द्रिश्यम/ दृश्यम

यश राज's picture
यश राज in जनातलं, मनातलं
9 Nov 2014 - 2:50 pm

माझे काही मल्लू सहकारी खुप दिवसांपासुन सांगत होते की द्रिश्यम म्हणुन एक खुप सुंदर मल्याळम सिनेमा आहे, त्याने यंव बिझेनेस केला,त्यंव रेकॉर्ड केले व तु नक्की बघ.मी त्यांचे बोलणे हसण्यावारी नेले. माझ्या मनात आले की २०० पौंडाचा नायक आणि त्याची नात शोभेल अशी नायिका, त्यांचा डबलडेकर रोमांस कोण बघेल म्हणुन मी त्यांना सपशेल नाही सांगितले..आणि असेही दक्षिण भारतिय सिनेमे जास्त करुन मसाला मुवी म्हणुन विख्यात असतात म्हणुन डोक्याला उगाच शॉट नको असे वाटले.
पण एकाने मात्र जबरदस्ती द्रिश्यम आणून दिला आणि म्ह्टला की बघुन सांग कसा आहे ते.मी आपला थोड्या अनिच्छेने बघायला सुरुवात केली पण चित्रपट जसा सुरु झाला तेव्हा मात्र अगदी मंत्रमुघ्ध झाल्याप्रमाणे पुर्ण बघुनच संपवला.चित्रपट मल्ल्याळी भाषेत जरी होता तरी भाषेचा अडसर जाणवला नाही.

चित्रपटात जरी रुढार्थाने मोहनलाल नायक असला तरी माझ्यामते नायक आहे तो म्हणजे द्रिश्यम म्हणजेच दृश्य आणि जसा चित्रपट पुढे सरकतो तसे दृश्य हाच महत्वाचा नायक असणे अधोरेखित होते.

कथा म्हणायला गेलो तर सस्पेंस थ्रिलर आहे, यात रहस्य आहे पण ते प्रे़क्षकांसाठी नाहीच मुळी कारण या रहस्याचे साक्षीदार आपणच असतो. रहस्य आहे ते चित्रपटातल्या पात्रांसाठी.. आपण फक्त उत्कंठापुर्वक हाच विचार करत बसतो की जे काहि रहस्य आहे ते नेमके कधि उलगडणार आणि हेच नेमके दिग्दर्शकाचे यश आहे.

कथा सुरु होते केरळातल्या एका सुंदरश्या शांत अशा गावात, जॉर्जकुट्टी (मोहनलाल) एक केबल ऑपरेटर आहे. सर्वांशी मनमिळाऊ असा स्वभाव असणारा.आपल्या बायको राणी (मीना) आणि २ मुलींबरोबर रहात असतो.आपला परीवार आणि सिनेमे हेच जॉर्जचे विश्व असते.सिनेमाचे प्रचंड वेड असल्यामुळे जॉर्ज आपल्या घरी सुद्धा रात्री उशीरा जातो किंवा जातही नाही पण त्याच्या बायकोला याबद्दल काहि तक्रार नाही. पण याबरोबरच जर काहि श्रुंगारिक सिनेमे पाहिल्यावर जॉर्ज घरी लवकर येइल याची तिला खात्रि आहे.
जॉर्ज आनंदी आहे. आवश्यक तेवढाच खर्च करावा याबद्दल आग्रही आहे. त्याची कशाबद्दलही काही तक्रार नाही.
अशा या सुखि संसारात मात्र वरुणच्या रुपाने एक संकट येते. जॉर्जची मोठी मुलगी अन्जु एका कँपला गेलेली असताना वरुण मोबाइलवर तीची आंघोळ करताना चित्रिकरण करतो. ती घरी आल्यावर तिला शरीरसुखाची मागणी करतो व तसे न केल्यास हे चित्रिकरण उघड करेन अशी धमकी देतो. अन्जु हादरते पण आईला याची कल्पना देते. दोघे मिळुन वरुणची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात पण वरूण मात्र तिच्या आईलाच आता शरीरसुखाची मागणी करतो. त्यामुळे चिडलेल्या अन्जुकडून वरूणचा खुन होतो. दोघी मिळुन त्याचे मृत शरीर एका खड्यात दफन करतात.
जॉर्ज रात्री घरी आल्यावर त्याला ते कळते.तो हादरतो पण मात्र त्याचे डोके झपाट्याने विचार करायला लागते.ईथे त्याचे सिनेमाचे वेड अर्थात दृश्य कामात येते.त्याच्यापुढे आता एकच लक्ष्य असते ते म्हणजे आपल्या परिवाराला यातून सहीसलामत बाहेर काढणे.त्यासाठी तो ज्या काही युक्त्या योजतो त्या फक्त आणि फक्त चित्रपटात बघणेच योग्य.

मोहनलाल ने अगदी जीव ओतुन काम केले आहे. त्याचा मिष्कील स्वभाव्,एक जवाबदार बाप. तसेच संकट आल्यावर न डगमगता शांतपणे विचार करणारा, पुढे काय घड्णार याचा अन्दाज असणारा व आपल्या कुटुंबाला सहीसलामत बाहेर काढ्णारा जॉर्ज त्याने अफलातुन उभा केलाय. मीना ने त्याला समर्थपणे साथ दिलीय.
सिनेमात जास्त बडेजावपणा नाहीये. तसेच जे लहान गाव आहे ते सुद्धा अगदि सुन्दर आहे.जेणेकरुन कथेचा एक हिस्साच.
सह्कलाकारानिही चांगला अभिनय केलाय.दक्षिणेत चित्रपटाला व कलाकारांना बरेच पुरस्कार मिळाले आहेत.
तर असा हा नितांत सुंदर चित्रपट एकदा जरुर पाहिलाच पाहीजे.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

पिंपातला उंदीर's picture

9 Nov 2014 - 3:28 pm | पिंपातला उंदीर

आपल्या 'उच्च ' भारतीय परंपरेला अनुसरून हा चित्रपट एका जपानी कादंबरी वरून ढापला आहे . अर्थातच मूळ लेखकाला श्रेय न देण्याचा कद्रु पणा करूनच .

http://onlookersmedia.com/ekta-kapoor-sues-mohanlals-drishyam/

बोका-ए-आझम's picture

9 Nov 2014 - 7:22 pm | बोका-ए-आझम

ही जी जपानी कादंबरी तुम्ही म्हणताय ती Keigo Higashino या लेखकाची ' The Devotion of Suspect X' ही कादंबरी आहे आणि तिचा विषय खूपच वेगळा आहे. गाभा तोच आहे - म्हणजे नायकाने नायिकेला कठीण परिस्थितीतून बाहेर काढणं - पण तपशिलात पुष्कळ फरक आहेत. सर्वात मोठा फरक म्हणजे जपानी कादंबरीत नायक आणि नायिका हे शेजारी असतात आणि त्यांच्या वयातही बराच फरक असतो आणि नायिका तिच्या दारुड्या नव-याचा खून करते आणि नायकाच्या ते लक्षात येतं. शिवाय या परीक्षणावरुन चित्रपट सुखान्त असावा असं वाटतंय पण कादंबरी ही शोकांतिका आहे. जपानी कादंबरीत नायक आणि त्याचा काॅलेजमधला मित्र, जो आता पोलिसांचा सल्लागार आहे, त्यांच्यातली बौद्धिक झुंज ही वाचूनच अनुभवायला हवी.
जर एकता कपूरकडे या कथेचे हक्क असतील तर इतक्या सुंदर कथेचं काय होणार या विचाराने अंगावर शहारा मात्र आला!

यश राज's picture

9 Nov 2014 - 8:10 pm | यश राज

एकता कपुर या सुंदर कथेचे काय वाटोळे करणार काय माहीत....तसेच जर टिपिकल बॉलीवूडगीरी चित्रपटात घुसविली तर कल्याणच....

एकता कपूर त्याचं अगदीच वाटोळं करणार हे नक्की!!!

आदूबाळ's picture

9 Nov 2014 - 4:45 pm | आदूबाळ

बघनार...

कानडाऊ योगेशु's picture

9 Nov 2014 - 6:58 pm | कानडाऊ योगेशु

मी ही पाहीला आहे हा चित्रपट तो ही एका साऊथ इंडियन कलिगच्या शिफारशीमुळेच. आणि चित्रपट फारच आवडला.
ह्याचा हिंदी रिमेकही येतो आहे. एकता कपूरने त्याचे राईट्स विकत घेतले आहेत व अक्षय कुमार मध्यवर्ती भूमिका करतो आहे असे वाचले होते.
अक्षय कुमारला ही भूमिका कितपत झेपेल ही एक शंकाच आहे. तसेही ह्या रोलसाठी तो तसा तरूणच वाटतो. (एका षोडशवर्षीय मुलीचा बाप.)माझ्यामते सनी देओल चा ह्या भूमिकेसाठी विचार व्हावा. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी जीवतोड प्रयत्न करणारा कुटुंबप्रमुख हे पात्र त्याच्या साठी व प्रेक्षकांसाठीही एक सरप्राईझ ठरु शकेल. (एरवीच्या भूमिकेत त्याने काट डालुंगा चीर डालुंगा असे डायलॉग फेकत नेहेमीसारखाच आक्रस्ताळेपणा केला असता.)

हं अक्षय कुमार नक्कीच सूट होत नाही. सनी देओलः ठीक वाटेल.

शब्दबम्बाळ's picture

11 Aug 2015 - 2:18 pm | शब्दबम्बाळ

हिंदी चित्रपट प्रदर्शित देखील झाला आहे! अजय देवगण आहे त्यात...
चांगला आहे अस ऐकलय बर्याच जणांकडून...

सस्नेह's picture

9 Nov 2014 - 10:05 pm | सस्नेह

कथा चाहे कुठून ढापलेली असो, सादरीकरण जमून आले असेल तर बघायला अन कौतुकायला काही हरकत नसावी.

hitesh's picture

9 Nov 2014 - 10:44 pm | hitesh

यु ट्युबावर आहे का ? तेलगु तमिळ मल्याळ कnnaD सगळ्या भाषेत आहे. पण पुर्ण षिनेमा नाहि

यश राज's picture

10 Nov 2014 - 4:21 pm | यश राज

माहीत नाही पण टोरंट वर सापडायला हरकत नाही.

सिरुसेरि's picture

9 Nov 2014 - 10:54 pm | सिरुसेरि

याचा तामिळ रीमेक पापनासम या नावाने बनतो आहे . उलगनायगन / Universal Star or Hero कमलहासन हा मुख्य भुमिका करतो आहे . त्याचे विस्वरुपम २ आणि उत्तमा विलन असेही २ चित्रपट बनत आहेत . उत्तमा विलन मधिल भुमिके करीता त्याने प्राचिन थिय्याम या युद्ध /नर्तन कलेचा अभ्यास केला आहे . बाकी मोहनलालचा हिज हायनेस अब्दुल्ला हा चित्रपट सुद्धा मस्त आहे .

मंदार कात्रे's picture

10 Nov 2014 - 7:52 am | मंदार कात्रे

मला वाटते केकता कपुर पेक्षा प्रियदर्शन हा रिमेक अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल ...

द्रिष्यम डावुनलोडवत आहे...

(प्रियदर्शन फॅन)

मदनबाण's picture

10 Nov 2014 - 9:48 am | मदनबाण

पहावयास हवा ! :)
त्याचे विस्वरुपम २ आणि उत्तमा विलन असेही २ चित्रपट बनत आहेत .
अरे देवा ! विस्वरुपम १ थोडा पाहिला होता { पूर्णपणे पाहणे माझ्या मानसिक सहनशक्तीच्या पलिकडे होते.} त्यातच मेंदुला झिडझिण्या आल्या होत्या ! आता २ येतो आहे,म्हणजे सगळा आनंदच आहे ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }

सिरुसेरि's picture

10 Nov 2014 - 12:10 pm | सिरुसेरि

पुष्पक , सदमा , अप्पु राजा , हिन्दुस्तानी या चित्रपटांतला आणि त्या काळातला कमल हासन आता राहीला नाही . नवनवीन प्रयोग करण्याच्या नादात काही चांगल्या themes ची तो वाट लावुन टाकतो . हिंदी आणि मराठी मध्ये तरी वेगळे काय चालू आहे ? नुस्ता धुमाकुळ आणि फालतु item songs ..

सुहास झेले's picture

10 Nov 2014 - 5:47 pm | सुहास झेले

आवडला मला ... मी ह्याच सिनेमाचे परीक्षण लिहून ठेवले होते खूप दिवसांपासून ड्राफ्टमध्ये... :)

कपिलमुनी's picture

10 Nov 2014 - 6:42 pm | कपिलमुनी

सध्याच्या राजकारण्याच्या राड्यात तेवढाच विरंगुळा

सुधीर's picture

11 Aug 2015 - 11:52 am | सुधीर

येउ द्या लवकर.

मागच्याच आठवड्यात हिंदी दृश्यम पाहिला. प्रचंड आवडला. मूळ मल्याळम सिनेमा नाही पहिला. जालावर फुकट उपलब्ध नाही आहे. पण एक गाणं सापडलं हिंदी रिमेक मध्ये जशास तसे चित्रिकरण झाले आहे.

मोहनलालच्या मानाने अजय देवगण अभिनयात थोडा कमी पडला असावा. पण ती कसर तबू (मीरा देशमुख) आणि कमलेश सावंत (गायतोंडे) ने भरून काढली आहे. तबू ने उभी केलेली मीरा देशमुख प्रचंड आवडली. काही ठिकाणी अगदी दाद देण्यासारखा अभिनय वाटला. अगदी 'वज्रादपि कठोराणी मृदुनिकुसुमादपि' छाप! बालकलाकार मृणाल जाधव आणि रजत कपूरनेही चोख भूमिका केल्यात. पण सगळ्यात बेश्ट जितू जोसेफच भारी कथानक. त्याला तोड नाही. चित्रपट कुठल्याही भाषेत, कुठल्याही कलाकारांबरोबर केला तरी खिळवून ठेवणारा आहे.

परिक्षण येऊद्या लवकर.

प्रभाकर पेठकर's picture

11 Aug 2015 - 3:53 pm | प्रभाकर पेठकर

हिन्दी दृश्यम दोनदा पाहिला. अप्रतिम आहे.
IGच्या भूमिकेत तब्बू नाही आवडली एव्हढी. बाकी प्रतिसादाशी सहमत. कमलेश सावंतने ('लक्ष्य' मधला मारूती) त्याच्या वाट्याला आलेली भूमिका शब्दशः तो जगला आहे. त्याला हिन्दी चित्रपटात उज्वल भवितव्य खुणावते आहे.
अजय देवगणनेही ('सिंघम' नंतर) पूर्णतः वेगळीच, अभिनयाचा कस लावणारी, भूमिका फार समर्थपणे पेलून तो नुसताच 'स्टार' नसून 'अभिनेता' ही आहे हे सिद्ध केले आहे.

दोन्ही मुलींनी खुप उच्च अभिनय केला आहे. त्यांच्या कौतुकासाठीही दोन शब्द खर्च करणे अनाठायी ठरणार नाही. असो.

सर्वांग सुंदर चित्रपट.

IG, संपूर्ण प्रकरणाची चौकशी खासगीत का करते कळत नाही. बाकी अजून एकदोन विसंगती आहेत पण दूर्लक्ष करण्याजोग्याच आहेत. असो.

सुहास झेले's picture

11 Aug 2015 - 6:10 pm | सुहास झेले

हिंदी दृश्यम बघितला इतका आवडला नाही... मोहनलाल आणि जितु जोसेफचा दृश्यम बघितल्याने तसे झाले असेल. मोहनलालच्या सिनेमाची ditto कॉपी आहे.. अगदी कॅमेराफ्रेम्स सुद्धा. त्यामुळे निशिकांतला जास्त स्कोप उरला नाही..मात्र अजय आणि तब्बूने त्यांना दिलेलं काम चोख केले आहे... :)

नाखु's picture

12 Aug 2015 - 3:33 pm | नाखु

कमल हासनने ही केला आहे काय?

कपिलमुनी's picture

12 Aug 2015 - 5:20 pm | कपिलमुनी

बहुतेक पापनाशम असा नाव होता

सुहास झेले's picture

12 Aug 2015 - 11:40 pm | सुहास झेले

हो बरोबर... तोच !!

द-बाहुबली's picture

1 Sep 2015 - 4:13 pm | द-बाहुबली

IG, संपूर्ण प्रकरणाची चौकशी खासगीत का करते कळत नाही.

बेकॉज फॉर हर इट इज ऑल पर्सनल... नॉट बिजनस.

कपिलमुनी's picture

11 Nov 2014 - 12:33 pm | कपिलमुनी

काल डाउनलोड केला .
केरळाचा वातावरण , पाउस अप्रतिम छायाचित्रण हा चित्रपटाचा प्लस पाँईट आहे.
कथा खिळवून ठेवते.

इतर भाषेमधील आवर्जून बघावे अशा चित्रपटांची यादी तयार केली पाहिजे

चित्रपट परिक्षण आहे काय?
आधी फक्त ढिशुम ढिशुम नाव वाटल.
काय तरी मारामारी असेल म्हणुन धागा उगडलाच नाही.

याची एचक्यु प्रींट अव्हेलेबल असेल तर कृपया व्यनी करणे... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुझे जीवन की डोर से बाँध लिया है... :- Asli Naqli

कविता१९७८'s picture

11 Aug 2015 - 2:17 pm | कविता१९७८

सावधान ईंडीया मधे ही अशी स्टोरी आली होती.

मोहनराव's picture

11 Aug 2015 - 6:13 pm | मोहनराव

हिंदी सिनेमा काल पाहिला. कमालीचा आवडला.

वय पंध्राच्या आतील मुलांना घेऊन पाहण्यासारखा शिनेमा आहे का?

कपिलमुनी's picture

11 Aug 2015 - 11:24 pm | कपिलमुनी

हरकत नाही

प्रभाकर पेठकर's picture

12 Aug 2015 - 2:55 am | प्रभाकर पेठकर

मी पाहिला तेंव्हा, एक बाप आपल्या ४ वर्षाच्या मुलाबरोबर आला होता. मध्यंतरात तो मुलगा (वय वर्षे चार, बरं का!) आपल्या वडिलांना सांगत होता, 'पपा, मला नं तो सिंघम (अजय देवगण) ती पिवळी गाडी पाण्यात ढकलतो नं, ते खुप आवडलं.' एव्हढ्या लहान वयात त्या मुलाला आपल्याला काय आवडलंय ते स्वच्छ शब्दात सांगता येत होतं ह्याचं मला भारी कौतुक वाटलं.

होबासराव's picture

12 Aug 2015 - 5:35 pm | होबासराव

काका मी नोटीस केलय कि बरेच लहान मुल अजय देवगण ल सिंघम म्हणुनच ओळखतात.

दा विन्ची's picture

12 Aug 2015 - 12:02 am | दा विन्ची

हिंदी दृश्यम पहिला आणि आवडला. कुणाला हवा असेल तर गुगल drive वर शेअर करू शकेन. जी मेल आय डी व्य नि मधून कळवावा. प्रिंट चांगली पण आवाज थोडा कमी आहे

दा विन्ची's picture

12 Aug 2015 - 12:10 am | दा विन्ची

हिंदी दृश्यम पहिला आणि आवडला. कुणाला हवा असेल तर गुगल drive वर शेअर करू शकेन. जी मेल आय डी व्य नि मधून कळवावा. प्रिंट चांगली पण आवाज थोडा कमी आहे

पिक्चर आवडला. देवगण अन कमलेश मापात अ‍ॅ़क्टिंग केलेत. तब्बूबाई ठिकठाक. रजतकपूर आन श्रीया सरन पण ओकेटोके.
मूळ कथा भारी असलेने आवडला. :)

ओक्के, कपिलमुनी व पेठकरकाका.

आशु जोग's picture

1 Sep 2015 - 3:10 pm | आशु जोग

कुणीतरी आपला विडीयो बनवला म्हणून, त्याने बोलावलेल्या वेळेला, बोलावलेल्या ठिकाणी आपण जावे का

कुणीतरी आपला विडीयो बनवला म्हणून आपण त्याचा खून करावा का...

खून करण्याची आपली कृती योग्यच होती असा विश्वास असेल तर आपण इतके घाबरून जावे का...

१४, १५ वर्षाच्या मुलीचा विडीयो बनवला म्हणून ती गोंधळून जाईल हे शक्य आहे पण
तिच्या आईने भांबावून जाणे योग्य आहे का...

या जगात लोक नको तिथे सीसी टिव्ही कॅमेरे लावणार, विडीयो बनवणार आणि त्यानंतर आपल्याला ब्लॅकमेलसुद्धा करण्याचा प्रयत्न करणार. पण आपण ब्लॅकमेल व्हायचे का...

चित्रगुप्त's picture

1 Sep 2015 - 4:36 pm | चित्रगुप्त

हिंदी दृश्यम बघितला. सुरुवातीची पंधरा-वीस मिनिटे कंटाळवाणा वाटला, विशेषतः घुटता है दम दम दम दम दम दम दम दम दम दम.... हे अनाठायी गाणे ऐकण्यात दम घुटला. नंतरचा पूर्ण सिनेमा मात्र आवडला. तेलगु बघायला हवा.

.
.

कपिलमुनी's picture

1 Sep 2015 - 5:51 pm | कपिलमुनी

drishyam