मेसेज
किती दिवस झाले तुझा काही मेसेज नाही,
मला आहे माहीती तुझा मेसेजपेक अजून संपलेला नाही
जरी तुझा मेसेजपेक संपलेला असायचा ,
तरी दुसऱ्याच्या मोबाईल वरून का असेना तुझा मेसेज यायचा ,
जेव्हा हि वाजते मेसेज ची ringtone ,
तुझाच मेसेज असावा म्हणून लगेचच चेच्क करतो मी माझा cellphone.
काही चुकले का माझे
कि नवीन मित्र झाले तुझे
सांग ना काय आहे माझा गुन्हा ,
मी तर मित्र तुझा जुना …….
-कवि -प्रितम दादाजी तोरवणे
साक्री ता. साक्री ,जिल्हा -धुळे
प्रतिक्रिया
16 Mar 2015 - 6:06 pm | प्रचेतस
अतिशय उत्तम अशी सहज सुंदर कविता.
येऊद्यात तुमच्या पोतडीतून अजूनही अशाच काही.
16 Mar 2015 - 6:17 pm | असंका
+१
17 Mar 2015 - 3:54 am | रुपी
तेवढा "चेच्क" शब्दाचा अर्थ मात्र कळला नाही.
16 Mar 2015 - 6:06 pm | स्पा
चचा ची आठवण झाली
येरे चचू
16 Mar 2015 - 10:00 pm | अजया
वल्लींनी प्रोत्साहण दिलंय म्हंजे कविता बेस्टच!!! लिहित रहा.आम्ही वाचतच राहु,नेटपेक संपला तरी..
16 Mar 2015 - 10:46 pm | इनिगोय
+१
आजच्या काळाला सुसंगत असलेल्या सांकेतिक भाषेतलं नीर्भीड गहन भाश्य.
17 Mar 2015 - 6:00 am | स्पंदना
अरे वा!
इनिच्या नेटला...हे आपल...हृदयाला भिडलेलं दिसतयं.
आणि वल्ली म्हणजे आजच्या नव कविंचे तोरण हार!!
17 Mar 2015 - 7:37 am | सस्नेह
ते 'तोरण' नसून 'तारण' हार आहेत !
..तुमची शब्दप्रतिभा तारण पडलेली दिसतेय ;)
17 Mar 2015 - 9:00 am | अत्रुप्त आत्मा
@काही चुकले का माझे
कि नवीन मित्र झाले तुझ>> =)))))
@ वल्लींनी प्रोत्साहण दिलंय म्हंजे कविता
बेस्टच!!! >> +++१११ अगदी अगदी! वल्ली नव्याच काय? जुन्या ही लोकांना असच्च प्रो त्साहण देत असतात . या बाबतीत त्यांचा की बोर्ड कोणीही धरु शकत नाही. फारच सेवाSभावी मणो वृत्तीचे आहेत. वल्ली!
17 Mar 2015 - 12:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रोत्साहानाच माहिती नाही...अशा प्रेम कविता आल्या की धावत येतो. कोनाचं लफ़्र तुटलं की खांदा द्यायला हमखास येतो. नै तर ते शिल्प भले आणि वल्ली भला. (पळा आता) ;)
-दिलीप बिरुटे
17 Mar 2015 - 1:08 pm | प्रचेतस
=))
16 Mar 2015 - 10:39 pm | मनीषा
काही चुकले का माझे
कि नवीन मित्र झाले तुझे
सांग ना काय आहे माझा गुन्हा ,
मी तर मित्र तुझा जुना …
मन चिंती ते वैरी न चिंती ...
16 Mar 2015 - 11:04 pm | इनिगोय
अरेच्या! असं आहे होय...
17 Mar 2015 - 9:17 am | शैलेन्द्र
वर्मावर बोट..
17 Mar 2015 - 12:18 pm | मनीषा
आता हे वर्मा कोण?
कन्फ्युजन वाढवू नका हो
16 Mar 2015 - 10:54 pm | खटपट्या
खूप छान कविता !!
17 Mar 2015 - 7:58 am | यसवायजी
'पेक'संपलेला नाही, पैकं सम्पलेत तुमच्याकड़चे. आता नवा गड़ी नवा चेच्क.
17 Mar 2015 - 12:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रितम मी हजार वेळा सांगितलं की प्रेम करु नका आणि प्रेमात पडला असला तर तक्रार करु नका.
सहन करा. अरे, तिची काही मजबुरी असेल तिला कोणी मेसेज करु देत नसेल. असा विचार कर ना.
येईल तुला तिचा मेसेज. वाट पाहा. तुला त्रास होतो तिलाही त्रास होतो आपला दिसतो तिचा नाही. :)
कालच मी माझ्या मैत्रीणीला मेसेज केला. कोणाचा शेर आहे काय माहिती पण कामाला आला. तुही सेंड कर तिला मेसेज. माझं नाव नको सांगु :)
इसन दुनिया मे कोयी किसी का हमदर्द नही होता.
लाश को शमशान मे रखकर अपनेही लोग पुछते है 'और कितना वक्त लगेगा'
-दिलीप बिरुटे
17 Mar 2015 - 3:42 pm | एक एकटा एकटाच
डॉक्टर
शायरी
लईभारी
17 Mar 2015 - 5:03 pm | शब्दबम्बाळ
मजबुरी शब्दावरून बशीर बद्र यांची शायरी आठवली…
कोई कांटा चुभा नहीं होता,
दिल अगर फूल सा नहीं होता,
कुछ तो मजबूरियां रही होंगी
यूँ कोई बेवफा नहीं होता…
18 Mar 2015 - 1:27 pm | चित्रगुप्त
.... कौन रोता है किसी और की खातिर ऐ दोस्त, सबको अपनी ही किसी बात पे रोना आया..... कभी खुद पे कभी हालात पे रोना आया...
17 Mar 2015 - 1:13 pm | आदूबाळ
या ऐवजी
गायछाप आणि चुना ,
मी तर मित्र तुझा जुना …….
असंही चाललं असतं. अमर मैत्रीचं प्रतीक.
17 Mar 2015 - 3:44 pm | एक एकटा एकटाच
*lol*
17 Mar 2015 - 5:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
कायतरीच काय ! आता प्रितमच्या मनात अमरबद्दल संशय आला तर दोषी कोण ? ;)
17 Mar 2015 - 6:03 pm | आदूबाळ
अच्छा. तो-रवने दो.
18 Mar 2015 - 1:22 pm | चित्रगुप्त
मी तर मित्र तुझा जुना …….
-कवि -प्रितम दादाजी तोरवणे
साक्री ता. साक्री ,जिल्हा -धुळे
................. यावरून ' वाहवा वाहवा चेंडू हा, सुरेख कितितरि खचित हा" या कवितेच्या शेवटी येणार्या "मिस मेरी भोर" ची आठवण झाली. कुणाला माहीत आहे का ही कविता पूर्ण ?