कथा-कॉलेज कट्टा भाग २

चेतन677's picture
चेतन677 in जनातलं, मनातलं
31 Dec 2014 - 9:34 pm

सर्वांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!!!!!!!!!!

मागील भाग
कथा-कॉलेज कट्टा भाग १

या कथेतील घटनाक्रम हा पुर्णतः काल्पनिक आहे.

तो दिवस होता २६ ऑगस्ट २०१२.डी.वाय पाटील कॉलेजच्या ऑफीसच्या बाहेर अॅडमिशनसाठी भली मोठी रांग होती.
"यार,ज्ञानेश्वर आपण उद्या येउयात का?" अभिनवने सवाल केला.
अभिनव दहा दिवसांपूर्वीच पुण्यात आला होता.मुळचा अहमदनगर मधील अभिनवचा मेकॅनिकल इंजिनीअरींगमध्ये डिप्लोमा पूर्ण झाला होता. आता त्याचा डी.वाय पाटील इंजिनीअरींग कॉलेज्,आकुर्डी येथे प्रोडक्शन इंजिनीअरीग थेट द्वितीय वर्षात नंबर लागला होता.पिंपरीमधल्या काळेवाडी येथे आपल्या काकांकडे तो राहायला आला होता.
त्याचा मित्र ज्ञानेश्वर यानेही पुण्यातल्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये डिप्लोमा पूर्ण केला होता.अभिनवच्या कांकाच्या शेजारीच त्याचे घर होते.मग त्याची आणि अभिनव ची आता चांगलीच ओळख झाली होती.
"अबे घंटू थांब ना यार एवढ्याशा लाईनला घाबरतोस का?" ज्ञानेश्वरने आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले.
जवळ जवळ दिड तास झाला तेव्हा अभिनवचा नंबर आला.त्याने आपला फॉर्म द्यायला हात पूढे केला खरा तेवढ्यात त्याला कुणीतरी धक्का दिला आणि अभिनवचे सगळे डॉक्युमेंट्स आणि फॉर्म खाली पडला.अभिनव ते गोळा करण्यासाठी खाली वाकला.त्याला बाकीच्या मुलांचा आवाज येत होता.
'ए लाइन दिसत नाही का?'
एक मुलगी धक्का देउन अभिनवच्या पुढे गेली होती.
"आज तारीख किती?" त्या मुलीने तिथल्या क्लर्कला विचारले.
"२६" टक्कल असलेल्या क्लर्कने उत्तर दिले.
" हो का.हे वर तोड करुन खुशाल सांगताय. माझा पहिल्या वर्षाचा,पहिल्या सेमेस्टरचा रिझल्ट आला नाही अजुन म्हणुन मी दोन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता.अजुन त्याचा काही पत्ता नाही.कुठे गहाळ केला माझा रिझल्ट? माझा रिझल्ट गेला कुठे??" तिने जोरात टेबलवर हात आदळला.
आत्तापर्यंत त्या मुलीने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे त्या क्लर्कच्या टक्कलावर घाम आला होता.
"मॅडम,मला फक्त दोन तास द्या.या मुलांची अॅडमिशन प्रोसेस चालू आहे.मी स्वतः तुमच्या क्लासमध्ये येऊन देतो मग तर झालं??"
"आणि नाही दिलं तर?? म्हणजे तुमच्याकडुनच गहाळ झाला तर...मग विद्यापीठाच्या फेर्या मारायला का सांगितलं मला उगीच?" त्या मुलीचा राग अजुन शांत नव्हता झाला.
"अगं प्राची ते म्हणत आहेत तर देतील ना आणुन.." या मंजुळ आवाजाकडे अभिनवचे लक्ष गेले.
" अगं पण वैष्णवी???" ती ओरडली.
वैष्णवीने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता.ती मोठ्या घरातली होती.पण राहणी एकदम साधी होती.
" तुमचं डिपार्ट्मेंट कोणतं?" मघाचाच तो क्लर्क म्हणाला.
" प्रोडक्शन,सेकंड वर्ष." प्राची असे म्हणते न म्हणते तोच ज्ञानेश्वर पुढे आला.
" हाय मी ज्ञानेश्वर और सभी प्यार से मुझे नॅनो बुलाते है." प्राचीसमोर हात करत तो म्हणाला.
"चल बाजुला सरक.नॅनोटेक्नॉलॉजी." त्याचा हात झटकत प्राची निघुन गेली.
सगळे हसायला लागले.
"सुधरा आता तरी" अभिनव हसत हसत म्हणाला.
"भाऊ,डी.वाय पाटील कॉलेज आहे.साध सुध नाही." ज्ञानेश्वर.
अॅडमिशनचा फॉर्म भरुन दोघे घरी आले.तब्बल एक आठवड्यानंतर कॉलेज सुरु राहाणार होते.दोघांनाही आपल्या कॉलेज लाईफबद्दल उत्सुकता होती.
शेवटी तो दिवस उजाडला.तो त्यांचा पहिला दिवस होता खरा पण द्वितीय वर्ष आता संपत आले होते.फक्त शेवटचा दिड महिना हातात होता.दोघे प्रोडक्शन डिपार्ट्मेंटजवळ आले.तेव्हा एक मुलगा ओरडत होता.
"क...क...कुणाला या...या झेरॉक्स पाहीजेत का?म्हात्रे सरांनी दिल्यात." डिपार्ट्मेंटच्या बाहेर एक मुलगा ओरडत होता.तो सुरज होता.लहानपणी एका आजारामुळे तो कायमचा अडखळत बोलत असे.पण याचा त्याने कधीही न्युनगंड बाळगला नाही.
अभि आणि ज्ञानेश्वर दोघे डिपार्ट्मेंटमध्ये गेले.तिथे एक सर थांबले होते आणि त्यांच्याभोवती मुलांचा भला मोठा घोळका होता.ते मुलांना काहीतरी समजुन सांगत होते.तेच होते म्हात्रे सर.मॅन्युफॅक्चरींग इंजिनीअरींग हा विषय त्यांच्याकडे होता.मुलांसोबत ते अतिशय मोकळेपणाने बोलत असत आणि त्यांचे शंका निरसन करत असत.
"काय थेट द्वितीय वर्ष का?" एवढ्या वेळ शांतपणे थांबलेल्या अभिनव आणि ज्ञानेश्वरकडे पाहत ते म्हणाले.
"हो.सर" दोघेही एका सुरात म्हणाले.
" आपलं कॉलेज आता फक्त दीडच महिने राहीलंय.बरचसं शिकवुन झालेय.पण तरी काही अडचण असेल तर तुम्ही कधीही माझ्याकडे या.आणि तुम्ही दोघेच आज?? तीस मुलांचं अॅडमिशन झालं होतं ना?" सरांनी विचारले.
"स...स्स.....सर मी पण आहे ना.." झेरॉक्स मारुन येत सुरज म्हणाला.
" हो सुरज मला माहित आहे.आणि काही नोट्स वगेरे पाहिजे असतील तर सुरजकडुन घ्या रे." सरांच्या या वाक्यावर दोघांनीही मान हलवली.
"चला मुलांनो क्लास मध्ये.मॅथ्सच लेक्चर आहे ना?जा लवकर" असे म्हणत सर तिथुन निघुन गेले.
"हाय मी अभिनव.सगळे मला अभि म्हणतात आणि हा ज्ञानेश्वर म्हणजेच नॅनो." त्या मुलांच्या घोळक्याजवळ जात अभिनव म्हणाला.पण त्याच्यापैकी कुणीही बोलायला पुढे आले नाहीत.सगळे त्या दोघांकडे असं काही पाहत होते की जणु अभि आणि नॅनो परग्रहाचेच वासी आहेत.सगळे तिथुन निघुन गेले.
" जाउद्या रे एवढं टेन्शन नका घेऊत.हे नेहमीचच आहे." सुरज त्यांच्याजवळ येत म्हणाला.
खरंच ते नेहमीचच होतं.या कॉलेजपुरता नाही तर सगळ्या कॉलेजमध्ये असंच चालायचं.जे मुलं डिप्लोमानंतर बी.ई.ला डायरेक्ट सेकंड वर्षास अॅडमिशन घ्यायचे त्यांना रेग्युलरची काही मुले काहीतरी वेगळंच समजायची.त्यामुळे क्लास मध्ये दोन ग्रुप असायचे.एक रेग्यलर मुलांचा आणि दुसरा डायरे़क्ट सेकंड वर्षास अॅडमिशन घेतलेल्या मुलांचा.
तिघेही क्लास नंबर २२ मध्ये गेले. तीन नंबरचा बाक हा अभि आणि ज्ञानेश्वरचा आवडता बाक असायचा.आजही ते दोघे तीन नंबरच्याच बाकावर बसले.
मॅथचे लेक्चर सुरु झाले.
" ए नॅनोटेक्नॉलॉजी..." कोणीतरी पाठीमागुन ज्ञानेश्वरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालं.
"प्राची तु??" ज्ञानेश्वरने मागे पाहिले आणि तो ओरडलाच.
"अरे बधीर किती मोठ्याने ओरडतोस? जरा हळु..बरं झालं मॅथ्सच्या अय्यर मॅडम काही म्हणत नाही ते नायतर दुसरं कोण असंत तर.....आणि मेन मुद्द्यावर ये.तुझ डोकं खाली घे जरा मला बोर्डवरचं काही दिसत नाहीये." प्राची.
" च्या मारी,प्राची तु कधीपासुन सिरीअस झालीस?" तिच्याशेजारीच बसलेला एक मुलगा तिची चेष्टा करत म्हणाला तो अखिल होता.प्राचीचा बॉयफेंड.पहिल्याच वर्षाच्या व्हॅलंटाईन डे ला अखिल प्राचीला प्रपोज मारुन मोकळा झाला.स्वभावाने मोकळ्या स्वभावाची आणि अल्लड असलेली प्राचीही त्याच्यावर कधीची फिदा झाली होती तेव्हा तिनेही होकार द्यायला फार वेळ घेतला नाही.अशी ती जोडी होती.
"You third and fourth benchers Get out from the class.....!!!!" या आवाजाने सगळे आपल्या दुनियेतुन जागे झाले.अय्यर मॅडम आता कडाडल्या होत्या.त्यांनी ज्ञानेश्वर,प्राची,अखिल आणि सोबत अभिलाही क्लास मधुन हाकलुन दिले.
" सॉरी माझ्यामुळे झालं सगळं" नाराज होत ज्ञानेश्वर म्हणाला.
" तुझी काही चुक नाही रे नॅनो.सगळं या अखिलमुळे झालं." प्राची ओरडली.
" मी?? मी काय केलं हा??" आणि नेहमीसारख्या बाकीच्या प्रेमीयुगुलासारखी त्यांची शाब्दीक चकमक सुरु झाली.
" अरे चिल्ल बधीर!!!.गप्प बस आता.पुढे काय करायचं?अजुन पाऊण तास आहे नेक्स्ट लेक्चरला." अखिलशी भांडुन प्राची दमली होती.म्हणुन या भांडणाची सांगता करत ती म्हणाली.प्राचीचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या बोलण्यात सारखं चिल यार्,चिल बधीर असे शब्द यायचे.जणु चिल या शब्दावर तिचा कॉपिराईटच होता!!!
शेवटी प्रत्येक कॉलेजविरांच्या सवयीप्रमाणे चौघांनीही कँटीनचा रस्ता पकडला.
" चला कोण काय काय मेनु घेणार? सांगा लवकर...आणि अभि तु तर काही बोलतच नाहीये रे.तुझ्या गर्लफ्रेंडने दुसर्या मुलींसोबत बोलायला सक्त मनाई केली आहे काय??" एवढ्या वेळ शांत असलेल्या अभिला प्राचीने डिवचण्याचा प्रयत्न केला.पण त्यावरही अभिने काहीच प्रतिक्रिया दिलि नाही.कदाचित आपल्या बोलण्याचा अभिला राग आला असं वाटुन प्राचीही एकदम शांत झाली.
थोड्याच वेळात सगळ्यांचा नाष्टा करुन झाला.
"चला मी आता कलटी मारतो." अखिल.
"काय? अरे आज निदान एकतरी लेक्चर कर रे..." प्राची त्याला समजावत म्हणाली.
" अगं, लेक्चर हे बंक करण्यासाठीच असतात.तुला नाही यायचे ना माझ्यासोबत तर नको येऊस मी चाललोय." असं म्हणत अखिल निघुनही गेला तिथुन.
मग शेवटी उरलेल्या तिघांनीही परतीचा रस्ता पकडला.लेक्चर करण्यासाठी.आता SOM म्हणजेच Strength Of Material चे लेक्चर होते.हा विषय शिकवणारे न्यायाधीश सर हे डिपार्टमेंटचे हेड होते आणि तसेच चक्क जर्मन रिटर्न होते.त्यांच्याकडे विद्येच भंडार होतं.म्हात्रे सरांसारखेच तेही एकदम मस्त होते.चालु लेक्चरला कुणि उठुन गेलं काय किंवा बाहेरुन आलं काय त्यांच काहीच म्हणंण नसायचं.मुलांनी कॉलेज लाईफ इंजॉय करावी असे कदाचित त्यांनाही वाटत असे.वर्गात फक्त जेमतेम वीसच विद्यार्थी होते.
तसं तर सर काही शिकवायचे नाही.आपल्या जर्मनीतले अनुभव फक्त शेयर करायचे.हे लेक्चर कधी संपल ते अभि आणि नॅनोला कळालंही नाही.आज कॉलेजमध्ये मिटिंग असल्याने आज कॉलेज सुटले होते.असं जाता जाता सरांनी सुचना केल्या.
सगळे विद्यार्थी जायला निघाले.इतक्यात प्राचीने अभि आणि नॅनोला हाक मारली.
" अरे अभि मी ऐकलंय की तु डिप्लोमाला मॅथ्स आणि SOM मध्ये टॉपर होतास.."प्राची.
" बरं मग??" अभिने सवाल केला.
"काही नाही अरे ही प्रज्ञा.हिला थोडी मदत करशील का स्टडीत?"चाचरत प्राचीने विचारले.
पण तिच्या या प्रश्नाला काहीही उत्तर न देता अभि तिथुन निघुन गेला.
" अरे नॅनो काय मित्र आहे रे तुझा? मघाशी कँटीनमध्येपण असंच केलं आणि आत्तापण नीट बोललं तर सरळ नीट उत्तर द्यायचं ना यार!!!" प्राची आता चिडली होती.
" चिल प्राची.तो आधी असा नव्हता." प्राचीच्याच स्टाइल मध्ये नॅनो तिला समजावुन सांगत होता.
" म्हणजे?आधी असा नव्हता?? मला काही समजत नाहीये रे.." प्राची आता वैतागली होती.
मग नॅनो म्हणजेच ज्ञानेश्वर एकदम स्तब्ध झाला आणि त्याने हकिकत सांगायला सुरुवात केली.
ते इयत्ता बारावीचं वर्ष होतं.अभि या आधी एवढा शांत कधीही नसायचा.तो कॉलेजचा एक अतिशय भांडखोर मुलगा होता.भाडणं मारामारी यात तो नेहमीच अग्रेसर असायचा.सगळे त्याला भाई म्हणत असत अभि भाई.अभिच्या या स्वभावाला सगळे प्राध्यापक आणि अभिचे आईवडिल जरी वैतागलेले होते तरी एकजण होतं जी अभिच्या या स्वभावावर फिदा झाली होती.प्रियांका म्हणजेच पियु.या किंवा त्या कारणाने ती अभिजवळ जायचा प्रयत्न करायची पण तिला हवी तशी बोलायची संधी मिळालीच नव्हती.पण एक दिवस सुदैवाने तिला ही संधी मिळाली.त्यादिवशी भौतिकशास्राचे प्रॅक्टिकल होते.आणि अभि काहीतरी सापडत होता.
"भाई काय शोधतोय?" एकाने विचारले.
" अबे माझा पेन यार घरी राहिला वाटतं..." अभि.
" भाई हा घे ना माझा." असं म्हणत शेजारच्याने त्याला पेन देउ केला.
" अबे घंटु तो दोन रुपयांचा डबडा पेन ठेव तुझ्याकडंच" शेजारच्याच्या डोक्यावर पेन मारत अभि म्हणाला.
" हा घे शाईपेन.मला माहितिये तु फक्त शाईपेनच वापरतो." या आवाजाने अभिचे लक्ष वेधले.ती पियु होती.
खरंच अभि पाचवीत असल्यापासुन फक्त शाईचाच पेन वापरत असे.ती अभिची एक खासियत होती.पण हे फक्त त्याच्या जवळच्याच मित्रांना माहित होते.पण याची प्रियांकाला माहिती असंणं हे त्याच्यासाठी आश्चर्य होतं.
" थँक्स." अभि प्रियांकाचे आभार व्यक्त करत म्हणाला.
" फक्त थँक्सने काम नाही चालणार.मला तुझी मदत पाहिजे." ती म्हणाली.
"मदत? कसली मदत?" अभिने हळुच विचारले.
" अरे मला मॅथ्सच Derivatives आणि Integration नीट येत नाही रे.तु क्लासमध्ये पटापट उत्तरं काढतोस.मला पण जरा शिकवशील का? उद्या कसं राहिल सकाळी? प्लीज यार जरा लवकर ये नऊ वाजता ठीक आहे.चल बाय.आमच जरा प्रॅक्टीकलचं रीडींग राहीलंय." असं म्हणत ती तिथुन तिघुनही गेली.
" यार भाई लगता हे वो तुमसे लव करती हे..." एकजण हळुच अभिच्या कानात म्हणाला.
"गप चल पळ इथुन.." असं म्हणत अभिने त्याला पळवुन लावले.
प्रियांका बारावीला अभिनवच्या वर्गात नवीन आली होती.पण आज प्रथमच अभि तिला पाहत होता.तसंही त्याला वर्गातल्या मुलींबद्द्ल माहिती काढण्याचा किवा त्यांच्याशी बोलण्याचा वेळ कुठे होता..त्याचा सगळा वेळ भांडण आणि मारामारी यातच जात असे.
शेवटी दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे अभि कॉलेजला गेला.साडेनऊ वाजत आले होते प्रियांका अभिची वाटच पाहत होती.
" सॉरी जरासा उशीर झाला." अभि.
त्यावर प्रियांका खुदकन हसली.मग त्यांचा अभ्यास सुरु झाला.त्यादरम्यान कधी कधी चुकुन अभिचा प्रियांकाच्या हाताला स्पर्श होत असे.मग प्रियांकाही अभिच्या डोळ्यांत डोळे घालुन पाहत असे.आता अभिला तिच्या डोळ्यांतले प्रेम जाणवत होते.
डोळ्यांनी डोळ्यांना इशारा केला होता.थोड्याच वेळात लेक्चर सुरु होणार होते मग दोघांचीही तंद्री भंग पावली.
असेच काही दिवस गेले या ना त्या कारणाने दोघेही भेटत असत.एक दिवस असाच अभि आपल्या टोळक्यासोबत उभा होता.कॉलेज सुटले होते.कदाचित अभि कुणाची तरी वाट पाहत होता.इतक्यात त्याला त्याची पियु दिसली.पण ती जरा घाईतच घरी चालली होती.ती एकटीच होती.त्याने तिच्या मागे पाहिले तर तिच्या मागे दोघेजण दुचाकी वरुन तिचा पिछा करत होते,शिट्ट्या मारीत होते.प्रियांकाचा चेहरा रडवेला झाला होता.ती अभिसमोरुन गेली पण तिने फक्त अभिकडे पाहिले आणि तशीच पुढे निघुन गेली.पण अभीने तिचे डोळे वाचले होते. त्याने तशीच आपली नजर मागे फिरवली त्या दुचाकीवरच्या दोघांकडे.
" अरे मित्रांनो जाताय कुठे.जरा थांबा ओळख करुन घेऊत.तसं पण या कॉलेजचे तुम्ही दिसत नाहीत." त्यांना थांबवत अभिने विचारले.
"अरे आम्हाला काम आहेत दिसत नाही का पोरीची छेड काढत आहोत ते." ते दोघे म्हणाले.
" गपचुप इथुन निघुन जा." अभि.
" का रे पण तुला काय एवढी पंचायत लागलीये?" ते दोघे हसत म्हणाले.
" आता खुप झाले,स्पष्टच बोलतो तिच्या केसाला जरी धक्का लागला तरी खपवुन नाही घेणार." अभि.
" अरे आम्ही तिच्या केसाला तर धक्का लावुतच अजुन...." त्यांनी काही बोलण्याच्या आतच अभिने एकाच्या कानाखाली लगावली.त्या धक्क्याने त्यांची दुचाकीही खाली कोसळली.तिथे अभिच्या कॉलेजच्या मुलांनी गर्दी केली होती.गर्दी हळुहळु वाढत होती.
" ऐका सर्वजण...जर प्रियांकाकडे कुणी वाईट नजरेने जरी बघितल कुणी तर हा अभि त्याला जिवंत सोडणार नाही. I LOVE PRIYANKA..." अभि मोठ्याने ओरडलाच. तो आवाज पुढे गेलेल्या प्रियांकालाही ऐकु गेला.पण ती अभिकडे नाराजीने बघु लागली.आपली खुप मोठी चुक झाली हे अभिला जाणवले आणि तो तसाच मान खाली घालुन तिथुन निघुन गेला.
त्यानंतर जवळ जवळ पंधरा दिवस झाले.अभि आणि प्रियांका दोघेही एकमेकांसोबत बोलले नाहीत.मग एक दिवस उजाडला तो होता ३ सप्टेंबर अभिचा वाढदिवस होता.मुलांनी अभिसाठी कॉलेजमध्येच मोठ्ठा केक आणला.एकच दंगा सुरु झाला.याच दिवसाचे औचित्य साधुन अभिच्या पप्पांनी अभिसाठी बाइक घेतली होती.पण थोड्यावेळाने सगळे एकदम शांत झाले.
"अबे काय झालं अचानक? कुणी मास्तर आलं का?" अभिने आश्चर्याने विचारले.
तेवढ्यात त्याला कुणाचा तरी मंजुळ आवाज आला.
" हॅपी बर्थडे अभि...." ती त्याची पियु होती.
अभिला विश्वासच बसला नाही.त्याला खुपच आनंद झाला.अभिने प्रियांकाला मिठीच मारली.याचा अर्थ की कदाचित प्रियांकाने त्याला त्याच्या वागण्याबद्दल माफ केले होते.मग काय याच खुशीत अभिने केक कापला.मग एक केकचा घास पियुला भरवला.
"यार फक्त तिलाच भरवणार??मग काय आम्ही उपाशी बसायचं का?"गर्दीतुन कोणितरी ओरडले आणि यावर सगळे हसायला लागले.
" काय आज दिवस आहे!!! मी नवीन बाइक पण घेतलीये.चल ना प्लीज एक चक्कर मारुन येऊत." अभि मोठ्याने पियुला म्हणाला.शेवटी नाही हो करत ती तयार झाली.आणि अहमदनगरच्या हायवेवर अभिची बाइक भरधाव धावु लागली.
" अरे अभि जरा हळु चालव.मला तुला एक सांगायचयं" पियु.
" काय? सांग ना, अग मग...." अभि मोठ्याने ओरडला.
" अभि...." पियु अचानक बोलायचं थांबली.आणि हळुच अभिच्या कानात कुजबुजली.
" आय लव यु too!!!" यावर अभिचा विश्वासच बसेना...काय करावं हे त्याला सुचत नव्हतं.
"याहु.आज मी खुप खुश आहे." अभि अजुन जोरात बाइक चालवत म्हणाला.
" अभि बाइक जरा हळु चालव.आणि आपण चाललोय तरी कुठे?" पियु हसत हसत म्हणाली.
" आपण कुठे चाललोय ते मलाही माहित नाही.आता मी डोळे झाकुनसुद्धा बाइक चालवेन बघ झाकले डोळे." अभि हसत म्हणाला.
" अभि समोर बघ.....!!!!!!!!!!!!!!!" प्रियांका ओरडली.
एक ट्रक भरधाव त्यांच्याच दिशेने येत होता.बहुतेक त्याचे ब्रेक फेल झाले होते.अभिने आपली बाइक कंट्रोल केली खरी.पण अभि खुपच गडबडला होता त्याने कचकन ब्रेक दाबला आणि त्याची ती बाइक तशीच त्या ट्रकखाली गेली.ब्रेक दाबल्यामुळे अभिच्या हातातुन बाइक निसटली तो ट्रकच्या चाकांच्या बरोबर मधुन पलीकडे फेकला गेला.पण त्याची पियु.....त्याची पियु मात्र या भयंकर अपघातातुन वाचली नाही.............आणि त्याची लाडकी पियु जिच्यावर अभि जिवापाड प्रेम करत होता ती त्याला सोडुन निघुन गेली कायमचीच....
"त्यानंतर अभिदादाचा फक्त अभि झाला.परत कोणत्याही मुलीकडे त्याने बघितलेही नाही.आजही तो प्रियांकाला विसरला नाहिये.तिच्या मृत्युला तो स्वतःलाच जबाबदार धरतोय अजुनही.बिचारा.त्यानंतर तो एकदम शांत झालाय.एकदम शांत." एवढे बोलुन ज्ञानेश्वर गप्प शांत झाला.अभिची ती लव स्टोरी ऐकुन प्राचीच्याही डोळे पाणावले होते.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

क्रमशः....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Jan 2015 - 12:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जे मुलं डिप्लोमानंतर बी.ई.ला डायरेक्ट सेकंड वर्षास अॅडमिशन घ्यायचे त्यांना रेग्युलरची काही मुले काहीतरी वेगळंच समजायची.त्यामुळे क्लास मध्ये दोन ग्रुप असायचे.एक रेग्यलर मुलांचा आणि दुसरा डायरे़क्ट सेकंड वर्षास अॅडमिशन घेतलेल्या मुलांचा.

हे खरयं....अनुभवलेलं आहे. आमच्याकडे प्राणिसंग्रहालयातुन आलेल्या माकडांसारखी पहायची बारावी नंतर आलेली मुलं. बाकी नंतर डिप्लोमावाल्यांकडुनचं सॉम, मॅनफ. प्रोसेसेस आणि डीझाईन चे सबजेक्ट्स शिकायची. डिप्लोमानंतर स्वानुभवानी वाट लावणारा एकचं विषय म्हणजे मॅथ्स ३...बाकी सगळं झॅक सोप्प गेलं.

टवाळ कार्टा's picture

1 Jan 2015 - 1:03 am | टवाळ कार्टा

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

शिद's picture

1 Jan 2015 - 5:06 am | शिद

असेच म्हणतो.

कपिलमुनी's picture

2 Jan 2015 - 4:58 pm | कपिलमुनी

आमच्याकडे प्राणिसंग्रहालयातुन आलेल्या माकडांसारखी पहायची

खरा आहे . आमच्याकडे तर सरळ भारत पाकिस्तान होता ! १ - १.५ महिना राहिलेला असतो , कोणीही पोरा असाईनमेंटस देत नाहीत . नोट्स देत नाहीत .. सहा महिन्यानंतर हीच पोरा सर्वात जास्त मिर्‍या वाटणर आहेत म्हणून गुर्जीसुद्धा फार मदत करत नाहीत.
डिप्लोमाधारकांसाठी एम ३ हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे ;)
माझा एम ३ क्रिटिकल ला निघाला :)

टवाळ कार्टा's picture

2 Jan 2015 - 5:03 pm | टवाळ कार्टा

डिप्लोमाधारकांसाठी एम ३ हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे

कचकून सहमत

M3 -> 64
M4 -> 65
M5 -> 67

\m/

मुक्त विहारि's picture

1 Jan 2015 - 4:00 pm | मुक्त विहारि

पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत....

धडपड्या's picture

1 Jan 2015 - 7:33 pm | धडपड्या

छान लिहीताय..
परंतु बर्याच ठिकाणी असे जाणवले, की विचार हिंदीमधून केलाय, व मराठीत ट्रान्सलेट केलाय.. तेवढंच.. बाकी कथा मस्त..

चेतन677's picture

1 Jan 2015 - 7:58 pm | चेतन677

तुम्हाला नेमकं कोणत्या ठिकाणी असे वाटले ते स्पष्ट सांगितले तर मला आनंदच होईल.....

धडपड्या's picture

1 Jan 2015 - 9:44 pm | धडपड्या

"यार,ज्ञानेश्वर आपण उद्या येउयात का?" अभिनवने सवाल

चल बाजुला सरक

जरा हळु..बरं झालं मॅथ्सच्या अय्यर मॅडम काही म्हणत नाही ते नायतर दुसरं कोण असंत तर.....

तसं तर सर काही शिकवायचे नाही

अरे अभि मी ऐकलंय की तु डिप्लोमाला मॅथ्स आणि SOM मध्ये टॉपर होतास..

या किंवा त्या कारणाने ती अभिजवळ जायचा प्रयत्न करायची

अभि काहीतरी सापडत होता.

फक्त थँक्सने काम नाही चालणार.

उद्या कसं राहिल सकाळी?

त्याने तिच्या मागे पाहिले

तसं पण या कॉलेजचे तुम्ही दिसत नाहीत.

काय आज दिवस आहे!!!

यासारखी वाक्ये थोडी खटकतात हो... बाकी मस्त..

सस्नेह's picture

2 Jan 2015 - 10:46 am | सस्नेह

पु ले शु

विजुभाऊ's picture

2 Jan 2015 - 3:53 pm | विजुभाऊ

धडपड्या काकांशी सहमत.
वाईट वाटेल पण स्पष्ट बोलतो.
कंटाळवाणे, स्लो आणि रटाळ लिक्खाण झालंय राव. लिहीताना वाक्यरचना काही काही ठिकाणी जरा गंडलीये.
उदा: आणि अभि काहीतरी सापडत होता.
ही अशी वाक्यरचना मराठीत होऊ शकणार नाही "सापडणे" या ऐवजी "शोधणे" हे क्रियापद योग्य वाटेल )

प्रसाद१९७१'s picture

2 Jan 2015 - 4:32 pm | प्रसाद१९७१

कुछ मजा नही आया बॉस. टुकार मराठी सिरियल चे स्क्रीप्ट वाचतो आहे असे वाटले.

हा घे शाईपेन. शाईपेन हा शब्द मराठी आहे?

विजुभाऊ's picture

2 Jan 2015 - 4:49 pm | विजुभाऊ

शाईपेन = हा इंक पेन या शब्दाचा मराठी अवतार आहे. बहुतेक इंग्रजी माध्यमातील मुले हा शब्द वापरतात.
आम्ही मराठी माध्यमातील विद्यार्थी मात्र फौंटन पेन हाच शब्द वापरायचो.
( "तो पेन" की "ते पेन" हा अजून एक गोंधळ आहेच )
अवांतरः या इथे "निखीलचे शाईपेन" असा एक आयडी होता.

चेतन677's picture

2 Jan 2015 - 7:19 pm | चेतन677

ही कथा शुद्ध मराठीत मुद्दाम लिहीत नाहीये..जसं एका काॅलेजमध्ये बोलतात,वागतात तशी भाषा टाकायचा प्रयत्न केलाय.मराठी,हिंदी,इंग्रजीचे मिश्रण टाकायचा प्रयत्न केलाय...

चेतन677's picture

2 Jan 2015 - 7:24 pm | चेतन677

ही कथा शुद्ध मराठीत मुद्दाम लिहीत नाहीये..जसं एका काॅलेजमध्ये बोलतात,वागतात तशी भाषा टाकायचा प्रयत्न केलाय.मराठी,हिंदी,इंग्रजीचे मिश्रण टाकायचा प्रयत्न केलाय...

ही कथा शुद्ध मराठीत मुद्दाम लिहीत नाहीये..जसं एका काॅलेजमध्ये बोलतात,वागतात तशी भाषा टाकायचा प्रयत्न केलाय.मराठी,हिंदी,इंग्रजीचे मिश्रण टाकायचा प्रयत्न केलाय...
व्वा . काय पण समर्थन केलंय काका. पुलेशु.
अगदी खरं सागयचे तर भाषा जमली नाहिय्ये हेच खरे. उगाच कॉलेजमधे असे बोलतात असे नका सांगु.