विरुपाक्षी हे कोलार जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. हे मुलबागलपासून ५ किमी अंतरावर असून, इथे तेराव्या शतकातील एक प्रशस्त शिव मंदिर आहे. हे मंदिर कृष्णदेवराय दुसरे ह्यांच्या कारकिर्दीत बांधले गेले. ह्याची रचना हंपीतिल विरुपाक्ष मंदिराप्रमाने असल्याचे सांगण्यात येते. (हम्पी मी अजून पाहिले नाही तेंव्हा जाणकारांनी ह्यावर प्रकाश टाकवा.) ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे एकाच गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. आणि ह्यातील एका शिवलंगाचा रंग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बदलत राहतो. मी तिथे दुपारी तासभर होतो तेंव्हा ह्याची शहानिशा करता आली. पण हे मंदिर आज दुर्लक्षित आहे इतकं मात्र खरे.
मंदिराचे प्रवेशद्वार
आत प्रवेश केल्यावर होणारे भव्य मंदिराचे दर्शन
मागून बाजूने काढलेला अजून एक फ़ोटो
ह्याच आवारात श्रीकृष्णाचेही छोटेसे मंदिर आहे. त्यातील सुंदर मूर्ती.
तिथले पार्वतीचे मंदिर बंद होते. मंदिरा बाहेरील सिंह .
मंदिराबाहेर एक अर्धवट बांधलेले प्रवेश द्वार आहे.
विरुपाक्षीहून अंदाजे १३ किमी अंतरावर गुट्टाहल्ली इथे बंगारू तिरुपती हे मंदिर आहे. ह्याला लक्ष्मी व्येंकटेश्वरा स्वामी मंदिर अशा नावानेसुद्धा ओळखले जाते. एका छोट्याश्या टेकडीवर विष्णूचे तर बाजूच्या टेकडीवर पद्मावतीचे मंदिर आहे. इथे विष्णूचे दर्शन दरवाज्यातून न घेता खिडकीतून घेतात. भृगु महर्षी ह्यांच्या स्वप्नात देवाने असेच दर्शन दिल्यामुळे मंदिराची रचना अशा प्रकारे करण्यात आल्याचे पूजार्यांनी सांगितले.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार
आत जाताच दिसणारे विहंगम द्रुश्य
पुष्कर्णिच्या मधोमध बसवलेला हा पक्षी. राजहंस आहे का?
मंदिराच्या खालच्या भागावर तयार केलेला हा गरूड , जणू मंदिर गरुडाने आपल्या पाठीवर घेतल्याचा आभास निर्माण करते.
बंगारु तिरुपतीपासून १० किमी अंतरावर कोटी लिंगेश्वर आहे. ह्या मंदिरात एक कोटि शिवलिंग स्थापन करण्याचा प्रकल्प चालू आहे. ह्याची सुरुवात १९७२ साली झाली. आजतागायत ९० लाख लिंग स्थापन झाल्याचे सांगण्यात येते.
आत जाताच आपण विविध आकाराच्या आणि प्रकाराच्या शिवलिंगाच्या सागरात हरवून जातो
हे चार मजली ईमारतिच्या उंचीचे शिवलिंग
त्याचाच जवळून काढलेला एक फ़ोटो.
दुसरे एक जवळपास वीस फुट उंचीचे शिवलिंग आणि त्यासमोर स्थापन केलला कलश
इथेच देवीच्या अनेक अवतारांच्या मूर्त्या आहेत
कोटिलंगेश्वर इथे केमरा आत नेण्यासाठी १०० रुपये द्यावे लागतात
हा पूर्ण प्रवास अर्ध्या दिवसात करता येतो. ह्या तिन्ही ठिकाणी जेवण्याची फारशी सोय नाही. गरज पडल्यास मुलबागलला जेवण करावे.
जाताना बेंगलोर चन्नई हायवे वरून कोलार बायपास करून मुलाबागालाही बायपास करून विरुपाक्षीला जात येते. येताना कोटि लिंगेश्वरहून परत मुलाबागालला ने येता, बंगारपेठ मार्गे बेंगलोरला येता येते. पण हा रस्ता थोडा अरूंद असून गाडी हळू चालवावी लागते.
सर्जेरावांनी सुचवल्याप्रमाणे - मी भेट दिलेली इतर मंदिरे
कुरुडुमुळे आणि मुलबागल http://misalpav.com/node/30729
नुग्गेहळ्ळी http://misalpav.com/node/30612
सोमानाथापुरा http://misalpav.com/node/30825
प्रतिक्रिया
31 Mar 2015 - 6:40 pm | गणेशा
अप्रतिम आहे मंदिर आणि फोटो पण छानच.
दुसरा फोटो अति सुंदर
31 Mar 2015 - 7:14 pm | प्रचेतस
मस्त फोटो
31 Mar 2015 - 9:52 pm | खंडेराव
फोटो अगदी मस्त आलेत. २ नंबरचा तर लाजवाब..
यातले कोटिलिंगेश्वर मी पाहीलेय. पण, मला काय ते मानवले नाही, नुसता आकड्यांचा खेळ वाटला.
1 Apr 2015 - 12:19 am | रुपी
फोटोही मस्तच! तुमची ही मंदिरांची मालिका अतिशय सुंदर आहे. अशी कितीतरी सुंदर पण दुर्लक्षित ठिकाणे आपल्या जवळपास असतात. तुम्ही त्यातल्या काहींची ओलख करुन देत आहात, त्याबद्दल धन्यवाद!
1 Apr 2015 - 5:30 am | यशोधरा
कोटीलिंगेश्वर आणि बंगारु तिरुपती पाहिलेय. तिरुपतीच्या मंदिराला रंगरंगोटी झालेली दिसतेय.
1 Apr 2015 - 6:22 am | श्रीरंग_जोशी
अहाहा, सुंदर आहेत फोटोज.
1 Apr 2015 - 6:44 am | कंजूस
आवडली मालिका.दगडी देवळांना रंगवणे आणि सिमेंटच्या प्रचंड भडक रंगवलेल्या मूर्ती उभ्या करणे वाढत चालले आहे.हम्पीची थोडीफार माहिती मी भटकंतीमध्ये लिहिली होती.
6 Apr 2015 - 5:07 pm | पॉइंट ब्लँक
दगडात मूर्ती घडवणारे कारागीर कमी होऊ लागले आहेत आणि शिवाय दगडात मूर्त्या घडवणे वेळखाऊ आणि खर्चिक काम. आता सगळ्यांना फास्टात आणि स्वस्तात काम करून पाहिजे असतं. मग सिमेंट्च्या मूर्त्या बनतात. असो, दगडी मूर्त्यांवरून शिवरापटनाची आठवण झाले. कोलार जिल्ह्यातले ह्या गावतले बहुतांश लोक शिल्पकार आहेत. बघुया कधी भेट द्यायचा योग येतोय ते :)
1 Apr 2015 - 8:48 am | सर्जेराव संपतरा...
लाजवाब फोटो!
1 Apr 2015 - 10:06 am | शशिका॑त गराडे
अप्रतिम
1 Apr 2015 - 10:32 am | मदनबाण
मस्त फोटो... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..
1 Apr 2015 - 3:07 pm | हरकाम्या
१ कोटी लिंगे उभारणे हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग असावा असे वाटते.नाही तरी आपल्या पूर्वजांनी अशी देवळे
बांधण्याचे उद्योग न कंटाळता बरेच वर्षे केले.
6 Apr 2015 - 5:32 pm | अत्रुप्त आत्मा
छान
6 Apr 2015 - 5:46 pm | बॅटमॅन
मस्तच ओ प्वाइंट ब्लँक साहेब. दगडी ब्यूटी इंडीड! अजून यूद्या अशेच!