वासकसज्जा

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
9 Feb 2014 - 4:47 pm

गेल्या वर्षी एका संध्याकाळी एका पत्रकार मित्राचा फोन आला. "रात्री साडेआठ वाजता आमच्या पाणवठ्यावर येणे."
(माझा पाणवठा वेगळा आहे.).वेळेवर पोहचलो. मित्रासोबत आणखी दोघं तिघं बसले होते.पुनराचम्य... वगैरे झाल्यावर चर्चा मुद्द्यावर आली." रामदास, एका चित्रपटाचे संवाद लिहायचे आहेत." मी नकारार्थी मान हलवली.मग बराच आग्रह झाल्यावर मला पटलं की माझ्यात काहीही काम करण्याचे सामर्थ्य आहे. समजूत पटायला बकार्डी या अद्भूत रसायनाचा हातभार होता ते दुसर्‍या दिवशी सकाळी कळलं .थोडक्यात , अबीद सुरती यांच्या "वासकसज्जा" ह्या कादंबरीवर आधारीत चित्रपटाचे संवाद लिहायला सुरुवात केली.काम संपत आलं तेव्हा कळलं की चित्रपटाचा पतपुरवठा करणारा इसम आता नाही म्हणतो आहे.मराठी चित्रपट सृष्टी एका अजरामर कलाकृतीला कायमची मुकली.
सोबत त्या चित्रपटाचे काही प्रवेश देतो आहे.
*********************************************************************
मूळ कादंबरी अबीद सुरती -मराठी अनुवाद चंद्रकांत भोंजाळ.

वासकसज्जा :
(सुरुवात) हिदायत खान च्या आवाजात एक नॅरेशन
तिला नाव आहे गाव आहे पण त्याला काही महत्व नाही.बाजारात बचकी म्हणूनच ओळखतात.
ती आहे म्हणजे आईबाप असणारच.
(कदाचीत) कदाचीत-ती बापाचीच मुलगी असेलही. दुष्काळाच्या गावात योनीशुचीतेचा मंत्र ऐकायला बेंबीवर कान उगवत नाही.
सुकाळाच्या गावात लैंगीक शोषणाला शौक म्हणतात.
बचकी म्हणते (बचकीचा आवाज) "शौक और भूख दोनो बिमारी है."
एक चपटी पोटात गेली की बेबीही बरळते.
(बचकीचा आवाज)."दिलको छू ले ऐसे दाग नही"
असं म्हणत ठणठणीत आवाज करत पादते.
बचकी शोलापूरहून आली आहे.
धंदा करते. पैसे कमावते.
मेंढीचा धंदा करते म्हणून दहापेक्षा जादा गिर्‍हाईक घेत नाही.
हिदायतचे निवेदन पुढे चालू...
"ती आम्रपाली नाही -कान्होपात्रा नाही-शिवलिलामृताचा अकरावा अध्याय तिच्या वैश्यीक खानावळीत कुणी वाचला नाही. बेबीची आई पण रांडच आहे. बारा खणाची रांड म्हणून माळ्शिरसच्या आसपास फेमस आहे. दुष्काळाच्या गावात कारण सांगायला नी ऐकायला कुणी येत नाही म्हातार्‍या बाया आणि पोरं -म्हणजे बसायला न लागलेल्या पोरीसुध्दा भिक मागायला गावाबाहेर पडतात. बचकीचा बाप मेला तेव्हा आधार कार्ड नव्हतं पण बचकीच्या आईच्या हातात एक आधार कार्ड होतं .ते तिने वापरलं.चोख वापरलं .
बचकीला बाजारात सोडून ती तालुक्याला धंदा करायला जायची. बचकी एकदा दोनदा रडली तर म्हणाली, (बचकीच्या आईचा आवाज)
"बाप मेला तुझा आता मी काय घरात बसून *** वारा घालू ?"
--------------------------------------------------------------------------------------------------------
वासकसज्जा ०२

शाळेचा गॅदरींगचा दिवस आहे. समोर दिडदोनशे मुलं मुली बसलेली आहेत. स्टेजवर पेटी वाजवायचा प्रयोग चालू आहे. तबला -ढोलकी आणि चाळाचा आवाज येतो आहे. बचकी मुलींमध्ये बसून उत्सुकतेनी पडदा वर जायची वाट बघते आहे. पडदा वर जातो .हेड बाई आवाज देतात आणि स्वागतगीत सुरु होतं .अर्धवट होता होता पडदा पडतो आणि पुन्हा वर जातो तेव्हा स्टेजवर काळोख आहे. हळूहळू पांढर्‍या साडीमध्ये-हातात निरांजनाचं तबक घेऊन मुली गाणं सुरु करतात. पोरंपोरी शांत होतात.
स्टेजवर एक मुलगी केस मोकळे सोडून -सोनेरी मुकुट घालून हातात सोनेरी चक्र धरून संतोषी माता झाली आहे.
बचकीचं पूर्ण लक्ष आता तिच्याकडे .
गाण्याचा कोरस " मै तो आरती ऊतारु रे संतोषी माता की "
बचकी हात जोडते. बाजूची मुलगी हातावर हात मारते.
"हात काय जोडत्येस .ती काय संतोषी माता हाय का ?"
"बावळ्ट्टिअस . आमच्या बाजूलच र्‍हाते. चड्डीत मुत्ये अजून "
बचकीचं लक्षच नाही.
कोरस "जय जय संतोषी माता जय जय मा"
कसंबसं गाणं समेवर येतं आणि गर्दीतून वाट काढत तुंगी म्हणजे बचकीची आई येते आहे.
बेबीचं बखोट धरून म्हणते "बेब्ये चल घरी "
बचकी भानावर येते " येते मी जरा आरती बघू दे "
तुंगी : आरती कसली बघत्ये .चल घरी. भजन आलाय"
गर्दीत नेहेमीप्रमाणे थोडासा गोंधळ .
आता गर्दीतून वाट काढत हातात शिटीची दोरी फिरवत -पिटी मास्तर येतो आहे
बचकी उठून उभी राहते.
आईच्या पाठोपाठ चालते.
पिटी मास्तर -"चला निघा लवकर .ही काय्य रात्रशाळा नाय तुंगे"
भजन म्हटल्यावर बचकीच्या वयाच्या आणखी चारपाच मुली त्यांच्या पाठी चालल्यात.
तुंगी (पीटी मास्तरला) "हट रे कवायत्या."
बचकी मागे वळून वळून चालते आहे
कोरस एकदम मोठ्या आवाजात बडी ममता बडा है प्यार माके आंखोमे...बडी ममता माया दुलार मां कें आंखोमे.
आवाज हळू हळू कमी होतो आहे....
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वासकसज्जा ०४
भजनलालच्या भोवती चार पाच बायका कलकल करत बसल्या आहेत.
एक एक मुलगी समोर येते तेव्हा एकेक बाई बोलते आहे.
"ही माजी बरं का भजनदादा "
"हां हां....
"पन चार हज्जर रुपे दून जाशील तर पाठीवते "
भजनलाल मान नकारार्थी हलवतो .
ग्लास तोंडाला लावून -सिगरेटची राख उडवत बोलत राह्तो.
"चार हजार ? पिसा बहुत मेंगा है "
"मंग किती द्याल आता.."
"दो हज्जार से ज्यादा नही ..."
बाई कचाकचा बोलत उठते..
"काही लाज रे भाड्या .भजनभाउ भजन्भाउ म्हनते तर तू बकरीची पन पेसे दिना..."
नसीबवारी छोरी हे. बंबैयें जा रही है. पिसा तो मिलेगा -रोहटक जागी तो ** फटेगी पर पिसा नही मिळेगा !!!!
"चल तू हट भी.."
समोर एक बर्‍यापैकी मुलगी दिसते.
भजनलाल हसतो.
पोरगी डोळा मारते.
भजन पुन्हा हसतो
"आजा अज्जा... तू तो इंटर्नेसनल घस्सड बनेगी."
एक बाई पदरानी डोळे पुसते.भजन लाल हातात नोटांची जुडी ठेवतो.
बाई रडायला लागते."आणिक देना रे भावा ...".
"रोती क्युं रे बावली सस्ते मैंगे के चक्कर में उल्झ्या करें ,
"किते हो | बावली भाई कीत हंडे स यु , पूणामें में ले-ले ,५०० गज का प्लाट आ जा गा ,
बढ़िया कोठी बणेगी | अर एक ले-ले होंडा सिटी ,चार घंटे में बंबई !!!!!
हळूहळू बाया बाहेर जातात.
तुंगी आत येते.
यानंतरचा प्रवेश भजनलाल आणि तुंगी यांच्या संवादाचा आहे.
हा प्रवेश बच्यकीला मुंबैला न्यायला भजनलाल तयार होतो येथपर्यंत आहे.
"ऐ तंगी तू बडी चंगी...लेकीन ...लेकीन ..देखण आळा तो बुब्बे देखता है "
तंगी "व्हैल की चार दाणे घाला ते पण व्हील "
भजन : "इसको लेक्के जाउं तो काम मैं आंट लाग जागी"
तंगी : "भजनभाउ भरल्या गुणीत चार दाणे माझे बी टाक "
भजन :"म्यै अगाऊ बोल दित्ता अल्लूणी लाग्गी तो म्यै रस्ते पें फेक देवा "
"औळ-सौळको काम कोणी ह्यों "
मान हलवत...
"मारे गळामे बर्रा. डाल दिया तंगभद्रा तू बागर छ्योरी हो तो बात करो."
सिगरेट फेकत ...
"बचुरी है.ये बिलकूल बच्यकी...."
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तुंगी आणि बच्यकीचा प्रवेश. तुंगी तिला मुंबईला पाठवायला आतूर झाली आहे.
भजनलाल तुंगी आणि बच्यकीच्या मध्ये उभा आहे.
"नाराज नही होणा तंगभद्रा "
.काही नोटा दोघींच्या मध्ये डान्स बारच्या स्टाईलने उधळतो.आणि मागे वळतो.
दोघीही नोटा वेचायला एकाच वेळी वाकतात.
बच्यकी आणि तुंगीची टक्कर होते. दोघीही पुन्हा एकमेकीसमोर उभ्या राहतात.
बच्यकीचे दात तुंगीच्या कपाळावर लागून रक्त आलं आहे.
तुंगी एक क्षण रागानी बघते आणि दुसर्‍या क्षणी हसते.
"वाकलीस ना वेचायला. वाक. वाक. वाकशील तर कमवशील."
"खाकलीस तर मरशील."
बच्यकी अचानक घाबरली आहे.
"आये मी नाइ ना जात."
तुंगीच्या डोळ्यात आग आहे.
"बोल पुन्हा बोल"
"आलीसा माघारी तर बेचक्यात इंगळ घालीन"
बेच्यकीला दूर लोटते.
ती भडभडा ओकते.
बाहेरून भजनलालचा आवाज येतो.
"ए बचकी..... ए मिचकू ...ए मटठो चल्लो बैठो गाडीमें.."
बच्यकी आईकडे पाठ फिरवते.
पुन्हा एकदा भजनलालचा आवाज येतो.
"ए बच्यले .ए बच्यकी ए बच्यकी......
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भजनलाच्या ट्र्क मध्ये चार पाच मुली आणि बच्यकी मुंबईकडे निघाल्या आहेत.
हे गाणे चार पाच कडव्याचे आहे पण एकेका मुक्कामानंतर पुढे पुढे जाते आहे आणि भजनलालच्या बाजूची मुलगी बदलत जाते आहे.
"हत्था मारे किन्नर डायवर मारे पव्वा
हट जा छोरी चांच मारे काला काकाकव्वा "

काले जामुनकी मंडी उथ्थे जा रही गड्डी
किन्नर राखे टोकरी डायवर चाटे रबडी

अलट पलट कर डायवर बोले आगी मेरी बाडी
किन्नर बेठो आडमे छोरी बण जा घोडी
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इथे एक जंपकट आहे.
हिदायत सोबत बच्यकीचा पहीला इंटर व्ह्यु.ती हिदायतला यशस्वी फिल्म रायटर समजते आहे पण हळूहळू तिला समजतं ही हिदायत पण हारलेला माणूस आहे. संभाषण संपेपर्यंत बेच्यकीच्या आवाजात निराशा येते आहे

"तुझा बाप ?
माझा बाप ? आम्ही बापाला बा म्हण्तो.
हम्म...
तो शेतकरी होता.
आमच्या कडे दुष्काळ होता
दुष्काळ ?
अकाल ??
हो.
बाजरी -जुंधळा इतकीच शेती.
नहर नही था ?
नाही पाट होता पन पाटाचं पाणी सावकाराच्या शेताला.
मग कधी बाजरी उभीच जळायची.जोंधळ्याचा दाणा काळा पडायचा.
हसू नकस.
नही बाबा मै नही हसता फिर ?
काही नाही. खावटीचे पैशे-सोसायटी -सगळे पैशे संपले की सावकार .
ब्याज ?
शंभराला धा रुपये.
फीर ?
फिर क्या घंटा .
मतलब ?
पिक आलं तर पैशे नाहीतर आणखी उधार ?
और जादा उधार ?
तर..आणखी उधार म्हणजे बुराईला झाटे
धा वर्सं झाली. बा बाजारात गेला. हातात पैसा आला
मग सावकार उभाच त्याला दिले मग सोसायटी कापली.
घरी येताना विचारत होता. आता र्‍हायल्या पैशात
एक महीन्याचा राशनपानी.
मग परत उधार
फिर क्या ?
एका महीन्याचा राशनपानी किंवा पंधरा दिवस दारु -नाहीतर एंड्रीनचा डब्बा.
फिर ?
अरे फिर -फिर काय .डोकं फिरेल या फिर फिरनी
फिरभी फिर क्या हुआ?
कुछ नही उसने एंड्रीन पी लिया .
अभी मेरेको बताव तुम क्या करते ?
मै ? मै तो भाग लिया घरसे .आया बोंबेमे.
डरपोक है तू. एकदम गांडू. भगोडा. म्येरेको लगा रायटर रायटर है तो ....
मिलेगी अच्छी स्टोरी मिलेगी. फिर एक रातमे देख ...
एक रातमे क्या होगा ?
हजारो राते दैखी म्यै इधर एक मर्द शोधावा तर दहा गांडू भेटतात .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज इतकेच पुरे .. पण वासकसज्जा कादंबरी मला आजच्या काळात पुरेशी वाटली नाही म्हणून आधुनिकीकरण केले.
सवाद जर खटकले तर संपादक मंडळाला ते संपादीत करण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो जरूर वापरावा.

नाट्यमाध्यमवेध

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

9 Feb 2014 - 4:59 pm | किसन शिंदे

जळजळीत वास्तव. कादंबरी माहिती नाही पण वरील संवादांमुळे कादंबरीचा एकुण गाभा लक्षात आला. चित्रपट बनायला हवा होता खरचंच..

मुक्त विहारि's picture

9 Feb 2014 - 5:24 pm | मुक्त विहारि

हेच म्हणतो

जेपी's picture

9 Feb 2014 - 5:46 pm | जेपी

कादंबरी हुडकावी लागेल .

वाचनालयात उपलब्ध असेल तर मिळेल.

आदूबाळ's picture

9 Feb 2014 - 8:51 pm | आदूबाळ
सुहास झेले's picture

9 Feb 2014 - 6:08 pm | सुहास झेले

निशब्द... !!

कादंबरी वाचेन नक्कीच....

आदूबाळ's picture

9 Feb 2014 - 8:50 pm | आदूबाळ

हं...

जॅक डनियल्सने त्याचा असलाच एक अनुभव सांगितला होता, त्याची आठवण झाली.

पुभाप्र.

सुवर्णमयी's picture

11 Feb 2014 - 9:33 pm | सुवर्णमयी

हिदायतला यशस्वी फिल्म रायटर समजते आहे पण हळूहळू तिला समजतं ही हिदायत पण हारलेला माणूस आहे

ह्म्म
उत्तम झाले आहेत संवाद.

मराठे's picture

12 Feb 2014 - 1:43 am | मराठे

>> दुष्काळाच्या गावात योनीशुचीतेचा मंत्र ऐकायला बेंबीवर कान उगवत नाही.
>> सुकाळाच्या गावात लैंगीक शोषणाला शौक म्हणतात.

इथेच अडकलोय अजून.

पैसा's picture

13 Feb 2014 - 11:05 am | पैसा

असं खरंच घडत असेलही. आपल्या ओळखीच्यापेक्षा फार वेगळं जग आहे हे. कादंबरी वाचताना त्यातलं दैन्य, दु:ख जास्त जाणवतं. नग्नता प्रत्यक्ष दिसत नाही त्यामुळे त्यातलं मॅटर जास्त भिडतं. पण त्याचा सिनेमा करताना दृश्यावर जास्त भर दिला तर तोच प्रसंग जास्त बीभत्स वाटू शकतो. या विषयावर सिनेमा करायचा तर तो विषय पेलणारा तसाच समर्थ दिग्दर्शक हवा. इतक्या बोल्ड विषयावर मराठीत संयमित सिनेमा कोणी करू शकेल का हा प्रश्न आहे. वास्तव आणि बीभत्सपणा यातली सीमारेषा सांभाळणे कठीण.

कवितानागेश's picture

13 Feb 2014 - 11:17 am | कवितानागेश

हम्म..
खरं तर बरेचसे शब्द कळले नाहीयेत.

साती's picture

13 Feb 2014 - 3:59 pm | साती

मला माहिती आहेत तेवढे अर्थं इथे सांगते.

प्यारे१'s picture

13 Feb 2014 - 4:07 pm | प्यारे१

व्यनि करावा असं सुचवतो.
उगा 'बालमनां'वर वाईट परिणाम नकोत.

चिगो's picture

13 Feb 2014 - 12:08 pm | चिगो

आपल्या अनुभवविश्वाबाहेरचे जग किती दाहक आहे, ह्याचा अस्सल नमुना..

प्यारे१'s picture

13 Feb 2014 - 1:01 pm | प्यारे१

भीषण, अंगावर येतंय असं...!

स्वाती दिनेश's picture

13 Feb 2014 - 1:06 pm | स्वाती दिनेश

एका वेगळ्या जगातलं जळजळीत वास्तव!
स्वाती

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Feb 2014 - 1:45 pm | राजेंद्र मेहेंदळे

त्या दुनियेत काय चाल्लयं...आणि आपण बसलोय शहरात टोलनाके फोडायच्या बातम्या बघत...जसे काय आयुष्यात दुसरे काही उरलेच नाहिये

जयवंत दळवी आणि तेंडुलकरांनी हे मांडलंय अगोदर .

खटपट्या's picture

15 Feb 2014 - 8:57 am | खटपट्या

वाचून एक तास झाला. सारखा सारखा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतोय.
सुन्न….

रामदास काका… तुम्हाला भेटायचं एकदा

तिमा's picture

15 Feb 2014 - 10:05 am | तिमा

संवाद फार प्रभावी झाले आहेत. तुम्ही नक्कीच चांगले संवाद-पटकथा लेखक व्हाल. एकदा बसलं पाहिजे तुमच्या आणि बाकार्डीच्या सोबत.

NAKSHATRA's picture

22 Jan 2021 - 8:07 pm | NAKSHATRA

वास्तव आणि बीभत्सपणा यातली सीमारेषा सांभाळणे कठीण.

NAKSHATRA's picture

22 Jan 2021 - 8:10 pm | NAKSHATRA

वास्तव आणि बीभत्सपणा यातली सीमारेषा सांभाळणे कठीण.