* मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावे
गावांच्या नावांच्या अभ्यासाला टोपोनिमी मराठीत स्थलनाम अभ्यास असे म्हणतात. गावांच्या नावांच्या भेंड्या खेळण्या पलिकडे जाऊन विशीष्ट भौगोलीक परिसरातील भाषेचा आणि मानवी स्थलांतराचा ढोबळ अंदाज येण्यास स्थलनाम अभ्यास उपयूक्त ठरू शकतो. अर्थात असे अंदाज ढोबळच असू शकतात त्यावरून अंतीम स्वरूपाचे निष्कर्ष काढणे सयुक्तीक असेलच असे नाही.
* आता पर्यंत या धाग्यावर झालेल्या चर्चा
** अणसूर, पनस, फणस , कणस , सणस, अनासपुरे
** कुडाळ / कुडाल / कुटाल आणि चेन्नई / मद्रास
** थिर': थिरूपती, थिरूअनंतपूरम आणि कोविल : नागरकोविल - (मिपा सदस्य मार्गी)
** होसा, आणि उर - पेट्टे, हळे (मिपा सदस्य कंजूस, शेखरमोघे) उर
** मालेगाव - (मिपा सदस्य टोपी)
** मुंगी-पैठण
** आबाद, ग्राद, ग्राम, गाव - (मिपा सदस्य हुप्प्या)
** बुरुज-बुर्ज-बर्ग-बर्ख - (मिपा सदस्य आदूबाळ)
** रावळपींडी
** प्रत्यत : मळा , मळी किंवा मळा; उदा मालवण, मलावन, करमळी, उसगाळीमाळ, करमळ, हरमळ, पनसामाळ अफगाणीस्तानातील Mala, Gholmala, Karmalay, Kamal Khel,
*** सर्वांच्याच चर्चा सहभागाचे आभार. जिथे कमी जागेत सहज शक्य आहे तेथे उपचर्चा चालू करणारे किंवा महत्वपूर्ण माहिती विश्लेषणात योगदान करणार्या सदस्यांचा संदर्भाच्या दृष्टीने युक्त जावे म्हणून सदस्य नामोल्लेख कंसात करण्याचा प्रयत्न केला आहे पण प्रत्येक चर्चा सहभागीचे नाम नमुद करणे पूर्ण जागा त्यातच व्यापली जाऊ नये म्हणून टाळले आहे. सर्वांच्याच चर्चा सहभागाचे पुनश्च्च आभार.
अलिकडेच आंतरजालावर वाचन करताना श्री लंके मध्ये महारागाम नावाचे तर आझरबैजान देशात लंकारन अशी नावे योगा योगाने वाचण्यात आली. भारतात ur, ner, palli, , veli, cheri, pat, kuppam, padi, , vayal, vani (wani), vali, wadi इत्यादी प्रत्यय असणार्या ग्रामनामांची मोठीच संख्या आहे. यातील 'उर', 'नेर', 'पत/पात/पाट', 'वट' हे प्रत्यय असलेली ग्राम नामे इराण मध्येही आढळत असावीत नगर हे प्रत्यय असलेली ग्राम नामे अफगाणीस्तानातही असावीत. यातील बरेच प्रत्यय आपल्या वापरात वाचनात एवढे सरावलेले असतात की सहज जाणवतही नाहीत पण आजकाल आंतरजाल आणि सोप्या संगणकीय सुविधांनी ग्रामनामातील एकसारख्या प्रत्ययांचा अभ्यास करणे सोपे झाले आहे.
*भारतातील ग्राम नामे ऑनलाईन शोधण्यायोग्य सुविधा
**सेंसस इंडीया
**पोस्टल पिनकोड
**लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी
* अफगाणीस्तानातील गावांची यादी या दुव्यावर उपलब्ध असलेली आढळली
* United Nations Group of Experts on Geographical Names यांच्या वेब पेजवर इतर काही देशांसोबतच इराणमधील गावांची नावांची यादीचा दुवा आहे.
* युके मधील गावांच्या नावांच्या प्रत्ययांची यादी इंग्रजी विकिपीडियावरील लेखात उपलब्ध आहे. (हा धागा लेख मुख्यत्वे मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावांशी संबधीत असला तरी संदर्भा साठी म्हणून हा दुवा नमूद केला आहे.
मला स्वतःला मुख्यत्वे मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांच्या नावातील साधर्म्याची माहिती शोधण्यास आवडते. खासकरून अझरबैजान आणि अर्मेनिया या देशातील ग्रामनामांमध्ये मला सध्या बर्या पैकी रस आहे पण अफगाणिस्तान इराणच्या ग्रामनामांच्या सविस्तर याद्या जेवढ्या सहजतेने आंतरजालावर शोधता आल्या तेवढ्या सहजतेने मध्य आशियातील इतर देशांच्या माझ्या शोधात मला मिळाल्या नाहीत. कुणाला त्या उपलब्ध होऊ शकल्यास अथवा मध्य आशियातील नोंद घेण्याजोगी ग्रामनामाची साधर्म्ये आढळल्यास या धागा प्रतिसादातून नोंदवावीत अशी विनंती आहे.
* शोधगंगावरील शोध प्रबंध दुवे
** Cultural history of the konkan based on silahara inscriptions Researcher: Paranjape, Binda चॅप्टर ९ पिडीएफ दुवा
* माझे स्थलनाम विषयक उप धागे
* अंक, वेंक, अंग, वेंग, वेंगुर्ले, वेंगसर, बेंगलूर, वेंकटेश
* कोंडा, कोंडाणा; कोंड, कोंडके, कोंडदेव
* आटपाटनगर, पाटण, पाटील, पटेल इत्यादी
* माझे शब्द व्युत्पत्ती विषयक ईतर धागे
* मंदिर या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ?
* पंक, पाकळी, पाखी, पाखरु, आणि ऋग्वेदातील पाकः
* आषाढीच्या निमीत्ताने पुंडलीकाच्या शोधात पुन्हा एकदा ...
* स्थलनाम आणि शब्द व्युत्पत्तीशी संबधीत ईतर धागे
* येल्ला आणि तीच्या दासी
* राजराजेश्वरी,राजरा, मेसाई, मेसको, मायराणी देवींची माहिती हवी
* टवळी आणि सटवी
* मिसळपाव बाह्य शब्द व्युत्पत्ती धागे (माझे)
प्रतिक्रिया
20 Feb 2015 - 2:16 pm | सतीश कुडतरकर
सिधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण - Malvan
इराण मधील मलावन - Malavan
20 Feb 2015 - 6:11 pm | माहितगार
वर नोंदवलेल्या अफगाणि यादीत van असलेल एकच Karvan Kasi या नावाने अपवाद मिळाल. अर्थात सिधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये माळ + वन हे सहज लक्षात येतात इराणच्या यादीत शोध दिल्या नंतर van असलेला Ābgāvān सारख्या नावांचा दहा पानांचा तरी शोध येतो आहे. वर UNGEGN वरून मिळणारा इराणी स्थल नामांचा डाटाबेस सॅटेलाईट व्ह्यूला जोडला आहे. van, ur, ner, हे शब्द शोधताना त्याचे लोकेशन दोन मोठ्या जलाशयांच्या मध्ये दिसते आहे. जलाशयांची नावे त्या सॅटेलाईट व्ह्यूला डायरेक्टली नमुद केलेली नाहीत ते कास्पीअन सी आणि लेक उर्मीया असतील का ते पाहून कुणी सांगू शकेल का ?
20 Feb 2015 - 6:24 pm | माहितगार
अफगाणी यादीत Mal बहुधा दोन प्रकारात येत असावे एक तर मलंग,मलीक,मलाल,जमाल अशा नावात येते आहे पण अर्थातच त्यांचा इथे संबंध नाही. शमाली शोमाली अशी नावे दिसतात त्यांचा अर्थ सुभा असा होत असेल का ?
Mala, Gholmala, Karmalay, Kamal Khel, अशा प्रकारशी malestan या नावाचा प्रांताचे नावही दिसते आहे यातील mala भारतातील माला उच्चाराशी संबधीत असेल का हे त्यांच्या भाषांची पार्श्वभूमी असल्या शिवाय सांगता येणार नाही पण साधर्म्य रोचक वाटत आहे
20 Feb 2015 - 6:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
शमाली शोमाली अशी नावे दिसतात त्यांचा अर्थ सुभा असा होत असेल का ?
शमाली / शोमाली हे दिशादर्शक विशेषण आहे...
अश् शर्क (الشَّرق) = पूर्व
अल् घर्ब (الغَرب) = पश्चिम
अश् शम्माल (الشَّمال) = उत्तर
अल् जनूब (الجَنوب) = दक्षिण
शमाली = उत्तरेकडे असलेले ठिकाण / उत्तरेकडून येणारा/री (व्यक्ती, वारा, पाऊस, इ)
शोमाली हे शमालीचे एक बोलीरूप आहे.
20 Feb 2015 - 6:46 pm | माहितगार
ग्रेट शोमाली शब्द ऐकण्यात होता नेमका अर्थ माहित नव्हता. रोचक माहितीसाठी धन्यवाद
20 Feb 2015 - 7:55 pm | पैसा
मळा आहे ते. मळी किंवा मळा शेवट येणारी गावे असतात. उदा. करमळी, उसगाळीमाळ, करमळ, हरमळ, पनसामाळ (ही सगळी गोव्यातली गावे आहेत).
21 Feb 2015 - 5:22 pm | माहितगार
उसगाळीमाळ आणि पनसामाळ मध्ये माळ हा प्रत्यय सुस्पष्ट दिसते आहे. मळा प्रत्यय घेणारी गावे महाराष्ट्रात आहेत गोव्यात अथवा कोकणीत माळ हा शब्द मळा या अर्थाने येतो असे आपणास म्हणावयाचे आहे का ? (मळा हा शब्द दक्षिण भारतीय भांषांमध्ये सुद्धा वापरला जातो का याची माहिती जाणकारांनी द्यावी). परंतु मळा हा शब्द उत्तर भारतीय भाषात अथवा संस्कृतात माझ्या ऐकण्यात नाही असल्यास जाणकारांनी अधीक माहिती द्यावी. माळ हा शब्द मराठीत मुख्यत्वे गळ्यात घालण्याचा दागिना. आणि माळ - वैराण, सपाट प्रदेश या दोन अर्थांनी वापरला जातो. पुस्तक डॉट ऑर्ग या ऑनलाईन हिंदी डिक्शनरी नुसार माल या शब्दाचे माल पुं० [सं० मा+ रन्, र—ल, पृषो०] १. क्षेत्र। ३. वन। जंगल। ६. एक प्राचीन अनार्य या म्लेच्छ जाति। ६. एक प्राचीन देश। हे अर्थ भौगोलीक प्रदेशांच्या संदर्भाने दखल घेण्या जोगे वाटतात. महाराष्ट्रात माळ हा प्रत्यय माळ - वैराण, सपाट प्रदेश या अथवा उपरोक्त भौगोलीक अर्थाने बर्याच गावांच्या नावात येत असावा. मालेगाव, माळेगाव, माळशिरज, माळशेज, यवतमाळ इत्यादी त्या शिवाय माळवा, ह्या भौगोलीक प्रदेशाचे नावही मराठी लोकांना सुपरिचीत आहे. पुस्तक डॉट ऑर्ग नुसार मालद नावाच्या प्रदेशाचा उल्लेख रामायणात त्राटीकेने उजाड केलेल्या प्रदेश म्हणून येतो. मालदा/मालदह हे बिहार मधील शहर आहे.
आपण मराठी लोक माळा शब्दाचा हिंदी उच्चारण माला असे करण्याचा प्रयत्न करतो तसे अफगाणी उच्चारणांबाबत झाले असू शकेल का हा विचार करून मी वरच्या प्रतिसादात mala शब्दाचा वर उल्लेख भौगोलीक क्षेत्र या अर्थानेच केला. अर्थात प्रत्यक्षात तुम्ही म्हणता तसेही असू शकेल का ते अधीक भाषाशास्त्रीय शोध घेतल्या शिवाय नक्की सांगता येणार नाही असे वाटते.
आपण अफगाणीस्तानातील Mala, Gholmala, Karmalay, Kamal Khel, या शब्दांबद्दल चर्चा करत आहोत आणि तेथेही फळबागा भरपूर असणार पण त्यांना मळा म्हणत असावेत यासाठी इतर भाषिक संदर्भांची गरज पडेल असे वाटते.
21 Feb 2015 - 6:03 pm | पैसा
माळ म्हणजे ओसाड गवताळ पठार, मळा म्हणजे भाजीचा/फळांचा/शेतीचा पट्टा. लहान मळा म्हणजे मळी. अफगाणिस्तानात तोच अर्थ असलेले वेगळ्या उच्चाराचे शब्द असू शकतील कारण या दोन्ही प्रदेशातल्या भाषांचे कूळ एक असणार.
21 Feb 2015 - 1:54 pm | पगला गजोधर
यु एस ए पेनसिल्वेनियातील मालव्हर्न….
20 Feb 2015 - 3:45 pm | आदूबाळ
बुरुज-बुर्ज-बर्ग-बर्ख हे भारतापासून ते हॉलंडपर्यंत स्थळनामांत वारंवार येतं. गॅरिसन/फोर्टिफिकेशन असा काहीसा अर्थ असावा.
20 Feb 2015 - 6:35 pm | माहितगार
बुर्ज-बर्ग हा संबंध माहित नव्हता. आशियाई नावांशी साधर्म्य असणारी अजून काही युरोपीय उदाहरणे आहेत का ? कारण माझ्या आत्तापर्यंतच्या वाचनात तशी कमी आलीत. बुर्ज-बर्ग अशा प्रकारचा बदल लक्षवेधल्या शिवाय लक्षात येईलच असे नाही.
20 Feb 2015 - 8:19 pm | विशाखा पाटील
स्पेनमध्ये इस्लामी राज्य होते, त्यामुळे तिथे अरब नावांचा प्रभाव सापडतो. उदा. 'बेने' म्हणजे '..ची मुलं'. (भारतात आलेल्या ज्यूंची ओळख 'बेने इस्राईल' अशी आहे.) बेने नावाने सुरू होणारी स्पेनमध्ये गावे आहेत.
20 Feb 2015 - 8:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
बिन् = इब्न (= चा मुलगा) वापरून नावे लिहीण्याची प्रथा सर्व मध्यपूर्वेत आहे. बेने हा शब्द त्याच अर्थाने जास्त करून इझ्राईली / ज्यूंमध्ये वापरला जातो.
(मुलाचे नाव) बिन् (वडीलांचे नाव) बिन् (आजोबांचे नाव) (टोळी/ट्राईबचे नाव) असे पूर्ण नाव होते.
उदा: फहाद बिन्/इब्न अब्दुलाझिझ बिन्/इब्न तारिक अल् सौद
21 Feb 2015 - 6:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
त्यात "बुर्ग" पण सामील करा. उदा. हांबुर्ग (जर्मनीतले एक शहर)
इतर काही उदाहरणे:
संस्कृत ---> जर्मन (उच्चार)
रथ ---> rad (राड)
अक्ष ---> achse (आख्शं)
नाभी ---> naba / nabe (नाबा / नाबं)
गर्भ ---> grifan / griff (ग्रिफान / ग्रिफ्)
याशिवाय मातृ, पितृ, भ्रातृ, हस्त, इ कित्येक संस्कृत शब्दांची (जे आजच्या अनेक भारतीय भाषामध्ये तसेच्या तसेच अथवा थोड्याफार फरकाने रूढ आहेत) अनेक युरोपियन भाषांची जवळीक सर्वमान्य आहेच.
आशियातील भारतापासून ते मुख्य युरोप खंड, ब्रिटनसारखी बेटे आणि वसाहतवादामुळे अमेरिका यांचा मानवी प्रसरणात संबंध आहे. अर्थातच, या प्रचंड आकाराच्या भूभागावर प्रचलीत असलेल्या भाषांत बरेच दुवे आढळून येतात. म्हणून या सर्व भाषांना "इंडो-युरोपिअन भाषाकुटुंब (लँग्वेज फॅमिली)" म्ह्टले जाते.
मात्र, शतकानुशतके एकमेकापासून हजारो किलोमीटर अंतराने विभागलेल्या या भाषांतील शब्दांचे उत्पत्ती-संबध लावताना केवळ उच्चारसाधर्म्यावर अवलंबून न राहता त्यांत (अ) अर्थसाधर्म्य व (आ) व्याकरणसाधर्म्य आहे की नाही हे पाहणे जास्त महत्वाचे आहे.
इंडो-युरोपिअन भाषाक्षेत्र : अशिया आणि युरोप
.
इंडो-युरोपिअन भाषाक्षेत्र : अमेरिका
.
21 Feb 2015 - 7:34 pm | माहितगार
इंडो युरोपीयन भाषागटात परस्पर साधर्म्य आहे पण ते टोपोनिमीतही खासकरून गावांच्या नावांच्या बाबतीत त्याच प्रमाणात आहे असे म्हणता येईल की गावांच्या नावांच्या बाबतीत साधर्म्य कमी आहे. गावांच्या नावांच्या बाबतीत साधर्म्य कमी असेल तर स्थलांतर विषयक निष्कर्षात फरक पडावयास हवे असतील या बाबत अधिक माहिती मिळाल्यास वाचावयास आवडेल.
20 Feb 2015 - 3:53 pm | आशु जोग
बंगळूरुमधे येलहंका नावाचा भाग आहे.
महाराष्ट्रापेक्षा बंगळूरु ये लंका के पास है म्हणून येलहंका नाव असावे असे आमचा गग्गी म्हणतो.
20 Feb 2015 - 6:37 pm | माहितगार
:)
20 Feb 2015 - 7:31 pm | हाडक्या
काका, तुमचे धागे पाहून मला उपक्रमाची खूप खूप आठवण येते हो.. तुम्हाला उपक्रमासारख्या संस्थळाची खूप गरज आहे.
(कुठे नेऊन ठेवलाय उपक्रम माझा?)
21 Feb 2015 - 5:28 pm | माहितगार
हम्म.. असूद्यात मिसळपाव खात खात उपक्रम करुयात की, गावांच्या नावांचा आंतरजालीय शोध एक चांगला छंद/उपक्रम आहे सवडीनुसार जरुर जॉईन व्हा.
20 Feb 2015 - 7:42 pm | कंजूस
श्रीलंकातील गावांच्या मोठ्या नावाची फोड करून कसे लक्षात ठेवायचे याबद्दल लोनली प्लानेट च्या पुस्तकात फार छान माहिती दिली आहे त्याची आठवण झाली अर्थात प्रताधिकारात असल्याने चूप.
21 Feb 2015 - 5:34 pm | माहितगार
ओके. एखाद्या गावाच्या नावाबद्दल इतर लोक काय म्हणतात याची चर्चा करताना लोनली प्लानेट काय म्हणत याची चर्चा समीक्षण या कॅटेगरीत बसून कॉपीराईट अपवादात मोडेल असा अंदाज आहे. बाकी माहितीसाठी धन्यवाद
21 Feb 2015 - 3:09 am | खटपट्या
पाकीस्तानातील रावळपींडी हे गाव मला नेहमी भारतात असल्यासारखे वाटते.
कोकणातल्या माझ्या गावाच्या बाजुच्या गावाचे नाव "भू" असे आहे. :)
आता जीथे काम करतोय तीथे एका नदीचे नाव कर्न रीव्हर असे आहे. आम्ही आपले उगाच म्हणतो "प्राचीन काळी इथे कर्ण येउन गेला असावा" :) तसेच योशमाईट जंगलाला बरेच भारतीय "यशोमती पार्क" असे म्हणतात. :)
21 Feb 2015 - 4:23 am | पिवळा डांबिस
योशमाईट नाय मालक, त्याचा उच्चार योसेमिटे असा आहे.
मला वाटतं तो रेड (अमेरिकन) इंडियन भाषेतला शब्द आहे....
21 Feb 2015 - 11:59 am | आशु जोग
पाकीस्तानातील रावळपींडी हे गाव मला नेहमी भारतात असल्यासारखे वाटते.
यावर माहितगार यांच्याकडून उत्तर मिळणार नाही. त्यांची फ्रीक्वेन्सी भलतीच असते.
21 Feb 2015 - 5:40 pm | माहितगार
आमच्या अनुपस्थितीचे परस्पर नाहीते अर्थ लावून 'आमच्या अखंड भारत पक्षातील लोकांना' नाहक फितुर करण्याच्या प्रयत्नांचा आम्ही तीssव्र णिषेध करटो. :)
21 Feb 2015 - 5:44 pm | माहितगार
हे बरय जो भागच भारताचा होता (आणि भविष्यात पुन्हा असेल) त्यातील एका गावाच्या नावा बद्दल असल्या सारखे वाटतेय म्हणताय :) आमच्या अखंड भारत पक्षात पूर्णपणे सामील व्हा की ! अए तळ्यात मळ्यात कशामुळे ?
आमच्या अखंड भारत पक्षाला बाकी कर्न रीव्हर आणि योशमाईटचे जंगल नको आहे आम्हाला आमच्या सीमा सांभाळता आल्यातरी पुरे आहेत ! :)
23 Feb 2015 - 12:27 am | खटपट्या
अखंड भारत पक्ष ? येतो की. फोर्म भरावा लागतो की प्रवेश फी द्यावी लागते ? मुख्यालय कुठे ?
25 Feb 2015 - 2:52 pm | माहितगार
:) मिपावरूनच कंपू स्वरूपात चालू करून पुढे पक्ष म्हणून वाढवण्याचा इरादा आहे ! तुर्तास आमच्या समवेत कंपूगिरीत सहभाग नोंदवण्या शिवाय इतर काही फॉर्मॅलिटी नाहीत. मिपा हेच मुख्यालय :)
21 Feb 2015 - 4:21 am | पिवळा डांबिस
लुईझियानामध्ये एका गावाचे नांव Delhi आहे.
पण शिंचे त्याचा उच्चार मात्र डेल्हाय असा करतात!!!
21 Feb 2015 - 5:51 pm | माहितगार
ग्रेट इंग्रजी विकि तपासला तेव्हा युएस मध्ये अर्धाडझन तरी Delhi दिसताहेत खरच तिकडेच अजून एक भारत उघडायला हरकत नै :)
21 Feb 2015 - 7:10 am | कापूसकोन्ड्या
Vaduz
Vaduj, Maharashtra 415506
21 Feb 2015 - 6:27 pm | माहितगार
रोचक माहिती महाराष्ट्र आणि भारतात वट/वड पासून वाडी वगैरे काही प्रत्यय आहेत त्याच प्रकारे महाराष्ट्रातले वडूज संभवेल असे वाटते.
21 Feb 2015 - 10:32 pm | विशाखा पाटील
अरबीमध्ये सुकलेल्या नदीपात्राला आणि दरीला 'वाडी' असे म्हणतात आणि अरबी स्थलनामांमध्ये वाडी हा प्रत्यय सापडतो. महाराष्ट्रात अरबी आणि फार्सीच्या प्रभावातून हा शब्द आला असावा.
21 Feb 2015 - 11:05 pm | माहितगार
बरोबर आपल्याकडे हिंदी उर्दुत 'वादी' असा होऊन येतो. पण वट/वड पासून आपल्याकडे अनेक शब्द आहेत जसे की वाटीका, वाडा. आपल्याक्डील ग्राम नाम वाडी हे 'वाडा' पासून झाले असण्याची शक्यता मला अधीक वाटते आहे. वट हे झाडाचे नाव प्रोटो इंडोयुरोपीय्न भाषाकुळात राहीले असेल तर दरी या अर्थाचा अरेबीक वाडी/वादी सुद्धा त्यापासून आलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे वाटते अर्थात मी चूकही असू शकतो.
22 Feb 2015 - 2:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
तो अरबी शब्द वाडी नसून "वादी" असा आहे. वादी म्हणजे दरी.
फार पूर्वी अरबस्थानात पाण्याने भरलेल्या नद्या होत्या तेव्हा त्यांच्या पाण्याच्या ओघाने या वाद्या (दर्या) बनलेल्या आहेत. आता त्यातील फारच कमी वाद्यांमध्ये पाणी असते, बहुतेक सर्व कोरडी ठणठणीत झालेली पात्रे आहेत.
21 Feb 2015 - 11:36 am | सतीश कुडतरकर
थोडस अवांतर
आमच्या चायवाल्याकडे 'प्रातःकाल' नावाचा हिंदी पेपर येतो. त्यात राजस्थान मधील बातम्या असतात. कधी नजरेखालून घातल्यास महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील गावांच्या नावाचेच एखादे गाव असतेच असते. जसे रत्नागिरीतील चिखली, खेड. ठाणे जिल्ह्यातील केळवा (Beach). कारण कोकणातील सध्याचे निवासी काही निवडक जाती सोडल्यास स्थलांतरित आहेत.
21 Feb 2015 - 6:30 pm | माहितगार
रोचक, भारतातल्या भारतात तर खूप एकसारखी गाव नावे आहेत बरीच नावे भारतच्या चारही टोकास आढळतात, डाटाबेस सर्च केलेतर थक्क व्हावयास होते.
21 Feb 2015 - 12:20 pm | आदूबाळ
Prague - प्रागज्योतिषपूर
Gowda असं हॉलंडमधल्या एका गावाचं नाव आहे. पण त्याचा उच्चार "खावडा" असा आहे.
21 Feb 2015 - 6:33 pm | माहितगार
रोचक माहिती Gowda युरोपात एकच असेल का अजून असतील आपली दक्षीण भारतीय मंडळी खुष होतील. :)
24 Feb 2015 - 11:35 pm | हाडक्या
फ्रांसमध्ये एक सचिन नावाचे गाव आहे.. :)
1 Jun 2018 - 11:42 pm | गामा पैलवान
स्कॉटलंड मध्ये ठाणे नावाचं गाव आहे.
-गा.पै.
1 Jun 2018 - 11:43 pm | गामा पैलवान
चुकलो, ते बिरूद आहे.
क्षमस्व!
-गा.पै.
25 Feb 2015 - 3:07 pm | माहितगार
देवीच्या शक्तिपीठांपैकी एक हिंग्लजा मातेचे मंदीर बलुचीस्तानात स्थीत आहे (त्या देवीची स्थानिक मुस्लिम आणि राजस्थानादी प्रांतात चांगलीच फोलोअरशीप (भक्तगण) आहेत). कदाचीत अफगाणिस्तानातही मंदिर राहीले असावे असा गूगल बुक्सचा (हिंदी) संदर्भ दिसतो आहे पण दुजोर्यासाठी अफगाणिस्तानच्या डाटाबेस मध्ये पडताळता आला नाही. या देवीची नावे भारतात स्थळनामात आली असावीत असे दिसते. बलुचीस्तानमधील देवी गावाचे स्थलनाम हिंग्लज असेच आहे आणि तेथील नदीचे नाव हिंगोल आहे. हिंग्लजगड नावाने एक शक्तीपिठ माळव्यात मध्यप्रदेशात असावे. उत्तरप्रदेशात हिंगौरी नावाचे गाव हिंगलजा देवी शी संबंधीत आहे. त्या गावाच्या नावावरून हि देवी गौरींपैकी असण्याची शक्यता असावी का ? मला महाराष्ट्रातील गडहिंगलज आणि हिंगोली ह्या दोन गावांची नावे लागलीच आठवली (पण महाराष्ट्रातील या गावांच्या नावाच्या आंतरजालावरील माहितीत हिंगलजा देवी बद्दल नमुद केलेली माहिती काही आढळली नाही)
25 Feb 2015 - 3:16 pm | माहितगार
उस्मानाबाद जिल्ह्यात हिंग्लजवाडी नावाचे गाव दिसते आहे.
शिवाय हिंगण/णा/णी अशी स्थलनामे ही महाराष्ट्रात दिसताहेत पण हिंगलजा देवीशी संबंधीत असतील का नाही हे सांगणे कठीण आहे.
25 Feb 2015 - 7:50 pm | माहितगार
हिंगलाज देवीचे मूळ या नावाने लोकसत्तावर सुकन्या आगाशे यांचा सविस्तर माहितीपूर्ण आणि रोचक लेखच मिळाला.
1 Jun 2018 - 11:12 pm | गामा पैलवान
कैकेशस पर्वतराजीत हिंगुश / इंगुश नावाची जमात आढळते. हे नाव सुद्धा हिंग वरून पडलेले दिसते. त्यांचा इंगुष्ठीया नावाचा प्रजासत्ताक देखील आहे.
हिंगीस (मार्टिना वालं) उपाख्य हिंगीसोव्ह हे नाव चेक प्रजासत्ताकात आढळून येतं. याचं मूळही इंगुश जमातीत असावं असा अंदाज आहे.
-गा.पै.
25 Feb 2015 - 8:57 pm | हुप्प्या
भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणमधली अनेक गावे/शहरे ही आबाद प्रत्यय बाळगून आहेत. अहमदाबाद, औरंगाबाद, हैद्राबाद, इस्लामाबाद, होशंगाबाद, दौलताबाद, अबोटाबाद (ओसामाजींचे समाधीस्थळ!), जलालाबाद. आग्रा शहराचे नाव काही काळ अकबराबाद होते. अकबराबाद नावाची अनेक गावे इराणमधे आहेत.
हे बहुधा फारसी भाषेतून आले आहे. रशियात ग्राद ह्या नावाने शेवट होणारी अनेक गावे आहेत. ह्या दोन्ही प्रत्ययांचे भाषाशास्त्रीय नाते आहे. ग्राद, ग्राम, गाव हेही जवळचे वाटते. तेही इंडो युरोपियन भाषेतले एक समान मूळ असणारे
शब्द असावेत.
27 Feb 2015 - 11:14 am | माहितगार
घर या अर्थाने गेर हा शब्द येऊन स्थलनामांमध्येही दिसतो. त्याच गेरची गेरेड किंवा गेरेज हि रुपे झाली असल्याची शक्यता वाटते.
1 Jun 2018 - 11:31 pm | गामा पैलवान
हुप्प्या,
इथे इंग्लंड मध्ये अॅबोट (abbott) प्रत्यय असलेली अनेक गावे आहेत. उदा. : न्यूटन अॅबोट, स्टोक अॅबोट, इत्यादि. हा प्रत्यय आबाद सारखा वाटतो. ही पेठगावे म्हणजे सुबात्तापूर्ण मार्केट व्हिलेजेस असावीत. मराठीत आबादीआबाद म्हणजे वैपुल्य अशा अर्थाचा शब्द आहे.
इंग्लंडसारखी जर्मनीत बाद रीशेनहॉल सारखी नावं आहेत. त्यातला बाद प्रत्यय बहुधा बाथ म्हणजे गरम पाण्याची कुंडे यावरून पडलेला दिसतो. तसेच बादेन प्रत्यय असलेली बरीच गावं आढळतात. यांचा आबाद या फयन्चा/ अरबी प्रत्यायाशी कितपत संबंध आहे हे शोधून काढणं रंजक ठरावं.
आ.न.,
-गा.पै.
5 Jun 2018 - 9:48 pm | समर्पक
फारसी व संस्कृत या फार जवळच्या भाषा आहेत. संस्कृत आप फारसीत आब होते, पाण्याजवळील जागा (व त्याकारणाने संपन्न जागा) अशा अर्थाने आबाद हा शब्द आला. पुढे गावांची नावे त्यावरून आली
6 Jun 2018 - 1:54 pm | माहितगार
रोचक आहे हा संबंध
6 Jun 2018 - 1:56 pm | माहितगार
अनुषंगिक अवांतर : आता बर्याच आबाद्यांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागते , हा भाग निराळा
27 Jul 2015 - 10:42 pm | माहितगार
विभीन्न ऐतिहासीक काळातील मुंगी-पैठण गावाचे बरेच दाखले दिसताहेत पण मुंगी-पैठण हे गाव कोणते अथवा कुठे आहे. मुंगी-पैठण हे एकच गाव आहे का मुंगी-पैठण नावाची अधीक गावे आहेत ? कृ. कुणास काही कल्पना मिळाल्यास अवश्य द्यावी.
30 Jul 2015 - 4:10 am | माहितगार
जदुनाथ सरकारांनी अनुवादीत केलेल्या औरंगजेबाच्या इतिहासात २४ जाने १६७८ ला शिवाजी महाराजांनी मुंगी पाटन वर हल्ला केल्याची बातमी औरंगजेबास मिळते असा उल्लेख आहे. संदर्भ अर्काईव्ह्ज डॉट ऑर्ग.
या उल्लेखातील मुंगी पाटन कोणते असण्याची शक्यता आहे. पैठण जवळील का गुजराथ मधील का अजून कुठले ?
30 Jul 2015 - 4:21 am | माहितगार
अर्काईव्ह डॉट ऑर्गचा दुवा
28 Apr 2018 - 12:00 pm | माहितगार
होस (होसूर, होसपेट होसनगर मधील) चा अर्थ काय असेल ?
28 Apr 2018 - 12:06 pm | माहितगार
होसा (हल्ली/बळे/कोट/दुर्ग) अशी पण कर्नाटकात बरीच नावे दिसताहेत.
28 Apr 2018 - 12:17 pm | कंजूस
होसा = नवीन
पेट्टे = बाजार मंडई
( हळे = जुना, हळेबिडू)
28 Apr 2018 - 1:18 pm | माहितगार
अरेवा नेमकी महिती, सांगितलीत एक कोडे सहज सुटले. अनेक आभार
30 Apr 2018 - 4:13 am | शेखरमोघे
तसेच कानडीत "ऊरू" म्हणजे गाव - होसा (द) ऊरू म्हणजे (कधीतरी) नवे असलेले, वसलेले गाव.
30 Apr 2018 - 10:18 am | माहितगार
रोचक माहिती , उर हा शब्द भारतभर असंख्य स्थलनाम प्रत्ययात आहे म्हणजे उर शब्द गाव या अर्थाने सर्वच भारतीय भाषांत वापरला गेला असणार , कन्नड सारखी काही भाषा व्यतिरिक्त उर शब्दाचा गाव हा अर्थ विस्मृतीत गेला असणार . पा +उर पूर हा नगर शब्द तयार होऊन अधिक लोकप्रिय झाल्यामुळे उर म्हणजे गाव हे मराठी सारख्या भाषेतून विसरले गेले असू शकते .
माझ्या अंदाजाने पूर प्रत्यय असलेल्या ग्राम नामापेक्षा केवळ उर प्रत्यय असलेली ग्रामनामे जुनी असण्याची खात्रीपूर्वक सांगता आले नाही तरी शक्यता अधिक असावी . मला वाटते पूर हा प्रत्यय काही काळ विचारात न घेता केवळ उर हा प्रत्यय असलेल्या ग्रामनामातील उपसर्ग कोणकोणत्या अर्थाने येतात हे अभ्यासाने रोचक ठरावे . या निमित्ताने सुरवातीस महाराष्ट्रातील २० एका स्थलनामांचा विचार करून पाहूया असे वाटते . म्हणजे उर हा शब्द महाराष्ट्रात प्रचलित असताना तात्कालीन मराठीत इतर कोणते शब्द प्रचलित होते ते ग्रामनामातील उपसर्गांवरुन लक्षात येऊ शकेल
शब्द फोड दाखवताना विविध शक्यता अभ्यासणे हा उद्देश आहे ( अचूकतेचे दावे नाहीत आणि दुखावण्याचा उद्देश नाही त्यामुळे आपल्या गावाचे नावाची अनपेक्षित फोड दिसल्यास हलकेच घ्यावे हि विनंती . उर हा प्रत्यय गाव या अर्थाने धरला आहे
लातूर - लात + उर - लात शब्द कोणत्या अर्थाने आला असेल ? लाथ या अर्थाने येण्याची शक्यता कमी असावी लाटसाहेब वाल्या अर्थाने तर येत नाही कि अजून काही अर्थ असेल ?
राहूर - राह + उर - उर हा शब्द प्रयोग प्राचीन आहे , राह शब्दाचा रस्ता हा अर्था पेक्षा राहणे ह्या अर्थाची शक्यता अधिक वाटते .
माहूर - माह + उर - माह शब्द कोणत्या अर्थाने आला असेल ? तीन शक्यता वाटतात १) तेथे रेणुका मंदिर असल्या मुळे आई शब्दाचे मा हे रूप मा उर _ माहूर २) दुसरे महाउर ते माहूर हि शक्यता ३) माह शब्दास अजून काही वेगळा अर्थ होता
राजूर - राज + उर सर्व नाही पण राजूर नावाची काही गावे छोट्या मोठ्या राजधानीचे आव अथवा राजाचे प्रतिनिधित्व करणारी गावे राहिली असू शकतील
साकुर - साक + उर साक = ?
सेलूर - सेल + उर ; सेल = ?
सेंदूर - सेंद ; सेंद = ? सिंध मधून आला असेल ?
परतूर - परत + उर ; परत = ?
रिधुर - रिध + उर ; रिध = ?
साहूर - साह + उर ; साह = ?
वेंगूर - वेंग = ?
विंचुर - विंच = ? ( विंचु प्राणी वाचक ?)
वारुर - वार = ? ( ठराविक दिवशी जाण्याचे गाव कि अजून काही ?)
मसूर - मस + उर ; मस = ? ( मसोळ , मसोड अशी सुद्धा गावे आहेत म्हणजे डाळीच्या मसूर वनस्पती वरून थेट आले असण्याची शक्यता )
भालुर - भाल = ?
बेलूर - बेल + उर - बेल (बहुतेक वनस्पती नाम )
येलूर - येल = ?
थेऊर - थे = ते ?
जेजुर - जेज = ?
जांबूर - जांब = (बहुतेक वनस्पती नाम ?)
चाकूर - चाक + उर
चांदुर चांद
कुसूर - कूस + उर
काटसुर - काटस + उर ; काटस = ?
इंदुर - इंद + उर ; इंद = ? ( देवता नाव ?)
आडूर - आड + उर = आड = ?
अतनूर - अतन =उर ?
मदनूर - मदन + उर
अणदूर - अणद = ?
अणसूर - अणस = ?
29 Apr 2018 - 2:38 pm | Topi
मालेगाव हे मल्लग्राम पासून झाले असावे कारण मणी आणि मल्ल नामकदैत्यांचा संहार खंडोबा नी केला अशी आख्यायिका सांगितली जाते, मालेगाव पासून चंदनपुरी नावाचं खंडेरायाच्या क्षेत्र अती निकट आहे
29 Apr 2018 - 3:48 pm | माहितगार
' माले' शब्द संस्कृत आणि पाली साहित्यात स्थानवाचक आला आहे का पहावे लागेल . भारतीय पिनकोड डाटाबेस मध्ये बन्गाल, आसाम, पुर्वोत्तर वगळतात हिमाचल उत्तराखन्ड ते खाली तामीळनाडू केरळ पर्यन्त माले शब्दापासूनची गावे दिसताहेत. आपल्या प्रतिसादामुळे माले शब्दाच्या संदर्भाबद्दल उत्सुकता नक्कीच वाढली आहे.
29 Apr 2018 - 2:41 pm | Topi
पूर पुरम ह्यातील प नाहीसा होवून ऊर प्रत्यय फक्त गांवचे नावापुढे राहिला असावा
29 Apr 2018 - 4:01 pm | माहितगार
माझे व्यक्तीगत मत हे कदाचित उलटे असावे . 'पा' अक्ष्रोच्छार नुसता सुद्धा प्राचीन भारतीय संभाषणात पुरेसा असावा . पा + उर पासून पौर आणि नंतर पूर अशी शक्यता मला अधिक वाटते. दुसरे महत्वाचे कारण वसती या अर्थाने उर हा प्रतय लागून येणार्या गावांची संख्या पूर पेक्षा कितीतरी पटीने भारतात आहेच पण त्या शिवाय उर प्रत्यय असलेली गावे इराक पर्यंत तरी नक्कीच सापडतात त्या शिवाय हडप्पा मोहोंजदाडो समकालीन इराक मधील समकालीन सुमेरीयन संस्कृतीचे उर नावाचे गाव / शहर प्रमूख ठाणे होते . इजिप्त आणि सुमेरीअन सन्स्कृतीतील लिपीचा बोध झाल्यामुळे त्यांच्या इतिहासावरही अधिक प्रकाश पडतो आणि उर मुळचा सुमेरीअन संस्कृतीतील शब्द असल्याचे वाटत रहाते. अर्थात उर या शब्दावर मला वाटते तमीळांना ही अधिकार सांगावा वाटतो पण त्यान्च्या पाशी इराक प्रमाणे काही आधार नाही . पण इन एनी केस उर नावाच्या गावाच्या दक्षिणेतील एकुण प्रसारा मुळे दक्षिण आनी उत्तर भारताचा सांस्कृतीक संगम अती प्राचिन आहे हे अधोरेखीत होते असे वाटते. असो .
* Ur इंग्रज विकिपीडिया लेख
1 May 2018 - 2:10 pm | मार्गी
खूप सुंदर माहिती येते आहे!
माझ्याकडून थोडी भर-
दक्षिण भारतात अनेक गावांमध्ये 'थिर' आहे- थिरूपती, थिरूअनंतपूरम इ. तिथे 'थिर' शब्दाचा अर्थ 'महान' 'स्थिर' असा काहीसा होतो.
तसेच, तमिळ नाडूमध्ये अनेक कोविल आहेत. उदा., नागरकोविल. कोविलचा अर्थ वस्ती असा होतो. कोविल- कबिला- कुळ- सिव्हिल!
असे अनेक शब्द अनेक भाषांमध्ये समान आहेत. इंग्रजी ट्रूथ शब्द संस्कृत ऋत् च्या जवळचा आहे!
पण ह्याचं कारण एकच भाषा सगळ्या भाषांची जननी आहे, हे नाही; तर पुरातन काळापासून मानव खूप मिसळून राहात आला आहे हे आहे. शिवाय काही शब्द हे स्थितीवाचक आहेत. म्हणजे जगातलं कोणतंही बाळ शक्यतो निसर्गत: अम्, म असे स्वर पहिले शिकतं. म्हणून आईसाठी मदर, माता, माँ, मेर्, मुटर असे शब्द त्यातून येऊ शकले असावेत, असं म्हंटलं जातं.
1 Jun 2018 - 8:46 pm | माहितगार
खर म्हणजे ईंग्रजी विकिपीडियावर चेन्नई गावाची व्युत्पत्ती बघत होतो, कुणा चेन्नप्पा नावाच्या नायकाची सत्ता १४ व्याशतकात तिथे राहीली असल्यामुळे त्याच्या नावावरुन चेन्नई नाव आले असल्याचे ईंग्रजी विकिपीडिया तील उल्लेखावरुन लक्षात येते पण माझ्या मते तेवढ्यावरुन ई या प्रत्ययाचा पुरेसा उलगडा होत नाही . मुंबई मध्ये ई हा प्रत्यय आई शब्दावरुन आल्याचे मुंबा + आई हि व्य्त्पत्ती आपण सर्वसाधारणपणे स्विकारतो . गावाचे नाव चेन्नप्पा वरुन आले असते तर प्पा गळाले तरी प्रत्य वेगळा काही लाअला असता पण ई ची शक्यता कमी राहीली असती. चेन्न म्हणजे तेलगुत लहान असा अर्थ होतो, चेन्नम्मा (चेन्न+अम्मा म्हणजे लहान आई या अर्थाने ) सारखा शब्द बहुधा तेलगुत बर्या पैकी वापरला जात असावा. चेन्नम असलेली बर्यापैकी गावे आंध्र तेलंगाणा कर्नातकात आणि तामीळनाडूतही दिसतात त्या सर्व ठिकाणि ती चेन्न अप्पा वरुन गेली नसावीत. अम्मा च्या एवजी आई सहज होऊ शकत असावे. आई प्रत्यय येणारे तामीळ नाडूतील एकमेव गाव नसावे मदुराई शब्दातही आई प्रत्य राहण्याची शक्यता असू शकते अजून अशी गावे तामीळनाडुत आहेत पहावे लागेल.
अशीच दुर्दशा तामीळी लोकांनी मद्रास शब्दाच्या व्युत्पत्तीची केली असावी. मद्रास शब्द पोर्तीगीज भाषेतून व्युत्पत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तीन वर्षांपुर्वी अशात मद्रासपट्टणम असा उल्लेख असलेला १४व्या शतकातला शिलालेख मिळाला (आणि वास्को दा गामा आलाच मुळी पंधराव्या शतकाच्या शेवटी) आणि पिनकोडान्चा डाटाबेस बघीतला तर मद्र आणि मद्र शब्दावरुन ची गावे उत्तर प्रदेश ते केरळ तामीळनाडू सर्वत्र दिसतात.
मदुराईचे दुसरे नाव कुडाल आहे म्हणे ! आता ऐतिहासिक काळात तामीळ साहित्याच्या तीन संगम सभा तिथे झाल्या त्यावरुन त्यांनी कुडाल शब्दाचा अर्थ सभा शब्दावर पोहोचवलेला दिसतो. पण kudal koodal हि दोन्ही स्पेलीन्ग्ची अनेक गावे मध्यप्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र ते दक्षिणेतील राज्ये आहेतच मध्ये दिसतात. स्पेलिन्ग मध्ये जरासा बदल kutal करा आणि मग काश्मीर ते आसाम पर्यंत कुटाल गाव नावे सापडते ते खाली महाराष्ट्रा पर्यंत . महाराष्ट्रात कोकणातले कुडाळ प्रसिद्ध आहेच पण सातारा नांदेड हिंगोली जिल्ह्यातही कुडाळ ग्राम नाम दिसते तर अशा असंख्य कुडाळ नावाच्या गावी तामीळ संगम सभा झाल्या असण्याची शक्यता कमी असावी. कुडाळ नावाचे अर्थाचे काही तर्क कुणाला माहित आहेत का ?
गुडी कुडी कुटी हे शब्द पाल / तंबू वजा निवासस्थान शब्द म्हणून वापरले गेले असावे . दक्षिण भारतीय भाषा विशेषतः तमीळ क चा ग ग चा क असा फेरफार करताना दिसते . गुडा हा प्रत्यय असलेली अनेक गावे दक्षिणेत आहेतच. गुढी या शब्दाचा शोध घेताना या उच्चाराचा एक अर्थ उंचवटा उंचीची जागा असू शकेल अशा अर्थाची चर्चा मागे मी या वेगळ्या लेखात केली आहे. कुट हा शब्द डोंगर अर्थाने येतो हे आपण सर्व जण जाणतोच . त्यामुळे कुडाल आणि कुटाल आणि गुडा एकमेकांचीच रुपे असू शकण्याची शक्यता मला व्यक्तीशः वाटते. पण तरीही कुडाल/ कुटाल नाकाची काही वनस्पती नावे असण्याची किंवा कुडाळ शब्दास इतर व्युत्पत्तीची शक्यता असल्यास माहित नाही . पण माझे सध्याचे मत नंतर उंच जागा असा अर्थ निघून पडला तरी सुरवातील कुडाल शब्द उंचावरची जागा असा होऊ शकेल का, माझा तर्क चुकही असू शकेल . कुडाल हा शब्द ग्रामनामात क्वचित प्रत्यय अथवा उपसर्गातही येताना दिसतोय.
1 Jun 2018 - 9:22 pm | यशोधरा
मस्त धागा.
1 Jun 2018 - 9:37 pm | कंजूस
जिथेजिथे वेदोक्त काथ्याकुट झाला /काथ्या कुटला/ बहुधा द्वैत -अद्वैत यावरच कुटायचे / घरच्या लक्ष्म्या वारंवार निरोप पाठवायच्या जेवण गार होतय लवकर या तरीही कुटायचेच ती गावे कुडल. विजापुराजवळ आहे एक संगमाचे ठिकाण ते झाले कुडलासंगमा. इथे धर्मशाळा आणि अन्नछत्रे असतात. वाद करकरून घसा सुकतो भूक लागते मग छत्रात चापायचे.
अभिप्राय विनोदी वाटल्यास योगायोग समजावा. कारण शिलालेख पुरावा नाय.
4 Jun 2018 - 8:20 am | सिरुसेरि
असाच प्रश्न नेल्लुर , वेल्लुर , येल्लुर या नावांबाबत पडतो .
4 Jun 2018 - 9:12 am | माहितगार
उर या प्रत्ययाबाबत वर चर्चा झाली आहेच, उर प्रत्ययासोबत येणारी ग्राम नामे बर्यापैकी जुनी असावीत त्यामुळे त्यांच्या अर्थांचा विचार करणे रोचक ठरु शकते.
* येल्लुर हे देवी नावावरुन येते त्या बद्दल अधिक चर्चा येल्ला आणि तीच्या दासी लेखाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे.
* वेल्लुर मधील वेल वनस्पती नावावरुन असण्याची शक्यता वाटते . व चा ब असा उच्चार बदलही होतो आणि बेल्लूर नावाची गावेही सापडतात .
** वेरुळ हे वेलुर - वेरुल - वेरुळ असे झाले नसेल ना असे कधी कधी वाटते , वेरु शब्दाला अजून काही अर्थ असेल तर माहीत नाही
* नेलुर / नल्लुर नल आणि नेल या शब्दांना काही विशीष्ट अर्थ असेल तर माहित नाही . दक्षिण भारतीय भाषा बोलताना /उच्चारताना बर्याच ग्रामनामान्चा उच्चारण शेवट नल / नेल असा होऊन नन्तर उर प्रत्यय लागताना दिसतो जसे कन्नेलुर , उदा चीन्नालुर ,
**नल्लुरु ( एक नल्लुरपालम ही आहे गंमत म्हणजे वस्तिस्थान प्रत्ययाला पुन्हा अजून एक वस्तीस्थान प्रत्यय लागण्याचेही प्रकार होतात )
** काटमनल्लुर कर्नाटकातील या उदाहरणात नल्लुर हा पुर्ण शब्दच प्रत्यय झाल्याचे दिसते आहे 'काटम' कानडीत काही अर्थ असेल
** Muthanallur आहे याचा समास कसा सोडवणार Mutha+nallur की Muthan+allur की Muthanall + ur
nallur येणारी दक्षिणेत आणखी बरीच गावे आहेत
4 Jun 2018 - 9:38 am | माहितगार
अणसूर मधील अणस शब्दावर anas अक्षरांवर महाराष्त्रातील गावांच्या डाटाबेस मध्ये शोध घेतला तर कणस आणि फणस हे शब्द असलेली गाव नावे आहेत .
अननस नावाचेही फळ आहे , (हिंदीत अनाज हा शब्द आहे तो अनस -अनास - अनाज असा तयार झाला असू शकतो असे वाटले अर्थात या सर्वाचे मूळ अन्न शब्द आहेच)
पण पनस panas नावाची गावे सातारा अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात दिसतात . पपनस आणि फणस बहुधा केवळ कोकणात होतात, नुसते पनस अथवा पणस नावाचे वेगळे काही फळ असू शकेल का अशी शंका वाटून गेली.
सणस वाडी नावाची गावे आहेत सणस नावाचीही काही वनस्पती आहे का कि सणस शब्दाचा अजून वेगळा काही अर्थ होतो ?
सण शब्द स + अन असा आला असेल का म्हणजे स म्हणजे चांगले अन म्हणजे अन्न असे काही ? की व्युत्पत्ती काही वेगळी आहे ?
4 Jun 2018 - 10:43 am | माहितगार
कोकणात अनासपुरे नावाचे गावही दिसते आणि मला वाटते असे आडनावही आहे, या नावांच्या व्युत्पत्तीचा या निमीत्ताने उलगडा होताना दिसतोय .
4 Jun 2018 - 2:46 pm | माहितगार
वेंगसर, वेंगणी , वेंगगाव, वेंग गाव , वेंगरुल, वेंगुर्ले यात वेंग म्हणजे काय ?
6 Jun 2018 - 11:29 pm | Topi
नंदीग्राम, नांदगाव, राजनांदगाव ह्यात नंद हा प्रत्यय नंद घराण्यातील राजा किंवा भगवान श्रीकृष्ण ह्यांचा पालक नंदबाबा ह्यांच्याशी तर नसावा?
मराठीत नांदने या क्रियापदाशी संबंध नसावा कारण तिन्ही गावे बंगाल,महाराष्ट्र, आणि बिहारमधील आहेत
7 Jun 2018 - 10:12 am | माहितगार
अन म्हणजे अन्न मिळाल्यावर होणारी भावना म्हणून आनंद शब्द विकसीत झाला असू शकेल किंवा नंदाच्या घरातील सुख समाधान आनंदाची काल्पनिक प्रतिमा असू शकेल. पण शब्दाचा प्रभाव हा नंद कुळ आणि त्याची साहित्यिक आणि सांस्कृतिक दखल झाल्या नंतरचा असावा असे वाटते. आनंदी घरात रहाणे म्हणजे नांदणे हा शब्द विकास स्वतंत्र असावा - आनंद आणि नंद वरुन विकसीत इतरही बर्यापैकी शब्द भारतीय भाषात आहेत - त्यावरुन ग्राम नावे विकसीत होण्याची सहसा गरज नसावी . १) स्वतः नंदकुळातील , २ स्वतः नंद कुळातील समजून घेणारे यांचे स्थलांतर किंवा आनंददायी परिवार हा अर्थ होत असल्याने वस्तीस्थानास नंद उपसर्ग असलेली नावे ठेवली गेली असावीत.
जिथपर्यंत ग्राम नामांचा संबंध आहे नंद हा उपसर्ग असलेल्या ग्रामनावांची संख्या भारतात आपल्या अंदाजा पेक्षा खूप मोठी असावी.
डाटाबेस मधून काही उदाहरणे देतो आणि आणखी पण आहेत पण त्यासाठी वेगळा प्रतिसाद देतो . नंदपूर हे नाव सर्वाधीक दिसतय वर जम्मू पासून सुरवात होताना दिसते आहे. हिमाचल, पंजाब, हरीयाणा , उत्तरा खंड , उत्तर प्रदेश ,बिहार , झारखंड, गुजरात, मध्यप्रदेश,, महाराष्ट्र, यादी पूर्ण नसल्याने ईतर राज्याची नावे आंतर्भूत झाली नसावीत , जशी मिळतील तशी देतो.
Nand Garh (118)
Nand karan
Nandal(94)
nandawala
Nandgaon (1)
Nandgarh
Nandha(34)
Nandha(53)
Nandhuwali
Nandi Khalsa (16)
Nandiali
Nandnaur (23)
Nandpur
Nandpur Ka Dera
Nandrampur Bas(304)
Nandsinghwala (8)
Nanduki(22)
Nanduwali (128)
7 Jun 2018 - 12:48 pm | माहितगार
महाराष्ट्रात नंद , नांना, नांद्र हिं अक्षरे असलेल्या गाव नावांचे प्रकारच अदमासे पाऊणे दोनशेच्या आसपास होताहेत त्यात असंख्य गावांना एकच नाव असेल अशी अनेक गृहीत धरा म्हणजे एकुण प्रभाव लक्षात येईल.
मध्येच व्यत्यय आल्यामुळे खालील प्रकारचे विश्लेषण पुर्ण होऊ शकले नाही पण अंदाजा येण्यासाठी पुरेसे असावे
* ऊपसर्ग (म्हणजे शब्दाच्या आधी) प्रत्यय म्हणजे शब्दा नंतर
* नंद ऊपसर्ग : केस, पाच; प्रत्यय: ई , खेड , गाव , गुर
* नंदा प्रत्यय : ई,
* नांद प्रत्यय : गाव
* नांदा प्रत्यय : पूर
* नंदूर प्रत्यय : बार
* नांदूर उपसर्ग : घाट , जाट
* जु-नांदुर्खी
* नांद्रा / नांद्रे उपसर्ग : कोट, घाट , देव ,
* नांदेड
* आंनंद प्रत्यत गाव, नगर, ग्राम, वली, वन, व्हाळ, वाडी ; ऊपसर्ग समास : का ,खा, परमा,
** नंदन प्रत्यय : पाडा,वन,वाड,शिवणी
7 Jun 2018 - 12:07 pm | Topi
स्वतः नंदकुळातील , २ स्वतः नंद कुळातील समजून घेणारे यांचे स्थलांतर किंवा आनंददायी परिवार हा अर्थ होत असल्याने वस्तीस्थानास नंद उपसर्ग असलेली नावे ठेवली गेली असावीत.
परंतु नंदा आडनावे असणारी लोकसंख्या भारतात जास्त नसावी दुसरा पर्याय म्हणजे स्वतःचे नंद कुळातच समावेश करण्याची प्रवृत्ती नंद घराणे बलवान असण्याची वेळची असावी
7 Jun 2018 - 12:51 pm | माहितगार
...परंतु नंदा आडनावे असणारी लोकसंख्या भारतात जास्त नसावी.
ऑब्झर्वेशन बरोबर आहे पण आडनावे काळाच्या ओघात बर्याच मोठ्या प्रमाणावर बदलू सुद्धा शकतात म्हणुन त्याबद्दल निश्चित निष्कर्ष काढणे कठीण जाते .
7 Jun 2018 - 12:07 pm | Topi
स्वतः नंदकुळातील , २ स्वतः नंद कुळातील समजून घेणारे यांचे स्थलांतर किंवा आनंददायी परिवार हा अर्थ होत असल्याने वस्तीस्थानास नंद उपसर्ग असलेली नावे ठेवली गेली असावीत.
परंतु नंदा आडनावे असणारी लोकसंख्या भारतात जास्त नसावी दुसरा पर्याय म्हणजे स्वतःचे नंद कुळातच समावेश करण्याची प्रवृत्ती नंद घराणे बलवान असण्याची वेळची असावी