:44 pm | खंडेराव

गमतीने म्हणत असाल तर ठिक आहे. बाकी, देव माणसे हिंदु कि मुसलमान बघुन निर्णय घेतो अशी आपली समजुत असेल तर त्याचा णिशेध!

काळा पहाड's picture

29 Apr 2015 - 10:52 pm | काळा पहाड

नै हो. आमचा देव तसं बघत असता तर काय हवं होतं? पण आमचा देव पडला सर्वधर्मसमभाव वाला. त्यामुळं तो तसं काही करण्याची शक्यताच नाही.

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2015 - 11:19 pm | टवाळ कार्टा

छान...माणसात देव शोधणे याचा नवीन अर्थ समजला आज

पैसा's picture

28 Apr 2015 - 11:08 pm | पैसा

पापं वाढली हो! फार काय, मिपावरच्या णवीण लेखकांणा तुम्ही मिपाकरांनी सतावल्यामुळे हा आकाशातल्या बापाचा कोप झाला आहे.

अत्रन्गि पाउस's picture

29 Apr 2015 - 3:25 am | अत्रन्गि पाउस

रवींद्रनाथ टागोरांनी कडाडून विरोध केला होता असा वंगचित्रात उल्लेख आहे.
...जस्ट आठवले ..

डॉ. कल्याण गंगवाल यांनीही आइनस्टाइन चा संदर्भ देत असेच तारे तोडले आहेत.

प्रसाद१९७१'s picture

29 Apr 2015 - 12:06 pm | प्रसाद१९७१

सगळा केजरीवाल चा दोष आहे. भुकंप होऊ कसा दिला त्याने?

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2015 - 12:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

सद्या "आप" स्वतः राजकीयभूकंपग्रस्त असल्याने त्या पडझडीत दुर्लक्ष झाले असेल... त्यान्ला येकडाव मापी द्या ! :) ;)

क्लिंटन's picture

29 Apr 2015 - 1:04 pm | क्लिंटन

सगळा केजरीवाल चा दोष आहे. भुकंप होऊ कसा दिला त्याने?

असं होय? मला वाटत होते की भूकंपासाठी मोदीच जबाबदार आहेत.

प्रसाद१९७१'s picture

29 Apr 2015 - 1:25 pm | प्रसाद१९७१

पूर्वी मोदींचे नाव असायचे, गेल्या आठवड्यात एकाचा नौटंकी करता करता जीव गेल्या पासुन, सर्व मृत्युंची जबाबदारी केजरीवालांची आहे हे नव्यानीच कळले.

नौटंकी कुणाची आणि जीव कुणाचा गेला. गुप्त सुत्रांकडून असंही समजतं की आण्णा हजारेंच्या उपोषणात सुद्धा अशीच नौटंकी करण्याचा बेत होता पण आण्णा हुशार निघाले. त्यांनी उपोषणच गुंडाळले आणि नौटंकीवालला त्याच्या आवडत्या विशिष्ट अवयवावर लाथ मारून हाकलून दिले.

होबासराव's picture

29 Apr 2015 - 12:27 pm | होबासराव

त्यानुसार नेपाळची परिस्थिति खुप वाईट आहे.
धाग्यात गांधिंचा संदर्भ आल्याने हा धागा शतकी होणार.

णेफळे आळिचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक असलेला
होबासराव

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Apr 2015 - 1:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

वाचतेय.

८० वर्षापूर्वी लोक तितकेसे वैज्ञानिक विचारांचे नसल्यामुळे हा ज्ञानी बाब जे काही बोलतो आहे त्याला माना डोलावण्याचे काम केले असेल.

८० वर्षेच नाही तर २५ वर्षापूर्वीही '४०० वर्षे जुनी मसजीद तोडून देशाचे भले होऊ शकते' ह्यावर माना डोलावणारा सुशिक्षित मध्यमवर्ग होता की.

पैसा's picture

29 Apr 2015 - 1:09 pm | पैसा

माईसाहेब, तुम्हाला ४०० वर्षापूर्वीच्या आठवणी अजून आहेत? मस्तच हो! तेव्हाच्या मशिदी कशा बांधल्या ते पण तुम्हाला आठवत असेल नै? आमाला कै म्हैत नै. सांगा बघू पटकन!

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2015 - 1:37 pm | टवाळ कार्टा

ओ तै...म्हैत नै कै...त्या स्वयंभू असत ;)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Apr 2015 - 2:33 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तेव्हाच्या मशिदी कशा बांधल्या ते पण तुम्हाला आठवत असेल नै

अगदी खर्रीखुर्री माहिती पाहिजे असेल तर संघाने सक्तीने रिटायर केलेल्या लालकृष्ण अडवाणींना तू विचारावेस असे सुचवते.किंवा उमा भारती,अशोक सिंघल्,मुरलीमनोहर्,वाजपेयी..अशा तज्ञांची फौज आहेच.

पैसा's picture

29 Apr 2015 - 3:41 pm | पैसा

तुम्ही सगळं प्रतेक्ष बघितलंय म्हणून तुम्हालाच विचारलं. आठवत नसेल तर नाय म्हणा. हाकानाका!

काळा पहाड's picture

29 Apr 2015 - 3:56 pm | काळा पहाड

आठवत कसं नाही? बाबराच्या पुढे मागे करणार्‍यात त्या पण होत्याच की! त्यानं नाही म्हटल्यावर मग "ह्यां" ना पकडलं त्यांनी.

हुप्प्या's picture

3 May 2015 - 10:19 am | हुप्प्या

मायडे जरा वहावत गेलीस गं! म्हातारपणामुळे स्मृतीभ्रंश सुरु झाला का गं? जरा चांगल्या डॉक्टराला दाखिव. उगाच काट्याचा नायटा नको व्हायला. असो.
तर शहाबानोच्या खटल्याचा निर्णय फिरवून हिंदू लोकांच्या नाराजीवर उतारा म्हणून गांधींच्या राजीवने त्या अयोध्येच्या अवशेषाजवळच्या देवळाचे कुलूप उघडून तिथे रामाची पूजा सुरू केली. म्हणजे एक आग लावून त्यावर पेट्रोल ओतून ती विझवायचा प्रयत्न बर का गं मायडे! तर ह्या प्रयत्नांना योग्य ते फळ यायचेच होते ते आले. चल आता भूकंप आणि त्याच्या कारणांकडे वळ. वाटले तर नान्यालाही बोलाव.

ह्या वर आपले मौलिक मत मांडण्या करीता हीतेसभाय णाना णेफळे (पगारे) किंवा ते फिलॉसॉफर ग्रेट थुंकरकर
मीपा वर 'आप'ली पायधुळ झाडतील.

णेफळे आळिचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक असलेला
होबासराव

कविता१९७८'s picture

29 Apr 2015 - 2:13 pm | कविता१९७८

कुणी म्हणते राहुलगांधी केदारनाथला गेले म्हणून देव रागावला आहे. हे काय भलतेच? देव आपल्याच अवतारावर कधी रागावतो का?

शब्दच सुचत नाहीयेत जेव्हापासुन हे वाक्य वाचलंय.

यसवायजी's picture

29 Apr 2015 - 2:48 pm | यसवायजी

ही घ्या कारणे

a

लॉर्ड फॉकलन्ड's picture

29 Apr 2015 - 3:13 pm | लॉर्ड फॉकलन्ड

२००१ मधे भुजमध्ये भुकम्प झाल्यावर, 'गुजराती लोकांनी डांगमध्ये ख्रिश्चनांवर हल्ले केल्याने देवाने त्यांना ही शिक्षा दिली' असे कर्नाटकचा एक ख्रिश्चन मंत्री म्हणाला होता.

बॅटमॅन's picture

29 Apr 2015 - 3:18 pm | बॅटमॅन

लिंक इ. मिळेल का?

क्लिंटन's picture

29 Apr 2015 - 3:26 pm | क्लिंटन

लिंक इ. मिळेल का?

या मंत्र्याचे नाव टी.जॉन असे होते.

लातूर-किल्लारीचा भूकंपही बाबरी पाडल्यामुळे झाला अशा स्वरूपाचेही ज्ञान काहींनी पाजळले होते असे वाचल्याचे आठवते. अर्थात त्यावेळी इंटरनेट नसल्यामुळे लिंक सहज देता येणार नाही.

बॅटमॅन's picture

29 Apr 2015 - 3:55 pm | बॅटमॅन

धन्यवाद!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Apr 2015 - 5:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

भूकंपासारख्या दुर्घटनेचेही राजकारण कसे करावे हे ह्या कमंडलू मंडळींकडून शिकावे रे बॅटमना.

सूड's picture

29 Apr 2015 - 5:56 pm | सूड

तुमच्या काळात पण असं भूकंपावरुन राजकारण व्हायचं का गं माई? म्हणजे द्वापारयुग, त्रेतायुगात वैगरे? तू ब्रह्मदेवापेक्षा उलुशीक लहान म्हणून विचारलं हो!!

पैसा's picture

29 Apr 2015 - 7:51 pm | पैसा

तेव्हा इंद्र, वरूण, वायु सगळे देव एकमेकांवर ढकलायचे बघ! मग शंकराने शाप दिला का विष्णुने वर दिला यावरून पण भांडणं व्हायची असं माई नानाला सांगताना ग्रेटथिंकरने ऐकलं असं हितेश म्हणाला.

स्वप्नांची राणी's picture

30 Apr 2015 - 8:13 pm | स्वप्नांची राणी

एकदा माई आणी नाना कैलासावर बसून सारीपाट खेळत होते. तेंव्हा माईने नानांना विचारले की मी कोणत्या पुण्यानं आपणांस प्राप्त झाले..? ...असं काहीसं डोळ्यासमोर उभं राहिलं माझ्या!!

पुण्याने प्राप्त व्हायला त्यांच्या काळात पुणे अस्तित्वात तरी होतं का?

स्वप्नांची राणी's picture

30 Apr 2015 - 8:18 pm | स्वप्नांची राणी

पुण्ण्य रे पुण्ण्य...लिही बघू १०० वेळा...

ओक्के, हल्ली पुण्यातला आणि पापपुण्यातल्या पुण्यातला फरक न कळण्याइतकं पुण्याचं पाणी लागलंय. ;)

स्वप्नांची राणी's picture

30 Apr 2015 - 8:23 pm | स्वप्नांची राणी

बाकी पुणे त्रेतायूगापासून अस्तित्त्वात होतं...किंबहुना, त्याच्या अस्तित्त्वाबाद्दल शंका घेतल्यानेच भुकंप झाला असावा...

मृत्युन्जय's picture

29 Apr 2015 - 6:09 pm | मृत्युन्जय

टी जॉन आणी एम गांधी कमंडलू?

आशु जोग's picture

19 Jun 2015 - 12:19 am | आशु जोग

हा धागा म्हणजे आफ्टरशॉकच

आशु जोग's picture

29 Apr 2015 - 10:48 pm | आशु जोग

हुप्प्या बातम्या चिकटवायचे थांबवणार असे ठरले होते ना

हुप्प्या's picture

30 Apr 2015 - 10:11 am | हुप्प्या

असा गैरसमज का झाला आपला? जर चिकटवलेल्या बातम्या आवडत नसतील तर अशा धाग्यांना आपण चिकटू नये. अन्यत्र गमन करावे असे एक अनाहूत सल्ला.

विवेकपटाईत's picture

30 Apr 2015 - 8:00 pm | विवेकपटाईत

पतंजली, संघ आणि डेरा सच्चा सौदाचे हजारो कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने नेपाल मध्ये आज कार्य करतात आहे. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेश सरकारने ही शेकडो ट्रक गरजेच्या वस्तू पाठविल्या. तर दुसरी कडे आप आणि पप्पू कुठे आहेत. फोर्ड फाउंडेशन कडून पैसा घेणारे Ngo कुठे आहेत. पुरोगामी कुठे आहे.

लॉर्ड फॉकलन्ड's picture

30 Apr 2015 - 8:30 pm | लॉर्ड फॉकलन्ड

फक्त स्वतःचेच कौतुक्.पाकिस्ताननेहि बिफ मसाल्याची पाकिटे पाठविलि आहेत्.त्यांचे पण कौतुक करा.

..Te aamchyaa 'Naanyaane' dilelyaa 'PAK' Sallyaamule, ase eikale, he Khare ka 'Maai' ??