तर त्या पोपटाने जोरदार गर्दी खेचली होती. पोपट लहान अस्ला तरी तो भल्या मोठ्या खुर्चीवर बसला होता, खुर्चीशेजारी त्या पोपटाच्या जन्मदात्याचे वडील उभे होते. त्यांचे नाव नरेशभाई. गोरापान वर्ण, निळसर घारे सोळे आणि अथांग शुभ्र दाढी असलेले हे व्यक्तिमत्त्व मला भावले. नरेशभाइंची परवानगी घेऊन त्यांच्या दोन छबी टिपल्या.
तिथुन पुढे निघालो, तहाअ लागली होती तेव्हा एका पाण्याचा दुकानात गेलो आणि तिथे नाना चविचे पाणी उपलब्ध होते ते ढोसले. समोर बघितले तर पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा एक विशाल मनोरा केला होता जो पायात पोकळ होता. त्या पोकळीत शिरायला बरीच गर्दी होती. मीही पोकळीत घुसलो अणि छताचं हे चित्र दिसलं
पलिकडे एक हवा भरलेआ महाराज होता, त्याच्याभोवतीही भरपूर गर्दी होती.
जवळच एका व्यासपिठावर एक पूर्ण परावर्ती मानवाकृती उभी होती.
(डोक्यावर माशाची हंडी घऊन उभे असलेले मुवि दिसले का?)
बदालत्या काळात्ल्या बदलत्या संपर्कमाध्यमांबरोबर टपालानं येणार पत्र आपल्या दैनंदिन जीवनातुन दूर गेल असलं तरी टपालपेटी अजुनही मनात असावी. चित्रकाम केलेल्या टपालपेट्यांमध्ये मुंबईचा डबेवाला होताच.
यंत्रभागांनी बनविलेला घोडा सगळ्यांना खुणावत होता. घोड्याबरोबर चित्र काढुन घ्यायला अनेकजण उत्सुक दिसत होते.
अगदी तशाच प्रकारे अनेक प्रकारचे अनेक यंत्रांचे भाग वापरुन बनविलेला महाबैल प्रमुख आकर्षण ठरला होता.
घोडा आणि बैलप्रमाणे धातुचा सिंह देखिल होता
'रागीट मुद्रा धारण केलेले मुवि आणि भेदरलेल्या मुद्रेचा सिंह
हे सर्व धातुकलाकाम होते कलाकार ईल्याअसभाइंचे. इल्यासभाई हे रामदासांच्या परिचयातले होते.
प्रदर्शन म्हणजे सामाजिक समस्यांचे प्रतिबिंब त्यात दिसणारच. इथेही स्त्रीचे असुरक्षित जीवन, लहान मुलांचे असुरक्षित जीवन यावर कलाकृती होत्याचं.
प्रदर्शनाचा पसारा संपत आला होता. आता प्रत्येकाला भूक जाणवु लागली होती, दोनेकतास कसे गेले ते समजले नाही. आम्ही बाहेरचा रस्ता धरला
या प्रदर्शनात मी टिपलेल्या चित्रांपैकी मला सर्वात जास्त आवडलेले हे चित्र 'निष्पाप हास्य'
क्रमशः
प्रतिक्रिया
15 Feb 2014 - 12:49 am | अत्रुप्त आत्मा
जबरी हा ही भाग! :)
@'रागीट मुद्रा धारण केलेले मुवि आणि भेदरलेल्या मुद्रेचा सिंह>>> =)) हे कॉम्बिनेशन..भारीच!
..........................
15 Feb 2014 - 9:23 am | सुधीर कांदळकर
यंत्रभागाचे प्राणी सुरेखच. बाटल्यांच्या मनोर्याचे बाहेरून काढलेले चित्र असेल तर कृपया टाका.
धन्यवाद.
15 Feb 2014 - 9:34 am | निरंजन
शेवटचा फोटो मस्त. मी ढापणार.
15 Feb 2014 - 10:31 am | भाते
प्रत्यक्ष अनुभवलेला कट्टा पुन्हा एकदा सचित्र अनुभवायला मिळाला.
धन्यवाद सर्वसाक्षी.
16 Feb 2014 - 4:25 pm | सुहास झेले
सुंदर... मस्तच झालाय हा ही भाग... आता पुढचा भाग लवकर येऊ द्यात :)
16 Feb 2014 - 4:47 pm | प्रभाकर पेठकर
सुंदर. प्रथम दर्शनीच प्रेमात पडावं असं प्रदर्शन आणि मिपाचा कट्टा.
16 Feb 2014 - 5:26 pm | रेवती
सगळे फोटू आवडले.
16 Feb 2014 - 5:38 pm | प्यारे१
खूपच छान!
बैल, घोडा, भेदरलेला सिंह, नरेशभाई, रागावलेले मुवि आणि निष्पाप मुलं सगळ्यात बेष्ट!
सर्वसाक्षी हार्दिक धन्स!
17 Feb 2014 - 11:14 am | ऋषिकेश
मुविंसमोर बिचारा सिंह खास आवडला!
एकूणच छायाचित्रे (सगळ्याच भागांतील) अतिशय बोलकी आहेत.
17 Feb 2014 - 11:18 am | मदनबाण
मस्त ! :)
20 Feb 2014 - 8:57 pm | आयुर्हित
काळा घोडा प्रसारण on DD भारती TV channel.
आज आत्ता ९ वाजता....
Source : Cable set top box
20 Feb 2014 - 10:10 pm | एस
आवडेश...