एक वाचलेला किस्सा सादर करीत आहे..
इंदोर मध्ये एक धनी मराठी परिवार रहात होता..पिढीजात श्रीमंती व त्या बरोबर परिवार रसिक पण होता व श्रद्धाळू पण..
कोजागरी च्या रात्री त्यांचा कडे रात्र जागवण्याचा मोठा कार्यक्रम असे.
नामवंत गायक कलाकार हजेरी लावत असत.
व नंतर केशरी दूध सर्व उपस्थितांना दिले जाई व कार्यक्रमाची सांगता होत असे...
एका वर्षी असाच कार्यक्रम झाला ..पाहुणे गेल्यानंतर यजमान व यजमान बाई आवराअवर करत होते..
त्यांचे केशरी दूध घ्यायचे राहिले होते.. पातेले मोठे होते ज्यात केशरी दूध होते व दूध पण बेताचे उरले होते..
यजमान बाईनी मोठ्या पातेल्यातून लहान पातेल्यात दूध ओतायला सर्वात केली अन त्या घाबरल्या मोठ्या पातेल्याच्या तळाशी एक पाल मरुन पडलेली त्यांना दिसली..
बहुतेक दूध उकळताना वरुन पाल टपकली असावी व आतच मेली असावी..
मोठा कठीण प्रसंग होता पाहुणे तर दूध पिऊन घरी गेले होते..
अजाणते पणाने घडू नये ते घडून गेले होते..
यजमान व त्यांच्या बायकोने विचार केला दुधाचे पेले भरले व दूध प्राशणं केले..
त्यांनी विचार केला की जे पाहुण्यांचे होईल तेच आपले होईल या हेतुने..
परिवार नाना महाराजाचे भक्त होते त्यांना अशुभ घडू नये म्हणून साकडे घातले.
सुदैवाने वा गुरु माउली कृपेने काही झाले नाही.
प्रतिक्रिया
16 Aug 2014 - 8:36 am | तुषार काळभोर
यापैकी काही नसावे. भारतातील घरगुती पाल (आणि सरडेसुद्धा) ही बिनविषारी असते.
18 Aug 2014 - 1:12 pm | बाळ सप्रे
पाल बिनविषारी असते ही नानामहाराज गुरुमाउलींची कृपा !!
18 Aug 2014 - 8:46 pm | शैलेन्द्र
+११११
16 Aug 2014 - 10:58 am | पोटे
पाली विषारी असतात तर माण्जरे पाली का खातात ?
16 Aug 2014 - 12:12 pm | एस
पाल (हाऊस लिझर्ड) ही विषारी नसते. आपल्या घराच्या छताला एक प्रकारची विषारी बुरशी असते. ती पालींच्या शरीरावर चिकटल्यास अशी पाल पडलेले खाद्यपदार्थ माणसांच्या आरोग्यास घातक ठरू शकतात. जुन्या कौलारू छतांना अशी बुरशी जास्त असे. आताच्या आधुनिक घरांमध्ये याचे प्रमाण सहसा आढळत नाही.
16 Aug 2014 - 12:20 pm | स्पंदना
मुळ मुद्दा लक्षात घेण्याजोगा. जेंव्हा आपल्याकडुन हे नकळत का असेना घडलय हे लक्षात आले तेंव्हा त्या दोघांनी मिळुन तेच दुध पिउन येणार्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी दाखवली.
ऑन अदर हँड त्या ऐवजी उपस्थीतांना घडलेला प्रकार तातडीने कळवुन डॉक्टरची व्यवस्था करणेही उचित ठरले असते नाही का?
पण त्यांच्या नैतिक जबाबदारी स्विकारण्याचा पद्धतीत फरक पडला असे म्हणुन शकतो, तरीही त्यांनी ती त्यांच्या परीने स्विकारली.
17 Aug 2014 - 10:22 pm | भृशुंडी
झोल आहे.
म्हणजे बघा, एखाद्याला गरीबीतून वर काढण्यापेक्षा स्वतः गरीब होऊन राहिले तर काय होणार?
तसंच बाकीच्यांना त्रास झाला असेल तर तो आपल्यालाही होउ दे- ह्यात काय प्वाईंट आहे?
त्यापेक्षा एखाद्या पावण्याला फोन करून विचारलं तर?
18 Aug 2014 - 11:54 am | संजय क्षीरसागर
नंतरची लफडी निस्तरत बसून पुन्हा गिल्ट काँप्लेक्स पासून वाचणं अवघड, म्हणून त्यांनी `सेल्फ कन्फेशन' किंवा विषारी दुग्ध-प्राशन हा पर्याय जवळ केला.
रात्री-अपरात्री पब्लिकला उठवून तब्येतीची चवकशी करण्यानं आणखी बोभाटा झाला असता. त्यात, कार्यबाहुल्यामुळे कुणी फोन उचलला नसता तर, `गेलेले दिसतायंत!' असा गैरसमज होणं सहाजिक आहे. त्यापेक्षा, त्यांना त्यांचं बघू दे, आपण आपलं (एकदा शेवटचं) बघू असा विचार करणं उचित होतं.
16 Aug 2014 - 12:44 pm | प्यारे१
>>>परिवार नाना महाराजाचे भक्त होते त्यांना अशुभ घडू नये म्हणून साकडे घातले.
>>>सुदैवाने वा गुरु माउली कृपेने काही झाले नाही.
ह्या वाक्यांची काय गरज काय? मेले असते तर 'अण्डर कृपा कव्हर' मेले असते का? कशाला नको त्या उल्लेखांनी चांगल्या गोष्टी नासवतात लोक कुणाला माहिती.
18 Aug 2014 - 1:03 pm | धन्या
नाना महाराज जे कोणी असतील ते असोत. मात्र संतांच्या चरीत्रांमधील अशाच प्रकारच्या सांगोवांगीच्या सुरस चमत्कार कथांमुळे त्यांची मुळ शिकवण बाजूला राहते आणि निरर्थक गोष्टींचा उदो उदो होतो.
साधे भोळे लोकही मग "त्यांचा तेव्हढा अधिकारच होता" असे म्हणून त्याच फालतू गोष्टींमध्ये अडकून पडतात.
18 Aug 2014 - 1:59 pm | प्रभाकर पेठकर
साधे भोळे की मूर्ख?
18 Aug 2014 - 2:22 pm | प्यारे१
साधे भोळे. :)
18 Aug 2014 - 2:26 pm | धन्या
मूर्ख या शब्दामध्ये तिरस्काराची छटा आहे. अज्ञानी हा शब्द वापरता येईल साधे भोळे म्हणायचे नसेल तर.
18 Aug 2014 - 2:30 pm | प्रभाकर पेठकर
मूर्खांचा तिरस्कार वाटत नाही, कीव येते.
18 Aug 2014 - 2:35 pm | धन्या
oops !!!
18 Aug 2014 - 1:48 am | आदूबाळ
हा किस्सा मुक्तपीठ मध्ये दिला तर ब्याक्कार मजा येईल.
18 Aug 2014 - 3:09 am | संजय क्षीरसागर
ते सर्वांना वाचवू शकले!
18 Aug 2014 - 10:54 am | नाव आडनाव
:):)
18 Aug 2014 - 11:34 am | संजय क्षीरसागर
काही प्रश्न उरतातच :
१) सगळे दूघ पीत होते तेव्हा अकु काय करत होते?
२) दुधाचे पेले प्राशन करुन, साकडे घालून झाल्यावर, यजमानांनी काय केले?
३) मुळात नाना महाराज कशानं गेले?
४) यजमान (केवळ धक्यानं) गेले असते आणि पाहुणे (काही कल्पनाच नसल्यानं) वाचले असते, तर नाना महाराजांचे नांव वाकडे झाले असते का?
18 Aug 2014 - 2:39 am | मूकवाचक
इंदोर मध्ये एक धनी मराठी परिवार रहात होता..पिढीजात श्रीमंती व त्या बरोबर परिवार रसिक पण होता व श्रद्धाळू पण..
कोजागरी च्या रात्री त्यांचा कडे रात्र जागवण्याचा मोठा कार्यक्रम असे.
नामवंत गायक कलाकार हजेरी लावत असत.
व नंतर केशरी दूध सर्व उपस्थितांना दिले जाई व कार्यक्रमाची सांगता होत असे...
एका वर्षी असाच कार्यक्रम झाला ..पाहुणे गेल्यानंतर यजमान व यजमान बाई आवराअवर करत होते..
त्यांचे केशरी दूध घ्यायचे राहिले होते.. पातेले मोठे होते ज्यात केशरी दूध होते व दूध पण बेताचे उरले होते..
यजमान बाईनी मोठ्या पातेल्यातून लहान पातेल्यात दूध ओतायला सर्वात केली अन त्या घाबरल्या मोठ्या पातेल्याच्या तळाशी एक पाल मरुन पडलेली त्यांना दिसली..
बहुतेक दूध उकळताना वरुन पाल टपकली असावी व आतच मेली असावी..
मोठा कठीण प्रसंग होता पाहुणे तर दूध पिऊन घरी गेले होते..
अजाणते पणाने घडू नये ते घडून गेले होते..
यजमान व त्यांच्या बायकोने विचार केला दुधाचे पेले भरले व दूध प्राशणं केले..
त्यांनी विचार केला की जे पाहुण्यांचे होईल तेच आपले होईल या हेतुने..
परिवार नाना महाराजाचे भक्त होते त्यांना अशुभ घडू नये म्हणून साकडे घातले.
सुदैवाने वा गुरु माउली कृपेने काही झाले नाही.
---
परिवार बुद्धीवादी होता. त्यांनी पालींच्या विषारी व बिनविषारी प्रजातींचा विदा गोळा करायला सुरूवात केली.
यदृच्छेने काही झाले नाही.
---
परिवार नव-अद्वैतवादी होता. त्यांनी मी दूध घेतले या विचाराला बॅक ट्रॅक करण्याची प्रक्रिया पार पाडली.
पाल, पाहुणे आणि परिवार यातला 'मी' एकच असल्याने आणि त्याचा जन्मच झालेला नसल्याने विष बाधण्याचा प्रश्नच उरला नाही.
18 Aug 2014 - 2:55 am | संजय क्षीरसागर
अद्वैतवादात नवा-जुना असा प्रकार नाही. ती वस्तुस्थिती आहे.
ज्याचा जन्म झाला ते शरीर मरणारच.
जो एक आहे तो मरण्याचा प्रश्न येत नाही याचं कारण विषबाधा नाही, तर तो सदैव अभोक्ता आहे.
18 Aug 2014 - 3:08 am | मूकवाचक
कृ. ह. घ्या. हे वे. सां. न. ल.
18 Aug 2014 - 3:11 am | संजय क्षीरसागर
हे वे. सां. न. ल.
18 Aug 2014 - 1:09 pm | धन्या
हे काही झेपलं नाही. विशेषतः शेवटचं अर्ध वाक्य. हे वाक्य कुणासंदर्भात आहे?
18 Aug 2014 - 1:29 pm | संजय क्षीरसागर
ती (व्यक्तीच्या) भोजनावर अवलंबून नाही त्यामुळे तिला अभोक्ता म्हटलंय. तस्मात, कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक आपत्तीनं ती अबाधित आहे.
18 Aug 2014 - 12:00 pm | पिवळा डांबिस
मुखी कुणाच्या पडे केसर-दूध,
कुणा मुखी ती पाल...
ते नाना महाकाल!!!
अकुल्या, ते नाना महाकाल!!!
18 Aug 2014 - 12:14 pm | सुहास..
पंख लागायच्या आधी वाचुन घेतला ;)
'पाली' विषयी अधिक माहीती ते मुर्ती-शिळा-शिलालेख-वितीहास-अभ्यासक-संपादक श्री. वल्ली यांना विचारावी .. ;)
धन्यवात ;)
18 Aug 2014 - 12:16 pm | सुहास..
अविंतर ....आपल हे अवांतर : कुठलाही प्राणी कसल्याही तरल पदार्थात मरण पावला तर कालांतराने तो त्या तरल पदार्थावर तंरगला पाहिजे असे शास्त्रात ( कुठल्या ते माहीत नाही ) म्हटले आहे का ?
18 Aug 2014 - 1:44 pm | आदूबाळ
प्वाईंट आहे.
यात केशरी दूध तरल पदार्थ आहे हे गृहितक आहे, पण एजमानांच्या केशरी-दूध-मेकिंग-अॅबिलिटीज वर शंका न घेता; एक शक्यता अशी आहे, की तळाशी जो खरपुडीसदृश पदार्थ तयार होतो, त्यात पाल चिकटली असावी.
18 Aug 2014 - 8:20 pm | सुहास..
त्यात पाल चिकटली असावी. >>>
माफ करा पण , चिकटली की चिटकली ??
अर्थात यावर चर्चा करण्याकरिता वेगळा धागा काढण्यास हरकत नाही ( आहे फुकट ;) )
18 Aug 2014 - 8:36 pm | आदूबाळ
आता माझी सकटली हां...
- चिंगम २
19 Aug 2014 - 7:13 pm | प्यारे१
>>> चिकटली की चिटकली ??
तुझाच एक धागा होता ना? चिकटवणे की चिटकवणे?
अजून किती तिथेच 'चिटकून' राहून ट्यार्पी काढशील रे बाबा?
19 Aug 2014 - 10:06 pm | सुहास..
????
माझा धागा ? ...आठवेना ......आमचा धागा म्हणजे लिहा आणि गंगासमर्पण .....
( तसं नसत तर , आमचे प्रतिसाद आमच्या धाग्यावर नंबर ऑफ रिप्लायपेक्षा जास्त नसते का दिसले ट्यारप्याग्रस्त शिशुवर्गातल्या वा समुद्रीकंपुसारखे )
असो , एक धागा तुला उचकटायला सांगीतला होता हे मान्य ...पण स्साला हा आरोप अमान्य ...तो कशासाठी होता हे जग जाहीर होत ..म्हणुन हे ही जग जाहीर करतोय ....असो २ ....( लिखाण बंदच करतो च्यामारी, ना रहेगा वाश्या ..ना ....)
21 Aug 2014 - 1:53 pm | इरसाल
माझ्या माहितीनुसार काही प्राणी तरल पदार्थ घेतल्यानंतर तरंगतात.
21 Aug 2014 - 2:00 pm | सुहास..
अनुभव की पार्शल ऑबर्व्हेशन ;)
21 Aug 2014 - 2:09 pm | इरसाल
आमाला कुटला आलाय अनुभव आम्ही पल्याडचे आबझरवेशन वाले !
18 Aug 2014 - 4:07 pm | वेल्लाभट
प्रतिसाद्स वाचून केवळ हसतोय मी ! ! ! ती पाल, दूध, यजमान, पाहुणे, नाना महाराज सगळं बाजूलाच! कसला खुर्दा झालाय मूळ धाग्याचा. पालीपेक्षा डेंजर !
18 Aug 2014 - 4:12 pm | धन्या
ही सगळी नाना महराजांची कृपा आहे. :)
19 Aug 2014 - 5:58 pm | यशोधरा
म्हंजे मिपावर होते ते नाना म्हाराज? नीट बघा, मिपाच्या छताच्या एखाद्या कोपर्यात वगैरे बसले असतील दडी मारुन! :P
19 Aug 2014 - 7:00 pm | धन्या
अहो तै, अशी वर्णनं भूता-खेतांची असतात. महाराजांची नसतात.
महाराज म्हटले म्हणजे कसे डोक्याच्या मागे वलय असलेली एखादी तेजःपुंज मूर्ती नजरेसमोर येते.
19 Aug 2014 - 8:16 pm | पैसा
गुजराती लोक आचार्याला महाराज म्हणतात!
19 Aug 2014 - 8:20 pm | धन्या
यम्पीतल्या इंदौर शहरात घडलेल्या घटनेवर मराठी जन चर्चा करत असताना गुजराती आचार्याला मध्ये आणल्याबद्दल तीव्र निषेध !!
19 Aug 2014 - 10:11 pm | पैसा
गुज्जूभायंना आपले न म्हटल्याबद्दल तुझा डब्बल निषेध! (सांगू का नरेन भाईंना?)
20 Aug 2014 - 5:34 pm | यशोधरा
महाराजांनापण पावर असते म्हटलं! आता अगदीच एअर इंडियाचा महाराजा असेल तर मग.. ह्या, ह्या, ह्या! :D
20 Aug 2014 - 7:20 pm | धन्या
एयर इंडीयाच्या महाराजाने अगदी खटारा विमानांना "इंटरनॅशनल फ्लाईटस" बनवण्याचा चमत्कार केला आहे.
19 Aug 2014 - 1:36 am | प्रभाकर पेठकर
इथे पालीला ओढून ओढून मगर बनविण्याचा प्रयत्न चालू आहे.
19 Aug 2014 - 2:56 pm | जिन्गल बेल
*ROFL*
19 Aug 2014 - 6:57 pm | धन्या
असू दया हो काका. त्यांची तरी शंभरी कधी भरायची.
तुम्हाला काय वाटते, त्यांनी नाना महाराजांचा उल्लेख केला तो काय महाराजांप्रती आदरभाव आहे म्हणून?
19 Aug 2014 - 11:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
पालीची शंभरी तर केव्हाच भरली (गोष्टीतच) ! (दुधात पडून मेली नाय काय बिचारी ? :( ;) )
19 Aug 2014 - 5:45 pm | पालव
झेपले नाहि बुआ ...काहिच्या काहि...कोजागीरीला रात्री १२ वाज्ता दुध पीतात, मग पाहुने गेल्याअवर कसे काय उशिरा दुध पीनार
19 Aug 2014 - 6:58 pm | धन्या
बुवा पार पोचलेले आहेत. कसे झेपतील?
20 Aug 2014 - 12:18 pm | ज्ञानोबाचे पैजार
बर झाल त्यांनी उरलेल दुध पिउन टाकलं, उगाच वाया कशाला घालवायच?
दुध प्यायच्या आधी पाल पिळुन घेतली की नाही?
नंतर त्या पालीच काय केल? (त्याची रेशीपी विचारुन इकडे टाकलीत तर ती एक चांगली समाजसेवा होइल)
पैजारबुवा,
20 Aug 2014 - 2:11 pm | अजया
:-))
20 Aug 2014 - 4:22 pm | तुमचा अभिषेक
घरच्यांची सर्वांची दुपारची जेवणे झाली. शेवटाला घरातला कर्ता पुरुष कामानिमित्त बाहेर गेलेला तो येऊन ताटावर बसला. समोर डाळीचा टोप. तळाला उरलेली थोडीशी डाळ. चमच्याने सहज ढवळून पाहिले तर त्यात मरून पडलेली पाल नजरेस पडली. घरातले सारे जेऊन तासभर झाला होता, अजून कोणाला काही झाले नव्हते तरीही सर्व भितीने थंडगार पडले. या महापुरुषाने मग काय करावे. त्या सर्वांना धीर येण्यासाठी म्हणून लिमडा मिरची काढतात तसे पाल बाहेर काढून उरलेली डाळ बिनधास्तपणे प्राशन केली.
20 Aug 2014 - 4:30 pm | संजय क्षीरसागर
म्हणजे हिरो (उर्फ नाना महाराजांचा) रोलच पिक्चर मधून डिलीट! आता कसा चालणार पिक्चर?
20 Aug 2014 - 4:41 pm | आदूबाळ
असा कसा डिलीट? त्याला तसं करायची बुद्धी कुणी दिली? नामांनीच.
20 Aug 2014 - 4:57 pm | संजय क्षीरसागर
तर त्यांच्यामुळेच!
20 Aug 2014 - 5:17 pm | प्रसाद गोडबोले
पाल घातलेली केशरी दुध चवीला कसे लागेल ह्याचा विचार करीत आहे ... करायचा एकदा हा बेत मिपाकरांनो पालमिल्कशेक ...कोजागरी जवळच आली आहे ... मजा येईल ... !!
20 Aug 2014 - 5:44 pm | बॅटमॅन
तेलुगु आणि तमिऴ भाषेत दुधालाच पाल म्हणतात =))
20 Aug 2014 - 5:54 pm | प्रसाद गोडबोले
बंगालीत तर काही काही माणसांनाच पाल म्हणतात : उदाहरणार्थ बिपिनचंद्र पाल *lol*
इंग्रजीत पाल हा शब्द मित्र ह्या अर्थाने वापरतात : Hey , how are you , Pal ? *pleasantry*
20 Aug 2014 - 6:26 pm | बॅटमॅन
हा हा हा =))
'आपले' डिरेक्टर २००९-१० साली शंकर पाल म्हणून होते ते आठवलं. शंकरपाळ्याची आठवण व्हायची त्यांना पाहिलं की.
20 Aug 2014 - 6:29 pm | बॅटमॅन
बंगालीत झाडू साठीचा शब्द,
तमिऴ मध्ये सामान्य किड्यासाठीचा शब्द,
तेलुगुमध्ये आदरार्थी 'इथे या, जनाब आईये' छाप शब्द,
काश्मिरी भाषेतला ब्रेड/चपाती/नान/रोटी इ. साठीचा शब्द,
हे सर्व शब्द एकदा पहा आणि नै हास्यस्फोट झाला तर सांगा.
20 Aug 2014 - 7:24 pm | धन्या
रा ** इक्कडा वस्तायी.
एका तेलुगू चित्रपटात जेव्हा हे पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा फुटलो होतो. :)
20 Aug 2014 - 7:33 pm | बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी. :)
20 Aug 2014 - 6:09 pm | mbhosle
तुम्हाला एकूण किती भाषा येतात हो ?
20 Aug 2014 - 5:52 pm | कवितानागेश
घाणेरडी माणसं!! =))
20 Aug 2014 - 6:00 pm | असंका
फार वर्षांपूर्वी अगदी लहानपणी अशी एक गोष्ट एका नामांकीत साप्ताहिकात वाचली होती (सा. सकाळ/लोकप्रभा/.चित्रलेखा इ. पैकी असावे)
पाहुणे सकाळी सकाळी घरी जायला निघतात, तेव्हा दूध का खीर का असलंच काही त्यांना बरोबर देतात. त्यांची गाडी निघाल्यानंतर थोड्या वेळाने हे पण तो पदार्थ वाढून घेतात, तर भांड्यात मेलेली पाल. पण त्या गोष्टीत हे लोक पार जीवाच्या आकांताने ही गोष्ट या पाहुण्यांना कळवायचा प्रयत्न करतात. पोलीसांना सांगतात. आणखी कुणाकुणाला सांगतात, पोलीसही लगेच सायरन वाजवत त्यांनी सांगितलेल्या गाडीच्या शोधात निघतात. दुपारपर्यंत जेव्हा गाडी सापडत नाही, तेव्हा शेवटी रेडिओ वर अनाउंस करतात- "दूध पिऊ नका, दुधात पाल सापडली आहे" असं काहीतरी. शेवटी पोलीसांनाच हे लोक सापडतात, पण त्यांनी तोवर दूध पिलेले नसते. मग सगळे हाश्श हुश्श होते.
मी उगाच वाचलं होतं ते. आणि विचार करत होतो यात छापून येण्यासारखे काय आहे... .
20 Aug 2014 - 8:29 pm | विश्वनाथ मेहेंदळे
किशोर मध्ये आली होती गोष्ट.
20 Aug 2014 - 8:38 pm | धन्या
*lol*
20 Aug 2014 - 9:19 pm | असंका
हो ना! आपण पण वाचली आहे तर!