असं गं रक्तिम मुख तुझं
जसं मिटल्या लाजाळूचं पान ,
त्यावर टेचात चालणं गं
वळवी वैराग्याची मान !!
मीच थिटा वर्णू कसा
सृष्टीत तूच महान,
सुरमयी कटी सखे
तुझा कुमुदिनीचा वाण !!
एक पाचोळाच मी सखे
ज्याला कुठून देहभान ?
मन आलं दबकत चाखण्या
तुझे ओठ रंगले पान !!
बेहोष गंध तुझा तो
त्यात रेखीव कमान,
बेसावध तुझ्यात तू मात्र
भुंग्यांना त्याची जाण !!
कधी जाण हृदय हेही
खुपसे तुझ्यावर कुर्बान,
मला लाभावं माळण्या
वेणी गजरयाचा मान !!
नजरे नको प्रतारणा आता
तुला मनाचीच आण,
काय आहे गं सृष्टीत ?
समोर लावण्याची खाण !!
श्री. साजीद यासीन पठाण
दह्यारी,
(पलूस, सांगली)
प्रतिक्रिया
1 Jul 2014 - 11:30 am | आयुर्हित
कधी जाण हृदय हेही
खुपसे तुझ्यावर कुर्बान,
मला लाभावं माळण्या
वेणी गजरयाचा मान !!
व्वा! क्या बात है!! बहोत खुब!!!
1 Jul 2014 - 12:48 pm | एस
वळवी वैराग्याची मान हे बरोबर की वाळवी वैराग्याची मान हे बरोबर याचा विचार करतोय. तसं दोन्ही बरोबर आहेत म्हणा! पहिल्यात वैराग्य डचमळीत (डळमळीत असाही प्रमाणभाषेतला शब्द) होणे तर दुसर्यात वैराग्य संपून जाणे.
1 Jul 2014 - 1:31 pm | अनुप ढेरे
व्वा! मस्तं आवडली कविता!
1 Jul 2014 - 2:53 pm | psajid
खरेतर तो शब्द वळावी किंवा वळवी वैराग्याची मान असाच आहे. इथे कविता डकवताना तो लक्षात आला नाही त्याबद्दल दिलगीर आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
1 Jul 2014 - 10:03 pm | पैसा
कविता आवडली. वाळवी काढून टाकली आहे! :)
2 Jul 2014 - 7:03 am | मदनबाण
वाह... मस्तच !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रिमझिम गिरे सावन... :- मंझिल
2 Jul 2014 - 6:07 pm | अत्रुप्त आत्मा
एक पाचोळाच मी सखे
ज्याला कुठून देहभान ?
मन आलं दबकत चाखण्या
तुझे ओठ रंगले पान !!>>>. वाह्ह! मजा आ गया.
2 Jul 2014 - 6:11 pm | प्यारे१
आवडली कविता...
18 Jul 2014 - 9:32 pm | स्पंदना
सुरेख!
19 Jul 2014 - 9:39 am | अत्रुप्त आत्मा
*i-m_so_happy*