आयटीच्या गोष्टी - नमन

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
16 Feb 2013 - 4:35 pm

नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांबद्दल आणि एकंदरीत आयटी क्षेत्राबद्दल खुपच कुतुहल असते. आयटी म्हटलं की सगळ्यात आधी दोनच गोष्टी नजरेसमोर येतात, एक म्हणजे बक्कळ पैसा आणि दुसरं म्हणजे एसीत बसून काम करणं. दोन्ही गोष्टी आयटीमधील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या प्रमुख अंगाबद्दल शब्दशः खर्‍या असल्या तरी आयटी म्हणजे केवळ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नाही. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्येही बक्कळ पैसा आणि एसीमधील काम यांच्या जोडीनेच इतरही असंख्य भानगडी असतात. काही चांगल्या तर काही वाईट.

आपण भारतीय स्वतःला आयटीतील बाप समजतो. पण ते खरं नाही. या क्षेत्रात काम करणारे (आणि वास्तवाचे भान असलेले) चांगलेच ओळखून आहेत की आपण या क्षेत्रातले पाटया टाकणारे हमाल आहोत. आपल्याला मिळणारा बक्कळ पैसा हा केवळ चलनातील फरकाचा प्रताप आहे. तसेच अमेरिका आणि युरोप खंडांमध्ये वाढलेले संगणकीकरण परंतू स्वस्त आणि कुशल संगणक कामगारांची अनुपलब्धता हीसुद्धा आपल्याला सो कॉल्ड आयटीमधले बाप बनवण्यास कारणीभूत आहे. पुढे हे सारं आपण विस्ताराने पाहूच.

बरेच दिवसांपासून मनात होतं की उगाचच प्रतिसादाच्या पिंका टाकण्यापेक्षा काहीतरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करावा. पण टंकायचा कंटाळा येत होता. त्याचबरोबर विषय कुठला निवडावा हे ही कळत नव्हतं. माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या प्रकाशात उलगडून दाखवावा की मानसशास्त्राचं बोट धरुन मनोविकारांबद्दल सहज सोप्या भाषेत लिहावं हे कळत नव्हतं. संगणक सुरक्षा या विषयावर काही खरडावं असंही कधी कधी वाटायचं. नुकतीच चालू झालेली प्रथम फडणीसांची मोबाईल उत्क्रांतीवरील सुंदर मालिका, त्याहीआधीची सोकाजीनानांची अत्याधुनिक तंत्रज्ञान सहज सोप्या भाषेत सांगणारी लेखमाला वाचून वाटलं की आपण आयटीवर का लिहू नये. आणि ठरवलं की आपण आयटीवरच लिहायचं.

कमी अधिक अशा साडे सात आठ वर्षांच्या माझ्या आयटी करीयरमध्ये खुप काही गोष्टी पाहील्या, अनुभवल्या. काही आनंद देणार्‍या, काही आपल्या क्षमतेचा कस पाहणार्‍या, काही मनस्वी चीड आणणार्‍या, तर काही नैराश्येच्या खोल गर्तेत फेकून देणार्‍या. या सार्‍याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न असेल. मिपावर आयटीमधील रथी महारथी आहेत. ते माझ्या लेखनात काही चुका झाल्या तर दाखवून देतीलच. तसेच ते प्रतिसादांमधून आपले अनुभवही सांगतील, वाचकांच्या प्रश्नांना उत्तरेही देतील याची मला खात्री आहे.

नमनाला घडाभर तेल वाहून झालं आहे. मुद्दयाचं असं काही लिहिलंच नाही. ते सारं आपण पुढच्या भागापासून पाहू.

तोपर्यंत, स्टे टयुन्ड* !!!

*स्टे टयुन्ड - हा आयटी मॅनेजर्सचा आवडता शब्दप्रयोग. शब्दशः अर्थ "तुमचा रेडीओ अमुक अमुक फ्रीक्वेंसीला टयून करा" एव्हढाच असला तरी आयटीमध्ये त्याला खुप मोठा अर्थ आहे. तुम्हीच पाहा:

प्रसंग १ : अबक आयटी कंपनी आपली कर्मचारी संख्या वाढवण्याच्या विचारात आहे. दे हॅव एक्स्पान्शन प्लान. या संदर्भात एका नामांकीत सरकारी संगणक शिक्षणसंस्थेच्या नोटीस बोर्डवर नोटीस लावली जाते. पोरं पोरी भराभर आपापले रिझुमे, सीव्ही जे काही असेल ते मॅनेजरच्या ईमेल आयडीवर पाठवतात. (कंपनी सध्यातरी छोटी असल्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजरच रीक्रुटमेंट, रीसोर्स मॅनेजमेंट पाहत असतात.) पोरांचा भरभरुन प्रतिसाद पाहून मॅनेजर हरखून जातो. रीप्लाय म्हणून केलेल्या ईमेलमध्ये पोरांना तो खुप मोठी मोठी स्वप्नं दाखवतो. शेवटी थोडंसं रीक्रुटमेंट प्रोसेसबद्दल, इंटरव्ह्यू शेडयुलबद्दल लिहितो लिहितो. अगदी शेवटची ओळ असते, स्टे टयुन्ड !!!

प्रसंग २ : कंपनीत अ‍ॅट्रीशन रेट वाढू लागला आहे. मॅनेजमेंटच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. याच गतीने पोरं पोरी जरी कंपनी सोडून जाऊ लागली तर एक दिवस कंपनीला टाळं ठोकावं लागेल याची त्यांना खात्री पटू लागली आहे. काहीतरी करणं भाग आहे. मग एचारमधील चार डोकी/मॅनेजमेंटमधील चार डोकी मिळून काहीतरी प्लान बनवतात. याच कंपनीत पोरांना कसं उज्ज्वल भवितव्य आहे याच्या लंब्याचौडया बाता केल्या जातात. हा प्लान एक खुपच वरचा मॅनेजर एक दिवस टाऊन हॉल नामक मीटींगमध्ये सार्‍या कर्मचार्‍यांना समजावून सांगतो. त्याचं ते गाजरदर्षक भाषण संपवता संपवता तो म्हणतो, स्टे टयुन्ड !!!

प्रसंग ३ : अबक नावाच्या भारतीय आयटी कंपनीचा कखग नामक अमेरिकन तेल आणि वायू कंपनीशी आयटी सेवा पुरवण्यासाठीचा करार आहे. कधीतरी या अमेरिकन कंपनीचा एक उच्चपदस्थ अधिकारी अबक च्या भारतातील डेव्हलपमेंट सेंटरला भेट दयायला येतो. त्याच्यासाठी पायघडया घातल्या जातात, त्याला टोपी घातली जाते (सॉरी, पगडी घातली जाते), त्याची आरती केली जाते. या सार्‍या पाहूणचाराने तो भारावून जातो. शेवटी तो टाऊन हॉल नामक मीटींगमध्ये भाषणाला उभा राहतो. आमच्या कंपनीला या वर्षी इतके इतकी मिलियन की बिलियन डॉलर नफा होणार आहे. पण हा नफा कमावण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून उत्तम अशा आयटी सेवेची अपेक्षा आहे अशा टाईपचं ते भाषण असतं. भारतीय कंपनीच्या मॅनेजरच्या डोळ्यांसमोर ऑनसाईट अपॉर्च्युनिटीज दिसायला लागतात. तो "क्लायंट" आपलं भाषण एकदाचं संपवतो. त्याचं शेवटचं वाक्य असतं, स्टे टयुन्ड !!!

तंत्रमाहिती

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

12 Mar 2014 - 3:06 pm | वामन देशमुख

आयटी मध्ये डोमेन एक्स्पर्ट हा एक अनाकलनीय/काल्पनिक प्रकार आहे ...

अहो, आइटी मधील (डोमेनच नव्हे) कुठलाही एक्स्पर्ट हा एक खरोखरच काल्पनिक प्रकार आहे...
आइटी हे डोमेन एखाद्याला एक्स्पर्ट म्हणविण्याइतकं तरी मोठं आहे का?

अविनाश पांढरकर's picture

12 Mar 2014 - 4:07 pm | अविनाश पांढरकर

+१

तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.

डोमेन एक्स्पर्ट हा त्या त्या डोमेनमधला तज्ञ असणे अपेक्षीत असते. बहुतेक वेळा डोमेन एक्स्पर्टने त्या त्या क्षेत्रातील औपचारीक शिक्षण (पदवी, पदव्युत्तर पदवी) घेतलेले असते.

उदा काही वर्षे बँकिंग कस्टमर साठी प्रोग्रम्मिंग केल्यावर तो 'बँकिंग' आयटी एक्स्पर्ट समजला जावा अशी अपेक्षा असते...इतरांपेक्षा चार बँकिंग संकल्पना माहित असाव्यात हि अपेक्षा ठीक आहे पण एकदम एक्स्परर्त ?

काही वर्षे बँकिंग कस्टमर साठी प्रोग्रम्मिंग केल्यावर तो 'बँकिंग' आयटी एक्स्पर्ट समजला जात असेल तर ती कंपनी धन्य म्हटली पाहिजे.

अमेरिकेच्या एका बलाढ्य पेट्रोलियम कंपनीच्या प्रोजेक्टवर काम करत असताना तिकडे जो डॉमेन एक्स्पर्ट होता त्याने प्रत्यक्ष रिफायनरीमध्ये दहा वर्ष काम करुन तो नंतर आयटीमध्ये आल्याचे आठवते.

अत्रन्गि पाउस's picture

12 Mar 2014 - 7:26 pm | अत्रन्गि पाउस

बऱ्याच ठिकाणी हि अपेक्षा ठेवली जाते...रेसुमे मध्ये सुद्धा बघा कोणत्या डोमेन्स साठी काम केले ते लिहिलेले असते...
:)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Mar 2014 - 6:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आम्हाला मेकॅनिकल विंजिनियर लोकांना आय.टी. बद्दल जरा जास्तचं आस्था असते कॉलेजमधे असल्यापासुन. ;)

कॉलेजमधे असताना सगळी हिरवळ आय.टी., कॉंप्युटर आणि ईलेक्ट्रॉनिक्स मधे. उगीचं वाळवंटातल्या कॅक्टससारख्या २-४ मुली सगळ्या डिपार्ट्मेंटमधे मिळुन.
थोडीशी जलन म्हणजे, साला रोज १०-१२ तास फिजिकली घासुन, विदौट ए.सी मधे उभं राहुन, लोकांच्या शिव्या खाऊन पण लै म्हंजे लै कमी पगार आणि लै म्हंजे लै म्हंजे लै कमी प्रोमोशन्स :(
तक्रारीचा भाग सोडला तर बाकि जवळपास सगळे दोस्त लोकं आय.टी. वाले असल्याने जास्त पंगा घेत नाही :).

कॉलेजमधे असताना सगळी हिरवळ आय.टी., कॉंप्युटर आणि ईलेक्ट्रॉनिक्स मधे. उगीचं वाळवंटातल्या कॅक्टससारख्या २-४ मुली सगळ्या डिपार्ट्मेंटमधे मिळुन.

खरं आहे. मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रीकल अशा अभ्यासक्रमांना मुली सहसा प्रवेश घेत नाहीत.

थोडीशी जलन म्हणजे, साला रोज १०-१२ तास फिजिकली घासुन, विदौट ए.सी मधे उभं राहुन, लोकांच्या शिव्या खाऊन पण लै म्हंजे लै कमी पगार आणि लै म्हंजे लै म्हंजे लै कमी प्रोमोशन्स

असहमत. परिस्थीती बरीच बरी बदलली आहे. क्रीम ऑफ क्रीम आयटीत जाऊ लागल्याने कोअरमधील कंपन्याही चांगले इंजिनीयर्स खेचण्यासाठी आता आयटीच्या तोडीचे पॅकेजेस देतात.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Mar 2014 - 10:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

क्रीम ऑफ क्रीम आयटीत जाऊ लागल्याने कोअरमधील कंपन्याही चांगले इंजिनीयर्स खेचण्यासाठी आता आयटीच्या तोडीचे पॅकेजेस देतात.

अहो कंपारेटीव्हली सांगतोय हो. एखाद्या आय.टी. वाल्याला १०० रुपये सॅलरी हाईक+ वरची पोझिशन मिळाली तर मेकॅनिकल वाल्याला साधारण ३५-४०-४५ रुपये मिळते असं निरीक्षण आहे. शिवाय आय.टी. वाल्यांना "ऑन द बेंच" हा नॉलेज अपडेट करायसाठी आणि नवी स्कील्स (ते पण कंपनीच्या खर्चानी) शिकायचा पर्याय असतो. शिवाय मेकॅनिकल मधे वरची पोस्ट मिळेलचं असं नाही. अर्थात कंपनी टु कंपनी बदलते ही गोष्ट.

ह्यामागे मुळ कारण असं आहे की मेकॅनिकल ईंडस्ट्री मधे लोकं कमी असुन सुद्धा मोठ्या इन्वेस्ट्मेंट मुळे प्रॉफीट मार्जिन कमी असतो.

खेडूत's picture

12 Mar 2014 - 11:35 pm | खेडूत

तसे नाही ते!
२००० पासून मुलीना शिक्षणात ३०% आरक्षण चालू झाले. मात्र ते सर्व इतर आरक्षणा अंतर्गत होते.
म्हणजे साठ मुलांच्या वर्गात ३०% विद्यापीठा बाहेरील विभागातून (म्हणजे १८) आणि विद्यापीठ विभागातून ७०% म्हणजे ४२ अशा जागा. यात ५०% आरक्षण, पण एकूण कुठल्याही वर्गात २० मुलीना प्रवेश मिळतो. याशिवाय मुली ३०% बाहेर उर्वरित कोट्यात स्पर्धा करूच शकतात!

त्यामुळे मी जेव्हा २००२ मध्ये प्राध्यापकी करत असे तेव्हा मेक्यानिकल ला पण वीसेक मुली असत. विद्युत अभियांत्रिकीला तर निम्मा वर्ग मुलीच असत. शहरी भागात तरी मुली पूर्ण आरक्षणा प्रमाणे प्रवेश घेतात. ग्रामीण विभागात त्यांनी पर्याय न दिल्याने मुलाना त्या कोट्यात प्रवेश मिळतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Mar 2014 - 9:41 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आमच्याकडे डीप्लोमाला ० आणि ईंजिनिअरींग ला पुर्ण डिपार्ट्मेंटला मिळुन जेमतेम ८-१० मुली होत्या, ते पण पुण्यातल्या कॉलेजमधे (कोरडं नशीब ह्यालाचं म्हणत असतील काय?). तेव्हाचं पटलं काँपिटीशन टफ आहे ते :) ;)...!!

बबन ताम्बे's picture

12 Mar 2014 - 8:06 pm | बबन ताम्बे

कंपनीचे फायनांशियल निकाल येतात तेंव्हाही ट्युंड असावे लागते. निकाल कसा लागेल त्यावर जॉब राहील की नाही अवलंबून असते. खूप लॉस झाला किंवा युरोप अमेरिकेत मंदी आली की आय.टी. मधले टेंशंस विचारू नका ! (विशेषतः एमएनसी मधे). २००१ मधील मंदी (टॉवर पडले तेंव्हा) आणि २००७ मधील मंदीने आय्.टी.ला चांगलेच घुसळून काढले.

२००९ च्या मंदीमध्ये आम्हाला सिलिकॉन व्हॅलीमधून परतीचं विमान पकडावं लागलं होतं. :(

अत्रन्गि पाउस's picture

12 Mar 2014 - 8:27 pm | अत्रन्गि पाउस

रोज सकाळी १ २ प्रोजेक्ट्स गेल्याचे कळत होते...
भल्या भल्यांची तंतरली होती....

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Mar 2014 - 8:25 pm | राजेंद्र मेहेंदळे

आयटीमधील एकेकाची विचारसरणी

प्रोजेक्ट मॅनेजर- ९ बायका १ मुल १ महीन्यात डिलिवर करु शकतील.
सॉफ्टवेअर ईंजीनीयर-एक मुल डिलिवर करायला १८ महीने लागतील.
ऑनसाईट मॅनेजर- एक बाई १ महीन्यात ९ मुले देउ शकेल.
मार्केटींग मॅनेजर- मी कोणाही बाई किंवा बाप्या शिवाय १ मुल डिलिवर करेन.
रिसोर्स ऑप्टीमायझेशन टीम- आम्ही १ मुल कोणाही रिसोर्स शिवाय डिलिवर करु.
डॉक्युमेंटेशन टीम--मुल डिलिवर होवो कि न होवो ,आम्ही ९ महीने नोंदी करणार
ऑडीटर-झालेल्या मुलाबद्दल नेहेमीच असमाधानी
टेस्टींग टीम-झालेले मुल बरोबर नाहिच,त्यात चुका काढा
एच आर मॅनेजर- गाढवाला ९ महीने वेळ दिल्यास तेही १ मुल देउ शकेल.
क्लायंट- असा माणुस ज्याला माहीतच नाही कि आपल्याला मुल हवे आहे.

मोदक's picture

12 Mar 2014 - 8:30 pm | मोदक

.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Mar 2014 - 11:23 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif __/\__ http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

धन्या's picture

12 Mar 2014 - 11:18 pm | धन्या

आयटीच्या गोष्टी - नमन (हा भाग)
आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच
आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१)

ऑनसाईट २ च्या लिखाणाची तयारी करत असताना "ऑनसाईट १" चे काश्मीर होऊन थेट अगदी स्तनपानापर्यंत गोष्टी गेल्यामुळे वैतागून लिखाण थांबवले होते. ऑनसाईट २ (आणि पुढेही) लिहिण्याची ईच्छा आहे. बघूया.

हवालदार's picture

12 Mar 2014 - 11:46 pm | हवालदार

इछ्छेची अन्मलबजवणी त्वरीत करा.

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2014 - 2:50 pm | पिलीयन रायडर

"ऑनसाईट १" चे काश्मीर होऊन थेट अगदी स्तनपानापर्यंत गोष्टी गेल्यामुळे

काल रात्री मोबाईलवर हा प्रतिसाद वाचला.. बेक्कार हसत होते बराच वेळ.. नवर्‍यानी विचारलं काय झालं तर त्याला म्हणाले...

"एका धाग्याचं काश्मीर केलं होतं रे आम्ही.. मिपाच पब्लिक ना..!!!"

तो धाग्याच काश्मीर ह्या शब्दापाशीच अडकला होता.. =))

तुमच्या ह्या प्रतिसादामुळे आठवलं.. घासुगुर्जींनी पार अगदी चार्ट बिर्ट लावले होते इथे!!! आणि मी न्यु मदर असल्याने एकदम ओथंबुन प्रतिसाद लिहीत होते! (अर्थात माझ्या स्टॅण्ड वर मी अजुनही ठाम आहे.. वन्स अ मदर.. ऑल्वेज अ मदर!!)

शिद's picture

13 Mar 2014 - 3:30 pm | शिद

ऑनसाईट २ (आणि पुढेही) लिहिण्याची ईच्छा आहे.

मग लिहा की.... आम्ही वाट पाहतोय. पु.ले.शु.

अरे वा हुच्च लोक्स ब्याक्स ...

बेंच प्रदान झालेला दिसतोय , विथ फुल स्यालरी
चान चान

जळजळ होत असल्यास ईणो घेणे. ;)

स्पा's picture

13 Mar 2014 - 5:34 pm | स्पा

व्हय जी ;)

"फुल स्यालरी ऑन बेंच" फक्त महाकाय आयटी कंपन्यांमध्ये असते रे.
माझ्या बाबतीत म्हणशील तर "गेले ते दिन आणि राहील्या त्या आठवणी" असं झालंय आता. :(

स्पा's picture

13 Mar 2014 - 7:02 pm | स्पा

:(

स्पा's picture

13 Mar 2014 - 7:03 pm | स्पा

डोंट वारी , आल इज वेल