कंदील कळकट ..जीवनावरील महाभाष्य
कवीवर्य समीरसूर यांच्या या महान कवितेवर लिहावयाचे भाग्य मला लाभले, धन्य, धन्य झालो मी ! ज्यांचे नावच इतके काव्यमय, त्यांचे काव्य महान असणारच. समीरसूर म्हणजे वेळूच्या बनातून वारा वहातो तेव्हा येणारा मधूर आवाज, वाह वाह. वेळू हा शब्द वेणूपासून आला असे म्हटले म्हणजे यमुनाकाठच्या कुंजवनातील बासरीचे मधुर स्वर व त्यावर जीव ओवाळणार्या गोजिर्या गोपी आठवतात. पण आपले समीरसूर हे नवयुगाचे एकांडे शिलेदार ( पहा प्रसिद्ध टीकाकार विष्णुसुत {म्हणजे मीच} यांचे लेख) असल्याने त्यांनी स्वप्नरंजनात गुंतून न जाता आजच्या भीषण वास्तव्यावर महाभाष्य करणारी ही युगप्रवर्तक कविता लिहली.
जालावरील एका लोकप्रिय स्थळावरच्या अभ्यासू, रसिक टीकाकारांच्या लेखावरून असे दिसते की कोणतीही कविता समजावून घ्यावयाची असेल, कवितेतील सौंदर्यस्थळे, बारकावे, अलंकार, इ. कळावयास पाहिजे असतील तर प्रथम कोणा प्रथितयश, लोकप्रिय संगीतकाराने संगीत देऊन, स्वत गायलेले गाणे ऐकले पाहिजे. एकदा गाण्यातला गोडवा, समयोचित आलाप व ताना, मींड. pauses, (अधुनमधुन इंग्रजी शब्द वापरले की बरे असते, काय ? तुमचा अभ्यास दिसतो) वाद्यांचा उपयोग वगैरे गोष्टी कळल्या की कविता "कळलीच". काय उरले ? तेव्हा आपण प्रथम "गाणे" ऐका. खरभास्कर गुंडोबुवा हल्लकल्लोळकर यांनी अडाणी (अडाणा रागाची रागिणी) मध्ये आडव्यातिडव्या तालात (हा त्यांचा एक बेताल ताल आहे) गायलेले हे गाणे. गुंडोबुवा हल्लकल्लोळकर. प्रत्येक "ट" वर तारसप्तकातून तिय्या घेत कसे येऊन आदळतात हे ऐकले की सगळे श्रोते सफाचा"ट" होतात.
: : गाणे इथे ऐका. xxxxxxxxx
काय म्हणता लिन्क उघडत नाही ? नशिब तुमचे. आपण कवितेकडेच वळू.
कंदील कळकट, अनारसे तुपकट
कढई ओशट, चालला तांडा !
सदरा मातकट, कढी आंबट
नेहमीची कटकट, विटका झेंडा !!
अहाहा, किती अर्थगर्भ ! सामान्य लोकांना कळले नाही तर तो त्यांचा दोष. त्यांना (काही तरी) कळावे या करिता तर आम्ही टीकाकार.
प्रथम लक्षात घ्या मानवाच्या नि:सार जीवनावर, शोकांतिकेवर ही सूत्रमय रचना आहे. "चालला तांडा" यातून कवी तुम्हाला इशारा करतो " जीवन सगळ्यांनी मिळून जगायाचे आहे. एकटा माणुस इथे निरर्थक आहे, हतबल आहे .तांडा वाळवंटातून जातो, तसे तुमच्या सभोवती निर्जल, ओसाड जग आहे. प्रवास रात्रीचाच करावयाचा, आजूबाजूच्या तिमीरातून वाट काढावयास बरोबर काय तर कंदील. पण तोही कळकट, या जगात तुम्हाला सामना करावयाचा आहे पण हत्यार मात्र बोथटच ( इथेही "ट" आला की नाही ? समीक्षा कशी कवितेला लगटून पाहिजे.) ह्या कळकट कंदीलातून प्रकाश तो काय पडणार ? असहाय्य माणुस किती लढणार ? तरीही या अर्थहीन जगण्यामध्येही अधुनमधुन काही तरी आमिष दाखविले जाते. फुटकळ देणग्या मोठ्या उदारपणाने दिल्या असे दाखविले जाते. व हा तुपकट अनारसा ज्या झॊळीत पडतो त्या फाटक्या झोळीला म्हटले आहे ओशट कढई. ओशट विशेषण कढईचा जुनाटपणा, अस्वच्छता, दुर्लक्षितपणा दाखवते. जीवनात थोडे तरी चमचमीत मिळावे असे सामान्यालाही वाटत असते पण अशी कढीही आंबट निघते. तोंडाला चव येण्याऐवजी जुन्या, आंबट ताकाचीच चव रेंगाळत रहाते. अन्न-वस्त्र-निवारा पैकी अन्नाची ही गत, तांडा चालतच रहाणार म्हणजे निवारा नाहीच व वस्त्राबद्दल एका शब्दात निकाल लावला आहे, सदरा मातकट. मलीन जीवनात दुसरे काय मिळणार ? निर्मल पाणी पिण्यास मिळणे जेथे दु:प्राप्य तेथे वसन धुण्यास कोठून मिळणार ?या अनादी अनंत क्लेषांना म्हटले आहे नेहमीची कटकट
इतक्या नकोनकोसे करणार्या जीवनाला माणुस कंटाळत का नाही ? तांडा पुढे पुढे का चालला आहे ? या अतूट संघर्षात विटका झालेला झेंडा तो अजून का फडफडवीत आहे ? हा विटका रंग विटकरी आहे. भगव्यात लाल मिळवलेला. भगवा रंग नैराश्याचा असला तरी माणसाने त्यात आपल्या विजिगीषु आकांक्षेचा लाल रंग मिसळला आहे. "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा " असे म्हणत तो वाळवंटात पुढचे पाऊल टाकतच आहे.
कवितेला जीवनावरील महाभाष्य म्हटले आहे कारण नवयुगाची ही ध्वजयात्रा (Flagmarch) समीरसूरांनी नेटक्या शब्दात मांडली आहे. नवकाव्यात न आढळणारा अनुप्रास हा अलंकार येथे मन वेधून घेतो. आज "सत्यकथा" नाही पण असती तर राम पटवर्धनांनी या कवितेला जागा व दाद दिली असती. जिते रहो ! लिखते रहो !
शरद
प्रतिक्रिया
15 Oct 2014 - 5:13 pm | स्पा
ख्या ख्या
15 Oct 2014 - 5:43 pm | प्यारे१
ब्रूट्स, यू टू???
15 Oct 2014 - 5:56 pm | पैसा
:D
15 Oct 2014 - 6:34 pm | सतिश गावडे
येड लागले येड लागले या लोकांसी येड लागले... या जनांसी येड लागले...
15 Oct 2014 - 7:01 pm | कवितानागेश
आहाहा!!
वाचनखूण साठवली आहे.
( वात्रटपणाचा एखादा व्हायरस फिरतोय की काय सध्या? :) )
15 Oct 2014 - 8:12 pm | प्रकाश घाटपांडे
मस्तच! पं शरदबुवांच्या ठेवणीतील खास चीज!
15 Oct 2014 - 9:07 pm | रामपुरी
एकही मारा पर क्या सॉलिड मारा
15 Oct 2014 - 9:18 pm | तिमा
एकही मारा पर क्या सॉलिड मारा
बुवांनी मारली ऐशी तान की
श्रोते ओरडले
बुवा, ऐसी ना मारो!
15 Oct 2014 - 10:14 pm | स्वप्नज
'शीत'युद्धांमुळे वातावरण चांगलेच 'तापलेय'....रोज नवीन मित्रराष्ट्रे येताहेत..... तिसर्या महायुद्धाची नांदी तर नव्हे ना ही.....
15 Oct 2014 - 10:56 pm | संजय क्षीरसागर
त्या खुद्द समीरसूरचा तिथला हा प्रतिसाद वाचण्याजोगा आहे
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
याला म्हणतात दिलदारी!
अर्थात, तिथला प्रतिसाद (बहुदा सोईस्करपणे) वाचला नसेल, त्यामुळे डोलारा साफ कोसळलायं (हे वेगळं लिहायची गरज नाही)
16 Oct 2014 - 12:21 am | अत्रुप्त आत्मा
@डोलारा साफ कोसळलायं>>> ज्ज़े बात!!! :-D
16 Oct 2014 - 12:47 am | भृशुंडी
चालू द्या जाहिराती चालू द्या..
16 Oct 2014 - 9:47 am | पैसा
लिहीत रहा!
16 Oct 2014 - 5:04 am | स्पंदना
राहू दे शरद सर!!
टाळा अन जीभ यात अंतरच नसेल तर काय अपेक्षा करणार तुम्ही. मी स्वतः कधीही आंधळी पूजा मांडत नाही याचा अनुभव आहे तुम्हाला, कोणतीही गोष्ट व्यक्तीसापेक्ष नसते यावर माझा गाढ विश्वास आहे. त्यामुळे जर चांगल लिहीलं असेल तर दाद नक्कीच निघुन जाते, अन ती देताना मी कधीच या माणसाने मला दुखावले होते, वा जनामनात याची अशी ख्याती आहे, याचा विचार करत नाही.
जोवर कोणालाही टारगेट न करता लिखाण केलं जातं तोवर त्याला काही क्वालीटी उरते, जो काही विचार मनात उमटतो, तो स्वच्छ, आपला स्वतःचा असतो. कोणाच्या तरी तिरस्काराचं ग्रहण लागलेले लिखाण कस स्वच्छ असेल? कसा उतरेल त्यात मनातला भाव?
16 Oct 2014 - 4:29 pm | संजय क्षीरसागर
इथेच नाही तर माझ्या इतर पोस्टसवर सुद्धा.
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता हे रसग्रहण ग्रेसची बाजू मांडण्यासाठी लिहिलं होतं. स्कोर सेटलींग कसलं आलंय त्यात? त्यावर आलेल्या ६१ प्रतिसादांपैकी कमितकमी ३०/३५ तरी `कविता समजली आणि रसग्रहण आवडलं' असे आहेत. त्या बॅकग्राउंडवर हि पोस्ट म्हणजेच `स्कोर सेटलींगचा' (अर्थात, पूर्णपणे फसलेला) प्रयत्न आहे.
तुम्ही उगीच स्वतःची आणि इतरांची, माझ्याबद्दलची मतं कलुषित करता आहात. पुन्हा तुम्हाला तिच गोष्ट सांगतो, मला कुणाचीही काहीही खोडी काढण्यात कणमात्र रस नाही. माझं इथलं विविध विषयांवरचं आणि बहुरंगी लेखन आणि प्रतिसाद त्याची साक्ष आहेत. पण कुणी उगीच उद्योग केला तर मला उत्तर देणं भाग पडतं. तुम्ही स्वतःची आणि इतरांची दिशाभूल करत आहात.
16 Oct 2014 - 5:24 pm | पैसा
येऊ द्या अजून पुढचा भाग.
17 Oct 2014 - 11:20 pm | भृशुंडी
प्रत्येक ठिकाणी तोंड घालायलाच हवं का?
आवडलं नसेल तर नका वाचू, पुढे चला.
25 Oct 2014 - 4:14 pm | कवितानागेश
एकंदरीत विडम्बने आणि खोडकरपणा याबद्दल माझी मतं इतरत्र आहेतच. ती इथे उगाळत नाही.
@ संजय क्षीरसागर,
तुमच्याच आभ्यासासाठी हे देत आहे. त्यावर पुन्हा पुन्हा भांडायला यायची गरज नाही. शक्य असेल तर स्वतःच्या वागण्याचा एकदा सविस्तर विचार करा.
तुमच्याशी काही बोलण्यात अर्थ नाही हे माहितच आहे...
पण एकम्दरीत कान्गावखोरपणा जिथला तिथेच खोडला जावा यासाठी इथेच काही लिन्का देत आहे.
सरळ कवितेचं, आणि कथेचं केवळ स्वतःला समजत नाही, म्हणून तुम्हीच उगाचच क्षवैताग परीक्षण लिहिणं, हे http://www.misalpav.com/node/21377, http://www.misalpav.com/node/21341, http://www.misalpav.com/node/21861, इथे आहेच. ही फक्त छोटीशी उदाहरणे आहेत. सरळ चांगल्या परीक्षणावरती आपणच विनाकारण गोंधळ घालणं ही प्रक्रिया सदर सदस्याकडून इथे http://www.misalpav.com/node/24813 झालेली दिसेलच.शिवाय अनेक विडंबने स्वतःच उगीच कुणीही खोडी न काढता लिहिलेली दिसतीलच. काही इथे, http://www.misalpav.com/node/26136, http://www.misalpav.com/node/22325, http://www.misalpav.com/node/28156.
हे सगळं फार तर ५% झालं. पण इतका एमाराय पुरे! मी तुम्हाला घाब्रवणार नाही!!
पण तुम्हाला यावरुन काय ते कळत नसेल तर अजून अनेक प्रतिसादांच्या स्लाईद्स देउनतुमच्या वागणूकीचा डीटेल रीपोर्ट देता येइल
याशिवाय प्रत्येक धाग्यावर कुणाची ना कुणाचीतरी अक्कल काढून सरळ सदस्यांना उचकवण्याचा तुमचा उद्योग इथल्या सदस्यांना कळत नाही अशा भ्रमात तुम्ही राहू नये अशी सदिच्छा. त्यावर पुन्हा तुमची थट्टा केल्यावर तुम्हीच 'मला टार्गेट करतात हो...' असं ओरडत सुटता तेही हास्यास्पदच आहे. पण तरीही संस्थळावर सुव्यवस्था राखण्याचा एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी हा प्रतिसाद लिहित आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इथे जे सगळे सदस्य वाचक, लेखक, या नात्यानी येतात ते 'आपण मित्रांमध्ये जात आहोत' या आपलेपणाच्या भावनेनी येतात. त्यामुळे कुणामध्येही कितीही वैचारिक मतभेद असले तरी ते वाद तेवढ्यापुरतेच असतात. पण तुम्ही मात्र सदैव निर्बुद्ध लोकांना 'तुम्ही स्वत" कसे अत्यंत शहाणे आहात' हे पटवोन देण्यासाठी येत असल्यानी आपोआपच थट्टेचं कारण ठरता हे तुम्हाला समजत नसेल असं वाटत नाही.
तुमचं नावदेखिल न घेता लिहिलेल्या गोष्टी, तुमच्याबद्दलच आहेत हे कळण्याइतके आणि त्याबद्दल वर तक्रारही करण्याइतके तुम्ही हुशार असता, पण लोक उगीचच वाहव्वा करतायत, हे न कळण्याइतके निरागस होउन, ती वाहव्वा इतरांशी भांडण्यासाठी गंभीरपणे वापरण्याइतके हुशारही असता, हे मात्र काही केल्या कळत नाही!
सगळ्यात वाईट म्हणजे तुमची कुणीही खोडी काढलेली नसताना तुम्ही खुशी, कवित१९७८, मराठी कथालेखक आणि माहितगार यांना अतिशय वैयक्तिक पातळीवर विनाकारळ टार्गेट केल्याची अगदी ताजी उदाहरणं आहेत. (लिन्का जरा शोधून देते.)त्यात खुशीताईम्साठी तर तुम्ही अत्यंत माणुसकीहीन रितीनी 'खुदकुशी' हा शब्द वापरलात, जो नंतर संपादित केला गेला.
तरीही तुम्ही सातत्यानी या वरच्या प्रतिसादाप्रमाने जिथे तिथे कान्गावखोरपणा करत हिम्डत आहात, म्हणून हे लिहितेय. शिवाय तुम्ही कायम थट्टेचे निमित्त का होत आहात हेही तुमच्या लक्षात यावं ही अपेक्षा.
आता त्याहून महत्त्वाचं एक,...
केवळ एक सदस्य संस्थळाच्या मुक्त अभिव्यक्ती धोरणाचा गैरफायदा घेतोय, म्हणून एकंदरीतच मुस्कटदाबीचं धोरण निर्माण करणं हे मिसळपावच्या स्वभावाविरुद्ध आहे. म्हणूनच हे सर्व वाद सम्पादित न करता तसेच ठेवले जातात. (तरीदेखिल तुमच्या अनेक प्रतिक्रिया सतत सम्पादित करण्याची वेळ येते ही गोष्ट वेगळी.)
पण या मुक्त धोरणामुळे तुम्ही सतत भांडखोरपणा करणं बंद करुन 'आम्हा सर्वसामान्य सदस्यांचं मित्रत्त्वाचं अंगण' स्वच्छ ठेवण्यास हातभार लावलात, तर उपकार होतील, ही विनंतीवजा सूचना करण्यासाठी हे टम्कन्श्रम मी घेत आहे.
पुन्हा एकदा, यावर उत्तर लिहून पुन्हा डोकं खाउ नका. त्यापेक्षा विचार करा.
शिवाय हे सगळं काही संपादक आणि मालक वाचतच आहेत, तेंव्हा पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे तक्रारी घेउन जाण्यापेक्षा एकदा विचार करा.
15 Nov 2014 - 10:28 pm | प्यारे१
बाकी सगळं जौ दे, ह्या माऊचं शुद्धलेखन एवढं कसं बिघडलं ब्वा?
-संचित आपलं ते सचिंत प्यारे
16 Oct 2014 - 9:42 am | विटेकर
अश्लाघ्य वट्वट, वेळ जातो फुकट
मीपणाची झटापट, किती कराल ?
लेख चवचाल, प्रतिसाद बेताल,
अवघेची कंगाल, कितीक म्हणून?
अडखळा हात, माजलेत साथ- साथ
दुर्लक्षाने मात, कशी कराल ?
मारली बोंब, उसळला आगडोंब,
मिपावर झोंब, का म्हणून ?
मोडली अक्कल, काढले बक्कल ,
पट्ट्याने बुकल, तोंड दाबून ?
संमं ची झोप, वाचकांची होप
माजुर्ड्यांचा थोप, किती काळ ?
घसरला दर्जा , मीपणाचा मर्जा
लावणार मी खर्जा, घाबरतो कोण ?
उठी बा नीलकाण्ता, थांबवी आकान्ता
तोडणार अंहता, तुजवीण कोण ?
17 Oct 2014 - 3:19 am | प्यारे१
___/\___
16 Oct 2014 - 9:47 am | मदनबाण
हॅहॅहॅ... :)
बाकी गुंडोबुवा हल्लकल्लोळकर. या वरुन गुंडोपंतांची आठवण आली ! काय गुंडोपंत केम छो ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup
इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण
16 Oct 2014 - 10:39 am | समीरसूर
माझ्या कवितेचे रसग्रहण उत्तम उतरले आहे. मला अगदी हाच अर्थ अभिप्रेत होता. अजून एक दुसरा अर्थ आहे या काव्यात. तो जरा जास्त गुंतागुंतीचा आहे. आणि एक अजून तिसरा अतितरल, मलमली अर्थ इतका आत लपला आहे की तो उलगडून सांगण्यासाठी एखादे चर्चासत्र फॉलोड बाय डिनर आयोजित करावेच लागेल. खरं तर एखादी डॉक्युमेंटरीच होऊ शकेल या गूढगर्भ, निळसर, अभिजात, मर्मभेदी काव्यावर. पटकथा लिहिण्याचं काम मी (माझ्या काव्यसाधनेतून वेळ काढून) आनंदाने स्वीकारायला तयार आहे. साधारण २०-२५ मिनीटांची असली तरी हरकत नाही. माझे जुने फोटो, हस्ताक्षर, वगैरे लगेच उपलब्ध करून देऊ शकेल.
एवढं करा हो कुणीतरी, आजकाल कुणालाही प्रसिद्धी मिळते. माझ्यासाठी एवढंदेखील करणार नाही का मिपा आणि मिपाकर्स? ;-)
चर्चांसाठी माझी दैनंदिनी बघून जानेवारी २०१५ मधल्या तारखा काढून देऊ शकतो मी. लवकर ठरवा. जास्त वेळ नका घालवू. ;-)
17 Oct 2014 - 7:50 am | सस्नेह
अब मारोगे क्या ?
17 Oct 2014 - 11:50 pm | दशानन
जब्र्रा!