Skip to main content

नुग्गेहळ्ळी

लेखक पॉइंट ब्लँक यांनी गुरुवार, 05/03/2015 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
होयसाळा राज्यघरण्याने दहाव्या ते चौदाव्या शतकापर्यंत दक्षिण भारतात राज्य केले. त्यांनी जवळपास दोनशे मंदिरे बांधली. त्यातील हळेबेद बेलूरची मंदिरे जगप्रसिद्ध आहेत. पण इतर बरीच मंदिरे दुर्लीक्षीत आहेत किंवा मोडकळीला आलेली आहेत. नुग्गेहळ्ळी हे हसन जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. श्रवनबेळगोळा पासून अवघ्या २६ किलोमीटर असूनहि प्रवाश्यांपासून लपून राहिले आहे. ह्या गावात तेराव्या शतकातील दोन सुंदर मंदिरे आहेत - लक्ष्मी नरसिंह आणि सदाशिव . ह्या मंदिरात टिपलेले काही फोटो : लक्ष्मी नरसिंह मंदिर DSC_0883 मंदिराच्या भिंतीवर विविध देवी देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत. नाट्यलक्ष्मिची सुंदर मूर्ती DSC_0770 क्लोज अप DSC_0770-001 अजून एक लक्ष्मीची मूर्ती . ह्या दोन्ही मूर्त्यांच्या हातात मक्याचे कणिस बघा. हि मंदिरे युरोपियन भारतात येण्याआधी बांधलेली आहेत. त्यामूळे मका त्यांनी भारतात आणला हा तर्क चुकीचा ठरतो DSC_0793 शेष नागवारील विष्णू. DSC_0845 गोवर्धन पर्वत उचलणार कृष्ण। DSC_0853 अजून एक विष्णू DSC_0864 हिरण्यकश्यपूचा वध DSC_0747 कालिया मर्दन. Taming Kaliya सदाशिव मंदिरात फारसे कोरीव काम आढळत नाही . पण मंदिर प्रेक्षणिय आहे. DSC_0969 अधिक माहितीसाठी http://en.wikipedia.org/wiki/Lakshmi_Narasimha_Temple,_Nuggehalli http://nuggehalli.org/ बेंगलोरहून श्रवनबेळगोळा आणि नुग्गेहळ्ळी एका दिवसात प्रवास पूर्ण होऊ शकतो. सार्वजनिक वाहतुकीची सोय बहुधा नसावी. जेवण श्रवनबेळगोळामध्ये केलेले उत्तम

वाचने 11527
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

फोटोही मस्त आलेत आणि मंदीरही..काय डिटेल्स् आहेत कामात..

होयसळांचे मंदिर म्हणजे नादच नाय करायचा. इतके जबराट कोरीवकाम अन्यत्र क्वचितच कुठे आढळते. अपरिचित मंदिराची माहिती करून दिल्याबद्दल बहुत धन्यवाद!

In reply to by कपिलमुनी

हे फोटो दुपारी तीनच्या सुमारास काढले आहेत. त्यामुळे लाइट थोडा हार्श आहे. तो कमी करण्यासाठि थोडा ब्लर आणि विग्नेट चा उपयोग केला आहे. पिकासा आणि गिम्प मध्ये काहि पर्याय आहेत. उदा कर्व वापरून काहि अंशी छेड छाड करता येते :)

ह्या दोन्ही मूर्त्यांच्या हातात मक्याचे कणिस बघा.
ते म्हाळुंग असावं. कोल्हापूर महालक्ष्मीच्या मूर्तीतही हे कोरलेलं सापडतं.

In reply to by सूड

हम्म. एकंदर वादाच विषय दिसतोय. आधि वाचायला हव होत. http://scholar.google.co.in/scholar?q=maize+in+india+somnathpur&btnG=&h… http://www.econ.ohio-state.edu/jhm/arch/maize.html असो. नजरेस आणून दिल्याबद्द्ल आभारि आहे.

कसल्या सुरेख आणि कोरीव मूर्ती आहेत. फोटो पण मस्तच आलेत. आणि म्हाळुंग बद्दल सूड शी बाडीस.

In reply to by एस

सूचनेबद्दल आभारी आहे. मिपावर पहिल्यांदाच लिहिले आहे. पूढिल लेखार सुधारण्याचा प्रयत्न करेन.

बहळा सुंदरवादा. नृसिंह फारच आवडला नवीन ठिकाणाची ओळख +१आणि लाइट इफेक्टस परिणामकारक +१.थोडक्यात छान.कणीस समृद्धिचे प्रतीक मध्यभागी फुगिर दिसतंय मक्याचं नसतं.

म्हाळुंगं किंवा बीजापूरक. प्रजननशक्तीचे प्रतिक मानतात ह्या लिंबूवर्गीय फ़ळाला. बाकी होयसळ शैली खूपच सालंकृत असल्याने साधेपणातील सौंदर्य येथे अजिबातच दिसत नाही.

In reply to by प्रचेतस

माहिती बद्दल धन्यवाद. काहि ठिकाणी ते मु़क्ताफळ pe.arl-fruit नावचे काल्पनिक फळ असल्याचे काल वाचनात आले.

काही कारणाने हलेबीडू बेलूर पाहून सुद्धा श्रवण बेळगोळ पहायचे राहून गेले आहे. आता योग आल्यास हे ही ठिकाण पहाता येईल. त्यासाठी धन्यवाद. बाकी वल्लींचा मुद्दा बरोबर आहे. दक्षिणेतील कोरीव कामात अलंकारांचा अंमळ अतिरेकच दिसतो. अर्थात त्याचे कवतिकही आहेच !

In reply to by चौकटराजा

काहि साधी सुंदर जागाहि आहेत. लिहिन पूढच्यावेळी त्यांच्याबद्दल.

अहाहाहा!!!!! काय फोटो..काय फोटो!!!! अहो तुम्ही वॉटरमार्क नाहीत का टाकला? कुणी ढापले तर? मी तर सेव्ह करुन घेतेय माझ्याक्डे, पण कुठेही वापरणार नाही.. माझ्या आनंदासाठी.. करु का?

In reply to by पिलीयन रायडर

वॉटरमार्क आज पर्यंत वापरला नाहि. तुम्हाला फोटो आवडले आणि चोरी करण्याचे लायकिचे आहेत हे वाचून आनंद झाला :). तुम्हि फोटो सेव करून ठेवू शकता. :)

In reply to by पॉइंट ब्लँक

चोरी करण्याचे लायकिचे आहेत हे वाचून आनंद झाला>> :-)

एका नवीन प्रवास स्थ्ळाची अत्यंत उपयुक्त माहिती. फोटोही अतिशय सुरेख. अजून इतर ठिकाणांची माहिती शक्य असल्यास द्या. वाचन खूण साठविली आहे.

मूर्तींवरील अलंकरण बघून शब्द संपले! तुम्हाला या फोटोंसाठी खूप धन्यवाद! असेच आणखी अपरिचित ठिकाणांबद्दल खूप लिहा!