फिशपाँड....

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
19 May 2008 - 12:21 am

आत्ताच एका प्रतिसादात ऋषिकेशने वापरलेला कंडा हा शब्द बघितला. खूप दिवसांनी हा शब्द समोर आला. तसा हा शब्द खूपच जुना. भाईकाकांनी पण हा शब्द वापरला आहे, पूर्वरंग मधे, मलाय भाषेत त्यांना हा शब्द 'मुलगी' ह्या अर्थी सापडला होता. मी सुद्धा आठवायचा प्रयत्न करायला लागलो की आमच्या वेळेला काय शब्द फेमस होते ते... पण छया: काही आठवायला तयार नाही. पण तेवढ्यात एकावरून एक असे काहितरी जुने जुने आठवायला लागले आणि अचानक आमच्या शाळेत १०वी च्या शेवटी झालेला 'सेंड ऑफ' चा कार्यक्रम डोळ्यासमोर आला. खासकरून त्यातले काही फिशपाँड्स...

त्यात काही 'नेहमीचे यशस्वी' घिसेपिटे होतेच, उदा. चंद्र वाढतो कलेकलेने, '----' वाढतो/ते किलोकिलोने वगैरे... पण काही मात्र खतरनाक आणि 'वाईट्ट' होते. त्यातले काही इथे देतो आहे.

एक मुलगी जरा 'अशीच', म्हणजे 'अशीच', अहो अशीच म्हणजे मित्र वगैरे अगदी भरपूर तिला....
'लेक लाडकी ह्या घरची, होणार सून मी दहा घरची'

आम्हाला १०वीत इंग्लिश मधे एक धडा होता त्यात एक मेड्यूसा नावाची चेटकीण होती जिच्या डोक्यावर केसांच्याऐवजी नागमोडी साप होते... मग काय एक मुलगी होती आमच्या वर्गात कुरळ्या, केसांची तिला मेड्यूसा हे नाव अपरिहार्यच ना.... तिला...
'अटक मटक चवळी चटक, मेड्यूसाच्या डोक्याची *** सटक'

असेच काही काही... तुमच्या कडून पण ऐकायला आवडेल....

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

टारझन's picture

5 Oct 2008 - 12:51 am | टारझन

कॉलेजात आमच्या एक साउथ इंडियन पोरगी होतो.. रंगाने चॉकलेटी .. =)) आणि मनाने फार मोठी पण उंची फक्त ५ फुट आणि नुसतं खी खी खी करून हसणं ... तिला टाकलेला हा ...

सकाळी हसतेस .. दुपारीही हसतेस ..
संध्याकाळी हसतेस .. आणि रात्री ही हसतेस ..
श्यामले .. तुला काय वाटतं ? तु काय एकटीच दात घासतेस ?
(आणि नंतर सगळ्यांनी नाकाला हात लावले)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

टुकुल's picture

5 Oct 2008 - 1:02 am | टुकुल

>>> 'लेक लाडकी ह्या घरची, होणार सून मी दहा घरची'
=)) .. लई भारी..

आमचेही काही

मुलींच्या चेश्टेसाठी..
"आप आये तो बहार आयी,
आप गये तो ओर चार आयी"

सावळ्या (काळ्या) यक्तिसाठी...
"पाठुन पाहिलं तर ईस्त्री कडक,
पुढुन पाहिलं तर डांबरी सडक."

टुकुल's picture

5 Oct 2008 - 1:06 am | टुकुल

"समोरुन आला म्हशीचा कळप,
त्यात म्हणे मला ओळख" :)

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Oct 2008 - 3:25 am | ब्रिटिश टिंग्या

आम्हाला इंजिनियरिंग ग्राफिक्स शिकवायला एक काटकुळे मास्तर होते. त्यांना वार्षिक स्नेहसंमेलनात पडलेला फिशपाँड -

"फ्रंटव्ह्युमे लाईन! टॉपव्ह्युमे पॉईंट!"

अथांग सागर's picture

5 Oct 2008 - 3:54 am | अथांग सागर

स्वतःला समजते कॉलेजची परी,
तुझ्यापेक्षा तर आमची 'मोलकरीण' बरी.

-अथांग सागर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2008 - 10:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा मला मिळाला होता शाळेत कधीतरी!
आणि माझा बाळूपणा म्हणजे त्याच दिवशी मला असा काही प्रकार असतो हे आणि माझं नाव वर्गातल्या पोरांना माहित आहे हेही समजलं होतं! :-)

घासू's picture

5 Oct 2008 - 4:13 pm | घासू

लेके पहेला पहेला प्यार
आयी दूसरी तिसरी चो॑थी यार

विजुभाऊ's picture

16 Oct 2008 - 4:02 pm | विजुभाऊ

मला पडलेला फिश्पॉन्ड
गुजर रहे थे वह जिस गली से
गुजर रहे थे हम भी उसी गलीसे
फूल बरस रहेथ उनपर
फूल बरस रहे थे हमपर
मगर........
मगर वे थे डोलीमे
और हम थे डोली उथाये खान्दोपर

वृषाली's picture

16 Oct 2008 - 5:12 pm | वृषाली

"मी नाही त्यातली . कडी लावा आतली."

अनिल हटेला's picture

16 Oct 2008 - 5:19 pm | अनिल हटेला

कॉलेज कसं,
पंढरी जसं....

शिक्षक कसे,
विट्ठल-रुखमाइ जसे..

कॉलेज च्या मुली कशा,
चंद्रभागेतल्या मासोळ्या जशा..

कॉलेजची मुलं कशी,
त्यावर टपलेली बगळी जशी...!!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

स्पृहा's picture

16 Oct 2008 - 5:52 pm | स्पृहा

माझ्या हसण्यावर जाऊ नका
माझ्या रुसण्यावर जाऊ नका
जरी पुरुषासारखा असलो तरी
माझ्या पुरुषत्वावर जाऊ नका.... ;)

टारझन's picture

16 Oct 2008 - 6:35 pm | टारझन

जरी पुरुषासारखा असलो तरी
माझ्या पुरुषत्वावर जाऊ नका....

हो स्प्रुहा भाऊ .. त्याची कल्पना तुमच्या नावावरनंच आली :) (ह.घ्या)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

नितीनमहाजन's picture

16 Oct 2008 - 6:12 pm | नितीनमहाजन

प्रसिध्द व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या मुलाला मिळालेला हा:

युवर फादर इज अ ग्रेट आर्टिस्ट ऍण्ड यू आर हिज मास्टरपीस.

डॉ.प्रसाद दाढे's picture

16 Oct 2008 - 6:28 pm | डॉ.प्रसाद दाढे

आमच्या क्लासमधल्या एका अतिशय जाड-जूड मुलीला हा वाईट फिशपॉन्ड मिळाला होता
'दूरसे देखा तो चीनका गेट था, पास आके देखा तो ००० का पेट था'
खेड्यातून आलेल्या मुला॑ना हा हमखास मिळत असे,
'पौडावरून आल॑य येड॑, बर्फाला म्हनत॑य पेढ॑'
आता विचार केला की थोड॑ वाईटही वाटत॑ पण ते॑व्हा वात्रटपणा करता॑ना
दुसर्‍याच्या भावना॑चा वगैरे विचार करायची अक्कल नव्हती!

प्राजु's picture

16 Oct 2008 - 7:54 pm | प्राजु

मला मिळालेले फिशपॉण्ड..
१. किरकोळ गप्पांचे ठोक व्यापारी - प्राजक्ता
२. प्राजक्ता गेली करायला रक्तदान ,डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Oct 2008 - 7:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

२. प्राजक्ता गेली करायला रक्तदान ,डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण..
मग कशाला गं वजनाची चिंता? ;-)

प्राजु's picture

16 Oct 2008 - 7:57 pm | प्राजु

त्यावेळी कॉलेज मध्ये होते बाई. वजनाचा काटा ४२-४५ किलो च्या पुढे जातच नसे आणि आता..मागे यायचं नाव घेत नाही बघ. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

16 Oct 2008 - 8:18 pm | टारझन

. वजनाचा काटा ४२-४५ किलो च्या पुढे जातच नसे
अरे बापरे .. हो हे फक्त त्या काळी शक्य आहे . हल्ली काटा ९०-९५ च्या खाली यायला नको म्हणतो ... विचारा काट्याला :)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

प्राजु's picture

16 Oct 2008 - 8:58 pm | प्राजु

अरे बापरे .. हो हे फक्त त्या काळी शक्य आहे . हल्ली काटा ९०-९५ च्या खाली यायला नको म्हणतो ... विचारा काट्याला
अरे तुझ्यावजनाबद्दल चाललं नाहिये. माझ्याबद्दल चालू आहे. तुझ्याकडे बघूनच तुझा वजनकाटा असेच म्हणत असेल याची कल्पना येते. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Oct 2008 - 9:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे बापरे .. हो हे फक्त त्या काळी शक्य आहे . हल्ली काटा ९०-९५ च्या खाली यायला नको म्हणतो ... विचारा काट्याला
अरे तुझ्यावजनाबद्दल चाललं नाहिये. माझ्याबद्दल चालू आहे. तुझ्याकडे बघूनच तुझा वजनकाटा असेच म्हणत असेल याची कल्पना येते.

तुझ्याबद्दलच आहे ते प्राजू, फक्त ९०-९५ पाऊंड आहे ते! टार्‍याचं वजनाबद्दल एवढा अनादर नको दाखवूस, चार आकडी नाही आलं म्हणजे मिळवलं! आता बोल टार्‍या!

विचारी मना's picture

16 Oct 2008 - 9:10 pm | विचारी मना

आमच्या कॉलेजात पड्लेले फिशपॉन्ड...............
१. आमची माती आमची माणस
गुड्घ्यात मेन्दू अन डोक्यात कणस !
२. कॉलेजमध्ये येतो सुटाबुटात
घरी झोपतो गोनपाटात !

विचारी मना's picture

16 Oct 2008 - 9:17 pm | विचारी मना

परमपूज्य गुरुन्वर पड्लेला......त्याना पुढे टक्कल होत....

" BACK SALAMAAN.......
FRONT SHARAD !! " (sharad talavalakar)

वारकरि रशियात's picture

17 Oct 2008 - 1:23 pm | वारकरि रशियात

मुक्तसंगः अनहंवादि
आमच्याच (उरोज सौश्ठवात ) उन्नती नसलेल्या (वर्ग)मैत्रिणीला दिलेला:
म्यांचेश्टर !

स्पृहा's picture

17 Oct 2008 - 3:37 pm | स्पृहा

लुकड्या मुलाला.........

फॅरेक्स विना गुटगुटीत बाळ

वारकरि रशियात's picture

18 Oct 2008 - 1:07 pm | वारकरि रशियात

मुक्तसंगः अनहंवादि
आमच्यापेक्ष्या एक वर्ष पुढे असलेल्या जोडीला (मुलाचे नांव उदा. काळे व मुलीचे नांव उदा. काकोडकर वगैरे) :
ते दोघे एकत्रच (एकाच गाडीने एकाच डब्यातुन) कॉलेजला येत - जात. एकाच बाकावर बसत. प्राक्टिकललाही पार्टनर (आल्फाबेटीकल रोल नंबर्स) इ.इ.

नॉट टु बी लू़ज शंटेड!