विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ३

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
25 Mar 2014 - 10:00 pm

विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ३

विपश्यना केंद्रात भुताटकी?

....अहो सुरवातीला अशी काही माझी बोबडी वळली की काही विचारू नका! आधीच विविध प्राण्यांच्या कळपांच्या आवाजांनी मनात धडधड व्हायची! अहो अगदी त्या निरुपद्रवी मोरांच्या केकाटणाऱ्या आवाजाने भिती वाटायची राव! अहो पहिले काही दिवस मी या शिबिराला कोसत होतो!
...त्यात काही डाव होता की काय? ... चोरदरोडेखोरांना देखील शिबिरातून साधना करायला देतात म्हणून ऐकलं होतं. ...माझा पक्का संशय झाला होता! …
…. कोण? ... कोण आहे?...असे म्हणत तेथील अर्ध्याचड्डीतील साधक एकदम बाहेर आला....
... डोळे फाडून पहात जणू काही म्हणाला, ...
.... ... 'समझता नही क्या बे? चल भाग जा! असा सल्ला रागीट स्वरात देऊन… !

मित्रांनो,
हा भाग आधीच दिवाळी अंक २०१२ मधे प्रकाशित झाला आहे. फक्त ती लेख क्रमांकाची पुढची कडी आहे. त्यानंतरच्या लेखाला संनग्नता यावी म्हणून वरील गोषवारा जरा नाट्यमयपणे सादर केला आहे.

वाचकांनी तो संपूर्ण रंजक किस्सा इथे पहावा.

1

राहायच्या खोलीतील रचना व सामान

लेख क्रमांक 4 मधे "मी आत्महत्या करायला निघालोय....!"

1

संस्कृतीविरंगुळा

प्रतिक्रिया

डायरेक्ट लेख क्रमांक ४ टाकला असता तर जास्त उत्तम झाले असते. पुभाप्र.

शशिकांत ओक's picture

25 Mar 2014 - 10:42 pm | शशिकांत ओक

कदाचित नव्या सदस्यांनी तो वाचला नसेल तर त्यांनी वाचावा. फक्त साधना किंवा विपश्यना विषयावर प्रवचन असा लेखातील आशय नसावा असे वाटले. त्या काळातल्या घटनांना रंजकपणे सादर करणे हा उद्देश आहे. आपण हा लेख आधी वाचलात म्हणून धन्यवाद..

मला ज्वारीच्या लाह्या फोडतात त्याची आठवण झाली .दमट केलेले जोंधळे/ज्वारी तापलेल्या मोठ्या लोखंडी कढईत टाकून (भडभुंजे)भराभर हलवतात .त्यासाठी झाऱ्याला कापड गुंडाळलेले असते .ज्वारीच्या आतल्या पाण्याची वाफ जोरात दाणा फोडून बाहेर येते तेव्हा लाही होऊन कढईच्या बाहेर पडते .काही दाणे फुटतच नाही हो -त्याला गणंग म्हटतात .गणंगावर कितीही संस्कार केले तरी गणंगच राहातात .

गंमत अशी की लाह्या : गणंग प्रमाण ८० : २० असते .
गणंग वाया मात्र जात नाहित त्याचे पीठ करून खाता येते .

काहींना तिकडे ध्यानधारणेत यश येते का माहित नाही ,घरच्यांना तर दहा दिवस शांतता नक्कीच मिळत असेल .

बुध्दाच्या काळातही चित्र काही वेगळे नव्हते .अजिंठा लेण्यात तळाच्या पट्टीत सामान्य लोक दंगामस्ती करतांना दाखवले आहेत .ज्ञान त्यांच्यापासून कोसभर दूरच राहिले .

लेख वाचून चांगलीच करमणूक झाली .

लेख वाचून चांगलीच करमणूक झाली .

तोच उद्देश होता.

गणंगावर कितीही संस्कार केले तरी गणंगच राहातात

या लेखाने आणण गणंग आहोत व असेच राहू अशी भावना उद्दीपित झाली हे ही नसे थोडके. अनित्य व अनिच्छ अशा जगात शरीराने वावरताना गणंग शरीराचा वाहन किंवा शिडी म्हणून उपयोग करून नित्य व अविनाशी काय याची जाणीव करून घ्यायला सोईचे व हक्काचे साधन आहे याची जाणीव करून देण्याचे कार्य अशा दहा दिवसांच्या शिबिरातून होते. अनेकांशी गप्पा मारताना आधी आपण कसे गणंग होतो म्हणणारी मंडळीही तेथे भेटतात. असो.
आपल्या प्रतिसादातून या विषयाकडे विपरीत आकर्षणाने पाहिले जात आहे हे ही नसे थोडके!

शशिकांत ओक's picture

26 Mar 2014 - 12:54 pm | शशिकांत ओक

2012 च्या दिवाळी अंकातून प्रकाशित झालेल्या या धाग्यावर 'आनंदी' गोपाळांना करुणा येऊन त्यांनी - अरे अगदीच कोणी या लेखाच्या वाटेला गेले नाही असे वाटायला नको असे वाटून, जाता जाता प्रतिसादाचा खो दिला होता. नंतर च्या ४ पैकी माझे २ होते.
त्या मानाने यावेळी दिलेल्या दुव्याची लिंक (कि लंका) पार करून निदान ५५ लोक तिथवर पोहोचले असे मोजदाद करता लक्षांत येते.
शिवाय इथे अन्य लेखांवरील प्रगती पहाता विपस्यनेच्या मजकुराला अगदीच उपेक्षित केले गेले नाही..
अहो लेखाची ही अवस्था तर साधना, ध्यान, एकाग्रता वगैरे त्रासिक गोष्टींची कोण संगत करणार? विपस्यना साधनेला अशा मानसिकतेच्या प्रत्येक शरीरातून जावे लागते म्हणूनच २-५ वर्षांत नव्हे दोनशे - पाचशे वर्षांचा काळ गोएंन्काजींनी का मागून घेतला, याचे आकलन व्हायला सोपे जाते. असो.

कंजूस's picture

26 Mar 2014 - 2:59 pm | कंजूस

खरं आहे .
कढईत तळाशी फार वेळ राहून काळे पडलो नाही तरी खूप झालं .