लोकमान्य - एक युगपुरूष

श्रीरंग's picture
श्रीरंग in जनातलं, मनातलं
4 Jan 2015 - 11:34 am

लोकमान्य टिळक : जाज्वल्य राष्ट्रवादी विचारांनी एका संपूर्ण पिढीला भारून टाकणारे, स्वातंत्र्यलढ्यात झोकून द्यायला प्रव्रुत्त करणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्व. महाराष्ट्राने ज्यांच्यावर निस्सिम प्रेम केलं, नव्हे ज्यांची अक्षरशः भक्ती केली अशा महानायकाचा जीवनपट येणं अतीशय स्वागतार्ह आहे.
चित्रपट उलगडत जातो तो मकरंद (चिन्मय मांडलेकर) या पत्रकाराच्या नजरेतून. लोकमान्यांच्या सापडलेल्या एका दुर्मिळ ध्वनीफीतीच्या प्रक्षेपण समारंभाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेला मकरंद त्यांचे विचार ऐकून अंतर्मुख होतो. "तरुणांनी स्वतःची प्रगती अवश्य करावी. पण त्याबरोबरच स्वतःच्या कौशल्याचा, विद्येचा जास्तीत जास्त उपयोग देशासाठी कसा होईल, याचा सदैव विचार करावा." हे शब्द मनात रुंजी घालू लागतात. काळाच्या ओघात, लोकमान्यांचे विचार कुठेतरी विस्मृतीत गेल्याची जाणीव त्याला अस्वस्थ करते. होणार्या सासर्याकडून मुलाला अमेरिकेत नोकरी मिळाल्याचे प्रचंड कौतुक सतत ऐकून, ही जाणीव अजूनच तीव्र होते. लोकमान्यांसारख्यांनी रक्ताचं पाणी करून स्वराज्य तर मिळवलं, पण त्यांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्मान करण्यात आपली पिढी अपयशी ठरते आहे, या भावनेने तो पोखरला जाऊ लागतो. लोकमान्य टिळक समजावेत, आणि त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावेत, या उद्देशाने तो टिळकांचे चरित्र वाचायला घेतो,आणी लोकमान्यांचा जीवनपट आपल्यासमोर उलगडत जातो.
एखाद्या ऐतिहासिक नायकाच्या चरित्राची वर्त्मानाशी सांगड घालून लिहिलेली कथा, हा काही नवीन प्रयोग नाही. "रंग दे बसंती", " मुन्नाभाई", पासून ते "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" पर्यंत अशी कथानकं आपण पाहिलेलीच आहेत. या चित्रपटाचं वेगळेपण असं, की पत्रकाराचे कथानक फक्त संदर्भापुरते वापरले आहे. चित्रपटाचा मुख्य झोत हा लोकमान्यांवरच आहे. टिळकांच्या महाविद्यालयीन दिवसांपासून सुरू होऊन ही कथा, न्यू इंग्लीश स्कूलची स्थापना, त्याचे व्यापारिकरण होत असल्याचे पाहून त्यातून निराळे होणे, केसरी वृत्तपत्राची स्थापना, पुढे कर्जात बुडालेले "केसरी" संपूर्ण विकत घेऊन यशस्वीपणे चालवणे, सख्खा मित्र असलेल्या आगरकरांबरोबर झालेले वैचारिक मतभेद व त्यातून निर्माण झालेला दुरावा, इथपासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, रँड वधाच्या खटल्यानंतर भोगावा लागलेला तुरुंगवास, परखड व आक्रमक अग्रलेखांद्वारे देशभर चेतवलेली राष्ट्रभावना, मंडालेचा तुरुंगवास, तिथे लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाची रचना, अशी पुढे सरकत जाते, व परतल्यावर "पुनश्च हरी ओम" करण्याचा संकल्प करतात तिथे येऊन थांबते.
गणित, सहित्य, पत्रकारिता, तत्वज्ञान, अशा विविध विषयांपर प्रभुत्व असलेल्या टिळकांचे चरित्र कथानकात उत्तम गुंफण्यात आले आहे. त्याला अतीशय उत्तम निर्मीतीमूल्य, पार्श्वसंगीत, व कलादिग्दर्शनाची जोड मिळाल्यामुळे चित्रपट मनोरंजन करण्यात देखील कुठेच कमी पडत नाही. रँडचा वध, गीतारहस्याची निर्मीती, हे प्रसंग तर अतीशय उत्तम जमून आले आहेत. पहिलाच चित्रपट दिग्दर्शित करत असलेल्या ओम राऊत यांनी अत्यंत सफाईदार काम केले आहे.
या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे सुबोध भावेचा अभिनय. मिळालेल्या भूमिकेचे याने अक्षरशः सोने केले आहे. यापुढे कित्येक काळापर्यंत लोकमान्यांचा उल्लेख झाला, की सुबोधच डोळ्यासमोर यावा, इतकी त्यानी ही भूमीका जिवंत केली आहे. साधारण एक दीड वर्षापूर्वी एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सुबोध अतीशय आत्मीयतेनी लोकमान्यांविषयी बोलला होता, आणी त्यांच्यावर चित्रपट व्हावा हे स्वप्न असल्याचे त्याने बोलून दाखवले होते. त्यानंतर तो ही भूमीका करणार असल्याचे समजले तेव्हा तो यावर अपार मेहनत घेऊन अविस्मरणीय भूमिका साकारणार यात शंकाच नव्हती. अपेक्षेपेक्षाही उत्तम लोकमान्य त्याने उभे केले आहेत. संवादफेक, देहबोली वगैरेमधे त्याने घेतेलेली मेहनत दिसून आली आहे. समीर विद्वांसने साकारलेले आगरकर पण लक्षात राहण्याजोगे. चिन्मय मांडलेकर व प्रिया बापट यांना विशेष वाव नसला तरी त्यांनी पण भूमिका उत्तम निभावल्या आहेत.
टिळकांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचा राष्ट्रीय स्तरावर जनमानसावर असलेला प्रचंड प्रभाव, स्वातंत्र्यवीर सावरकर, बापट इत्यादींवर असलेला त्यांच्या विचारांचा पगडा, वगैरेबद्दल थोडं अधिक दाखवलं असतं तर चित्रपट अजूनच प्रभावी झाला असता असं वाटत राहतं.
पण स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या, राष्ट्राचे दैवत असलेल्या या उत्तुंग महानायकाचा सुंदर जीवनपट आवर्जून पहावा असाच. लोकमान्यांच्या चरित्राला पडद्यावर उजाळा दिल्याबद्दल निर्मात - दिग्दर्शकांचे शतशः आभार.

कलासमीक्षा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 Jan 2015 - 11:40 am | मुक्त विहारि

धन्यवाद...

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jan 2015 - 11:47 am | डॉ सुहास म्हात्रे

गेल्या शुक्रवारी पाहिला. सुंदर चित्रपट. अजून प्रभावी होऊ शकला असता याबाबत सहमत.

सुबोध भावेचा अभिनय केवळ अप्रतिम !

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2015 - 12:34 pm | अत्रुप्त आत्मा

कालच पाहिला , अप्रतिम !
सुबोध भावे एकदम दणदणित!

कलंत्री's picture

4 Jan 2015 - 12:02 pm | कलंत्री

चित्रपटाबद्दल भरभरून ऐकले. चित्रपट सर्वदूर पोहोचो.

बोका-ए-आझम's picture

4 Jan 2015 - 12:07 pm | बोका-ए-आझम

सुबोध भावेने परकायाप्रवेश केला आहे असं म्हणायला हरकत नाही. सर्वात जबरदस्त म्हणजे डोळ्यांचा फार सुंदर वापर केला आहे. असामान्य धैर्य असणारे लोकमान्य त्याच्या डोळ्यांमधूनच दिसतात. काॅलेजमधल्या लोकमान्यांपासून ते पन्नाशीच्या लोकमान्यांपर्यंत होणारा बदल त्याने छान दाखवला आहे.

पिंपातला उंदीर's picture

4 Jan 2015 - 1:00 pm | पिंपातला उंदीर

सध्या मराठी आणि हिंदी मध्ये चरित्रपट बनवण्याची लाट आली आहे . या चित्रपट मधून त्या त्या महान व्यक्तिरेखेचे अनेक पैलू लोकांसमोर येतात हि चांगली गोष्ट आहे . पण आपल्याकडे बनणारे चित्रपट खरेच त्या व्यक्तिरेखेला न्याय देतात का ? उदाहरणार्थ बालगंधर्व यांच्या आयुष्यावर बनवलेल्या चरित्रपट मध्ये गौहरजान च्या व्यक्तिरेखेवर किंवा त्यांच्या बालगंधर्व यांच्याशी असलेल्या संबंधावर संदिग्धता होती . वास्तविक पाहता बालगंधर्व यांच्या आयुष्याच्या एका टप्प्यात गौहर जान किती महत्वाच्या होत्या हे सर्वविदित आहे . दोघेही पती पत्नी प्रमाणे एकत्र राहायचे . लोकमान्य चित्रपट पाहिला नाही पण त्यात वेदोक्त प्रकरण , सावकार आणि कर्जदार शेतकरी प्रकरणात टिळकांनी सावकारां ची घेतलेली बाजू , एकूणच समाजसुधारणा करण्याला असलेला त्यांचा विरोध या गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला आहे का यावर चित्रपट पाहिलेल्यांनी कृपया प्रकाश टाकावा . म्हणजे टिळकांच्या या भूमिका बरोबर का चूक हा मुद्दा महत्वाचा नाही पण तुम्ही जेंव्हा चरित्रपट बनवत असता तेंव्हा टिळकांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या (आणि तत्कालीन समाजावर पण सखोल परिणाम करणार्या ) घटना निव्वळ त्या वादग्रस्त आहेत किंवा टिळकांच्या इमेज (किंवा ज्या व्यक्तिरेखेवर चित्रपट बनत आहे तिच्या ) वर प्रश्नचिन्ह उमटू शकतात म्हणून टाळणे कितपत योग्य आहे ? अर्थातच चित्रपटात काय काय दाखवावे आणि काय नाही हे त्या दिग्दर्शक आणि लेखकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे मान्य आहेच पण निव्वळ त्या व्यक्तिरेखेच्या चांगल्या आणि goody goody बाजू दाखवल्याने तो चित्रपट त्या व्यक्तिरेखेला न्याय देत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे .

अर्धवटराव's picture

4 Jan 2015 - 2:13 pm | अर्धवटराव

वेदोक्त प्रक्ररण दाखवायचे म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीत वेदमंत्र म्हणायला विरोध एव्हढच दाखवणं पुरेसं नाहि, तर या सनातनी विचारामागची भुमीका देखील दाखवायला लागेल. आणि त्याकरता प्रथम श्रुती-स्मृती प्रकार समजुन सांगायला लागेल. दंभ आणि खोट्या प्रतिष्ठेच्या काळोखातुन उद्भवलेल्या सामाजीक विषमतेचा दर्प इतका उग्र आहे आंबेडकर व कुरंदकरांसारख्या साक्षेपी विचारवंतांनाही श्रुती-स्मृती उमगली नाहि ( किंवा त्यांच्या अभ्यासाचा पिंडच वेगळा असल्यामुळे असेल ) तिथे एक चित्रपट कथालेखक आणि दिग्दर्शक एका मर्यादीत वेळेच्या कलाकृतीत त्यावर काय प्रकाश टाकणार... दहा जोर-बैठका काढता येत नाहि तर उगाच शिवधनुष्य उचलायच्या भानगडीत का पडावं ?

सतिश गावडे's picture

4 Jan 2015 - 7:15 pm | सतिश गावडे

या विषयावार एखादा धागा तुम्हीच टाका आता. :)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2015 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा

+++++११११११

अर्धवटराव's picture

4 Jan 2015 - 11:35 pm | अर्धवटराव

पण विषय फार 'बोअरींग' आहे.

ग्रेटथिंकर's picture

4 Jan 2015 - 1:04 pm | ग्रेटथिंकर

चित्रपटात वेदोक्त प्रकरण दाखवायला हवे होते. जाज्वल्य देशाभिमानी टिळकांनी वेदोक्त प्रकरणात प्रतिगामी भूमिका का घेतली याचे स्पष्टीकरण यायला पाहिजे होते.

पैसा's picture

4 Jan 2015 - 1:10 pm | पैसा

चित्रपटाबद्दल, त्याच्या दिग्दर्शन, अभिनयाबद्दल बोला बरे! तुम्ही या धाग्यावर ट्रोलिंग करायला कधी येताय याचीच वाट बघत होते! मी बघतांय हां!!

ग्रेटथिंकर's picture

4 Jan 2015 - 1:17 pm | ग्रेटथिंकर

पैसाक्का आमी ट्रोलिंग नाय करत.
पण वेदोक्त प्रकरण टिळकांच्या आयुष्यातले एक महत्वाचे प्रकरण आहे. इंग्रजांचा प्रचंड द्वेष करणारे टिळक वेदोक्त प्रकरणात मात्र इंग्रजांकडेच शाहू महाराजांची लेखी तक्रार का करतात ?त्यामागे टिळकांचा काय दृष्टीकोन होता? हे चित्रपटात यायला पाहिजे होते.

पैसा's picture

4 Jan 2015 - 1:55 pm | पैसा

आता टिळक आणि वेदोक्त याबद्दल तुम्हाला काय माहीत आहे यावर दुसरा धागा काढा बघू. त्याच्यापूर्वी चित्रपट बघून या, चित्रपट कसा आहे याबद्दल इथेच सांगा.

श्रीगुरुजी's picture

4 Jan 2015 - 9:17 pm | श्रीगुरुजी

>>> त्यामागे टिळकांचा काय दृष्टीकोन होता? हे चित्रपटात यायला पाहिजे होते.

नानासाहेब,

तुम्ही आणि माईसाहेब टिळकांच्या काळात होता (माईसाहेब शरद पवारांपासून इतर सर्वांना अरेतुरे करत असतो त्यावरून हा अंदाज बांधलाय). तुम्ही टिळकांना बघितलेले असणार. तुमच्या काळातच हे प्रकरण घडलंय. इतरांना विचारण्यापेक्षा तुम्हीच आता या वेदोक्त प्रकरणाचा याचि देही याचि डोळा वृत्तांत लिहा.

vikramaditya's picture

4 Jan 2015 - 9:38 pm | vikramaditya

मी टरफले उचलणार नाही...

ह्या प्रसंगातील शेंगा नानाच शाळेत घेवुन गेले असे एकुन आहे. खरं खोटं माई जाणे.

ग्रेटथिंकर's picture

4 Jan 2015 - 10:43 pm | ग्रेटथिंकर

हे माई व नानासाहेब नक्की कोण आहेत ?मिपावर जळी स्थळी काष्ठी पाषाणी फक्त यांच्या नावाचीच चर्चा चालू असते ,कुणी मोठ्या व्यक्ती आहेत काय!

कपिलमुनी's picture

5 Jan 2015 - 1:43 pm | कपिलमुनी

----माई मोड ऑन----
बेट्या ग्रेट्या ! आजकालची मुले आई- बाबांना विसरतात हेच खरे रे

----माई मोड ऑफ----

श्रीगुरुजी's picture

5 Jan 2015 - 4:43 pm | श्रीगुरुजी

>>> हे माई व नानासाहेब नक्की कोण आहेत ?

प्रश्न थोडा चुकलाय. "हे माई उपाख्य नानासाहेब नक्की कोण आहेत ?" असा प्रश्न हवा होता.

>>> मिपावर जळी स्थळी काष्ठी पाषाणी फक्त यांच्या नावाचीच चर्चा चालू असते ,कुणी मोठ्या व्यक्ती आहेत काय!

मोठी व्यक्तीच असणार ना! ग्रेटथिन्कर, टॉपगिअर्ड फिलॉसॉफर, नानासाहेब नेफळे, माईसाहेब कुरसुंदीकर, ग्रेटथिंकर असे अनेक डूआय वापरणारी व्यक्ती असामान्यच असणार.

पिंपातला उंदीर's picture

4 Jan 2015 - 1:11 pm | पिंपातला उंदीर

@ग्रेटथिंकर- माझा प्रतिसाद पुन्हा वाचा
म्हणजे टिळकांच्या या भूमिका बरोबर का चूक हा मुद्दा महत्वाचा नाही पण तुम्ही जेंव्हा चरित्रपट बनवत असता तेंव्हा टिळकांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या (आणि तत्कालीन समाजावर पण सखोल परिणाम करणार्या ) घटना निव्वळ त्या वादग्रस्त आहेत किंवा टिळकांच्या इमेज (किंवा ज्या व्यक्तिरेखेवर चित्रपट बनत आहे तिच्या ) वर प्रश्नचिन्ह उमटू शकतात म्हणून टाळणे कितपत योग्य आहे ?

मुक्त विहारि's picture

4 Jan 2015 - 1:17 pm | मुक्त विहारि

धन्य झालो.

आता अजून पण काही हिताच्या गोष्टी नक्कीच ऐकायला मिळतील.

फारएन्ड's picture

4 Jan 2015 - 1:22 pm | फारएन्ड

सुंदर ओळख. नक्कीच पाहणार.

पिंपातला उंदीर's picture

4 Jan 2015 - 1:25 pm | पिंपातला उंदीर

@पैसा ताइ माझा प्रतिसाद हा एकूणच आपल्याकडे जे चरित्रपट बनतात त्याच्यात जो ट्रेंड दिसतो त्या बद्दल होता . आंबेडकरांवर जो जब्बार पटेलांनी चित्रपट बनवला किंवा मागच्या वर्षी जो यशवंतराव चव्हाण यांच्यावर चित्रपट बनवला त्यात पण त्या व्यक्तींच्या goody goody बाजू दाखवल्या होत्या आणि त्यांच्या आयुष्यातले वादग्रस्त मुद्दे सोयीस्कर पण टाळले होते . व्यक्तिपूजा करणे आणि तुमच्या आमच्या सारख्या माणसाला (गांधी , आंबेडकर , ठाकरे ई .) याना देवत्व बहाल करणाऱ्या समाजात हे अवघड असले तरी चित्रपटाला ते हानिकारक ठरते . माझा प्रतिसाद त्या चित्र्पतनच्या context मध्ये होता . टिळक महान होते का नाही , त्यांच्या ऐतिहासिक चुका काय यासाठी वेगळा धागा उघडावा

पैसा's picture

4 Jan 2015 - 1:53 pm | पैसा

तुमची भूमिका एकूण चित्रपटांबद्दल आहे हे माहीत आहे. तुम्ही चित्रपटक्षेत्रात पाय ठेवत आहात तेव्हा असा विचार करणे चांगलेच. माझा प्रतिसाद स्पेसिफिक ट्रोलांसाठी आहे.

कविता१९७८'s picture

4 Jan 2015 - 7:35 pm | कविता१९७८

आजच पाहीला , आवडला .

विकास's picture

4 Jan 2015 - 8:22 pm | विकास

चित्रपट परीक्षणाबद्दल धन्यवाद! बघण्यासाठी उत्सुक आहे...

चौकटराजा's picture

4 Jan 2015 - 8:47 pm | चौकटराजा

अत्रे यांचे 'कर्‍हेचे पाणी' चे खंड वाचले. मी 'चार्ली चापलिन' हे आत्मकथन वाचले त्याला बरीच वर्षे झाली पण दोन्हीत मला आज ही लक्षांत राहिले ते म्हणजे त्यानी आपले कथन केले नाही तर त्यांनी पाहिलेल्या भवताल मधे मी कुठे होतो अशी ती कथने होती. त्यात स्वता: ची फजिती, पस्तावा ई गोष्टीपण होत्या. तसे चरित्रात काही वेळेसच होते. बर्‍याच वेळा नाही. बरेवाईट सर्वाचाच विचार करण्याचा उद्देश जर चित्रपटाचा नसेल तर टिळ्कांच्या चुका पटातून वगळल्या तर काहीच हरकत असायचे कारण नाही. दिगदर्शकाने चित्रपटाच्या आत्म्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. कथानकाच्या नायकाच्या सदगुणांशी वा दुर्गुणांशी सम्यकपणे निष्ठा असण्याचा दुराग्रह कशासाठी ?

श्रीगुरुजी's picture

4 Jan 2015 - 9:15 pm | श्रीगुरुजी

हा चित्रपट नक्कीच बघणार. लोकमान्य टिळक हे निव्वळ सातंत्र्यसेनानी नव्हते तर एक अत्यंत निर्भीड पत्रकार, लेखक आणि वेदांती होते. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वावर बनलेला चित्रपट नक्की बघणार.

hitesh's picture

4 Jan 2015 - 10:33 pm | hitesh

छान

बॅटमॅन's picture

4 Jan 2015 - 11:02 pm | बॅटमॅन

टुकार पिच्चर आहे. पहिल्या हाफमध्ये काही चांगले क्षण नक्कीच आहेत, परंतु दुसरा हाफ साफच गंडलेला आहे.

एक तर ते फ्लॅशबॅक टेक्निक पूर्णच गंडलेले आहे. उगा काहीतरीच आहे, त्यापेक्षा स्ट्रेट बायोपिक चालले असते.

रँड असा वायझेड का दाखवलाय बटबटीत? २२ जून १८९७ या पिच्चरमध्ये कसा दाखवलाय ते पहा म्हणावं जरा. डब्ल्यू डब्ल्यू एफमधील केनची आठवण येते राव त्याला बघून. तदुपरि पुण्यातल्या प्लेगासाठी डायरेक दिल्लीपर्यंत व्हाईसरॉयपर्यंत कशाला जायचं? मुंबै प्रांताचा गव्हर्नर काय प्लेगच्या उंदरांनी खाल्ला होता काय?

लोकमान्यांच्या राजकीय कारकीर्दीतले सर्वांत महत्त्वाचे पोस्ट-मंडाले क्षण दाखवले नाहीत. लखनौ काँग्रेस नाही, होमरूल नाही, इंग्लंडचा दौरा नाही, अ‍ॅनी बेझंट नाही, गोखले नाहीत, दादाभाई नौरोजी नाहीत. काय चेष्टा लावलीये? वेदोक्त प्रकरण नाही, ताईमहाराज प्रकरण नाही. नुसता आपला 'स्वराज्य' चा कंठाळी नारा. लोकमान्यांसारखी मिशी लावल्याने लोकमान्य होतात की काय?

न्यू इंग्लिश स्कूलमध्येही टिळक 'वैदिक गणित' शिकवतानाचा एक हास्यास्पद सीन दाखवलाय. अरे काय चाललंय? अक्कल नसेल म्हणून काहीही घुसडायचं? बळंच काहीतरी? वैदिक ऊप्स 'वेदिक' गणित हे १९६५ नंतर एकदम प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाअगोदर कुठेही त्याची हवा नव्हती. लोकमान्य गेले १९२० साली. असे असताना हा काय मूर्खपणा लावलाय? स्वतः लोकमान्यांनी हे पाहिलं असतं तर दिग्दर्शकाचे डोके ठिकाणावर आहे काय? असा अग्रलेख लिहिला असता.

विवेकानंदांना भेटले तो क्षणही पूर्णच हास्यास्पद केलाय. विवेकानंदांना भेटायला बेलूर मठात कशाला जायला लागतंय? स्वतं विवेकानंद पुण्यात आले असताना टिळकांबरोबर त्यांची भेट झाल्याचे सगळीकडे नमूद आहे, असे असताना विवेकानंदांना भेटायला टिळक पेश्शल 'ष्टीम दुरांतो' करून कलकत्याला जातात.

गांधी आणि टिळकांची भेटही तितकीच शाळकरी आहे. गांधी अहिंसेबद्दल जे बोलतात ते पाहता एखाद्या गांधीविरोधकाने मुद्दाम टुकार ड्वायलॉक त्यांच्या तोंडी मारले असावेत असं वाटतं. टिळक जे बोलतात ते पाहून गांधींची मान खाली जाते. उगा दाखवायचं म्हणून काहीही दाखवायचं?

अतिशय बटबटीत, अतिशय ढोबळ चुकांनी भरलेला पिच्चर आहे. पाहून संताप होतो. इतके पैसे खर्चून पिच्चर बनवता येतो तर चार पुस्तके वाचता येत नाहीत? इतकं कल्पनादारिद्र्य का दाखवावं? माझ्यासारखे सामान्य प्रेक्षक जर अशा फुटात बारा इंचाच्या चुका काढू शकत असतील तर यांची लायकीच नाही असेच म्हणावे लागेल.

मी काही हॉलिवुडी अपेक्षा करत नाहीये, पण किमान जे दाखवलंय ते तरी जरा सेन्सिबल असू द्या की राव. टिळकांच्या चरित्रात खंडीभर अतिमहत्त्वाच्या घटना घडल्या, त्यांपैकी ज्या दाखवल्या त्या तरी धड दाखवायच्या ना.

जमेची बाजू म्हणजे सुबोध भावे दिसायला डिट्टो लोकमान्य दिसतो. बाकीची कास्टही बर्‍यापैकी तशी दिसेल अशी आहे. आणि ते न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करतानाचे गाणेही लय आवडले. प्रथमार्धातले कूल ड्यूड टिळक नंतर नीट मॅच्युअर होताना दाखवता आले नाहीत. गीतारहस्य इ. देखील नीट सांगता आलेले नाहीये.

टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला तद्वतच शिवाजीउत्सवही सुरू केला. पण त्याची दखल ना के बराबर इतकीच घेतली आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2015 - 11:40 pm | अत्रुप्त आत्मा

खाटुकशी भरपूर सहमत आहे..

हाच...

लोकमान्यांच्या राजकीय कारकीर्दीतले सर्वांत महत्त्वाचे पोस्ट-मंडाले क्षण दाखवले नाहीत. लखनौ काँग्रेस नाही, होमरूल नाही, इंग्लंडचा दौरा नाही, अ‍ॅनी बेझंट नाही, गोखले नाहीत, दादाभाई नौरोजी नाहीत. काय चेष्टा लावलीये? वेदोक्त प्रकरण नाही, ताईमहाराज प्रकरण नाही. नुसता आपला 'स्वराज्य' चा कंठाळी नारा. लोकमान्यांसारखी मिशी लावल्याने लोकमान्य होतात की काय?

नेभळट्पणा का केला? हा प्रश्न मलाही (एकदा) पडला!

पण..

बाकि सिनेमा म्हणून म्हणाल...तर आहे चांगला.सुबोध भावे ..अभिनय - सुंदरच! तांत्रिक बाजूही छान पार पाडल्या आहेत. पण सिनेमाचा बाज पहाता..हा मी,खास लोकमान्यांवर काढलेला चित्रपट आहे,असं मानणार नाही(पब्लिसिटी किंवा धंद्यासाठी..तसं प्रोमोजमधे तसं दाखवलय..हा भाग वेगळा!) सावरकरांवर (बाबुजिंनी)काढलेला चित्रपट जसा फक्त त्याच विषयाला वाहिलेला होता,तसा हा नक्कीच नाही. मुन्नाभाई मधून गांधी जसे त्यांच्या अहिंसा या त्यांच्या मूल्यासह नविन पिढीच्या मनावर ठसवायचा प्रयत्न होता..तद्वतच ह्या चित्रपटातून स्वराज्य..या जन्मसिद्ध हक्कासाठी झगडणारे टीळक मांडायचा प्रयत्न केला गेलेला आहे..आणि म्हणून कदाचित त्या शिवायच्या त्यांच्या चरित्रातल्या इतर गोष्टी बाजुला ठेवल्या असतील,असं मला वाटतं.

त्यावेळचे मटिरिअल कल्चरही उत्तम दाखवलेले आहे. काही गाणीही छान आवडली. पण मूल्यांचे काढे पाजण्याचा "तुम्हाला-शष्प-कळत-नाही-आम्ही-शिकवतो-ते-बघा" छाप पंतोजीपणा आवडत नाही. हे कोण लागून गेले टिकोजीराव? अलीकडे असं दाखवल्यास फारसं कुणी बघेल याची शंकाच आहे. किमान ते नीट व्यवस्थित दाखवल्यास लोकं जरातरी उपदेश सहन करतील.

बॅटमॅन's picture

4 Jan 2015 - 11:48 pm | बॅटमॅन

आणि हो..सुबोध भावे अतिशय हुबेहूब लोकमान्य वाटतो. त्याच्या वाट्याला जे ड्वायलॉक आले ते त्याने व्यवस्थित साकार केले. त्याबद्दल त्याला पैकीच्या पैकी मार्क. पण रायटर आणि डिरेक्टर लोक लैच गंडले.

विकास's picture

5 Jan 2015 - 9:18 am | विकास

विवेकानंदांना भेटायला बेलूर मठात कशाला जायला लागतंय? स्वतं विवेकानंद पुण्यात आले असताना टिळकांबरोबर त्यांची भेट झाल्याचे सगळीकडे नमूद आहे, असे असताना विवेकानंदांना भेटायला टिळक पेश्शल 'ष्टीम दुरांतो' करून कलकत्याला जातात.

चित्रपट पाहीला नसल्याने भाष्य करू शकत नाही. पण आपण सांगितलेले मुद्दे असले तर बर्‍याच तॄटी आहेत असे म्हणावे लागेल. (रँड कसा दाखवला आणि दाखवायला हवा वगैरे सारखे मुद्दे हा ज्याचा त्याचा प्रश्न असो...). मात्र विवेकानंदांसंदर्भात काही माहिती म्हणून सांगावेसे वाटत आहे. हा प्रसंग (कसा दाखवला ते मला माहीत नाही! पण) का घेतला असावा हे, खालील वाचल्यावर समजेल. माझा संदर्भः "लोकमान्य टिळकांच्या आठवणी" हे पुस्तक आहे, ज्यात समकालीनांनी टिळकांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. पण आत्ताच विवेकानंद.नेट वर टिळकांनीच लिहीलेली या संदर्भातील आठवण मिळाली... थोडक्यात विवेकानंद टिळकांना १८९२ ला शिकागोला जाण्याआधी मुंबई-पुणे प्रवासात भेटले होते. त्यावेळेस ते टिळकांकडे राहीले देखील होते. पण त्यांना स्वामींचे नाव केवळ "संन्यासी" इतकेच सांगितले होते. नंतर शिकागो प्रसंगानंतर टिळकांनी फोटो पाहील्यावर त्यांना पत्र पाठवून "आपणच ते का?" असे विचारले. त्यावर विवेकानंदांनी "हो" म्हणून उत्तर पाठवले.

नंतर कलकत्ता काँग्रेसच्या दरम्यान, टिळक त्यांना भेटायला बेल्लूरला गेले होते. "आठवणी..." पुस्तकानुसार तेंव्हा दोघे गंगेच्या काठवर आणि गंगेमधे काही अंतर चालत गेले आणि एकांतात बोलले. टिळकांच्या लेखनाप्रमाणे त्यांंच्यात खालील बोलणे झाले (शेवटचे वाक्य वाचण्यासारखे आहे!):

Once after this, during one of the Congress sessions at Calcutta, I had gone with some friends to see the Belur Math of the Ramakrishna Mission. There Swami Vivekananda received us very cordially. We took tea. In the course of the conversation Swamiji happened to remark somewhat in a jocular spirit that it would be better if I renounced the world and took up his work in Bengal while he would go and continue the same in Maharashtra. "One does not carry," he said, "the same influence in one's own province as in a distant one."

सुनील's picture

5 Jan 2015 - 9:39 am | सुनील

We took tea

हे रोचक वाटते आहे. विशेषतः कलकत्ता काँग्रेस जी १९११ ला झाली आणि पंच हौद मिशन चहा प्रकरण १८९० सालीच घडले होते, त्या संदर्भात.

अधिक माहितीच्या प्रतीक्षेत.

क्लिंटन's picture

5 Jan 2015 - 10:35 am | क्लिंटन

विशेषतः कलकत्ता काँग्रेस जी १९११ ला झाली आणि पंच हौद मिशन चहा प्रकरण १८९० सालीच घडले होते, त्या संदर्भात.

१८९३ मध्ये विवेकानंदांनी शिकागो जिंकले त्यानंतर लोकमान्यांची आणि विवेकानंदांच्या खर्‍या अर्थाने ओळख झाली. विवेकानंद १९०३ मध्ये गेले.१८९३ ते १९०३ या दरम्यान १८९६ आणि १९०१ या दोन वर्षी काँग्रेसचे अधिवेशन कलकत्त्यात भरले होते. १९३० च्या दशकात काँग्रेसची अधिवेशने मार्च महिन्यात भरायला लागली त्यापूर्वी ती डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होत असत. म्हणजे कलकत्त्याची अधिवेशने डिसेंबर १८९६ आणि डिसेंबर १९०१ मध्ये झाली असतील हे सयुक्तिक वाटते.

या दुव्यावर विवेकानंदांच्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यांची माहिती दिली आहे.त्यानुसार ते १८९३ ते १८९६ या काळात भारताबाहेर होते.ते ३० डिसेंबर १८९६ रोजी नेपल्स (इटली) हून भारतात यायला बोटीने निघाले.त्यामुळे लोकमान्य-विवेकानंद भेट १८९६ च्या कलकत्ता काँग्रेसच्या वेळी झाली असणे शक्य नाही. विवेकानंद १८९९-१९०० या काळातही परदेशी होते.पण १९०१ मध्ये ते नक्कीच बेलूर मठात होते.तेव्हा ही भेट १९०१ च्या काँग्रेसच्या वेळी झाली असणे अधिक सयुक्तिक वाटते.

चित्रपट अजून बघितलेला नाही त्यामुळे चित्रपटात ही भेट नक्की कधी दाखविली आहे याची कल्पना नाही. पण ही भेट रँडला मारायच्या प्रकरणापूर्वी दाखवली असेल तर मात्र ती नक्कीच चूक असेल.

बॅटमॅन's picture

5 Jan 2015 - 12:08 pm | बॅटमॅन

धन्यवाद चूक दुरुस्त केल्याबद्दल.

चित्रपट बहुदा उद्या बघणार आहे.या प्रतिसादानंतर फार अपेक्षा न बाळगताच चित्रपट बघायला जाईन.

गांधी आणि टिळकांची भेटही तितकीच शाळकरी आहे. गांधी अहिंसेबद्दल जे बोलतात ते पाहता एखाद्या गांधीविरोधकाने मुद्दाम टुकार ड्वायलॉक त्यांच्या तोंडी मारले असावेत असं वाटतं. टिळक जे बोलतात ते पाहून गांधींची मान खाली जाते. उगा दाखवायचं म्हणून काहीही दाखवायचं?

कोणीही यावे आणि आपला नेता किती मोठा होता हे दाखवताना गांधीजींना चारदोन टपल्या माराव्यात हा प्रकार अनेक ठिकाणी बघायला मिळतो (मिसळपाववरच पूर्वी कोणीतरी हे लिहिले होते ते इथे उधृत करत आहे :) ). त्यातलाच हा प्रकार दिसतो. इतर महापुरूषांवरील चित्रपटात गांधीजी हे महत्वाचे पात्र नाही म्हणून दुय्यम भूमिका द्यायला काही ना नाही पण उगीच खोटेनाटे काहीतरी घुसडले जाऊ नये ही अपेक्षा.

अवतार's picture

5 Jan 2015 - 8:02 pm | अवतार

सहमत.

टिळक-विवेकानंद भेटीबद्दल ऐतिहासिक दृष्ट्या काय खरे आहे ह्याची कल्पना नाही. मी दुर्दम्य वाचली आहे. त्यात टिळक विवेकानंदांना भेटायला बेलूर मठात जातात असा प्रसंग आहे. पुण्यातील भेटही दाखवलीच आहे.

ग्रेटथिंकर's picture

5 Jan 2015 - 12:28 am | ग्रेटथिंकर

गणेशोत्सव टिळकांनी सुरु केला हे खरे ,परंतु शिवजयंती पहिल्यांदा सुरु करण्याचा मान महात्मा फुल्यांकडे जातो ,१८६९ साली फुल्यांनी सार्वजनिकरित्या शिवजयंती साजरी केल्याची नोँद ब्रिटीश अर्काईव्हज् मध्ये आहे.

बॅटमॅन's picture

5 Jan 2015 - 4:11 am | बॅटमॅन

लिंक मिळेल का?

अर्धवटराव's picture

5 Jan 2015 - 6:12 am | अर्धवटराव

बसा बोंबलत :P

मृत्युन्जय's picture

5 Jan 2015 - 11:43 am | मृत्युन्जय

या वर्षीचा पहिला ठ्ठो प्रतिसाद म्हणुन या प्रतिसादाची नोंद करावी असे नमूद करु इच्छितो. :)

श्रीगुरुजी's picture

5 Jan 2015 - 12:33 pm | श्रीगुरुजी

>>> लिंक मिळेल का?

लिंक कसली मागताय नानासाहेब नेफळ्यांना? ते स्वतः प्रत्यक्ष त्या मिरवणुकीत लेझीम खेळत होते अशी ब्रिटीश गॅझेटीअर मध्ये नोंद आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jan 2015 - 1:13 pm | अत्रुप्त आत्मा

=)))))

नाखु's picture

5 Jan 2015 - 2:00 pm | नाखु

ह्या प्रसंगातील शेंगा नानाच शाळेत घेवुन गेले असे एकुन आहे. खरं खोटं माई जाणे.

शिवाय मला शेंगा (खायला) मिळाल्या नाहीत म्हणून मी नाव सांगणारच !!! ह अजरामर डायलाक बी नानांचा आहे हे मागेच माईंनी महीला मंडळाच्या सभेत सांगीतले आहेच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jan 2015 - 8:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

नाना-माईचे नाव दिसले की मिपाकरांच्या प्रतिभेला अकल्पित वसंतबहर फुटतो... या जोडगोळीची अनन्यसाधारण महत्ता सिद्ध करणारा याहून मोठा सबळ पुरावा तो काय ?! :) ;)

वरील माहिती बरोबर आहे. १८६९ साली ज्योतिराव रायगडावर गेले आणि त्यांनी झाडाझुडुपांनी वेढलेली शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. शिवजयंतीची सुरूवात ज्योतिबांनी १८७० साली केली.

अर्थात, या माहितीची तटस्थ म्हणता येईल अशी लिंक मला सापडली नाही. पण फुल्यांना सार्वजनिक शिवजयंती उत्सव सुरू करण्याचे श्रेय नक्कीच जाते.

अर्थात, हे या धाग्यावर फारच अवांतर आहे. चित्रपटाविषयी बोलण्यापेक्षा नेहमीप्रमाणेच विषय इकडेतिकडेच घरंगळतो आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Jan 2015 - 10:02 pm | llपुण्याचे पेशवेll

शिवजयंती सार्वजनिक रित्या कोणी पहीली साजरि केली असा प्रश्न असेल तर उत्तर बरोबर असेलही परंतु टिळकानी सार्वजनिक शिवजयंती सार्वत्रिक (लोकप्रिय) केली असे म्ह्णणे जास्त सयुक्तीक दिसते.
सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पनाही भाऊ रंगार्‍यांच्या वाड्यातील गणेशोत्सवावरून आणि अन्य संस्थानिकांकडे साजर्‍या होण्यार्‍या गणेशोत्सवावरूनच घेतलेली होती परंतु सार्वजनिक गणेशोत्सव असे स्वरूप प्राप्त करून देणे हे श्रेय लोकमान्यांचेच.

एस's picture

5 Jan 2015 - 10:50 pm | एस

तसे म्हणा हवे तर.

माहितीकरिता धन्यवाद स्वॅप्स! हे अगोदर वाचल्याचे आठवते आहे, पण मध्ये विस्मरणात गेले होते. तुमचा प्रतिसाद वाचून पुन्हा एकदा आठवले, धन्यवाद!

ग्रेटथिंकर's picture

8 Jan 2015 - 12:54 am | ग्रेटथिंकर

@बॅटमॅन
http://www.youtube.com/watch?v=9WYGJVXrVjI&itct=CCEQpDAYASITCNW1iuHLgsMC...
हे हरि नरकेंचे भाषण ,नीट ,संपुर्ण ऐका. शिवजयंती फुलेंनी सुरु केली व नंतर ती टिळकांच्या नावावर ती का व कशी खपवली जाते याचे पुराव्यासहीत स्पष्टीकरण दिलेले आहे.

ग्रेटथिंकर's picture

8 Jan 2015 - 1:01 am | ग्रेटथिंकर

जमल्यास ती हरी नरकेंची सीरीज पुर्ण बघा, गोबेल्सनीतीने इतिहास कसा बदलला जातो याचे त्यात पुराव्यानीशी स्पष्टीकरण केले आहे.

श्रीगुरुजी's picture

8 Jan 2015 - 1:11 pm | श्रीगुरुजी

नानासाहेब,

गोबेल्सनीति, गोबेल्सनीति म्हणतात ती यांच्याच लेखातून आणि व्याख्यानातून दिसते. जरा डोळे उघडे ठेवून वाचा म्हणजे समजेल.

श्रीगुरुजी's picture

8 Jan 2015 - 1:09 pm | श्रीगुरुजी

ह्याच हरी नरक्यांनी काही वर्षांपूर्वी अनेक लेखातून असे लिहिले होते की ब्राह्मणांची संख्या ५-६ टक्के आहे, परंतु सरकारी सेवेत ३३-३४ टक्के ब्राह्मण आहेत. म्हणजे ब्राह्मणांसाठी ६०० टक्क्यांहून अधिक जागा राखीव आहेत.

ह्याच हरी नरक्यांनी काही वर्षांपूर्वी अनेक लेखातून असे लिहिले होते की अमेरिकेत कृष्णवर्णियांना राखीव जागा दिलेल्या आहेत, मग भारतात इतर मागासवर्गियांना राखीव जागा का नाहीत?

ह्याच हरी नरक्यांनी संभाजी ब्रिगेडच्या सुरवातीच्या काळात अनेकवेळा ब्रिगेडच्या व्यासपीठावर हजेरी लावून ब्रिगेडींच्या जातीयवादी व फॅसिस्ट अजेंड्याचे समर्थन केले होते.

यांची विश्वासार्हता ती किती?

पिशी अबोली's picture

8 Jan 2015 - 3:26 pm | पिशी अबोली

महाराष्ट्री प्राकृतला मराठी म्हणणारे सुद्धा हेच...

नरके हा सेमीब्रिगेडीच आहे. त्यामुळे त्यांचा दुवा विश्वासार्ह नाही.

तदुपरि स्वॅप्स यांनी दिलेली माहितीही पहावी. फुल्यांनी सुरू केली पण टिळकांनी ती जास्त पापिलवार केली हे खरेच आहे.

ग्रेटथिंकर's picture

8 Jan 2015 - 4:07 pm | ग्रेटथिंकर

नरके ब्रिगेडशी थेट संबंधित कधीच नव्हते, व्याख्याता म्हणुन ते त्यांच्या व्यासपीठावर गेले याचा अर्थ ते ब्रिगेडी ठरत नाही.तसच असेल तर ब मो पुरंदरे बर्याचदा हिंदुत्ववाद्यांच्या व्यासपीठावर दिसतात ,मग त्यांचे लेखन हिंदुत्ववादी मानसिकतेतुन झाले असेच म्हणावे लागेल.

नरके हे भाषातज्ञ व इतिहासतज्ञ आहेत, बाकी त्यांनी दिलेले पुरावे जेन्युन आहेत, ते खोडता येत नसल्यास कबुल करा की यांचा प्रतिवाद करता येत नाही.
बाकी याच धाग्यावर बॅटमॅन यांनी टिळकांनी शिवजयंतीउत्सव सुरु केला असे विधान केले आहे. http://misalpav.com/comment/reply/29917/647020
या प्रतिसादाच्या वरच्या कमेंटमध्ये शिवजयंती फक्त पॉप्युलर केल्याचा दावा केला आहे, एकाच धाग्यावर एवढा विरोधाभास!

अद्द्या's picture

8 Jan 2015 - 5:10 pm | अद्द्या

ब मो पुरंदरे बर्याचदा हिंदुत्ववाद्यांच्या व्यासपीठावर दिसतात ,मग त्यांचे लेखन हिंदुत्ववादी मानसिकतेतुन झाले असेच म्हणावे लागेल.

पुरंदरे आणि बी - ग्रेडिंना एकाच पारड्यात तोलणारे तुम्ही खरेच ग्रेट म्हटले पाहिजेत . .

ग्रेटथिंकर's picture

8 Jan 2015 - 6:39 pm | ग्रेटथिंकर

फक्त नरकेंनाच क्रिटीकली घ्यायचे काय!! बाकीचे का नाही ??
ब मो पुरंदरेंकडे इतिहासाची कुठलीच पदवी नसताना ते लिहतील ते ब्रह्मवाक्य कशावरुन? फक्त अजेंडा राबवायचा असेल तर नरके व पुरंदरे आपापले अजेंडे राबवतच आहेत, पण नरके त्याला पुराव्याची जोड देत आहेत.

श्रीगुरुजी's picture

8 Jan 2015 - 8:30 pm | श्रीगुरुजी

>>> ब मो पुरंदरेंकडे इतिहासाची कुठलीच पदवी नसताना ते लिहतील ते ब्रह्मवाक्य कशावरुन?

नानासाहेब,

ब्रिगेडी अजेंडा, ब्रिगेडी अजेंडा म्हणतात तो हाच.

इतिहासाची पदवी देणार्‍या संस्थांमध्ये काय लायकीचे शिक्षण मिळते हे सर्वांनाच माहिती आहे. मोजके अपवाद वगळल्यास नुस्ता गाळ भरला आहे. त्यामुळे ग्रेटथिंकरांच्या उद्गारांची मजा घेणे इतकेच आपल्या हाती उरते. तुम्हांला वेगळे सांगायला नकोच म्हणा.

श्रीगुरुजी's picture

8 Jan 2015 - 8:52 pm | श्रीगुरुजी

दिल्लीच्या नेहरू विद्यापीठाच्या इतिहास विभागातून पदवी मिळविणार्‍यांनाच नानासाहेब नेफळे इतिहासकार मानतात. उदा. रोमिला थापर, इरफान हबीब इ.

>>> त्यामुळे ग्रेटथिंकरांच्या उद्गारांची मजा घेणे इतकेच आपल्या हाती उरते. तुम्हांला वेगळे सांगायला नकोच म्हणा.

मी नेहमीच नानांच्या पोकळ दाव्यांचा आनंद घेत असतो. २-३ महिन्यांपूर्वी त्यांनीच असा दावा केला होता की १९८० च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नुकत्याच स्थापन झालेल्या भाजपला ज्या १२ जागा मिळाल्या होत्या त्या राम मनोहर लोहियांच्या प्रभावामुळे मिळाल्या होत्या. (राम मनोहर लोहिया हे जनसंघी नसून समाजवादी होते आणि ते १९६७ मध्येच गेले होते). नानांच्या या मुक्ताफळांवर मी पोट धरून हसलो होतो.

बॅटमॅन's picture

8 Jan 2015 - 9:01 pm | बॅटमॅन

दिल्लीच्या नेहरू विद्यापीठाच्या इतिहास विभागातून पदवी मिळविणार्‍यांनाच नानासाहेब नेफळे इतिहासकार मानतात. उदा. रोमिला थापर, इरफान हबीब इ.

हा हा हा, मग ब्रिगेडचे सर्वच इतिहासकार त्यातून गळाले की हो. =)) नरक्यांचं शिक्षण कुठं झालंय ते माहिती नाही, ते एक कळालं असतं तर नानांच्या लेखी ते इतिहासकार आहेत की नाही ते समजलं असतं.

बाकी नानांच्या अगाध ज्ञानाबद्दल काय बोलावे. तुम्हांलाच ते जास्त माहिती असेल.

ब मो पुरंदरेंकडे इतिहासाची कुठलीच पदवी नसताना ते लिहतील ते ब्रह्मवाक्य कशावरुन?

मी असं कधीच म्हणालो नाही कि पुरंदरे म्हणतील ते ब्रम्हवाक्य . पण मी जेवढ त्यांना बोलताना ऐकलंय / बघितलंय त्यानुसार ते कधीही पुरावे सोडून बोलत नाहीत . .
आणि काही का असेना . बी ग्रेड सारखा YZ पणा तर कधीच करत नाही .

श्रीगुरुजी's picture

8 Jan 2015 - 8:28 pm | श्रीगुरुजी

>>> नरके हे भाषातज्ञ व इतिहासतज्ञ आहेत, बाकी त्यांनी दिलेले पुरावे जेन्युन आहेत, ते खोडता येत नसल्यास कबुल करा की यांचा प्रतिवाद करता येत नाही.

नानासाहेब,

त्यांची स्वतःची विश्वासार्हता व निष्पक्षपातीपणा संशयास्पद असल्याने त्यांनी जे काही दावे केले आहेत त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य.

ग्रेटथिंकर's picture

8 Jan 2015 - 9:48 pm | ग्रेटथिंकर

नरकेंचा निष्पक्षपातीपणा

निष्पक्षपातीपणा दाखवायचा म्हणजे नक्की काय करायचं? नरकेंच्या भाषणाच्या चौदा क्लीप आहेत ,त्यात त्यांनी पुराव्यानीशी प्रत्येक गोष्ट मांडली आहे व त्या पुराव्यांवर व त्यांच्या विश्वासार्हतेवर जाहिर वादविवादाची तयारीही दाखवली आहे.आणखी काय करायचे?
शिवईतिहासावर अशाच एका चर्चेचे आव्हान केल्यानंतर महाराष्ट्रातल्या तथाकथीत ईतिहासकारांनी(?) जाहिर पळ काढुन आपली खरी 'पात्रता' सिद्ध केली होती.

कुणाला 'सफेद दाढी ' हाच जर विश्वासार्हतेचा मापदंड वाटत असेल तर त्याने तसे जाहीर करावे *ROFL*

श्रीगुरुजी's picture

9 Jan 2015 - 12:51 pm | श्रीगुरुजी

>>> निष्पक्षपातीपणा दाखवायचा म्हणजे नक्की काय करायचं?

नानासाहेब,

निष्पक्षपातीपणा दाखवायचा म्हणजे आपली जात, आपली विचारसरणी, आपल्याला ज्यांचे विचार पटत नाहीत त्यांची जात, त्यांच्याविषयीचा मनातील पूर्वग्रह इ. दूर सारून निव्वळ वस्तुस्थितीवर आधारीत अभ्यास करून निष्कर्ष मांडायचे. तुम्ही ज्यांचा हवाला देत आहात ते वरील कोणत्याच निकषांवर निष्पक्षपाती नाहीत. त्याहून महत्त्वाचे म्हणजे एका विशिष्ट जातीविषयी अत्यंत खोटा व पुर्वग्रहदूषित प्रचार करणार्‍या एका अत्यंत जातीयवादी व फॅसिस्ट संघटनेशी ते संबंधित आहेत. त्या संघटनेच्या व्यासपीठावर अनेकवेळा उपस्थित राहून त्या संघटनेच्या फॅसिस्ट व जातीयवादी अजेंड्याचे त्यांनी जाहीर समर्थन केले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल.

>>> नरकेंच्या भाषणाच्या चौदा क्लीप आहेत ,त्यात त्यांनी पुराव्यानीशी प्रत्येक गोष्ट मांडली आहे व त्या पुराव्यांवर व त्यांच्या विश्वासार्हतेवर जाहिर वादविवादाची तयारीही दाखवली आहे.आणखी काय करायचे?

वर उत्तर दिले आहे.

>>> शिवईतिहासावर अशाच एका चर्चेचे आव्हान केल्यानंतर महाराष्ट्रातल्या तथाकथीत ईतिहासकारांनी(?) जाहिर पळ काढुन आपली खरी 'पात्रता' सिद्ध केली होती.

कोणी व कधी पळ काढला होता त्याची लिंक देता का?

>>> कुणाला 'सफेद दाढी ' हाच जर विश्वासार्हतेचा मापदंड वाटत असेल तर त्याने तसे जाहीर करावे

लोकांच्या जातीपातीवरून, रंगरूपावरून विश्वासार्हता ठरविणे ही तुमच्यासारख्यांची कामं. तुम्ही व्यक्तीच्या अभ्यासावरून, ज्ञानावरून व संशोधनावरून विश्वासार्हता न ठरविता त्या व्यक्तीचा आडनावावरून विश्वासार्हता ठरविता. म्हणूनतर तुम्हाला अनेक डूआय वापरून प्रतिसाद द्यावे लागतात व त्यामुळेच तुमच्यासारख्यांची विश्वासार्हता शून्य आहे.

ग्रेटथिंकर's picture

9 Jan 2015 - 1:36 pm | ग्रेटथिंकर

@श्रीगुरुजी,नरके कोणत्या फॅसिस्ट संघटनेशी सलग्न आहेत ते सांगितले तर बरे पडेल.आणि जरी असले तरीही वादविवादाची तयारी दाखवत आहेत, ते ही पुराव्यानीशी ,अशा वादात नरकें वगैरे लोकांना सहज खोटे पाडता येऊ शकते व त्यांची पोलखोल करता येऊ शकते.व पुरंदरे बेडेकर आदींची विश्वासार्हता आणखि वाढीस लागू शकते, परंतु नरकेंचा प्रतिवाद करायला अजूनही कुणीही पुढे आलेला नाही ,अगदी युट्युबवरही नाही. याचा अर्थ त्यांचा युक्तीवाद बिनतोड आहे असाच आहे.

बाकी पुरंदरे बेडेकर आदी तज्ञ अनेक हिंदुत्ववादी पक्ष व संघटनांच्या व्यासपीठावर दिसतात, याचा अर्थ काय घ्यायचा? ते ही एका विशिष्ट धर्मीयांच्या विरोधातच सतत लिहीत असतात व एका विशिष्ट जातीचे सतत उदात्तीकरण करत असतात असा घ्यायचा का व उपरोक्त तुमच्या लॉजिकने त्यांची विश्वासार्हताही शुन्य समजावी लागेल.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jan 2015 - 1:55 pm | अत्रुप्त आत्मा

@नरकेंचा प्रतिवाद करायला अजूनही कुणीही पुढे आलेला नाही ,अगदी युट्युबवरही नाही. याचा अर्थ त्यांचा युक्तीवाद बिनतोड आहे असाच आहे. >>> +++++१११११ :
आमच्या वैदिक पंडितांना मी अगदी अशीच आव्हान समजावली पोहोचवली आहेत. पण ते ही योग्य जागी पाय लाऊंन पळतात.

श्रीगुरुजी's picture

9 Jan 2015 - 2:20 pm | श्रीगुरुजी

>>> @श्रीगुरुजी,नरके कोणत्या फॅसिस्ट संघटनेशी सलग्न आहेत ते सांगितले तर बरे पडेल.

आधीचे प्रतिसाद वाचा म्हणजे कळेल.

>>> आणि जरी असले तरीही वादविवादाची तयारी दाखवत आहेत, ते ही पुराव्यानीशी ,अशा वादात नरकें वगैरे लोकांना सहज खोटे पाडता येऊ शकते व त्यांची पोलखोल करता येऊ शकते.व पुरंदरे बेडेकर आदींची विश्वासार्हता आणखि वाढीस लागू शकते,

नरक्यांना खोटे पाडल्यामुळे पुरंदरे, बेडेकर इ. विश्वासार्हता कशी बदलेल? त्यांचे लेखन व संशोधन सुरवातीपासूनच विश्वासार्ह आहे व नरके काय दावे करतात याच्याशी त्याचा अजिबात संबंध नाही.

>>> परंतु नरकेंचा प्रतिवाद करायला अजूनही कुणीही पुढे आलेला नाही ,अगदी युट्युबवरही नाही. याचा अर्थ त्यांचा युक्तीवाद बिनतोड आहे असाच आहे.

असं म्हणणं म्हणजे संजय दत्तच्या फर्लो रजेसारखंच झालं. रजा वाढविण्याच्या अर्जावर अजून निर्णय झालेला नाही याच बाय डिफॉल्ट अर्थ रजा वाढविली गेली आहे असा सोयिस्कर अर्थ काढून तो अजूनही बाहेरच आहे. अगदी तसंच झालं हे. एखाद्याच्या दाव्याचा प्रतिवाद करायला ती व्यक्ती व तिचा पूर्वोतिहास विश्वासार्ह असावा लागतो. तसे नसेल तर अशा व्यक्तीकडे व तिच्या दाव्यांकडे दुर्लक्ष केले जाते. इथेही तसेच आहे. २६/११ नंतर अंतुले, दिग्विजय आणि आता कोल्हापूरचा कोणीतरी मुश्रीफ असे दावे करत होते की हा हल्ला संघाच्या लोकांनी केला आहे व पाकड्यांचा याच्याशी संबंध नाही. १६ डिसेंबरचा पेशावरचा हल्ला हा भारताने केला होता असा दावा काही पाकड्यांनी केला होता. अशा मूर्खपणाच्या दाव्याचा प्रतिवाद न करण्याचा शहाणपणा सर्वांनीच दाखविला आहे. असल्या दाव्यांचा प्रतिवाद न करता दुर्लक्ष केले म्हणजे तो दावा खराच व बिनतोड आहे असा अर्थ तुमच्यासारखी मंडळी काढतात. परंतु तो मूर्खपणा असतो.

>>> बाकी पुरंदरे बेडेकर आदी तज्ञ अनेक हिंदुत्ववादी पक्ष व संघटनांच्या व्यासपीठावर दिसतात, याचा अर्थ काय घ्यायचा? ते ही एका विशिष्ट धर्मीयांच्या विरोधातच सतत लिहीत असतात व एका विशिष्ट जातीचे सतत उदात्तीकरण करत असतात असा घ्यायचा का व उपरोक्त तुमच्या लॉजिकने त्यांची विश्वासार्हताही शुन्य समजावी लागेल.

पुरंदरे, बेडेकर इ. तज्ज्ञ इतिहास संशोधक फक्त हिंदुत्ववादी संघटनेच्याच नव्हे तर सर्वच व्यासपीठावर जातात. हिंदुत्व संघटनेशी अजिबात संबंध नसलेल्या अनेक व्यासपीठांवर जाऊन त्यांनी व्याख्याने दिली आहेत (उदा. टिळक स्मारक व्याख्यानमाला) व हिंदुत्ववादी नसलेले अनेक काँग्रेस/राष्ट्रवादीचे पुढारी त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत. त्यांची विश्वासार्हता संशयातीत आहे. ते ब्रिगेडच्या व्यासपीठावर गेले नसावेत कारण ब्रिगेडींना त्यांच्या आडनावाची अ‍ॅलर्जी आहे, त्यामुळे त्यांना तिथे आमंत्रणच नाही.

पिशी अबोली's picture

9 Jan 2015 - 3:04 pm | पिशी अबोली

परंतु नरकेंचा प्रतिवाद करायला अजूनही कुणीही पुढे आलेला नाही

नानासाहेब, तुमचे नरके ज्या विषयांवर बोलतात, त्या विषयांवर संशोधन करणारे ते पहिले आणि एकमेव नाहीत. त्यांच्या भाषाविषयक क्लेम्स बद्दल तर मी नक्कीच सांगू शकते, की त्यांच्या आधी भरपूर निष्पक्षपाती संशोधन झालेलं आहे, ज्याला योग्य त्या वर्तुळात योग्य ती मान्यता आहे. कोणीही स्वयंघोषित तज्ञ उठतो आणि काय वाटेल ते सांगत सुटतो, म्हणून सगळे संशोधक चालले त्याचे प्रतिवाद करायला, असं संशोधनाच्या क्षेत्रात होत नाही. हवे असल्यास त्या तथाकथित तज्ञांनी आपापले राजकीय अजेंडे बाजूला ठेऊन मान्यताप्राप्त तज्ञांच्या संशोधनाचा नीट अभ्यास करावा. घसे फोडून आक्रमक पद्धतीने संगितलेली गोष्ट खरी ठरत नाही. असो.

ग्रेटथिंकर's picture

9 Jan 2015 - 3:43 pm | ग्रेटथिंकर

घसे फाडून आक्रमकपणे मांडलेली गोष्ट खरी ठरत नाही


अगदी अगदी.याच धर्तीवर कुणीतरी विशिष्ट जातीचा आहे, त्याला पांढरी दाढी आहे, नाटकीय संवाद लिहीतो, विशिष्ट धर्माला ग्रे शेडमध्ये दाखवतो, विशिष्ट संघ/संघटनांमध्ये उठबस करतो म्हणुन तो विश्वासार्ह होत नाही.
पैसा's picture

9 Jan 2015 - 6:10 pm | पैसा

कंट्रोल मि. ग्रेटथिंकर. या धाग्यावर चित्रपट सोडून अन्य चर्चा घडवून आणण्यात तुम्ही यशस्वी झालात. अन्य मिपाकरांचे त्यासाठी हाबिणंदन. तुमच्या त्या अभ्यासपूर्ण लेखाची वाट पहात आहे. जाती आणि दाढीचा उल्लेख तुम्ही सोडून आणखी कोणी करत नाहीये, याचे भान असो द्यावे.

श्रीगुरुजी's picture

9 Jan 2015 - 8:17 pm | श्रीगुरुजी

+१

हा नानासाहेब नेफळे उपाख्य माईसाहेब कुरसुंदीकर उपाख्य ग्रेटथिन्कर उपाख्य टॉपगिअर्ड फिलॉसॉफर उपाख्य ग्रेटथिंकर आपल्या प्रत्येक अवतारात तेच तेच जातीय प्रतिसाद देत असतो आणि चर्चा भरकटवण्यात यशस्वी होतो.

ये विशिष्ट विशिष्ट क्या है, ये विशिष्ट विशिष्ट?

श्रीगुरुजी's picture

9 Jan 2015 - 8:19 pm | श्रीगुरुजी

>>> >>> शिवईतिहासावर अशाच एका चर्चेचे आव्हान केल्यानंतर महाराष्ट्रातल्या तथाकथीत ईतिहासकारांनी(?) जाहिर पळ काढुन आपली खरी 'पात्रता' सिद्ध केली होती.

>>> कोणी व कधी पळ काढला होता त्याची लिंक देता का?

नानासाहेब नेफळे,

कधी देताय लिंक?

बॅटमॅन's picture

8 Jan 2015 - 8:45 pm | बॅटमॅन

हाहा, जेवढे ज्ञान आहे त्याच्या आधारे आम्ही बोलत असतो. काही चूक आढळल्यास सुधारून घ्यायला आमची ना नसते. तदुपरि या नरकेमहाशयांचे बाकीचे प्रताप आम्हांला चांगलेच माहिती आहेत. तेव्हा बाकी असोच असो.

आमच्या नानाला काय बोलायच नाय...
तो अमर हाय.
मी लवकरच "नाना-माई की अमरप्रेम कथा" असा पिच्चर बनवणार हाय.
ज्यांना काम पायजे त्यांनी व्यनी करु नये.
आमीच इथले एक एक नग पात्ररचनेत घ्यु.

पिंपातला उंदीर's picture

9 Jan 2015 - 9:00 pm | पिंपातला उंदीर

सध्या ओबीसी आरक्षणा वरून नरके आणि बी ग्रेडी मध्ये धुमशान चालू आहे . मराठा आरक्षणा ला विरोध केल्याने सध्या बी ग्रेडी नरके यांचा शेलक्या भाषेत उद्धार करत आहे .

असल्यास तिच द्या ना... कशाला उगाच एव्हढा पेटारा उघडा करताय? आणि नसल्यास हा व्हिडीओ कुठल्याच कामाचा नाहि.

मदनबाण's picture

5 Jan 2015 - 2:14 pm | मदनबाण

माई मोड ऑन>>
शेंगात शेंगा भुईमुगाच्या शेंगा
आमच्या "ह्यांच" नाव घेते...
नाना आणि ग्रेटथिंकरला उगीच शंका !
माई मोड ऑफ>>
*LOL*

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || अच्युतम केशवं ||

जेपी's picture

5 Jan 2015 - 2:19 pm | जेपी

माई मोड ऑन>>
शेंगात शेंगा भुईमुगाच्या शेंगा
आमच्या 'ह्यांच नाव घेते..
नाना आणी ग्रेटथिंकरला ठेंगा!
माई मोड ऑफ>>>
*wink*

बॅटमॅन's picture

5 Jan 2015 - 2:23 pm | बॅटमॅन

हे भारीये =))

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jan 2015 - 3:03 pm | अत्रुप्त आत्मा

@आमच्या 'ह्यांच नाव घेते..
नाना आणी ग्रेटथिंकरला ठेंगा! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif वारल्या गेलो आहे!

विशाल कुलकर्णी's picture

5 Jan 2015 - 4:55 pm | विशाल कुलकर्णी

हे खरे तर असे हवे आहे...

माई मोड ऑन>>
शेंगात शेंगा भुईमुगाच्या शेंगा
नाना आणी ग्रेटथिंकरचे नाव घेते..
आमच्या 'ह्यां'च्या डोक्याला भूंगा !
माई मोड ऑफ>>> ;)

इरसाल's picture

6 Jan 2015 - 10:42 am | इरसाल

माई मोड ऑन>>
शेंगात शेंगा भुईमुगाच्या शेंगा
नाना आणी ग्रेटथिंकरचे आय्डी गेले..
तर नवा डुआयडी काढु चंगा !
माई मोड ऑफ>>> Wink

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Jan 2015 - 10:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

=))

=))

=))

=))

ठ्ठो!!!!!

अजया's picture

8 Jan 2015 - 8:49 pm | अजया

=))