डोब्रा - भाग २

खटपट्या's picture
खटपट्या in जनातलं, मनातलं
2 Nov 2014 - 3:12 am

डोब्रा - भाग १

तो बाहेर गेलाय हे बघितल्यावर डॉक्टर सरपटत रूम सर्विसच्या बटणापर्यंत कसेतरी पोहोचले आणि त्यांनी रूम सर्विसचे बटण दाबले.

-------------------------------------------------------------------------------------------

रूम सर्विस चे बटन दाबताच दोन ते तीन मिनिटात रूम सर्विसचा माणूस आला. समोरील दृश्य पाहताच तो प्रचंड घाबरला. ताबडतोब मागे फिरून त्याने व्यवस्थापनाला घटनेची खबर दिली. हॉटेल व्यवस्थापनेचे लोकही झाला प्रकार पाहून स्तंभित झाले. त्यांनी लगेच हे प्रकरण स्थानिक पोलिसांना कळवले. चौकशी सुरु झाली. झाला प्रकार पोलिसांच्या कानावर घालून डॉक्टरांना अजून धोका पत्करायचा नव्हता. कारण यामुळे पोलिस जॉनच्या मागे लागले असते. व सर्वच डोब्रा सावध झाले असते. डॉक्टरांनी अज्ञात इसम येउन माझ्यावर हल्ला करून गेला असे सांगून वेळ मारून नेली. पोलिस पुढील तपासासाठी निघून गेले.

डॉक्टरांना अत्यंत सावध पावले उचलायची होती. जॉनच्या प्रात्यक्षिकाने हे सिद्ध झाले होते कि जगात डोब्रा जमात आहे. आता फक्त एखाद्या डोब्राला विश्वासात घेऊन त्यांना पुढील अभ्यास करायचा होता. त्या साठी ते कोणतीही किंमत मोजायला तयार होते. कोणत्याही थराला जायला तयार होते. डॉक्टरांनी पुढील पाच सहा दिवसात हॉटेलमध्ये जॉनबद्दल चौकशी केली. पण जॉन ती घटना घडल्यापासून कामावर आला नव्हता. जास्त चौकशी करणेसुद्धा धोकादायक होते कारण डॉक्टरांबद्दल संशयाचे वातावरण तयार झाले असते.

डॉक्टरांनी निर्णय घेताला व त्यांनी हॉटेल सोडले. बहुतेक जॉन हे शहर सोडून डॉक्टरांच्या हातून निसटला होता. डॉक्टरांनी आणखी खोलवर जायचे ठरवले. नायजेरियातील अजून आतील भागात त्यांनी हॉटेल शोधून डेरा टाकला. आता तर डॉक्टर प्रत्येक येणार्‍या जाणाऱ्यावर नजर ठेवू लागले.

एक दिवस हॉटेल मध्ये फिरत असताना त्यांना मार्था दिसली. दिसायला सुंदर आणि विशिष्ट केशभूषा. मार्था फ़ैसिलिटी मैनेजमेंट विभागात मैनेजर होती. कधी कधी ती काउण्टरवर देखील दिसत असे. डॉक्टरांनी काउण्टरवर तिची जुजबी ओळख करून घेतली व इकडतिकडच्या गप्पा मारून काही घडलच नाही असे दाखवून आपल्या रूमवर आले. मार्थाने विशिष्ठ केशभूशेमुळे आपले कपाळ बेमालूमपणे झाकले होते हे डॉक्टरांच्या लक्षात आले होते. ती डोब्रा असावी का? असूही शकते. पण डॉक्टरांना यावेळी कोणताही धोका पत्करायचा नव्हता. मार्थाला थोडा जरी संशय आला असता तर ती निसटण्याची शक्यता अधिक होती.

डॉक्टर आता काउण्टरसमोरच्या लॉबीमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवू लागले. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते मार्थाकडे बघून ओळखीचे हसू लागले. १०/१२ दिवस असेच गेल्यावर एक दिवस धीर करून डॉक्टरांनी मार्थाला हाक मारली.
"हाय मार्था"
"हेलो डॉक"
"हाऊ आर यु मार्था?"
"आय एम फाईन. हाऊ अबाउट यु?"
"आय एम फाईन मार्था. मी या भागात नवीन आहे. माझा इकडची काही प्रेक्षणीय स्थळे पहाण्याचा विचार आहे. याबद्दल तू मला काही मदत करू शकशील का?"
"अम्म्म…. नक्की काय मदत हवी आहे तुम्हाला?"
"म्हणजे हेच कि, अशी कोणती प्रेक्षणीय स्थळे आहेत? त्या ठिकाणी नेमके कोणत्या वेळी जावे? कसे जावे? किती खर्च येईल वगैरे."
"ओह, याबद्द्ल आम्ही एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. ती मी तुम्हाला देऊन शकते."
"ओके दैट्स नाइस. पण एखादा गाईड मिळाला असता तर… "
"गाईड ची व्यवस्था तर मी नाही करू शकत सर सॉरी"
"नो प्रोब्लेम, इफ यु डोन्ट माइण्ड, तुही माझ्याबरोबर गाईड म्हणून येऊ शकतेस"
"सॉरी सर पण मी इथली सर्व कामे बघून नाही येऊ शकणार"
"नो प्रोब्लेम, तुला जेव्हा सुटी असेल तेव्हा सांग, मला घाई नाहीये. तू विचार करून सांग मला ओके?"
"ओके सर"

डॉक्टरांनी खडा तर टाकला होता. मार्था काय विचार करत असेल याचा ते विचार करत होते. आपण जास्त मागे लागतोय असे वाटू नये म्हणून डॉक्टरांनी तिला दोन तीन दिवस भेटायचे टाळले. दोन तीन दिवसांनी डॉक्टर स्वत:हून तिला सामोरे गेले.
"हाय मार्था"
"हाय डॉक"
"तुला वाटतंय कि तू माझ्यासाठी वेळ काढू शकशील?"
"अम्म्म्म, मी प्रयत्न करतेय. मी सांगते तुम्हाला"
"ओके, तू खर्चाची काळजी करू नकोस. आणी तुझी फी किती आहे ते सुद्धा सांग"
"नक्की डॉक"

परत डॉक्टरांनी दोन तीन दिवस दडी मारली. आणि एक दिवस डॉक्टरांना मार्थाचा फोन आला. "डॉक. मी माझ्या सुट्या मैनेज करून तुमच्यासाठी एक दिवस काढला आहे"
"ओके दैट्स नाइस. कुठे जायचे आपण पहिल्यांदा?"
"इथे जवळच पुराणकालीन गुहा आहेत. त्यात सुंदर चित्र चितारली आहेत. तुम्हाला आवडेल ती जागा"
"ओह, खूप छान"
"ठीक आहे. मी शानिवारसाठी गाडी बुक केली आहे. आपण सकाळी ७ वाजता निघूया. जमेल ना तुम्हाला?"
"हो जमेल"
"ठीक आहे. मी शनिवारी सकाळी तुम्हाला फोन करते."
"ओके, धन्यवाद"

डॉक्टरांना कधी एकदा शनिवार उजाडतो असे झाले होते. शनिवार उजाडला, डॉक्टर भल्या पहाते उठून ७ वाजता तयार होऊन बसले. बरोबर ७ वाजता मार्थाचा फोन आला.
"हेलो डॉक"
"हेलो मार्था"
"आर यु रेडी?"
"यस, लेट्स गो"
लगेच डॉक्टर लॉबीसमोरच्या पोर्चमध्ये आले. पोर्चमध्ये येताच त्यांना समोर एक एसयुव्ही उभी असलेली दिसली. आणि ती गाडी स्वत: मार्था चालवत होती. मार्थाने आज गुलाबी रंगाचा ती शर्ट आणि निळी जीन्स परिधान केली होती ज्यात ती अतिशय मनमोहक दिसत होती. डॉक्टर नेहमी मार्थाला हॉटेलच्या पोशाखात पहात असत. पण आजचं मार्थाचं रूप त्यांच्यासाठी नवीन होतं. एखाद्या प्रियकराला भेटायला याव अशा तयारीने मार्था आली होती. डॉक्टरांनी जेव्हा कारचा दरवाजा उघडला तेव्हा मार्था म्हणाली,
"हाय डॉक, काम इन प्लीज, लेट्स गो"
डॉक्टर थोडे लाजले आणि संकोचले. मार्था सराईत ड्रायव्हर सारखी गाडी चालवू लागली. शेवटी न राहावून डॉक्टर मार्थाला म्हणाले,
"मार्था, तू आज खूप सुंदर दिसतेयस"
"ओह, थैंक्स"
"मार्था, इफ यु डोन्ट माइंड, एक विचारू?"
"हो बोला ना"
"तुझं लग्न झालंय?"
मार्था हसून म्हणाली, "काय वाटतं तुम्हाला?"
"माझ्या मते झालं नसावं"
"अम्म्म… माझं लग्न झालं होतं पण ते जास्त दिवस टिकलं नाही. एकाच महिन्यात आम्ही वेगळे झालो. आता मी सिंगल आहे"
"ओह" डॉक्टर मनातून थोडं सुखावले.
"व्हॉट अबोउट यु डॉक?"
"अगं, माझं या रिसर्चच्या भानगडीत लग्न करायचं राहून गेलं."
"ओके" मार्था गालातल्या गालात हसली.

गप्पा मारता मारता त्यांची गाडी ठरलेल्या स्थळी आली डॉक्टर आणि मार्था दोघेही त्या प्राचीन गुहा बघण्यात मग्न झाले. त्या गुहा म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कार होता. मार्था तिच्याकडे असलेली माहीति डॉक्टरांना सांगत होती. डॉक्टरहि तल्लीन होऊन गुहेतील चित्रांकडे आणि मार्थाकडे पहात होते. दुपारी त्यांनी जवळच असलेल्या उपहार गृहात जेवण आटोपले. त्यानंतर डॉक्टरांनी गुहेतील चित्रे आपल्या कैमेरात बंदिस्त करायला सुरवात केली. काही चित्रांबरोबर त्यांनी मार्थाचेही फोटो काढले जे त्यांना पुढील संशोधनासाठी उपयोगी पडणार होते. मार्थानेही त्यांचे काही फोटो काढले. ते दोघे असे फोटो काढत असताना एका पर्यटकाने त्यांना विचारले, "मी तुम्हाला मदत करू शकतो का? तुमचा दोघांचा एकत्र फोटो काढायचा असल्यास."
डॉक्टर म्हणाले, "हो प्लीज"
त्या पर्यटकाने दोघांचे फोटो काढले आणि कैमेरा डॉक्टरांकडे परत देताना म्हणाला, "नाइस कपल"
त्याची हि प्रतिक्रिया ऐकून डॉक्टर आणि मार्था दोघेही संकोचले आणि थोडावेळ एकमेकांशी काहीही न बोलता चालत राहिले. डॉक्टरांचे मार्थाकडे बारीक लक्ष होते. त्यांना आपल्या मनात काय चालले आहे याचा तिला अजिबात सुगावा लागू द्यायचा नव्हता. दिवसभराच्या निरीक्षणावरून ती "डोब्रा" आहे याबद्दल डॉक्टरांची खात्री पटली होती. पण आता विषय कसा काढायचा या चिंतेत ते होते. परतीच्या प्रवासात डॉक्टर मार्थाला म्हणाले.
"मार्था, मी तुझा खूप आभारी आहे. तू एवढे सुंदर स्थळ मला दाखवलेस."
"नो प्रोब्लेम डॉक. मी सुद्धा तुमची सोबत एन्जोय केली."
"ओके मार्था, मग आता पुढची तरीप कुठे?"
"माझ्या मनात एक दोन ठिकाणं आहेत पण मी माझ्या रजा वगैरे पाहून ठरवते आणि तुम्हाला सांगते।"
"हो नक्की सांग. मला घाई नाहीये. तुला उद्या पण सुटी असेल ना?"
"हो, का?"
"नाही असेच. संध्याकाळी कुठेतरी कॉफी प्यायला भेटलो असतो."
"अम्म्म, उद्याचा दिवस मी थोडी बीजी आहे. पण रात्री जेवणासाठी आपण भेटू शकू. नाहीतर असं कराना, तुम्ही माझ्या घरी रात्री जेवायला या. तुम्हाला काही प्रोब्लेम नसेल तर."
"ओह, नो प्रोब्लेम, मला नक्की यायला आवडेल."
"ठीक आहे उद्या मी दुपारपर्यंत कळवते"
"ओके" डॉक्टरांना जे हवं होतं तसंच होत होतं.

(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मार्थाचा फोटो मिस केला. *wink*
पुभाप्र

खटपट्या's picture

2 Nov 2014 - 6:53 am | खटपट्या

abcd

भारीच... मार्था प्रकरण वेगळंच वळण घेणार आहे असं दिसतंय. पु.भा.प्र.

बाकी, मार्था उर्फ Tyra Banks मस्तच दिसते आहे. ;)

बोका-ए-आझम's picture

2 Nov 2014 - 10:23 am | बोका-ए-आझम

Beyonce Knowles पण चालेल मार्था म्हणून!

मुक्त विहारि's picture

2 Nov 2014 - 12:28 pm | मुक्त विहारि

कथा रंग्त चालली आहे...

पुभाप्र

श्रीरंग_जोशी's picture

2 Nov 2014 - 11:06 pm | श्रीरंग_जोशी

दोन्ही भाग एकाच बैठकीत वाचले. कथा एकदम रोचक आहे.

पुभाप्र.

स्पंदना's picture

3 Nov 2014 - 4:12 am | स्पंदना

वाचते आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

3 Nov 2014 - 11:39 am | लॉरी टांगटूंगकर

वाचतोय, पु.भा.ल.टा

सौंदाळा's picture

3 Nov 2014 - 12:16 pm | सौंदाळा

थरारक. रहस्य, प्रेम, भय असा वेगळाच परिणाम करतेय कथा.
मस्त लिहिले आहे.
पुभाप्र

नाखु's picture

4 Nov 2014 - 9:26 am | नाखु

कथा "खटपट" छान.
पुभाप्र.

प्रसाद१९७१'s picture

4 Nov 2014 - 1:29 pm | प्रसाद१९७१

पहीला भाग जेव्हडा अभ्यास पूर्ण वाटला होता त्या मानानी हा फारच पाणी घालून वाढवल्यासारखा वाटला.
अभ्यासु आणि वैचारिक लिहुन सुद्धा ते वाचनीय होऊ शकते हे भारतीय लोकांना पटतच नाही का?

पाणी घालुन वाढवल्यामुळे चांगल्या चविच्या आमटीची मजा जाते.

असे माझे मत.

खटपट्या's picture

5 Nov 2014 - 1:00 am | खटपट्या

ओके, काळजी घेतो पुढ्च्या वेळेला !!

छान चाललीये कथा..पुभाप्र