नाही म्हटले तरी तुम्ही सतत येत राहता ……
मी अलिप्तपणे दूर व्हायचा प्रयत्न करतो ….
तरी बघता बघता कळत नाही …
कधी आणि कसा तुमच्या ओढीने खेचला जातो ….
एक आली की दुसरीही येते …
शृंखला अव्याहत सुरू असते
आजूबाजूच्यांना काय माहीत …
मन कुठल्या गाळात रुतून बसते
आपणच अडकायचं नी धडपडत बसायचं….
हा जुनाच नकोस खेळ रोज खेळणं…
तुम्हाला दूर लोटायच आहे हे ठरवूनही
तुमच्याच कुशीत नकळत शिरणं …
नेहमीच्या ह्या ओढाताणीत जीवाची किती घालमेल….
जो ह्या चक्रात एकदा तरी सापडलाय फक्त त्यालाच हे कळेल….
एक दिवस तुमच्याबरोबर मलाही क्षितिजाकडे घेऊन चला ……
तेव्हाच शांतपणे मागे वळून म्हणू शकेन….
"चला,रंगमंचावरचा अजून एक प्रवेश पूर्ण झाला…"
प्रतिक्रिया
18 Jun 2014 - 12:19 am | भृशुंडी
टिंबकाव्य..
ह्म्म...