लोकमान्य - एक युगपुरूष

श्रीरंग's picture
श्रीरंग in जनातलं, मनातलं
4 Jan 2015 - 11:34 am

लोकमान्य टिळक : जाज्वल्य राष्ट्रवादी विचारांनी एका संपूर्ण पिढीला भारून टाकणारे, स्वातंत्र्यलढ्यात झोकून द्यायला प्रव्रुत्त करणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्व. महाराष्ट्राने ज्यांच्यावर निस्सिम प्रेम केलं, नव्हे ज्यांची अक्षरशः भक्ती केली अशा महानायकाचा जीवनपट येणं अतीशय स्वागतार्ह आहे.
चित्रपट उलगडत जातो तो मकरंद (चिन्मय मांडलेकर) या पत्रकाराच्या नजरेतून. लोकमान्यांच्या सापडलेल्या एका दुर्मिळ ध्वनीफीतीच्या प्रक्षेपण समारंभाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेला मकरंद त्यांचे विचार ऐकून अंतर्मुख होतो. "तरुणांनी स्वतःची प्रगती अवश्य करावी. पण त्याबरोबरच स्वतःच्या कौशल्याचा, विद्येचा जास्तीत जास्त उपयोग देशासाठी कसा होईल, याचा सदैव विचार करावा." हे शब्द मनात रुंजी घालू लागतात. काळाच्या ओघात, लोकमान्यांचे विचार कुठेतरी विस्मृतीत गेल्याची जाणीव त्याला अस्वस्थ करते. होणार्या सासर्याकडून मुलाला अमेरिकेत नोकरी मिळाल्याचे प्रचंड कौतुक सतत ऐकून, ही जाणीव अजूनच तीव्र होते. लोकमान्यांसारख्यांनी रक्ताचं पाणी करून स्वराज्य तर मिळवलं, पण त्यांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्मान करण्यात आपली पिढी अपयशी ठरते आहे, या भावनेने तो पोखरला जाऊ लागतो. लोकमान्य टिळक समजावेत, आणि त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावेत, या उद्देशाने तो टिळकांचे चरित्र वाचायला घेतो,आणी लोकमान्यांचा जीवनपट आपल्यासमोर उलगडत जातो.
एखाद्या ऐतिहासिक नायकाच्या चरित्राची वर्त्मानाशी सांगड घालून लिहिलेली कथा, हा काही नवीन प्रयोग नाही. "रंग दे बसंती", " मुन्नाभाई", पासून ते "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" पर्यंत अशी कथानकं आपण पाहिलेलीच आहेत. या चित्रपटाचं वेगळेपण असं, की पत्रकाराचे कथानक फक्त संदर्भापुरते वापरले आहे. चित्रपटाचा मुख्य झोत हा लोकमान्यांवरच आहे. टिळकांच्या महाविद्यालयीन दिवसांपासून सुरू होऊन ही कथा, न्यू इंग्लीश स्कूलची स्थापना, त्याचे व्यापारिकरण होत असल्याचे पाहून त्यातून निराळे होणे, केसरी वृत्तपत्राची स्थापना, पुढे कर्जात बुडालेले "केसरी" संपूर्ण विकत घेऊन यशस्वीपणे चालवणे, सख्खा मित्र असलेल्या आगरकरांबरोबर झालेले वैचारिक मतभेद व त्यातून निर्माण झालेला दुरावा, इथपासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, रँड वधाच्या खटल्यानंतर भोगावा लागलेला तुरुंगवास, परखड व आक्रमक अग्रलेखांद्वारे देशभर चेतवलेली राष्ट्रभावना, मंडालेचा तुरुंगवास, तिथे लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाची रचना, अशी पुढे सरकत जाते, व परतल्यावर "पुनश्च हरी ओम" करण्याचा संकल्प करतात तिथे येऊन थांबते.
गणित, सहित्य, पत्रकारिता, तत्वज्ञान, अशा विविध विषयांपर प्रभुत्व असलेल्या टिळकांचे चरित्र कथानकात उत्तम गुंफण्यात आले आहे. त्याला अतीशय उत्तम निर्मीतीमूल्य, पार्श्वसंगीत, व कलादिग्दर्शनाची जोड मिळाल्यामुळे चित्रपट मनोरंजन करण्यात देखील कुठेच कमी पडत नाही. रँडचा वध, गीतारहस्याची निर्मीती, हे प्रसंग तर अतीशय उत्तम जमून आले आहेत. पहिलाच चित्रपट दिग्दर्शित करत असलेल्या ओम राऊत यांनी अत्यंत सफाईदार काम केले आहे.
या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे सुबोध भावेचा अभिनय. मिळालेल्या भूमिकेचे याने अक्षरशः सोने केले आहे. यापुढे कित्येक काळापर्यंत लोकमान्यांचा उल्लेख झाला, की सुबोधच डोळ्यासमोर यावा, इतकी त्यानी ही भूमीका जिवंत केली आहे. साधारण एक दीड वर्षापूर्वी एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सुबोध अतीशय आत्मीयतेनी लोकमान्यांविषयी बोलला होता, आणी त्यांच्यावर चित्रपट व्हावा हे स्वप्न असल्याचे त्याने बोलून दाखवले होते. त्यानंतर तो ही भूमीका करणार असल्याचे समजले तेव्हा तो यावर अपार मेहनत घेऊन अविस्मरणीय भूमिका साकारणार यात शंकाच नव्हती. अपेक्षेपेक्षाही उत्तम लोकमान्य त्याने उभे केले आहेत. संवादफेक, देहबोली वगैरेमधे त्याने घेतेलेली मेहनत दिसून आली आहे. समीर विद्वांसने साकारलेले आगरकर पण लक्षात राहण्याजोगे. चिन्मय मांडलेकर व प्रिया बापट यांना विशेष वाव नसला तरी त्यांनी पण भूमिका उत्तम निभावल्या आहेत.
टिळकांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचा राष्ट्रीय स्तरावर जनमानसावर असलेला प्रचंड प्रभाव, स्वातंत्र्यवीर सावरकर, बापट इत्यादींवर असलेला त्यांच्या विचारांचा पगडा, वगैरेबद्दल थोडं अधिक दाखवलं असतं तर चित्रपट अजूनच प्रभावी झाला असता असं वाटत राहतं.
पण स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या, राष्ट्राचे दैवत असलेल्या या उत्तुंग महानायकाचा सुंदर जीवनपट आवर्जून पहावा असाच. लोकमान्यांच्या चरित्राला पडद्यावर उजाळा दिल्याबद्दल निर्मात - दिग्दर्शकांचे शतशः आभार.

कलासमीक्षा

प्रतिक्रिया

नाखु's picture

5 Jan 2015 - 2:24 pm | नाखु

नाना आणि ग्रेटथिंकरला उगीच शंका !
ऐवजी
फिलोसोफर आणि ग्रेटथिंकरला दाखवून ठेंगा!
चालेल का!
आमची किंचित वशी-वशी-वशी कवी संघटना आहे आणि तीचे आम्ही एकमात्र "मसीहा" आहोत.अध्यक्ष व इतर किरकोळ पदांसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत्.पात्रता व निकष लवकरच जाहीर करू.

आदूबाळ's picture

5 Jan 2015 - 9:35 pm | आदूबाळ

नशीब नाव

वशी-वशी-वशी कवी संघटना

असं नाही ठेवलंत ते.

नाखु's picture

6 Jan 2015 - 8:30 am | नाखु

आमच्या प्रतीस्पर्धी संघटनेचं नाव आहे आणि विडंबनासाठीच तीचा जन्म झाला आहे.
================
बाकी आम्च्या संघटनेत मानाचं पान पाहेजे का ??

नक्की द्या मला मानाचं पान
नाहीतर दीन मी श्या घान घान

कुणी घाबरट कुणी भित्रट कुणी बुळा
पण गहन कवी संघटनेचे अध्वर्यू
फक्त नाद खुळा

(हे पुरेसं क्वालिफिकेशन आहे का? ;) )

नाखु's picture

6 Jan 2015 - 5:12 pm | नाखु

आमी फकस्त विचारपूस केली आणी तुम्ही डायरेक पहिला नंबर काढला तो पण मुन्नाभाई ष्टाइलेने *HAPPY* :happy: :HAPPY: :Happy: ^^
अध्यक्षपदाचा स्वीकार व्हावा!!

बॅटमॅन's picture

7 Jan 2015 - 1:19 am | बॅटमॅन

काय अब्यास, काय अब्यास. _/\_

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2015 - 10:47 am | अत्रुप्त आत्मा

@कुणी घाबरट कुणी भित्रट कुणी बुळा
पण गहन कवी संघटनेचे अध्वर्यू
फक्त नाद खुळा >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif घनघोर षटकार! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing005.gif

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.नाना आणी सौ. माईचा सत्कार भुईमुगाच्या शेंगा देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते.

श्रीगुरुजी's picture

5 Jan 2015 - 4:39 pm | श्रीगुरुजी

मदनबाण, जेपी, नादखुळा,

जबरी उखाणे! :YAHOO:

पिशी अबोली's picture

5 Jan 2015 - 5:28 pm | पिशी अबोली

मी पाहिला..मला आवडला. काही गोष्टी बालिश आहेत. पण अनेक गोष्टी चांगल्या आहेत. सुबोध भावे,समीर विदवांस या दोघांचीही कामे आवडली. आजच्या काळाशी रेलेवन्स दाखवायचा प्रयत्न फार जमून आला नाही, पण प्रयत्न म्हणून आवडला.

भाते's picture

5 Jan 2015 - 7:48 pm | भाते

जर त्या पिकासाठी ३०० ते ६०० रुपये देणाऱ्यांना 'लोकमान्य - एक युगपुरूष' सारख्या मराठी चित्रपटासाठी १००-१५० रुपये देणे अवघड जात असेल तर कठिण आहे!

आला अजून एक नेहमीचा विषय आला.. ;)
याच चालीवर आता येत असलेला अहिराणी चित्रपट पण पाहणे ( अहिराणीसाठी कर्तव्य म्हणून) आले.. !!

कोण कुठला चित्रपट पाहतो यात अस्मितेचे राजकारण आणू नये असे वाटते. पी़के पण टूकारच आहे हो (नसेल पण काहींच्या मते) पण म्हणून लोकांनी ही असली विधाने करणे समर्थनीय नाही..

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jan 2015 - 2:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

टिळकांसारख्या नाव प्रसिद्ध असूनही मागच्या/आजच्या पिढीतल्या बहुतांश व्यक्तींना नीट/सखोल माहिती नसलेल्या, वैविध्याने भरलेल्या, विशाल आवाक्याच्या आणि प्रसंगी वादग्रस्त असलेल्या व्यक्तीरेखेवर बेतलेल्या दीड ते तीन तासांच्या चित्रपटामध्ये त्या व्यक्तीचे पूर्ण जीवन तर नाहीच पण जीवनातले सर्व मुख्य प्रसंग योग्य तर्‍हेने बसवणे हे (जर शक्य झाले तर !) मोठ्या जिकीरीचे काम असते. अश्या जीवनगाथा सांगायला चार-साडेचार तासांचा चित्रपटसुद्धा कमी पडतो. अश्या चरित्रांना दीर्घ दूरचित्रवाणी मालिकाच योग्य न्याय देऊ शकतात.

कमी लांबीच्या चित्रपटांत पूर्ण जीवनचरित्र दाखविण्याचा प्रयास न करता त्या व्यक्तीरेखेचे केवळ चित्रपटाच्या मूळ हेतूला पूरक असे काही पैलू दाखवावे असा प्रयास केला जाऊ शकतो. त्यामुळे चित्रपट पाहण्यापूर्वी त्या लेखक-दिग्दर्शक-निर्माता यांचे चित्रपट काढण्यामागचे ध्येय समजाऊन घेतले तरच अश्या चित्रपटात जे दाखवले आहे ते बरोबर आहे, पुरेसे आहे आणि योग्य प्रकारे सांगितले आहे की नाही हे नीट ठरवता येईल. सुदैवाने चित्रपट पाहण्याअगोदर दूरचित्रवाणीवरील मुलाखत पाहिली असल्याने चित्रपटामागची त्यांची भूमिका समजली होती. ती अशी...

"लोकमान्य टिळकांनी त्याकाळी सांगितलेली स्वराज्य आणि सुराज्य यांची मुल्ये आजच्या काळातल्या भारतालाही प्रसंगोचित (रिलिव्हंट) आहेत; त्यामुळे ती कालातीत मुल्ये परत समजून घेणे आणि आचरणात आणणे जरुरीचे आहे"... आणि ते विचार आजच्या पिढीसमोर मांडण्यासाठी हा चित्रपट काढलेला आहे."

अर्थातच चित्रपट टिळकांचे समग्र चरित्र असा न पाहता वरील दृष्टीकोनातून पाहिला गेला. त्यामुळेच वरचा माझा प्रतिसाद...

सुंदर चित्रपट. अजून प्रभावी होऊ शकला असता याबाबत सहमत.
सुबोध भावेचा अभिनय केवळ अप्रतिम !

...कायम आहे !

नाखु's picture

6 Jan 2015 - 2:59 pm | नाखु

कमी लांबीच्या चित्रपटांत पूर्ण जीवनचरित्र दाखविण्याचा प्रयास न करता त्या व्यक्तीरेखेचे केवळ चित्रपटाच्या मूळ हेतूला पूरक असे काही पैलू दाखवावे असा प्रयास केला जाऊ शकतो. त्यामुळे चित्रपट पाहण्यापूर्वी त्या लेखक-दिग्दर्शक-निर्माता यांची चित्रपट काढण्यामागचे ध्येय समजाऊन घेतले तरच अश्या चित्रपटात जे दाखवले आहे ते बरोबर आहे, पुरेसे आहे आणि योग्य प्रकारे सांगितले आहे की नाही हे नीट ठरवता येईल. सुदैवाने चित्रपट पाहण्याअगोदर दूरचित्रवाणीवरील मुलाखत पाहिली असल्याने चित्रपटामागची त्यांची भूमिका समजली होती.

शिवाय उत्तुंग व्यक्तीमत्वावर चित्रपट बनविताना वेळेचे (मर्यादा) भान ठेवावेच लागते.

पिंपातला उंदीर's picture

7 Jan 2015 - 9:17 am | पिंपातला उंदीर

तुमच्या मुद्द्यात तथ्य आहे . पण हा प्रश्न आपल्याच चित्रपटाना का भेडसावतो ? कारण संशोधन आणि लिखाण या कडे होणारे दुर्लक्ष . महत्वाचे म्हणजे आपण जर त्या व्यक्तिरेखेच्या negative बाजू चित्रपटात दाखवल्या तर छोट्या छोट्या मुद्द्यांवरून दुखावले जाणारे पब्लिक चित्रपट चालू देणार नाहीहे पण त्याना माहित आहे . समांतर 'censorship केंद्र पण ह्या अभिव्यक्तीला अडथळा आहेत .

कालच 'लोकमान्य-एक युगपुरूष' हा चित्रपट बघितला.चित्रपटाविषयीची काही निरिक्षणे:

१. सध्याचे जग आणि लोकमान्यांचा काळ यामधील बॅक अ‍ॅन्ड फोर्थ करायची काही गरज नव्हती असे वाटले.प्रिया बापटच्या भावाला अमेरिकेत नोकरी मिळाली म्हणून हॉटेलमध्ये पार्टी, म्हाडाच्या घरासाठीचा अर्ज, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर पेपरमध्ये लेख छापून आणणे इत्यादी प्रकारांमध्ये १५-२० मिनिटे उगीच वाया घालवली आहेत.त्यापेक्षा गांधी, डॉ.आंबेडकर, सावरकर या चित्रपटांप्रमाणे केवळ जुना काळच दाखवला असता तर काही बिघडले असते असे वाटत नाही.
२. अशा मोठ्या माणसांचे चरित्र आणि कर्तुत्व दोन-अडीच तासांच्या चित्रपटात दाखविणे तसे कठिणच असते.त्यामुळे सगळ्या महत्वाच्या गोष्टी चित्रपटात दाखविता आल्या नाहीत हे समजू शकतो.त्यामुळे लोकमान्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटना--विशेषतः वेदोक्त आणि ताईमहाराज प्रकरण दाखविले नाही हे ठिक आहे.वेदोक्त आणि ताईमहाराज प्रकरणांचे धागे एकमेकांमध्ये इतक्या विलक्षणरित्या गुंफले आहेत की ते वाचतानाही नेहमीपेक्षा बरेच जास्त लक्ष देऊन वाचावे लागते.ही गुंतागुंत चित्रपटात कशी दाखविणे शक्य होणार होते याची कल्पना नाही.वेदोक्त आणि ताईमहाराज प्रकरणे ही कोल्हापूर संस्थानच्या माधवराव बर्वे आणि नाना भिडे यांच्या प्रकरणाइतके दाखवायला सोपी नक्कीच नव्हती.त्यातूनही 'वेदोक्ताचे खूळ' हा अग्रलेख केसरीमध्ये छापून आला असला तरी तो स्वत: लोकमान्यांनीच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) लिहिला होता की नाही याविषयी अभ्यासकांमध्ये एकमत नाही.अग्रलेख बहुतांश वेळा संपादक लिहित असले तरी प्रत्येकवेळी तेच लिहितात असे नाही.तसेच या अग्रलेखातील शैली आणि लोकमान्यांची शैली वेगळी आहे त्यामुळे हा संशय घ्यायला जागा आहे असे वाचल्याचे आठवते.
३. लोकमान्य टिळक आणि गोपाळराव आगरकर यांच्यातील मतभेद अगदी टोकाचे होते.टिळक स्वातंत्र्यवादी आणि आगरकर सुधारणावादी होते.या दोन महापुरूषांपैकी दोघेही आपापल्या जागी बरोबरच होते आणि दोघांमध्ये कोण चूक आणि कोण बरोबर याचा निवाडा करता येणे अगदीच अशक्य आहे.या चित्रपटात टिळकांची बाजू व्यवस्थित दाखविली आहे पण आगरकर दाखविताना दिग्दर्शक थोडे कमी पडले आहेत.मान्य आहे की चित्रपटाचे नायक आगरकर नव्हते पण १८९५ पर्यंतचे टिळक हे आगरकरांबरोबरच्या मतभेदांशिवाय समजून घेता येणे अशक्यच आहे. त्यामुळे आगरकरांची बाजू थोडी अधिक दाखवायला हवी होती असे मला वाटते.फ्लॅशबॅक करण्यात जो वेळ घालविला आहे तो यासाठी सत्कारणी लावता आला असता. तसेच एकमेकांना अगदी शेलक्या भाषेत संबोधित करूनही टिळक आणि आगरकर यांच्यात वैयक्तिक पातळीवर स्नेह अगदी शेवटपर्यंत अतूट होता.या महत्वाच्या मुद्द्याची अगदी एका वाक्यातच बोळवण केली आहे.
४. लोकमान्यांची स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्याबरोबरच्या भेटी दाखवायचे प्रयोजन समजले नाही.या भेटी अगदी काही सेकंदांमध्ये उरकल्या आहेत.तसेच गांधींना नेहमीप्रमाणे अगदीच बावळट दाखविले आहे.ते का हे समजले नाही.लोकमान्य हे विवेकानंदांना आणि गांधीजींना भेटले एवढेच जर का दिग्दर्शकाला दाखवायचे होते तर ते न दाखवूनही फार काही बिघडले नसते.मग अ‍ॅनी बेझंट आणि होमरूल लीग अगदीच दाखविल्या नाहीत त्याऐवजी त्यांना थोडा तरी न्याय द्यायला हवा होता.आणि गांधीजींना बावळट दाखवायचे होते म्हणून का होईना १९१६ ची लखनौ काँग्रेस दाखवायचे टाळले असे वाटू लागले.ती काँग्रेस दाखवली असती आणि मुस्लिम लीगबरोबर टिळकांनी केलेला करार दाखविला असता तर गांधीजींनाच दोषपात्र कसे दाखविणार?
५. संमतीवय कायदा प्रकरणी न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळराव आगरकरांची सभा उधळून देणारे टिळक दाखविले असतील तर तेच न्यायमूर्ती रानडे गेल्यानंतर लोकमान्यांनी त्यांना नक्की कोणत्या शब्दात श्रध्दांजली वाहिली होती हे दाखविले नाही तर चित्र एकांगीच असेल.
६. लोकमान्यांना मुंबई उच्च न्यायालयाने ६ वर्षांची शिक्षा देऊन मंडालेला पाठविले तो क्षण चित्रात बघितला अगदी तसाच दाखविला आहे.खटल्याची सुनावणी रात्रीच्या वेळी पूर्ण झाली आणि लोकमान्यांचा अजरामर बचाव रात्री उशीरा झाला. त्यावेळचे चित्र तिसरीत असताना 'थोरांची ओळख' या इतिहासाच्या पुस्तकात दिले होते त्याची आठवण झाली.
७. महंमद अली जीना लोकमान्य टिळकांना गुरूस्थानी मानत होते.तसेच १९१६ मध्ये लोकमान्यांविरूध्द राजद्रोहाचा तिसरा खटला आला त्यावेळी महंमद अली जीनांनी टिळकांचे वकिलपत्र घेतले आणि त्या खटल्यातून टिळक निर्दोष सुटले.महंमद अली जीनांनी नंतरच्या काळात भारताचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलले ते लक्षात घेता त्यांचा निदान ओझरता उल्लेख तरी हवा होता असे वाटून गेले.निदान विवेकानंदांची भेट दाखवली आहे त्यापेक्षा तरी हा उल्लेख अधिक महत्वाचा होता असे वाटते.
८. सध्याच्या काळातील पालकांना लोकमान्यांचा अतिशय महत्वाचा संदेश दिग्दर्शकाने दाखविला हे खूपच चांगले झाले.लोकमान्यांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक हे लोकमान्यांप्रमाणे तल्लख बुध्दीमत्तेचे नव्हते आणि अभ्यासातही त्यांना फार गती नव्हती. त्यांना लोकमान्य म्हणतात--"तू जोड्यांचा व्यवसाय केलास तरी चालेल पण इतक्या उत्तम प्रतीचे जोडे बनव की त्यांना विलायतेतून मागणी आली पाहिजे". (मी ऐकलेले व्हर्जन थोडे वेगळे होते. त्याप्रमाणे लोकमान्य म्हणतात की इतक्या उत्तम प्रतीचे जोडे बनव की 'मी टिळकांनी बनविलेले जोडे वापरतो असे लोक अभिमानाने म्हणाले पाहिजेत'.) आपल्या पाल्याने इंजिनिअरच किंवा डॉक्टरच व्हावे असे पालक अजूनही दिसतात (जरी त्यांची संख्या पूर्वीपेक्षा बरीच कमी झाली असली तरी). अशांच्या डोळ्यात झणझणीत अंजन लोकमान्यांने १०० वर्षांपूर्वीच घालून ठेवले होते ते चित्रपटात दाखविले हे खूपच चांगले झाले.
९.चित्रपटातील काही चुका मात्र अगदीच अक्षम्य वाटल्या. उदाहरणार्थ लोकमान्य वैदिक गणित शिकविताना दाखविले आहे.वैदिक गणिताची ओळख कुणा शंकराचार्यांनी १९६० च्या दशकात एका पुस्तकातून करून दिली.लोकमान्यांना त्या पध्दती अन्य कोणत्या मार्गाने माहित असल्या असे गृहित धरले तरी वैदिक गणित हे नाव वापरणे खटकलेच. तसेच रॅन्डला थेट व्हॉईसरॉयच्या कार्यालयातून पुण्याला पाठवायचा आदेश येतो हे जरा अनाकलनीयच वाटले.अशा प्रकारचे निर्णय मुंबई प्रांताचे गव्हर्नर घेत असायची शक्यता सर्वात जास्त.आणि समजा व्हॉईसरॉयच्या कार्यालयामधून तसा निर्णय आला तरी १९११ पर्यंत भारताची राजधानी कलकत्त्याला असल्यामुळे व्हॉईसरॉयचे कार्यालय दिल्लीला न दाखविता निदान कलकत्त्यात तरी दाखवायला हवे होते.

अगदी असेच म्हणतो. कैक शाळकरी ढोबळ चुका अक्षम्य वाटल्या.