गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१३
http://misalpav.com/node/28048 >>>
आणि मग "गुर्जी..प्लीज तुंम्ही सांगा ना एखादा ठेवणीतला..उखाणा" अश्या विनंत्या सुरु होतात.मग आंम्ही
............,चं नाव घेऊन,बांधते मंगल गाsssssठ
गुर्जी आले मदतीला,कारण नव्हता उखाणा पाsssssठ!!!
असा टाइम'बॉम्ब उडवतो...
मग फोटुवाल्यांसह सगळे बेजान हसतात,आणि...खेळ पुढे सरकतो!
==============
होम म्हटला की मग तो वास्तूशांतिचा असो, किंवा हा विवाहहोम असो. सगळ्यांच्या प्रमाणे,बरेचदा वधू/वरांनाही कित्ती धूर होणार आहे नक्की!? हा प्रश्न होमाच्या-काठावर आलं की मनात पडतोच.
आणि मग..वर..आंम्हाला हा वरचा प्रश्न सरळ विचारतो..किंवा मग जोडी जरा बुजरी वगैरे असेल,(किंवा बुजत असेल! ;) )तरः- "फार धूर होत नाही ना!?" असं डॉक्टरला विंजेक्शनला घाबरणार्यानी- "नै..मंजे टोचायच नै ना फा.......र!?" असं विचारल्या सारखा विचारतो.मग आंम्हिही त्या वराला वधूच्या दिशेनी जाणारा डायल्याग मारतो:"धुराला भ्यायलात,तर पुढे आगिशी कसे खेळाल!?" असा कडक चेंडू टाकून एकंदर होमासाठी तयार करतो.
(नवर्या मुलास..) हम्म्म्म..चला आचमन करा... वगैरे सुरवात होऊन पहिला विवाहहोम अवरतो आणि मुलाला पाणिग्रहाणास्तव वधू समोर उभे करणे होते.(विवाह सोहळ्यातला हा एक अत्यंत टची आणि ग्गोगोड सीन! ;) ..)
आंम्ही:- हां ..आता तू समोर उभा रहा,आणि तिचा उजवा हात पाचही बोटांसह शेकहँड सारखा हातात घे पाहू!.. हां .. बरोबर.आणि आता दोघांनी पूर्ण १ मिनिटभर.एकमेकाच्या डोळ्यात बघत बसायचं..बरं का!.. इथे, काहि बुजर्या वरांना आणि वरवर अत्यंत धीट वाटणार्या वधूंना, अंतर्यामी इतक्या गुदगुल्या होतात,की पहिलं अर्धमिनिट दोघं खाली मान घालून हसतच रहातात.मग कडेनी ही गम्म्मत वेंजॉय करणार्या म्हातर्या बायकांपासून ते यांच्या मित्र.मैत्रिणींपैकी काहिंनी टाकलेल्या खास अक्षता यांना लागायला सुरवात होते.
मित्रलोक्सः- "किती वेळ??????? बास की!!!!!!!!!!"
मैत्रिणी:- (आजकाल या शिट्याही मारतात!..) आणि मग- "झालं झालं...आम्ही नै पाहिलं" अश्या कोरस मधे आरोळ्या वगैरे होतात. मग आम्ही त्यात हळूच शिरून खेळ पुढे नेतो. आंम्ही:-वराला उद्देशून " हे पहा,आज तू सर्वांसमक्ष हिचा हात हातात घेऊन,म्हणजेच पाणि-ग्रहण करून, असं सांगतोयस की, मी हिला हिच्या सर्व गुणदोषांसह,म्हणजे जशी आहे तशी धर्मपत्नी म्हणून स्विकारत आहे. म्हणजे......... नंतर तक्रार चालणार नाही हां!" (इथे बाजुनी हमखास हशा) " जशी आहे तशी स्विकारतो...म्हणजे हल्लीच्या नव संस्कृत मधे तुमचं..ते..काय म्हणता..ते...........
हां............ अॅज इट इज! (अजून हशा..आणि शिट्या सुद्धा!)
फोटोग्राफर बिचारे हा १ मिनिटाचा टेक १० मिनिटं चाल्लेला पाहून ७/८ अँगलनी फोटू मारून मारून दमतात. आणि मग हे पाणिग्रहण सुटतं.मुलगा उभा ठाकून अवघडलेला पाटाला-येऊन बसतो. आणि मग पुढे मुलिच्या भावाकडनं तिच्या ओंजळीत लाह्या घालणे..मुलानी वर हात धरून त्या लाह्या होमात आर्टीफिशियल धबधब्यातलं पाणि पडतं,तश्या सोडणे..फोटू वाल्यांनी योग्य ते फोटो घेणे.होमा सभोवती प्रदक्षिणा होणे..असं करत करत गाडी "कानपिळी" नावाच्या दिव्य ठेसनाला येऊन स्थिरावते.
हा ही विधी नसलेला विधी हल्लीच्या काळातला अत्यंत फेमस असा झालेला विधी आहे. आंम्ही वधूच्या त्या भावाला..ज्या द्यायच्या त्या सूचना देतो. मग भाऊ वराला,हातनी त्याचा कान धरून कानात-"माझ्या बहिणीचा नीट सांभाळ करा.." वगैरे वगैरे.. ठरलेले (लोकं)शास्त्रातले उपदेश करतो/किंवा आंम्ही ते करवून घेतो. आणि मग फोटोवाल्यांनी त्या भावास -"हां... राइट..राइट..दोघांच्या मागे..तिथेच खाली बसं..येस..येस..बरोब्बर..कानाला धरा आता मुलाच्या" वगैरे भाव देऊन फोटो काढायला सुरवात केली..की परत कडेचं पब्लिक "ओढ..ओढ..चांगला जोरात" असा धोशा लावतं (हल्ली काही ठिकाणी हे भाऊ सुद्धा सख्खे/आत्ते/मावस/चुलत..असे सगळे यायला लागलेले आहेत!) मग तो कान चांगला पिळून वगैरे होतो.भाऊस आहेर देणेचे होते.
पण एकदा
एक अजब गंम्मत जाहली,हा भाऊ इतका बिच्चारा संथ आणि आज्ञा-धारक होता,की मी त्यांच्या कडून-"हा तुझा उजवा हात घे आणि(वराजवळ नेववून..)त्याच्या उजव्या कानाशी लाव" असं सांगितल्यावर त्या भाऊरायानी त्या उभयता पाठि असताना.....स्वतःचा(च) उजवा कान धरिला,आणि मला तितक्याच मख्ख पणे विचारलं:- "आता!!!!!!!!!!?" ( *dash1* ) स्टेजखालच पब्लिक हसून हसून मरायच्या बेताला आलवतं..आणि मी ही विशेष जिवंत उरलेलो नव्हतो. तरिही मी जितका जीव माझ्या शिवात उरला होता...तो एकवटून त्याला सांगितलं:- अरे...मुला...आपला नव्हे...त्याचा कान धर!मग त्यानि पुन्हा त्याच आज्ञा-धारकपणे नवर्यामुलाच्या कानाला हात लाऊन परत चेहेरा.."आता!!!!!!?" असा केला(च). मग मी त्याला... "फिरकीचा नळ पिळून बंद करतात तसा पिळ आता तो कान" असं उद्-वेगानी सांगितलं,आणि त्या नवर्या मुलाचे बिचार्याचे हाल जाहले. तो पाटावरून अक्षरशः बोंबलत उठला. शेवटी त्या उप-स्थिंतापैकी एका समंजस मामाला, माझी आणि वधुवरांची दया आली...आणि त्यानी या आज्ञा-धारक भाऊरायाला स्टेजवरून फोटो वगैरे काढवून खाली नेला. आणि आंम्ही सगळेच...सुटलो! =)) नंतर मग एकदा, आंम्हा भटजींच्या गप्पा चाल्लेल्या असतांना,एका (खर्या) ज्येष्ठःश्रेष्ठाकडून जे हाती लागलं... ते असं:- ज्येष्ठःश्रेष्ठः- "ही...कानपिळी आहे ना..? का...य?. ती मंजे...तुम्ही हल्लीची मुलं ( :-/ ) - वराचा कान/बिन पिळायला लावता ना..तसं काहि नाहीये.. समजलं!? आंम्ही:-(हल्लीची मुलं ;) ..) :- "मग काय हो नक्की!?" *scratch_one-s_head* ज्येष्ठःश्रेष्ठः-"हां..ते सांगतो..असें समोर बसा आधी..! तो वधूचा भाऊ अस्तो ना.. जो त्या लाजा होमात बहिणीच्या ओंजळीत लाह्या घालतो ना....,तेंव्हा त्यावेळी त्या भावाला वरपक्षाकडून डोक्यावर (आहेर म्हणून..) जी पगडी चढवली जायची ना....,ती कानावर जिथे बसते..तिथे पिळा मारलेली असायची..म्हणून हो..ती कानपिळी(पगडी!), आणि तिचा तो आहेर. आंम्ही:- अस्सं होय! (मनात..:-काय प्वॉइंट गावला! *biggrin* ) ज्येष्ठःश्रेष्ठः- त्या शब्दातली ती पगडी,तुमच्या हल्लीच्या भाषेत काय म्हणतात ना...तशी ती सायलंट झाली,आणि ही (कान-पिळायची) नको ती ब्याद (आमच्या) नवर्यामुलांच्या-पाठिमागे आली! आंम्ही:-(मनातः-ख्या..ख्या..ख्या..ख्या..!) अस्सं आहे होय ते!? बरं झालं कळ्ळं! थँक्यू हां बंडूतात्या थँक्यू! ज्येष्ठःश्रेष्ठः- हो........... असू दे हो असू दे..ते थँक्यू कळ्ळं तुमचं! आता श्टेजवर असे जेंव्हा नाचाल ना..तेंव्हा तुंम्ही खरे! हॅ..हॅ..हॅ..हॅ.. (त्यांच्या समवयस्क मित्राकडे वळत..) सखाराम..तंबाखू दे..चल! आता, "ते चांगलं..का हे चांगलं?" असा प्रश्न माझ्या मनात आला.केवळ या प्रसंगापुरताच नव्हे,तर धर्मक्षेत्रात असे अनेक ध चे मा..आणि(परत) मा चे ध.. जाहलेले आहेत..त्या साठीही! पण अश्या गोंधळाच्या प्रसंगी माझा तो काका माझ्या कानाशी येतोच आणि मला सांगतो:- अरे..आत्मू..हे बघ...ध असो किंवा मा असो..जोपर्यंत मुदलात फरक पडत नाही,तोपर्यंत व्याजाचा विचार आपण कंशाला करांचा!?..आणि शेत तेच असणार...हवामान बदलंलं की पेरायला बी फक्त वेगळं येतं...इतकाच काय तो फरक. काय समजलांस!!!? आपलं काम पेरणी करणं आहे...अरे..आपण पैसे घेतो ना त्याचे! मी बराचसा अंतर्मुख..आणि काही काळ गप्प! =============== क्रमशः ============= मागील सर्व भागः- 1 .. 2 .. 3 .. 4 .. 5 .. 6 .. 7 .. 8 .. 9 .. 10 .. 11 .. 12 ================================================Book traversal links for गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१३
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धुराला भ्यायलात,तर पुढे आगिशी
छान !
अरे..आत्मू..हे बघ...ध असो किंवा मा असो..जोपर्यंत मुदलात फरक पडत नाही,तोपर्यंत व्याजाचा विचार आपण कंशाला करांचा!?..आणि शेत तेच असणार...हवामान बदलंलं की पेरायला बी फक्त वेगळं येतं...इतकाच काय तो फरक. काय समजलांस!!!? आपलं काम पेरणी करणं आहे...अरे..आपण पैसे घेतो ना त्याचे!बोलके शब्द !हा पण भाग मस्त....
छान लिहिलय हो गुर्जी! त्या
हाहाहा अतिशय सुंदर!!!
काकांचे शब्द पटले. बाकी
कान पिळीचा अर्थ समजला
@बाकी आता कानपिळी पगडीची फॅशन
मस्त !!!
खुसखुशीत
मस्तच !!
हाण तेज्यायला. मस्त नवीन
मस्त झालाय हा भाग!
होळकरशाही वरून आठवलं,
प्रगती आहे...
प्रगती आहे...
@ "होळकरशाही पगडी" म्हणतात ना
मस्त
छान..
भारी
भारी
गुर्जी धमाल आहेत की.
मस्त
मजेदार लिहिता .
मोठ्या वयाच्या नवरानवरीला पण
हा का?
यकदम् कर्रेट्टम् ॥
@पण नवरानवरीचे वय कमी असले तर
>>संमंध दिसतो का?
मापी द्यावी शब्द संमंधा!