गिरिजाचा लॉग : १२:१६:१६
घड्याळ : मला घड्याळ पाहिजे , व्यवस्थित चालणारं सेकंदकाटा असणारा घड्याळ ! अ सोल्युशन !
सतरा . अंक १७ !
बिझिनेस येस बिझिनेस !
गूड आयडीया ! ग्रेट आयडीया इन्डीड ! मनात येतात ते विचार लिहुन काढ आणि वेळ नोंडवुन ठेव ! ग्रेट आयडीया !
गिरिजा यु आर जिनियस ... येस अ नार्सिसिस्टीक जिनियस ! फकिंग जिनियस ! ब्लडी पॅरामाऊंट जीनीयस !
गिरिजाचा लॉग : १२:१६:१५
घड्याळ : मला घड्याळ पाहिजे , व्यवस्थित चालणारं सेकंदकाटा असणारा घड्याळ ! अ सोल्युशन !
नो . स्टॉप .
कॉम्प्युअटर मुव्ही
महंमद ने मुव्ही लावलाय
आतल्या खोलीत जा आणि चित्रपट बघ => १२:१९:३०
धिस इज अ गुड आयडीया इन्डीड !
गिरिजाचा लॉग : १२:१६:१४
घड्याळ : मला घड्याळ पाहिजे , व्यवस्थित चालणारं सेकंदकाटा असणारा घड्याळ ! अ सोल्युशन !
ओके आठवायचा प्रयत्न कर .
१२:०५:०० आपण महंमदच्या घरी आलोय . टेरेसवर गप्पा मारत बसलोय . प्रचंड उकाडा आहे . समोरच्या लेडीज हॉस्टेल मधुन पोरी आपल्या कडे बघत आहेत . कोठेतरी मिक्सरचा आवाज चालु आहे . आपला मित्र घाबरलाय त्याला मी म्हणालो
There is nothing to fear ... there is nothing to fear ... we are the only ONE here !
अहंनिर्विकल्पो निराकार रुपो विभुर्वाप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्ती र न बंधः चिदानंद रुपः शिवोहं शिवोहं :
असो . च्यायला ह्यांच्या हे लक्षात येणार नाही म्हणा .
आपण पायर्या उतरुन खाली गेलो आणि हॉल मधे जाऊन १/२ लिटर पाणी पिले . पाणी सम हाऊ दोन्ही बाजुच्या बरगड्या जेथे भेटतात तिथे जाऊन अडकुन बसलय . नाही नाही हा भास आहे . कशावरुन ? सत्य आणि भास ह्यातील फरक तुम्हाला कशावरुन कळणार ? आणि कळाला तेव्हा तुम्ही सत्यात आहात की स्वप्नात हे तरी कसे कळणार ?
धिस इज अ गुड आयडीया इन्डीड ! गिरिजा यु आर जिनियस !
गिरिजाचा लॉग : १२:१६:१६
स्टॉप थिन्क राईट नोट डाऊन द टाईम
स्टार्ट
१२:४०:५० फर्स्ट लेव्हल ड्रीमींग . महंमद बीयर ऑफर करतोय . मला बीयर नकोय . नो बीयर . पश्या भाड्या हागु नकोस . बीयर संपव . घरी बाटली ठेवता येणार नाही मला .
नो नो बीयर . महंमद दुसर्या मित्राला म्हणला गंडलाय आज नेहमी असं करत नाही असो आपण संपवु
समाधी
कॅलिब्रेट टाईम : तेक द क्लॉक : गो इन्साईड : रन :
टाईम कॅलिब्रेटॅड : गोईंग इनसाईड :
नो बीयर
क्रेझ्झी
क्योंकि सास भी कभी बहु थी
हर्या इज जीनीयस ! गोड्या इज जीनीयस ! गिरीजा इज जीनीयस ! ११:२६ : ००
राँग
टाईं कॅलिब्रेशन रीचेकड : करेक्ट १२: २६:००.................. गुड गुड
गिरिजाचा लॉग : १२: २६: ००
घड्याळ : मला घड्याळ पाहिजे , व्यवस्थित चालणारं सेकंदकाटा असणारा घड्याळ ! टाईम कॅलिब्रेशन केलेले !
टाईम स्टॅम्प १२: २४ : ५१ : इवेन्ट : एक मित्र सोडुन चाललाय : गुड गुड
_________________________________________________________
१) भाषा हे केवळ भावना पोहचवण्याचे माध्यम आहे . टाईम कॅलिब्रेटेड : ११:३४:००
२) महंमद अनोळखी चित्रपट दाखवतोय : ल्युक लबास्की ? व्हाट द फक :
३)११: ३५: ३५: कॉपीराईट # बोरींग मुव्ही
वी आर डन ! there is nothing to do , there is no where to go , you are already perfect and and you are already complete !
४) एव्हरी वन इज जीनीयस # बोरींग मुव्ही
५ ) There is nothing to watch you are already perfect !
६) कीप राईटिंग विथ टाईम स्टॅम्प
फोकस ११ :३६:३६
७) I dont belong here . We are not human beings having spiritual experiences we are spiritual beings having human experiences !
८)I am not answerable to any one , I do not belong here
९)पिझ्झा . टॅक्सी ड्रायव्हर
१०) अस्युअतरस्याम दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधि राजः ! I dont belong here .... I belong to himaleya !!!
११) फर्स्ट लेव्हल ड्रीमीन्ग : टाईम स्टॅम्प ११:४४:५० कॅलिब्रेटेड टाईम !
११:४५:००: हॅल्युसिनेशन १ : बॉब डिलन माझ्या एका मित्रा सारखा दिसतोय आणि तो हसतोय माझ्या कडे पाहुन !
_________________________________________
अशी ही बनवा बनवी ! महंमदने अशीही बनवा बनवी चित्रपट लावलाय.! अरे पण मित्र मगाशीच घरी गेला होता ना ? तो परत आलाय का ? ! येस बहुतेक त्याला घरच्यांनी गरात घेतले नाही हकलुन दिल्याने परत इथे आलाय ?
टाईम स्टॅम्प ११:४५:०० : महंमद टार्टुर्र्र्र्र्र्र्र =))))
दादा कोंडके . My brain is still working ! I know URDU !!!!
_______________________________________________________________
___________________________________
( हे उलट्या अक्षरात लिहिले आहे )
Yes indeed you do ! Bingo !! काय पांचट पणा आहे हा ?
( इथुन पुढे परत सरळ अक्षरात)
__________________________________________________
१२:५०:४०: अॅक्शन : पायाच्या मधल्या बोटाने अंगठे झटकणे ! महंमद आत्ता हे करतोय . मी थोड्या वेळा पुर्वी हेच करत होतो ( टाईम स्टॅम्प का लिहुन ठेवला नाहीस )
No hindu ... You are Arya sanatan vaidik !!
_________________________________________________________
१२:५१:००: हॅल्युसिनिशन २: ह्यॅल्युसिनेशन १ रीपीट : बॉब डिलन माझ्या मित्रा सारखा दिसतोय आणि माझ्याकडे पाहुन हसतोय .
गिरीजा नो टॉकिंग !! यु आर ड्रंक ( ? =)) ;) )
Drinking and talking is as bad as drinking and driving !
शॉशॅन्क रीडेम्प्शन
हायला ह्या आयडीलिस्टीक लोकांचा नक्की काय प्रॉब्लेम असतोप : पश्या आपसाठी काम करतोय . हाऊ फनी !!
हॅल्युसिनेशन ३: मला असं हॅल्युसिनेशन होतय कि मगाचचेच हॅल्युसिनेशन परत येत आहे . आणि आता बॉब डिलन जोरात हसतोय ... हाहाहाहाहाहाहा
________________________________________
११:५६ टेस्ला
Time is absolute !
Time calibration correct ! Varified !!
# अशी ही बनवा बनवी
शिखंडी
कनेक्शन : ट्विटर ग्राफ अॅनालिटिक्स # पीजे
हॅल्युसिनेशन ४ : मला डास चावतोय , डास अजुन चावतोय , हसतोय !
___________________________________________________________
टाईम स्टॅम्प १२:०१: ?? हायबरनेट : एन्जोय द स्टेट : रीस्टार्ट व्हेन अॅल्गोरिदम कन्वर्जेस : स्टार्ट हायबरनेशन : हायबरनेट
______________________________________________________________
ह्यॅलुसिनेशन ५: मी पडत आहे . ग्रॅव्हिटी झीरो स्टेट ! नीमो , आय लव्ह माय नीमो !!
How do you know what is real and what is hallucination ?
ह्यॅल्युसिनेशन ६ : महंमद खरचं महंमद आहे !!
ह्यॅलुसिनेशन ७: Hyper dopamine secretion ! माझ्या मेन्दुच्या कोणत्यातरी कोपर्यात प्रचंड प्रमाणात डोपामाईन सिक्रीट होतय , Yes this is it ! This is it ! this is NOT an hallucination !!
What is TRUTH ? A Tautology ?? # अशी ही बनवाबनवी
How do you know ? You yourself in a dynamic state !
Physics => Maths => Philosophy => Absolute Truth !!
हॅलुसिनेशन ९ : देजावु !!टाईम स्टॅम्प : १२:१३:२५ !! Very funny !! हाहा !! ( कॅलिब्रेटेड घड्याळ हॉलमधल्या घड्याळा पेक्षा १ तास मागे होते म्हणल्यावर देजावु होणार की तासाभराने !)
Proc Log : महंमद म्हणाला एन्जॉय द स्टेट ! १२:१६:००:
_____________________________________________________________________
ह्यॅल्युसिनेशन १० : I am burning like a ghost rider
You dont have proof for n=0 ! तिसर्या मित्राने मान्य केले की तो जीनीयस नाहीये !
_________________________________________________________________
पेपर संपत आलाय . मला अजुन पेपर हवाय १२:२०:०० अॅट झीरो !
Bingo ! my brain is still working !!
गिरिजाचा लॉग : १२:२० : ३१
घड्याळ : मला घड्याळ पाहिजे आणि पेपरही , व्यवस्थित चालणारं घड्याळ ... सेकंदकाटा असणारा घड्याळ ! अ सोल्युशन !
_______________________________________________________________
प्रतिक्रिया
24 Apr 2015 - 8:13 am | पैसा
हे काय आहे! प्रगो, सगळं ठीक आहे ना?
24 Apr 2015 - 8:55 am | किसन शिंदे
24 Apr 2015 - 8:03 pm | प्रसाद गोडबोले
अरे नाही नाही नाही !
ही समाधी अवस्था खचितच नाही , उलट अज्ञ जन ज्याला समाधी समजुन गुरफटुन बसतात तीही अवस्था आहे ! समाधी अवस्थेविषयी काय बोलणार ...
बोलणें तितुकें व्यर्थ जातें । बोलतां अनुभवा येतें ।
अनुभव सांडितां तें । आपण होईजे ॥
अशी काहीशी अवस्था आहे ती !!
कधीतरी वेळ काढुन निवांतपणे लिहिन ह्या विषयावर :)
समाधी साधन संजीवन नाम | शांती तयासम सर्वांभूती || १ ||
शांतीची पै शांती निवृत्ती दातारू | हरिनाम उच्चारू दिधला तेणें || २ ||
शम दम कळा विज्ञान सज्ञान | परतोनि अज्ञान न ये घरा || ३ ||
ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट | भक्तीमार्ग नीट हरिपंथी || ४ ||
24 Apr 2015 - 8:06 pm | सतिश गावडे
तुम्हाला स्वतःला समाधीचा अनुभव आहे का?
24 Apr 2015 - 8:31 pm | प्रसाद गोडबोले
हा प्रश्न म्हणजे मौन पाळणार्या माणसाला तुम्ही मौन पाळत आहात का असे विचारण्यासारखा आहे ,
म्हणजे त्याने उत्तर दिले तर मौन भंगले , नुसते डोके हलवले तरीही मानसिक मौन भंगलेच की आणि उत्तर नाही दिले तर शंका घ्यायला जागा राहिली !
अनुभव आहे असे म्हणावे तर अनुभवता म्हणुन कोणीतरी त्रयस्थ होता अर्थात समाधी लागलीच नव्हती असा अर्थ होतो , अनुभव नाही म्हणावे तर मग वरचे सगळेच "तोंड पसरुनिया सुणे ! भुंकुन गेले ! " असे होईल आणि काहीच न बोलावे तर शंका घ्यायला जागा राहील !!!
असो ! विषय गंभीर आहे ! ऑफलाईन चर्चा करु !
You have to understand, most of these people are not ready to be unplugged. And many of them are so inured, so hopelessly dependent on the system, that they will fight to protect it. - The Matrix
24 Apr 2015 - 8:22 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
रविवारी येतोस का? १/२ ऐवजी १ लिटर कोल्ड कॉफी पाजतो जर्रा थंडावशील ;) ;) ;)!!!
24 Apr 2015 - 9:14 am | अजया
टिकटिक वाजते डोक्यात
बरंच काही प्रगोच्या(डोस्क्याच्या)खोक्यात!!
रच्याकने:कुछ लेते क्युँ नहीं?
24 Apr 2015 - 9:42 am | सस्नेह
शायद कुछ लिया है, इसीलिये तो...
24 Apr 2015 - 9:53 am | सतिश गावडे
बरंचसं असंबद्ध आहे त्यामुळे विशेष काही कळलं नाही.
एक लक्षात आलं ते हे की या असंबद्ध विचारांच्या सुपर फास्ट एक्स्प्रेसने खुप सार्या विषयांना ओझरता स्पर्श केला आहे. त्यातले दोन विषय तत्वज्ञान आणि मानसशास्त्र.
पूर्वी माझ्या मनात डील्युजन (भ्रम) आणि हॅल्युसिनेशन (भास) या शब्दांच्या अर्थांबाबत गोंधळ व्हायचा.
एका मित्राने म्हटलं, "तू जर नास्तिक असशील तर या शब्दांचे अर्थ लक्षात येणं खुप सोपं आहे."
मी म्हटलं, "कसं?"
"देव आहे हा भ्रम. आणि देव माझ्याशी बोलतो हा भास". मित्र चेहर्यावरचे उडालेले रंग पाहून हसत होता.
"आणि मी जर बिलिव्हर असेन तर?" माझा प्रतिप्रश्न.
"देवाच्या जागी भूत शब्द वापर. बाकीचं तसंच". मित्र स्थितप्रज्ञासारखा शांत.
"आणि माझा भूतयोनीवरही विश्वास असेल तर?"
"तुझा देव त्या भूतांपासून तुझे रक्षण करो."
there is nothing to do , there is no where to go , you are already perfect and and you are already complete !
कुणी म्हटलं असेल बरं हे? कुणी का असेना, कुणीतरी मोठा तत्ववेत्ता किंवा विचारवंत असणार. चिंतनातून त्याची अशी मनोभुमिका झाली असणार आणि मग कधी तरी त्याच्या त्या मनोभुमिकेला शब्दरुप मिळाले असणार. लोक ते वाचत असणार. क्षण, दोन क्षण स्वतःला मुक्त समजत असणार आणि तिसर्या क्षणाला पन्नास लाखाच्या आसपास टू बिएचके कुठे मिळेल हे शोधायला इंटरनेटकडे धाव घेणार.
शेल्डन कॉप त्याच्या If You Meet the Buddha on the Road, Kill Him! मध्ये आपल्याला धक्का देतो.
Philosophy, religion, patriotism, all are empty idols. The only meaning in our lives is what we each bring to them.
सारं काही शब्दांचे बुडबुडे आहेत तर मग हे काय आहे: अहंनिर्विकल्पो निराकार रुपो विभुर्वाप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्ती र न बंधः चिदानंद रुपः शिवोहं शिवोहं :
मी शेल्डन कॉपचे वाक्य पुन्हा वाचतो. माझं मलाच कळलं असं वाटतं. हा ही माझ्या कुठल्यातरी पुर्वजाने त्याच्या अस्तित्वाला दिलेला अर्थ आहे.
मग अस्तित्वाचं प्रयोजन काय?
The continuation of species.
हे कुणी सांगितलं?
असं डार्विन म्हणतो.
हे ही एक तत्वज्ञानच नाही का? माणसाने दिलेला अर्थ?
नाही. म्हणजे नसावं.
स्वार्थी जनुकं आपल्या पीढया निर्माण करण्यासाठी धडपडत असतात हे आता प्रयोगशाळांमधील चाचण्यांमधून सिद्ध झालंय.
हा रिचर्ड डॉकिन्सच्या The Selfish Gene चा प्रभाव म्हणायचा का?
नाही. ते डॉकिन्सचं तत्वज्ञान नाही. डॉकिन्सने ते फक्त समजावून सांगितलंय.
जर तुला चुलत भाऊ आणि सख्खा भाऊ यांच्यातून एकाला फेवर करायची वेळ आली तर तू कुणाला फेवर करशील?
ज्याची बाजू योग्य असेल त्याला.
आता हे नितिमत्ता वगैरे बाजूला ठेवून उत्तर दे.
सख्खा भाऊ.
का?
कारण तो माझ्या सख्खा भाऊ आहे.
बरं. आणि जर ही निवड सख्खा भाऊ आणि मुलगा यांच्यात करायची असेल तर?
मुलगा.
का?
कारण तो माझा मुलगा आहे.
हे तू बोलत नाहीस. तुझे स्वार्थी जीन्स बोलत आहेत. त्यांना आपला वंश फेवर करायचा आहे.
हे होतं कसं? स्वार्थी जीन्स आपली प्रजाती पुढे कशी सरकवतात?
डोपॅमाईनच्या मदतीने.
म्हणजे?
हे माणसाच्या मेंदूतील एक रसायन आहे. आपल्या मेंदूत काही कोटी विशेष पेशी आहेत ज्यांना चेतापेशी म्हणतात. या चेतापेशींची साखळी किंवा जाळं ही माहिती मेंदूतील वेगवेगळ्या माहिती पॄथक्करण आणि त्यावर कृती करण्याचे आदेश देणार्या भागांकडे वाहून नेण्याचं काम करतं. दोन चेतापेशींच्या जोडणीशी एक अती सुक्ष्म फट असते ज्याला सिनॅप्स म्हणतात. एका चेतापेशीतील संदेश त्या चेतापेशीच्या प्रक्षेपक टोकाशी येताच ती चेतापेशी जोडणीपाशी असलेल्या फटीत काही रसायने स्त्रवते. चेतापेशीतील संदेश मग त्या संदेशवाहक रसायनावर स्वार होऊन दोन चेतापेशींमधील अती सुक्ष्म दरी पार करुन ग्राहक चेतापेशीत प्रवेश करतो.
मेंदूतील या चेतापेशींच्या जाळ्यांना आणि माहिती पॄथक्करण आणि त्यावर कृती करण्याचे आदेश देणार्या भागांना त्यांच्या त्यांच्या कामानुसार नावं दिलेली आहेत. यातलं एक आहे रिवार्ड सर्किट. आणि यातला रासायनिक संदेशवाहक आहे डोपॅमाईन.
माणसाचा (किंवा कुठल्याही प्राण्याचा) वंश टिकून राहण्यासाठी प्रजनन होणे आवश्यक आहे. आणि प्रजनन होण्यासाठी जिवंत राहणे. जिवंत राहण्यासाठी अन्न आणि पाणी अत्यावश्यक आहेत. पण जर माणसाने अन्न घेतलेच नाही आणि प्रजनन केलेच नाही तर? ते तसं होणार नाही याची काळजी घेण्याचे काम निसर्गाने रिवॉर्ड सर्किटवर सोपवलंय. रिवॉर्ड सर्किट डोपॅमाईन हे रसायन संदेशवाहक म्हणून वापरते. आणि हे डोपॅमाईन माणसाला अन्न पाणी घेण्यासाठी किंवा प्रजनन करण्यास उद्युक्त करण्यासाठी माणसामध्ये हवीहवीशी भावना निर्माण करते. एकदा का या डोपॅमाईनच्या आमिषाला बळी पडून माणसाने जेवायला सुरुवात केली किंवा प्रजनन क्रिया सुरु केली की डोपॅमाईनचे काम संपते.
थोडक्यात, अस्तित्वासाठी अस्तित्व असा काहीसा प्रकार आहे.
24 Apr 2015 - 9:58 am | पैसा
मला पार्किन्सन सिंड्रोम आल्यासारखं अचानक वाटायला लागलंय. :P
24 Apr 2015 - 10:01 am | सतिश गावडे
चॉकलेट खाव डोपॅमाईन मिलाव. :)
24 Apr 2015 - 10:16 am | आनन्दिता
स गा शेट गिर्जा काकांची अतर्क्यातली कवितासदॄष्य,लेखरुपी, भटकंती तुम्ही सोपी करुन सांगितल्याबद्दल आभार!
पण प्लिज आता तुमच्या प्रतिसादाचा थोडक्यात अर्थ समजवा. =)) डोकं गरगरतंय..
24 Apr 2015 - 10:18 am | पैसा
पुण्यातला आमरस किंवा काकवी खाल्ली तर असं काहीतरी होतं.
24 Apr 2015 - 6:52 pm | एस
रत्नागिरी हापूसचा आमरस केव्हाही वाईटच. असे होणारच.
24 Apr 2015 - 7:01 pm | पैसा
हापूस आंब्याला नाव ठेवायाचा काम नाय! तो पुण्यात खाल्ला तर बाधतो!
24 Apr 2015 - 7:06 pm | अत्रुप्त आत्मा
@ तो पुण्यात खाल्ला तर बाधतो! >>> दुत्त दुत्त!
24 Apr 2015 - 7:07 pm | एस
पुण्याला नाव ठेवायचं काम नाय.. काय?
24 Apr 2015 - 10:03 am | नगरीनिरंजन
:-) डोपॅमाईनची ओळख पटलेला आणखी एक माणूस पाहून बरं वाटलं.
24 Apr 2015 - 10:32 am | सस्नेह
गिर्जाकाका यांच्या लेखाच्या सगा यांनी काढलेल्या सुलभ नवनीताचे कुणीतरी मराठीत भाषांतर करून ग्रहणास सुलभ असा रस काढून देईल काय ?
24 Apr 2015 - 10:48 am | विशाखा पाटील
मूळ कविता पूर्ण वाचण्याचे श्रम घेतले नाहीत, त्यामुळे कवितेचा आणि याचा काही संबंध आहे का हे ठाऊक नाही. पण एक स्वतंत्र लेखन म्हणून आवडलं. रिचर्ड डॉकिन्सच्या विचारांवर तुम्ही वेगळा लेख लिहावा, असे वाटते. इथे ती चर्चा नको.
24 Apr 2015 - 7:58 pm | प्रसाद गोडबोले
सकाळी इन्टर्नेट स्लो असल्याने प्रतिसाद जात नव्हते . आत्ता सकाळचा प्रतिसाद देतोय >>>
हे वाक्य ओशोंच्या एका प्रवचनातील आहे !
आणि मुक्त माणसांनी घर घेवु नये असे कोठे लिहिले आहे ? मुक्ती म्हणजे कर्मफलातुन मुक्ती ... जेथे कर्माचा लय झाला तेथे कर्ताही संपला च की !
त्यानंतर
योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः । यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दति एव ||
अशी काहीशी अवस्था असते . आपल्याला उगाचच पद्मासन घाउन निवांत बसलेल्या लोकांची चित्रे जीवनमुक्त म्हणुन पहायची सवय असल्याने कर्मयोगी माणुसही मुक्त असु शकतो हा विचारच झेपेनासा झालाय . आमचे रामभाऊ चक्क ब्यँकेत नोकरी करत होते , गणु व्यवस्थित संसार करत होता , लोकमान्य वृत्तपत्र चालवत होते , हे सारे जीवनमुक्त होतेच की ! युध्द भुमीवर नष्टो मोहो स्मृतीलब्ध्वा असे म्हणुन युध्दाला उभाराहिलेला अर्जुन मुक्तच होता की ! अखंड स्थीतीचा निर्धारु ! श्रीमंत योगी !! हेही मुक्तच होते की !
तात्पर्य काय की मुक्तीचा कर्माशी संबंध नाही , अत्यंत कर्मासक्त माणुसही मुक्त असु शकतो आणि अत्यंत निवान्त पडुन रहाणारा भिक्षुकही बध्द असु शकतो . ( अर्थात हे विधान कळायला फार चिंतन करावे लागते )
प्रकृते: क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वशः | अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते || २७ || हे ज्याच्या लक्षात आले तो मुक्तच !
चला आता ९९ एकर्स वर जाऊन फ्लॅट शोधुयात :)
24 Apr 2015 - 10:44 am | प्राची अश्विनी
गिरीजा ऐवजी गुरुजी असावे असे वाटते.:)
24 Apr 2015 - 4:17 pm | नाखु
दोस्तहो या विषयावर बोलू काही.
"काय लिहिलय यापेक्षा कुणी लिहिलयं यालाच जास्त महत्व दिलं की असं होणारच"
ज्याच्याशी काही विषयांवर तीव्र मतभेद असूनही तोच जर काही योग्य आणि समतोल विचार मांडत असेल तर पाठिंबा+सहमती द्यायला अजिबात न कचरणारा.
चांगल्याला चांगले म्हणण्याची अति वैट्ट खोड असलेला.
जुनाट ना़खु.
24 Apr 2015 - 11:00 am | टवाळ कार्टा
पो.प.संप्रदायाच्या प्रेषीतांना आणि स.गा. यांना असे कधीपासून होते?
24 Apr 2015 - 12:35 pm | बॅटमॅन
पोपशास्त्र्यांची मार्कोव्ह चेन आवडली. आमच्याही मनात असे कैकदा होत असते, किंबहुना बहुसंख्य जन्तेच्या मनात अशी विचारमाळका चालतच असते. आय आय डी नसलेली व्हेरिएबल्स एका सेरीज़मध्ये मांडली की असेच होणार.
काय गिर्जाकाका, बरोबर म्हणतोय ना?
24 Apr 2015 - 8:08 pm | प्रसाद गोडबोले
करेक्ट ! मार्कोव्ह चेन पेक्षा स्टोकॅस्टीक प्रोसेस ! ती ही नॉन स्टेशनरी आणि नॉन टाईम होमोजीनीयस ! आणि विचारांची स्पेस कन्टिन्युअस मानली तर मग तर कन्टीन्युअस टाईम कन्टिन्युअस स्पेस ! http://en.wikipedia.org/wiki/Continuous-time_stochastic_process
अवघड आहे रे खरंच !
अभ्यास कमी पडतोय !
अजुन वाचलं पाहिजेल !
24 Apr 2015 - 9:23 pm | बॅटमॅन
मार्कोव्ह चेन ही एक स्टोकॅस्टिक प्रोसेसच आहे बादवे. :)
बट येस, कंटिन्युअस स्पेस आणि कंटिन्युअस टाईम इंडीड.
24 Apr 2015 - 9:27 pm | प्रसाद गोडबोले
हा तेच ते ! मार्कोव्ह चेन डीस्क्रीट मधे असते ना ... टाईम तर कन्टीन्युअस आहे आणि विचारही कन्टीन्युअस आहेस ... आपण लिहित असतो तेव्हाही काळ आणि विचार चालुच असतात म्हणुन जरी लिहिलेले शब्द डीस्क्रीट आणि लिहिलेली वेळ डीस्क्रीट वाटत असली तरी मुळात ती तु म्हणाल्याप्रमाणे कन्टीन्युअसच आहे , आपण जे करत आहोत त्याला डीस्क्रीटायझेशन एर्रर म्हणतात म्हणुन मी आपलं म्हणलं की मार्कोव्ह चेन पेक्षा स्टॉकस्टिक प्रोसेस म्हणु
तसे मुद्दा दोघांनाही कळाल्या असल्यामुळे शब्दांचा कीस काढण्यात अर्थ नाही ! :)
24 Apr 2015 - 9:29 pm | बॅटमॅन
इंडीड. :)
24 Apr 2015 - 12:59 pm | स्पंदना
काय होतय गिरिजा काका?
24 Apr 2015 - 1:50 pm | अजया
गिर्जा म्हणाली प्रगोला
प्रतिसाद तुझा किती हीन
प्रगो म्हणाला गिर्जाला
व्हाय आर यु सो मिन?
गिर्जा म्हणली तुझ्या डोक्यातली रद्दी विक
प्रगो म्हणे अनाहिताज मेक मी सिक
गिर्जा म्हणे काढुन टाक ती विचारांची माळ
प्रगो म्हणे अनाहितात जायचे टाळ ^_~
वर लिहिलेले वाचुन आलेली गुंगी अजून न गेल्याने एवढीच यमके सापडली.बाकीची गुर्जींनी उधार दिल्यास वापरल्या जातील!!
24 Apr 2015 - 2:03 pm | मितान
=))
24 Apr 2015 - 2:09 pm | पिलीयन रायडर
=))
24 Apr 2015 - 2:26 pm | मधुरा देशपांडे
:)))
24 Apr 2015 - 2:33 pm | स्मिता श्रीपाद
अजया ताई सहीच :-))
24 Apr 2015 - 2:40 pm | प्रीत-मोहर
=))
24 Apr 2015 - 2:52 pm | कविता१९७८
अजया सहीच
24 Apr 2015 - 2:54 pm | टवाळ कार्टा
अग्गागा...येक नंबर प्रतिसाद \m/
24 Apr 2015 - 3:00 pm | सतिश गावडे
मठाची ही अजून एक वेगळी शाखा म्हणायची का?
आधीचा "तांब्या संप्रदाय" आणि आता हा "यमक संप्रदाय" :प
24 Apr 2015 - 3:28 pm | टवाळ कार्टा
साहेब तुम्ही आधी काय लिहिले आहे ते समजवा की आम्हा पामरांना...का तुम्हीसुध्धा एक नवीन कूट-संप्रदाय सुरु करत आहात ;)
24 Apr 2015 - 3:51 pm | सतिश गावडे
अरे अरे टका बालका, कळले नाही का रे तुला?
औषधाविना बरे व्हायचे असेल तर व्यनि कर मला
24 Apr 2015 - 3:53 pm | बॅटमॅन
आपणा सर्वांचा लाडका, पोपटहित.
24 Apr 2015 - 3:56 pm | सतिश गावडे
जवा नविन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला (औषधाविना)
=))
24 Apr 2015 - 3:59 pm | बॅटमॅन
औषधाच्या नावाखाली ज्योतिष सांगू लागला =))
24 Apr 2015 - 4:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पो.प.टहित
24 Apr 2015 - 2:07 pm | प्राची अश्विनी
अजया सही!!
24 Apr 2015 - 3:15 pm | बाळ सप्रे
लवकर बरे व्हा प्रगो !!
24 Apr 2015 - 3:20 pm | इशा१२३
अजया मलाहि गुंगी आलीये.वरची कविता/लेख जे काहि असेल ते एक अक्षर उमगल नाहिये.
तुझी कविता मात्र सहिच.
24 Apr 2015 - 3:26 pm | सौंदाळा
उत्सवमुर्ती प्रगो कुठे आहात तुम्ही?
शंभरीबद्दल अभिनंदन
24 Apr 2015 - 8:19 pm | सुबोध खरे
(.)
24 Apr 2015 - 8:24 pm | सतिश गावडे
डॉक, हे काय आहे?
24 Apr 2015 - 8:29 pm | सुबोध खरे
माझ्यातर्फे पूर्णविराम
(हा मी नवा प्रतिसाद काढला आहे आणि याच्या पेटंट साठी अर्ज केलेला आहे)
24 Apr 2015 - 8:32 pm | सतिश गावडे
ओह ओके. :)
24 Apr 2015 - 8:46 pm | टवाळ कार्टा
चूकून २ पुर्णविराम नका देउ...अर्थाचा अनर्थ होईल ;)
24 Apr 2015 - 6:40 pm | जेपी
मीच कातर लावतो.
(स स ब अ)जेपी
24 Apr 2015 - 4:25 pm | नाखु
परस्पर सत्काराचा "धुराळा" खाली बसला कि मगच नारळाचं पोत काढ बाहेर, नाहेतर आत्तच उगा "नारळफेक"सुरू होईल.
आणि हो यावेळी "नेत्रांजन्"च्या बुधल्याही मागवून ठेव जरा अत्ताच फोन आला होता समीतीचा !!
24 Apr 2015 - 3:35 pm | नाखु
प्रगोला "जवलन्शील्धागाविषयनिर्मीतीसंवर्धन्-संगोपन्-विस्तारीकरण्-वैश्विककरण्-गत्धागे-मुल्यमापन्-रेचक-विरेचनमुक्ती पुरस्कार" देणेत यावा.
बातमी दै:"रोज चा सामना"
======
मान्य्वरांचे अभिप्राय या पुरस्कारा बाबत :
हा स्त्री नाम सद्रुश्य आय डी काढणार्याचा सत्कार आहे याने चुकीचा पायंडा पडेल.
अनिस (अनाहिताज निडर समिती)
ह्याने आन्याय्ग्रस्त पुरूष एकीकरण चळवळीला जोर मिळेल आणि उनकलाही दिलासा आणि आत्मविश्वास मिळेल.
उनक
संनक
व भावक संघ (मिपा)
24 Apr 2015 - 4:08 pm | हाडक्या
ना खु, तुम्ही संघिष्ट दिसतांय.. ? ;)
24 Apr 2015 - 4:20 pm | नाखु
फक्त घनीष्ठ !!!!
24 Apr 2015 - 4:17 pm | अन्या दातार
धाग्यात जे काही रान उठलंय ते बघता एक प्रश्न पडलाय. जर प्रत्यक्ष जगातील एखाद्या स्त्रीने आभासी जगात पुरुषवाचक आयडी घेतला व तसे कालांतराने उघड झाले, तर अनाहिता इतक्याच आहत (हिंदी अर्थ अपेक्षित) होतील काय??
अवांतर - पश्या, काव्यपेक्षा मुक्तक म्हणेन मी या प्रकाराला. छान उतरलंय. :)
24 Apr 2015 - 4:50 pm | टवाळ कार्टा
नै...त्यावेळेस "स्त्री-पुरुष समानता" असा विषय असेल :)
24 Apr 2015 - 4:49 pm | कवितानागेश
प्रगो, दोनचार सूट सुटीत वाक्यात सांग ना काय झालय ते.
24 Apr 2015 - 6:49 pm | प्रसाद गोडबोले
धन्यवाद माऊ ली !
कवितेचा / मुक्तकाचा विषय नावात असल्या सारखाच "इन वन्डरलॅन्ड" आहे ! आपला मेन्दु एक वन्डरलॅन्ड आहे , आपल्याला काय माहीत कुठे काय लपवुन ठेवलय ! हो हो आपलाच मेन्दु असला तरी कोणत्या कोपर्यात कुठे काय दडुन बसलय ते आपल्याच माहीत नसतं ... मग एकेदिवशी ह्या वन्डर्लॅन्ड मधे चक्कर टाकुन आलो, वर मुक्तकात जे लिहिलय ते सापडलं .
अजुन थोडेसे लिहिन वेळ मिळाला की !
प्रतिसादांबद्दल :
बाकी धन्याचा प्रतिसाद उत्तम आहे त्याला उत्तर दिले होते पण सकाळी नेट स्लो अस्ल्याने प्रतिसाद गेला नाही , रात्री निवान्त परत लिहितो उत्तर ! किस्नाच्या प्रतिसादाला उत्तर देणे आवश्यक वाटते पण त्या साठी सविस्तर वेळ काढुन धागा लिहावा असा विचार मनात आहे. ब्यॅटमॅनचा प्रतिसादावरुन मला जे काही म्हणायचं ते त्याला बरेचसे कळेल असे वाटले ( कदाचित दोघेही अमुर्त गणिताची भाषा थोडीफार शिकल्यामुळे असावे.)
स्पंदना ह्यांच्या टोकाच्या व्यक्तीद्वेषी आणि अपप्रचारी प्रतिसादामुळे दुखावला गेलो होतो , संपादकांनी सावरुन घेतले. बाकी बहुतांश अनाहिता घोळक्याने प्रतिसाद देतात हे परत एकदा पटले आहे त्याविषयी मला काहीही म्हणायचे नाही. त्यांना हे मुक्तक कळणार नाहीच ह्याची बरीचशी खात्री होतीच . पण इतरांन्नाही कळाले नाही ह्याचे फार आश्चर्य वाटले .
किमान नोलान फॅन्सना हे मुक्तक कळायला हरकत नव्हती
गिरिजा आणि पश्या हे " प्रेस्टीज " ह्या नोलानच्या चित्रपटातील मेन कॅरॅक्टर सारखे आहेत , टाईमस्टॅम्पची कल्पना मेमेन्टो चित्रपटातील नॉनलिनियर इव्हेन्ट्स आणि फ्लॅशब्यॅक ला समान आहे , काळाचा स्पीड वढणे कमी होणे , मागे पुढे होणे हे इन्टर्स्टेलार वरुन घेतले आहे , आणि बाकीच्यअ जागा जसे इन्सेप्शन चित्रपटात आपल्या सबकॉन्शन्स ने भरुन काढल्या जातात तसे भरुन काढले आहे ...
असो . मला आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरायला लागेल बहुतेक !
आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद माऊली :)
24 Apr 2015 - 6:53 pm | कवितानागेश
मी हे सगळे सिनेमे एकदा नॉन लीनियर स्पीड नी बघते, कदाचित मलापण असे लिहायला जमेल! ;-)
24 Apr 2015 - 6:59 pm | पैसा
सध्या प्रगो आणि धन्या लिहितायत तेवढे पुरे! अजून मॅट्रिक्स/इन्सेप्शन नको.
24 Apr 2015 - 7:22 pm | सतिश गावडे
म्हणजे? मी लिहिलेलं समजलं नाही? :(
24 Apr 2015 - 7:43 pm | पैसा
सुट्टं सुट्टं समजलं, पण त्याची साखळी का आणि कशी केलीय यासाठी डॉक्याला ताण द्यायची इच्छा नाय! ;)
24 Apr 2015 - 5:38 pm | स्मिता श्रीपाद
अरे मघाशी १०० झालेले ना ?
"स्वच्छ मिपा अभियान" की काय ?
26 Apr 2015 - 5:09 pm | माम्लेदारचा पन्खा
असकसं होयाचं???
27 Apr 2015 - 12:24 pm | बाळ सप्रे
संक्षींची आठवण करुन देणारे लेखन.. पण हे त्याच्याही वरच्या लेव्हलचे वाटते .. अनादी, अनंत, किंवा अणू /विश्वाचा पसारा याचा विचार करायला लागल्यावर जसं डोकं गरगरतं तसं होतय ..
27 Apr 2015 - 2:37 pm | प्रसाद गोडबोले
बाळ एकदा काय ते ठरव !
वर म्हणालास कि प्रगो बरे व्हा आता म्हणत आहेस कि तुझे डोके गरगरतय ... . एकदा काय ते ठरव बुवा ...
धागा नीट वाच आणि नोलान चे ५-६ पिच्क्चर पहा ... कनेक्ट द डॉट्स ... न कळण्यासारखे काहीच नाहीये इथे !
28 Apr 2015 - 12:24 am | सूड
गांजानंतरचे ह्यॅल्युसिनेशन्स??
28 Apr 2015 - 12:34 am | प्यारे१
धागा आड़ौला. :)
28 Apr 2015 - 1:30 pm | प्रसाद गोडबोले
धन्यवाद :)
23 Jul 2015 - 9:47 pm | जडभरत
प्रगोजी खूप सुंदर लिहिलंत. वेदांताचा खूप गहन अभ्यास दिस्तोय. असो. आपण ते परब्रह्मच् आहोत जो मानवी अनुभव घेत आहोत. सुंदर! जग विरोधात जावो पण या श्रद्धेवरून ढळू नका.खूप अवघड आहे कबूल आहे. पण म्हणून तर ते सोनं आहे.
23 Jul 2015 - 10:41 pm | एस
जडभरत, तुम्ही काय जुने धागे वर काढायला मिपाजन्म घेतलाय का? एखादेवेळेस एखादा खूपच वाचनीय धागा प्रतिसाद देऊन वर आणला तर ठीक आहे. सतत तेच केले तर मिपावर येणारे नवीन धागे लवकर खाली जातात हे तुमचा प्रगाढ मिपाअभ्यास बघता तुम्हांला समजत नसेल असे वाटत नाही.
23 Jul 2015 - 11:09 pm | palambar
भाल्चन्द्र नेमाडए यान्चे पुस्तक वाचल्यावर असेच वाट्ते.