पहाटेची आकाशवाणी ........
अरूपास पाहे रूपी....
अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी.....
देवा तुझा मी सोनार....
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था.......
माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा......
नुकतेच मला अशी जुनी भक्तीगीते ऐकायला मिळाली, अतिशय सुंदर रचना, तेवढेच सुंदर संगीत आणि भाव, जयवंत कुलकर्णी, रामदास कामत, सुधीर फडके, वाणी जयराम, कुमार गंधर्व यांच्या सारख्याचें स्वर. कदाचित वर्षानुवर्षे पहाटे आकाशवाणी वर ऐकल्यामुळे असेल, ही गाणी ऐकताना असे वाटले की मन ३०-३५ वर्षे भूतकाळात मागे गेले आहे, त्याकाळी घरातील सर्व मंडळी पहाटे उठून, आपल्या पुढे वाढून ठेवलेल्या दिवसाच्या रमारागाड्याच्या चरकाला जुंपण्याच्या तयारीला लागताणा, रेडीओवर पुणे स्टेशन लावत, साधारणपणे २-३ तास… त्यावेळेत वर उल्लेखलेल्या गीतांसारखी गीते कानावर पडत असे, आणि ती ऐकत ऐकत अंघोळपांघोळ, चहापाणी, शाळेचा डब्बा, दप्तर भरणे वैगरे वैगरे काम, सर्वच करत असत… त्यामुळेच हा धागा प्रपंच ……
यामधे आपल्याला आवडणारी गीते लिहावीत, की जी आकाशवाणीवर पहिले दोन तीन तास येत असत, गीताच्या सुरूवातीच्या एकदोन ओळी, गीतकार, संगीतकार, गायक इ. जेवढी जमेल तेवढी माहिती तसेच त्या गीतासंदर्भात अजुन काही अवांतर माहिती देता आली तर अजुनच छान !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अत्तीशय सुंदर विषय..
रामदास कामत
.
@...हितेसभॉय....!!!
आकाशवाणीची आठवण बातम्यांपासून
इथे मिळतील
हे नाट्यगीत कुणाला माहिती आहे का ?
ते गाणे आता कुठे आहे
कुठे आहे तेच शोधतोय ..
भल्या पहाटे अंथरूणात पडून ही
पुरवणी...
बहुदा धारवाड केंद्रावर
मलयगिरिच्या --- कुमार गंधर्व