तुझी सोबत.......

माझं आभाळ's picture
माझं आभाळ in जे न देखे रवी...
31 Oct 2014 - 1:44 pm

तुझी सोबत.......
भुरभुरणाऱ्या पावसाच्या श्रावण सरीसारखी
क्षणात सोबत तर क्षणात कुठतरी गुडूप होणारी , हुरहूर लावणारी ,
हिरमुसले गेले कि अचानक बरसणारी ,
माझ्या मनी अन अंगणी ताल धरणारी पावसाची सरच ती ,
सर जुनं विसरून नव्याने जगायला शिकवणारी , कोवळ्या फुटलेल्या पालवी सारखी,

तुझी सोबत.......
आठवण पक्ष्यांचा नाच बनून राहिलेली , दूरवर कुठंतरी आभाळात रांगोळी सांडलेली .
माझ्या ओंजळभर स्वप्नाचं चांदणं बनून राहिलेली,
आठवणीतच गुंतलेली अन आठवणीतच उसवलेली

तुझी सोबत.......
भावनांचा हीशोब मांडणारी शब्दहीन कवितेची ओळ जशी ,
आभाळभर साठून हि बरसणं विसरलेली सर जशी.

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

31 Oct 2014 - 2:20 pm | विजुभाऊ

सुंदर कविता आहे.
एक सूचना

तुझी सोबत.......
आठवण पक्षांचा नाच बनून राहिलेली ,

या इथे पक्षांचा या ऐवजी पक्ष्यांचा असे हवे होते.
तुम्ही हा शब्द "पक्षी" या शब्दाची अनेक वचन म्हणूनच वापरलाय . "राजकीय पक्ष" यातील पक्षाचे अनेकवचन या अर्थाने खचितच वापरलेला नसावा अशी अपेक्षा आहे.

माझं आभाळ's picture

31 Oct 2014 - 2:46 pm | माझं आभाळ

धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल,पुढल्या वेळी काळजी घेईन नक्कीच.

एस's picture

31 Oct 2014 - 2:32 pm | एस

नेहमीच्या गुळगुळीत उपमा-रूपकांपेक्षा थोडे वेगळे काही करण्याचा प्रयत्न करा.

पुलेशु.

माझं आभाळ's picture

1 Nov 2014 - 10:45 am | माझं आभाळ

नक्कीच

वेल्लाभट's picture

31 Oct 2014 - 2:53 pm | वेल्लाभट

गुड वन !

माझं आभाळ's picture

1 Nov 2014 - 10:50 am | माझं आभाळ

:)

मदनबाण's picture

31 Oct 2014 - 5:00 pm | मदनबाण

छान...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो की

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2014 - 5:21 pm | अत्रुप्त आत्मा

आहाहाहाहाहाहा!!!!!!!!!!!!!!!!!!

शब्द नि शब्द ..नुसता स्पर्श करत करत जातोय मनाला!
सुखावह...अल्हाददायक. :)

माझं आभाळ's picture

1 Nov 2014 - 10:49 am | माझं आभाळ

धन्यवाद :)

माझं आभाळ's picture

1 Nov 2014 - 11:00 am | माझं आभाळ

मिपा वापरताना थोडा गोंधळ उडतोय, एकदा दिलेला प्रतिसाद तीन तीनदा का दिसत आहे आणि देलेली प्रतिक्रिया काढून टाकण्याची काही सोय आहे का ?

चुकलामाकला's picture

7 Nov 2014 - 8:14 am | चुकलामाकला

क्या बात!

गणेशा's picture

13 Nov 2014 - 1:28 pm | गणेशा

सुंदर