शेख चिल्ली !

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
4 Oct 2014 - 10:40 am
गाभा: 

कुणीही अजाणता अथवा बावळटपणे स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागत असेल तर सहसा ज्या चित्राची पटकन आठवण येते त्यातील एक म्हणजे शेख चिल्ली झाडाच्या फांदीवर उलटा बसून झाडाची फांदी कापतोय, झाडाची फांदी कापून झाली की तो आपोआप झाडावरून फांदी सहीत खाली पडणार हे सुज्ञांच्या लक्षात येतच. या शेख चिल्लीच्या इतर बर्‍याच कथा असल्या तरीही या धाग्याचा उद्देश अजाणता अथवा अज्ञानातून स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागणे, बोलणे, तर्क मांडणे या संदर्भाने आहे. स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागणे, बोलणे, (उणीवयूक्त) तर्क मांडणे/अनुसरणे, अशी उदाहरणे आपण बर्‍याचदा अनुभवत असतो अशा उदाहरणांची दखल घेणे हा धाग्याचा उद्देश आहे.

काही वेळा तर्क सुसंगत गोष्टीला आपण चुकीचे समजत नाही आहोत ना ? इतरांना शेख चिल्ली समजताना आपलाच तर्क लूळा पडत नाहीएना हे ही या निमीत्ताने तपासण्याची संधी प्राप्त होऊ शकेल असे वाटते.

शेख चिल्ली हि बहूधा खरोखर अस्तीत्वातील व्यक्ती असावी. हिंदी आणि उर्दूत बर्‍याच इतरही उपहासात्मक कथा शेख चिल्लीशी जोडल्या गेल्या असाव्यात. अर्थात आधी म्हटल्या प्रमाणे धाग्याचा उद्देश इतर कथानके अथवा कुणाही व्यक्तीचा व्यक्तीगत उपहास असा नाही.

वर म्हटल्या प्रमाणे उदाहरणे हवीत. शेख चिल्ली झाडाच्या फांदीवर उलटा बसून झाडाची फांदी कापतोय असे चित्र कॉपीराईट मुक्त स्वरूपात http://commons.wikimedia.org/wiki/Special:UploadWizard येथे बनवून आणि चढवून हवे आहे.

* जाहीरात :
** मराठी विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्प

हा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.यात आपण सहभागी होऊ शकता.

अनुषंगिक अवांतर सोडून इतर विषयांतर टाळण्यासाठी आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

5 Oct 2014 - 9:12 pm | श्रीगुरुजी

अलिकडच्या काळातील नितीशकुमार व केजरीवाल हे शेख चिल्ली आहेत. पूर्वी क्रिकेटमध्ये संदीप पाटील व नंतर विनोद कांबळी हे शेख चिल्ली होते. अलिकडे श्रीशांत हा नवीन शेख चिल्ली आहे. महाराष्ट्रात उधोजी शेख चिल्ली होण्याची शक्यता आहे.

तात्पर्य, शेख चिल्ली पूर्वीही होते, आताही आहेत आणि पुढेही असतील.

स्पार्टाकस's picture

6 Oct 2014 - 9:27 am | स्पार्टाकस

सर्वात मोठा शेखचिल्ली विसरलात ग्रुरुजी.

श्रीगुरुजी's picture

6 Oct 2014 - 2:09 pm | श्रीगुरुजी

कोण तो/ती?

काहि आयडी आहेत नजरेत ;)

पगला गजोधर's picture

6 Oct 2014 - 6:12 pm | पगला गजोधर
खटपट्या's picture

11 Oct 2014 - 5:11 am | खटपट्या

असे काही चालेल का ?

abcd

रेवती's picture

11 Oct 2014 - 7:11 am | रेवती

चित्र छान काढलेयत.

अनुप ढेरे's picture

11 Oct 2014 - 7:17 am | अनुप ढेरे

हाहाहा, मस्तं चित्र!

खटपट्या's picture

11 Oct 2014 - 8:23 am | खटपट्या

धन्यवाद रेवती आणि अनुप,
माहितगार साहेबांना पसंत पडले ;पाहिजे

माहितगार's picture

11 Oct 2014 - 8:21 am | माहितगार

असे काही चालेल का ?

चित्र एकदम मस्त, हातात कुर्‍हाड घेऊन फांदी तोडतानाची अ‍ॅक्शन आणि फांदीही तुटावयास आली आहे हे सहजच जाणवते. जरासं कार्टून टाईपच अपेक्षीत असल्यामुळे हे चित्र अगदी धावेलच. काही मायनर फिनीशींग असल्यास करून https://commons.wikimedia.org/wiki/Special:UploadWizard या दुव्यावर चढवल्यास मला मराठी विकिच नव्हेतर हिंदी इंग्रजी विकिपीडियावरही जोडता येईल. commons.wikimedia.org वर टाकलेली छायाचित्रे आपण मिपा वगैरेवर सुद्धा वापरू शकताच.

चित्रासाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद

खटपट्या's picture

11 Oct 2014 - 8:24 am | खटपट्या

ओके, फिनिशिंग करून देतो मी

ज्या माणसाने शेख चिल्लीला शहाणपण सांगायचा प्रयत्न केला तोही घ्या की चित्रात..?

खेडूत's picture

11 Oct 2014 - 11:37 am | खेडूत

उत्तम जमलंय !
असंच चित्र डोक्यात होतं पण कागदावर उतरवायला जमलं नाही. कारण शेखचिल्लीचा धडा हिंदी मध्ये पाचवी सहावीत होता त्यात सेम असं चित्र होतं. ऐशीच्या दशकांतली हिंदी बालभारती पुस्तके शोधल्यास मिळू शकेल. गोष्ट पण मजेशीर होती. आतां पूर्ण आठवत नाही.

शेख चिल्लीचे एखाद दुसरे चित्र आंतरजालावरही असावे पण कॉपीराईटमुळे विकिपीडियावर आणि अर्थात इतरत्रही वापरता येत नाही म्हणून हे चित्र पुन्हा काढून चढवणे महत्वाचे.

मस्तच काढलं आहे चित्र.

खटपट्या साहेब, आजपासून तुम्ही मिपाचे शिघ्र-चित्रकार. :)

खटपट्या's picture

12 Oct 2014 - 2:28 am | खटपट्या

धन्यवाद !!

आणि मुसलमानी पेहराव घालता आला तर बघा...टोपी, लांब डगला, वगैरे...?

माहितगार's picture

11 Oct 2014 - 12:26 pm | माहितगार

ज्या माणसाने शेख चिल्लीला शहाणपण सांगायचा प्रयत्न केला तोही घ्या की चित्रात..?

कोण तो ?

-अनभिज्ञ माहितगार

अवांतरः

आणि मुसलमानी पेहराव घालता आला तर बघा...टोपी, लांब डगला, वगैरे...?

-अजूनही बरेच मुस्लीम तथाकथीत मुसलमानी पेहराव वापरत असतीलही, तसे चित्रात दाखवण्यास हरकतही नाही. विवीधतेतून एकतेचा आदर करूनही कोणत्याही समुदायाने एकुण समाजा पासून दूर राहण्यास, स्टिरीओ टायपींग कारणीभूत ठरू असे पोषाख काय लिपी काय टाळता आल्यास पहावे असे वाटते. आणि इतर समाजानेही ह्या स्टिरिओ टायपींग लादत नाही आहोत ना हे पहावे असे वाटते. मग विवक्षीत समुदाय कोणते का असेनात.

- विचारात पडलेला माहितगार

नै म्हटले तरी शेख चिल्ली हे जुने क्यारेक्टर. मग मुसलमानी पोषाख दाखवण्यात हरकत काय? तसे तर मग शिवाजी महाराजांनाही उद्या शर्टपँट घालूनच दाखवा म्हणतील लोक.

:) तसे चित्रात दाखवण्यास हरकतही नाही. असे आधीच म्हटले आहे. :)

शेख चिल्ली ज्या फांदीवर बसला होता, तीच तोडायला बघत होता. बाजुने जाणार्या एका भल्या माणसाने ते बघून शेख चिल्ली ला सावध करायचा प्रयत्न केला- अरे ही फांदी पडल्यावर तुही खाली पडशील!! शेख चिल्ली ने त्याला उडवून लावले. पण मग लवकरच ती फांदी तुटली आणि फांदीवर बसलेला शेख चिल्ली पण. शेख चिल्ली आश्चर्य चकीत होउन विचार करायला लागला....तो भला माणूस म्हणजे नक्की एखादा महान भविष्य सांगणारा असणार!! फांदी तिथेच टाकून शेखचिल्ली त्या महान भविष्यवेत्त्याच्या शोधात निघाला.

माहितगार's picture

11 Oct 2014 - 7:17 pm | माहितगार

छान. शेखी चिल्लीचे पात्र आणि सारांश लक्षात होते, कथा पूर्ण लक्षात नव्हती.

माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आभार.

अर्धवटराव's picture

11 Oct 2014 - 9:22 pm | अर्धवटराव

शेखचिल्लीने भविष्य सांगण्याचा खुप हट्ट केला व तो कॉमनसेन्स समजु शकत नाहि म्हटल्यावर नाइलाजाने त्या 'भविष्यवेत्त्याने' शेखचिल्लीच्या दंडावर एक दोरा बांधला व दोरा तुटल्यास शेखचिल्ली मरेल असं खोटच सांगितलं.

दोरा तुटला तसं शेखचिल्लीला वाटलं आपण मेलो. तो स्मशानात एका कबरीत जाऊन झोपला. तिकडुन एक हवालदार तुपाच्या डब्यांचं ओझं वाहायला एखादा हमाल शोधत होता. शेखचिल्लीने झोपल्या झोपल्याच ओरडुन सांगीतलं कि जर तो जीवंत असता तर नक्कीच हमाली केली असती. हवालदाराने दटावुन त्याला उठवलं व ओझं वाहायला सांगीतलं. डोक्यावर ते ओझं घेऊन शेखचिल्ली निघाला व वाटेत आपण हमालीच्या पैशाचे काय करु याचे स्वप्न बघायला लागला. अंडे घ्यावे, त्यातुन कोंबड्या येतील, मग परत अंडे-कोंबड्या असं करत करत आपण श्रीमंत होऊ. मग लग्न करु. मुलंबाळं होतील. त्यांच्याशी खेळता खेळता बायको विचारेल, बच्चे कहां है. तो मै बोलुंगा उंहु मै नहि बताउंगा.

असं म्हणत त्याने मान हलवली व तुपाचे डबे खाली पडले. सगळं तुप वाया गेलं. चिडुन हवालदाराने शेखचिल्लीला चांगला चोप दिला.

अशी ति गोष्ट :)

तुमचा अभिषेक's picture

11 Oct 2014 - 4:12 pm | तुमचा अभिषेक

लहानपणी अमृत या मासिकात "मुल्ला नसरुद्दीन" या कॅरेक्टर बद्दल वाचल्याचे आठवतेय. तो वेगळा ना ..

शेख चिल्ली च्या कम्प्लीट उलटा!

शहाणा म्हणून प्रसिद्ध!

पैसा's picture

15 Oct 2014 - 12:02 am | पैसा

खटपट्या तो शर्ट प्यांटवाला माणूस मात्र जरा जुना करा!

खटपट्या's picture

15 Oct 2014 - 2:01 am | खटपट्या

हो या विकांताला ते आणि बयो पुर्ण करायचं आहे.