सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
23 Nov 2014 - 6:24 pm | चतुरंग
क्रामनिकने कास्पारोवला हरवले त्यावेळेपासून हा बचाव भलताच प्रसिद्ध झाला. या सामन्यात सगळ्याच डावात मॅग्नु पांढर्याने खेळताना हाच बचाव वापरला गेलाय.
नवव्या खेळीला आनंदने उंट डी७ अशी वेगळी चाल केली आणि मॅग्नुसला थोडे विचारात पाडले.
23 Nov 2014 - 6:39 pm | चतुरंग
पट्टी मोकळी करुन देण्यासाठी पुढची खेळी सी६ असे प्यादे सरकवून घोड्याला हुसकावून लावणे असू शकेल, त्याआधीच मॅग्नुस त्याचा घोडा एफ ६ असा नेऊन ठेवू शकतो. ई५ वरच्या प्याद्याला त्याने उंट, घोडा आनी हत्ती असे तीन जोर लावून ठेवलेत त्यामुळे ते प्यादे आणि घोडा अशा काँबिनेशनने ठाणे धरुन ठेवायचे हा प्लॅन आहे.
आनंदकडे काय प्रत्युत्तर आहे? एफ ८ वरचा काळा उंट बाहेर काढून हत्तींचा समन्वय करणे आणि पांढर्याला आत घुसण्यापासून रोखणे.
23 Nov 2014 - 6:44 pm | बहुगुणी
23 Nov 2014 - 6:44 pm | संजय क्षीरसागर
.
23 Nov 2014 - 6:59 pm | बहुगुणी
या दुव्यावर जाऊन Magnus Carlsen vs Viswanathan Anand [*] असं लिहिलं आहे त्यावर क्लिक करा (आता १२वा डाव्यात तुम्हाला हे करता येईल्) म्हणजे पट दिसू लागेल, त्या पटाखाली साधारण मध्यभागी डावीकडे embed दिसेल, त्यावर क्लिक करून This game or the whole tournament? असे options मिळतील. त्यानंतर Game सिलेक्ट करा, मग small 567X720 किंवा big 726X705 असे options मिळतील. small 567X720 वर क्लिक करून जो code दिसेल तो कॉपी करा, आणि मिपाच्या खिडकीत पेस्ट करा.
23 Nov 2014 - 7:09 pm | संजय क्षीरसागर
हा embed कोड सापडला नव्हता.
23 Nov 2014 - 6:52 pm | चतुरंग
आहे. जी ४ असे प्यादे सरकले आणि घोडा डी२, ई४ असा उड्यामारुन दुसरा घोडा एफ६ वरती आला तर काळ्याची परिथिती कठिण होणार..
आनंदने वजिराच्या बाजूला प्रतिहल्ल्याची तयारी केलीच पाहिजे परंतु त्याची मोहोरी तिकडे हलवणे आत्ता कठिण दिसते आहे..
23 Nov 2014 - 6:56 pm | चतुरंग
पुढे आहे फक्त ५ मिनिटांनी..अजूनतरी स्थिती बरोबरीची आहे परंतु आनंदने आता ए प्यादे सरकवून पटाचा भाग व्यापणे गरजेचे आहे अन्यथा जागेची घुसमट मोहोर्यांची मुसकटदाबी करते आणि मग डाव कठिण होत जातो.
एकदम थेट हल्ला करण्यापेक्षा मॅग्नुस अजगरासारखी घुसमट करतो..
23 Nov 2014 - 6:57 pm | चतुरंग
बोआ काँस्ट्रिक्टर!! :)
23 Nov 2014 - 6:57 pm | चतुरंग
ए प्यादे ६ मधे सरकले...
23 Nov 2014 - 6:59 pm | चतुरंग
आणि मॅग्नुसने ताबडतो ए ४ असे प्यादे सरकवून त्याची वाट रोखली, घोडा ई ७ मधे घेऊन जी६ किंवा सी ६ असा येण्याची तयारी शिवाय पांढरा उंट मोकळा करुन घेतला..
23 Nov 2014 - 6:58 pm | संजय क्षीरसागर
आणि कार्लसनचे दोन्ही हत्ती आणि डी-५ मधला घोडा फुल स्विंगमधे आहेत.
23 Nov 2014 - 7:03 pm | संजय क्षीरसागर
आनंदला तापदायक ठरणारे. तो हालल्या बरोबर कार्लसननं भेदी खेळी केली!
23 Nov 2014 - 7:07 pm | रामदास
वर्चस्वासाठी ह्या खेळी आहेत का ?
23 Nov 2014 - 7:14 pm | चतुरंग
पटाच्या मध्यात कार्लसनचे वर्चस्व आहे. तिथून पोझीशन भेदून मोहोरी आत घुसवणे हा उद्देश.
23 Nov 2014 - 7:13 pm | संजय क्षीरसागर
कार्लसनकडनं शिकावं! मला वाटतं इट इज द मोस्ट डेअरींग थींग.
23 Nov 2014 - 7:19 pm | चतुरंग
हे कॉमन आहे.
23 Nov 2014 - 7:17 pm | संजय क्षीरसागर
महत्त्वाची ठरणारे!
23 Nov 2014 - 7:20 pm | संजय क्षीरसागर
बी-३ खेळणार!
23 Nov 2014 - 7:21 pm | चतुरंग
आनंद एच ५ खेळू शकतो. मॅग्नुसने एच ४ खेळी केली तर मारामारी होऊ शकते!
23 Nov 2014 - 7:33 pm | रामदास
आनंद वेळ कमी घेतो आहे काय ?
23 Nov 2014 - 7:33 pm | बहुगुणी
आनंदने कार्लसनच्या घोड्यासाठी हत्ती (आणि उंट) ईरेला घालण्यापेक्षा सी प्यादे पुढे का सरकवलं नसेल?
23 Nov 2014 - 7:39 pm | संजय क्षीरसागर
ती खेळी केली की राजाला हालायचा आणखी लोच्या होईल
23 Nov 2014 - 7:46 pm | चतुरंग
मुख्य प्रॉब्लेम असा आहे की पांढर्या उंटाची हलायची घरं जवळपास बंद होतात. राजाच्या बाजूला घरं बंद झालीच आहेत.
त्यात सी प्यादे सरकले की उंट बंदिस्त झाला आणि डी ७ असा मागे गेला तर हत्तीच्या वाटेत येतोय त्यामुळे ते प्यादे सरकवणे अवघ्ड आहे...
23 Nov 2014 - 7:48 pm | चतुरंग
एफ ४ असे प्यादे खेळला तर मात्र सी ६ ही थ्रेट होते कारण तो घोडा हलला तर एफ ४ वरचे प्यादे किंचित दुबळे होते..
23 Nov 2014 - 7:53 pm | संजय क्षीरसागर
आता खेळ फुल ओपन होणार!
23 Nov 2014 - 7:55 pm | संजय क्षीरसागर
सी४ * बी५ खेळणार!
23 Nov 2014 - 7:57 pm | चतुरंग
कार्लसन घोडा एच५ असा आणून एफ ४ ची तयारी करणार त्यामुळे आनंदला सी ६ असे प्यादे रेटून घोड्याला मागे ढकलणे भाग आहे. परंतु मग एफ प्यादे ५ मधे आले तर उंट घोडा असा फोर्क देऊ शकते...त्यामुळे त्या दोन मोहोर्यांना जागा हवी!
23 Nov 2014 - 8:01 pm | संजय क्षीरसागर
तो आता पटाच्या डाव्याबाजूलाच सगळा खेळ करणार
23 Nov 2014 - 7:58 pm | चतुरंग
गँबल खेळला!! बी प्यादे पाच वर टाकले. सॅक्रिफाईस.. वजिराची बाजू मोकळी करुन हत्ती घुसवणे हा प्लॅन आहे का?
23 Nov 2014 - 8:05 pm | चतुरंग
इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली आहे की तीनही प्रोसेसिंग इंजिन्स काळ्याची थिती किंचित सरस दाखवत आहेत!!
आनंदला हे अॅडवांटेज जिंकण्यापर्यंत नेता येईल का?
23 Nov 2014 - 8:06 pm | संजय क्षीरसागर
आता आनंदचं अवघड आहे.
23 Nov 2014 - 8:09 pm | चतुरंग
आनंदची स्थिती आता जास्त चांगली आहे..तुम्ही पुन्हा काळ्या पांढर्या मोहोर्यांचा घोळ घालताय का?
23 Nov 2014 - 8:13 pm | संजय क्षीरसागर
माझ्या मते कार्लसनची स्थिती जास्त आक्रमक आहे.
23 Nov 2014 - 8:20 pm | संजय क्षीरसागर
.
23 Nov 2014 - 8:30 pm | चतुरंग
मोक्याच्या जागांवर असली तरी त्यांच्या प्रगतीचा स्पष्ट मार्ग नाहीये. उलट बी संभ अचानक मोकळा झाल्याने मॅग्नुसला ते खिंडार कसे बुजवावे हा प्रश्न सतावणार आहे. आता बी स्तंभाचे वर्चस्व विरुद्ध घोड्यांई थिती आणि डी स्तंभाचे वर्चस्व असा लढा आहे!
23 Nov 2014 - 8:35 pm | संजय क्षीरसागर
बी फाईलकडून कार्लसनला काहीही धोका संभवत नाही.
सगळा खेळ डी फाईलवर अवलंबून आहे
23 Nov 2014 - 8:38 pm | चतुरंग
परंतु त्याला थेट काउंट्र करण्यापेक्षा बी स्तंव्भ मोकळा करुन खेळाचा रोख हलवणे हाच प्रतिहल्ला ठरु शकतोय..
23 Nov 2014 - 8:23 pm | संजय क्षीरसागर
आधीच तापदायक होता. आता पुन्हा एफ-६ मधल्या घोड्यामुळे तो केंव्हाही पुनर्जन्म घेऊ शकतोयं!
23 Nov 2014 - 8:26 pm | चतुरंग
लक्ष देणे गरजेचे आहे. चौदा खेळ्यांना साधारणपणे तीस मिनिटे आहेत. थिती बर्यापैकी काँप्लिकेटेड असल्याने वेळ बराच लागणार आहे..
23 Nov 2014 - 8:28 pm | संजय क्षीरसागर
गमतीशिर आहे. जेंव्हा त्याला नक्की काय करावं हा प्रश्न पडतो तेंव्हा तो, निर्णय शिताफीनं प्रतिस्पर्ध्याकडे पास करतो!
23 Nov 2014 - 8:31 pm | संजय क्षीरसागर
त्याची राजा एफ-३ ही आता केलेली मूव!
23 Nov 2014 - 8:34 pm | चतुरंग
करायलाच हवी होती कारण त्याने घोडा एफ ४ ही आनंदची खेळी रोखली गेली..त्यात सयकॉलॉजी नाहीये थेट खेळ आहे..
23 Nov 2014 - 8:41 pm | चतुरंग
हत्ती बी ४ टाकलाय आनंदने हत्तीचा सॅक्रिफाईस आणि दोन मोहोरी + दोन प्यादी असा मामला होणार बीस्तंभातले प्यादे डोकेदुखी करायचा प्लॅन आनंदचा!!
23 Nov 2014 - 9:49 pm | चतुरंग
महागात पदले...त्याला पुरेसे कोंपेन्सेशन नव्हते आणि मॅग्नुसने एवढ्या ताणात अचूक निर्णय घेतला त्याबद्दल त्याला मानायलाच हवे. आनंदने देखील हे प्रेस कॉन्फरंसमधे मान्य केले..
23 Nov 2014 - 8:43 pm | संजय क्षीरसागर
गेममधे रंगत आली.
23 Nov 2014 - 8:50 pm | संजय क्षीरसागर
बहोत खूब!
23 Nov 2014 - 8:59 pm | संजय क्षीरसागर
अॅक्टीव केला!
23 Nov 2014 - 9:02 pm | संजय क्षीरसागर
आनंदला, घोडा घालवायचा की उंट असा प्रश्न पडलायं.
23 Nov 2014 - 9:06 pm | संजय क्षीरसागर
आणि त्याच्याकडे दोन हत्ती आहेत त्यांनी चढाई सुरु करेल.
23 Nov 2014 - 9:09 pm | संजय क्षीरसागर
असा विचार करतोयं असं दिसतंय.
23 Nov 2014 - 9:12 pm | संजय क्षीरसागर
बरोब्बर तेच खेळलायं.
23 Nov 2014 - 9:14 pm | चतुरंग
गेल्यात जमा आहे. घोडा खाता येत नाही आता राजा सी ६ घेऊन थोडेफार चान्सेस आहेत, मॅग्नुसने त्याचा टेंपरामेंट न घालवता खेळ केलाय...सामन्यातला हा बहुदा शेवटचा डाव ठरणार..
23 Nov 2014 - 9:22 pm | संजय क्षीरसागर
दोन हत्ती आहेत म्हटल्यावर कार्लसन काहीही करु शकतो.
23 Nov 2014 - 9:18 pm | संजय क्षीरसागर
.
23 Nov 2014 - 9:19 pm | संजय क्षीरसागर
आनंदनं ४० वी खेळी वेळात केली की झालं!
23 Nov 2014 - 9:20 pm | चतुरंग
आणि एकेक मूवचे कॅलक्यूलेशन! तुफान चाललाय डाव. जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत असा डाव बघितला नव्हता!
आनंदने डावत पुन्हा जान आणली आहे!!
23 Nov 2014 - 9:28 pm | संजय क्षीरसागर
कार्लसनचे हत्ती सगळी वाट लावून टाकतील. पण गेम बहारदार होतोयं हे निखालस!
आणि त्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद! वर्ल्ड चँपियनशिप इतकी जवळून आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली.
23 Nov 2014 - 9:29 pm | चतुरंग
मॅग्नुस पुन्हा चँपिअन झाला! आनंदचे कॅलक्यूलेशन चुकले कुठे तरी... अन्यथा त्याने डाव चांगला उलटवत आणला होता...
मॅग्नुसच्या चॅंपिअनशिपसाठी त्याचे अभिनंदन!! :)
23 Nov 2014 - 9:33 pm | संजय क्षीरसागर
हे मात्र अमान्य. कारण कार्लसनचे दोन हत्ती मात करायला पुरेसे होते म्हणून आनंदला हार मानावी लागली.
23 Nov 2014 - 9:42 pm | चतुरंग
शेवटी हत्ती रहात नव्हते. खेळ जवळपास तोललेला होता. आर बी ३ झाले असते तर चित्र बरेच वेगळे दिसू शकले असते..निदान आनंदने आजचा ड्रॉ करायला हवा होता तो नर्वस डिसिजन मधे गेला आणि डाव गमावून बसला.
मॅग्नुसने त्याचे टेंपरामेंट चांगलेच टिकवलेन.
23 Nov 2014 - 11:08 pm | संजय क्षीरसागर
माझ्याकडे बी * बी५ लाच कार्लसन जिंकल्याच दिसलं! म्हणून तर तुमच्या मागोमाग मी सुद्धा `कार्लसन जिंकला' म्हणालो.
23 Nov 2014 - 9:30 pm | संजय क्षीरसागर
!
23 Nov 2014 - 9:31 pm | चतुरंग
तणावाखाली तो ब्रेकडाऊन झाला आणि कॅलक्यूलेशन चुकले.
मॅग्नुसचा खेळ निर्विवाद उच्च झाला. ही इज ए न्यू चँपिअन!!
23 Nov 2014 - 9:34 pm | चतुरंग
आनंदने हत्ती बी ३ असा आणायला हवा होता त्याने गेम आणखीन लांबवायचे चान्सेस होते...
23 Nov 2014 - 9:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी मागच्या वर्षीच म्हटलं होतं आनंदचा सचीन तेंडूलकर झालाय.
तुम्ही लोक ऐकत नाही माझं. मी आज डाव पाहिला नाही.
माझा मानसिक त्रास वाचला धन्यवाद. लोभ असावा.
-दिलीप बिरुटे
23 Nov 2014 - 9:54 pm | चतुरंग
इथे आनंदने कँडिडेट स्पर्धा जबरदस्त पद्धतीने जिंकून या सामन्याचा आव्हानवीर म्हणून प्रवेश पटकावला होता!
यात स्वेच्छेने निवृत्ती वगैरे घ्यायचा प्रश्न नाहीये त्यामुळे सचिन आनंदची तुलना पूर्णपणे अयोग्य आहे.
प्रेस कॉन्फरंसमध्ये देखील आनंदला विचारले की आता तो चेस खेळणे सोडणार आहे का त्याने एका शब्दात उअत्तर दिले "नाही!"
23 Nov 2014 - 10:58 pm | संजय क्षीरसागर
एकदम मान्य! बहुदा त्यानं त्याचे सेकंडस बदलायला हवेत, म्हणजे विचारांचा अँगल बदलायला हवा.
तो (बहुतेक) क्लिष्ट विचार करतो (लाँग ड्रॉन प्लान) आणि कार्लसन सोपा आणि सहज विचार करतो त्यामुळे त्याचा खेळ जास्त इफेक्टीव आणि थरारक होतो.
25 Nov 2014 - 7:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गेले दोन दिवस बुद्धीबळाच्या जेष्ठ जाणकारांचे बुद्धीबळाबद्दलचे लेखन वाचतोय. जवळ जवळ सर्वांचेच मत बनले आहे की
'दोघांच्याही डावात सर्वोत्तम खेळ बघायला मिळाला नाही, पण दोघांच्या संयम हाच या लढतीतला मोठा फरक होता, त्यात तरुण कार्लसनने बाजी मारली. तरुण वयातील आक्रमकता त्याच्या खेळीत नव्हती तर प्रचंड असा संयम होता आणि हेच सर्वात महत्वाचे होते पण यात आनंदच्या वाढत्या वयाचा मुद्दा राहुन राहुन येतोच खेळाडुला वय नसतं तो केव्हाही फॉर्ममधे येऊ शकतो पण शारिरीक मानसिक क्षमता वयोमानानुसार कमी होत जाते हेच सत्य आनंदलाही शेवटी स्वीकारावे लागले''
आनंद पूर्वीच्या स्पर्धा जिंकल्यामुळे या स्पर्धेत तो आव्हानवीर म्हणुन उतरला ही गोष्ट मान्य. पण त्या खोडसाळ कार्लसनचं मत आपण वाचलं असेलच की त्याला आनंद या स्पर्धेत आव्हानवीर म्हणुन आला याचंच आश्चर्य वाटलं याचा अर्थ अस की तो आनंदला जोखून आहे.
रंगाशेठ, तुम्ही बुद्धीबळाचे उत्तम जाणकार आहात. आनंदला किमान दोन डावात जिंकण्याची उत्तम संधी होती आणि आनंदने अशावेळी चुका केल्या आणि वर्चस्व असलेल्या डावात पराभवाच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं त्याचं कारण एकच आनंद त्याच्याविरुद्ध मानसिक लढाईत आनंद कमी पडला आणि त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं.
-दिलीप बिरुटे
23 Nov 2014 - 11:12 pm | कंजूस
मला असं म्हणायचय की कार्लसन पुढे आनंदचा टिकाव लागत नाही हे सिध्द झालंय कारण १)आनंदची पांढरी असली की कार्लच्या खोड्या सुरू होतात -वजीर मारणे, राजाला हलवून कोट न करू देणे, उंट घोडे उडवणे. हे करताना पांढरीवाला निराश होऊन चुकला की तो डावपण खिशात टाकणे. याचे एक उदा॰ खंदकवाला अभेद्य किल्याचा किल्लेदार सूस्त राहतो आणि शत्रू फितुरी करवून किल्ला खिशात टाकतो. २)त्याच्याकडे पांढरी असतांना त्याला हवा तसा खेळ करवतोच ३)राजा एचपासून सीपर्यँत हलवायला घाबरत नाही.
24 Nov 2014 - 12:21 am | संजय क्षीरसागर
आनंद क्लासिकल खेळायला जातो आणि कार्लसन स्पाँटेनियस (आणि तरीही बिनचूक) खेळतो, हाच नेमका फरक आहे.
24 Nov 2014 - 12:35 am | मुक्त विहारि
धन्यवाद....
(आता नक्की कशाबद्दल. ते भारतभेटीत सांगतोच)
24 Nov 2014 - 11:31 am | आनंद
कार्लसन चे अभिनंदन!
११ सामने बघताना मजा आली. या बुद्धीबळ्मय वातावरणात. मि.पा. वर बुद्धीबळ स्पर्धा घेता येतिल का?
25 Nov 2014 - 2:52 pm | आनंद
बहुगुणीं ना धन्यवाद, मिपावर बुद्धीबळ स्पर्धेची तयारी चालु आहे असे दिसतय.
24 Nov 2014 - 3:06 pm | प्रसाद गोडबोले
कार्लसन हाच नंबर वन आहे हे पुन्गा एकदा सिध्द झाले !
24 Nov 2014 - 3:45 pm | कंजूस
या खेळात एका उंटासाठी हत्तीचा का बळी दिला हे कळले नाही. नंतर राजाने घोडा का घेतला नाही -कार्लचा हत्ती बी स्तंभात बी१ येउन उंटाची पाठ मोडेल वाटते.
सुमो कुस्तीचे पैलवान जिंकले की योकोझुना होतात. पुढच्या स्पर्धेत हरले तरी खेळतात. शिवाय आखाड्यात नवीन पैलवानांना सरावासाठी त्यांच्याशी कुस्ती करतात. हेसुध्दा एक कामच असते. आनंदने आता हेच करावे.
24 Nov 2014 - 3:49 pm | कंजूस
@मुवि काय गंमाडी गंमत आणताहात ?
25 Nov 2014 - 7:43 am | मुक्त विहारि
काही नाही...
तुम्हाला गुरु केल्याने आम्हाला बराच फायदा होत आहे.
थोडे फार खेळता येईल, इतपत आम्हाला पण शिकवा.
24 Nov 2014 - 3:54 pm | कंजूस
कोणी मंदिरा बेदी /आलिया भट या खेळासाठी समालोचन चर्चा करण्यासाठी आल्यास खेळाचे दडपण कमी होऊन न्यानात भर पडेल का ?
25 Nov 2014 - 3:29 pm | जेपी
आनंद कार्लसनची स्पर्धा संपली का ?
आता डाव होणार की नाही.
26 Nov 2014 - 11:24 am | संजय क्षीरसागर
त्यात आनंद जिंकला तरी एक गुणानं कार्लसन पुढेच राहाणार म्हणून १२ वी गेम झाली नाही, आणि मॅच संपली.
26 Nov 2014 - 11:51 am | प्रसाद गोडबोले
मला वाटतय आता कार्लसनला हरवायला कोणी तरी एकदम तरुण माणुसच आला पाहिजेल करुआना , अनिश किंवा नाकामुरा वगैरे .
आनंदला कुठे कमी लेखायचा प्रयत्न नाही पण आनंदच्या खेळातुन सरळ सरळ स्पष्ट पणे त्याचं वय जाणवत होतं .
आता पाहु कॅन्डीडेट्स टुर्नामेन्टची वाट :)
26 Nov 2014 - 12:27 pm | संजय क्षीरसागर
बदलायचा आवकाश आहे. लाँग ड्रॉन प्लान्सपेक्षा, सुटसुटीत तीन किंवा चार चालींचे निर्विवाद प्लान्स करत इनिशिएटीव स्वतःकडे ठेवायचा प्रश्न आहे. तुम्ही कार्लसनचे सगळे गेम्स पाहा, तो इनिशिएटीव कायम स्वतःकडे ठेवतो.
आनंदची बोर्ड-विजन (म्हणजे खेळी करुन झाल्यावर बोर्ड कसा दिसेल ते विज्युअलाइज करण्याची क्षमता) निव्वळ असामान्य आहे (आणि ती देखिल वेगवेगळ्या काँबिनेशन्सच्या सात-आठ मूव्हज नंतर!).
त्यानं ११ व्या गेममधे विपरित परिस्थितीत केलेला खेळ अद्वितीय होता. १० व्या गेममधे वजीर जिवंत करुन सुद्धा त्याचा फायदा उठवू शकला नाही हे त्याचं केवळ दुर्दैव ! (खरं तर कार्लसनची न डगमगता खेळण्याची क्षमता!)
माझ्या मते त्यानं ताज्या दमाचे (तरुण) सेकंड्स घेतले की काम झालं. बुद्धीबळात क्षमता कधीही कमी होत नाही, फक्त विचार करण्याची पद्धत बदलायला लागते. कारण खेळ तर त्याच्याकडे आहेच. सलग ५ वेळा जगज्जेतेपद राखणं सोपी गोष्ट नाही.
26 Nov 2014 - 1:43 pm | vikramaditya
The top three players in the history of Modern Chess are Bobby Fischer, Garry Kasparov and Magnus Carlsen. (as per the opinion of most experts)
अमित करमरकर ह्यांचा पूर्ण लेख वाचनीय आहे. तज्ञांच्या मते वर उल्लेखलेले तीन्ही खेळाडु आपल्या काळाच्या पुढे होते/ आहे. (अहेड ऑफ देअर टाईम्स) लेखकाच्या मते आनंद आणि क्रॅमनिक हे ग्रेट चँपियन असले तरी , नॉट इन द सेम क्लास.
26 Nov 2014 - 2:05 pm | कंजूस
संक्षी ,दहाव्या गेममध्ये प्यादाचा वजीर करण्याच्या चार खेळी अगोदर पट फिरवून अदलाबदल केली असती तर तो गेम कार्लसनने जिंकून दाखवला असता याबद्दल खात्री आहे.
मी लहानपणी धाकट्या भावाबरोबर खेळायचो आणि हरलो म्हणायचो तेव्हा माझा गेम तो घेऊन मला पुन्हा हरवायचा !
26 Nov 2014 - 3:28 pm | संजय क्षीरसागर
कार्लसननं ज्या पद्धतीनं तो गेम ड्रॉकडे नेला, ती त्याची न डगमगण्याची क्षमता कुणीही विसरु शकणार नाही. तो जिनिअस आहे. यापूर्वी एकही चेस चँपियनशिप मॅच इतकी लक्षपूर्वक पाहिली नव्हती कारण (खरं तर) चेस बोअर व्हायचा. ज्या वेळी कार्लसनचा खेळ पाहिला तेंव्हापासून मला चेसमधे इंटरेस्ट निर्माण झाला.
माझ्या दृष्टीनं तरी, आपला-परका अशा बालिश कल्पना खेळात कधीच नसतात, खेळ हा खेळ असतो आणि कौशल्य हे कौशल्यंच असतं. तस्मात, मी आनंदचा चाहता वगैरे नाही पण त्याची बोर्ड विज्युअलायजेशन कपॅसिटी (ची ग्रँडमास्टची बेसिक रिक्वायरमंट आहे), कार्लसनपेक्षा भारी आहे.... तो डावपेच लांबचे आखतो त्यामुळे अपयशी होतोयं.