डॉ सुहास म्हात्रेinजनातलं, मनातलं 12 Jun 2014 - 10:41 pm
आंतरजालावर असलेली ही व्हिडिओ क्लिप मला एका नातेवाईकाने पाठवली. ती इतकी आश्चर्यकारक आहे की इथे टाकल्याशिवाय राहवले नाही. प्रत्यक्ष पाहूनच ठरवा शिर्षक बरोबर आहे की नाही !
मी अजूनही विचार करतोय की यात नक्की त्या कावळ्याची चतुराई आहे की विडिओ बनवणार्यांची चलाखी.
जर कावळ्याची चतुराई असेल तर चतुराई हा शब्द फार थिटा पडावा... हॅट्स ऑफ कव्वा मामा !!!
मागे एक अशीच चित्रफित पाहिली होती. ज्यात एक कावळा, आक्रोड सदृश कडक कवचाचे फळ रहदारी नियंत्रक दिव्याजवळ (सिग्नलपाशी) रस्त्यावर ठेवतो आणि त्यावरून गाडी गेली कि ते कवच फुटते आणि आतले फळ कावळ्याला खायला मिळते. ते कवचयुक्त फळ रस्त्यावर अंदाजाने ठेवल्यावर जर त्यावरून गाड्या जात नसतील तर तो कावळा त्या फळाचे स्थान बदलून पुन्हा प्रतिक्षा करीत रस्त्याच्या कडेला थांबतो असे पाहावयास मिळाले होते.
अशाच दुसर्या एका प्रसंगात माकडे फळ तोडण्यासाठी दगडाचा वापार करताना दाखवली आहेत. म्हणजे, ते कवचयुक्त फळ जमिनीवर सपाट दगडासारख्या कडक पृष्ठभागावर ठेवायचे आणि वरून दुसरा दगड दोन्ही हातांनी उचलून त्यावर हाणायचा. कवच फुटले की आतले फळ खायचे.
मानवा व्यतिरिक्त, 'हत्याराचा' किंवा 'उपकरणाचा' वापर, स्वतःसाठी अन्न मिळविण्यासाठी कांही प्राणी करतात हे सिद्ध झाले आहे.
अर्थात, वरील चित्रफितीतील कावळा अन्न मिळविण्यासाठी जास्त कौशल्याचे काम करताना दाखवला आहे.
पण, कृती सुरु करण्याअगोदर त्या कावळ्याने एकंदर उपलब्ध उपकरणांचा अभ्यास केलेला दिसत नाही तसेच ह्या सर्व साधनांचा उपयोग सर्वात शेवटी मोठी काडी मिळविण्यासाठी करता येईल ह्याची सांगड कशी घातली हे ही कळत नाही. तसेच मोठ्या पिंजर्यातील मासाचा तुकडा मिळविण्यासाठी मोठ्या काडीची गरज आहे ह्यावर त्याने कांही विचार केल्याचे दिसत नाही. अशा अनेक त्रुटींमुळे मुळात 'हा कावळा ह्या कार्यासाठी प्रशिक्षित आहे की काय?' असा प्रश्न पडतो.
आजूबाजूच्या एखाद्या वस्तूचा वापर पाहिजे असलेले काम करून घेणासाठी साधन म्हणून करणे हे अनेक प्राण्यांत दिसते. मात्र येथे "अनेक वेगवेगळ्या वस्तूंचा योग्य क्रमाने उपयोग करून साध्य मिळवणे" हे त्या कावळ्याने केले आहे. कावळ्यातच नाही तर त्यापेक्षा अनेक वरिष्ठ स्तरांवर असलेल्या प्रजातींंही इतकी बुद्धिमत्ता अपेक्षित नाही... हे त्या चित्रफितल्या कावळाचे आश्चर्यकारक वैशिष्ठ्य आहे.
हा व्हीडिओ बीबीसीच्या Inside the Animal Mind कार्यक्रमाचा भाग आहे.. या कावळ्याची प्रजाती जगात सगळ्यात हुशार कावळे म्हणून ओळखली जाते. त्यातलाच एक त्यानी या प्रयोगासाठी वापरलाय.
प्रतिक्रिया
12 Jun 2014 - 11:26 pm | मुक्त विहारि
झक्कास...
धन्यवाद
15 Jun 2014 - 1:35 pm | अनिरुद्ध प
झक्कासच
12 Jun 2014 - 11:56 pm | रेवती
हा मागल्या जल्मीचा रांजणात खडे टाकणारा कावळा दिसतोय. चला, ती गोष्ट खरी होती हे म्हणायला पुरावा आहे.
13 Jun 2014 - 12:28 am | एस
हाउ ऑन अर्थ डिड दॅट बर्ड डू दॅट?
मस्तच.
13 Jun 2014 - 12:56 am | चित्रगुप्त
यावरून 'पिंडाला कावळा शिवणे' यातही काही तथ्य असावे असे वाटते.
13 Jun 2014 - 7:20 am | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री}
13 Jun 2014 - 10:42 am | प्रभाकर पेठकर
नाही. एकच 'आय' 'क्यूं' अशी चर्चा आहे.
14 Jun 2014 - 11:59 am | मदनबाण
हा.हा..हा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }
15 Jun 2014 - 1:43 pm | असंका
काय कोटी.....!!!
:-))
15 Jun 2014 - 9:36 pm | अत्रुप्त आत्मा
'आय' 'क्यूं' *ROFL*
16 Jun 2014 - 2:01 pm | बॅटमॅन
हाण तेच्यायला...!!!!
काका जबरीच हो =)) =)) =))
14 Jun 2014 - 1:11 am | तुमचा अभिषेक
मी अजूनही विचार करतोय की यात नक्की त्या कावळ्याची चतुराई आहे की विडिओ बनवणार्यांची चलाखी.
जर कावळ्याची चतुराई असेल तर चतुराई हा शब्द फार थिटा पडावा... हॅट्स ऑफ कव्वा मामा !!!
14 Jun 2014 - 1:35 am | चित्रगुप्त
हा एकच कावळा इतका हुशार आहे, की सर्वच- वा पुष्कळ कावळे तसे असतात? या प्रकारचे आणखी व्हिडियो आहेत का? याच कावळ्यावर आणखी काय काय प्रयोग केले गेले आहेत?
14 Jun 2014 - 10:50 am | त्रिवेणी
या विडियोतील कावल्यावर Gestalt Theory(समष्टिवादी उपपत्ती) किवा स्कीनर यांच्या साधक अभिसंधान (operant conditioning) चा प्रयोग केलेला आहे का?
14 Jun 2014 - 10:56 am | चित्रगुप्त
@त्रिवेनि:
या दोन्हीबद्दल थोडक्यात माहिती द्यावी अशी विनंती करतो. गूगलवर प्रत्येकाने वेगवेगळे वाचण्यापेक्षा इथे वाचणे सर्वांनाच सोयिस्कर पडेल. तेही मराठीत.
14 Jun 2014 - 1:15 pm | प्रभाकर पेठकर
मागे एक अशीच चित्रफित पाहिली होती. ज्यात एक कावळा, आक्रोड सदृश कडक कवचाचे फळ रहदारी नियंत्रक दिव्याजवळ (सिग्नलपाशी) रस्त्यावर ठेवतो आणि त्यावरून गाडी गेली कि ते कवच फुटते आणि आतले फळ कावळ्याला खायला मिळते. ते कवचयुक्त फळ रस्त्यावर अंदाजाने ठेवल्यावर जर त्यावरून गाड्या जात नसतील तर तो कावळा त्या फळाचे स्थान बदलून पुन्हा प्रतिक्षा करीत रस्त्याच्या कडेला थांबतो असे पाहावयास मिळाले होते.
अशाच दुसर्या एका प्रसंगात माकडे फळ तोडण्यासाठी दगडाचा वापार करताना दाखवली आहेत. म्हणजे, ते कवचयुक्त फळ जमिनीवर सपाट दगडासारख्या कडक पृष्ठभागावर ठेवायचे आणि वरून दुसरा दगड दोन्ही हातांनी उचलून त्यावर हाणायचा. कवच फुटले की आतले फळ खायचे.
मानवा व्यतिरिक्त, 'हत्याराचा' किंवा 'उपकरणाचा' वापर, स्वतःसाठी अन्न मिळविण्यासाठी कांही प्राणी करतात हे सिद्ध झाले आहे.
अर्थात, वरील चित्रफितीतील कावळा अन्न मिळविण्यासाठी जास्त कौशल्याचे काम करताना दाखवला आहे.
पण, कृती सुरु करण्याअगोदर त्या कावळ्याने एकंदर उपलब्ध उपकरणांचा अभ्यास केलेला दिसत नाही तसेच ह्या सर्व साधनांचा उपयोग सर्वात शेवटी मोठी काडी मिळविण्यासाठी करता येईल ह्याची सांगड कशी घातली हे ही कळत नाही. तसेच मोठ्या पिंजर्यातील मासाचा तुकडा मिळविण्यासाठी मोठ्या काडीची गरज आहे ह्यावर त्याने कांही विचार केल्याचे दिसत नाही. अशा अनेक त्रुटींमुळे मुळात 'हा कावळा ह्या कार्यासाठी प्रशिक्षित आहे की काय?' असा प्रश्न पडतो.
14 Jun 2014 - 2:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
कावळा निश्चितच प्रशिक्षित असावा... तरीसुद्धा...
आजूबाजूच्या एखाद्या वस्तूचा वापर पाहिजे असलेले काम करून घेणासाठी साधन म्हणून करणे हे अनेक प्राण्यांत दिसते. मात्र येथे "अनेक वेगवेगळ्या वस्तूंचा योग्य क्रमाने उपयोग करून साध्य मिळवणे" हे त्या कावळ्याने केले आहे. कावळ्यातच नाही तर त्यापेक्षा अनेक वरिष्ठ स्तरांवर असलेल्या प्रजातींंही इतकी बुद्धिमत्ता अपेक्षित नाही... हे त्या चित्रफितल्या कावळाचे आश्चर्यकारक वैशिष्ठ्य आहे.
14 Jun 2014 - 3:51 pm | अस्वस्थामा
+१ बरोबर..
हा व्हीडिओ बीबीसीच्या Inside the Animal Mind कार्यक्रमाचा भाग आहे.. या कावळ्याची प्रजाती जगात सगळ्यात हुशार कावळे म्हणून ओळखली जाते. त्यातलाच एक त्यानी या प्रयोगासाठी वापरलाय.
इतर भाग पण खासच आहेत..
(बीबीसीच्या माहीतीपटांचा चाहता)
14 Jun 2014 - 2:24 pm | प्रचेतस
मस्त.
प्रासचा कावळा, कडी आणि कॅमेरा हा लेख आठवला.
15 Jun 2014 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
"कावळा, कडी आणि कॅमेरा" हा लेखही रोचक आहे !
16 Jun 2014 - 6:07 pm | उगा काहितरीच
मस्त...
16 Jun 2014 - 6:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व प्रतिसादकर्त्यांसाठी धन्यवाद !