क्यूं के ये इश्क , इश्क है .. भाग १

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
21 Jul 2014 - 7:17 pm

प्रस्तावना- ही कलाकृती संपूर्ण पणे गायला अवघड आहे . यात आलापी तान , सरगम हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रकार आहेत . त्याच बरोबर तुमच्या आवाजाच्या रेंज ची परीक्षा पाहाणारी ही कव्वाली आहे. तरीही मी ठरविले आपण ही गायचा प्रयत्न करायचा. माझ्या संग्रही ही कव्वाली आहे. पण त्यातील वेगवान गायकी मुळे " अल्फांस " ( शब्द ) उचारण्यात अडचण येत असे म्हणून आंजावर शीध घेतला तर एकाने याचा भावानुवाद कम शब्दानुवाद इंग्लीश मधे केलेला आढळला. मग मला वाटले आपणजी मिपाच्या वाचकांसाठी हा प्रयत्न मराठीत करून पहावा. याच बरोबर त्यात थोडा सांगितिक भाग ही रसास्वादाप्रित्यर्थ घेतलाय.

१९५० ते १९७० हा काळ हिंदी चित्रपट संगीतातील सुवर्ण काळ होता. यात युगल गीते, विरह गीते, सोलो गीते, बालगीते, भजने, देश भक्तीपर गीते , हास्य गीते, कव्याल्या , गझला या बाजूने गीतकारानी लेखन केले. शायरी व फिल्मी अंदाज यांचा सुरेख संगम साधणारे शकील, साहीर, राजा मेहंदी अली खान, मजरूह, जान निसार, कैफी आझमी, हसरत यानी उत्तमोत्तम गीतांची बरसात या काळात केली. कव्वाली या प्रकाराचा हमखास वापर त्या काळात लोकप्रियतेसाठी व मनोरंजना साठी झाला. मेरी तसवीर लेकर क्या करोगे ,निगाहे मिलानेको, हमे तो लूट लिया मिलके हुस्नवालोने. झूम बराबर झुम शरावी चढता सूरज धीरे धीरे अशा एक से बढकर एक कव्वाल्यानी लोकांचे कान तृप्त केले. ज्या प्रमाणे मधुबनके राधिका नाचेरे असे शास्त्रीय रागदारीवर आधारित गीत परत झाले नाही तसेच फिलमी कव्वालीचे उदाहरण म्हणजे बरसात की एक रात या चित्रपटातील रोशन यानी संगीतबद्ध केलेली , साहीर लुधीयनवी यानी लिहिलेली व भारतभूषण, श्यामा मधुबाला यानी अभिनित केलेली, मन्नाडे, रफी व आशा भोसले यानी आपल्या समर्थ आवाजानी अजरामर केलेली " ना तो कारवॉकी तलाशहै " ही कव्वाली. आवाज, साज, अल्फांस की मौसिकी काय काबिले तारीफ असा प्रश्न पडावा अशी अप्रतिम कलाकृति. प्रेम अध्यात्म सार्याचे मर्म उलगडून दाखविणारी साहीर यांची प्रतिभा. असे हिचे वर्णन करावे की मुस्लीम सोशलचे संगीत एका हिंदू माणसाने दिले आहे याचा अचंबा वाटवणारी सगीत यात्रा हिला म्हणावे ? शास्त्रोक्त साठी तयार गळा असलेल्या मन्ना दांचा हा मास्टर पीस म्हणावा की रेंज साठी प्रसिद्ध असलेल्या रफींचा हा सरताज आयटेम म्हणावा ? आशाबाईंचा बुलंद आवाज . सारंगी, हारमोनियम टाळ्या सगळ्याचा सुरेख संगम इथे झालेला दिसतो.

ही कव्वाली संपूर्ण पणे कहरवा -- बोल- धागे नतिन नक धिन या तालात असून या तालाच्या मध्य लयीत याची सुरूवात होते व पुढे निम्यावर लय वाढवून पुढची कव्वाली पूर्ण होते. सुरूवात धागे नति नक धिन असा ताल चालू होतो. त्यात हाताचा तळ डग्याच्या कातड्यावर घासून केलेला घुमाव दार आवाजात धिक धिक असा कहरवा वाजू लागतो. त्यानंतर वाद्यावृंद चालू होऊन यात सारंगीचे सूर मिसळतात.पाठोपाठ सतारीची छेड.मग पुन्हा वादद्यवृंद लगेचच हारमोनियमचे सूर. लय वाढते टाळ्या येऊन मिळतात व हे अग्रसंगीत समेवर येते. कलावती रागाशी साधर्म्य सांगणार्‍या सुरावटीत मन्नादांची आलापी सुरू व आपले कान तापायला सुरूवात .

ना तो कारवाँकी तलाश है
ना तो हमसफरकी तलाश है
मेरे शौक ए खाना खराब को
तेरे रहगुजरकी तलाश है

------मी कोणत्या जथ्थ्याच्या शीधात नाहीये वा सहप्रवाशाच्या . माझ्या आकांक्षाची जी माती झालीय तिला तुझ्याकडे घेऊन
जाणार्‍या एक पथाचा शीध घ्यायचाय !

मेरे नामुराद जूनूनका है इलाज कोई तो मौत है
जो दवा के नामपे जहर दे उसी चारागर की तलाश है

माझ्या या दुर्दैववशात वेडावर एक मरण हाच मला उपाय दिसतो. मग त्यासाठी औषध देण्याचा बहाणा करून विष पाजणार्‍या अशा वैद्याच्या मी शोधात आहे.

तेरा इश्क है मेरी आरजू
तेरा इश्क है मेरी आबरू
दिल इश्क जिस्म इश्क है और जान इश्क है
ईमान की जो पूछो तो ईमान इश्क है

तुझं प्रेम मिळविणं ही माझी इच्छा तीच माझा सन्मान . हे हृदय म्हण्जे प्रेम हे शरीर म्हणजे प्रेम हे सारे आयुष्य म्हणजेच प्रेम ! निष्ठेचं विचाराल तर निष्ठा हे देखील प्रेमच.
तेरा इश्क मै कैसे छोड दूं
मेरी उम्र भरकी तलाश है

मग तुझ्या प्रेमाला मी पारखं का व्हावं? त्याच्या तर शीधात मी जन्मभर आहे.

ये इश्क इश्कै है इश्क इश्क ,ये इश्क इश्कै है इश्क इश्क
हे प्रेम आहे आहेच हे प्रेम , असंच आहे हे प्रेम
जाँ सोझ की हालतको जाँ सोझ ही समझियेगा
एका विदीर्णाची स्थिती दुसरा एक तसाच विदीर्ण समजू शकतो . ( घायल की गति घायल जाने प्रमाणे)
मै शमासे कहता हूं मैफिलसे नही कहता ....
मला हे फक्त या दीपज्योतीला सांगायचेय .मला जमलेल्या मंडळीशी काही बोलायचे नाहीये.
क्युं के ये ये इश्क इश्कै है इश्क इश्क ,ये इश्क इश्कै है इश्क इश्क
हे प्रेम आहे आहेच हे प्रेम , असंच आहे हे प्रेम
सहर तक सबका है अंजाम जलकर खाक हो जाना
भरी मैफिलमे कोई शमा या परवाना हो जाये

पहाट होईपर्यंत प्रत्येकाचा शेवट जळून राख होण्यात होईल. या मैफलीत एक ज्योती तरी किंवा पतंग होणे तरी क्रमप्प्राप्त आहे.
क्युं के ये ये इश्क इश्कै है इश्क इश्क ,ये इश्क इश्कै है इश्क इश्क
हे प्रेम आहे आहेच हे प्रेम , असंच आहे हे प्रेम

या मैफलीत हिरो भारतभूषण ( हिंदी चित्रपट सृष्टीला भार- भूषण असे कित्येकांचे मत) आतापर्यंत खुर्शीद बावरा व एक अनामिक असे दोन पुरूष तर रत्ना व श्यामा असे दोन गोड चेहरे ( ललना) यांची जुगल बंदी जरा अस्वस्थपणेच पहात असतो.
कव्वाली जोरात आली असतानाच हा एकदम आपल्या जागेवरून उठून महफलीत सक्रीय होतो तोच मुळी हरहुन्नरी गायक
मोहंमद रफी यांच्या आवाजात दरबारी रागातील एक गंभीर आलापी घेत.
ओ रे ना आ आ आ ----- ( ध नि सा रे ग .....रे ग रे सा )
वहशत ए दिल रस्न-ओ- दार से रोकी ना गयी
किसी खन्जर किसी तलवार से रोकी ना गयी
इशक मजनूं की वो आवाज है जिसके आगे
कोई लैला किसी दीवार से रोकी ना गयी ..

कोणा एखाद्याच्या लहरीचे वेड , दोरखंड वा जोखड यानी प्रेमाला कधी रोखता आलेले नाही. कोणताही खंजीर ,तलवार प्रीतीला अडवू शकत नाही. प्रेम त्या ( अजरामर) मजनू चा आवाज आहे ज्याच्या समोर कोणतीही भिंत एखाद्या लैला
च्या मार्गात आडवी येऊ शकली नाही.
कारण काय
क्युं के ये ये इश्क इश्कै है इश्क इश्क ,ये इश्क इश्कै है इश्क इश्क
हे प्रेम आहे आहेच हे प्रेम , असंच आहे हे प्रेम !

वो हंसके अगर मांगे तो हम जान भी देंगे
वो जान क्या चीझ है ईमान भी देंगे

त्यानी ( म्हणजे मंडळी प्रियेने ) जर जीव मागितला तर हसत देउ. अरे जिवाचे काय सारी निष्ठा अर्पण करू ( तिच्या पायापाशी ) .
कारण ---
क्युं के ये ये इश्क इश्कै है इश्क इश्क ,ये इश्क इश्कै है इश्क इश्क
हे प्रेम आहे आहेच हे प्रेम , असंच आहे हे प्रेम
मित्रानो - भाग २ लवकरच .

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

आह्ह... माझी आवडती कव्वाली. :)
इथे दिल्या शिवाय कसा राहु ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

आयुर्हित's picture

21 Jul 2014 - 9:40 pm | आयुर्हित

वाह व्वा! क्या बात है!!
मान गये चौकटराजाजी!!!
तो आप भी ये शौक रखते हो.
एक अप्रतिम काव्य आहे हे.
खरोखरच "प्रतिभा" होती त्याकाळच्या कलाकारांना.

फक्त तो शब्द "अल्फांस" नसुन "अल्फाज़" आहे.

मोहबत की बात करो न नफरत की बात करो
बरसो बाद मिले हो, अपने दिल की बात करो|

गमो का क्या है, वो तो आते जाते रहते है,
तुमको खुशिया मिली है, खुशियों की बात करो|

एक कांटा दिल में चुभा है, नासूर बन गया,
चारागर कौन है दिलो का, उसकी बात करो|

बातो में उसकी ज़हर का एहसास क्यों होने लगा
खाई है चोट गहरी , शिकायत की बात करो|

आसां नहीं है मर जाना, सांसे तो चलती है 'उदास'
मौत के आने तक ही सही, जिंदगी की बात करो|

चौकटराजा's picture

22 Jul 2014 - 7:02 am | चौकटराजा

बापरे ! चुक झाली राव. त्यामुळे अनेक धन्स !

एस's picture

22 Jul 2014 - 12:42 pm | एस

फक्त तो शब्द "अल्फांस" नसुन "अल्फाज़" आहे.

हेच म्हणायला आलो होतो. बाकी लेख फस्क्लास हो चौरा! शा.सं. मधलं काही कळत नाही पण ही कव्वाली जबरदस्त आवडते.

मुक्त विहारि's picture

21 Jul 2014 - 10:20 pm | मुक्त विहारि

मला लहानपणी कव्वाली जास्त आवडत न्हवती.

पण

परदा है परदा, (अमर अकबर अँथनी) लक्षात राहिली, ती अमिताभ मुळे.

आणि

मग वयांत आल्यावर आवडली ती,

झूम बराबर झूम शराबी...

ह्या २ कव्वाल्याच तेव्हढ्या खर्‍या,

आणि

चढता सूरज़ धीरे धीरे... समजायला लागली की, प्रुथ्वीवरचे चंबू-गबाळे आवरायला सुरुवात करणार.

भिंगरी's picture

21 Jul 2014 - 10:56 pm | भिंगरी

गणपती उत्सवात लहानपणी केलेल्या नाचाची आठवण आली
कव्वाली होती,
उन्च भारत का नाम हो जाये,
बात बन जाये काम हो जाये (बहुधा असंच काहीतरी असावं चूक भूल द्यावी घ्यावी)
(आता फक्त पालथी मांडी घालून टाळ्या वाजवलेल्या आठवतात.)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2014 - 12:08 am | अत्रुप्त आत्मा

*clapping*

दोन tidbits:

1) बहुतांशी उर्दू-प्रचूर हिंदीत असलेल्या या कव्वालीत अतिशय चपखलपणे एक पंजाबी कडवं मध्येच आहे (व्हिडिओ मध्ये ८.११ या वेळी ऐका):

इश़्क ना पूच्छे, हाय इश़्क ना पूच्छे दीन धरम नू, इश़्क ना पूच्छे जाता
इश़्क दे हाथों गरम लहू विच, डुबियां लाख बरांता

2) गाण्यातील एक अतिशय सुंदर जागा म्हणता येतील अशा "बहुत कठीन है डगर पनघट की, लाज राख मेरे घुंघट पट की" या ओळी मूळच्या अमीर खुस्रोने लिहिलेल्या आहेत असं वाचल्याचं आठवतं.

बाकी 'भाग २ लवकरच' म्हणून उत्सुकता वाढवलीत (साधारणपणे 'ना तो कारवां की तलाश है' हा या कव्वालीचा पहिला भाग आणि 'ये है इश़्क इश़्क' हा दुसरा भाग असं ऐकलं होतं, तेंव्हा आता यापुढे आणखी काय असेल ही उत्सुकता आहे).

[वरील व्हिडिओ पहातांना पुन्हा एकदा या चित्रपटातील 'श्यामा'च्या चेहेर्‍याचं शबाना आझमीशी साम्य जाणवलं...]

दोन्ही टिडबिट्सबद्दल धन्यवाद!

अमीर खुस्रोच्या ओळी आहेत असं कुठेतरी वाचल्याचं मलाही वाटतंय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jul 2014 - 9:29 am | ज्ञानोबाचे पैजार

चौराकाका,

फारच सुंदर गाणे आहे. माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक. कॉलेज मधे असताना पाठही केले होते.

हा भाग आवडला. संपुर्ण गाण्या बद्दल एकाच भागात लिहिले असते तर जास्त आवडले असते.

आता दुसरा भाग लवकर टाका बरं.

पैजारबुवा,

ऋतुराज चित्रे's picture

22 Jul 2014 - 4:56 pm | ऋतुराज चित्रे

विविधभारतीवर हे गाणे कधिच संपूर्ण ऐकवले जात नसे, ऑल इंडिया रेडिओवर मात्र संपूर्णच ऐकवले जायचे.

चौकटराजा साहेब, फार सुंदर फार मस्त. लहानपणा पासुन ही कव्वाली आयुष्याचा एक आविभाज्य अंग झाली आहे. घरात सुट्टीच्या दिवशी घरी असलो किंवा प्रवासात असताना ही कव्वाली व बैजुबावरा मधल भजन मन तरपत हरी दरशन को आज... हे भजन नक्की ऐकतोच. फार सुंदर लिहील आहेत सर.

धन्या's picture

22 Jul 2014 - 7:44 pm | धन्या

सुंदर लिहिलंय काका.

"चढता सुरज धीरे धीरे" ही कव्वाली पूर्वी निराशाजनक वाटायची. हल्ली जेव्हा जेव्हा ही कव्वाली ऐकतो तेव्हा वास्तवाची जाणिव अधिकाधिक गडद व्हायला लागते.

vikramaditya's picture

22 Jul 2014 - 9:48 pm | vikramaditya

लिखाणाचा आनंद घ्यायला मिपावर येतो. अप्रतिम.

vikramaditya's picture

22 Jul 2014 - 10:13 pm | vikramaditya

नाही का? बरसात की एक रात नव्हे.

चौकटराजा's picture

23 Jul 2014 - 10:47 am | चौकटराजा

बाऱकाईने वाचल्या बद्द्ल धन्यवाद.

vikramaditya's picture

23 Jul 2014 - 6:05 pm | vikramaditya

फारच आवडला. त्या अनुषंगाने इंटरनेटवर माहिती शोधत होतो. त्या वेळी ही गोष्ट लक्षात आली. बाकी विशेष काही नाही. चूक काढण्याचा उद्देष नव्हता.

आतिवास's picture

23 Jul 2014 - 7:39 pm | आतिवास

लेख आवडला.
पुढच्या भागाची वाट पाहते.

फारएन्ड's picture

23 Jul 2014 - 11:59 pm | फारएन्ड

मस्त लिहीले आहे. पुढचेही वाचायची उत्सुकता आहे. ते 'मरता हूँ तो कहते है के जीना होगा' वाल्या ओळी जबरी आहेत. पुढच्या लेखात येतील बहुधा.

शुचि's picture

24 Jul 2014 - 9:24 pm | शुचि

बहोत बहोत खूब!!! आवडले.