पहाटेची आकाशवाणी ........

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
10 Apr 2015 - 5:34 pm
गाभा: 

अरूपास पाहे रूपी....
अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी.....
देवा तुझा मी सोनार....
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था.......
माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा......

नुकतेच मला अशी जुनी भक्तीगीते ऐकायला मिळाली, अतिशय सुंदर रचना, तेवढेच सुंदर संगीत आणि भाव, जयवंत कुलकर्णी, रामदास कामत, सुधीर फडके, वाणी जयराम, कुमार गंधर्व यांच्या सारख्याचें स्वर. कदाचित वर्षानुवर्षे पहाटे आकाशवाणी वर ऐकल्यामुळे असेल, ही गाणी ऐकताना असे वाटले की मन ३०-३५ वर्षे भूतकाळात मागे गेले आहे, त्याकाळी घरातील सर्व मंडळी पहाटे उठून, आपल्या पुढे वाढून ठेवलेल्या दिवसाच्या रमारागाड्याच्या चरकाला जुंपण्याच्या तयारीला लागताणा, रेडीओवर पुणे स्टेशन लावत, साधारणपणे २-३ तास… त्यावेळेत वर उल्लेखलेल्या गीतांसारखी गीते कानावर पडत असे, आणि ती ऐकत ऐकत अंघोळपांघोळ, चहापाणी, शाळेचा डब्बा, दप्तर भरणे वैगरे वैगरे काम, सर्वच करत असत… त्यामुळेच हा धागा प्रपंच ……
यामधे आपल्याला आवडणारी गीते लिहावीत, की जी आकाशवाणीवर पहिले दोन तीन तास येत असत, गीताच्या सुरूवातीच्या एकदोन ओळी, गीतकार, संगीतकार, गायक इ. जेवढी जमेल तेवढी माहिती तसेच त्या गीतासंदर्भात अजुन काही अवांतर माहिती देता आली तर अजुनच छान !

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

10 Apr 2015 - 5:40 pm | अत्रुप्त आत्मा

जगी ज्यास कोणी नाही..त्यास देव आहे...
जेथे जातो तेथे ,तू माझा सांगाती
तुझ्या कृपेने दिन उगवे हा........

सध्या ही पोहोच..अजुन आठवतील..तशी हितेच लिहिन.

अत्रन्गि पाउस's picture

10 Apr 2015 - 7:27 pm | अत्रन्गि पाउस

रामदास कामत ह्यांच्या स्वरातले
-जटा जटा (रावण कृत शिव तांडव)
-पूर्वेच्या देवा तुझे
-हरी ओम हरी ओम प्रणव ओंकार ...

hitesh's picture

10 Apr 2015 - 10:58 pm | hitesh

रामा रघुनंदना

चल ऊठ रे म्य्कुंदा

विनोद१८'s picture

10 Apr 2015 - 11:15 pm | विनोद१८

माई मोड ऑन :-
..हे रे काय लिहीलेस हितेशा 'म्य्कुंदा' ??? असे आमचे हे अत्ताच मला म्हणाले.

माई मोड ऑफ, बाकी तुझे चालुदे.

आकाशवाणीची आठवण बातम्यांपासून सुरू होते...

इयं आकाशवाणी: |
प्रवाचिका विजयश्री:

गाणी असंख्यं आहेत ..
१) स्विकारावी पुजा आता उठी उठी गोपाळा ..
२) ज्ञानदेव बाळ माझा - सांगे गीता भगवंता ..
३) उठ पंढरीच्या राजा ...
४) स्वये श्री रामप्रभु ऐकती .. कुशलव रामायण गाती
५) एक धागा सुखाचा .. शंभर धागे दु:खाचे
६) माना मानव वा परमेश्वर.
७) अवचिता परिमळु ..
८) जगी ज्यास कोणी नाही - त्यास देव आहे
९) घनश्याम सुंदरा श्रीधरा - अरूणोदय झाला
१०) बोलावा विठ्ठल .. पहावा विठ्ठल
११) माझे माहेर पंढरी ..
खूप सारी आहेत .
आताही नेटवर , सीडीज वर ही गाणी ऐकता येतात .. पण सकाळच्यावेळी आकाशवाणी ऐकताना वेगळीच वाटतात.

फारएन्ड's picture

11 Apr 2015 - 7:43 am | फारएन्ड

मस्त आठवण. यातील अनेक गाणी येथे मिळतील ऐकायला
http://aathavanitli-gani.com/Anukramanika

माझ्याकडे २५ वर्षांपुर्वी कॅसेटवर खालील गाणे होते. गायक (बहुधा) प्रसाद सावकार, पात्र - नारद, नाटक कुठले ठाऊक नाही.
विजय असो तव
सदैव कंसा
सुखी रहा तू, तुझे प्रजाजन
श्री नारायण जय नारायण
श्री नारायण जय नारायण

लिंक असेल तर कृपया कळवावी.

अत्रन्गि पाउस's picture

11 Apr 2015 - 10:50 am | अत्रन्गि पाउस

ऐकायला मिळेल का ?

शेखर काळे's picture

12 Apr 2015 - 11:19 am | शेखर काळे

आता नाही आणि ती कॅसेटही कधीच खराब झाली.
कुणाला माहिती असेल .. तर जरूर सांगा ..

ऊध्दव गावंडे's picture

11 Apr 2015 - 3:54 pm | ऊध्दव गावंडे

भल्या पहाटे अंथरूणात पडून ही गीते
ऐकल्यावर
आवाज यायचा
"आकाशवाणी पुणे
सुधा नरवणे आपणास प्रादेशिक बातम्या देत
आहे ..."
दुपारी जळगाव केंद्रावरील १.४० ची सुंदर
गाणी ऐकन्या आधी १.३० ला भारदस्त
आवाज यायचा
"आकाशवाणी ,
नंदकुमार कारखानिस आपणांस बातम्या देत
आहे..."
संध्याकाळी तर ६.५० झाले की खेळता
खेळता आमच्या पैकी प्रत्येक मित्राच्या
तोंडी यायचं
"आकाशवाणी नागपूर ,
नेताजी राजगडकर आपणास प्रादेशिक
बातम्या देत आहे ..."

ऊध्दव गावंडे's picture

11 Apr 2015 - 5:10 pm | ऊध्दव गावंडे

वेळ आठवत नाही
बहूदा सकाळी ७.०५ ची असावी
संस्कृत बातम्या कानांत घर करावयाचा

"ऐ वंम आकाशवाणी संप्रती वार्तांहं शोयंताम् प्रवाचकाहं बलदेवानंदं सागराहं..."

संस्कृत मध्ये मला फारसे गम्य नाही , चूका असल्यास जाणकारांनी कृपया दुरूस्ती करावी .

बहुदा धारवाड केंद्रावर आठवड्यातून एका वारी लागणारे आणि महाराष्ट्रात ऐकू येणारे व्यंकटेशसुप्रभातम माझे वडील आवर्जून ऐकत.
एम. एस. सुब्बालक्ष्मी यांच्या आवाजातील हे स्तोत्र माझ्या आठवणीत कायम घर करून आहे.https://www.youtube.com/watch?v=Tzr57yL_5fQ
तेव्हा सकाळी कधीकधी लागणारी " काशिकापुराभिनाथ कालभैरवं भजे " ही श्रीकालभैरवाष्टकम् मधील प्रत्येक श्लोकाच्या चवथी ओळ आठवते.
श्रीशिवतांडवस्तोत्र हे म्हणायला अवघड आणि अतिशय सुंदर स्तोत्र पण याच वेळी ऐकायला मिळे.
मोगरा फुलला
कौसल्येचा राम बाई
राम जन्मला ग सखि राम जन्मला
उघडि नयन शंकरा
पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव..... आणि अनेक.
आकाशवाणीने आमची सकाळच नव्हे तर एकूणच जगणे सुंदर आणि सुसह्य केले. या धाग्याच्या निमित्ताने हे सगळे आठवले. धन्यवाद.

सिरुसेरि's picture

13 Apr 2015 - 1:18 am | सिरुसेरि

उठी उठी गोपाळा --- संगीत देव दिनाघरी धावला ,
अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान ,
गणपतीच्या म्होरं सारी नाचु गाउया ,
न लगे मुक्ती धन संपदा , संत संग देइ सदा ,
चल ग सखे , चल ग सखे पंढरीला ,----- प्रल्हाद शिंदे
चला मंगळवेढे जाउ , नाम विठ्ठल विठठल घेउ ,