काही काळापूर्वी मिपाकरांसाठी 'सांगा, कसे केलेत तुम्ही हे सर्व ? … आणि मिळवा एक चित्र' नावाची एक लेखन स्पर्धा मी जाहीर केली होती, त्याला मिपाकरांनी उत्तम प्रतिसाद दिला, आणि पैसा, वल्ली आणि प्रसाद गोडबोले, यांना एकेक चित्र भेट देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तीन चित्रे एकत्रित पाठवली, ती सर्वांना बघायला मिळावीत म्हणून इथे देतो आहे.
यापैकी कोणते चित्र कोणी घेतले ? कळवावे.
चित्र १.
चित्र २.
चित्र ३.
प्रतिक्रिया
10 Mar 2014 - 7:27 pm | पैसा
प्रसाद गोडबोलेने कोणतं चित्र घेतलं माहिती नाही. बाकीची दोन्ही चित्रं सध्या वल्लीच्या ताब्यात आहेत. मी येत्या ८ दिवसात पुण्याला जाणार आहे, तेव्हा वल्लीकडून मला पाहिजे ते चित्र घेईन. ;)
इतकी सुंदर चित्रं दिल्याबद्दल चित्रगुप्त यांना पुन्हा एकदा धन्यवाद!
10 Mar 2014 - 7:29 pm | आत्मशून्य
कुल.
10 Mar 2014 - 7:32 pm | सूड
तिसर्या क्रमांकाचं चित्र पाह्यलं आहे. इतर दोन पाहायला मिळाल्याबद्दल बरं वाटलं आणि ज्या तिघांना ती मिळालीयेत त्यांचा हेवा वाटला. ;)
10 Mar 2014 - 8:07 pm | चित्रगुप्त
चला, तर मग आणखी एकाद्या विषयावर ठेऊया पुन्हा लेखनस्पर्धा.
10 Mar 2014 - 9:00 pm | सूड
चालतंय की !!
10 Mar 2014 - 7:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
२ नंबरचं चित्र जबरदस्त आवडलं.
10 Mar 2014 - 8:14 pm | रेवती
क्र.२ चित्र मस्त!
10 Mar 2014 - 8:36 pm | बॅटमॅन
क्र. १ व ३ वाली चित्रे जास्त आवडली. क्र. १ चे चित्र द हॉबिट मधील डोल गुल डूरच्या ओसाड किल्ल्याची आठवण करून देतेय. क्र. ३ मध्येही नदीतीराचे चित्रण मस्त वाटले, पण क्र. १ चे चित्र खरेच जास्त आवडले.
क्र. २ बद्दल म्हणाल तर तुलनेने इतके अपील झाले नै.
पण कमी चितारून जास्त सूचकपणे सांगितले हा प्रकार मला आवडला.
10 Mar 2014 - 8:41 pm | शशिकांत ओक
चित्रगुप्त,
आपण नवनव्या विचारांची व प्रथांची फीत कापून सुरवात करता. त्यावरून एक सुचवावेसे वाटले .
पुर्वी जत्रेत, उरुसात काही ठिकाणी 3-5 रिंगा हाता घेऊन समोर ठेवलेल्या हव्या त्या वस्तू मिळवायला त्या लांबून फेकून हस्तगत करायची मुभा असलेला खेळ चाले. त्या धरतीवर आपण काही आपल्या चित्रांचे फोटो आधी मीपा धाग्यावर लाऊन ते हस्तगत करायला प्रवृत्त होतील असे, "सांगा हे सगळं तुम्हाला करायला आवडेल का?" असा काहीसा कल्पनाविलासाला प्रवृत्त करणारा धागा काढून सदस्यांना आवाहन करून स्पर्धेसाठी उतरवावे.... पहा विचार करून...
10 Mar 2014 - 9:18 pm | प्रचेतस
मी माझ्यासाठी २ नंबरचे चित्र निवडलंय कारण हे चित्र मला अतिशय 'प्रासादिक' वाटले.
10 Mar 2014 - 9:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त चित्रे !
10 Mar 2014 - 11:01 pm | श्रीगुरुजी
सर्वच चित्रे अप्रतिम! चित्र क्र. १ मध्ये मला डाव्या सोंडेच्या गणपतीचा भास होतोय.
10 Mar 2014 - 11:16 pm | धन्या
सुंदर चित्रे.
वल्ली आणि गिरीजा काकूंच्या कॄपेने तिसरे चित्र पाहण्याचा योग आला होता. :)
10 Mar 2014 - 11:21 pm | पिवळा डांबिस
धाग्याचं शीर्षक वाचून कुणी एखादी नवी सीकेपी नटी आलीये की काय असं वाटून धागा उघडला!
असो.
ही "चित्रे"ही छान आहेत! आवडली!!!!
:)
10 Mar 2014 - 11:58 pm | काळा पहाड
ते एक नंबर चं चित्र लै लै लै लै लै लै लै लै लै लै लै लै आवडलया.
11 Mar 2014 - 10:29 am | चौकटराजा
पहिले चित्र हे तुंग किल्याचे उत्तरेकडून पाहिलेले वाटते आहे.
तिसरे चित्र दुधीवरे खिंडीचे दक्षिणेकडून पाहिलेले वाटते आहे.
12 Mar 2014 - 2:19 pm | अविनाश पांढरकर
सर्वच चित्रे अप्रतिम!
12 Mar 2014 - 4:08 pm | यशोधरा
वा, सुरेख. पहिले व दुसरे चित्र अतिशय आवडले.
13 Mar 2014 - 12:41 am | कंस
अप्रतीम चित्रे !!
नं१ आणी नं ३ कशी पेंट केली असावीत ह्या विचारात पडलोय.