मॅटिनी
आज रविवारचा दिवस आहे,
गुलाबी थंडीचा महिना आहे
मुले पण मामा कडे गेली आहेत
आज जरा चुकारच मूड आहे............
.
नाष्ट्यास कांदे पोह्याचा बेत आहे
लिंबू पिळून बशी वाफाळते आहे
का लाजतेस प्रिये ,भरव ना घास
आज तर राजा राणीच राज्य आहे.........
.
किचन मधे जरा लुडबूड करु दे
मदतीच्या बहाण्यानं तुला सतावू देत.
गारठा जरा आज अंमळ जादा आहे
स्वयंपाक घरातली उब जरा घेऊ देत........
.
नको ति आज बेचव भेंडी अन गवार
कोवळी मटार सोलण्यास घेतली आहे
नारळ घालून उसळीचा फक्कड बेत आहे,
अन्नपुर्णे, तुझ्या हाताची चव निराळीच आहे.......
.
आकंठ भोजन, सखे तन मन तृप्त आहे
राहू दे आवरा आवरी, आज एकांत आहे.
नाइट शो तर आपला नेहमीचाच आहे,
आज भामिनी ,मॅटिनी चा मूड आहे.........
प्रतिक्रिया
16 Nov 2014 - 8:22 am | पाषाणभेद
लवकर वाचून घ्या कारण गाडी तिकडेच वळतेय.
16 Nov 2014 - 8:25 am | जेपी
=))
मोबल्यावर हाय नायतर बॅकप घेतला आसता.
16 Nov 2014 - 8:28 am | पाषाणभेद
गाडी कारशेडमध्ये जाण्याचा चान्स आहे
आज ठाकठोक करून बॉडी रिपेर करायचा मूड आहे.
बाल्कनीची तिकीटे १० का २० पॉपकोर्न कूपन फ्रि
16 Nov 2014 - 8:33 am | जेपी
बहुतेक पब्लिक आणखीन सुस्तीत आहे.
16 Nov 2014 - 9:09 am | प्रचेतस
बालदिन संपला वाटतं.
16 Nov 2014 - 10:25 am | मुक्त विहारि
बाल्याची तयारी करत आहेत...
16 Nov 2014 - 11:32 am | टवाळ कार्टा
;)
16 Nov 2014 - 9:10 am | अत्रुप्त आत्मा
अकुं ची लिबलिबीत जिल्बी! =))
16 Nov 2014 - 9:41 am | अजया
प्रौढदिनाच्या शुभेच्छांची चान चान जिल्बी =))
16 Nov 2014 - 10:26 am | मुक्त विहारि
आवडली...
16 Nov 2014 - 11:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काका जे होईन ते होईन..ख़यालातला रविवार इंजॉय करा.
आता पोरं मामाच्या गावी जाण्याची वाट पाहाणं आलं ;)
-दिलीप बिरुटे
(गारठ्यातला)
16 Nov 2014 - 11:28 am | माम्लेदारचा पन्खा
त्या अजाण "बालकां"ना त्यांचे "पालक" आज असे का चेकाळले त हे कळलंच नसतं ! ! :-))
16 Nov 2014 - 11:30 am | एस
अरेरे... असा रविवार कधी मिळायचा.. फ्रिज साफ करायचाय, नवरा-कम-प्लंबर-कम-इलेक्ट्रिशिअन-कम-खिळेहातोडेवाला-कम-हमाल-कम-एव्हरीथिन्ग फ्री-... वगैरे वगैरे... आज रविवार आहे! ऑल-इन-वन चा रोल वाट बघत आहे!
आलो...! (हाकेला ओ देत...) :-)
16 Nov 2014 - 11:37 am | जेपी
आसा रविवार कधि यायचा. *wink*
16 Nov 2014 - 12:35 pm | प्यारे१
छान आहे की कविता.
मुख्य म्हणजे सूचक (सटल) आहे.
ह्या पेक्षा सरळसोट नि थेट धोंडोपंतांची कविता होती जी अजूनही मिपावर आहे.
(उत्खनन करणारांना संधी. लाभ घ्यावा.)
17 Nov 2014 - 2:53 am | मुक्त विहारि
भाऊ
इथेच द्या की लिंक...
त्यावेळी मिपाकरांनी नुसती धमाल उडवली असेल.....
17 Nov 2014 - 10:35 am | प्रकाश१११
आकंठ भोजन, सखे तन मन तृप्त आहे
राहू दे आवरा आवरी, आज एकांत आहे.
नाइट शो तर आपला नेहमीचाच आहे,
आज भामिनी ,मॅटिनी चा मूड आहे.........वा
17 Nov 2014 - 11:59 am | वेल्लाभट
य न जॅा य
21 Nov 2014 - 8:08 pm | आगाऊ म्हादया......
बास का?? म्हणजे मामा मामी चा मॅटीनि मूडचा खेळ खलास कि....
21 Nov 2014 - 8:13 pm | प्रसाद गोडबोले
ब्यॅकप घ्या ब्यॅकप घ्या
21 Nov 2014 - 8:18 pm | टवाळ कार्टा
=))
जेपी ...१ सर्वर ब्याकप वाल्या लेखांसाठी घ्यायचा का ;)
21 Nov 2014 - 8:22 pm | प्रसाद गोडबोले
म्हैलांच्या "अनाहिता" सारखा पुरुषविभाग "बघा आता" होत नाही तोवर ब्यॅकप घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही :(
21 Nov 2014 - 8:27 pm | टवाळ कार्टा
हाहाहा "बघा आता" =))
21 Nov 2014 - 8:25 pm | जेपी
टक्या,
खिशाला खार लावायचा नाय.
बॅकप घेतला आहे.
21 Nov 2014 - 8:27 pm | टवाळ कार्टा
मिपाचा अनमोल "ठेवा" सांभाळून ठेव रे ;)