या भागात देशांतर्गत प्रवासाविषयी… प्रत्येक देशाची प्रवासाची साधने ही त्याची एक वेगळी ओळख असते. आता भारताचेच म्हणाल तर रेल्वे प्रवास ही एक ख़ासियत, अनेक प्रकारचे लोक पहावयास, अभ्यासावयास या प्रवासात मिळतात. हे लक्षात घेऊन विदेशातील प्रवासाचे आराखडे बनवावेत असे माझे मत आहे. मोठ्या शहरात मध्यवर्ती बाजारपेठेत वगैरे पाईच फिरणे मस्त, पण थोड्या अधिक अंतरासाठी कॅब न करता सार्वजनिक वहा़तूकसाधने उत्तम. एक तरी रात्रीचा प्रवास बसने करावा (सुरक्षित असल्यास, पण थोड़ा रिस्क तो बनता है।) आणि रेल्वे तर नक्कीच. तसेच, जलवहातुक असल्यास तीही अनुभवावी. एकल प्रवाशांनी अशा अनुभवांसाठी सुरक्षेकडेही लक्ष देणे आवश्यक अाहे. भरपूर आतले खिसे असलेले जॅकेट चांगले उपयोगी पड़ते असा स्वानुभव. यामुळे पासपोर्ट, पैसे, फ़ोन या गोष्टी कायम सोबत राहतात व बाहेरून दिसत नाहीत. ओघानेच आलं म्हणून थोड़े पैसे व फ़ोन विषयी, अर्थात, एकल प्रवाशांसाठी अधिक उपयुक्त, जवळ जास्तित जास्त दहा हजार रुपये मूल्याचे चलन बॅग व खिसे यात विभागून ठेवावे. त्याचबरोबर आंतरदेशीय क्रेडिट कार्ड त्याची मर्यादा कमी करून जवळ ठेवावे (शक्यतो ज्याला चलनपरिवर्तन शुल्क नसते असे). फ़ोन साठी स्थानिक कार्ड आपल्या देशातही खरेदी करता येते, परंतु आधी त्या देशातील वारंवारता लक्षात घेऊन तसा फ़ोन किंवा सरळ क्वाडबँड फ़ोन वापरावा (शक्यतो अतिशय अनाकर्षक असा) लक्ष ठेवण्यासाठी जितक्या कमी गोष्टी तितके चांगले, उदा माझ्यासाठी फक्त कॅमेरा क्रेडिट कार्ड व पासपोर्ट या तीनच महत्वाच्या चीजा, बाक़ी टॅब स्मार्टफ़ोन व इतर गॅजेट्स ची डोकेदुखी बरोबर ठेवली नाही.
या भटकंतीमध्ये भेट देउया पेरूतील राजधानी लिमानंतरच्या दुस-या सर्वात मोठ्या शहरास. अरेकिपा हे शहर साडेसात हजार फूट उंचीवर वसलेले आहे. पश्चिम किना-यावर समुद्रसपाटीवर वसलेल्या लिमा शहरात सफरीला सुरुवात केली. त्या पलिकडे पूर्वेकडे वाळवंट आहे, व त्यापलिकडे जसा आपल्याइथे सह्याद्री उभा ठाकला आहे तसा इथे अँडीज् पर्वत उभा आहे, मात्र त्याची उंची सह्याद्रीच्या चौपट आहे. या रांगांमधील पठारावर अरेकिपा वसलेले आहे.
विमानतळावर उतरल्यावर प्रथम दर्शन होते ते दोन भव्य ज्वालामुखींचे. बघण्यासारख्या सगळ्या गोष्टी या शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने थेट तेथेच गेलो. अतिशय स्वस्त आहे इथे सर्व. प्रत्येक शहरात एक मध्यवर्ती व शक्तिशाली कॅथेड्रल असते. माझा पहिला थांबा येथील कॅथेड्रल. सकाळचे आठ वाजले होते त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती. या इमारतीसह शहरातील अनेक महत्वाच्या इमारती ज्वालामुखीजन्य पांढ-या दगडातील असल्याने 'ला स्विदाद् ब्लांका' अर्थात श्वेतनगरी असे याचे दुसरे नाव आहे. कॅथेड्रल व 'सेंत्रो हिस्तोरिको' बघून एका ठिकाणी न्याहारी साठी थांबलो. मग एक स्थानिक संग्रहालय, येथील पेरूव्हियन ममी व इतर सांस्कृतिक वस्तु बघण्यासारख्या आहेत. त्यानंतर सांता कॅतालिना कॅथलिक मोनास्ट्री पाहिली व मध्यान्हीनंतर बसने पुढच्या प्रवासासाठी कूच केली.
येथील उल्लेखनीय गोष्टी म्हणजे अल्पाका लोकरीचे कपड़े आणि वानिता ची ममी. अल्पाका हा उंचावरील थंड वाळवंटासाठी बनलेला छोटेखानी केसाळ प्राणी; उंटाचा मावस चुलत भाउ. वानिता (Juanita) ची ममी सहाशे वर्षें जुनी व अतिशय सुस्थितीत आहे.
नकाशा:
विमानतळ : पार्श्वभूमीवर चॅचेनी ज्वालामुखी:
प्लाझा दे आर्मास : शहराचा मुख्य चौक :
कॅथेड्रल : पार्श्वभूमीवर एल् मिस्टी ज्वालामुखी :
कॅथेड्रल:
कॅथेड्रल:
कॅथेड्रलचा अंतर्भाग: (needs activeX)
सांता कॅतालिना मोनॅस्ट्री: रंगांची उधळण, छायाचित्रणाची पर्वणी
प्रतिक्रिया
18 Aug 2014 - 6:48 pm | पोटे
सुंदर
18 Aug 2014 - 6:53 pm | शिद
झकासच आहेत सगळे फोटो...खासकरून कॅथेड्रलच्या पार्श्वभूमीवर 'एल मिस्टी' ज्वालामुखी पर्वत. *ok*
18 Aug 2014 - 6:55 pm | एस
फोटो आवडले.
18 Aug 2014 - 6:58 pm | कैलासवासी सोन्याबापु
अप्रतिम!!!
18 Aug 2014 - 7:39 pm | जिन्क्स
सुरेख वर्णन आणि छायात्रांसाठी तुम्हाला मिसळपाव वरिल "किल्वर चा एक्का" हे पारितोषिक देण्यात येत आहे...
18 Aug 2014 - 7:42 pm | सूड
तुम्हाला पदवी म्हणाचंय का?
18 Aug 2014 - 11:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तच आहे की पेरू. आता पहायच्या जागांच्या यादीत वर गेला !
फोटो आवडले हेवेसांन :)
18 Aug 2014 - 11:38 pm | संजय क्षीरसागर
लगे रहो!
19 Aug 2014 - 12:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुंदर छायाचित्रं आहेत. विशेषतः सांता कातालिना आणि त्यापुढची सगळीच आवडली. अल्पाका हे नाव 'पाडस'मध्ये वाचलं होतं. ते पुन्हा इथे पाहून गंमत वाटली.
तिथले लोक, तिथली अन्नसंस्कृती, लिमाला ज्या कुटुंबामध्ये राहिलात त्यांच्याबद्दलही काही जरूर लिहा.
अवांतर - हे फोटो पाहून न्यू मेक्सिकोमधल्या 'सांता फे'पेक्षाही काहीच्या काही सुंदर शहर असेल असं वाटलं. कितीही प्रयत्न केला तरी सांता फे अमेरिकन शहर आहे दिसत राहतंच.
22 Aug 2014 - 2:23 pm | समर्पक
तेथील (न्यू मेक्सिको) ताओस गाव खूप बघण्यासारखे आहे. नवाहो आणि आपाचे लोकांबरोबर राहिलो होतो. त्यांच्या बर्याच चालीरिती टिकवण्याचा ते प्रयत्न करताहेत पण तुम्ही म्हणलात तशी अमेरिका (आंग्ल संस्कृती)सगळ्या घरात पोहोचलीच आहे.
19 Aug 2014 - 5:42 am | अत्रुप्त आत्मा
वाह!
19 Aug 2014 - 12:19 pm | इशा१२३
अप्रतिम!वर्णन अजून वाचायला आवडेल..
19 Aug 2014 - 12:24 pm | दिपक.कुवेत
फोटो आणि वर्णन देखील.
19 Aug 2014 - 1:19 pm | उदय के'सागर
चित्रात स्वच्छ रंगवलेलं एक गाव असतं अगदी तसं वाटलं.
बादवे, ती लाल्/कौलारू तिथली स्थानिक लोकांची खरे आहेत का? की अजून काही?
काय छान वाटेल तिथे रहायला :)
19 Aug 2014 - 1:21 pm | उदय के'सागर
चित्रात स्वच्छ रंगवलेलं एक गाव असतं अगदी तसं वाटलं.
बादवे, ती लाल्/कौलारू तिथली स्थानिक लोकांची खरे घरेआहेत का? की अजून काही?
काय छान वाटेल तिथे रहायला Smile
19 Aug 2014 - 11:43 pm | समर्पक
हो, यातील काही घरात नन्स् राहतात, बाकीची ऐतिहासिक वारसा म्हणून जपली आहेत.
19 Aug 2014 - 4:06 pm | बॅटमॅन
फार जबरी. सांता कातालिना इ. पाहून अन वाचून मीना प्रभूंचं 'दक्षिणरंग' हे पुस्तक आठवलं.
5 Sep 2014 - 3:39 am | रेवती
प्लाझा दे आर्मासचा फोटो सगळ्यात आवडला.