काळा घोडा कला महोत्सव कट्टा - वृत्तांत (३)

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
14 Feb 2014 - 1:00 am

आम्ही उत्सवस्थळी दाखल झालो. माझा या उत्सवाला हजेरी लावण्याचा पहिलाच प्रसंग. कलेचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही, अगदी रेघ देखिल सरळ मारता येत नाही. पण चार लोक जातात तर आपणही जावे, लोकांना कुठे माहित असतं की मी 'ढ' आहे? मागे एकदा तर मी जहांगिरला एक चित्र प्रदर्शन देखिल पाहुन आलो होतो. मूढ मुद्रेने एका चित्रापुढे 'हे काय असावे' याचा अंदाज घेत असता तिथल्यांपैकी एकाने मला 'जाणकार' समजुन अनेक भिकार चित्रांची सहल घडवली होती वर वहीत अभिप्राय लिहावा असा आग्रह देखिल केला होता. असो. सांगायचा उद्देश असा की मी कलामहोत्सव वा कलेविषयी लिहीणे म्हणजे लग्नात मंगलाष्टके म्हणणार्‍याने सवाई मध्ये गाण्यासारखे आहे. तात्पर्य मी जे दिसले ते इथे उमटवतो, त्यातले सौंदर्य तुम्हीच जाणुन घ्या. एकुण तीन प्रकारच्या कला प्रदर्शित केलेल्या दिसल्या. एक म्हणजे सुंदर, शोभिवंत चित्रे, वस्तू वगैरे, दुसरे मुक्त शैलितील वा प्रतिकात्मक कलाप्रदर्शन आणि तिसरे आजच्या समाजजीवनाचे प्रतिबिंब.

मुविंनी पुढे होत आम्हाला लवकर चला असा ईशारा केला. खाजगी रक्षक आणि पोलिसदल असा दुहेरी सुरक्षा बंदोबस्त होता. आत जाताना थैले-झोळ्या खिसे वगैरे तपासले जात होते. मी यंत्रातुन आत जाताच डाव्या हाताने कॅमेरा वर धरला आणि उजव्या हाताने माझा भिंगे ठेवलेला थैला सुरक्षा रक्षकाच्या हाती देत 'तपासा' असे म्हणताच त्याने हात जोडुन मला जा आत असे सांगितले. सबब मला खिशातली काडेपेटी टाकावी लागली नाही.
kg1

आतमध्ये थेट वाहनतळापासून ते कैखुश्रु दुभाष मार्गापर्यंत सर्व भूभागावर कब्जा करुन तिथे महोत्सवाचा व्याप होता. आतमध्ये तरूणाई मोकाट फिरत होती.
kg2

समोरच्या भिंतीवर रंगविलेला बहुरंगी बहुढंगी घोडा आवडला.
kg3

पलिकडे एक अफलातुन असे चक्रांचे झाड होते
kg4

समोर रबरी नळकांड्यांची साळुबाई होती
kg5

मधेच लाकडी विमान होते, कुठे गाडीचा अर्धभाग होता सर्वत्र लोक आपापली छबी टिपुन घेत होते.
k6

छबी टिपायची दोन विशेष ठिकाणे म्हणजे लाह्यांचा भला मोठा पुडा आणि एक रंगीबेरंगी अ‍ॅम्बेसेडर
k7
k8

सगळ्यांचे लक्ष वेधुन घेत होते एक दगडी कासव
k6a

पोलिसातही कलावंत असतो! या दालनातील सर्व कलाकृती मुंबई पोलिसांच्या होत्या
k10

शेजारीच एक सुबक भेटवस्तूंचे दालन होते, वस्तुंची मांडणी आकर्षक होती
k11

अनेक दालनांबाहेर कहीतरी प्रचारार्थ/ प्रदर्शनार्थ मोठ्या रंगीत छत्र्या उभारल्या होत्या. उन चुकवायला छत्रीत शिरलो, तर हात आपोआप कॅमेर्‍यावर गेले
k12
k14
k15
हे नक्की काय आहे? पानाचे डाग? गंजाचे डाग की आधुनिक चित्रकला?

एक दालन खास बाप्पांचे होते. अतिशय मोहक आणि प्रसन्न मूर्ती पाहायला मिळाल्या. सर्व मूर्ती कागदापासुन केलेल्या होत्या.
k16
k17
k19
k21
k22

मुवि मरिओ मिरांडाच्या दालनात. 'हा बघ कसा दिसतोय?'
k23

घंटाजाल, घंटानाद आणि घंटातरंग
k24
k25
k26

अचानक समोर एक अफलातुन प्रकार दिसला आणि मी भातेंना पाचारण केले.... मिश-कील चित्र टिपायला (मिशीतली मिशी आणि मिशीवर मिशी)

k27
k28

पुढे एका दालनात मोजड्या मस्तपैकी प्रदर्शित केलेल्या दिसल्या
k29
k30

आता गर्दी बर्‍यापैकी सुरू झाली होती मात्र सगळे स्वतःमध्ये मश्गुल होते. गर्दीची चित्रे टिपायला मजा येते, खरेतर कधी कधी एखाद्या प्रदर्शित वस्तुपेक्षा ती पाहायला जमलेल्या गर्दीच्या चेहेर्‍यावरचे भाव अधिक आवडतात
k31
k31a
k32

'सद् रक्षणाय खल निग्रहणाय रसिकांना सोहळ्याचा आनंद निर्धोकपणे घेता यावा म्हणुन जागता पहारा देणारे मुंबई पोलिसांचे हे खास पथक. वरकरणी हे जरी आपसात गप्पा मारत असल्याचा भास होत सला, तरी त्यांचे डोळे व पवित्रा बारकाइने पाहिले असता असे लक्षात येते की चौघांची नजर बरोब्बर चार बाजुंना आहे आणि बोटे शस्त्रावर सज्ज आहेत.
k33

एका उंच इमारतीचा भास निर्माण करणार्‍य कलाकृतीच्या पार्श्वभूमिवर भाते
k34

या पोपटाने भरपूर गर्दी जमा केली होती
k35

एकंदरीत मस्त प्रकार होता. आम्हीही त्या गर्दीत सामावुन गेलो होतो. रंग भरत होता. पण ....
(स्वगत - रात्रीचा एक वाजला, आता गपचुप झोपा उरलेले प्रदर्शन उद्या टाका)

क्रमशः

कलामौजमजाछायाचित्रणआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

नंदन's picture

14 Feb 2014 - 1:05 am | नंदन

मस्त. निवांतपणे खुर्चीत वाचत बसलेल्या बाप्पाचे शिल्प आणि त्यापेक्षाही त्यामागची कल्पना बेहद्द आवडली.

विजुभाऊ's picture

14 Feb 2014 - 1:15 am | विजुभाऊ

झकास.
मस्त सफर घडवलीत.
एक इच्छा : एकदा बोरीबंदर ( व्ही टी ) सफर घडवा ना.

सुशेगात आलेला मस्त वृत्तांत नि मस्त फोटोज!....!

लोकेशन: (गिरगांव) चौपाटी जवळपास आहे का? बाबुलनाथ, विल्सन, भारतीय विद्याभवन वगैरे?

(सर्वसाक्षी वृत्तांत कसा असावा ह्याचा एक पायंडा घालून देत आहेत असं वाटतंय)

अर्धवटराव's picture

14 Feb 2014 - 3:52 am | अर्धवटराव

बाप्पाच्या पोज काय पकडल्या आहेत जबरी.
वृत्तांत एकदम सुप्परलाईक.

रेवती's picture

14 Feb 2014 - 4:33 am | रेवती

सगळे फोटू व वर्णन आवडले. बाप्पांचे फोटू अगदी लक्षवेधक आलेत. रंगीबेरंगी घोडाही आवडला. मोजड्यांच्या दुकानात रंग आकर्षक असतात पण आता त्याला फसायचे नाही हे समजले आहे. हौसेनं घ्यावेत तर ते जोडे नुसतेच चांगले दिसतात पण एरवी पाऊले सोलवटून काढतात. बाकी कोणाला असा अनुभव आहे काय?

इरसाल's picture

14 Feb 2014 - 11:06 am | इरसाल

कंपनीच्या दिवाळी पार्टीसाठी घेतलेल्या मोजडीने मोज-डी केले होते (म्हणजे मोज दमड्या)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Feb 2014 - 5:25 am | अत्रुप्त आत्मा

गणपति एकापेक्षा एक भारी आहेत. :)

खराखुरा रंगीबेरंगी कट्टा! सुंदर फोटो! पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मिळतात का बघायाला जावं लागणार ! मस्त वृत्तांत.

सुधीर कांदळकर's picture

14 Feb 2014 - 9:05 am | सुधीर कांदळकर

झकास. भाग आवडला. कृपया भाग २ ची चित्रे पाहाण्यायोग्य करावीत ही नम्र विनंती.

पाषाणभेद's picture

14 Feb 2014 - 9:26 am | पाषाणभेद

काळा घोडा कला महोत्सव नक्की काय आहे? खाद्यजत्रा, खरेदीजत्रा, मौजमजा, होवू दे खर्च की काही सांस्कृतीक कार्यक्रम असलेला सरकारी समारंभ? याचे नियोजन खाजगी की सरकारी असते?

प्रभाकर पेठकर's picture

14 Feb 2014 - 11:31 am | प्रभाकर पेठकर

सर्व वृत्तांत अगदी खासच जमवला आहे.
छायाचित्रांमध्ये 'सर्वसाक्षी स्पर्ष' दिसतो आहे.

>>>>कलेचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही

किती, किती ती नम्रता?? (शिरोडकरांची नाही, सर्वसाक्षींची).

मस्त फोटो आणि मस्त वृत्तांत!

पिलीयन रायडर's picture

14 Feb 2014 - 12:10 pm | पिलीयन रायडर

मस्त फोटो आणि मस्त वृत्तांत!

+१ येक्झॅक्टली....

विअर्ड विक्स's picture

14 Feb 2014 - 2:30 pm | विअर्ड विक्स

काला घोडा फेस्टीवलला दरवर्षी जाणे होते... पण यावर्षी कामाच्या गडबडीत हुकले, तरीसुद्धा मिपावर त्याची सफर घडून आणल्याबद्दल धन्यवाद.....
छाया चित्रे सुरेख आहेत..... अजून येऊ द्या....

सूड's picture

14 Feb 2014 - 2:36 pm | सूड

बहुभुज बाप्पा आवडले.

एकदम झक्क्कास्स्स्स फोटो व वृत्तांत... सगळेच बाप्पा आवडले पण रस्सीखेच करणारे बाप्पा आणि उंदीरं खासचं...!!!

आतिवास's picture

14 Feb 2014 - 3:26 pm | आतिवास

वृत्तांत जमून आलाय. स्वत: फेरफटका मारून आल्यागत वाटायला लागलं आहे एव्हाना :-)

अनन्न्या's picture

14 Feb 2014 - 6:45 pm | अनन्न्या

फोटो दिसल्याशिवाय मजा नाही, आपण स्वतः तिथे गेल्यासारखे वाटते फोटोमुळे! पहिल्या दोन भागातील फोटो का दिसत नाहीत?

संजय क्षीरसागर's picture

14 Feb 2014 - 10:06 pm | संजय क्षीरसागर

तुमच्याबरोबर प्रदर्शन पाहातोयं असं वाटलं.

ओसामा's picture

14 Feb 2014 - 11:35 pm | ओसामा

सर्वसाक्षी साहेब,
वृत्तांत छान माहितीपूर्ण आहे. जमले तर ह्या महोत्सवाचा इतिहास पण सांगा. मी इतकी वर्षे मुंबईत राहून कधी जाण्याचा योग आला नाही.
त्या पोलिसांच्या फोटोची टिपणी " कराचा पैसा कामावर" ((Tax Dollars at Work) अशी सुचवावीशी वाटते. ही पोलिस मंडळी Force वन दलाचे सदस्य होते का? मी तरी तुमच्या पोलिसांच्या निरीक्षणाशी सहमत नाही.
१. हेल्मेट कोणीच घातलेल नाही.
२. पायामधले जोडे चालू ब्रांड वाटतात. पाठलाग करण्यात कुचकामी
३. रेडीओ फक्त एकाकडेच आहे.
४. डावीकडून दुसऱ्या पोलिसाने बंदूक चक्क मांडीवर ठेवली आहे.
ही निरीक्षणे माझ्यासारख्या संरक्षणात अंगठा छाप माणसाची आहेत. एवढा गाजावाजा करून, लाखो रुपये खर्च करून स्थापन केलेले हे दल जर असे Mediocre (मराठीमधला शब्द सुचत नाही) तर अजून एक नोव्हेंबर २००८ सारखा हल्ला होण्या वेळ लागणार नाही.
असो. पुढील भागांची वाट बघत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Feb 2014 - 11:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर वृत्तांत आणि फोटो. निगुतीने अनेक भागांत टाकत असल्याबद्दल विशेष धन्यवाद !

इतके सुरेख फोटो काढता आणि म्हणे कलेचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही.
खरचं, सर्व फोटो अप्रतिम आहेत. खुप आवडले.