एक किस्सा (बाल दिन स्पेशल)
गांजवे चौकात एक छोटेसे ६-१० स्के .फुटाचे भडभुंज्याचे दुकान आहे
भेळ शेव चुरमुरे आदी पदार्थ मिळतात....मालक त्याची बायको व छोटी मुलगी दुकानात असते.....
दुकानातली "शेंगदाण्याची भजी" मला आवडतात रुची पालट म्हणून मी १०-१५ रु ची घेत असायचो/असतो
२-३ वेळा मात्र" माल तयार केला नाही... उद्या नक्की करतो" अशी उत्तरे मिळाली ..मी पण फारसे मनावर घेतले नाही
पुढे एके दिवशी स्टेट ब्यांकेत खाते/ डिपॉझिट असल्याने पास बुक जुळवून घेण्यासाठी ब्यांकेत जायचे ठरले व चेक बुक/कार्ड पासबुक असलेले "पाऊच "घेऊन ब्यांकेत गेलो.
सुदैवाने "सिस्टिम डाउन "अश्या सबबी न मिळता पास बुक जुळवून घेतले.
तश्या फारश्या एंट्री नव्हत्याच म्हणा…कारण बाकीचे व्यवहार भार्या बघते……
येताना ते दुकान लागले अन रस्त्यावर स्कूटर लावली अन "शेंगदाण्याची भजी" याबद्दल विचारणा केली
त्यावर तयार नाही...माल भरला नाही अशी त्याने छापील उत्तरे दिली…।
यावर त्याला म्हणालो अरे मागच्या २-३ वेळी पण तू असेच म्हणाला..काही अडचण आहे का? का आयटम बंद केला आहेस???
असे म्हणताच तो म्हणाल" काय सांगू साहेब..भांडवल कमी पडत आहे..लई ओढा ताण चालू आहे"
"का भांडवल दुस-या धंद्यात फिरवले का?
ह्या छोटी ला नर्सरीत प्रवेश घ्यायचा आहे २५ हजार रु डोनेशन आहे ते जमवत आहे त्या मुळे ओढाताण होत आहे"
किती जमले?"
"१३ हजार जमले आहेत बाकीचे मित्र नातेवाई देईन म्हणत आहेत पण हातात पडेल तेव्हा खरे.."
कितिची गरज आहे>?
"२५ डोनेशन+ ३ हजार ड्रेस.पुस्तके..खाऊचा डबा पाण्याची बाटली आदी साठी"
मी त्याचे नाव विचारले व शांतपणे पाऊच मधून चेक बुक काढले व त्याच्या नांवाने १५ हजाराचा चेक लिहून त्याला दिला..
माझ्या ह्या अनपेक्षित कृतीने तो भांबावला..व खुर्ची वरुन उठला व चेक स्वीकारतं माझे हात धरले व "साहेब तुमचे उपकार जन्मभर विसरू शकत नाही..पाहिजे तर व्याज घ्या तारण म्हणून शॉप अक्ट लायसन्स घ्या "असे गदगदलेल्या स्वराने म्हणाला...
तो असे करणार ह्यात मला आश्चर्य वाटले नाही..कारण मी म्यान्युफ्याकचरिंग व्यवसायात असल्याने लाखो रुपयाची उचल ब्यांक व खाजगी सावकाराकडून घेतेलेली होती..त्याचे हप्ते व्याज फेडणे त्यात येणारे ताण तणाव ह्या ८४ लक्ष योनीतून प्रवास झालेला होता...
हात सोडवत म्हणालो व्याज वगैरे नको..जमेल तशी परत फेड कर मात्र चेक नी रक्कम माझ्या खात्यात भरत जा.. मला फोन करत जा...
पुढे त्याचा फोन आला दीड हजार ..कधी १ हजार असे करत तो रक्कम फेडत होता...
३-४ महिन्याने त्याच्या दुकानात गेलो..तो नव्हता.
मला पहाताच त्याची बायको पटकन उठली मी २० रु ची भजी घेतली..
बाजुला कोप-यात छोटी खेळत होति..२ वेण्या..शाळेचा ड्रेस..कोप-यात दप्तर..पाण्याची बाटली दिसत होति..
तिचि आई म्हणालि.."काकांना नमस्कार कर छोटी"
मुलीने बसूनच आपला चिमुकला हात हालवला...
मला एकदम माझ्या मुलीची बाल मूर्ती आठवली..त्या पण अश्याच २ वेण्या शाळेचा ड्रेस..लंच बॉक्स घेऊन सेंट हेलेना शाळेत जात असत..
ता.क.(त्याने सर्व पैसे फेडले)
प्रतिक्रिया
16 Nov 2014 - 8:56 am | आयुर्हित
या खाजगी शाळा देखील बिल्डर/गुंतवणूकदार लोकांच्या ताब्यात असल्याने पर स्क़ेअर फुट च्या रेट ने फी वाढत जाणार आहेत. आणि सर्व सामान्यांची फरफट होणार हे नक्की.
बऱ्याच वेळेला खूप कठीण परिस्थितून जावे लागते लोकांना.
आपल्यासारखे धनवान व दयावान लोकांची गरज आहे जगाला.
एक प्रकारे सामाजिक बांधिलकी दाखविल्याबद्दल धन्यवाद.
16 Nov 2014 - 8:59 am | खटपट्या
खूप छान अनुभव !!
16 Nov 2014 - 9:14 am | प्रभाकर पेठकर
त्रिवार दंडवत स्विकारावा.
हृद्य प्रसंग अगदी मोजक्या शब्दात मांडला आहे. त्या मुलीच्या आयुष्यातील प्रगतीत तुमचा खारीचा वाटा अत्यंत मोलाचा आहे.
16 Nov 2014 - 9:24 am | गवि
हेच म्हणतो.
किंबहुना नेमक्या गरजेच्या क्षणी मदत दिल्याने तो खारीचा वाटा न राहता सिंहाचा वाटा झाला.
16 Nov 2014 - 10:22 am | मुक्त विहारि
सहमत...
पण अकु साहेब जरा सांभाळून....
16 Nov 2014 - 12:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
नेमक्या गरजेच्या क्षणी मदत दिल्याने तो खारीचा वाटा न राहता सिंहाचा वाटा झाला.
हेच मनात आले !शिवाय हे मनात आले तरी ऐन वेळेवर किती जणांचा हात खिशात जाईल याबाबत साशंक आहे त्यामुळे अकुंना __/\__ !
16 Nov 2014 - 10:33 am | hitesh
छान.. सुंदर
16 Nov 2014 - 11:22 am | एस
सामाजिक बांधिलकी इतक्या सहजतेने दाखवलीत, आणि हा किस्सा आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दलही धन्यवाद. यातून बर्याचजणांना प्रेरणा मिळावी अशी आशा!
16 Nov 2014 - 11:30 am | टवाळ कार्टा
:)
16 Nov 2014 - 11:37 am | माम्लेदारचा पन्खा
तुमचा एक नवा पैलू समोर आला.... धन्य झालो....
सत्पात्री मदत केलीत तुम्ही...लगे रहो....
16 Nov 2014 - 11:48 am | जेपी
+1
16 Nov 2014 - 12:23 pm | रुपी
इतक्या पटकन १५ हजारांचा चेक लिहून दिलात!
16 Nov 2014 - 12:29 pm | प्यारे१
किस्सा आवडला.
अवांतरः
आम्ही आमच्या एका आंतरजालीय मित्राला मदत केलीये अशीच.
तो अगदीच अडचणीत आलाय असं म्हणाला होता म्हणून मदत केली.
एक महिन्यापूर्वीचा वायदा होता परतफेडीचा. आता मी वाट बघतोय.
प्रश्न पैशाचा कमी महत्त्वाचा आणि वेळेत पैसे परत करण्याचा जास्त आहे.
आज देतो उद्या देतो असंच सांगत आलाय पण अजून रक्कम जमा झाली नाही.
माणुसकी वरचा विश्वास उडू नये म्हणून तरी त्यानं रक्कम जमा करावी ही अपेक्षा आहे.
असो!
डिस्क्लेमरः मी स्वजबाबदारीवर रक्कम दिलेली असून त्यासंदर्भात मी स्वतःच पूर्णपणे जबाबदार आहे.
16 Nov 2014 - 6:00 pm | नूतन
खरंच! सत्पात्री मदत केलीत तुम्ही.
16 Nov 2014 - 7:06 pm | स्वप्नज
_/\_ आदर वाटतो तुमचा ..
16 Nov 2014 - 7:40 pm | बहुगुणी
दुकानदाराने जाणीवपूर्वक पैसे परत केले याचंही कौतुक वाटलं.
अशा लेखांनी, सत्कार्य करणार्याच्या समाधानाबरोबरच, वाचकांना आपणही काही भलं काम करावं अशी भावना निर्माण होते. म्हणून मिपा वर "one good deed a day/ आजचं सत्कार्य" असा विभाग सुरू करावा, ज्यात असं थोडक्यात आपण केलेलं वा पाहिलेलं सत्कार्य मांडलं जावं.
17 Nov 2014 - 10:43 am | सार्थबोध
सुरेख. अतिशय सुन्दर काम ...
17 Nov 2014 - 2:33 pm | बॅटमॅन
वा! मस्तच.
17 Nov 2014 - 2:50 pm | असंका
शेंगदाण्याची भजी पण करतात? का हल्दीराम सारखे मसाला शेंगदाणे?
18 Nov 2014 - 12:16 pm | स्वीत स्वाति
सत्पात्री मदत.
18 Nov 2014 - 4:58 pm | पैसा
बोधकथा चांगली आहे. मात्र परिस्थिती नसताना २५००० डोनेशनच्या शाळेत मुलीला घालायचा अट्टाहास समजला नाही. हा किस्सा कधीचा हे सांगितले नसले तरी निदान १० रुपयाची भजी हा उल्लेख पाहता ही कथा निदान १० वर्षांपूर्वीची असावी. तेव्हा २५००० म्हणजे आताचे एक लाख झाले. त्या शाळेची फी महिन्याला हजार दोन हजार सहज असेल. ती त्या भडभुंज्याला परवडणार होती का? ते पैसे त्याने कुठून भरले हे कळले नाही. ज्या मुलांना शिकायचं असतं ती सरकारी शाळेतही चांगले शिकतात. शिवाय मुलीच्या शिक्षणासाठी कोणी भडभुंजा इतका खर्च करील यावर सहजासहजी विश्वास बसत नाही. फेसबुकवर किंवा वॉट्स अॅपवर फॉरवर्ड करायला चांगली कथा आहे.
अवांतरः एकाने गाय मारली म्हणून आपण वासरू मारावे ही वागणूक पटत नाही. तुम्ही कितीही हुशार आणि विद्वान असाल तरी तुमच्या अंगी नम्रता नसेल आणि उठता बसता दुसर्याची अक्कल काढावीशी वाटत असेल तर तुमचे मडके थापटणार्या कोणातरी गोरोबा कुंभाराची गरज आहे हे समजून असावे.
18 Nov 2014 - 5:23 pm | प्रसाद१९७१
@ पैसा ताई - असेच प्रश्न पडले होते. पण विचार केला की कोणीतरी चांगले काहीतरी केले आहे तर आपण खुसपट का काढावे?
18 Nov 2014 - 5:28 pm | मोदक
नाही इतकी जुनी घटना वाटत नाही. बहुदा अकुंना या प्रकारचे शेंगदाणे अपेक्षीत असावेत.
शेंगदाण्याला जेमतेम आवरण होईल इतकेच डाळीचे पीठ असते व त्यामुळे याला भजी असेही म्हणतात.
याला मसाला शेंगदाणे असेही म्हणतात (आणि मसाला शेंगदाण्याचे याहूनही अनेक वेगवेगळे प्रकार आहेत)
18 Nov 2014 - 8:03 pm | पैसा
तो तयार करत होता असं लिहिलंय ना त्यांनी! ते मसाला शेंगदाणे असणार, पण आता त्याचे लहान पाकीटही २० रुपयांना मिळते.
18 Nov 2014 - 7:18 pm | सस्नेह
किस्सा म्हणून छान आहे.
अशी मदत करणारे त्याबद्दल हेतुतः किस्से लिहीत नाहीत. त्यांना दाखवण्यापेक्षा करण्यात समाधान असते.
19 Nov 2014 - 1:52 pm | चिगो
खरं सांगू का?
इथेच मी अडकलो. ३*२ किंवा ५*२ एवढ्या छोट्या जागेत भडभुंज्याचे दुकान मांडता येईल का?
किस्सा छान आहे. खरा असेल तर तुमच्या दानशूरतेचे आणि दुकानदाराच्या प्रामाणिक परताव्याचे कौतूक वाटते. पैसाताईंच्या प्रतिसादाशी बर्यापैकी सहमत असलो तरी आजकाल लोक पोरांच्या शिक्षणाच्या बाबतीत भलतेच "टची" आहेत, त्यामुळे आपला पास..